प्रश्न अ. शङ्करेण संन्यासार्थ कथम् अनुमतिः लब्धा ? उत्तरम् : ‘आदिशङ्कराचार्य:’ या पाठामध्ये शंकराचार्यांच्या जीवनातील दोन प्रसंग उद्धृत करण्यात आले आहेत. पहिल्या प्रसंगात, एका अटळ परिस्थितीत सापडले असताना, संन्यासी बनू इच्छिणाऱ्या शंकराचार्यांना त्यांची माता कशी अनुमती देते, याचे वर्णन आले आहे.
एकदा शंकर स्नानासाठी पूर्णा नदीवर गेले होते. स्नान करत असताना अनपेक्षितपणे एका मगरीने त्यांचा पाय पकडला. वेदना असहा झाल्याने शंकर जोरात ओरडू लागले. तेव्हा त्यांची आई आर्याबा तिथे पोहोचली. अशा दयनीय अवस्थेत शंकराला रडताना पाहून त्याची आई सुद्धा गांगरून गेली.
हा अनावस्था प्रसंग म्हणजे आयुष्याचा शेवट अशी शंकराची समजूत झाली व त्याने संन्यासी होण्याची अतृप्त इच्छा आईकडे बोलून दाखविली. हतबल झालेल्या आबिने मनात नसतानाही ही शंकराची शेवटची इच्छा मानून, संन्यास घेण्यासाठी अनुमती दिली.
In the lesson, आदिशङ्कराचार्यः, two incidents of शंकराचार्य’s life are given. The first incident explains how आदिशङ्कराचार्य, who was keen to become a monk was granted permission by his mother for practising monkship due to an inescapable situation.
Once, it went to पूर्ण river for bathing, a crocodile caught his leg. शंकर screamed loudly with pain. His mother अर्याम्बा came there. Seeing शंकर crying in miserable condition, even his mother got perturbed.
शंकर finding / thinking this situation as the end of his life, expressed his unfulfilled wish to become a monk to his mother and requested her to permit for the same. Unwillingly, helpless अर्याम्बा granted शंकर for monkship, considering this as his last wish.
3. सन्धिविग्रहं कुरुत।
प्रश्न अ. चास्ताम् उत्तरम् : चास्ताम् – च + आस्ताम्।
शंकराचार्य हे आठव्या शतकातील अद्वैत वेदांताचे उद्गाते व भारतीय तत्त्वज्ञ मानले जातात. शंकराचार्यांनी द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी व ज्योतिर्मठ येथे चार पीठे स्थापून त्यांच्या चार मुख्य शिष्यांना पीठासीन आचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली व लोकांना मार्गदर्शन करणे सुरू ठेवले. त्यांनी प्रस्थानत्रयींवर (वेद, उपनिषदे, गीता) विपुल भाष्य लिहिले. तसेच त्यांनी आज प्रचलित असणाऱ्या अनेक काव्यात्मक स्तोत्रांची रचना केली.
‘आदिशङ्कराचार्यः’ या पाठामध्ये त्यांच्या जीवनातील दोन प्रसंग उद्धृत करण्यात आले आहेत. पहिल्या प्रसंगात, एका अटळ परिस्थितीत सापडले असताना, संन्यासी बनू इच्छिणाऱ्या शंकराचार्यांना त्यांची माता कशी अनुमती देते, याचे वर्णन आले आहे. दुसऱ्या प्रसंगातून शंकराचार्यांच्या शिकवणीचा उलगडा होतो. ती शिकवण अशी – जो (कोणी) ज्ञान देतो, तो गुरु मानावा.
शङ्कराचार्य runs an early eigth century Indian philosopher and theologian who consolidated the doctrine of अद्वैत वेदान्त. शङ्कराचार्य is reputed to have founded four mathas (monasteries) at द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी and ज्योतिर्मठ. He placed his primary four disciples to head it and guide people.
He wrote copious commentaries on the vedic canon (ब्रह्मसूत्र). principal उपनिषद् and भगवद्गीता. Also, he composed poetic words in the form of 45, which are prevalant even today. In the lesson, आदिशङ्कराचार्य:, two incidents of his life are given.
The first incident explains how आदिशङ्कराचार्य, who was keen to become a monk was granted by his mother for practising monkship, due to an inescapable situation. The second event unfolds आदिशङ्कराचार्य’s preaching – whosoever imparts knowledge is the preceptor.
परिच्छेदः 1
भारतस्य दक्षिणदिशि ……………… चिन्तामग्ना जाता।
अनुवादः
पहिला प्रसंग :
संन्यासाकरिता अनुमती मिळाली. भारताच्या दक्षिणदिशेस, केरळ प्रदेशात आलुवा नगराच्या जवळ कालडी नावाचे गाव आहे. ते गाव पूर्णा नदीजवळ आहे. तेथे आठव्या शतकात जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म झाला.
शिवगुरु हे त्यांचे वडील आणि आर्यांबा त्यांची आई होती. लहानपणीच त्यांचे वडील शिवगुरु यांचे निधन झाले. त्यामुळे केवळ आईनेच मुलाचे पालनपोषण केले. जेव्हा ते पाच वर्षांचे झाले, तेव्हा मुंज झाल्यावर शिकण्यासाठी ते गुरुंजवळ गेले. तिथे या बालकाने वेद-वेदांगे व विविधशास्त्रे असामान्य वेगाने आत्मसात केली.
अभ्यास संपल्यावर शंकर घरी परतला. घरी परतल्यावर त्यांनी मातृसेवा सुरू केली. आर्यांबा सतत त्याच्या विवाहाचा विचार करत असे. पण मनाने, वाणीने व कर्माने (सांसारिक सुखापासून) विरक्त असलेल्या शंकरने आईकडे संन्यास घेण्याकरिता परवानगी मागितली. शंकराची ऐहिक विषयांतील नावड (अलिप्तता) पाहून आर्यांबा चिंतातुर झाल्या.
First incident :
Received permission for renunciation In the southern direction of India, there is a village named कालडी near आलुवा city in केरळ region. That village is near पृर्णा river. There, the world’s preceptor 1844 was born in eight century CE. His father was शिवगुरु and mother was आर्यांम्बा.
In his childhood itself, his father शिवगुरु passed away. Therefore, the mother alone reared her son. He who was initiated at the age of five approached the preceptor for studying. There, this child acquired knowledge of वेद-वेदाङ्ग and many scriptures with exceptional speed. After completing studies, शङ्कर returned home.
After coming home, he started serving his mother. Mother आर्यांबा always used to think about his marriage. But, शङ्कर who was detached (from worldly objects) by mind (mentally), speech and by his deeds, asked for permission (from his mother) for renunciation. आर्यांबा was distressed seeing the disinterest of शङ्कर in worldly pleasures.
परिच्छेदः 2
एकस्मिन् दिने ……………….. मुनिरभ्यगात्।
अनुवादः
एके दिवशी शंकर पूर्णानदीवर स्नानासाठी गेला. जेव्हा तो स्नान करण्यात मग्न होता, तेव्हा एक मगर तेथे आली.
मगरीने पटकन त्याचा पाय पकडला. तेव्हा शंकर जोरात ओरडला. “आई! मला वाचव! या मगरीपासून मला वाचव!” तो आक्रोश ऐकून, नदीवर पोहोचल्या आर्यांबेने मुलाला मगरीने धरलेले पाहिले.
भीतीने गांगरलेल्या तिनेही रडणे सुरू केले. शंकराने, आईला आर्ततेने विनवणी केली. “हे आई, यापुढे मी जगू शकणार नाही. मरण्यापूर्वी मला संन्यासी होण्याची इच्छा आहे. तेव्हा आता तरी मला अनुमती दे.” मनात नसताना सुद्धा हतबल आई (त्याला) म्हणाली – “बाळा, जशी तुझी इच्छा आहे, तसेच होऊ दे.
आताच संन्यास स्वीकार. माझी अनुमती आहे.” त्याच क्षणी आश्चर्य घडले. देवकृपेने मगरीने शंकराला मुक्त केले. नदीकाठी येऊन त्याने आईच्या चरणांना नमस्कार केला.
नंतर शंकराने आईला संन्यासाचे महत्व समजावून दिले. संन्यासी फक्त एकीचा पुत्र नाही.
हे विशाल जगच, त्याचे घर आहे. ‘हे माते, तू जेव्हा माझी आठवण काढशील, तेव्हा मी तुझ्याकडे येईन’ असे आईला वचन देऊन तो घरातून निघून गेला.
त्यानंतर, गोविन्दभगवात्पादांचे शिष्य होऊन सर्व दर्शनांचे अध्ययन केले. त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेऊन वैदिक धर्म स्थापनेसाठी प्रस्थान केले.
मुनींनी (शंकराचार्यांनी) वयाच्या आठव्या वर्षी चार वेद जाणले. बाराव्या वर्षी सर्वशास्त्रांचे जाणकार झाले. सोळाव्या वर्षी भाष्यांची रचना केली. (आणि) बत्तीसाव्या वर्षी ते स्वगृही (पंचत्वात विलीन) निघून गेले.
One day शंकर went to the river पूर्ण for a bath. When he was busy in taking a bath, a crocodile came there. A crocodile caught his leg swiftly. At that time, ist screamed loudly. “O mother! Please save me. Save me from (this) crocodile.”
Listening to the loud cry, अर्याम्बा who had reached the river-bank, saw her son seized by the crocodile. Perplexed with fear, even she started crying. शंकर requested mother intensely.
“O mother! Henceforth, I shall not live. I wish to become a monk, before I die. Now please give me permission.” Unwillingly helpless mother said- “o child, whatever you wish, let it happen. Now itself you accept renunciation. I grant you permission.” At that very moment, a wonder happened.
By god’s grace, शंकर it was realased by the crocodile. Coming to the river-bank, he bowed down to mother’s feet. Later imade mother realise the importance of renunciation. A monk is not a son of a lady alone.
This big world itself is his home. He went from his house after assuring the mother ‘O mother, whenever you will remember me, I will come to you.” Then, he learnt all दर्शन by becoming a desciple of गोविन्दभगवत्पाद.
He proceeded further to establish वैदिक धर्म, after receiving an initiation from (गोविन्दभगवत्पाद) to become a monk. He (शङ्कराचार्य) grasped the four वेदs at the age of eight, he mastered all the scriptures at the age of twelve. He composed (magnificent) भाष्य (commentary) at the age of sixteen. He reached the heavenly abode at the age of thirty-two.