Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharti Chapter 10 आप्पांचे पत्र
Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 10 आप्पांचे पत्र Textbook Questions and Answers
कृति
कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…


(ii)
उत्तर:


(अ) आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त – ………………………………….
(१) हृदयाची धडधड वाढते.
(२) कपाळावरच्या आठ्या वाढतात.
(३) विदयार्थ्याचे गुण वाढतात.
आप्पांच्या मते, चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.
(आ) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा – ………………………………….
Solution & Step-by-Step Answer:
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा तो चांगलं काम करतो.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. (अ) आप्पांचे शिक्षणप्रेम – …………………………………. (आ) स्वच्छता – ………………………………….
Solution & Step-by-Step Answer:
(अ) आप्पांचे शिक्षणप्रेम: मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात, ते खिडकीतून ऐकत असतो. (आ) स्वच्छता: आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो.
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
चौकटी पूर्ण करा. आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे ओळखा. (अ) ती लगबगीने घरी पोहोचली. (आ) जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो. (इ) आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.
Solution & Step-by-Step Answer:
क्रियाविशेषणे – (i) लगबगीने (ii) सहज (iii) आज.
प्रश्न 8
Maharashtra Board Solution
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये शोधा. (अ) पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली. (आ) तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय. (इ) छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता. (ई) परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.
Solution & Step-by-Step Answer:
शब्दयोगी अव्यये – (i) वर (ii) समोर (iii) बरोबर (iv) मुळे.
प्रश्न 9
Maharashtra Board Solution
स्वमत. (अ) ‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे, हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते.
आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल, जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल, वेगळ्या शब्दांत, ‘लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.’ वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे. (आ) ‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले ? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा. (इ) आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र Additional Important Questions and Answers कृती १: (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कारणे लिहा: (i) आप्पांना विदयार्थ्यांशी बोलायची कधी संधीच मिळाली नाही; कारण (ii) शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण
Solution & Step-by-Step Answer:
(i) आप्पांना विद्यार्थ्यांशी बोलायची कधी संधीच मिळाली नाही; कारण विद्यार्थी नेहमी घाईत असायचे. (ii) शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण त्यांना शिपाई हे पद कमी महत्त्वाचे वाटते.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृत्या पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
कृती २: (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विधाने पूर्ण करा: (i) बिस्मिल्लाह खान जगभर लोकप्रिय झाले; कारण ………………………………. (अ) त्यांनी जगभर सनई वादनाचे कार्यक्रम केले. (ब) हिंदी चित्रपटांतील खूप गाण्यांसाठी सनई वादन केले. (क) ते खूप मन लावून सनई वाजवायचे. (ड) त्यांचे वडील फार मोठे सनई वादक होते.
Solution & Step-by-Step Answer:
(i) बिस्मिल्लाह खान जगभर लोकप्रिय झाले; कारण ते खूप मन लावून सनई वाजवायचे.
(ii) शाळेतले शिक्षक जे शिकवत, ते आप्पा खिडकीतून ऐकत असत; कारण ……………………………….
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आप्पांचे पुढील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा: (i) उत्कृष्टतेचा ध्यास: …………………………….
Solution & Step-by-Step Answer:
(i) उत्कृष्टतेचा ध्यास: तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे, असं मला वाटतं.
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
अनेकवचन लिहा: |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
पुढील शब्दांतून विशेषणे व विशेष्ये यांचे दोन गट करा: अर्धा, मुली, खूप, रुपये, तीव्र, किरण, वेडी, माणसे, लाडू, पक्का, दोन, वाटा, चांगले, रंग, अक्षर, लहान.
Solution & Step-by-Step Answer:
विशेषणे: अर्धा, खूप, तीव्र, वेडी, पक्का, दोन, चांगले, लहान, विशेष्ये: मुली, रुपये, किरण, माणसे, लाडू, वाटा, रंग, अक्षर.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पुढील वाक्यांतील क्रियापदे ओळखून लिहा: (i) तो चालताना पाय घसरून पडला. (ii) खाता खाता उष्टे हात त्याने अंगाला पुसले. (iii) तो जेवून आला.
Solution & Step-by-Step Answer:
(i) पडला (ii) पुसले (iii) आला.
उतारा क्र.२ कृती १: (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कारणे लिहा: |
(ii) एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला आपले पैसे दिले; कारण
एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला आपले पैसे दिले; कारण त्या मुलांना नाल्यावरच्या एका तुटक्या पुलावरून जावे लागे.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
चूक की बरोबर ते लिहा: (i) आजकाल मुलांना कार्टून्सची नावे पाठ असतात, पण झाडांची नावे विचारली, तर दहासुद्धा सांगता येणार नाहीत. (ii) माणसे कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही. (iii) आप्पांचा मुलांवर तितकासा विश्वास नाही.
Solution & Step-by-Step Answer:
(i) बरोबर (ii) बरोबर (iii) चूक.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा: (सराव कृतिपत्रिका -२) (i) पुस्तकाच्या पानांत डोक्याचं खादय असतं. (ii) एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे.
Solution & Step-by-Step Answer:
(i) पुस्तकाच्या पानांत ज्ञान साठवलेले असते. (ii) शाळेतला एकतरी विदयार्थी लेखक झाला पाहिजे.
कृती २: (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
चौकटी पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
(i) (सराव कृतिपत्रिका-२)
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पुढील वाक्यांत योग्य वाक्प्रचार योजून वाक्ये पुन्हा लिहा: (i) समोरचा वाणी धान्यात भेसळ करतो, लोकांच्या बोलण्यातून कळते. (ii) गावातल्या स्वच्छता मोहिमेच्या यशाबाबत लोक गुरुजींचीच स्तुती करतात. (iii) ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम यशस्वी करून ग्राम पंचायतीने लोकांचे दुःख दूर केले. (iv) मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे स्वरूपच बदलून जाईल.
Solution & Step-by-Step Answer:
(i) समोरचा वाणी धान्यात भेसळ करतो, असे कानावर पडते. (ii) गावातल्या स्वच्छता मोहिमेच्या यशाबाबत लोक गुरुजींचेच नाव घेतात. (iii) पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम यशस्वी करून ग्राम पंचायतीने लोकांच्या डोळ्यांतले पाणी पुसले. (iv) मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे चित्रच बदलून जाईल.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
कंसातील प्रत्यय जोडून होणारे पूर्ण रूप लिहा: (i) लिहिणे (चे) (ii) कॉलेज (त) (iii) शिपाई (नी) (iv) सगळे (हून)
Solution & Step-by-Step Answer:
(i) लिहिणे (चे) = लिहिण्याचे (ii) कॉलेज (त) = कॉलेजात (iii) शिपाई (नी) = शिपायांनी (iv) सगळे (हून) = सगळ्यांहून.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पुढील शब्दांचा संधिविग्रह करा: (सराव कृतिपत्रिका-२) शब्द – संधिविग्रह (i) ग्रंथालय …………………………….. (ii) महोत्सव ……………………………..
Solution & Step-by-Step Answer:
(i) ग्रंथालय = ग्रंथ + आलय (ii) महोत्सव = महा + उत्सव
कती ४: (स्वमत / अभिव्यक्ती)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
लेखकांनी उताऱ्यात व्यक्त केलेला पर्यावरणविषयक विचार तुमच्या शब्दांत व्यक्त करा. (सराव कृतिपत्रिका-२)
Solution & Step-by-Step Answer:
लेखकांनी आपले पर्यावरणविषयक विचार तळमळीने सांगितले आहेत. त्यांच्या मते, प्रत्येकाने दहा झाडे लावली, तरी आपला देश निसर्गसंपन्न होईल आणि हे खरेच आहे. या निसर्गसंपन्नतेचा देशाला, म्हणजेच आपणा सर्वांनाच फायदा होईल. पर्जन्यमान वाढेल. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळाच्या छायेतून देश मुक्त होईल, मात्र त्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला जमेल तेवढे काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. आपल्याला पाणी निर्माण करता येत नाही, हे खरे आहे. पण अपव्यय तरी टाळू शकतो की नाही? प्रत्येकाने वाया जाणारे पाणी वाचवले तरी लक्षावधी लिटर पाणी वाचेल.
वाचलेले पाणी तहानेने व्याकूळ झालेल्यांना मिळेल; पाण्यासाठी आ वासून बसलेल्या पशुपक्ष्यांना मिळेल; सुकून चाललेल्या वृक्षवेलींना मिळेल. हे कळण्यासाठी सर्वांनी निसर्गाशी प्रेमाने वागायला शिकले पाहिजे. म्हणूनच लेखक सांगतात की, सर्वांनी फुलपाखरांचा अभ्यास केला पाहिजे. मधमाश्यांच्या पोळ्यापासून लांब न जाता त्याचा अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्या अवतीभवतीच्या निसर्गाशी आत्मीयतेने वागल्यास पर्यावरण रक्षणाचे अनेक मार्ग दिसतील, असे लेखक सुचवतात. व्याकरण व भाषाभ्यास कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी… १. समास: पुढील समासांचा प्रत्येकी एक सामासिक शब्द लिहा: २. अलंकार: (१) पुढील ओळीतील उपमेय, उपमान व अलंकार ओळखा: परीहून सुंदर असे ही चिमुरडी गालावर विलसे चांदण्याची खडी (२) पुढील वैशिष्ट्यांवरून अलंकार ओळखा व समर्पक उदाहरण दया: (सराव कृतिपत्रिका-१) ३. वृत्त:
(२) वृत्त ओळखा:
४. शब्दसिद्धी: (२) पुढील अभ्यस्त शब्द पूर्ण करा: (३) कंसातील शब्दांचे पुढे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा: (सराव कृतिपत्रिका-३) ५. सामान्यरूप: (२) पुढील शब्दसमूहातील शब्दांची योग्य सामान्यरूपे लिहा: (सराव कृतिपत्रिका-३) ६. वाक्प्रचार: पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा: भाषिक घटकांवर आधारित कृतीः १. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा: (i) चांगले x ……………….. (ii) जास्त x ……………….. (iii) ओळख x ……………….. (iv) आवश्यक x ……………….. (v) पूर्वज x ……………….. (vi) शिस्त x ……………….. (vi) गुण x ……………….. (viii) राग x ………………..
Solution & Step-by-Step Answer:
(i) चांगले x वाईट (ii) जास्त x कमी (iii) ओळख x अनोळख (iv) आवश्यक x अनावश्यक (v) पूर्वज x वंशज (vi) शिस्त x बेशिस्त (vii) गुण x अवगुण (viii) राग x लोभ.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
गटात न बसणारा शब्द शोधा: (i) कावळा, कबुतर, चिमणी, ससा, गरूड. (ii) अजंठा, शाळा, वर्ग, शिक्षक, विदयार्थी.
Solution & Step-by-Step Answer:
(i) ससा (ii) अजंठा.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा: (i) समुद्रकिनारी → [ ] [ ] [ ] [ ] (ii) फुलपाखराच्या → [ ] [ ] [ ] [ ]
Solution & Step-by-Step Answer:
(i) समुद्रकिनारी → [समुद्र] [नारी] [सरी] [किनारी] (ii) फुलपाखराच्या→ [खरा] [राख] [पारा] [पाल]
(१) अचूक शब्द लिहा:
Solution & Step-by-Step Answer:
(i) निसर्ग
(ii) निष्पर्ण (iii) मुहूर्त (iv) क्रीडांगण. (२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा: ३. विरामचिन्हे: पुढील परिच्छेदातील विरामचिन्हे ओळखा: ४. पारिभाषिक शब्द: पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा: ५. अकारविल्हे (२) दिलेल्या सूचनांनुसार पुढील शब्दकोडे सोडवा:
|











