Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं
11th Marathi Digest Chapter 3 अशी पुस्तकं Textbook Questions and Answers
कृती
1. अ. तुलना करा.

‘पुस्तकरूपी’ मित्र | ‘मानवी’ मित्र |
उत्तेजक, आनंददायी | मित्र दुरावतात. |
प्रेम, भावना, विचारांनी ओसंडणारं | मित्रांना कधी कधी प्रेमाची विस्मृती होते. |
विशाल अंत:करण, निःस्वार्थीपणा | वैर, स्वार्थीपणा या भावनेत अडकतात. |
उत्कट अनुभूती देणारे | विश्वासघातकी असतात. |
आ. कारणे लिहा.
प्रश्न अ.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण……….
उत्तर :
लेखक हा ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारा आहे. त्यामुळे पुस्तकांची हेळसांड करणारे, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणारे लोक यांच्याविषयी लेखकालाही चीड आहे. तोही ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे गंथांना आपल्या कपाटात जिवापाड जपून ठेवतो. म्हणून ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत.
प्रश्न आ.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला कारण …
उत्तर :
पुस्तक प्रेमीने अतिशय प्रेमाने, जिवापाड जपलेली दोन कवितेची पुस्तकं एका कवीला वाचण्यासाठी दिली. पण पंधरा दिवस झाले तरी त्याने ती पुस्तके परत केली नाहीत. उलट मी ती पुस्तके नेलीच नाहीत. असा कांगावा त्याने केला. या कटू अनुभवामुळे प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा निश्चय पुस्तकप्रेमीने केला.
प्रश्न इ.
रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहेट कारण…..
उत्तर :
रसिकता ही एक वृत्ती आहे. त्यामुळे तिचं अस्तित्व हे वयावर नव्हे तर मनावर अवलंबून असते. कलात्मक-आशयामधून साहित्य आपल्याला समृद्ध करतं. आपल्या जाणिवा त्यामुळे विस्तारतात, वैचारिक क्षमता वाढतात. रसमय पुस्तकांमुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात. या सर्व भावनेचा अनुभव घेऊन आपली रसिकवृत्ती अधिक बहरते. पुस्तके माणसाला कलात्मक आनंद देतात. माणसाच्या मनाला ताजेतवाने करतात. हा अनुभव कोणत्याही वयात घेता येतो. कारण वाचन संस्कृती ही कालातीत आहे. तिला वेळ-काळ-स्थळ-वय यांचे बंधन नाही म्हणूनच रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिक आहे.
इ. कृती करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
|


प्रश्न 2
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
|


2. अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न अ.
दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे
उत्तर :
दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
प्रश्न आ.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.
उत्तर :
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे – आईच्या घरी आल्यासारखे वाटणे.
3. व्याकरण :
अ. सूचनेनुसार सोडवा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘चवदार’ सारखे शब्द लिहा. …………… ………… …………….. …………..
Solution & Step-by-Step Answer:
: धारदार, फौजदार, डौलदार, लज्जतदार
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
जसे विफलताचे वैफल्य, तसे – अ. सफलता → ………. आ. कुशलता → ………. इ. निपुणता → ……….
Solution & Step-by-Step Answer:
: अ. सफलता → साफल्य आ. कुशलता → कौशल्य इ. निपुणता → नैपुण्य
|
आ. शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’
प्रश्न आ.
शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’
……… ……….. ……… ……….. ………..
प्रोत्साहक, मारक, प्रायोजक, आयोजक, समन्वयक
इ. या शब्दगटातील विशेषणे ओळखा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
या शब्दगटातील विशेषणे ओळखा.
Solution & Step-by-Step Answer:
4. स्वमत : प्रश्न अ. वैचारिक साहित्याद्वारे विविध मूल्यांची शिकवण माणसाला मिळते. माणुसकी, न्याय, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती, समता, बंधुता, सहृदयता अशा विविध मूल्यांची शिकवण वैचारिक साहित्यामुळे माणसाला मिळते. माणसाचे मन व्यापक व उदार बनवण्यात वैचारिक साहित्याचा फार मोठा वाटा असतो, वैचारिक साहित्य हे प्रबोधनपर व मार्गदर्शनपर असते. वैचारिक साहित्यामुळे विचारांची पायाभरणी मजबूत होते. एकूणच मानवी जीवन अर्थपूर्ण, समृद्ध करण्यास वैचारिक साहित्य सहकार्य करते. प्रश्न आ. जगातील सर्वांत सुंदर वस्तू म्हणजे पुस्तक असा व्यापक दृष्टिकोन लेखकाचा आहे. आपल्याजवळ जे काही चांगलं आहे ते सगळं देण्याची वृत्ती पुस्तकांची असते. पुस्तके माणसाला भरभरून प्रेम देतात. लेखकाची पुस्तकांवर आत्यंतिक निष्ठा आहे. लेखकाच्या मते पुस्तके ही माणसाला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात. जीवनाला नवचैतन्य देतात. लेखकाच्या मते कोणतेही साहित्य हे नवे जुने नसते. पुस्तके ही नेहमी मनाला मंत्रमुग्ध करणारी, हसवणारी, रडवणारी, अंतरंगाला भिडणारी असतात, जगण्याचा अर्थ पुस्तकं सांगतात. एकूणच पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तकांविषयीचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. प्रश्न इ. परिस्थितीशी झुंज देत आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्यायचा असं प्रत्येकाला वाटतं पण घडतं वेगळंच, कारण निष्ठुर नियती आड येते. पण निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी, त्याच्या मार्गात अनेक संकटे, अडचणी निर्माण करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की, दुर्बल वाटणारा माणूस नियतीचा पराभव करून विजयाच्या दिशेने घोडदौड करणार आहे. कारण दुर्दम्य विश्वास, आशा व संघर्ष करण्याची तयारी यांच्या बळावर माणूस नियतीशी कायमच लढत आला आहे. अभिव्यक्ती : प्रश्न अ. पुस्तकांच्या जगात शिरले की मनावरचे मळभ दूर होते. आयुष्यात आलेल्या दुःखमय प्रसंगात दुःखी, निराश विचार दूर करण्याचे तसेच मनातील अंधार दूर करून चैतन्य निर्माण करण्याचे काम पुस्तके करतात. पु.ल.देशपांडे यांच्या अनेक पुस्तकांनी वाचकांच्या मनावरील ताणतणाव कमी करून दुःख विसरायला लावून आपले आयुष्य हसरे केले आहे. प्रश्न आ. पुस्तकांची हेळसांड करणारी, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणाऱ्या माणसांचा पुस्तकप्रेमी लोकांना राग येतो, पुस्तकप्रेमी माणसे पुस्तकांवर आपल्या अपत्याप्रमाणे (मुलांप्रमाणे) प्रेम करतात. अशा पुस्तक प्रेमी लोकांना वाचायला भरपूर ग्रंथ असले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदमय वाटते, पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा स्मशानासारखा वाटतो. अनेक प्रसिद्ध लेखकांची नावेही आजच्या तरुण पिढीला माहीत नाहीत. एकूणच पुस्तकांवर स्वतःच्या जीवापेक्षा उदंड प्रेम करणारे पुस्तकांवर निष्ठा, श्रद्धा असणारे वाचक आता फारच कमी होत चालले आहेत अशी खंत लेखकाने व्यक्त केली आहे. शब्दसंपत्ती : पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. प्रश्न अ. प्रश्न आ. प्रश्न इ. प्रश्न ई. प्रश्न उ. प्रकल्प.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
जी. ए. कुलकर्णी, भा. द. खेर, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिकांची माहिती व यासंबंधीचे संदर्भसाहित्य वाङ्मय कोशातून शोधून लिहा. |
11th Marathi Book Answers Chapter 3 अशी पुस्तकं Additional Important Questions and Answers
खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.
खालील कृती सोडवा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
चौकट पूर्ण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
परिणाम लिहा.
उपयोजित कृती खालील पठित गदध उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. प्रश्न अ. प्रश्न आ. प्रश्न इ. खालील वाक्यातील विशेषण ओळखा.
खालील शब्दासाठी योग्य समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
स्वमत :
आत्मविश्वास वाढतो. जिद्दीने काम करण्याची नवी प्रेरणा मिळते. वाचनाचा छंद जोपासल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते. पुस्तकातील समृद्ध विचार आपल्याला जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी देतात, किमान साक्षरता समाजात नसेल तर जनजागृतीचा प्रयत्न फसतो. ज्या समाजात निरक्षर व्यक्ती अधिक असतात त्या समाजात गुन्हेगारी, दंगली वाढीस लागतात. वाचनकौशल्यात मागे असणारे लोक बऱ्याच वेळा बेकार राहतात व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी वाचन-लेखन इ.गोष्टी नागरिकांना येणे फार गरजेचे आहे. वाचन दुर्बलता किशोरवयीन मुलांच्या विकासावर परिणाम करते. वाचनाअभावी भावनिक दुर्बलता निर्माण होते. अशी बालके ‘माणूस’ म्हणून संवेदनशीलता वाचनाअभावी हरवून बसतात. थोडक्यात पुस्तके वाचण्याचे व्यक्तिगत व सामाजिक असे दोन्ही फायदे आहेत. उत्तम प्रशासक, उत्तम शिक्षक, कार्यक्षम, सुसंस्कारीत भावी पिढी ही वाचनातूनच तयार होते. संवेदनशील मनाच्या वाढीसाठी हे विचार कारणीभूत ठरतात, त्यामुळे इतरांचा आपण माणूस म्हणून विचार करायला लागतो, चांगले संस्कार होण्यासाठी, समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान येण्यासाठी पुस्तकांची भूमिका मोलाची ठरते, माणुसकी, समता, न्याय, बंधुत्व, सहृदयता या मूल्यांची शिकवण आपल्याला पस्तकामुळे मिळते. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी वाचन करून नवीन ज्ञान व माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा त-हेने माणसाच्या जडाघडणीत पुस्तकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सुखदुःखाच्या प्रसंगी पुस्तकांमुळे आपल्या मनावरील ताण कमी होतो. पुस्तके जगण्याची हिंमत वाढवितात.
त्याला काही दुखल-खुपलं तर आपण व्याकुळ होतो तसेच ग्रंथप्रेमी वाचक आपले जिवापाड जपून ठेवलेले पुस्तक लेखकाला देताना व्याकुळ झाला होता. लेखकाला पुस्तक देण्याआधी ग्रंथप्रेमीने अनेक सूचना केल्या. पुस्तक काळजीपूर्वक वापरा, त्याची पाने दुमडू नका, पुस्तकावरचं कव्हर काढू नका. पुस्तकांशी निर्दयी चाळा करू नका. अशा अनेक सूचना केल्या. कारण त्याचं त्याच्या पुस्तकांवर मुलांप्रमाणेच प्रेम होतं. या आधी एका व्यक्तीला दिलेलं पुस्तक त्यांच्याकडे परत आले नव्हते. प्रत्येक व्यक्तीला आपली मुले म्हणजे सर्वस्व असते त्याना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तो खूप काळजी घेत असतो. तेवढेच प्रेम ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर होते. आपली मुले आपल्याबरोबर असली की आपण नेहमीच आनंदी असतो आणि ती आपल्या सोबत नसतील तर आपले कोठल्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. तेवढ्याच उत्कटतेने ग्रंथप्रेमी आपल्या पुस्तकांशी आपुलकीने वागतो म्हणून तो म्हणतो माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं. स्वाध्यायासाठी कृती अशी पुस्तकं Summary in Marathi प्रस्तावना : मराठी संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, संपादक व वक्ते म्हणून डॉ. निर्मलकुमार फडके प्रसिद्ध आहेत. ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची ‘आस्वाद समीक्षा’ साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘कल्लोळ अमृताचे’, ‘चिंतनाच्या वाटा’, ‘प्रिय आणि अप्रिय’, ‘सुखाचा परिमळ’ अशी ही विविध साहित्यसंपदा आहे. ‘संतकवी तुकाराम : एक चिंतन’, ‘संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना’, ‘संतांचिया भेटी’, ‘संत वीणेचा झंकार’, ‘संत तुकारामांचा जीवनविचार’ ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके तसेच ‘समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज’, ‘साहित्यातील प्रकाशधारा’ हे लेखसंग आहेत. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा संतसाहित्य हा विशेष आस्थेचा विषय होता. ‘प्रबोधनातील पाऊलखुणा’ आणि ‘निवडक लोकहितवादी’ या संपादित पुस्तकातून एकोणिसाव्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग दिसून येतो. या त्यांच्या साहित्य सेवेबद्दल ‘भैरू रतन दमाणी’ या साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच नाशिक येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गंभीरता, अंतर्मुखता, चिंतनशीलता हे त्यांच्या साहित्याचे लेखनविशेष आहेत. पाठाचा परिचय : माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका प्रस्तुत पाठात मांडली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवून प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात, हा विचार व्यक्त करताना लेखकाने ‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे. पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात, पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात. जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. पुस्तके आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. आपल्याला जी पुस्तके विशेषत्वाने आवडतात ती हृदयाच्या कण्यात जपून ठेवायला हवी. मनाची सुदृढ आणि सशक्त वाढ होण्यासाठी पुस्तके वाचावीत. आपल्या जीवनप्रवासात पुस्तकं एक मार्गदर्शक म्हणून उभी राहतात. ग्रंथ हे गुरु आहेत हा विचार या पाठात अधोरेखित झाला आहे. पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात, अंत:करणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तके कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायी काहीही नाही. यावरून लेखकांचे ग्रंथप्रेम दिसून येते. लेखकांने एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून एक पुस्तक आणले होते. ते पुस्तक देताना या ग्रंथप्रेमीने लेखकाला “अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसयांच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, बरचं कव्हर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षानं पुस्तक परत करा.” अशा सूचना दिल्या. त्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत कारण त्या अटी खरोखरच अत्यंत सयुक्तिक होत्या, कारण ग्रंथप्रेमी व्यक्ती पुस्तकाला स्वत:ची अपत्ये समजतात. उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. मनाला धीर देतात. जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्य प्राप्त करून देतात. मनातल्या अंधाराला स्वप्नं दाखवून मनाला ताजे आणि टवटवीत करतात. उदा. ‘मेघदूत-कालिदास’, ‘टॉलस्टॉयची अॅना कॅरेनिना’ ही कादंबरी, गांधीजींचे आत्मचरित्र, व्हिक्टर ह्यूगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे अभंग इत्यादी, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘द ओल्ड मॅन अण्ड द सी’ कादंबरीतील एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात पोटात अन्नाचा कण नसताना आपली होडी ढकलतो, देवमाशाला जिंकण्याचे धाडस ठेवून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल सागराच्या आत जातो. त्याच्यात लाटांबरोबर झुजण्याची जिद्द, कणखर आशावाद, आकांक्षा, हटवादी मन, विजयोन्माद असतो. या कादंबरीतून निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी एक क्षण असा येणार आहे, की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजय प्राप्त करणार आहे असे हेमिंग्वेला सुचवायचं आहे. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असून त्यातून नव्या प्रेरणा वाचकाला मिळतात. समानार्थी शब्द / पर्यायी शब्द : वाक्प्रचार व त्यांचे अर्थ : टिपा : |









