SSC Marathi Second Language MARCH 2022 solved paper

MARCH 2022

मराठी (द्वितीय भाषा)

विभाग 1 : गद्य

प्रश्न 1.

(अ) उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

(1) चौकटी पूर्ण करा :

(i) उतान्यात आलेले नदीचे नाव –

(ii) बाळाची आई करत असलेला उद्योग –

पूढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज् पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माइया खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते. पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्रा राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, “त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.” या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.

कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिमाणतः त्यांच्या कार्यक्रमानां अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, “या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.”

(2) आकृतिबंध पूर्ण करा :

(3) स्वमत:

‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

(आ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

(1) कोण, ते लिहा :

(i) निरंजनचा सर्व खर्च क्रणारे –

(ii) निरंजनला मावश से सोट्न पुन्हा न परतलेला –

मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुर्जीनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकावायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीव करायचे. गुरुर्जींनी त्याला सांगितलं, की ‘जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.’ गुरुर्जोंचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता.

(2) का ते लिहा :

(i) निरंजन वार लावून जेवायचा, कारण …………………………………..

(ii) निरंजन झटून अभ्यास करायचा, कारण …………………………………..

(3) तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.

अपठित गद्य

(इ) उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

(1) आकृतिबंध पूर्ण करा :

संकटांकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी

अडचर्णींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना ? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये ? संकटांचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परन्तु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाहीं. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचर्णींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळ्लेले नसते. जीवन म्हणजे संकटे नक्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेक्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.

(2) कधी ते लिहा :

(i) आपण संकटांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही.

(ii) आजारी, संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.

उत्तर 1.

(अ)

(1) (i) उतान्यात आलेले नदीचे नाव – कृष्णा

(ii) बाळाची आई करत असलेला उदयोग – मासेमारी

(2)

(3) शालीनता म्हणजे नम्रता. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुण असणे महत्त्वाचे आहे. कारण शालीन व्यक्ती कितीही यशस्वी झाली तरी, अहंकाराने, उद्धटपणाने वागत नाही. या शालीनतेमुळे लोकांनाही त्यांच्या बद्दल प्रेम वाटू लागतेः त्यामुळे सर्वांच्या मनात स्वतः चे एक अढळ स्थान निर्माण करू शकतात.

‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ ही म्हण यांच्यासाठी अगदी सार्थ ठरते. त्यों लता मंगशकर, प्रकाश आमटे किंवा सचिन तेंडुलकर सारख्या व्यक्ती नेहमीच आपल्याला हव्याहव्याश्या वाद्र्र्रात.

(आ) (1) (i) निरंजनचा सर्व खर्च करणारे – भडसावळे गुरुजी

(ii) निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला – मामा

(2) (i) निरंजन वार लावून जेवायचा कारण, मावशीची परिस्थिती यथातथा होती.

(ii) निरंजन झटून अभ्यास करायचा, कारण जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंत मी सारा खर्च करीन.

(3) माझया मते शिक्षणाची, ज्ञानाची आवड असणे हे खन्या विद्याथ्र्यांचे प्रथम लक्षण आहे. त्यासाठी नम्रता हा गुण अत्यावश्यक आहे.कारण नम्रतेशिवाय कुठलाही गुण अपूर्ण आहे. इतरांचा आदर, शिक्षकांचा सन्मान राखणे, हे विद्यार्थ्यांचे प्रमुख कर्तव्य आहेत. कष्टाठू व मेहनती वृत्ती, नवीन काही शिकण्याची आवड, सत्य-असत्य ओळखण्याची कला, आपल्या बरोबरीच्या, लहानांच्या मतांना महत्त्व देण्याची वृत्ती इ. गुण आदर्श विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे.

(इ) (1)

संकटांकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी

(2) (i) संकटंचे जेक्हा आपल्यावर आक्रमण होते.

(ii) जेक्हा थट्टा-विनोद करतात.

विभाग 2 : पद्य

प्रश्न 2.

(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

(1) योग्य पर्याय निवडा.

(1) सैनिकाचे औक्षण केले जाते………………………..

(i) भरलेल्या अंतःकरणाने

(ii) डोक्यांतील आसवांच्या ज्योतींनी

(iii) तबकातील निरांजनाने

(iv) भाकरीच्या तुकड्याने

(2) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे …………………………………..

(i) कष्टाचे, पैशाचे सामर्थ्य नसलेले

(ii) सैनिकाबरोबर लढणारे

(iii) शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले

(iv) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय

नाही मुठीमध्ये द्रव्य

नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना

नाही कष्टाचे सामर्थ्य;

जीव ओवाळावा तरी

जीव किती हा लहान;

तुइया शौर्यगाथेपुढे

त्याची केवढीशी शान;

वर घोंघावे बंबारा,

पुढे कल्लोळ धुराचे

धडाडत्या तोफांतून

तुझें पाऊल जिद्दीचें;

तुझी विजयाची दौड

डोळे भरून पहावी;

डोळ्यांतील आसवांची

ज्योत ज्योत पाजळावी

अशा असंख्य ज्योतींची

तुइ्यामागून राखण;

दीनदुबक्यांचे असें

तुला एकच औक्षण

(2) कृती करा :

(i) डोळे भरून पाहावे असे दृश्य –

(ii) अपुरे वाटणारे सामर्थ्य –

(3) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा :

(i) औक्षण –

(ii) द्रव्य –

(iii) शौर्य –

(iv) आसवे –

(4) काव्यसौंदर्य :

‘अशा असंख्य ज्योतींची

तुइ्यामागून राखण’

ना ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा :

उत्तर 2.

(अ) (1)

(1) (ii) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी

(2) (iv) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय

(2) (i) सैनिकाच्या विजयाची दौड

(ii) कष्टाचे सामर्थ्य

(3) (i) औक्षण – ओवाळणे

(ii) द्रव्य – धन, पैसा

(iii) शौर्य – साहस

(iv) आसवे – अश्रू

(4) ‘औक्षण’ म्हणजे ओवाळणे. सीमेवर लढायला दपेशवासियांतर्फे केले जाणारे हे एक औक्षण. प्रस्तुत ओर्ठीमध्ये डोळ्यांना निरंजनाची, तर अश्रुना निरंजनातील ज्योतीची अमा देऊन सैनिकाच्या रक्षणासाठी देशवासियांच्या असंख्य ज्योती त्याचे जणू औक्षण करत आहेतः

यांमध्ये पराक्रमी सैनिकाला सर्वार्थाने अक्षम, असमर्थ अशी भावना व्यक्त किली आहे. गरीब, दीन दुबळे असुनही सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणाज्या लोकांचे वर्णन यामध्ये केले आहे.

(आ)

विभाग 3 : स्थूलवाचन

प्रश्न 3.

खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :

(1) ‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते’, हे विधान ‘मोठे होते असलेल्या मुलांनो’ या पाठाधारे स्पष्ट करा.

(2) तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.

(3) टीप लिहा-व्युत्त्पत्ती कोशाचे कार्य.

उत्तर 3.

(1) दिवाळ्ठीत रंगीत कागदी कंदीलाची शोभा मला खूप आवडते. आई नेहमी बाजारातून छोटे कंदील विकत आणायची. यावर्षी मी ठरवले की आपण स्वतः कागदी कंदील तयार करायचा. बधू या जमते की नाही ते ? मी स्वतः स्टेशनरीच्या दुकानातून रंगीत झिलेटीन, कागद व काड्या आणल्या. सुताचे बंडल आणले. नि दिवाळीच्या आदल्या सकाळीच कंदील करायला घेतले. चौकोनात काड्या जोडायला घेतल्या. पण काही मनासारखे जमेना. दुपार झाली मी पुन्हा विस्कटायचो पुन्हा जोडायचो. नीट जमत नव्हते. पण निर्धार केला की कंदील पूर्ण झाल्याशिवाय जेवायचे नाही. हळ्ठहळू मला ते जमायला लागले. पूर्ण कंदीलाचा काड्यांचा सांगाडा तयार झाला, मग त्यावर ताणून वेगवेगळे रंगीत कागद चिटकवणे सोपे गेले. अखेर खूप मेहनतीनंतर सुंदर कंदील तयार झाला. तेक्हा मला कळले की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते.

(2) ‘जाता अस्ताला’ या कवितेत सूर्याची भूमिका ही कुटुंबप्रमुखासारखी आहे, तो जसा त्याच्या नंतर कुटुंबाची गैरमोय होऊ नये म्हणून योग्य जी सोय करून ठेवतो, तसेच सूर्य देखील पृथ्वीवर सूर्यास्तानंतर कुणाची गैरसोय होक नये म्हणून त्याची आधिच तरतूद करून ठेवतो. पण त्याची चिंता त्याला सतावते. व अशाच विचारात तो आकंठ बुडालेला असतो. त्याचवेळी छोटीशी पणती पुढे येऊन त्याला आत्मविश्वासक पूर्ण वचन देने की पृथ्वी अस्तानंतर अंधारात बुडणार नाही.

पणतीचे हे बोलणे ऐकूण सूर्याला खूप आनंद वाटतो. व बिनधास्तपणे अस्ताकडे वठ्ठ लागतो कारण पणतीचा आत्मविश्वास पाहून तो सुखावतो.

(3) व्युत्पत्ती कोशाचे कार्य : व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाची मुळापासून माहिती देणे. हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे. याचे प्रामुख्याने चार प्रकार पडतातः।

  1. शब्दाचे मूळ रूप दाखवणे : बदलत जात असलेल्या भाषेचे व शब्दांचे मूळरूप आपण व्युत्पत्ती कोशात पाहू शकतो.
  2. अर्थातील बदल स्पष्ट करणे : बदलत्या काळनुसार शब्दाचा मूळ अर्थासोबत आणखी एक अर्थ सापडतो.
  3. उच्चारातील बदल व फरक दाखवणे : एखाद्या शब्दाचा इतिहास, अर्थ व भाषेत तो कसा प्रचलित झाला. याची माहिती मिळते.
  4. बदलांचे कारण स्पष्ट करणे : सोपेशब्द वापरण्यासाठी बहुधा आपण शब्दांत बदल करतो. आणि ते प्रचलित सुद्धा होतात.

विभाग 4 : भाषाभ्यास

प्रश्न 4.

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

(1) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा :

(i) अक्षय दररोज अभ्यास करतो.

(ii) अहाहा ! किती सुंदर देखावा हा !

(2) कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा :

(i) ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा.)

(ii) आज पहाटे रानात उजेड नक्हता. (होकारार्थी करा.)

(3) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन) :

(i) मूठभर मांस वाढणे.

(ii) उत्साहाला उधाण येणे.

(iii) मळमळ व्यक्त करणे.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

(1) शब्दसंपत्ती :

(1) खालील शब्दांचे समानार्थी एक शब्द लिहा :

(i) मित्र

(ii) कनवाळू

(2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :

(i) लहान

(ii) ज्ञान

(3) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :

लिहिता वाचता येणारा –

(4) वचन बदला :

(i) ठसा

(ii) शेंग

(2) लेखननियमांनुसार लेखन :

खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :

(i) पहिला दीवस सूरळीत गेला.

(ii) रात्रभरच्या वाटचालीने थकुन ती वीश्रांती घेत होती.

(3) विरामचिन्हे :

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :

(i) “मावशी तुम्ही रहता कुठे”

(ii) “शावास द्वन खेळ्लास”

उत्तर 4.

(अ) (1) (i) किधानार्थी वाक्य

(ii) उद्गारवाचक वाक्य (उद्गारार्थी)

(2) (i) किती उंच इमारत आहे ही !

(ii) आज पहाटे रानात अंधार होता.

(3) (i) मूठभर मांस वाढणे-स्तुतीने होरपळ्न जाणे.

बाइने केलेल्या कौतुकामुळे राजुला मूठभर मांस चढले.

(ii) उत्साहाला उधाण येणे-खूप उत्साही वाटणे.

आईला दारात पाहून, ताईच्या उत्साहाला उधाण आले.

(iii) मळमळ व्यक्त करणे-नाराजी व्यक्त करणे.

बोनस कमी मिळाल्याने बाबांनी मळमळ व्यक्त केली.

(आ) (1) (1) (i) मित्र-सखा, सोबती.

(ii) कनवाळू-मायाळू.

(2) (i) लहान-मोठे

(ii) ज्ञान-अज्ञान

(3) (i) सुशिक्षित

(4) (i) ठसा-ठसे

(ii) शेंग-शेंगा

(2) (i) पहिला दिवस सुरळीत गेला.

(ii) रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती.

(3) (i) “मावशी तुम्ही राहता कुठे?”

(ii) “शाबास! छान खेळलास”

विभाग 5 : उपयोजित लेखन

प्रश्न 5.

(अ) खालील कृती सोडवा :

(1) पत्रलेखन :

खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :

किंवा

(2) सारांशलेखन :

विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उतान्याचा एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिह्न.

(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :

(1) जाहिरात लेखन :

पुढील विषयावर जाहिरात तयार करा :

आयुर्वेदिकं केशतेलाची आकर्षक जाहिरात तयार करा.

(2) बातमीलेखन :

खालील निवेदन वाचून बातमी तयार करा :

(3) कथालेखन :

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.

(इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा.

(1) प्रसंगलेखन :

(2) आत्मकथन :

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

(3) वैचारिक :

‘निसर्ग आपला गुरू’ या विषयावर तुमचे विचार मांडा.

उत्तर 5.

(अ) 1.

पत्रलेखन

दिनांक : 26 डिसेंबर,

प्रति,

माननीय,

मुख्याध्यापक,

संतगाडगे बाबा विद्यालय,

संतभूमी चौक, अमरावती

E-mail : sgbv.50@gmail.com

विषय : स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी.

माननीय सर,

मी आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, आपणांस विनंती करू इच्छिते की, येत्या 3 जानेवारी, 2013 रोजी शाळेच्या ‘विदयार्थी मंडळतफे’ एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित कख्यात आली आहे. ही स्पर्धा सकाकी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

तरी, आपण यासाठी शाळेचे सभागृह अम्हाला उपलब्ध करून द्यावे ही विनंती.

आपली विश्वासू

आशा पवार

विद्यार्थी प्रतिनिधी, अमरावती.

किंवा
अनौपचारिक पत्र

दिनांक : 10 जानेवारी,

प्रिय स्वाती,

सर्वप्रथम तुझे मनःपूर्वक अभिनंदन. विद्यालयात आयोजित झालेल्या ‘एकपात्री अभिनय स्पर्धा’ यामध्ये तुला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेले पाहून आनंद वाटला.

या एकपात्री एकांकिकेत तू उत्तमरित्या अभिनय केलास. नशी तू अभिनयात लह्मनपणीच किती नियुज दाखवून दिलेस. तुझे यश पाहून नक्कीच काका-काकू खुशच झाले असतील ना ! साहजिक आहे. कसे आरेत ने के?

तुझा यशाचा आलेख असाच वाढ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थोबते.

तुझीच मैत्रीण

आशा पवार

संतभूमी चौक,

अमरावती.

sgbv.50@gmail.com

किंवा

अडचणी व रोगांनी माडून जायची गरज नसते. संकटे काही कालावधीसाठी असतात. सोशिकपणा, खिलाडूवृत्ती असू नये ? मोठी व असह्य वाटणारी संकट ओसरल्यावर आपणच विचारात पडतो, की नेमके का घाबरलो.

मनाची शांतीव स्थिरता नसल्याने आपण अडचर्णीचे मूळ रूप जाणून घेत नाही.

मळभ आलेला सूर्य जसा नाहीसा होत नाही तसेज संकटामुळे जीवनाचा मूळ आनंद नाहीसा होत नाही. थट्टा विनोदाद्वारे आजारी लोक आनंददायी जीवनचा अनुभव घेतात.

(आ) (1) जाहिरात लेखन

आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात

(2) बातमीलेखन

(3) कथालेखन

‘प्रामाणिकता’

रामपुरी गावात एक राजू नावाचा अतिशय हुंशार, चाणाक्ष पणखूप गरीब मुलगा राहात होता. तो रोज दैनंदिन पेपर वाटत असे. त्यातून मिळणान्या तुटपूंज्या मिळकतीतून स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे.

राजू वाटत असे. न्यातून मिळणान्या तुटपूंज्या मिळकतीतून स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे.

राजू नेहमी हसतमुख, इतरांना मदत करणारा म्हणून ओळखला जायचा. राजूच्या घरात आई, दोन बहिणी आणि राजू राहात असे. आई धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करे. असेच दैनंदिन कामे करत असताना, अचानक एक दिवस राजूला एक बैग सापडली.

बाह्यरूपी तीं बैग अगदी चकचकीत रंगाची, नवीन आणि स्वच्छ सुंदर दिसत होति. राजुची नजर घेच्यावर पडली. बराच वेळ विचार करून राजूनी ती बैग उचलण्याचे ठरवले व ती बैग घेऊन तो थेट पोलिस स्टेशनला पोहचला.

तिथे सर्व हकिगत सांगितल्यावर, पोलिसांनी ती बैग तपासली, त्याअंती समजले की त्यात खुप दागिने आणि पैसे होते. पण त्यापेक्षा पोलिसाना राजूचा प्रामाणिकपणा जास्त आवडला. त्यामुळेच त्यांनी राजूला बक्षिस दिले व त्याचा शाळेचा खर्च साहेबच करतील असा शब्द दिला. हे ऐकूण राजुचा आनंद गगनात मावेना.

(इ) (1) प्रसंगलेखन :

आज दि. 27 फेब्रुवारी, म्हणजेच ‘मराठी दिन’ वि.वा. शिखाडकर, म्हणजे तुमचे आमचे कुसुमाग्रज, यांच्या जन्मदिनानिमित्त आपण हो ‘मराठी भाषा दिन’ साजरा करतो,

याचसाठी आम्ही सगळ ‘आदर्शविद्यालय’ कोल्हापुर येथील विद्यालयान ऑयोजित ‘मराठी भाषा दिन सोहळयान सहभागी झालो. कार्यक्रम साधारणपणे सं. 10 वाजला सुरू झाला. कार्यक्रमात काव्यवाचन. कथाकथन, नाट्यप्रयोग तसेच गीतगायन या विविध रंगी कार्यक्रमांनी तिथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांना कर्णमधूर व बोधात्मक मेजवानी दिली.

मराठी भाषा दिनाचे महत्त्व आपल्यासोबान समाजांनाही बाळगावे असे आवाहन माननीय मुख्यालय संरानी केले. विद्यार्यांचे सुज गुण ओळखून त्यांच्याळलगुणांना वाव देव्याचे काम शिक्षकांनीउत्कृष्टरिन्या पार पाडावे.

आभार प्रदर्शनाचा सोहतपारपडला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

तात्पर्य-प्रामाणिकपणाचे फळ नेहमी चांगलेच असते.

(2) आत्मकथन :

मी द्याड बोलत आहे

‘नमस्कार’ मी झाड बोलतोय. आज सर्व झाडांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय. आम्ही झाड नेहमी तुम्हाला काहीन न काही सतत देत असतो. जसे फळ, भाज्या, फुले, ऑक्सिजन इ. तसेच जमिनीची धूप होऊ देत नाही. पाण्याची पातळी खोलवरपर्यंत पोहचवण्यास मदत करतो. झाडांवर खूप काही अवलंबून आहे. जसे पाऊस, वातावरणाचा समतोल राखणे. आम्हीच आहोत जे वरूण राजाला आमंत्रण देतो. त्यामुळे जलचक्र सुरळीत चालते. चांगला पाऊस म्हणजे उत्तम शेती. म्हणजेच उत्तम उत्पादन, म्हणजेच महागाईत कमी. याचा अर्थ सर्व काही तुमच्यासाठी.

गवत, झांड झुडप यामुळे निसर्गाची विविधना जपली जाते. सर्व झाडे ही जणू कल्पतरूच आहेत. कारण त्या सर्वांचा सर्वोतोपरी वापर हा फक्त मानवासाठीच आहे. तरी देखील तुम्ही आम्हाला दगड मारता, कुज्हाडी चालवता: काय मिळते हे करून ?

शहरीकरणाच्या नादात तुम्ही आम्हाला पृथ्वीवरून नाहिसे तर नाही करणार ना? निसर्गसंपत्ती म्हणजे आम्हीच आहोत. दुसरे तिसरे काही नाही, असे झाले तर काय हाहाकार माजेल या पृथ्वीतलावर याचा कधी विचार केला का तुम्ही ? मान्य आहे राहण्यासाठी चांगले घर आवश्यक आहे. त्याचबरोबर आमची राखणपण खूप आवश्यक आहे.

(3) वैचारिक :

निसर्ग आपला गुरू :

अगदी बरोबर आहे. निसर्ग हा आपला अनेक गुरुैैकी एक आहे. गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाशा घेऊन जातात. जो आपल्याला घउवतो. ज्ञान देतो न्याला आपण आपला गुरू मानतो.

निसर्ग सुद्धा त्यांच्यापैकी एक आहे. कारण निसर्ग सुद्ध्या आपल्याला शिकवलो, घडवतो आणि विविध प्रकारचे ज्ञान देतो. निसर्ग आपल्याला स्वतःच्या कृतीतून बरेच काही शिकवतो. न्यासाठी आपण त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे.

जेव्हा मी असे ठखले तेव्हापासून मला निसर्गाने विविध रुपे, घटक, आकार अनुभवायला मिळाली. आपण निसर्गाला का गुरू मानावे उत्तुंग आकाश जीवनाकडे सततप्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देतो. सतत वाहमारी नदी आपल्याला जीवनात सतत चलात रहावे शिकवलो.

अशा अनेक गोष्टी निसर्ग आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतो. निसर्गाचे आणखी एक महत्तवाचा गुणधर्म म्हणजे इतरांना सतत मदत करावी. याचे मूर्तिमंत उदाहरण म्नणजे ‘वृक्ष’ सतत निस्वार्थ भावनेने इतरांना मदनकरा. हे करत असताना कोणताही भेदभाव करू नये. असे से आपलयाला सांगत आहेत.

शरीराने व मनाने सतत तरूण रहा. आपल्या कृतीने इतरांनासुखी, समाधानी आनंदी करा.