MARCH 2023
मराठी (प्रथम भाषा)
विभाग 1 : गद्य
प्रश्न 1.
(अ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) आकृती पूर्ण करा :
न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी
तयार केलेले यंत्रमानव
न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हांला लॉपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटिल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांनी सर्क्हिसिंगचे अडीच हजार रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, “”राजाभाऊ, उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे?” सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नक्हता. फक्त पाच मिनिटं… माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माइया सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही; पण आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांतील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबोबाबत वेटरच्या खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हांला दुप्पट कमाई करून देर्हल याची मी खात्री देतो.” एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो.
(2) उत्तरे लिहा :
(i) रोबो वेटरचा सर्क्सिसिंगचा कालावधी लिहा.
(ii) रोबो वेटरबाबत न्यू एज रोबो कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा.
(3) स्वमत:
रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) कृती करा :
पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’ मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस् दिवसेंदिवस अगदी महिनोन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी क्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एक्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माइया ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, “अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास. तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एक्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला.
‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बन्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते.
(2) एका शब्दात उत्तर लिहा :
(i) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.
(ii) अरुणिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती.
(3) स्वमतः
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
अपठित गद्य
(इ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) आकृतिबंध पूर्ण करा :
माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तीचे पौरूष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून.
कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला. संस्थानिकांचे वाडे, वारकच्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले.
अंगमेहनतच गरिबांची दौलत. ‘कमवा आणि शिका’ या शिक्षण-क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते.
(2) चौकटी पूर्ण करा :
(i) कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत
(ii) कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र
उतर 1. (अ) कृती करा :
(1)
न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी
तयार केलेले यंत्रमानव
(2) उतरे लिह्म :
(i) दोन महिने
(ii) मानवी वेटरपेक्षा दुष्पट काम व दुप्पट कमाई
(3) स्वमत: हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते. अचानक एक दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती पाहून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले. रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसच्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातील फरकच रोबोंना कळेना. मनोजने प्रसंगावधान वापरून त्याने, त्या बाईचे प्राण वाचवले जिथे यंत्रमानव आहेत तिथे अशी परिस्थीती निर्माण होणे सहाजीकच आहे. रोबोंना स्वतः ची बुद्धी नसल्याने तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही.
(आ) (1) कृती कंरा :
(2) एका शब्दात उत्तर लिहा :
(i) बचेंद्री पाल (ii) भाईसाब
(3) स्वमत : कोणतीही व्यक्ती दुसन्याव्यक्ती सारखी नसते. एखाद्याला नृत्य आवडते तर कुणाला गायला गायन आवडते. तर कुणाला इतरांची मदत करायला आवडते. कुणाला समाजातील घडामोर्डीशी दोस्ती करायला आवडते. आपल्यातला असा वैशिष्टयपूर्ण गुण कोणता ? ते आपण शोधून काढले पाहिजे मग आपल्या हातून आपोआप लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. अपंग असलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वतः मधला वेगळा गुण ओळखला, स्वतः चे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अरुणिमा असते.फक्त त्या आरुणिमाचा शोध आपण घेतला पाहिजे. हाच जीवनाचा महामंत्र आहे.
अशीच अरुणिमा प्रत्येकामधे असते, गरज आहे फक्त तिला शोधण्याची.
(इ) (1)
(2) चौकटी पूर्ण करा :
(i) अंगमेहनत (ii) कमवा आणि शिका
विभाग 2 : पद्य
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा :
(i) सकारात्मक राहा.
(ii) उतावळे व्हा.
(iii) खूप हूरळून जा.
(iv) संवेदनशीलता जपा.
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पांणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी,
घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणान्या पानी.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.
झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडसे !
(2) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. :
कवितेतील संकल्पना | संकल्पनेचा अर्थ | ||
| (i) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. | ||
(ii) उघडून ओंजळीत | (ii) सागळे लोक फसवे नसतात. | ||
घ्यावी मनातली तळी | (iii) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. |
(3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा :
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी
(4) काव्यसौन्दर्य :
‘ झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
(आ) खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा :
(इ) खालील पंक्तीचे रसग्रहण करा :
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’
उत्तर 2.
(अ) (1)
(i) सकारात्मक राहा. योग्य
(ii) उतावळे क्हा. अयोग्य
(iii) खूप हुरळून जा. अयोग्य
(iv) संवेदनशीलता जपा. योग्य
(2)
कवितेतील संकल्पना | संकल्पनेचा अर्थ |
(i) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली | (i) सगळे लोक फसवे नसतात. |
(ii) उघडून ओंजळ्ठीत घ्यावी मनातली तळी | (ii) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे |
(3) सकारात्मक जीवन कसे जगावे आणि प्रयत्नवादी कसे असावेहा मोलाचा संदेश देताना कवयित्री म्हणतात, की निराश होक नकोस, जमीन खणत रहा. आणखी थोडेसे खादे, जमीनी खाली नक्कीच तुला पाणी मिळ्ठल. जिद्दीने प्रयत्न कर जीवन जगताना हिंमन सोडू नकोस. सर्व माणसे स्वार्थी नसतात. काही प्रामाणिक माणसेही जगात आहे. हा विश्वास मनात असू दे.
(4) कवयित्रीच्या मते, मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रयत्नाचे मन निर्मितीक्षम असते. त्या अंतरमनातील गाभ्याशी ज्याचे गाणे दडलेले असते. मनाशी असलेले गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते.
(आ)
मुद्दे | ‘भरतवाक्य’— किंवा—’वस्तू’ | |||||||||||||||||||||||||||||
| मोरोपंत | द. भा. धामणस्कर | ||||||||||||||||||||||||||||
(ii) | प्रस्तुत कवितेचा विषय |
| निर्जीव वस्तुंचा सजीवपणा | |||||||||||||||||||||||||||
(iii) |
|
|
|
(इ) रसग्रहण करा :
आशयसौंदर्य : सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची ‘आकाशी झेप घे रे’ ही मराठी चित्रपटातील एक गीत रचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृवाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी क्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च घ्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्राचे मोल जाणावे. हा अमूल्य संदेश ही कविता देते.
काव्यसौंदर्य : वरील ओळीमध्ये कर्वीनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाडकपट करून जेव्हा शेतकरी शेतात कष्ट करतो तेव्हा त्याला मोत्यासारखे पीक मिळते. घामातून मोती फुलतात. तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. म्हणून श्रमदेव त्यांच्या घरी अवतरतात.
भाषिक वैशिष्टै : ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकला व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे. व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे. साध्या शब्दांत महत्त्वपूर्ण विषय मांडला आहे.
विभाग 3 : स्थूलवाचन
प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
(1) व्युत्पत्तीकोशाचे कार्य लिहा.
(2) ‘बालसाहित्यिका-गिरिजा कीर’ या पाठाच्या आधारे ‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे’ या विधानानान्त तुमचे मत स्पष्ट करा.
(3) ‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, है ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर 3.
(1) व्यूत्पत्तीकोशाचे कार्य लिहा :
व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मूळविषयी माहिती देणे
(i) शब्दाचे मूळ रूप दाखवणे : भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्तीकोशाच्या माध्यमातून शोधता येते. उदाः मराठी भाषेतील ‘आग’ हा शब्द संस्कृतमधील ‘अग्नि’ या शब्दापासून आला आहे.
(ii) अर्थातील बदल स्पष्ट करणे : काळानुसार, शब्दाच्या स्वरूपात, अर्थात त्यांच्या परस्परबंधात बदल होतात. काहीवेळौ मूळ अर्थासोबत अधिक एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. उदा. व्युत्पत्तीकोशानुसार शहाणा म्हणजे अतिशहाणा. हा अतिशहाणा हा अर्थ देखील रूढ होत आहे. समान दिसणान्या शब्दांचे अर्थदेखील कोशात उलगडतात
(iii) उच्चारातील बदल व फरक दाखवणे : एखाद्या शब्दाचे मूळ रूप त्याचा इतिहास, अन्य भाषेत तो शब्द कसा आला आहे हे ही व्युत्पत्तीकोशात दाखवलेली असते.
(iv) बदलांचे कारण स्पष्ट करणे : भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच, सोपे करव्णयाची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलमागच्या कारणांची नोद व्युत्पत्तीकोशाचे कार्य आहे.
(2) आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकीट मारतो. पुढे पाकीटातील चिठ्ठीवरून मधूला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशामुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो या विचाराने तो व्याकूळ होतो आणि पाकीटात असलेल्या, पत्रावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडवते.
आपल्या कृतीमुळे कोणाचातरी मृत्यू ओढावणे हा क्रूरपणाच होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे, तशीच दुसन्या व्यक्तीला सुद्धा आई असते. त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो, दुसन्याच्या मनात विचारच करीत नाही, हे मधूच्या लक्षात आले.
(3) चूका करणान्या माणसांकडे व मुल्गांकडे समाज, पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतात. पोलीससुद्धा अशी मुले समोर आली की, त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्याशी मारपीट करतात. ही मुले लबाडच असतात, गुन्हेगारी रूपातच असतात असे त्यांचा पूर्वग्रह असतो. साहजिक एक तर मुले पोलीसांना घाबरतात किंवा कोडगी बनतात. त्यामुळे त्या मुलांचा सुधारण्याचा मार्गच बंद होतो. श्रीमती रेखा यांनी मात्र या मुलांकडे मायेने पाहिले त्यांना जवळ घेतले. आपलेसे केले. तयामुळे त्या मुलांनी घरी येष्यास होकार दिला.
14 वर्षीय मुलाचे त्यांनी ममतेने त्याचे मन परिवर्तन केले. यामुळे ही मुले त्यांच्या जवळ आली.
विभाग 4 : भाषाभ्यास
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
(1) समास :
योग्य जोड्या लावा :
सामासिक शब्द | समासाचे नाव |
(i) भाजीपाला | द्विगू समास |
(ii) कमलनयन | समाहार द्वंद्व समास |
कर्मधारय समास |
(2) शब्दसिद्धी :
खालील तक्ता पूर्ण करा :
(भरदिवसा; लाललाल, दुकानदार, खटपट)
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
(3) वाक्प्रचार :
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(i) कान देऊन ऐकणे
(iii) आनंद गगनात न मावणे
(ii) कसब दाखवणे
(iv) तगादा लावणे.
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. :
(i) डोळा – (ii) वृक्ष –
(2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(i) वास्तव ………………………….
(ii). सोय x ………………………….
(3) खालील शब्दांचे वचन ओळ्खा :
(i) वह्या – ………………………….
(ii) मुलगा – ………………………….
(4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा :
विचारसरणी
(2) लेखननियमांनुसार लेखन :
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
(कोणतीही दोन वाक्ये सोडवा) :
(i) गीर्यारोहणाने मला खुप महत्त्वाचे धडे दिले.
(ii) आलिकडे एक सुरेख परदेशी सीनेमा पाहिला.
(iii) तीचं अवसान पाहून त्यानं दिपालीला तेथेच टाकलं.
(iv) सरपण नीट नसलं कि गड्यांची फजीती होते.
(3) खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा :
मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळ्ठन पाहिलयं :
(4) पारिभाषिक शब्द :
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा :
(i) Workshop
(ii) Exchange
उत्तर 4.
(अ) (1) योग्य जोड्या लावा :
सामासिक शब्द | समासाचे नाव |
(i) भाजीपाला | समाहार द्वंद्व समास |
(ii) कमलनयन | कर्मधारय समास |
(2) शब्दसिद्धी :
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द | ||
दुकानदार | भरदिवसा |
|
(3) (i) कान देऊन ऐकणे
अर्थ : लक्षपूर्वक ऐकणे
वाक्य : बाईंच्या सर्व सूचना आम्ही कान देऊन ऐकत होतो.
(ii) कसब दाखवणे
अर्थ : कौशल्य दाखवणे
वाक्य : प्रतिकुल परिस्थीतीत आहे त्या सर्व गोष्टींशी जुळवून यश मिळवले ही कसब दाखवून राजूने सर्वांचे मन जिंकले
(iii) आनंद गगनात न मावणे
अर्थ : खूप आंनद होणे.
वाक्य : मुलाचे यश पाहून आशाताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला.
(iv) तगादा लावणे.
अर्थ : पुन्हा पुन्हा विचारणे.
वाक्य : सहलीला जाण्यासाठी जुईने आईकडे तगादा लावला.
(आ)
(1) शब्दसंपत्ती :
(i) डोळा – नयन
(ii) वृक्ष – झाड.
(2) (i) वास्तव काल्पनिक
(ii) सोय गैरसोय
(3) (i) वह्या – अनेकवचन
(ii) मुलगा – एकवचन
(4) विचारसरणी – विचारणे, विसर
(2) (i) गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले.
(ii) अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला.
(iii) तिचं अवसान पाहून त्यानी दिपालीला तेथेच टाकले.
(iv) सरपण नीट नसले, की गड्यांची फजिती होते.
(3) मी एवढं सगळं सांगितलं, कारण मी तुम्हांला खूप जवठून पाहिलंय.
(4) (i) Workshop कार्यशाळा
(ii) Exchange देवाणघिवाण
विभाग 5 : उपयोजित लेखन
प्रश्न 5.
(अ) खालील कृती सोडवा :
(1) पत्रलेखन :
(2) विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उतान्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा (शब्दमर्यादा 60 ते 90 शब्द):
(1) जाहिरातलेखन :
खालील मुद्द्यांचा आधारे ‘कला-छंद वर्ग’ याची आकर्षक जाहिरात तयार करा.
आयोजक
(2) बातमीलेखन :
खालील विषयावर बातमी तयार करा.
8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळ्ठत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धाचे आयोजन. पालकांचा उदंड प्रतिसाद.
(3) कथालेखन :
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा :
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)
पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळ्ठोख दाटून आला. एक हुरहुर तिचया मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काठोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि…………………
(इ) लेखनकौशल्य :
खालील लेखनप्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा.
(1) प्रसंगलेखन :
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
प्रत्यक्ष पावसाचा, निसर्गाचा तुम्ही घेतलेला अनुभव
(2) आत्मकथन :
दिलेल्या मुद्द्यांचा आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
(3) वैचारिक :
‘प्रदूषण – एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
उतर 5.
- 1.
पत्रलेखन
(औपचारिक पत्र)
श्रेयस ईनामदार, विद्यार्थी प्रतिनिधी,
गणेश विद्यालय, कल्याण
ठणे-439002
24 सप्टें 2023
प्रति,
मा. व्यवस्थापक,
मनोज पुस्तकालय
63/314, आनंद नगर,
अकोला- 431139
E-mail : manojakola@gmail.com
विषय : शालेय ग्रंथालयासाठी सवलती अंतर्गत पुस्तकांची मागणीबाबत.
महोदय,
आपण आमच्या शाळेच्या ग्रंथालया साठी नेहमीच पुस्तके पुरवत असतात. या वर्षी सुद्धा आम्हाला आमच्या ग्रंथालयासाठी पुस्तके अपेक्षित आहेत. जसे येणान्या डिसेंबर मध्ये दि. 8 रोजी आपल्या दुकानाचा वर्धापन दिनानिमित्त आपण काही सवलती पुरवत आहात, त्यामधून आपण काही पुस्तकें पुरवावीत ही विनंती.
त्यामुळे खालील यादी दिलेली पुस्तके व कादंबरी आपल्या प्रतिनिधीबरोबर शाळेच्या कार्यालयात वेळेवर पाठवण्याची कृपा करावी.
आपला कृपाभिलाषी,
श्रेयस ईनामदार
( विद्यार्थी प्रतिनिधी)
किंवा
(अनऔपचारिक पत्र)
332, गांधीनगर, दि. 28 नोव्हे 2023
मुंबई-413136
प्रिय मित्र रमेश,
सप्रेम नमस्कार,
बरेच दिवस झाले, तुइ्या पत्राची वाट पाहत होतो. तुला वाचनाची खूप आवड आहे, हे आम्ही सर्वजण जाणतोच, त्यामुळे तुला परवडेल आणि तुई्या आवडीचे सर्व पुस्तकांची तू मागणी करू शकशील म्हणून.
अकोला येथे मनोज पुस्तकालय, 69/314, आनंदनगर, अकोला, येथे तू मागणी कर, कोणत्या ही पुस्तकांवर सवलत असून, 2000 रु. च्या खरेदीवर एक पुस्तक मोफत मिळेल. या सर्व खास सवलती दि. 8 डिसेंबर रोजी दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त आहेत.
तरी तू या सर्व सवलर्तींचा भरपूर फायदा घे. दुकानाची वेळ स. 9.00 ते रात्री 8.00 पर्यंत आहे. सोमवार बंद असते. पुस्तकाची यादी पाठविण्यासाठी इ-मेल संपर्क manojakola@gmail.com या वर साधू शकतो. इथे सर्व छान आहे. तिथे पण सर्व छानच असेल अशी आशा करतो.
तुझाच मित्र
(श्रेयस ईनामदार)
किंवा
2. सारांशलेखन
शिक्षणामुळे माणसाला त्यांचा सामाजिक परिसर व निसर्ग यांच्यात संवाद साधता आला पाहिजे. भारत हा खेड्यांचा देश असून निसर्गाच्या खूप जवळ आहे, त्यामुळे माणसांच्या पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो. शिक्षण हेच जीवनाचे रहस्य आहे हे कर्मवीरांनी जाणले. वाडे, धर्मशाळा यांचा आश्रय घेऊन त्यांनी पुढे शाळ् उभारल्या. त्यातून शेतीचा विकास घडवून विदयाथ्यांमध्ये श्रमदान घडवून विहिरी खोदण्यात आल्या.
अंगमेहनत गरीबांची हीच दौलत असून, ‘कमवा आणि शिका’ हा मंत्र सर्वांना दिल्र.
(आ)
- जाहिरातलेखन :
2. बातमीलेखन : वार्ताहर; शेंदूरजना घाट : दि. 8 मार्च रोजी तालुक्यातील जनता कन्या हायस्कुल येथे जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत ‘माता-पालक मेळावा’ उत्साहात साजरा करण्यात आला. स्वदेशी फाऊंडेशनच्या फिडल ऑफिसर नम्रता शिर्के यांनी महिला पालकांसाठी काही शासकीय योजनांची ओळख करून दिली त्याचबरोबर येणान्या काळजी गरज ओळखून त्यांनी महिला सशक्तीकरणाबाबत सुद्धा धडे दिले. महिलांनी सुद्धा उंच आकाशात भरारी घेऊन येणान्या पिर्ठींसाठी काही आदर्श ठेववीत याचे आवाहन केले. मनोरंजनात्मक काही आकर्षक कार्यक्रम व विविध स्पर्धांचेही आयोजन केले. पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
अत्यंत मोलाचा म्हणजेच ‘नारी तू महान’, विश्वाची तू शान हा नारा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
3. कथालेखन- राजूचे प्रसंगावधान
आणि पाहतेतर काय राजू लगबगीने कुठेतरी जाताना तिने पाहिले. तिने त्याला भांबवून विचारले. राजूने सांगितले की आईची अचानक तब्येत खराब झाली आहे, दवाखान्यातून औषधे आणायला चाललोय. हे ऐकूण सखूच्यां पोटात गोळा आला. आईला काय झाले असेल या विचाराने तिने आपली पावले झरझर चालण्यास सुरुवात केली. सखू घरी आली, पाहते तर काय आई त्रासाने त्रस्त झाली होती, सखूला पाहून तिला बरे वाटले!
ती म्हणाली, ‘बाळा, खूप त्रास होतोय ग!’ सखू म्हणाली, ‘आई काळजी करू नकोस’, राजू आणतोय औषध. तोपर्यंत तिने आईला घरगुती औषध दिले ज्यामुळे तिला थोडे बरे वाटले. तोपर्यंत सखूने घरातील कामे आटोपली. त्याचबरोबर बाजारातून आणलेल्या भाज्यांना व्यवस्थित ठेवली. राजू आंला आणि त्याने आईला औषध दिले ज्यामुळे आईला बरे वाटले.
आपल्या मुलांचे हे समजूतदारपणाचे वागणे पाहून आईचा आनंद गागनात मावेनासा झाला. आईने राजूला आणि सखूला जवळ घेतले व म्हणाली ‘असेच आयुष्यभर एकत्र रहा आणि एकमेकांची घ्या काळजी, एकमेकांना जपा.’ त्यानंतर सर्वांनी एकत्रित जेवण केले व झोपले.
तात्पर्य : नेहमी एकमेकांची काळजी घ्यावी.
(इ) 1. प्रसंगलेखन : ‘अकस्मात पडलेला पाऊस’
त्यादिवशी भयंकर उकडत होते सकाळी सुद्धा घामान्या धारा वाहत होत्या. जसजसा दिवस वर येऊ लागला, त्यामुळे जीव हैराण होऊ लागला. शरीरात सर्व घामाच्या धारा झाल्या होत्या. जीवाची नुसती काहिली होत होती मन नगमगत राहिले. टीक्ही पाहायचा प्रयत्न केला. काही केल्या चैन पडेनासे झाले.
तेवढ्यात दुपारी अंधारून आले. आभाकात काळेकुट्ट ढग जमा झाले. गार गार वारा सुटला. जमिनीवर कागदकपटे, पालापाचोळा हवेत घसंरू लागले आणि काही क्षणातच धो-धो पाऊस कोसळू लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावू लागले. पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो, हा अनुभवच वेगळाच होता.
आज सगळे वेगळेच घडत होते. आम्ही पावसात शिरलो की पाऊस आमच्यात शिरला हेच समजेनासे झाले होते. सर्व परिसर पाऊसमय झाला होता. पावसाच्या त्या शीतलस्पर्शाने जीव सुखावला होता. पावसाने केवढा कायापालट केला होता! ही किमया फक्त अनुभवच करू शकतो.
2. आत्मकथन : प्रत्येकाला जीवनात वेळेळेळी थोडा आनंद हवा असतो. आपण विविध गोष्टीमधून आनंद मिळवू शकतो. खेळ, खेळ आणि चित्रपट हे आपल्या जीवनात मनोरंजन जोडणारे काही आहेत..पण माइया मते पुस्तक वाचणे हे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन आहे.
मी पुस्तक बोलतोय, लहान मोठे स्त्री आणि पुरूष सर्वांचा खरा साथीदार आणि खरा मार्गदर्शक आहे. मी प्रत्येकासाठी काम करतो. लहान मुलांना माझी रंगीत चित्र पाहून खूप आनंद होतो. मी त्यांचे मनोरंजन करतो, तसेच त्यांना शिक्षित करतो, जीवनाचे खरे यश मला वाचूनच मिळते, म्हणूच मी आयुष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे. माझी असंख्य रूपे आहेत.
हिंदूसाठी मी ‘रामायण’, गीता किंवा ‘महाभारत’ आहे, तर मुस्लिमांसाठी मी ‘कुराण-ए-शरीफ’ आहे. ख्रिश्चन मला ‘बायबल’ मानतात नर सिख मला ‘गुरू ग्रंथ साहिब’ मानतात. ज्याप्रमाणे मानवी समाजात अनेक जाती आहेन, त्याचप्रमाणे माइ्याही पण अनेक जाती आहेत. कथा, नाटक, कादंबरी, कविता, टिका, निबंध इत्यादी अनेक प्रकार आहेत. समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, ज्ञान-विज्ञान शिक्षण इत्यादी अनेक प्रकार आहेत.
हे वाचकाच्या आवडीवर अवलंबून आहे की त्यांना माझे कोणते स्वरूप सर्वात जास्त आवडते.
निसर्गाप्रमाणे मी सुद्धा मानवजातीच्या भल्यासाठी जगतो. माझा अभ्यास केल्याने ज्ञान वाढते, नवीन माहिती मिळते. मी चुकीच्या व्यक्तीस योग्य मार्ग दाखवतो. माझे वाचन करून तुम्ही तुमच्या वेळेचा चांगला उपयोग करू शकता, कारण मी ज्ञानाचा भंडार आहे.
3. वैचारिक : ‘प्रदूषण हे एक हळ् हळ्ूू प्रभाव दाखविणारे विष आहे. आणि ते दिवसादिवस आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणात अस्थिरता निर्माण करते. प्रदूषणाला मुख्यतः तीन भागात विभाजित केले आहे. वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि जलप्रदूषण.