Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर
Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Textbook Questions and Answers


प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृती पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|



प्रश्न 3
Maharashtra Board Solution
कारणे लिहा. (अ) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण ………………………….
Solution & Step-by-Step Answer:
ः लेखकाला चाचणी परीक्षेची उत्तरपत्रिका घरूनच न्यावी लागे कारण लेखकाची शाळा गरीब होती. फक्त तीन पैसे किंमत असलेली उत्तरपत्रिका शाळा विदयार्थ्यांना देऊ शकत नव्हती.
|
(आ) लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण ………………………….
उत्तरः
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही कारण तिथे फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाई.
(इ) लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण ………………………….
लेखकाला गिरगांवातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही कारण प्रवेश फी ची व्यवस्था होईपर्यंत त्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा. (अ) आपण सगळ्यांनी …………………………. मदत केली पाहिजे. (आई)
Solution & Step-by-Step Answer:
आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.
(आ) आमच्या बाईंनी प्रमुख …………………………. आभार मानले. (पाहुणे) (इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी …………………………. रुजू झाला. (नोकरी)
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’ प्रस्तुत वाक्यातील अलंकार (१) (१) उपमेय (२) उपमान |
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
स्वमत. (अ) ‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, हा प्रयोग दाखवून भावे सर लेखकाला म्हणाले ‘माशेलकर तुमची उर्जा एकत्र करा. काहीही जाळता येतं.’ – याचाच अर्थ असा की ज्या विषयाचा ध्यास घेतला आहे, त्यात पूर्णपणे स्वत:ला झोकून दया, कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता. साध्य करू शकता. खरोखरच आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून मिळालं. त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजलं. भावे सरांच्या शब्दांतून त्यांना पुढे जाण्याची, प्रगती करण्याची जबरदस्त ऊर्जा मिळाली.
|
(आ) शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा
उत्तरः
वयाच्या सहाव्या वर्षीच लेखकांचे वडील वारल्यामुळे त्यांना व त्यांच्या आईला गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’ तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये रहावे लागले. तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली असताना. दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आईबरोबर शिक्षणाची आस असलेल्या लेखकांना रहावे लागले. यावरून परिस्थितीशी मिळते जुळते घेत आलेल्या संकटांशी सामना करणे हा गुण त्यांच्यातून दिसून येतो. महापालिकेच्या खेतवाडीतील शाळेत वयाच्या बारा वर्षांपर्यंत शिक्षण घेत असताना त्यांना पायात चप्पलही घालायला मिळाली नाही. अशा परिस्थितीत ते शाळा शिकले. यावरून शिक्षणाविषयीची त्यांची चिकाटी, आस्था या गुणांचे दर्शन घडते.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती तेवढेही रुपये त्यावेळी त्यांच्याकडे नव्हते. प्रवेश फी नसल्याने आईच्या ओळखीच्या बाई (माऊली) मदतीला धावून आली पण तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. शेवटी कसाबसा युनियन हायस्कूल मध्ये प्रवेश मिळताच लेखकांचा पुढील प्रवास सुरु झाला. छोटाशा खोलीत पूरक वातावरण नसताना लेखकांनी आपले शिक्षण थांबवले नाही, तर अशाही वातावरणात त्यांच्या जिद्दीची दाद दयावीशी वाटते. ते पुढे मिळते जुळते घेत शिकतच राहिले.
त्याचवेळी लेखकांच्या हळव्या मनावर त्यांच्या शिक्षकांच्या शिकवण्याचा जो परिणाम झाला त्यामुळे त्याच्या अभ्यासाचा पाया पक्का झाला. शिक्षणाबददल त्यांना अजून ओढ वाटू लागली.
शिक्षणाशिवाय या जगात तरणोपाय नाही हे कळल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना वाटेल त्या परिस्थितीत शिकवण्याचे ठरवले. कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्यांच्या वह्या करायची. अखंड पेन्सिल न मिळाल्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहित गेले. एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे प्रयोगाने सिदध करून दाखवले व माशेलकरांना त्यांच्यातील उर्जाशक्तीचे रुप ओळखण्यास प्रवृत्त केले. त्यावरून त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.
या सर्व प्रसंगांतून लेखकाचा आत्मविश्वास वाढवून दिला. जगण्याचे भान मिळाले. आणि पुढे लेखक फार मोठे वैज्ञानिक संशोधक झाले.
(इ) डॉ. माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते, ते प्रसंग पाठाधारे लिहा.
उत्तरः
स्वतःचे वडील वारल्यावर आई त्यांना घेऊन मुंबईस खेतवाडीतील देशमुख गल्लीत एका छोट्यासा पहिल्या माळ्यांवर राहिली तरीही लेखकांनी आईस कधी नाही म्हटले नाही. त्याही स्थितीत ते आईबरोबर राहिले.
हायस्कूलला शिकण्यास गेल्यावर एकवीस रूपये फी पुढील कॉलेजसाठी प्रवेश मिळवण्यासाठी नव्हती तरीही धीर न सोडता आजूबाजूच्या बिहाडांतील काही कामे करून तिने प्रवेश फीची व्यवस्था केली व प्रवेश घेतला. मात्र अशा वातावरणात लेखकांनी जिद्दीने अभ्यास केला.
उत्तरपत्रिकेची फी भरण्यासाठीचे फक्त तीन पैसे एवढेही पैसे त्यांच्याकडे नसल्याने मग आईने गिरगावातील अनेक कामे केली. प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. हे पाहून लेखकांच्या मनातील जिद्द अजून वाढली व ते अति जोमाने शिक्षण घेऊ लागले. इत्यादी उदाहरणांतून माशेलकरांची मातृभक्ती ठळकपणे दिसून येते.
(ई) ‘माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
प्रत्येकाच्या जीवनात आपल्या शिक्षकांचे स्थान फार महत्त्वपूर्ण असते. माझ्याही जीवनात शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली, आत्मविश्वासाने पुढे जाण्याची शक्ती मिळाली. मी आज ज्या मोठ्या पदावर पोहोचलो आहे ते केवळ माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच, म्हणून माझ्या जीवनात माझ्या शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे.
Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Additional Important Questions and Answers
प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती १: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा, |

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
ओघ तक्ता पूर्ण करा. |

प्रश्न 3. योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. |
(i) ……………………….. हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. (ताई, माई, आई, बाई)
(i) आई
(ii) आमचे मूळ गाव ……………………….. गोव्यातील माशेल. (उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण)
उत्तर:
(ii) दक्षिण
(iii) मी आणि माझी आई ……………………….. येऊन पोहोचलो. (गोव्यात, अमरावतीत, मुंबईत, पुण्यात)
उत्तर:
(iii) मुंबईत
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
कोण ते लिहा. (i) दारिद्र्याशी संषर्घ करणारी – लेखकाची आई (ii) शाळेत कसा जाऊ? असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारे – लेखक माशेलकर
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
घटना आणि परिणाम लिहा. |

प्रश्न 4. एका वाक्यात
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.
|
(i) लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव काय होते?
उत्तरः
लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव ‘युनियन हायस्कूल’ असे होते.
(ii) लेखक आपल्या आईचे व मामाचे ऋण का मानतात?
उत्तरः
युनियन हायस्कुल व त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांशी संपर्क यांच्यामुळे आला म्हणून लेखक आईचे व मामाचे ऋण मानतात.
(iii) लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व कोण होते?
लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व आई होती.
(iv) उदहनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला कुठे जावे लागले?
उत्तरः
उदरनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला मुंबईला जावे लागले.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.
Solution & Step-by-Step Answer:
(i – आ), (ii – ई), (iii – अ), (iv – इ)
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा. (i) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. (ii) माझे बालपण तिथेच गेले. (iii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले. (iv) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले.
Solution & Step-by-Step Answer:
(i) माझे बालपण तिथेच गेले. (ii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले. (iii) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. (iv) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. |

कृती ३ : स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
लेखकाच्या बालपणीच्या काळाचं वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः लेखकाचे बालपण गोव्यातील माशेल या गावी गेले. आई, वडील आणि त्यांचे मामाही याच गावात राहात होते. माशेलच्या मैदानावर खेळल्याच्या, तिथल्या पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी त्यांना आठवतात. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांना व त्यांच्या आईला माशेल सोडून मुंबईला यावे लागले.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आपल्या शालेय शिक्षणातील अडचणींचे वर्णन लेखकाने कसे केले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः वयाच्या ६व्या वर्षी लेखकाचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना माशेल सोडून मुंबईला यावे लागले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली होती. शिक्षण घेण्यासाठी लेखक खूप उत्सुक होते. पण फी भरणे शक्य नसल्यामुळे आपण शाळेत जाऊ शकू की, नाही असे त्यांना वाटत असे.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
माशेलहून मुंबईला आल्यावर लेखकाची व त्याच्या आईची स्थिती कशी होती ते थोडक्यात लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः वडिलांच्या निधनामुळे लेखक व त्यांची आई उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीत ते राहत होते. लेखकाच्या आईकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्यामुळे तिला व लेखकाला खूप गरिबीत दिवस काढावे लागले. शाळेची फी भरणेही त्यांच्या आईला शक्य नव्हते.
|
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
लेखकाची शाळा व शिक्षक यांच्याबद्दल माहिती तुमच्या शब्दात लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः लेखक सहा वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना मुंबईला यावे लागले. त्यांच्या मामांच्या प्रयत्नांनी व आईच्या कष्टाळूवृत्तीमुळे त्यांचे शिक्षण सुरू झाले. गिरगावातल्या युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. या शाळेतील सर्वच शिक्षक अत्यंत प्रेमळ व आपुलकीनं संस्कार करणारे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य ती दिशा मिळाली.
|
प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. |
कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कारणे लिहा. |
(i) माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण...
माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण त्यांना लेखकाच्या शिक्षणाची सोय करायची होती.
(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण...
उत्तरः
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती त्यामुळे ती लेखकासाठी चप्पल खरेदी करू शकत नव्हती.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 3
Maharashtra Board
Solution & Step-by-Step Answer:
एका वाक्यात उत्तरे लिहा.
|
(i) कोणामुळे लेखकाला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला?










