Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली
9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 11 मातीची सावली Textbook Questions and Answers
1. खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा:
2. खालील तकता पूर्ण करा.

घटना | परिणाम / प्रतिक्रिया |
1. फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसला. | 1. सून येऊन डाफरली. |
2. मनूला फरसूने शिकवले. | 2. मनू कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले. |
3. वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. | 3. आठवड्याभरातच कोसू मरण पावली. |
4. मनूने जमीन विकायला काढली. | 4. फरसूने बैलासारखी मान डोलावली. |
3. आकृती पूर्ण करा:
प्रश्न (अ)
उत्तर:


प्रश्न (आ)
पाठाच्या आधारे फरसूचे पुढील मुद्दयांना अनुसरून वर्णन करा:
उत्तर:
1. छंद: फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टींतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायरीवर बसायचे, फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची, झाडावर चढणाऱ्या खारीचे बागडणे न्याहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता. चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे.

2. मेहनत: फरसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पानन् पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी. भाताचे पीक झाले की, तेथेच वांगी, दुधी यांसारख्या भाज्यांचे पीक घेई. फरसू व त्याची बायको ही उभयता पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. शेवटपर्यंत मातीचीच चाकरी करायची, झाडापानांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निर्धार होता.
3. दुःख: फरसूचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा तो तर जगण्याचा आधार होता. मात्र, त्याच्या भावनेची मुलाला, सुनेला कदर नव्हती. सून तर त्याच्यावर डाफरायची. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती.
4. माणूसपण: फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली होती. दोन्ही मुलींची लग्ने करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली. मुलाला खूप शिकवले. पण शहरीकरणाची वावटळ त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त करीत होता. एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकूळ करून टाकते.
4. ओघतक्ता तयार करा:


5. खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा:
प्रश्न (अ)
“आमसा जलम या मातीत गेल्ता मणून थोडं वायीट वाटते.”
उत्तर:
“आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते.”
प्रश्न (आ)
“त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.”
उत्तर:
“त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी.”
6. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा:
प्रश्न (अ)
टकळी चालवणे –
1. सूत कातणे
2. सतत बोलणे
3. वस्त्र विणणे.
उत्तर:
सतत बोलणे
प्रश्न (आ)
नाळ तुटणे –
1. मैत्री जमणे
2. संबंध न राहणे
3. संबंध जुळणे.
उत्तर:
संबंध न राहणे
7. खालील अर्थांची वाक्ये पाठातून शोधून लिहा.
(अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले –
(आ) फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला –
(इ) फरसूचे झाडांबाबतचे प्रेम –
8. स्वमत.
प्रश्न (अ)
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास, त्याची कारणे सोदाहरण लिहा..
उत्तर:
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. माणूस स्वत:च्या इच्छाआकांक्षांसाठी जगतो. तसेच, इतर माणसांबद्दल वाटणारा बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. बंधुभाव नष्ट झाला, तर माणूसपण नष्ट होते. शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. नैसर्गिक गोष्टींपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत.
शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच, पण दिसतही नाही. सिमेंट काँक्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे. झाडेपाने दिसेनाशी झाली आहेत. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा कळतनकळत परिणाम होत आहे. आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. बंधुभाव नष्ट होत आहे. साहजिकच, आपण माणूसपण गमावत आहोत. हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे.
प्रश्न (आ)
पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
फरसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची पत्नी शेतात राबत. मातीशी नाते असण्यातच माणूसपण असते, अशी त्याची श्रद्धा होती. जमिनीवर, झाडाझुडपांवर त्याचे जिवापाड प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करायची, झाडाझुडपांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निश्चय होता. हा कोणत्याही शेतकऱ्याचा पारंपरिक विचार आहे. मला हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो.
अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून लोक पांढरपेशे बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला राजी नसतात. शेतीला कमी लेखतात. यामुळे जीवनात विकृत्या शिरल्या आहेत. कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात. प्रदूषणामुळे नदयांची गटारे झाली आहेत. समुद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. जमिनीपासून, शेतीपासून माणसे दूर गेल्यामुळे ती निसर्गापासूनसुद्धा तुटली आहेत. ती निसर्गाची नासधूस करीत आहेत. यामुळे माणूस स्वत:चेच जीवन धोक्यात आणीत आहे. यातून बाहेर पडायचे असेल, तर फरसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे.
प्रश्न (इ)
‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
उपक्रम:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे ‘उदयाच्या सुंदर दिवसासाठी’ – हे पुस्तक वाचा. |
भाषा सौंदर्य:
प्रश्न 1. आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचारांची उदाहरणे लिहा:
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
भाषाभ्यास: तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्ही धडे वाचता, कविता वाचता. धडे आणि कविता म्हणजेच गय आणि पदध यांच्या रचनेत फरक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. हा फरक असतो मुख्यतः लयीचा. पदध गाता येते किंवा लयीत वाचता येते. गदयाचे तसे नसते. कवितेमध्ये लय निर्माण कशी होते? कुठल्या गोष्टीमुळे होते? हे आज आपण बघणार आहोत. वृत्त, छंद यांसारख्या गोष्टींमुळे कवितेला लय मिळते. कवितेची लय समजण्यासाठी आपण त्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. वृत्त किंवा छंद म्हणजे काय ? लय निर्माण करण्यासाठी कवितेची जी विशिष्ट शब्दरचना केली जाते. व्हस्व, दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो, त्याला ‘वृत्त’ म्हणतात. याचा अर्थ कविता एका विशिष्ट वृत्तामध्ये रचलेली असते, म्हणून ती आपल्याला लयीत म्हणता येते. गणितात जशा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संकल्पना येतात, तशा वृत्तविचारामध्ये काही संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्या संकल्पना आपण आधी समजून घेऊया.
Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 11 मातीची सावली Additional Important Questions and Answers उतारा क्र. 1 1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
फरक लिहा: |
तरुणपणाचा काळ | म्हातारपणाचा काळ |
तरुणपणाचा काळ | म्हातारपणाचा काळ |
सुखी, समाधानी | खिन्न, शोकाकुल कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आशय स्पष्ट करा: 1. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. 2. आपली खरबरीत बोटं त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली.
Solution & Step-by-Step Answer:
1. आपण आनंदाने चालतो, तेव्हा आपले पाय सहज, भरभर पडतात. फरसूचे पाय असे आनंदाने पडत नाहीत. पाय उचलण्यासाठी त्याला कष्ट पडतात. पाय ओढावे लागतात. म्हणजे फरसू दुःखीकष्टी मनाने पायरीवर येऊन बसतो. 2. खरबरीत बोटे म्हणजे भरपूर कष्ट केलेल्या हातांची बोटे. या खरबरीत बोटांना गुळगुळीत पायऱ्या सुखाच्या वाटत नाहीत. पायऱ्यांचा गुळगुळीतपणा दूरचा, परका वाटतो.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
माहिती लिहा: |
पूर्वीच्या गोष्टी | आताच्या गोष्टी |
1. | 1. |
2. | 2. |
पूर्वीच्या गोष्टी | आताच्या गोष्टी |
1. चिंचेचे झाड, मंगलोरी कौले, भिरभिरत येणारी चिंचेची पाने. | 1. गुळगुळीत पायऱ्या, गुबगुबीत खुर्च्या. |
2. चिंचेच्या मुळावर बसून मित्रांसोबत केलेल्या गप्पागोष्टी. | 2. आता गप्पा मारायला कोणीही नाही. आता फक्त एकट्याने आभाळाकडे बघत राहणे
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
उताऱ्यातील सासरे-सून यांच्यातील नाते स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
सुनेला वाटते की, सासऱ्यांनी तिच्या इच्छेप्रमाणे वागावे. सासरे। त्यांच्या जीवनातील सर्व जुन्या गोष्टी नष्ट झाल्याने दुःखी आहेत. सासऱ्यांच्या मनातील भावना सून लक्षात घेत नाही आणि त्यांच्यावर डाफरत राहते.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
कोष्टक पूर्ण करा: |
घटना | परिणाम |
1. इनूस मास्तर परदेशातल्या घटना सांगायचे. |
घटना | परिणाम |
1. इनूस मास्तर परदेशातल्या घटना सांगायचे. | फरसू व आबू यांना नवल वाटायचे. कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारी फरसूची मन:स्थिती लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठतो. त्याच्या पायांची हाडे कडकडतात. यावरून तो उतारवयात आहे, हे लक्षात येते. त्याला आताचे वातावरण प्रिय नाही. चकचकीत, ऐषारामी वातावरणात त्याचे मन रमत नाही. तो उदास, विमनस्क स्थितीत वावरतो. त्याच्या खरबरीत बोटांना गुळगुळीत पायरीचा स्पर्श सुखद वाटत नाही.
गुबगुबीत खुर्चीतही त्याला अवघडल्यासारखे होते. त्याला हवेहवेसे वाटणारे दृश्य त्याच्या मनात जागे होते. ते असते पूर्वीचे, त्याच्या तरुणपणातील. चिंचेचे झाड, मंगलोरी कौले, इकडून तिकडे बागडणाऱ्या खारी यांनी बनलेले वातावरण त्याला समाधान दयायचे. आता ते सर्व नाहीसे झाले आहे. त्याच्या फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत. या आठवणींनी फरसू उदास होतो आणि आभाळाकडे बघत राहतो. उतारा क्र. 2 1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृती पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
का ते लिहा: 1. गावकरी फरसूवर मनोमन जळायचे. 2. पाठीचा कणा दुखेपर्यंत फरसू पत्नीसहित राबणे चालू ठेवायचा.
Solution & Step-by-Step Answer:
1. पावसाळ्यात फरसूचे भातशेत हिरवेगार दिसायचे. पिकल्यानंतर ते भात झळाळणाऱ्या सोन्यासारखे दिसे. त्यामानाने इतरांचे शेत पिकत नसे. 2. भाताचे पीक झाल्यावर फरसू तिथे वांगी, कारली, दुधी वगैरे भाज्यांचीही पिके घ्यायचा. तो दुबार पिके घ्यायचा. त्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागायचे.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पुढील वाक्य प्रमाणभाषेत लिहा: त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.
Solution & Step-by-Step Answer:
त्यांचीच पुण्याई, ही विहीर नाही, नदी आहे नदी.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा: फरसने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले.
Solution & Step-by-Step Answer:
बापजादयांची कमायी रे पोरांनो!
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विधान पूर्ण करा: फरसूच्या मते, बापजादयांच्या पुण्याईमुळे …………………..
Solution & Step-by-Step Answer:
फरसूच्या मते, बापजादयांच्या पुण्याईमुळे – (अ) फरसूच्या विहिरीला वैशाखातही भरपूर पाणी असे. (आ) फरसूने तीन मुलींची लग्ने करून त्यांना सासरी पाठवले. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. इतकी सुबत्ता त्याला लाभली होती.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृती पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
फरसूच्या यशा मागील तुम्हांला जाणवलेले रहस्य सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
फरसूच्या यशामागे दोन गोष्टी आहेत. एक आहे त्याची श्रद्धा आणि दुसरी आहे त्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. त्याची चांगल्या, उदात्त मूल्यांवर श्रद्धा आहे. त्याच्या मते, कोणाच्याही कामात खोडा घालू नये. म्हणजे कोणाचेही वाईट करू नये. इतरांचे वाईट केल्यास आपले अकल्याण होते, असा त्याचा ठाम विश्वास आहे. आपल्या बापजादयांनी कोणाचीही फसवणूक केली नाही; कोणाला नाडले नाही; म्हणून आपली भरभराट झाली, असे त्याला वाटते.
दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. त्याने नैसर्गिक खतावरच पूर्णपणे भर दिला. रासायनिक खताचा वापर केला नाही. रासायनिक खताचा वापर न केल्यामुळे जमिनीचे नुकसान झाले नाही. त्याने चिंचेचा पाला शेतात पसरून त्याचेच खत होऊ दिले. तसेच, मुख्य भातपिकानंतर त्याने वांगी, कारली, दुधी वगैरे भाज्यांची पिके घेतली. या प्रकारच्या दुबार पिकांमुळेही जमिनीचा कस वाढण्यास मदत झाली. एकंदरीत, श्रद्धा व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यांमुळे फरसू यशस्वी झाला. उतारा क्र. 3 1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पुढील कोष्टक पूर्ण करा: |
घटना. | परिणाम |
तिघेही मुकाट जेवत होते. |
घटना. | परिणाम |
तिघेही मुकाट जेवत होते. | मुलांशी प्रेमाचे नाते न राहिल्यामुळे डोळ्यांत आसवे येत होती.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
कोष्टक पूर्ण करा: |
सुनेचे उद्गार | सुनेच्या मनातला अर्थ |
1. काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे! | |
2. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी? |
सुनेचे उद्गार | सुनेच्या मनातला अर्थ |
1. काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे! | निरर्थक व निष्क्रिय आयुष्य जगत आहेत. |
2. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी? | मला कष्ट करावे लागतात आणि यांचा काडीचाही उपयोग नाही.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा: फरसूचे झाडांबाबतचे प्रेम.
Solution & Step-by-Step Answer:
पोटच्या पोरांइतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्याचा निश्चय होता.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
अर्थ स्पष्ट करा: 1. पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत. 2. आपला आधार तर कधीच तुटून पडला.
Solution & Step-by-Step Answer:
1. झाडापानांवर प्रेम असल्यामुळे कष्ट कधी जाणवलेच नाहीत. 2. फरसूची पत्नी मरण पावली. त्यामुळे त्याचा आधार तुटून पडला.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
फरक लिहा: |
फरसू | मनू |
1. | 1. |
2. | 2. |
3. | 3. |
फरसू | मनू |
1. तिसरी-चौथीच्या पुढे गेला नव्हता. | 1. फरसूने मनूला शिकवले. |
2. जमिनीचीच चाकरी करायची हे ठरवलं होतं. | 2. इंग्रजी नावाच्या कुठल्याशा कंपनीतील नोकरीच श्रेष्ठ मानीत होता. |
3. पोटच्या मुलाच्या प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना शेवटपर्यंत आधार देण्याचा निश्चय केला होता. | 3. मातीत हात घालायलाच नाखूश होता. कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
मनू आणि फरसू यांच्यातील नाते भावनाहीन, कोरडे होण्यामागील तुम्हांला जाणवलेले कारण स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
फरसू कष्ट करीत करीत व निसर्गाशी खेळत खेळतच जगला. त्यामुळे त्याचा जमिनीवर, झाडापानांवर जीव आहे. त्यांच्या आधारानेच आपले जीवन उभे राहते. म्हणून जीव असेस्तोवर जमिनीची चाकरी करायची, झाडापानांना आधार दयायचा, हा त्याचा निर्धार होता. तसेच, फरसू खेडेगावात राहत असल्यामुळे खेडेगावातील माणसे एकमेकांना धरून राहतात. तिथे व्यक्तीच्या स्वत:च्या सुखदु:खापेक्षा संपूर्ण समाजाचे सुखदुःख महत्त्वाचे मानले जाते.
मनूने शिक्षण घेतले. आपल्याकडील बहुतांश शिक्षण पुस्तकी असते. ते कष्टापासून दूर असते. यामुळे मनूला शेतीतले कष्ट कमी दर्जाचे वाटतात. चकचकीत, गुळगुळीत स्वरूपाचा बंगला सुखाचा वाटतो. नोकरी करणारा कळतनकळत फक्त स्वत:चाच विचार करू लागतो. मनूचे तेच झाले. तो फरसूपासून मनाने दूर गेला. त्या दोघांमध्ये भावनिक नाते राहिलेच नाही. दोघांमध्ये संवाद राहिला नाही. समाधान राहिले नाही. उतारा क्र. 4 1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
माहिती लिहा: 1. पूर्वीच्या जुन्या घरातील जेवणाच्या वेळचे वातावरण. 2. पूर्वीच्या जेवणाचे स्वरूप. 3. कोसूचा मृत्यू.
Solution & Step-by-Step Answer:
1. पूर्वी जुन्या घराच्या अंधाऱ्या पडवीत जेवणे होत असत. कोसू प्रार्थना करी. प्रार्थना संपल्यावर जेवण चालू होई. त्या वेळी कोसूची टकळी चालू असे. मनू तर जेवता जेवता बहिणींशी मस्ती करायचा. वातावरण मोकळे, प्रेमळ असे.. जेवताना आनंद मिळे. 2. पूर्वीचे जेवण साधे असे. जेवणात एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील, भात आणि तांदळाच्या भाकऱ्या असत. जेवणात कोणताही उंची थाट नव्हता. तरी जेवणाचे समाधान मिळे. 3. वाडीत काम चालू होते. हे काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा, असे काहीतरी लागले. म्हटले तर साधी इजा झाली होती. तीच महागात पडली. आठवड्याभरातच कोसूची प्राणज्योत मालवली.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा: फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला.
Solution & Step-by-Step Answer:
तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
संकल्पना स्पष्ट करा: 1. केळीचे बन जमिनीवर झोपावे, तसे. 2. कारली-वांग्यासारखा जमिनीचा बाजार मांडला. 3. बैलासारखी मान डोलावली.
Solution & Step-by-Step Answer:
1. केळ पडली की ती पूर्ण उन्मळून पडते. तिची जमिनीत रुजलेली सर्व मुळे मातीतून पूर्णपणे बाहेर येतात. म्हणजे ती समूळ नष्ट होते. केळीचे अखंड बन जर असेच आडवे झाले, तर सगळी बाग उजाड झालेली दिसते. अशाच प्रकारे एकाएकी कोसू मरण पावल्यामुळे फरसूचा संसार उद्ध्वस्त झाला.
2. कारली-वांग्याचा बाजार मांडला जातो, तेव्हा त्या कारल्या वांग्यांबद्दल कोणालाही आपुलकी वाटत नसते. किंबहुना त्यांची विक्री झाली, तर सगळ्यांना आनंदच होतो. म्हणून बाजारात सर्व विक्रेते ओरडून लोकांना खरेदी करण्याचा आग्रह करीत असतात. वेळप्रसंगी कमी किमतीतही विकत असतात. यालाच बाजार मांडणे म्हणतात. जमिनीची बाब तशी नसते. आपण जमीन विकून तिला कारली-वांग्याच्या पातळीवर आणले असे फरसूला वाटत असते. 3. नंदीबैलाचा मालक सांगतो, त्याप्रमाणे बैल मान डोलावतो. बैलाला स्वत:चे मत वा भावना नसतात. तो मालकाच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. त्याप्रमाणेच आपणही मनूच्या म्हणण्याला मान डोलावली. आपले मनातले खरेखुरे म्हणणे सांगितलेच नाही, असे फरसूला वाटते.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
फरसूच्या कल्पनेप्रमाणे कोसूच्या मृत्यूमागील कारणे.
Solution & Step-by-Step Answer:
फरसूच्या कल्पनेप्रमाणे कोसूच्या मृत्यूमागील कारणे: 1. ज्या मातीने संसार फुलवला, त्या मातीलाच उजाड केल्यामुळे कोसू मरण पावली असावी. 2. मनूने जमीन विकायचा विचार मांडला, तेव्हा नंदीबैलाप्रमाणे आपण मान डोलावली, असे फरसूला वाटले.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
फरसू व मनू यांची जीवनदृष्टी समजावून सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
फरसूच्या जुन्या घरात पूर्वी जेवतानाचे वातावरण लोभसवाणे होते. सगळेजण गप्पाटप्पा करीत, थट्टामस्करी करीत जेवत असत. त्यात माया होती. भावनेचा ओलावा होता. त्यात सहज, साध्या निर्मळ भावनांना वाव होता. म्हणून ते वातावरण सुंदर होते, सुखद होते. या वातावरणात शेती, गाईगुरे, झाडेपाने यांनाही स्थान होते. गावातल्या लोकांनाही स्थान होते. सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत जगणे हवे असते.
मनूला व त्याच्या पत्नीला, म्हणजे फरसूच्या सुनेला ही जगण्याची रीत मान्य नव्हती. त्यांना उच्च दर्जाच्या गुळगुळीत फरश्या बसवलेली, मोठ्या, उंच इमारतीमधील महागडी घरे अधिक आकर्षक वाटतात. मनू जुन्या घराला गोठा म्हणतो. त्याला शेतीपेक्षा नोकरी अधिक चांगली वाटते. या दोन वेगवेगळ्या जीवनरिती आहेत. दोन्ही एकमेकींच्या विरुद्ध आहेत. मनूला फरसूचे मन कळत नाही. त्यामुळेच मनू कायम फरसूविरुद्ध उभा ठाकतो. उतारा क्र. 5 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृती पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
कोष्टक पूर्ण करा: |
कृती | कृतीमागील भावना |
1. फरसू पुढ्यातली बशी सरकवून उठला. खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला. | |
2. सूनबाई व मनू या दोघांनीही शांतपणे जेवण पुढे चालू केले. |
कृती | कृतीमागील भावना |
1. फरसू पुढ्यातली बशी सरकवून उठला. खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला. | आपण काहीच करू शकत नाही, ही असहायता, खोल दुःख. |
2. सूनबाई व मनू या दोघांनीही शांतपणे जेवण पुढे चालू केले. | अभिमान व आनंद. कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
उत्तर लिहा: फरसूच्या दृष्टीने जमिनीवर झालेले अत्याचार: |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृती पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
उतारा क्र. 6 1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कारणे लिहा: 1. फरसू मध्यरात्री घराबाहेर बसला आहे. 2. फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिले.
Solution & Step-by-Step Answer:
1. प्रथम फरसूची बायको गेली. मग जमीन गेली. घर गेले. सर्व झाडे गेली. जिवाभावाच्या सर्वच गोष्टी नष्ट झाल्या. म्हणून तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. दु:खामुळे त्याला चैन पडेना आणि तो मध्यरात्र असतानाही घराबाहेर येऊन बसला. 2. पूर्वजांनी जमीन मिळवली होती. त्यांनीच घर बांधले होते. त्यांनीच झाडेझुडपे लावली. पैशाच्या हव्यासाने पूर्वजांची सर्व कमाई आपण घालवली. हा एक प्रकारे गुन्हाच केला, अशी फरसूची भावना होती. या गुन्हयाबद्दल येशूकडे माफी मागावी, म्हणून त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिले.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
पुढील घटनांचे परिणाम लिहा: 1. जमीन विकली, पैसा आला – ……………………. 2. मनूने कागद आणला, फरसूने सही केली – …………………..
Solution & Step-by-Step Answer:
1. जमीन विकली, पैसा आला – ते बापाला विसरले. 2. मनूने कागद आणला, फरसूने सही केली – फरसूला वाटले, त्याने बेइमानी केली. आपल्या आईला फसवले.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
अर्थ स्पष्ट करा: आमशा आजा, पणजाअं रगत हय्!
Solution & Step-by-Step Answer:
जमीन, घर, झाडेपेडे हे फरसूच्या पूर्वजांनी, त्याच्या आजा पणजाने मिळवले होते. तेवढे सगळे उभे करण्यासाठी त्यांनी स्वत:ची आयुष्ये ओतली होती. रक्त आटवले होते. ते सगळे आपण पैशांसाठी विकले, याचे प्रचंड दु:ख व पश्चात्ताप फरसूला होतो. हा पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी फरसू हे उद्गार काढतो.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आबूने फरसूची काढलेली समजूत तुमच्या शब्दांत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
मध्यरात्री दुःखावेगाने अस्वस्थ होऊन फरसू घराबाहेर पडला. त्याला पाहून आबूने आश्चर्य व्यक्त केले. त्यावर, पूर्वजांनी रक्त आटवून उभारलेली संपत्ती आपण विकली, याबद्दलचा पश्चात्ताप त्याने आबूकडे व्यक्त केला. आबूने त्याची समजूत काढली. अशी जमीन अनेकांनी विकली आहे. त्यात गैर काहीच नाही. मिळालेल्या भरघोस पैशांनी मनूचे जीवन पूर्ण समृद्ध होणार आहे. ही सुद्धा चांगलीच घटना आहे. म्हणून फरसूने त्याचे दु:ख वाटून घेऊ नये, असे आबूने समजावले.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘फरसूच्या घरातील यातनादायक वातावरणाला फरसू व मनू हे दोघेही सारखेच जबाबदार आहेत.’ विधान स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
काळानुसार परिस्थिती बदलते. प्रत्येक पिढीचे विचार बदलतात. नवीन पिढी नवीन विचारांना अनुसरून चालते. नव्या पिढीची जगण्यावागण्याची रीत वेगळी असते. ही रीत म्हणजे जीवनशैली. मन् हा नव्या युगातला युवक आहे. त्याची जीवनशैली आधुनिक काळातली. तो या नव्या जीवनशैलीला अनुसरूनच वागणार. हा बदल फरसूला कळलेला नाही. म्हणून त्याला दु:ख होते. तो वेदनेने विव्हळतो. त्याच वेळी मनूलाही वडिलांची मन:स्थिती कळत नाही. वडील है ज्या विचारांच्या वातावरणात वाढले, त्याच विचारांना धरून ते वागणार. त्यांना स्वत:च्या विचारांत झटकन बदल करता येणार नाही.
नवीन विचार ते त्वरेने आत्मसात करू शकणार नाहीत. हे सर्व मनूनेही लक्षात घ्यायला हवे होते. वडिलांना हळूहळू आपल्या विचारांकडे आणायचा प्रयत्न त्याने करायला हवा होता. पण त्याने तो तसा केला नाही. बापलेक दोघेही आपापल्या जागी घट्ट राहिले. त्यांच्या दुःखाचे मूळ तिथे आहे. म्हणून दोघेही सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहेत. उतारा क्र. 7 1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आशय स्पष्ट करा: 1. जलमभर ढोरहारकं खपाला पाये. 2. त्यांना पायाखालती जमीनच नय् रे……… 3. त्यांशे पाय जमिनीवर नाय.
Solution & Step-by-Step Answer:
1. फरसू जमीन विकल्याबद्दल दु:खी होतो. आबूला वाटते की, फरसूला दारिद्र्यात राहणेच पसंत आहे. पैसे हातात आले की, अनेक सुखे मिळवता येतात. पण फरसू या सुखांची आस बाळगतच नाही. तो स्वत:ला यातनांमधून मुक्त करण्याचा प्रयत्नच करीत नाही. म्हणून आबूचे मत असे बनत चालले आहे की, फरसूला ढोरासारखे राबणे आवडते.
2. फरसूच्या मते, आपल्या मालकीची जमीन असेल, तरच आपण स्थिर असतो, आपल्या जीवनाला अर्थ असतो. आपल्या मालकीची जमीन नसेल, तर आपल्याला कोणताही आधार नसतो. आपण जमीन विकल्यामुळे आपली नातवंडे-पतवंडे यांचा आधारच आपण काढून घेतला, असा अर्थ होऊ शकतो. 3. आबूच्या मते, आजच्या पिढीतील मुले हुशार आहेत, कर्तबगार आहेत. त्यांचा पाय जमिनीवर ठरत नाही. ते बोटीने, विमानाने जगभर हिंडतात. अरबस्तान, इंग्लंड, अमेरिका वगैरे अनेक देशांमध्ये जातात. म्हणून आबू म्हणतो की, हल्लीच्या मुलांचा पाय जमिनीवर ठरतच नाही. ही मुले सतत फिरतीवर असतात. त्यांची प्रगती होत आहे.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृती पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विधाने पूर्ण करा: 1. आबूच्या मते, जमीन विकल्याने ………………………….. 2. फरसूच्या मते, जमीन नसेल तर ………………………….
Solution & Step-by-Step Answer:
1. आबूच्या मते, जमीन विकल्याने अमाप पैसा मिळाला. आता मरेपर्यंत सुखात राहता येईल. 2. फरसूच्या मते, जमीन नसेल, तर ढोरासारखे जीवन उपयोगाचे नाही. आपले आयुष्य संपले. आता पुढच्या मुलाबाळांना पायाखाली जमीनच राहणार नाही.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
कसे/कशी ते लिहा: |
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘फरसूला वाटलं, ही आपल्या मातीची सावली आहे,’ या विधानाचा आशय तुमच्या शब्दांत सांगा. ‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे लोंढे वाहत आहेत. घरांची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डरांची हाव वाढली आहे. 1 ते जमिनी गिळंकृत करीत आहेत. नव्या पिढीच्या हे लक्षात येत नाही. नव्या पिढीला फक्त पैसाच दिसतो. पैशाने सर्व काही विकत घेता येईल, असे त्यांना वाटते. पैशांसाठी जमीन विकली, तर आपल्या
आयुष्याची सर्व पाळेमुळे उद्ध्वस्त होतात; माणूस मनाने उद्ध्वस्त होतो; हे त्यांच्या लक्षात येत नाही. दीड एकर जमिनीवर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे एखादा अक्राळविक्राळ राक्षसच आहे, असे फरसूला भासते. त्या इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जमिनीवर पसरली आहे. जणू काही त्या सावलीने त्याची जमीन, त्याचे संपूर्ण जीवनच गिळंकृत केले आहे, असे त्याला वाटत राहते. फरसू या दर्शनाने व्याकूळ होतो; विकल होतो. हा सर्व भाव ‘मातीची सावली’ या दोन शब्दांतून व्यक्त होतो. भाषाभ्यास: (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती: 1. समास:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तक्ता भरा:
Solution & Step-by-Step Answer:
2. शब्दसिद्धी:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘ता’ प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
3. वाक्प्रचार/म्हणी:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
डोळे भरून येणे – 1. खूप रडणे 2. दुःख होणे 3. डोळ्यांत पाणी येणे.
Solution & Step-by-Step Answer:
दु:ख होणे.
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती: 1. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा: |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
पुढील नामांआधी कंसातील योग्य विशेषणे जोडा: (चकचकीत, गुबगुबीत, गुळगुळीत, खरबरीत)
Solution & Step-by-Step Answer:
2. लेखननियम:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
अचूक शब्द निवडून लिहा: |
3. विरामचिन्हे:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा: 1. बाबा चला जेवून घ्या मनू म्हणाला 2. आबा म्हणाले अरे अया रडते काय फरसू
Solution & Step-by-Step Answer:
1. “बाबा, चला, जेवून घ्या,’ मनू म्हणाला. 2. आबा म्हणाले, “अरे, अया रडते काय फरसू?”
4. पारिभाषिक शब्द:
Solution & Step-by-Step Answer:
मातीची सावली Summary in Marathi प्रस्तावना: प्रसिद्ध लेखक. कथा, बालकथा, व्यक्तिचित्रण, ललित लेखन, अनुवादित लेखन असे विविध प्रकारचे लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. प्रस्तुत पाठ म्हणजे त्यांची एक कथा आहे. आधुनिक जीवनाचा, शहरी जीवनाचा प्रभाव वाढत जाऊन शेती व शेतीवर आधारित ग्रामीण जीवन हळूहळू लोप पावत आहे. अशा वेळी नामशेष होत असलेल्या संस्कृतीच्या परंपरेच्या वारसदारांची होणारी उलघाल या कथेत सांगितली आहे. ही कथा प्रमाण भाषेतच आहे. पण तिच्यातील संवाद हे बोलीभाषेतील आहेत. उत्तर कोकणाच्या वसईपर्यंतच्या किनारपट्टीतील परिसरात बोलली जाणारी ही एक बोली आहे. फरसू हा एक गरीब शेतकरी. तो पारंपरिक समाजजीवनाला अनुसरून जगणारा. जमीन, शेती, झाडेपाने यांच्यावर मनापासून, जिवापाड प्रेम करणारा. या सर्वांशी त्याचे रक्ताचेच नाते निर्माण झाले आहे. पूर्वजांनी जी वाट मळून ठेवली आहे, त्या वाटेने जाण्यात त्याला धन्यता वाटते. मनू त्याचा मुलगा. त्याला फरसूने वाढवले, शिकवले. शिक्षणाच्या जोरावर त्याला आधुनिक वळणाची नोकरी लागली. त्यानंतर त्याची दृष्टीच बदलली. चकचकीत, गुळगुळीत बंगल्याच्या बदल्यात त्याने बिल्डरला जमीन विकली. फरसूच्या जगण्याच्या सगळ्या खाणाखुणा पुसून टाकणाऱ्या एकेक घटना घडू लागल्या. त्यामुळे फरसू विकल झाला. असहायतेने तो परिस्थितीला शरण गेला. त्याच्या वेदनांचे चित्रण या कथेत आलेले आहे. शब्दार्थ: वाक्प्रचार व त्यांचे अर्थ: बोलीभाषेतील वाक्यांचा अनुवाद 1. वाक्ये: यी बावडी नय् नदी हय् नदी. कोणाया कामात खोडा घटला ते तुमश्या नशिबाई वाळू जाल्याशिवाय रेल का? 2. वाक्ये: काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे ! अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी? 3. वाक्ये: नय् ते उबा जलम त्या गोठ्यात काडाला लागलोआ. आज माणसाहारकं घर मिळालंय. 4. वाक्य: जेजूस आथं मानासुदं नेलं ते बरं होईल. 5. वाक्य: आमचा फरसू खरंस डोकरा जाला आथं. 6. वाक्य: तू आपला नुसता रडत बसलाय. 7. वाक्य: ते शाप मीस भोगीन. 8. वाक्य: माती नयेल ते ढोराअ जीवन तरी काय कामाअ? 9. वाक्य: पण आमशी नातंपण… त्यांना कायच नय् येणार रे… |










