Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय (कविता)
9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 9 मी वाचवतोय Textbook Questions and Answers
1. कोष्टक पूर्ण करा:

पूर्वीचे व्यवसाय | पूर्वीचे खेळ |
1. लोहारकाम | 1. विटीदांडू |
2. कुंभार (मडकी बनवणे) | 2. लगोरी |
3. भांड्यांना कल्हई करणे | 3. आट्यापाट्या |
2. आकृती पूर्ण करा:


3. सकारण लिहा:

जुन्या गोष्टींपैकी वाचाव्यात अशा वाटणाऱ्या गोष्टी | त्या गोष्टी वाचवण्याची तुमच्या मते कारणे |
1. कविता | 1. मन समृद्ध होते |
2. आई | 2. प्रेम, माया, जिव्हाळा लाभतो |
3. बोली | 3. विचार व्यक्त करता येतात |
4. भूमी | 4. मूल्यांवर निष्ठा असते |
4. कव्यसौंदर्य.
प्रश्न (अ)
तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातली खंत स्पष्ट करा.
उत्तर:
जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चालल्या आहेत, यांची खंत कवीला वाटते. बदलत चाललेल्या समाजातील वास्तव कवीच्या मनाला खटकते. आपण आईला ‘आई’ अशी साद घालत नाही. वासरासाठी गोठ्यात गायही हंबरत नाही. मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चाललेयत. गावगाड्यातील व्यवसाय लोप पावतायत. मुले मातीतले खेळ खेळत नाहीत. कुणी लेखन करीत नाही. मातृभाषेत कुणी या भूमीतली संस्कृती जपत नाही. अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट होण्याची खंत कवीला बोचते आहे.
प्रश्न (आ)
‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.
उत्तर:
पूर्वीच्या कविता किंवा साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्य जपणारे होते. जीवनानुभूतीतून आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होत्या. परंतु आता लिहिणाऱ्या हातातून सकस साहित्यनिर्मिती होत नाही, हे कवीला सांगायचे आहे. जो शब्दपसारा दिसतो तो भावनाशून्य व पोकळ आहे, असे कवीला म्हणायचे आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही, याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात की, आताचे शब्द केविलवाणे झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता व तात्कालिकता कवीला या ओळीतून सांगायची आहे.
प्रश्न (इ)
सामाजिक बदलाबद्दल कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
उत्तर:
पूर्वी गावगाडा होता. नैतिक मूल्ये जपणारी गावची संस्कृती होती. हळूहळू समाज बदलत गेला. शहरे वाढू लागली. सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किराणा, भुसार मालाची दुकाने हरवून गेली. लोहाराचा भाता बंद पडला. कुंभाराचे चाक फिरायचे थांबले. तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर लयाला गेल्यामुळे कल्हईची झिलई निघून गेली. चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घेतली. आधुनिक समाजव्यवहारांमुळे मायेची माणसे दुरावली. अशा प्रकारे या कवितेत सामाजिक बदलाविषयी कवीने सांगितले आहे.
5. स्वमत:
प्रश्न (अ)
‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.
उत्तर:
‘माझी बोली’ म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा होय. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात जी नवीन पिढी शिकते आहे; त्यांच्यावर शिशुवर्गापासूनच इंग्रजीचे संस्कार होत आहे. पूर्वीचे घरचे मराठमोळे वातावरण झपाट्याने बदलत आहे. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी रुळत जाते आहे. आईची जागा ‘मम्मी’ने घेतली आहे. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हळूहळू मंदावत आहे. मातृभाषा हेच विचार व भावना मांडण्याचे नैसर्गिक माध्यम असते. ते माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवीने खंत व्यक्त केली आहे. अशा प्रकारे ‘माझी बोली’ या संकल्पनेतून कवींची खेदजनक भावना व्यक्त झाली आहे.
प्रश्न (आ)
‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
शहरे वाढली तसतसे लोकांच्या गरजा पुरवणारे ‘मॉल’ वाढले. पूर्वी शहरामध्येसुद्धा छोटे छोटे दुकानदार होते. विशिष्ट प्रकारच्या वस्तू विशिष्ट दुकानांत मिळायच्या. मॉलमध्ये सर्व वस्तूंची दुकाने एकत्र असतात. शिवाय खादयपान सेवेची हॉटेल्स व सिनेमागृहेही असतात. मॉलच्या एकंदर झगमगाटाचे आकर्षण माणसांच्या ठायी निर्माण झाले. महागड्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज फोफावला. त्यातच आकर्षक जाहिरातींची भर पडल्यामुळे लोकांना मॉलचे आकर्षण निर्माण झाले. साहजिकच माणसांचा मॉलमध्ये राबता सुरू झाला आणि त्यांनी छोट्या दुकानांकडे पाठ फिरवली. अर्थात मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो, हे खरे आहे.
उपक्रम:
तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची पुढील मुद्द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा:
Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 9 मी वाचवतोय Additional Important Questions and Answers
1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 2 : (आकलन)


कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)
कृतिपत्रिकेतील प्रश्न 2 (आ) साठी……
2. कवितेचा विषय → वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव चित्रण हा कवितेचा विषय आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →
4. कवितेतून मिळणारा संदेश → चांगली जुनी संस्कारक्षम मूल्ये हरवू नयेत; आईची बोली पारखी होऊ नये; भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होता कामा नये; हा संदेश प्रस्तुत कविता देते.
5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवींनी चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. कवितेचा शेवट परिणामकारक झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.
6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → यंत्रयुगातील नवीन बदलांमुळे जुनी मूल्ये ढासळत चाललीयत. ती वाचवणे व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
→ बदलत जाणाऱ्या वास्तवामध्ये ममी-डॅडी या परकीय शब्दांमुळे
आईची मायेची हाक आता ऐकू येत नाही. गोठ्यातल्या गाईसुद्धा 3 आता नैसर्गिक हंबरणे विसरत चालल्या आहेत.
8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → जुनी मूल्ये नामशेष होण्याची खंत कवींनी आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडली आहे. नवीन पिढीचा निरुद्देश चंगळवाद अधोरेखित केला आहे. आई, आईची बोली, भूमी आणि कविता वाचवण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला आहे. या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडली.
कृतिपत्रिकेतील प्रश्न 2 (इ) साठी…
काव्यसौंदर्य: बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दांत चितारताना प्रस्तुत ओळींमध्ये कवी म्हणतात की ‘मम्मी-डॅडी’ या उसन्या परिभाषेमुळे ‘आई’. अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती हाक सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या मायेचा वारसा असलेल्या गाईसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरल्या आहेत. त्या आता आपल्या वासरांसाठी हंबरत नाहीत. म्हणजेच आई-लेकरांचे संबंध मायाममतेचे राहिले नाहीत, ही खंत कवींनी व्यक्त केली आहे. भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होते, याची बोचणी प्रस्तुत ओळींमध्ये स्पष्टपणे दर्शवली आहे.
भाषिक वैशिष्ट्ये: जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवीने चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. योग्य परिणामकारकता शब्दाशब्दांत अभिव्यक्त झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.
भाषाभ्यास:
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:
1. समास:
2. वाक्प्रचार:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा: 1. दंग असणे 2. दुरावणे.
Solution & Step-by-Step Answer:
1. दंग असणे – अर्थ : मग्न असणे. वाक्य: जेव्हा बघावे तेव्हा मंदार खेळामध्ये दंग असतो.
2. दुरावणे – अर्थ : लांब जाणे. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती: 1. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा: 1. लिहिता-वाचता येणारा → ………………….. 2. लिहिता-वाचता न येणारा → ………………..
Solution & Step-by-Step Answer:
1. साक्षर 2. निरक्षर.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
अनेकवचन लिहा: |
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पुढील शब्दांतील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द लिहा: 1. वाचवतोय 2. समाजाचे
Solution & Step-by-Step Answer:
1. चव, वय 2. मास सजा
2. लेखननियम:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
अचूक शब्द ओळखा: 1. बोलचाली, बोलाचाली, बोलाचालि, बोलचालि. 2. दूरर्दशन, दुरदर्शन, दूर्रदर्शन, दूरदर्शन.
Solution & Step-by-Step Answer:
1. बोलाचाली 2. दूरदर्शन.
3. पारिभाषिक शब्द:
Solution & Step-by-Step Answer:
मी वाचवतोय Summary in Marathi कवितेचा आशय: समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहे. जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यंत्रयुगाच्या आधुनिक झगमगाटात आईची बोली कोणी बोलत नाही. नवीन पिढी यांत्रिक वस्तूंच्या आहारी गेली आहे. या सर्व बदलांची खंत या कवितेत कवींनी व्यक्त केली आहे. जुन्या काही चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणे गरजेचे झाले आहे. शब्दार्थ: टिपा: वाक्प्रचार व त्यांचे अर्थ: कवितेचा भावार्थ: बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दांत चितारताना कवी म्हणतात – ‘आई’ अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या गाईसुद्धा आता हंबरणे विसरल्या आहेत. त्या आता वासरासाठी हंबरत नाहीत. (आई-लेकरांचे संबंध मायेचे राहिले नाहीत.) मोठमोठे मॉल्स व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या झगमगाटी दुनियेत आता पूर्वीच्या किराणा व भुसाराची दुकाने हरवून जात आहेत. पूर्वीच्या गावच्या संस्कृतीत (गावगाड्यात) असलेले (जुने व्यावसायिक) लोहार, कुंभार नि त्यांचे भाते व चाके गावगाड्याबरोबरच निमूटपणे नाहीशी झाली आहेत. पूर्वीच्या भांड्यांची कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे. चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखेसकट दूर गेली. आता धुराशिवाय ती गॅस शेगडीवर शिजत असलेली दिसते.संभाषणातून-संवादातून हल्ली (माझी) मातृभाषा (आईची बोली) निघून चालली आहे. आता मुले सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटीदांडू आणि लगोरीचे खेळ खेळत नाहीत. त्यांचा गिल्ला आता थांबलाय. आता आट्यापाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झाले आहेत. परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाहीत. आता मुले दूरदर्शनच्या स्पोर्ट चॅनेलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात किंवा गुन्हेगारी विश्वातील मालिका बघत राहतात. आता कुणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत. लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय. शब्द केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जातात. अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी माझी कविता सांभाळतोय आणि कवितेसोबतच माझी आई, माझी भाषा नि माझी भूमी यांचा { मी या आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे. |