Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 5Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 2 हत्तीचे चातुर्य Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 2 हत्तीचे चातुर्य. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

25 Solved Questions17 Diagrams888 words

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

5th Standard Marathi Digest Chapter 2 हत्तीचे चातुर्य Textbook Questions and Answers
1. पाहा. ऐका. वाचा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पाहा. ऐका. वाचा.
Solution & Step-by-Step Answer:

2. पाहा. सांगा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पाहा. सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
एकदा एका मैदानात काही मुले फुटबॉल खेळत होती. या मुलांचा हा खेळ तीन ससे पाहत होते. या मुलांचे खेळून झाल्यावर त्या तीन सशांनी फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला. खेळता खेळता अचानक त्यांचा फुटबॉल एका मोठ्या खड्ड्यात गेला. ससे विचारात पडले. आता हा फुटबॉल कसा काढावा बरं? त्यांनी एक युक्ती लढवली व एक फळी आणली ती फळी खड्ड्यात घातली, पण तो बॉल काही वर आला नाही. एक हत्ती हे सगळं पाहत होता. सशांच्या धडपडीची त्याला गंमत वाटली व दया आली. त्याने सोंडेत पाणी भरून ते पाणी खड्ड्यात सोडले. त्याबरोबर फुटबॉल वर आला. हत्तीने आपल्या सोंडेने फुटबॉल काढला. ससे पुन्हा आनंदाने खेळू लागले. हत्तीच्या चातुर्यामुळे त्यांना फुटबॉल परत मिळाला. तात्पर्य – सयमसुचकता (Sense of presence) दाखवली तर अडचणीतून मार्ग निघतो.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
सुरुवातीला दिलेल्या चित्रांवालील नावे सांगा.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.

प्रश्न 3. चित्र पाहा. कोण ते सांगा. (अ) खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे – (आ) सशांना मदत करणारा –

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
(अ) ससे (आ) हत्ती

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काटा.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
सर्व चित्रे पाहा व गोष्ट सांगा.

प्रश्न 6. घ,ठ, थाप या अक्षरांपासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यांसारख्या इतर अक्षरांपासून तुम्हालाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा.

1. शब्द ओळखा व कार्यावर लिहा.

प्रश्न 1.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
(अ) वेगळा (ब) बगळा

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
(अ) गाजर (ब) मांजर

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
(अ) मगर (ब) नगर

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
(अ) कडक (ब) भडक

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
(अ) सामान (ब) कमान

प्रश्न 6 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
(अ) वाटाणा (ब) फुटाणा

प्रश्न 7 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
(अ) आकाश (ब) प्रकाश

प्रश्न 8 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
(अ) फाटके (ब) तुटके

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य Additional Important Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
चित्रात किती ससे आहे?
Solution & Step-by-Step Answer:
चित्रात तीन ससे आहेत.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
चित्रात मुले कोणता खेळ खेळत आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
चित्रात मुले फुटबॉल खेळत आहेत.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
मुले फुटबॉल खेळताना त्यांच्याकडे कोण पाहत आहे? उत्तरः मुले फुटबॉल खेळताना त्यांच्याकडे ससे पाहत आहेत.

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खेळत असतांना फुटबॉल कुठे गेला?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
खेळ खेळता खेळता फुटबॉल खड्ड्यात गेला.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
ससे फुटबॉल कशाप्रकारे बाहेर काढत आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
ससे फळीने फुटबॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
फुटबॉल बाहेर काढण्यासाठी शेवटी कोणी प्रयत्न केला?
Solution & Step-by-Step Answer:
फुटबॉल बाहेर काढण्यासाठी शेवटी हत्तीने प्रयत्न केला.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
हत्तीने खड्ड्यात पाणी कशातून टाकले?
Solution & Step-by-Step Answer:
हत्तीने खड्ड्यात पाणी सोंडेतून टाकले.
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
खड्ड्यात पाणी टाकल्याने काय झाले?
Solution & Step-by-Step Answer:
खड्ड्यात पाणी टाकल्याने फुटबॉल वर आला.
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
सशांना केव्हा आनंद झाला?
Solution & Step-by-Step Answer:
फुटबॉल खड्ड्यातून वर आल्याने सशांना आनंद झाला.
प्रश्न 10 Maharashtra Board Solution
शक्तिपेक्षा काय श्रेष्ठ असते?
Solution & Step-by-Step Answer:
शक्तिपेक्षा युक्ति श्रेष्ठ असते.

2. पुढील दिलेली चित्रे पाहून कोण ते लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पुढील दिलेली चित्रे पाहून कोण ते लिहा. 1. मुलांचा खेळ पाहून फुटबॉल खेळणारे – 2. सोंडेने खड्ड्यात पाणी सोडणारा –
Solution & Step-by-Step Answer:
1. ससे 2. हत्ती

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
पुढील मुद्द्यांच्या व चित्रांच्या मदतीने गोष्ट तयार करून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
मुंगी ……….. कबुतर मैत्री …………. एक दिवस मुंगी पाण्यात ………………. कबुतराने पान टाकणे. मुंगीचे पानावर चढणे ………….. प्राण वाचणे ………. जाणीव एके दिवशी जंगलात शिकारी …………….. कबुतराच्या शिकारीचा नेम …………… मुंगीचा शिकाऱ्याच्या पायाला चावा ……त्याचा नेम चुकणे ………….. कबुतराचे प्राण वाचणे.

कथा (खरे मित्र):

एकदा एका जंगलात मुंगी-कबुतराची मैत्री झाली. मुंगी पाणी पीत असताना पाय घसरून पडली. कबुतराने लगेच झाडाचे पान टाकून तिला वाचवले. मुंगीला या गोष्टीची जाणीव होती की कबुतरामुळेच आपले प्राण वाचले, नाहीतर आपण बुडून मरून गेलो असतो. एके दिवशी त्याच जंगलात एक शिकारी आला. शिकाऱ्याने इकडे-तिकडे पाहिले. त्याला एका झाडावर कबुतर दिसले. त्याच्या मनात कबुतराची शिकार करावी असे आले. शिकाऱ्याने लगेचच नेम धरला व बंदूकीने गोळी कबुतराला मारणार इतक्यात मुंगीचे लक्ष शिकाऱ्याकडे गेले. मुंगीला काय करावे सुचेना. अखेरीस मुंगीने शिकाऱ्याच्या पायाचा कडकडून चावा घेतला. त्याचा नेम चुकला व अशात-हेने कबुतराचे प्राण वाचले. कबुतर व मुंगी आता खूपच चांगले मित्र झाले.

तात्पर्य:

1. आपल्यावर उपकार करणाऱ्याला कधी विसरू नये.
2. खरे मित्र संकटकाळात एकमेकांची मदत करतात.

हत्तीचे चातुर्य Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

प्रस्तुत पाठात चित्ररूपाने आलेल्या कथेत हत्तीने दाखवलेल्या समयसुचकतेचे व चातुर्याचे वर्णन केले आहे.

शब्दार्थ/Meanings: