Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 7Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 3 माझ्या अंगणात (कविता) Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 3 माझ्या अंगणात (कविता). Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

42 Solved Questions8 Diagrams1818 words

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 3 माझ्या अंगणात (कविता)

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 3 माझ्या अंगणात Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?
उत्तरः
कवीच्या अंगणात मोती-पवळ्याची म्हणजे धान्याची रास पडते.

प्रश्न आ.
रानमेवा कुठे उगवला आहे?
उत्तरः
रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे.

प्रश्न इ.
कवी गुण्यागोंविदाने सनमेवा खायला का सांगत आहे?
उत्तरः
रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो म्हणून कवी गुण्यागोंविदाने रानमेवा खायला सांगत आहे.

प्रश्न ई.
कवीच्या अंगणात पाखरे का येतात?
उत्तरः
कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात.

2. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

प्रश्न अ.
गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत.
उत्तर:
गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं.

प्रश्न आ.
काळ्याभोर मातीतून टपोरे, दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते.
उत्तर:
काळ्याशार मातीतुनी मोती-पवळ्याची रास.

प्रश्न इ.
शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते.
उत्तर:
जीव दमतो, शिणतो घास भरवते माय.

प्रश्न ई.
रानातला रानमेवा एकमेकांना देत, घेत आनंदाने खाऊया.
उत्तरः
रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्यागोविंदानं खावा.

3. तुम्ही पाहिलेल्या एखादया धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुम्ही पाहिलेल्या एखादया धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा. उत्तरः दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या गावाला गेलो होतो. माझे गाव खेडेगाव आहे. गावातली वाट शेतमळ्याच्या मधून जाते. भाताच्या धान्याने शेतमळा भरला होता. पिवळीजर्द अशी भाताची शेते दिसत होती. त्यावर पाखरे येऊन भाताच्या लोंब्या आपल्या चोचीने काढून खात होती.

चर्चा करा. सांगा.

रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.

खेळूया शब्दांशी.

(अ) कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
काळ्याशार मातीतुन मोती – पवळ्याची………… (मिजास’, आस, रास)
Solution & Step-by-Step Answer:
ः रास
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
घरामंदी घरट्यात जशी दुधातली …………... (माय, साय, जाय)
Solution & Step-by-Step Answer:
ः साय
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
दूर उडुनिया जाता, आसू येती ………………... (गालावर, सारेजण, घरट्यात)
Solution & Step-by-Step Answer:
ः गालावर

(आ) समूहदर्शक शब्दांची यादी करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
समूहदर्शक शब्दांची यादी करा.

Solution & Step-by-Step Answer:

(इ) खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. (अ) सांडलं, (आ) रास, (इ) माय
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) पडलं, (आ) मिजास, (इ) साय

(ई) खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा. (अ) खावा, (आ) माय, (इ) घरामंदी
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) खाणे, (आ) आई, (इ) घरामध्ये

उपक्रम:
तुमच्या परिसरातील एखादया अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्नावली तयार करा.

खेळ खेळूया.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
‘स’ चा शब्दपंखा पूर्ण करा.

Solution & Step-by-Step Answer:

कविता करूया

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
घराभोवती प्रशस्त अंगण, खेळ खेळी तेथे सारेजण, सडा, रांगोळी अन् तोरण, साजरे करतो सगळे सण.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
आला दिवाळीचा सण दारा बांधूया तोरण काढू दारापुढे रांगोळी गोडधोड करू पुरणपोळी

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
गुढीपाडव्याचा हा सण दारा बांधू रंगीबेरंगी पाना-फुलांचे तोरण देवास देऊ नारळाचा मान

वरील आकृत्यांमध्ये गोलात दिलेल्या शब्दांशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचे निरीक्षण करा. यांमध्ये शेवट समान असणारे काही शब्द आहेत.
उदा., खेळ, मेळ, नारळ
सण, तोरण, सारेजण
दार, घर, सुंदर
अशा शब्दांना यमक जुळणारे शब्द म्हणतात.

या शब्दांचा वापर करून आपल्याला लयबद्ध वाक्ये तयार करता येतात.
उदा., घराभोवती प्रशस्त अंगण,
जमले तेथे सारेजण,
सडा, रांगोळी अन् तोरण,
साजरे करतो सगळे सण.
याप्रमाणे वरील आकृत्यांमध्ये दिलेल्या इतर शब्दांचा उपयोग करून कवितेच्या ओळी तयार करा..

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 3 माझ्या अंगणात Important Additional Questions and Answers

कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुम्ही आम्ही सारेजण, गुण्यागोंविदानं …………….. (खावा, जावा, रहावा) उत्तरः खावा

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
जीव दमतो, शिणतो’, घास भरवते ……………….. (माय, हाय, जाय)
Solution & Step-by-Step Answer:
ः माय
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आणि माझ्या अंगणात लख्ख ………………… पडलं. (प्रकाश, चांदणं, सोने)
Solution & Step-by-Step Answer:
ः चांदणं
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
दिला-घेतला वाढतो, रानातला ………………... (सुकामेवा, खवा, रानमेवा)
Solution & Step-by-Step Answer:
ः रानमेवा

खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
‘माझ्या अंगणात’ या कवितेचे कवी कोण आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
‘माझ्या अंगणात’ या कवितेचे कवी ‘ज्ञानेश्वर कोळी’ हे आहेत.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
काळ्या रानात काय सांडले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
काळ्या रानात गहू व ज्वारीचे दाणे सांडले आहेत.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
थकलेल्या जीवाला घास कोण भरवते? उत्तरः थकलेल्या जीवाला घास माय भरवते.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कवीच्या गालावर आसू का ओघळतात?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
कवीच्या अंगणातील दाणे टिपून पाखरं तृप्त होऊन दूर उडून जातात तेव्हा कवीच्या गालावर आसू ओघळतात.

खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आज माझ्या अंगणात पाखरे दाणे टिपत आहेत.
Solution & Step-by-Step Answer:
अंगणात आज माझ्या दाणं टिपती पाखरं.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
माझ्या अंगणात रानमेवा ऐटीने डुलत आहे.
Solution & Step-by-Step Answer:
अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
अंगणातील पाखरं दूर उडून गेल्यावर कवीच्या गालावर आसू ओघळतात. उत्तरः दूर उडुनिया जाता आसू येती गालावर.

खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
गहू …………………………. ……………………… सांडलं, आणि ………………………. ……………………….. पडलं।।
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, आणि माझ्या अंगणात लख्ख चांदणं पडलं।।1।।
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
काळ्याशार ………………… ……………………………रास, अंगणात …………………….. रानमेव्याची ………………..
Solution & Step-by-Step Answer:
काळ्याशार मातीतुनी मोती-पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
जीव दमतो, ………………. …………………………. माय, घरामंदी …………………….. ……………………………साय।। उत्तरः जीव दमतो, शिणतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय।।
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
अंगणात …………………. …………………….. पाखरं, दूर ………………………….. …………………….गालावर।।
Solution & Step-by-Step Answer:
ः अंगणात आज माझ्या दाणं टिपती पाखरं, दूर उड्डुनिया जाता आसू येती गालावर

खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
काळ्याशार मातीतून काय मिळते, असे कवी म्हणतात?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
काळ्याशार मातीतून मोती-पोवळ्या प्रमाणे गहू-ज्वारीचे पीक मिळते, ते चांदण्याप्रमाणे लखलखते, असे कवी म्हणतात.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
रानातल्या रानमेव्याची मिजास आहे, असे कवी का म्हणतात? उत्तरः कवीच्या घराजवळ रानमेव्याची झाडे डुलत आहेत. ती फळे एकमेकांना दिल्या घेतल्याने आपला आनंद अजून वाढतो म्हणून कवी म्हणतात की, रानातल्या रानमेव्याची मिजास म्हणजेच तोरा आहे.

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्ये लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

जोड्या जुळवा.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution

‘अ’ गट

‘ब’ गट

1. लख्ख

(अ) साय

2. मोती-पवळ्याची

(ब) मिजास

3. रानमेव्याची

(क) रास

4. दुधातली

(ड) चांदणं

Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. लख्ख

(ड) चांदणं

2. मोती-पवळ्याची

(क) रास

3. रानमेव्याची

(ब) मिजास

4. दुधातली

(अ) साय

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील आकृतिबंध पूर्ण करा. उत्तरः

खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कवीने मोती-पवळ्याची उपमा कशास दिली आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः कवीने मोती-पवळ्याची उपमा ज्वारीच्या धान्याच्या दाण्यांना दिली आहे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
दिल्या घेतल्याने काय वाढते?
Solution & Step-by-Step Answer:
ः दिल्या घेतल्याने रानातला रानमेवा वाढतो.

कृती 3: काव्यसौंदर्य

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
‘दूर उडुनिया जाता आसू येती गालावर’ या काव्यपंक्तीतून सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
कवीने आपल्या कवितेतून शेतात धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला होणारा आनंद व्यक्त केला आहे. धान्याने, समृद्धीने भरलेल्या अंगणात अनेक पाखरे दाणे टिपण्यास येतात. मात्र नंतर दूर उडून जातात. त्यांचा सहवास न लाभल्याने डोळ्यांतील अश्रू गालावर ओघळतात. सवयीच्या पाखरांचा सहवास न लाभल्याचे दु:ख प्रस्तुत पंक्तीतून व्यक्त होते.

व्याकरण व भाषाभ्यास

समूहदर्शक शब्दांची यादी करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

उत्तरः

खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

खालील नामांना कवितेतील विशेषणे शोधून लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

खालील शब्दांचे वचन बदला.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

‘ख’ चा शब्दपंखा पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

1. खोटेच्या विरुद्ध
2. बैलगाडी
3. गाईच्या दुधापासून तयार होणारा एक पदार्थ
4.  मोठा दगड
5. पक्षी या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द पा …

Solution & Step-by-Step Answer:

लेखन विभाग:

खालील विषयावर चर्चा करा व लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील विषयावर चर्चा करा व लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, या विषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.

प्रश्न 2. तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.

माझ्या अंगणात Summary in Marathi

काव्य परिचयः

घराला जसं स्वतंत्र अस्तित्व असतं तसं अंगणालाही असतं. आशा-आकाक्षांच्या वृक्षवेली, स्वप्नांची फुलपाखरं, सृजनाच्या कळ्याफुलं या अंगणातच भेटत राहतात असे हे अंगण – ‘माझ्या अंगणात’ या कवितेत आले आहे. रात्रंदिवस कष्ट केल्यावर शेतातील धान्य, समृद्धता अंगणात येऊन पसरते. तेव्हा शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नाही. शेतकऱ्याच्या मनातील याच विविध भावनांचे, वर्णन कवीने केले आहे.

Every house has its own identity. The same way every courtyard is unique. One can meet to the creepers of wishes, butterflies of dreams, birds of innovation in this courtyard. Poet has described such a ‘courtyard’ in his poem. After a core hardship when farmer pours his wealth of grains in the courtyard, his joy becomes boundless. The feelings and emotions of a farmer are described in this poem.

कवितेचा भावार्थ:

शेतात धान्य डौलात डुलत असलेले पाहून आनंदित झालेला शेतकरी म्हणतो की, माझ्या काळ्याशार शेतात मोत्यांप्रमाणे गहू, ज्वारीचे दाणे उगवून आले आहेत, छान पिकले आहेत आणि त्यांच्या प्रकाशाने जणू माझ्या अंगणात शुभ्र चांदणे पडल्याचा भास होत आहे.।।1।।

शेतातील काळ्या मातीतून मोती-पोवळ्यांसारखी सुरेख व किमती अशा धान्याची रास सांडली आहे. माझ्या अंगणात रानमेव्याची अर्थात रानातील फळे, कंदमुळांची रास आनंदाने पसरली आहे.।।2।।

रानातल्या फळे व कंदमुळांचा मेवा एकमेकांना दिल्या-घेतल्याने वाढतो. तुम्ही, आम्ही, सगळ्यांनी हा रानमेवा एकत्र आनंदाने, प्रेमाने, समजुतीने खाऊ या.।।3।।

शेतामध्ये कष्ट करून दमलेल्या जीवाला घरी आल्यावर आई मायेने घास भरवते. घरामध्ये मायेने करणारी, छोट्याशा घरट्यात सुखाने राहणारी आई जणू दुधावरची साय आहे.।।4।।

आज माझ्या अंगणात अनेक पाखरे दाणे टिपत आहेत, त्यांना पाहून जीव सुखावून जातो आहे. परंतु हिच पाखरे जेव्हा अचानक दूर उडून जातात, तेव्हा डोळ्यांतील अश्रू गालावर ओघळतात.।।5।।

शब्दार्थ:

वाकाचार:

1. गुण्यागोविंदाने राहणे – आनंदाने राहणे