Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 5Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 1 नाच रे मोरा Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 1 नाच रे मोरा. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

13 Solved Questions560 words

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 1 नाच रे मोरा

5th Standard Marathi Digest Chapter 1 नाच रे मोरा Textbook Questions and Answers

1. ऐका. म्हणा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
ऐका. म्हणा.

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच!

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच।। 1।।

झर झर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ
काहीतरी गाऊ
करून पुकारा नाच।। 2।।

थेंब थेंब तळ्यात नाचती रे
टप्टप् पानात वाजती रे
पावसाच्या रेघात
खेळ खेळू दोघांत
निळ्या सौंगड्या नाच।। 3।।

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच।। 4।।

– ग. दि. माडगूळकर

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 1 नाच रे मोरा Additional Important Questions and Answers

1. खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दांत लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एक किंवा दोन शब्दांत लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
प्रस्तुत कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
प्रस्तुत कवितेत पावसाळ्याचे वर्णन केले आहे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
प्रस्तुत कविता कोणी लिहिली आहे?
Solution & Step-by-Step Answer:
प्रस्तुत कविता ‘ग. दि. माडगूळकरांनी’ लिहिली आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
कवी मोराला कशाप्रकारे नाचण्यास सांगत आहे?
Solution & Step-by-Step Answer:
कवी मोराला पिसारा फुलवून नाचण्यास सांगत आहे.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
झाडांची इरली कशामुळे भिजली आहे?
Solution & Step-by-Step Answer:
झाडांची इरली झर झर धार झरल्यामुळे भिजली आहे.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कवी कोणाबरोबर खेळ खेळणार आहे?
Solution & Step-by-Step Answer:
कवी निळ्या सवंगड्यांबरोबर खेळ खेळणार आहे.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
कवी मोराला कशाखाली नाचण्यास सांगत आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
कवी मोराला आभाळातील सातरंगी कमानीखाली नाचण्यास सांगत आहे.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
इंद्रधनुष्यातील सात रंग कोणते?
Solution & Step-by-Step Answer:
तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा हे इंद्रधनुष्यातील सात रंग आहेत.

3. कंसातील शब्दांचा आधार घेऊन रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कंसातील शब्दांचा आधार घेऊन रिकाम्या जागा भरा. (रिमझिम, कमान, कापूस, धार, सौंगड्या, जोडी, इरली, तळ्यात, पानात)

उत्तरः

4. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
1. ढगांशी वारा झुंजला रे …………………. पिंजला रे 2. थेंब थेंब तळ्यात नाचती रे ……………………….. वाजती रे 3. पावसाची रिमझिम थांबली रे …………………………… जमली रे 4. आभाळात छान छान …………… कमानीखाली त्या नाच।
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. काळा काळा कापूस 2. टपटप पानात 3. तुझी माझी जोडी 4. छान छान सात रंगी कमान

5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन कसे केले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
आकाशात काळे काळे ढग जमा झाले आहेत. वारा सुटला आहे. वीज चमकत आहे. झर झर पावसाची धार पडत आहे. झाडांची इरली भिजली आहे. पावसाचे थेंब तळ्यात नाचत आहेत. पावसाच्या थेंबांचा पानांवर पडून टप्टप् असा आवाज येत आहे. आकाशात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन केले आहे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
प्रस्तुत कवितेत आभाळाचे वर्णन कसे केले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
पाऊस सुरू होण्यापूर्वी आभाळात काळा काळा कापूस पिंजावा तसे काळे ढग जमा झाले आहेत व वीज कडाडते आहे. तसेच पावसाची रिमझिम थांबल्यावर आभाळात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवितेत आभाळाचे वर्णन केले आहे.