Class 9 (SSC)Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus
Chapter 5 व्यायामाचे महत्त (कविता) Solutions
Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 5 व्यायामाचे महत्त (कविता). Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.
31 Solved Questions• 7 Diagrams• 3082 words
Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 व्यायामाचे महत्त(कविता)
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 5 व्यायामाचे महत्त Textbook Questions and Answers
1. व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
2. चूक की बरोबर ते लिहा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
चूक की बरोबर ते लिहा. (अ) व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो. (आ) व्यायामाने जडत्व वाढते. (इ) व्यायामाने स्नायू अशक्त होतात. (ई) व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
Solution & Step-by-Step Answer:
(अ) बरोबर (आ) चूक (इ) चूक (ई) बरोबर
3. शब्दसमूहांबद्दल एक शब्द चौकटीत लिहा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
शब्दसमूहांबद्दल एक शब्द चौकटीत लिहा. (अ) आरोग्य देणारी – (आ) विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती – (इ) स्वत:ची कामे स्वत:करणारा – (ई) एका अंगाने केलेला विचार –
प्रश्न (अ) व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा. उत्तरः मानवी जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायामाचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होतो. शरीरामध्ये तरतरी, उत्साह येतो. व्यायामामुळे अन्नपचन सहजपणे होते. शरीरात स्थूलपणा वाढत नाही. रक्तव्यवस्था सुरळीत होते. शरीरातील स्नायू बळकट मजबूत होऊन आपले आयुष्य वाढते. शिवाय शरीरातील पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि काम करण्याचा उत्साह वाढतो. त्यामुळे दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे.
प्रश्न (आ) ‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. उत्तरः तुकडोजी महाराज म्हणतात की, व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोग प्रतिकारकशक्ती वाढते. येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहज सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबीसुद्धा बनतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. या नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते. शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो. म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश, स्फूर्ती वाढते.
प्रश्न (इ) ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा. उत्तरः संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ बसून घराघरात ‘शुभं करोति कल्याणम्’ ही दिव्याची प्रार्थना म्हटली जाते. ‘आरोग्यम् धनसंपदा’ ही त्यातीलच एक पंक्ती आहे. प्रार्थना करताना जणू आपण परमेश्वराकडून आरोग्यरूपी धनसंपदेची अपेक्षा करत असतो. पण अवघ्या जगाने मान्य केले आहे की उत्तम आरोग्य प्राप्त करणे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी नियमितपणे योग्य व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामुळे अन्नपचन व्यवस्थित होते. रक्तव्यवस्था सुरळीत होते. शरीरातील स्नायू बळकट होऊन शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय शरीरातील पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण संतुलित राहते. शरीरामध्ये तरतरी, उत्साह वाढतो. या व्यायामामुळेच उत्तम आरोग्याची प्राप्ती आपणाला होते. आपल्याला लाभलेले उत्तम आरोग्य ही खऱ्या अर्थाने आपली धनसंपदाच असते.
भाषाभ्यास:
समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्याला ‘पद’ असे म्हणतात. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे प्रकार ठरतात.
पद
प्रधान / गौण (कमी महत्त्वाची)
समासाचे नाव
1. पहिले पद
प्रधान
अव्ययीभाव
2. दुसरे पद
प्रधान
तत्पुरुष
3. दोन्ही पदे
प्रधान
द्ववंद्ववं
4. दोन्ही पदे
गौण
बहुव्रीही
यावर्षी आपल्याला ‘अव्ययीभाव’ आणि ‘वंद्व’ हे दोन समास समजून घ्यायचे आहेत.
Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 5 व्यायामाचे महत्त Additional Important Questions and Answers
पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. उत्तरः
प्रश्न 2Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. उत्तरः
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
सर्वप्रकारे, सर्व ठिकाणी कोणाला वैरी मानावे असे कवी म्हणतो?
Solution & Step-by-Step Answer:
ः सर्वप्रकारे, सर्व ठिकाणी आळसाला वैरी मानावे असे कवी म्हणतो.
प्रश्न 2Maharashtra Board Solution
व्यायामाविण काय विकारी होते असे कवी म्हणतो?
Solution & Step-by-Step Answer:
ः व्यायामाविण सात्त्विक भोजन विकारी होते असे कवी म्हणतो.
ः आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे, हे सगळ्या जगाने मान्य केलेले आहे. व्यायामामुळेच आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण होते.
प्रश्न 2. व्यायामाविण सात्त्विक भोजन। तेहि मारी विकारी होऊन। उत्तरः आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण सात्त्विक आहार घेत असतो. या सात्त्विक भोजनाने आपले शरीर व मन छान स्वस्थ राहते; पण तुकडोजी महाराज म्हणतात, की अशा भोजनासोबतच व्यायामही केला पाहिजे. नाहीतर अशा भोजनामुळेही आपणस विविध विकार, विविध आजार होऊ शकतात.
प्रश्न 3Maharashtra Board Solution
व्यायामहीना पित्त, कफ, वायु। जर्जर करिती अत्यंत।।
Solution & Step-by-Step Answer:
ः जर आपण व्यायाम करीत नसू तर आपल्या शरीरात पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण कमी-जास्त होऊ लागते. पित्त, कफ, वायू यांच्या असंतुलित प्रमाणामुळे रोग होतात आणि आपण आजारी पडतो. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. व्यायामामुळे पित्त, कफ, वायू यांचे शरीरातील प्रमाण योग्य व संतुलित राहण्यास मदत होते.
प्रश्न 4Maharashtra Board Solution
व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।
Solution & Step-by-Step Answer:
ः तुकडोजी महाराज म्हणतात, की व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढते. येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहज सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबीसुद्धा बनतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. या नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होऊन ताजेतवाने बनते. शिवाय कोणत्याही कामांमध्येही उत्साह जाणवतो.
पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
व्यायाम आरोग्यदायी मित्र। हे ध्यानी ठेवावे सूत्र।
Solution & Step-by-Step Answer:
ः राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व साध्या, सरळ भाषेत समजावून सांगितले आहे. ते म्हणतात की, व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
ः आपण व्यायाम नियमितपणे करायला हवा. योग्य व पुरेसा व्यायाम आपण नियमित केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजेच स्थूलपणा वाढत जातो. नियमीत व्यायामामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडौल होते. तसेच आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह भरतो.
ः तुकडोजी महाराज म्हणतात की, व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहज सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबीसुद्धा बनतो.
प्रश्न 4Maharashtra Board Solution
व्यायामाचे मानवी जीवनातील महत्त्व थोडक्यात सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
ः व्यायाम म्हणजे शारीरिक कसरत. व्यायाम फक्त मनुष्याचे शरीरच सुदृढ करीत नाही तर तो व्यक्तीला मनाने देखील बळकट करीत असतो. व्यायाम मन एका ठिकाणी केंद्रित करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. जर का व्यक्तीचे मन बळकट व स्वस्थ असेल तर ती व्यक्ती शरीराने देखील बळकट होते. व्यायाम काम, क्रोध, वासना, ईर्ष्या, द्वेष, मत्सर व मोह यांपासून मनुष्याचे संरक्षण करतो. माणसाची आत्मिकशक्ती जोपासण्याचे काम व्यायामामुळे शक्य होते. व्यायाम माणसाचे मन, मनगट व मेंदू यांवर समतोल नियंत्रण ठेवतो त्यामुळे व्यक्तीचा व्यक्तिमत्त्व विकास होतो.
प्रश्न 5Maharashtra Board Solution
व्यायामाचे शरीराला होणारे फायदे तुमच्या शब्दात लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः ‘आरोग्यम् धनसंपदा’ म्हणजे स्वस्थ शरीर हेच माणसाचे वैभव आहे. सुदृढ आरोग्य माणसाची धनसंपदा आहे. माणसाचे आरोग्य तेव्हाच चांगले व स्वस्थ राहू शकते जेव्हा तो मानसिक व शारीरिकदृष्ट्या बळकट व मजबूत असेल. त्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे असते. नियमित व्यायाम करणारी व्यक्ती आजारी पडत नाही. ती शरीराने व मनाने नेहमी स्वस्थ राहते. नियमित व्यायाम केल्याने आरोग्य सुदृढ तर राहतेच शिवाय माणूस दीर्घायू होतो. म्हातारपणी सुद्धा माणूस स्वबळावर सर्व शारीरिक क्रिया पार पाडू शकतो. म्हणूनच ‘आरोग्यम् धनसंपदा’ असे जे म्हटले गेलेले आहे ते खरेच आहे.
प्रश्न 6Maharashtra Board Solution
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
Solution & Step-by-Step Answer:
ः 1. कवी / कवयित्रीचे नाव – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (माणिक बंडोजी ठाकूर)
2. संदर्भ – ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. ही कविता त्यांच्या ‘ग्रामगीता’ या पुस्तकातून घेतली आहे.
3. प्रस्तावना – ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व या कवितेतून तुकडोजी महाराजांनी प्रभावीपणे मांडले आहे.
4. वाङमयप्रकार – ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता म्हणजे ‘ओव्या’ आहेत.
5. कवितेचा विषय – व्यायामाचे शरीरावर होणारा सकात्मक परिणाम दर्शविणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता म्हणजे आदर्श ‘ओव्या’ आहेत.
7. मध्यवर्ती कल्पना – आरोग्यासाठी व्यायाम अतिशय आवश्यक गोष्ट आहे. व्यायामामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय पित्त, कफ, वायू या गोष्टींचे शरीरातील प्रमाण संतुलित राहून शरीर बलवान होते. अशा प्रकारचे मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व दर्शविणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ‘व्यायामाचे महत्त्व’ ही सुंदर कविता आहे.
8. कवितेतून मिळणारा संदेश – सुदृढ आरोग्य हवे असेल तर व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे अन्नपचन सहज होते. शिवाय स्थूलपणा कमी होऊन रक्तव्यवस्था उत्तम कार्य करते त्याचबरोबर शरीराचे स्नायू बळकट होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते. अंगामधला आळस दूर होऊन स्फूर्ती वाढते. अशाप्रकारे व्यायामामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होत असतो म्हणून दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. असा संदेश व्यायामाचे महत्त्व’ या कवितेतून आपणास मिळतो.
9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता मला खूप आवडली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले आयुष्य उजळून टाकणाऱ्या व्यायामाचे महत्त्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अतिशय सोप्या भाषेत पटवून दिले आहे. त्यांचे शरीरप्रकृतीचे बारीक निरीक्षण मनाला भावणारे आहे.
10. भाषिक वैशिष्ट्ये – ‘व्यायामाचे महत्त्व’ या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केला आहे. शिवाय ही कविता ‘ओवी’ रूपात असल्यामुळे प्रत्येक ओवीमध्ये चार चरण दिसून येतात. त्याचबरोबर ‘यमक’ अलंकाराचा वापर शोभून दिसतो.
ः ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे.
‘राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज’ यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व साध्या, सरळ भाषेत समजावून सांगितले आहे. ते म्हणतात की, व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे, हे सगळया जगाने मान्य केलेले आहे. व्यायामामुळेच आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण होते.
‘व्यायामाचे महत्त्व’ या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केला आहे. शिवाय ही कविता ‘ओवी’ रूपात असल्यामुळे प्रत्येक ओवीमध्ये चार चरण दिसून येतात. त्याचबरोबर ‘यमक’ अलंकाराचा वापर शोभून दिसतो.
ः ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे.
आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण सात्त्विक आहार घेत असतो. या सात्त्विक भोजनाने आपले शरीर व मन छान स्वस्थ राहते. पण तुकडोजी महाराज म्हणतात की, अशा भोजनासोबतच व्यायामही केला पाहिजे. नाहीतर अशा भोजनामुळेही आपणास विविध विकार, विविध आजार होऊ शकतात. सात्त्विक भोजनासोबतच चांगला, योग्य व्यायाम केला तर पोटातील जठाराग्नी चांगला प्रदिप्त होतो. म्हणजे पोटातील अग्नी चांगला पेटून आपल्या अन्नाचे सहज पचनही होते. अन्नाचे अपचन होऊन होणारे विकार व्यायामामुळे टाळता येतात.
‘व्यायामाचे महत्त्व’ या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केला आहे. शिवाय ही कविता ‘ओवी’ रूपात असल्यामुळे प्रत्येक ओवीमध्ये चार चरण दिसून येतात. त्याचबरोबर ‘यमक’ अलंकाराचा वापर शोभून दिसतो.
ः ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे.
आपण व्यायाम नियमितपणे करायला हवा. योग्य व पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजेच स्थूलपणा वाढत जातो. नियमित व्यायामामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडौल होते. तसेच आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह भरतो. तुकडोजी महाराज पुढे म्हणतात की, व्यायामामुळे शरीरातील रक्तव्यवस्था व्यवस्थित होते. रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्ताशी संबंधित विकार दूर होतात आणि आपले आयुष्य वाढते.
‘व्यायामाचे महत्त्व’ या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केला आहे. शिवाय ही कविता ‘ओवी’ रूपात असल्यामुळे प्रत्येक ओवीमध्ये चार चरण दिसून येतात. त्याचबरोबर ‘यमक’ अलंकाराचा वापर शोभून दिसतो.
ः ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे.
आपण व्यायाम नियमितपणे करायला हवा. योग्य व पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजेच स्थूलपणा वाढत जातो. नियमित व्यायामामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडौल होते. तसेच आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह भरतो. तुकडोजी महाराज पुढे म्हणतात की, व्यायामामुळे शरीरातील रक्तव्यवस्था प्रवाही होते. रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्ताशी संबंधित विकार दूर होतात आणि आपले आयुष्य वाढते.
‘व्यायामाचे महत्त्व’ या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केला आहे. शिवाय ही कविता ‘ओवी’ रूपात असल्यामुळे प्रत्येक ओवीमध्ये चार चरण दिसून येतात. त्याचबरोबर ‘यमक’ अलंकाराचा वापर शोभून दिसतो.
ः ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे.
नियमित व योग्य व्यायामामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना बळकटी प्राप्त होते. सगळे स्नायू सशक्त होत जातात. माणसाला आजारपण येत नाही. याच व्यायामामुळे मानवाला दीर्घायुष्य प्राप्त होते, असे तुकडोजी महाराज म्हणतात. आपण जर व्यायाम करीत नसू तर आपल्या शरीरात पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण कमी-जास्त होऊ लागते. पित्त, कफ, वायू यांच्या असंतुलित प्रमाणामुळे रोग होतात आणि आपण आजारी पडतो. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. व्यायामामुळे पित्त, कफ, वायू यांचे शरीरातील प्रमाण योग्य व संतुलित राहण्यास मदत होते.
‘व्यायामाचे महत्त्व’ या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केला आहे. शिवाय ही कविता ‘ओवी’ रूपात असल्यामुळे प्रत्येक ओवीमध्ये चार चरण दिसून येतात. त्याचबरोबर ‘यमक’ अलंकाराचा वापर शोभून दिसतो.
ः ‘व्यायामाचे महत्त्व’ ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे.
तुकडोजी महाराज म्हणतात की, व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढते. येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहज सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबीसुद्धा बनतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. या नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते. शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो. म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश, स्फूर्ती वाढते.
‘व्यायामाचे महत्त्व’ या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केला आहे. शिवाय ही कविता ‘ओवी’ रूपात असल्यामुळे प्रत्येक ओवीमध्ये चार चरण दिसून येतात. त्याचबरोबर ‘यमक’ अलंकाराचा वापर शोभून दिसतो.
व्यायाम आरोग्यदायी …….. सर्वतोपरी।। ‘राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज’ यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व साध्या, सरळ भाषेत समजावून सांगितले आहे. ते म्हणतात की, व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे, हे सगळ्या जगाने मान्य केलेले आहे. व्यायामामुळेच आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण होते.
व्यायामाविण सात्त्विक ……. अन्नपचन सहजचि।। आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण सात्त्विक आहार घेत असतो. या सात्त्विक भोजनाने आपले शरीर व मन छान स्वस्थ राहते. पण तुकडोजी महाराज म्हणतात की, अशा भोजनासोबतच व्यायामही केला पाहिजे, नाहीतर अशा भोजनामुळेही आपणास विविध विकार, विविध आजार होऊ शकतात. सात्त्विक भोजनासोबतच चांगला, योग्य व्यायाम केला तर पोटातील जठाराग्नी चांगला प्रदिप्त होतो. म्हणजे पोटातील अग्नी चांगला पेटून आपल्या अन्नाचे सहज पचनही होते. अन्नाचे अपचन होऊन होणारे विकार व्यायामामुळे टाळता येतात.
व्यायामे जडत्व ……… विचारी सजीवपण।। आपण व्यायाम नियमितपणे करायला हवा. योग्य व पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजेच स्थूलपणा वाढत जातो. नियमित व्यायामामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडौल होते. तसेच आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह भरतो. तुकडोजी महाराज पुढे म्हणतात की, व्यायामामुळे शरीरातील रक्तव्यवस्था व्यवस्थित होते. रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्ताशी संबंधित विकार दूर होतात आणि आपले आयुष्य वाढते.
व्यायामाने सशक्त स्नायु ……. करिती अत्यंत।। नियमित व योग्य व्यायामामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना बळकटी प्राप्त होते. सगळे स्नायू सशक्त होत जातात. माणसाला आजारपण येत नाही. याच व्यायामामुळे मानवाला दीर्घायुष्य प्राप्त होते, असे तुकडोजी महाराज म्हणतात. आपण जर व्यायाम करीत नसू तर आपल्या शरीरात पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण कमी-जास्त होऊ लागते. पित्त, कफ, वायू यांच्या असंतुलित प्रमाणामुळे रोग होतात आणि आपण आजारी पडतो. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. व्यायामामुळे पित्त, कफ, वायू यांचे शरीरातील प्रमाण योग्य व संतुलित राहण्यास मदत होते..
व्यायामे वाढे ……. कार्य करण्याची।। तुकडोजी महाराज म्हणतात की, व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढते. येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहज सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबीसुद्धा बनतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. या नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते. शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो. म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश, स्फूर्ती वाढते.