Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?
Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Textbook Questions and Answers
1. पुढील वाक्ये कोणत्या प्राण्यासंदर्भात आहेत त्या प्राण्याचे नाव लिहा.
प्रश्न अ.
“जन्मापासून आंधळी आहे ती!” [ ]
उत्तरः
मांजरी
प्रश्न आ.
“सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच!” [ ] पिलं
उत्तरः
कुत्रीची
2. आकृत्या पूर्ण करा.




ई.

3. ‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’ हे विधान पाठाच्या आधारे पटवून दया.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’ हे विधान पाठाच्या आधारे पटवून दया.
Solution & Step-by-Step Answer:
ः मुके प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी नेहमीच भुकेलेले असतात. माणसांनी गोंजारलेले, मिशा, डोक्यावरुन फिरवलेला मायेचा हात त्यांना नेहमीच हवा असतो. त्या क्रियेतून, भावनेतून प्रकट झालेली माया, आर्जवता, प्रेम हे प्राण्यांना कळत असते. लेखिकेचे मांजरांना खाजवणे, कुरवाळणे या ममतेच्या स्पर्शानी मांजरे खूश होऊन पोटातून ‘गुर्रगुर्र’ असा आवाज काढून समाधानाची पावती देतात.
|
प्राण्यांना प्रेमाने जवळ घेतले की ती आपली होतात. माणसांपेक्षाही अधिक लळा लावतात. प्राण्यांमध्येही एक लहान मूल, बालकत्व असते. ती प्रेमाची, मायेची भूकलेली असतात. त्यांच्या डोळ्यातही एक अफाट कारुण्य असतं. त्याची जाणीव माणसाला व्हायला पाहिजे व मुक्या प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे.
व्याकरण व भाषाभ्यास
(अ) कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. (लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे)
प्रश्न अ.
सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ………………………………
उत्तरः
सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागला नाही.
प्रश्न आ.
चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ………………………….
उत्तरः
चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.
प्रश्न इ.
पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ………………………….
उत्तरः
पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले.
(आ) दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा. (इवले, शांत, खरखरीत)
प्रश्न (आ)
दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा. (इवले, शांत, खरखरीत)
(अ) रागीट
(आ) मोठे
(इ) मऊमऊ
उत्तरः
(अ) शांत
(आ) इवले
(इ) खरखरीत
(इ) जोडशब्द लिहा.
प्रश्न (इ)
जोडशब्द लिहा.
(अ) चढ
(आ) अंथरुण
(इ) इकडून
(ई) आले
उत्तरः
(अ) उतार
(आ) पांघरूण
(इ) तिकडून
(ई) गेले
विचार करा. सांगा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का? या वाक्यातून तुम्हांला प्राण्याबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः हे वाक्य प्राण्यांच्या तोंडचे आहे. इस्पितळातील असहाय्य प्राणी आपल्याला सूचवित आहेत की आम्ही समाजाचेच घटक आहोत. जैव विविधतेचे सभासद आहोत. पर्यावरणासाठी उपयुक्त आहोत. तेव्हा आम्हांला तुम्ही सांभाळले तर पर्यावरण संतुलन राहील. मानवाला लाभच होईल. आम्हांला तुम्ही हवे आहात पण तुम्ही आमच्यावर प्रेम कराल नं? आम्ही तुम्हांला हवे आहोत का? असा मार्मिक सवाल प्राणी करीत आहेत व आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करीत आहेत.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः लेखिकेने प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली. कुत्र्यांचे, मांजराचे विविध भाग न्याहाळले. त्यातील सोयी कशा आहेत ते पाहिले. प्राण्यांना हवे असलेले प्रेम तिला जाणवले. प्रत्येक प्राणी प्रेमाकरिता आसुसला होता. आम्हांला घरी जायचेच आम्हांला कुरवाळा, आम्ही तुम्हांला हवे आहोत का? जणू असे आपल्या डोळ्यांनी बोलत होता. कोणी चिडून तर कोणी शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसले होते. भरतने सर्व इस्पितळ दाखविले. छानशी माहिती दिली. तेथून बाहेर पडतांना लेखिकेला वाटले आज आपण एक वेगळेच जग पाहिले.
|
लिहिते होऊया.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पाऊस कोसळत असताना एक कुत्र्याचे छोटे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा. किंवा कुत्र्याचे पिल्लू भर पावसात दारात आले तर तुम्ही कोणती काळजी घ्याल?
Solution & Step-by-Step Answer:
ः भर पावसात कुत्र्याचे पिल्लू दारात आले तर मी प्रेमाने स्वागतच करीन, त्याचे ओले अंग मऊ कापडाने पुसून घेईन. त्याला मऊ सुती कापडाचे अंथरुण तयार करून देईन. एक वाटी दूधाची व एक वाटी खाऊची त्याच्याजवळ ठेवीन. त्याच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवून त्याला आपलेसे करीन. पावसात जाऊ देणार नाही. त्याला कुशीत घेऊन मायेची ऊबही देईन.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’ या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः जैव विविधता म्हणजे पृथ्वीवरील निरनिराळे सजीव. सामान्यपणे जैव विविधता म्हणजे जातिमधील विविधता व जीवशास्त्रीय संपन्नता. जैव विविधता परिसंस्था टिकवते. निसर्गातील कार्बनडायऑक्साईडचे चक्र सुरळीत ठेवते. सर्व घटक संतुलित ठेवते. म्हणून जलचक्र ही सुरक्षित राहते. पाणी शुद्ध ठेवते. जमिनीची धूप थांबवते. जैव विविधतेच्या नाशामुळे मानवी आरोग्य धोक्यात येईल. वेगवेगळे आजार होतील. बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू चे विषाणू पसरतील. अगदी कीटकही आपणास उपयुक्त आहेत. परागकण पसरवून ते झाडांची निर्मिती करतात. त्यामुळे परिसंस्था टिकते. पर्यावरण संरक्षण आणि जैव विविधता संवर्धन कायदा 1999 चा अभ्यास करून जैव विविधता संपन्न करू या.
|
उपक्रम:
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी दया. त्या घरातील लोक पाळीव
प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.

सूचनाफलक
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
सूचनाफलक तयार करणे. |
एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे. दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना याव्या लागतात. दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो. अपेक्षित कृती योग्य तव्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे. यापूर्वी तुम्ही सूचनाफलक या घटकाचा अभ्यास केलेला आहे. या इयत्तेत तुम्ही स्वतः सूचनाफलक तयार करायला शिकणार आहात.
प्रश्न 2. सूचनाफलकाचे विषय |
प्रश्न 3. सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी |
प्रश्न 4. सूचनाफलक तयार करा. त्यासाठी खालील नमुना कृतींचा अभ्यास करा. विषय- ‘उदया शहरातील पाणीपुरवठा बंद राहील.’ नमुना कृती 1 |

विषय- ‘कणखर’ गिर्यारोहण संस्थेतर्फे कॅम्पचे आयोजन.
नमुना कृती 2

प्रश्न 5. तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा. |
भाषासौंदर्य
प्रश्न 1. खालील म्हणी पूर्ण करा. |
Class 8 Marathi Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Additional Important Questions and
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

2. वाक्यपूर्ती करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. ‘आम्हांला तुमची गरज आहे; 2. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला ………..
Solution & Step-by-Step Answer:
ः 1. ‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का? 2. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांना केलेलं ते आवाहन होतं.
|
कृती 2: आकलन कृती
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
जनावरांचे इस्पितळ कुठे आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः मुंबईच्या परळ भागात जनावरांचे इस्पितळ आहे.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
गलेलठ्ठ बोका काय करत होता?
Solution & Step-by-Step Answer:
ः गलेलठ्ठ बोका आपल्या मिशा साफ करत बसला होता.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

प्रश्न 4
Maharashtra Board Solution
ओघतक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

कृती 3: व्याकरण कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या लावा. |
विशेषण | विशेष्य |
1. छोटीशी | अ. तसबीर |
2. गलेलठ्ठ | आ. रंग |
3. उदी | इ. बोका |
4. मोठी | ई. इमारत |









