SSC GEOGRAPHY Marathi Medium March 2023 solved paper

MARCH 2023

GEOGRAPHY

1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा :

(1) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ………………….. आहेत.
(i) मुख्य भूभागापासून तुटलेला भूभाग
(ii) प्रवाळ बेटे
(iii) जवालामुखीय बेटे
(iv) खंडीय बेटे

(2) ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील …………………. लोकसंख्या असलेल्या देश आहे.
(i) कमी
(ii) मध्यम
(iii) अत्यल्प
(iv) सर्वांत जास्त

(3) वस्त्यांचे केंद्रीकरण ………………………. या प्रमुख बार्बीशी निगडित असते.
(i) समुद्रसान्निध्य
(ii) मैदानी प्रदेश
(iii) पाण्याची उपलब्धता
(iv) हवामान

(4) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ………………….. प्रकारची आहे.
(i) अविकसित
(ii) विकसित
(iii) विकसनशील
(iv) अतिविकसित

उत्तर 1.

(1) (ii) प्रवाळ बेटे

(2) (iv) सर्वांत जास्त

(3) (iii) पाण्याची उपलब्धता

(4) (iii) विकसनशील

2. योग्य जोड्या जुळ्वा :

‘अ’ गट ‘ब’ गट

(1) ट्रान्स अमेझोनियन मार्ग (अ) साग
(2) काटेरी व झुडपी वने (ब) फुटबॉल

(3) मैदानी प्रदेश (क) प्रमुख रस्ते मार्ग

(4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ (ड) खेजडी

(इ) पंजाब

(ई) क्रिकेट

उत्तर 2.

‘अ’ गट ‘ब’ गट

(1) ट्रान्स अंमेझोनियन मार्ग (क) प्रमुख रस्ते मार्ग

(2) काटेरी व झुडपी वने (ड) खेजडी

(3) मैदानी प्रदेश (इ) पंजाब

(4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ (ब) फुटबॉल

3. थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन) :

(1) क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य

(2) ब्राझीलची किनारपट्टी

(3) भारतातील खाणकाम

उत्तर 3.

(1) क्षेत्रभेटीसाठी पुढील साहित्य आवश्यक आहे.

(i) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कैमेरा, दुर्बीण इत्यादी

(ii) स्थाननिश्चितीसाठी होकायंत्र आणि सखोल अभ्यासासाठी नकाशे

(iii) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली

(iv) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचन्याचे, वनस्पतीचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे.

(v) पाण्याची बाटली, टोपी, प्रथमोपचार पेटी इत्यादी.

(2) (i) ब्राझीलला सुमारे 7400 किमी लाबीची किनारपट्टी लाभली असून तिचे उत्तर किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात.

(ii) उत्तरकेडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडोवो नॉर्ते पर्यंतच्या किनाय्याला ब्राझीलचा उत्तर अटलांटिक किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिणेकडे पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो.

(iii) ब्राझीलच्या पूर्वीकडील किनाय्यावर मुख्यतः अनेक लहान व मोठ्या नदया येऊन मिळतात. साओ फ्रान्सिस्को ही मोठी नदी अटलांटिक महासागरास येऊन मिळते. या किनान्याचे काही ठिकाणी प्रवाळकट्टे व प्रवाळबेटे यामुळे रक्षण होते.

(iv) ब्राझीलच्या उत्तर किनान्यावर अमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात.

(3) (i) छोटा नागपूर पठाराची खनिजांचे भांडार म्हणून ओळख आहे येथे खाणकाम व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे.

(ii) पूर्व महाराष्ट्रात आणि छत्तीसगढमधील कोर्बा भागात कोळशाच्या खाणी आहेत.

(iii) राजस्थानमध्ये संगमरमरवर दगडाच्या खाणी आहेत. तर आंध्रप्रदेशात कडाप्पा दगडाच्या खाणी आहेत.

(iv) आसाममधील दिग्बोई, अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल आणि कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत.

(v) बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखाशी खनिज तेलाचे साठे आढळतात.

4. (अ) भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार) :

(1) केंद्रशासित प्रदेश-दमण

(2) पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश

(3) शीत वाळवंट

(4) उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश

(5) कन्याकुमारी

(6) चिल्का सरोवर

(आ) खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

प्रश्न :

(1) ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती ?

(2) ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते ?

(3) उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते ?

(4) साओ फ्रान्सिस्को नंदी कोणत्या महासागरास येऊन मिळते ?

(5) उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाय्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा.

उत्तर 4.

(अ)

(आ) (1) अमेझॉन ही ब्राझीलमधील प्रमुख नदी आहे.

(2) माराजॉ हे ब्राझीलमधील मुख्य बेट आहे.

(3) उरुग्वे नदी दक्षिणेकडे वाहते.

(4) साओ फ्रांन्सिस्को नदी दक्षिण अटलांटिक महासागरास येऊन मिळते.

(5) परानिबा ही नदी उत्तर अटलांटिक महासागराला येऊन मिळते

5. भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन) :

(1) ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनान्यालगत आढळ्ठते?

(2) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.

(3) हिमालयाच्या उंच भागात वनस्परींची संख्या विरळ आढळते.

(4) ईशान्य मान्सून वान्यांमुठेही भारतात पाऊस पडतो.

उत्तर 5.

(1) सुरुवातीच्या काळ्ठत युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात लोकवस्त्या निर्माण केल्या. ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात सम आणि दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा आणि साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळतो. म्हणूनच ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती आणि इतर उद्योगांचा विकास झालेला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्यासुद्धा विकसित झाल्या. त्यामुळेच ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाज्यालगत आढळते.

(2) पांढच्या शुभ्र वाळूच्या पुळणी, आकर्षक आणि स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गरम्य बेटे, अमेजॉन खोन्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी तसेच विविध उद्याने यांमुळे ब्राझीलमंधील पर्यटन व्यवसायाचा विकास झपाट्याने होत आहे. पर्यटन व्यवसायच्या वाढत्या विकासामुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणाची होणारी हानी यांसारखे दुष्परिणाम रोखणे आवश्यक आहे. पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासामुळे पर्यटन व्यावसायात अधिक चालना देते तसेच पर्यावरणाचे संतुलन राखणे शक्य होणार आहे. म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.

(3) एलयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान सेंपेक्षाही खूपच कमी आढळते. हिमालयाच्या उंन भगत सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. बर्फाचे थर आणि अतिथंड तापमानामुळे वनस्परींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही. वपमान वाढून या प्रदेशातील बर्फ वितळू लागते. त्यामुळे उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात. पुन्हा हिवाळ्यात या जिता होतो. अशा अतिथंड वातावरणामुळे हिमालयाच्या उंच भागात वनस्पर्तींची संख्या विरळ आढळ्रे.

(4) भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वान्यांमुळे पाऊस पडतो. हे वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात आणि टप्या-टष्याने उत्तरेकडे वाहतात. भारताच्या मुख्य भूमीवरून काहणारे हे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक आणि हिमाचल रांगांना अडून परत फिरतात. ईशान्येकडून हे वारे हिंद महासागराकडे परताना या वान्यांमुळे भारताच्या द्विपकल्पीय भागात पुन्हा मानसून परतीचा पाऊस पडतो, अशाप्रकारे, ईशान्य मानसून वान्यांमुळ्टुदुद्धा भारतात पाऊस पडतो.

6. (अ) खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

सरासरी आयुर्मान-भारत

वर्षनागरी लोकसंख्येची टक्केवारी
198054
199058
200063
201067
201668

प्रश्न :

(1) 1990 मध्ये संरासरी आयुर्मान किती आहे?

(2) कोणत्या दोन दशकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झाली आहे?

(3) 1990 ते 2016 या काळात सरासरी आयुर्मानात कितीने वाढ झाली?

किंवा

(आ) खालील आलेखाचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा :

प्रश्न :

(1) वरील आलेखाचा प्रकार कोणता ?

(2) या आलेखात कोणत्या बाबी दर्शविल्या आहेत ?

(3) कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे?

(4) 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे?

(5) 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे?

(6) 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे?

उत्तर 6.

(अ) (1) 1990 मध्ये सरासरी आयुर्मान 58 वर्षे इतके आहे.

(2) 2010 आणि 2016 या दोन दशंकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झाली आहे.

(3) 1990 ते 2016 या काळात सरासरी आयुर्मानात 10 ने वाढ झाली आहे

किंवा

(आ)

(1) वरील आलेख रेषाआलेख आहे.

(2) ब्राझील आणि भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील व्यापाराची टक्केवारी दर्शविली आहे.

(3) 1990 साली दोन्ही देशांची एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे.

(4) 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न 50 टक्के आहे.

(5) 2000 मध्ये भारताची एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्क्वारी जास्त आहे.

(6) 2016 मध्ये भारत आणि ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 15 टक्क्यांचा फरक आहे.

7. खलील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

(1) भारत आणि ब्राझील या देशांत नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.

(2) भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.

(3) क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होवू नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?

उतर 7.

(1) भारत व ब्राझील या दोन देशांच्या नागरीकरणाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास भारताचे नागरीकरण कमी व ब्राझीलचे नागरीकरण अधिक असल्याचे आढळते. 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण 31.02 टक्के होते तर 2010 च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण 84.6 टक्के होते. भारतातील नागरी लोकसंख्या 1961 ते 2011 या काळात 18 टक्क्यांहून 31.2 टक्क्यांपर्यत सातयाने वाढली आहे. तसेच याच काळात म्हणजेच 1961 ते 2011 मध्ये तिसमील नागरीकरण टक्केवारीत 31.2 पासून 47.1 पर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.

(2) भारतात सुमारे दीडशतक ब्रिटिशांची राजवट होती. 15 औगस्ट 1947 रोजी भारताल स्वतंत्र्य मिळाले. स्वातंत्रोत्तर काळात पहिल्या वीस वर्षात तीन युद्धांना तसेच अनेक प्रांतांतील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. असे असूनसुद्धा भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजेच 1947 पासून संसदीय प्रजासत्ताक शासनपद्धतीचा अवलंब केला आहे. आज रोजी भारत देश एक प्रमुख व जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखना जातो. विविध टप्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासास वेग प्राप्त झाला आहे. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजेच तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताकडे एक ‘तरुण देश’ म्हणून पाहिले जाते.

(3) नदीक्षेत्रात कचरा होणार नाही याची प्रथम दक्षता घेऊ. तसेच नदीक्षेत्रात पडलेली कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या पिशव्या किंवा गोण्या सोबत घेऊन जाऊ आणि त्या पिशव्यांमध्ये आपला कचरा जमा करू. (आम्ही वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या) क्षेत्रभेटीत सामील असलेल्यांकडून कचरा घेऊन नदी प्रदूषित होणार नाही याची खबरदारी घेऊ. क्षेत्रभेटीदरम्यान पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टणे, उरलेले खाद्यपदार्थ इतरत्र न टाकता एकत्र जमा करू नदीपात्रातील घाण आणि कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करू. तसेच नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नदीप्रदूषण होऊ नये म्हणून मार्गदर्शक सूचना देणारे फलक ठिकठिकाणी उभारू.