Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Textbook Questions and Answers
1. आकृतिबंध पूर्ण करा.


(आ)

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा. 1. पहिले ऑलिंपिक व्हिलेज ………….. येथे वसले. (ग्रीस, मेलबोर्न, फ्रान्स, अमेरिका) 2. पहिले ऑलिंपिक सामने ………….. साली झाले. (1894, 1956, इ.स.पूर्व७७६, इ.स. पूर्व 394)
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. मेलबोर्न 2. इ.स.पूर्व 776
3.खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखादया शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे – हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. उत्तरः |


4. स्वमत
प्रश्न (अ)
‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तरः
मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडासामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यांत, ऑलिंपिक क्रीडासामन्यांना एक मानाचे स्थान आहे. या ऑलिंपिक सामन्यांचे स्वतंत्र निशाण म्हणजे, एक भलामोठा ध्वज असतो. ध्वजाच्या पांढऱ्याशुभ्र रंगावर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली असतात. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ होय. जगभरातील सर्व राष्ट्रांतील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात.
या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नेमलेली असते. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या सामन्यांसाठी लागणारा सारा पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. ऑलिंपिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.
उपक्रम:
सन 2016 साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून खालील तक्त्यात लिहा.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Additional Important Questions and Answers
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. वेगवेगळे रस्ते | (अ) पाच वर्तुळे |
2. एकमेकांत गुंफलेली | (ब) ऑलिंपिक सामन्यांचे |
3. स्वतंत्र निशाण | (क) विशाल अंतराळ |
4. शुभ्रधवल पार्श्वभूमी | (ड) येण्याजाण्यासाठी |
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यात कशाला मानाचे स्थान आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यात ऑलिंपिक क्रीडासामन्यांना मानाचे स्थान आहे.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
ऑलिंपिकच्या ध्वजावर किती रंगांची वर्तुळे काढण्यात आली आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
ऑलिंपिकच्या ध्वजावर पाच रंगांची वर्तुळे काढण्यात आली आहेत.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
लेखकांची मोटार भरधाव वेगाने कुठे जात होती?
Solution & Step-by-Step Answer:
लेखकांची मोटार ऑलिंपिक गावाकडे भरधाव वेगाने जात होती.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. 1. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्व अनन्यसाधारण आहे. (क्रीडेचे, मेहनतीचे, कामाचे, शाळेचे) 2. …………. गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. (वडिलांच्या, आवडत्या, ऑलिंपिक, दूरच्या)
Solution & Step-by-Step Answer:
1. क्रीडेचे 2. ऑलिंपिक
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. 1. शुभ्रधवल : पार्श्वभूमी :: विशाल : ……………. 2. प्रचंड : गर्दी :: भलामोठा : ………………
Solution & Step-by-Step Answer:
1. अंतराळ 2. ध्वज
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती; कारण ………………………. (अ) येण्याजाण्यासाठी एकच रस्ता होता. (ब) रस्त्यावर सिग्नल होते. (क) लोकांमध्ये शिस्त होती. (ड) येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. उत्तरः गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती, कारण येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
काय ते लिहा. |
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
चूक की बरोबर ते लिहा. 1. संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यांत आशियाई क्रीडासामन्यांना एक मानाचे स्थान आहे. 2. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड.
Solution & Step-by-Step Answer:
1. चूक 2. बरोबर
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. ऑलिपिंक सामन्यांचे ते स्वतंत्र निशान होते.
Solution & Step-by-Step Answer:
ऑलिंपिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. 1. क्रिडासामने, क्रीडासामने, क्रीडासामणे, कीडासामने – [ ] 2. क्षितिज, क्षीतिज, क्षितीज, शितिज – [ ]
Solution & Step-by-Step Answer:
1. क्रीडासामने 2. क्षितिज
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
लिंग बदला मैत्रीण – [ ]
Solution & Step-by-Step Answer:
मित्र
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
समानर्थी शब्द लिहा. |















