Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 9 (SSC)Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 9 उजाड उघडे माळरानही Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 9 उजाड उघडे माळरानही. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

61 Solved Questions9 Diagrams3472 words

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 9 उजाड उघडे माळरानही Textbook Questions and Answers

1. कारणे लिहा.

प्रश्न (अ)
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण …………………..
उत्तरः
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी.

प्रश्न (आ)
जगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण ………………………..
उत्तरः
जगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण पळसफुले मातीच्या अंकावरती फुलून आली.

(आ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील आकृतिबंध पूर्ण करा. उत्तरः

(इ) पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:

2. सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:

घटक

त्यांचे सजणे

1. लिंबोणी

गर्द पोपटी रंगाची वस्त्रे घालून सजली आहे.

2. नागफणी

जर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजली आहे.

3. घाणेरी

दुरंगी चुनरीत सजली आहे.

4. पळसफुले

मातीच्या अंकावरती बहरून आली आहेत.

3. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
Solution & Step-by-Step Answer:

4. भावार्थाधारित.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’ या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः वरील काव्यपंक्ती ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री ‘ललिता गादगे’ आहेत. यांनी या ठिकाणी वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला अतिशय आनंद झाला आहे. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही रंगबिरंगी फुलांनी, पानांनी बहरून आलेले आहेत. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत आनंदाने गात आहे.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न (अ)
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
उत्तरः
‘कृती: 3 काव्यसौंदर्य’ मधील प्र. (3) चे उत्तर पहा.

प्रश्न (आ)
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
उत्तरः
‘कृती : 3 काव्यसौंदर्य’ मधील प्र. (4) चे उत्तर पहा.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही Additional Important Questions and Answers

पुढील पदयाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

2. जोड्या जुळवा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

‘अ’ गट

‘ब’ गट

1. रंग उधळले

(अ) सृष्टी

2. बेरड कोरड

(ब) लिंबोणी

3. गर्द पोपटी

(क) कर्णफुले

4. जर्द तांबडी

(ड) दिशा-दिशांन

Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. रंग उधळले

(ड) दिशा-दिशांन

2. बेरड कोरड

(अ) सृष्टी

3. गर्द पोपटी

(ब) लिंबोणी

4. जर्द तांबडी

(क) कर्णफुले

प्रश्न 2 Maharashtra Board Solution

‘अ’ गट

‘ब’ गट

1. लुसलुस पाने अंगोपांगी

(अ) पिंपळ पाने

2. दुरंगी चुनरीत उभी

(ब) सांबर वृक्ष

3. मऊ मुलायम मोरपिसारी

(क) घाणेरी

4. लाल कळ्यांनी लखडून उभे

(ड) वड वृक्ष

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. रंग उधळले

(ड) दिशा-दिशांन

2. बेरड कोरड

(क) कर्णफुले

3. गर्द पोपटी

(अ) सृष्टी

4. जर्द तांबडी

(ब) लिंबोणी

3. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
दिशा-दिशांना रंग का उधळले आहेत? उत्तरः वसंतऋतूच्या स्वागतासाठी दिशा दिशांना रंग उधळले आहेत.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
वसंतऋतूच्या स्वागतासाठी कोण नजराणा घेऊन आली आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः वसंतऋतूच्या स्वागतासाठी बेरड, कोरड सृष्टी नजराणा घेऊन आली आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
वसंतऋतूच्या स्वागतासाठी लिंबोणी कशी आली आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
गर्द पोपटी रंगाची वस्त्रे परिधान करून, मुरडत लिंबोणी आली आहे.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
वसंतऋतूच्या स्वागतासाठी नागफणी कशी सजली आहे? उत्तरः वसंतऋतूच्या स्वागतासाठी जर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजली आहे.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
लुसलुस पाने अंगावरती घेऊन कोण झुलत आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
लुसलुस पाने अंगावरती घेऊन वड झुलत आहे.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
दुरंगी चुनरीत कोण नटुन थटुन आली आहे? उत्तरः दुरंगी चुनरीत घाणेरी नटुन थटुन आली आहे.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
पिंपळाची पाने कशी आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
ः पिंपळाची पाने मऊ मुलायम मोरपिसासारखी आहेत.
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
पाणंदीवर कोण उभा आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
सांबर वृक्ष पाणंदीवर उभा आहे.
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
लाल कळ्यांनी लखडून कोण आहे?
Solution & Step-by-Step Answer:
लाल कळ्यांनी लखडून सांबर वृक्ष आहे.
प्रश्न 10 Maharashtra Board Solution
मातीच्या अंकावरती कोण बहरून आले आहेत? उत्तरः मातीच्या अंकावरती पळसफुले बहरून आली आहेत.
प्रश्न 11 Maharashtra Board Solution
पळसफुलांना पाहून कोण झुरत आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
ः पळसफुलांना पाहून जगातील सारी कुसुमे झुरत आहेत.
प्रश्न 12 Maharashtra Board Solution
आंब्याच्या मोहरातून काय आली आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः आंब्याच्या मोहरातून कोकिळेची सुरेल तान आली आहे.
प्रश्न 13 Maharashtra Board Solution
उजाड उघडे माळरान काय करत आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः उजाड उघडे माळरान वसंतगान गाऊ लागले आहे.
प्रश्न 14 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
सहसंबंध शोधा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

3. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
सळसळ झळझळ पिंपळ पाने …………………… (अ) दुरंगी चुनरीत उभी ही (ब) उभे स्वागता पाणंदीवरीत (क) मऊ मुलायम मोरपिसापरी (ड) लुसलुस पाने अंगोपांगी
Solution & Step-by-Step Answer:
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसापरी.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
सांबर लाल कळयांनी लखडून (अ) लुसलुस पाने अंगोपांगी (ब) सळसळ झळझळ पिंपळ पाने (क) झुले वड हा दंग होऊनी (ड) उभे स्वागता पाणंदीवरी
Solution & Step-by-Step Answer:
सांबर लाल कळयांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी.

4. काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
(अ) बेरड कोरड इथली सृष्टी (ब) रंग उधळले दिशा-दिशांना (क) स्वागत करण्या वसंत ऋतूचे (ड) घेऊन आली ती नजराणा उत्तरः (अ) स्वागत करण्या वसंत ऋतूचे. (ब) रंग उधळले दिशा-दिशांना (क) बेरड कोरड इथली सृष्टी (ड) घेऊन आली ती नजराणा

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
(अ) घालून सजली नागफणी (ब) मुरडत आली लिंबोणी (क) जर्द तांबडी कर्णफुलेही (ड) गर्द पोपटी लेऊन वसने
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) गर्द पोपटी लेऊन वसने (ब) मुरडत आली लिंबोणी (क) जर्द तांबडी कर्णफुलेही (ड) घालून सजली नागफणी
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
(अ) झुले वड हा दंग होऊनी, (ब) घाणेरी ही नटुनी थटुनी (क) लुसलुस पाने अंगोपांगी (ड) दुरंगी चुनरीत उभी ही
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) लुसलुस पाने अंगोपांगी, (ब) झुले वड हा दंग होऊनी, (क) दुरंगी चुनरीत उभी ही (ड) घाणेरी ही नटुनी थटुनी
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
(अ) मऊ मुलायम मोरपिसापरी, (ब) सळसळ झळझळ पिंपळ पाने (क) उभे स्वागता पाणंदीवरी (ड) सांबर लाल कळयांनी लखडून
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) सळसळ झळझळ पिंपळ पाने, (ब) मऊ मुलायम मोरपिसापरी, (क) सांबर लाल कळयांनी लखडून (ड) उभे स्वागता पाणंदीवरी
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
(अ) कुसुमे सारी या जगातली (ब) पळसफुले ही बहरून आली (क) पाहून त्यांना मनात झुरती (ड) या मातीच्या अंकावरती
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
(अ) पळसफुले ही बहरून आली, (ब) या मातीच्या अंकावरती, (क) कुसुमे सारी या जगातली (ड) पाहून त्यांना मनात झुरती
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 7 Maharashtra Board Solution
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 8 Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

कृती 3: काव्यसौंदर्य

1. खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा-दिशांना उत्तरः वसंतऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगानी पाने, फुले, निसर्ग सारी सृष्टी सजलेली आहे. विविध रंगाच्या फुलांनी निसर्ग बहरलेला आहे. यामुळे आजूबाजूचे पशु-पक्षी सुद्धा आनंदित झाले आहेत. जणू काही वसंतऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघाल्या आहेत.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी
Solution & Step-by-Step Answer:
ः वसंतऋतूत सर्व परिसर नटलेला सजलेला आहे. नानाविध रंगांनी निसर्गाचे रूप मनमोहक झालेले आहे. या वसंतऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे.

2. पुढील ओळींचा अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा-दिशांना.
Solution & Step-by-Step Answer:
ः वसंतऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. रंग उधळल्यामुळे दिशा उजळून निघाल्या आहेत.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी.
Solution & Step-by-Step Answer:
ः गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे वसंतऋतूच्या स्वागतासाठी सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी
Solution & Step-by-Step Answer:
ः घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसारी,
Solution & Step-by-Step Answer:
ः वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ मोरपिसाप्रमाणे मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती
Solution & Step-by-Step Answer:
ः पळसाच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला पाहायला मिळतात.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान.
Solution & Step-by-Step Answer:
ः वसंतऋतूत सृष्टीत अनेक बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो.अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः वसंतऋतू हा भारतातील सर्व ऋतूचा राजा मानला जातो. म्हणूनच त्याला ‘ऋतुराज’ देखील म्हणतात. वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत बदल होतात. ती निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघते. जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी ती बहरते. झाडांना नवी पालवी येते. पाने फुले बहरतात. लिंबोणी, अबोली, जाई, जुई, केवडा, रातराणी, चंपा, चमेली अशी विविध फुले फुलतात. त्यांचा सुगंध जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. वसंतऋतूचे आगमन होणार म्हणून पक्षीही खुश होतात.

वसंतऋतूचे स्वागत पक्षीही करतात. त्यांचे कलरव कानी पडतात. कोकिळा कुहू कुहू करून आपले गाणे सुरू करते. जणू ती वसंतऋतू आल्याची ग्वाही देते. वसंतऋतूत संपूर्ण सजीव सृष्टीत एक नवीन उत्साह व आनंद आपल्याला पहायला मिळतो.

प्रश्न 8 Maharashtra Board Solution
मानवी जीवनात वसंतऋतूला एक आगळेवेगळे स्थान दिले गेलेले आहे. या विधानावर चर्चा करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः वसंतऋतू सृष्टीच्या बहराचा ऋतू आहे. या ऋतूत सृष्टी नटते म्हणून मानवप्राणी वसंतपंचमी साजरी करतो. या ऋतूच्या निमित्ताने नृत्य व संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताच्या विविध राज्यात हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. राजस्थानी लोक या उत्सवाच्या निमित्ताने सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढतात. भारताच्या काही राज्यात लोक रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून विविध रंग व गुलाल उडवून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन. झाडे लावून त्यांचे संवर्धन करेन. इतरांना देखील झाडे लावण्यास प्रेरित करेन. पशु-पाखरे, नदी, तलाव हे देखील सृष्टीचेच अंश आहेत. या सर्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन, वनसंवर्धनसाठी समाजात जागरूकता निर्माण करेन. सृष्टी ईश्वराचे दुसरे रूप आहे ही भावना मनी बाळगून तिचे पूजन करेन, प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन. ‘झाडे। लावा व झाडे जगवा’ या मंत्राचे सर्वांना पालन करण्यास सांगेन. जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि ऊर्जा यांचा अवास्तव वापर टाळण्याचा प्रयत्न करीन. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करेन.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

प्रश्न 1. कवी / कवयित्रीचे नाव –

Solution & Step-by-Step Answer:
ः ललिता गादगे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
संदर्भ –
Solution & Step-by-Step Answer:
ः ‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ‘ललिता गादगे’ यांनी लिहिली आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
प्रस्तावना –
Solution & Step-by-Step Answer:
ः ‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ‘ललिता गादगे’ यांनी लिहिली आहे. या कवितेमध्ये वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
वाङमयप्रकार –
Solution & Step-by-Step Answer:
ः निसर्ग कविता
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कवितेचा विषय
Solution & Step-by-Step Answer:
ः निसर्गातील बदलांचे मनमोहक वर्णन करणारी ‘उजाड उघडे माळरानही’ ही एक निसर्ग कविता आहे.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
कवितेतील आवडलेली ओळ –
Solution & Step-by-Step Answer:
ः पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
मध्यवर्ती कल्पना –
Solution & Step-by-Step Answer:
ः वसंतऋतू हिवाळ्यानंतर सुरू होतो. या ऋतूत निसर्ग हिरवागार दिसतो. कारण वसंतऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. सारा आसमंत विविध रंगात आणि विविध गंधातही न्हाऊन जातो. सर्व झाडेवेली हिरवीगार व टवटवीत दिसू लागतात. नवचैतन्याने सळसळू लागतात. सारी सृष्टी आनंदित होते. कवयित्रीने अशा सुंदर बदलांचे वर्णन ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेत केलेले दिसून येते.
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
कवितेतून मिळणारा संदेश-
Solution & Step-by-Step Answer:
ः हिरवीगार झाडे, झुळझुळ वाहणारे झरे, खळाळणाऱ्या सरिता, उंचच उंच पर्वत या साऱ्यांनी तयार झालेली सृष्टी खूपच सुंदर आहे. ही सृष्टी माणसाला भरभरून देत असते. माणूस मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी या सुंदर सृष्टीचा नाश करतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या सुंदर व मनमोहक निसर्गाचे संगोपन करून निर्सगाचा समतोल साधला पाहिजे. निसर्गसौंदर्यातील बदलांचे जाणीवपूर्वक स्वागत करा. असा संदेश उजाड उघडे माळरानही या कवितेतून मिळतो.
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
Solution & Step-by-Step Answer:
ः ‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता मला खूप आवडली आहे. उजाड झालेले, मोकळे असलेले माळरान वसंतऋतूच्या आगमनाबरोबर चैतन्याने भरून येते. झाडांना नवीन पालवी फुटते. सारा निसर्ग हिरव्या रंगात न्हाऊन जातो. रानफुले लेऊन, हिरव्या वाटा सजून जातात. कोकीळेचा सुमधूर आवाज सारे वातावरण बेधुंद करणारे असते. या साऱ्या सौंदर्यांचे सुरेख वर्णन आपल्याला या कवितेत वाचायला मिळते, म्हणून ही कविता मनापासून आवडली.
प्रश्न 10 Maharashtra Board Solution
भाषिक वैशिष्ट्ये ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे.

प्रश्न 3. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा-दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा।।

Solution & Step-by-Step Answer:
ेः ‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूच्या आगमानाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली असते. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत असते. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघालेल्या असतात. शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी, रुक्ष झालेली असते. अशी ही कोरडी, रुक्ष झालेली सृष्टी असा वेगवेगळ्या रंगाचा नजराणा वसंत ऋतूसाठी घेऊन आली आहे असे वाटते.

या काव्यपंक्तींमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी, जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी।।
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटते, त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे. गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे देखील सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

या काव्यपंक्तींमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी।।
Solution & Step-by-Step Answer:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. अशीच मऊ, कोवळी पालवी वडाच्या झाडाखाली फुटते. अशी ही लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचे झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे. एवढेच नव्हे तर घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे असे वाटते.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसापरी, सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी।। उत्तरः ‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. अशीच मऊ, कोवळी पालवी पिंपळाच्या झाडालाही फुटते. असे वाटते जणू वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळाचे झाड मोरपिसाप्रमाणे असणारी मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभे आहे. तसेच सांबर नावाचा वृक्षदेखील रानातल्या चिंचोळ्या वाटेवर (पाणंद) दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभा आहे.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती।।
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

पळसांच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला पाहायला मिळतात. पळसाला आलेली व मातीवर पसरलेली ती फुले व त्यांची सुंदरता पाहून जगातील सर्व फुले मनातल्या मनात झुरतात.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 6 Maharashtra Board Solution
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान।।
Solution & Step-by-Step Answer:
ः ‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूत सृष्टीत अनेक आनंददायी बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो. अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही फुलांनी पानांनी बहरून आलेले असते. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत गात आहे असेच वाटते.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

उजाड उघडे माळरानही Summary in Marathi

कवयित्रीचा परिचय:

नाव: ललिता गादगे जन्म
जन्म: 1954
प्रसिद्ध कवयित्री, ‘फसवी क्षितिजे’, ‘अग्निजळ’, ‘संवेदन’ इत्यादी कवितासंग्रह; ‘आयुष्याच्या काठाकाठाने’, ‘दुःख आणि अश्रू’, ‘प्राजक्ताची फुले आणि दाह’ हे कथासंग्रह; ‘नाळबंधाची कहाणी’, ‘खिडकीतलं आभाळ’ हे ललित गदय प्रसिद्ध.

प्रस्तावना:

‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे होणाऱ्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

Poetess Lalita Gadge has written a poem named ‘Ujad Ughade Malranhi’. An appealing colourful description of change in nature due to the beginning of spring season has been depicted by the poetess in this poem in a vibrant picturesque manner.

भावार्थ:

स्वागत करण्या ……….. ती नजराणा।।1।।
वसंत ऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघाल्या आहेत. शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी, रुक्ष झालेली असते. अशी ही कोरडी, रुक्ष झालेली सृष्टी असा वेगवेगळ्या रंगाचा नजराणा वसंत ऋतूसाठी घेऊन आली आहे.

गर्द पोपटी ……… सजली नागफणी।।2।।
वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटते, त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे. गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे देखील सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

लुसलुस पाने ……… नटुनी थटुनी।।3।।
वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते अशीच ही मऊ, कोवळी, लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचे झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे. एवढेच नव्हे तर घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे.

सळसळ झळझळ ……. स्वागता पाणंदीवरी।।4।।
वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ आपल्या मोरपिसाप्रमाणे मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे. तसेच सांबर वृक्ष देखील रानाच्या त्या चिंचोळ्या वाटेवर (पाणंद) दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभे आहेत.

पळसफुले ही ……….. त्यांना मनात झुरती।।5।।
पळसांच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला

आंब्याच्या मोहरातून ……… लागले वसंतगान।।6।।
वसंत ऋतूत सृष्टीत अनेक बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो. अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही फुलांनी पानांनी बहरून आलेले आहे. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत गात आहे.

शब्दार्थ:

टिपा:

वाक्प्रचार:

1. दंग होणे – गुंग /मग्न होणे