Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharti Chapter 7 गवताचे पाते
Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 7 गवताचे पाते Textbook Questions and Answers
कृति
कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…


(ii)
उत्तर:


(iii)
उत्तर:


(iv)
उत्तर:



प्रश्न 5
Maharashtra Board Solution
खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? (अ) ज्ञानी x सुज्ञ (आ) निरर्थक x अर्थपूर्ण (इ) ऐच्छिक x अनिवार्य (ई) दुर्बोध x सुबोध
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
ज्ञानी x सुज्ञ.
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
स्वमत.
|
(अ) ‘माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :
माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावीः परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत… वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी घरलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.
(आ) गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते?
उत्तर :
मी गवतपाते असतो, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते :
“आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पाहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्या वेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हांला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात, मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत. त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत, आपणा प्रत्येकाला स्वत:चेच बरोबर आहे, असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असे वाटते.
आता हेच पाहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हांला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो. म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत, असे तुम्हाला वाटते. पण आजोबा, आम्ही आत्ता, या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उदयाचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत, आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही.
आता हे सगळे राहू दया. तुम्ही सांभाळून सांभाळून चाला. स्वत:च्या प्रकृतीला जपा.
(इ) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.
उत्तर :
हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.
पट… पटः.. पट…
त्यांचा तो पट… पट… पट… असा कर्णकटू आवाज …
तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, “अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात! लागलंबिगलं तर नाही ना?”
पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, “काय रे बाळा ? तुला त्रास झाला का रे?”
“छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?”
“काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना! काय करणार?”
“असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन – तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही!”
हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले.
ते पन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात E विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे झाडांवर पाने सळसळत होती… पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!
ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला. पटापट जायला हवं. एखादया आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित!
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा. “…एक विचारू?” उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले. “हं. “मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचंय… पण..” “पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?” “…हो.” “अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या..” “पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?” “हो! आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात…” …आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला! |
– (गुलमोहर)
(टीप – रूपक कथेचा भावार्थ परीक्षेकरिता समाविष्ट केलेला असल्याने तोही पाठाचा भाग म्हणून अभ्यासावा.)
रोप-वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपांत अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य प्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदेकानून, नीती-नियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील, असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील, अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही.
Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 7 गवताचे पाते Additional Important Questions and Answers
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती १ : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
नावे लिहा : (i) झाडावरून गळून पडणारी – (ii) कर्णकटू आवाजाने जागे होणारे – (iii) पानाने गवतपात्याला दिलेली उपमा – (iv) संजीवक स्पर्शाने गवतपात्याला जागे करणारा (v) नव्या गवतपात्याचा जीव खाऊन टाकणारी –
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
(i) झाडावरून गळून पडणारी – पिकलेली पाने (ii) कर्णकटू आवाजाने जागे होणारे – गवतपातो (iii) पानाने गवतपात्याला दिलेली उपमा – चिडखोर बिब्बा (iv) संजीवक स्पर्शाने गवतपात्याला जागे करणारा – वसंतऋतू (v) नव्या गवतपात्याचा जीव खाऊन टाकणारी – गळणारी पाने
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
वैशिष्ट्ये लिहा : (सराव कृतिपत्रिका-३)
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पुढील वाक्यांच्या साहाय्याने गवताचे पाते आणि पिकलेले पान यांच्या वृत्तीतील फरक स्पष्ट करा व तक्ता पूर्ण करा : (सराव कृतिपत्रिका-३) (i) गोड स्वप्न बघणारे (ii) स्वत:ला रसिक समजणारे (iii) कर्णकटू आवाज सहन न होणारे (iv) स्वत:ला उच्चपदस्थ समजणारे गवताचे पाते – पिकलेले पान (i) …………………… – …………………… (ii) …………………… – ……………………
Solution & Step-by-Step Answer:
गवताचे पाते – पिकलेले पान (i) गोड स्वप्न बघणारे – (i) स्वत:ला रसिक समजणारे (ii) कर्णकूट आवाज सहन न होणारे – (ii) स्वत:ला उच्चपदस्थ समजणारे
कृती २ : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
रिकाम्या चौकटी भरा : (i) गवतपात्याने उराशी बाळगलेली भावना – (i) सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे (iii) तरुण पिढी बेजबाबदार आहे, असे मानणारी (iv) वडील पिढी कटकटी असते, असे मानणारी –
Solution & Step-by-Step Answer:
(i) गवतपात्याने उराशी बाळगलेली भावना – उच्च पदाचा खोटा अभिमान (ii) सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे – गवतपाते (iii) तरुण पिढी बेजबाबदार आहे, असे मानणारी – वडील पिढी (iv) वडील पिढी कटकटी असते, असे मानणारी – तरुण पिढी
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृत्या पूर्ण करा :
Solution & Step-by-Step Answer:
कृती ३ : (व्याकरण)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पुढील शब्दांच्या अर्थछटा व्यक्त करणारे शब्द लिहा : (प्रत्येकी ४) (i) कर्णकटू (ii) कटकट (iii) चिडखोर (iv) चिमुकला (v) क्षुद्र.
Solution & Step-by-Step Answer:
(i) कर्णकटू : कर्कश, भसाडा, कर्णकठोर, बेसूर. (ii) कटकट : किटकिट, पिटपिट, किरकिर, भुणभुण. (iii) चिडखोर : चिडका, चिडचिडा, चिरचिरा, रागीट. (iv) चिमुकला : चिमणा, चिटुकला, सानुला, चिमुरडा. (v) क्षुद्र. : क्षुल्लक, क:पदार्थ, कस्पटासमान, हीन.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
मोठा आवाज व्यक्त करणारे चार शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
(i) घडामधुडुम (ii) दणदणाट (iii) खणखणाट (iv) घणघणाट.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
मंजूळ आवाज व्यक्त करणारे चार शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
(i) रुणझुण (ii) छुमछुम (iii) कुहुकुहु (iv) किलबिल.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
पुढील शब्दांसाठी तुमच्या मते, योग्य अशी प्रत्येकी दोन विशेषणे लिहा : (i) थंडी (ii) ऊन (iii) पाऊस
Solution & Step-by-Step Answer:
(i) थंडी : गुलाबी, झोंबरी. (ii) ऊन : रणरणणारे, दाहक. (iii) पाऊस : मुसळधार, रिमझिम.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
पुढील नामांसाठी पाठातील विशेषणे शोधा : (i) फळे : (ii) संगीत : (iii) आंबा : (iv) मंत्र :
Solution & Step-by-Step Answer:
(i) फळे : पिकलेली (ii) संगीत : कर्णकटू (iii) आंबा : गोड (iv) मंत्र : संजीवक
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
पुढील गटांमधील कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? (i) (१) आरंभ – अखेर (२) उदय x अस्त (३) सुरुवात x सांगता (४) समाप्ती x शेवट
Solution & Step-by-Step Answer:
(i) समाप्ती x शेवट
(ii) (१) राग x प्रेम (iii) (१) असत्य x सत्य कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाववैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहा. उत्तर : तरुण पिढीचे नेहमी असेच असते. आत्ता या क्षणी. जे दिसते, वाटते, तेच खरे. वर्तमानकाळ हाच खरा. उदया-परवा काय होईल ते महत्त्वाचे नाही. जे जे वाटते ते ते उत्स्फूर्तपणे करावे. वडील पिढीला हे असे वागणे पटत नाही. आणि म्हणून तरुणांना वडील पिढीचा अडथळाच वाटतो. त्यांची कटकट वाटते. |
वडील पिढीला वाटते की, तरुण पिढी फक्त मौजमजा करण्यात, सुखविलासात लोळण्यात धन्यता मानते. आयुष्याचा खरा अर्थ या तरुणांना कळलेला नसतो. मात्र, आपण तरुण असताना काय करीत होतो, हे प्रौढांना आठवत नाही. किंबहुना ते लक्षात घ्यायची त्यांची तयारीच नसते. नेमके हेच आता तरुण असलेल्यांच्या बाबतीतही घडते. वडील पिढीविरुद्ध तक्रार करणारे तरुण जेव्हा आईबाबा होतात, तेव्हा ते स्वतःच्या मुलांशी वडील पिढीप्रमाणेच वागतात. म्हणजे ‘येरे माझ्या मागल्या!’ असे असूनही कोणीही वास्तव शोधण्याचा प्रयत्न करीत नाही.
व्याकरण व भाषाभ्यास
कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती :
१. समास :
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा :
(i) प्रतिक्षण
(ii) बिनधोक
(iii) लोकप्रिय
(iv) नेआण
(v) रंगीबेरंगी
(vi) बारभाई.









