SAMPLE PAPER-5 Marathi
1. Questions
2. विभाग १:गद्य
प्रश्न ९.
(अ) पुढील उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
पुढील आकृतिबंध पूर्ण करा.
गेल्या पाच वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं, की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निखब्बून पडताहेत. लडाखच्या भिन्न-भिन्न दन्याखोज्यात भन्नाट एकाकी, रौद्ध आणि हिरवळ्रीचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाया सैनिकांना भेटलं, की ‘आपली माणस’ भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत. त्यांना आपण जपलं पाहिजे. त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे.
आम्ही पाच वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत, याचं प्रचंड अप्रूप वाट्न ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हांला भेटायला आवर्जून आले होते. १९९९ मधील कारगिल युद्धाच्या वेळ्ठी कर्नल असलेले कुशल ठाकूर करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात, याच्यापरता मोठा सन्मान तो कोणता ?
आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हांला म्हणाले, ” तुम्ही पाच वर्षांचा वादा केलात आणि तो निभावलात, हयाबद्दल अभिनंदन; पण-माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या आमच्या तरुण जवानांना भेटा त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हांला त्यांची गरज आहे. निदान पाच वर्ष तरी कमिशंड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्किसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात! तरुण मुलींना सांगा, की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन दया, की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवणार नाही.
वातावरणात नीरव शांतता ! त्याचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, ‘नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही’. तोलोलिंग पहाडीवरून वाहणान्या वान्याच्या झुळुकेने जणू कानात हब्चूच म्हटले ‘तथास्तु’. भासच तो; पण अंगावर रोमांच उठले, नकळ्ठत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. माघारी वळ्ळले ते, ‘ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबावदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन’ असे सैनिकांना आरवासन देऊनच! कारण ते म्हणतात,
‘माघारी जेक्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या ‘उदया’ साठी ज्यांनी आपला ‘आज’ दिला.
(i) गेल्या पाच वर्षात लेखिकेला जाणवलेली गोष्ट
(ii) लेखिकेसाठी सन्मानाची गोष्ट म्हणजे
(२) सरहद्दीवरील सैनिकांबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे असे लेखिका का म्हणते ?
(३) ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी लेखिकेजवळ तरुणांसाठी कोणता संदेश दिला ?
किंवा
‘माघारी जेन्हा जाल परतून, ओळ्खख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या ‘उदया’ साठी ज्यांनी आपला ‘आज’ दिला. या विधानाविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
(आ) पुढील उताच्याच्या आधारे आकृतिबंध पूर्ण करा.
आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात, की तो दड्न बसतो, पकड् गेलात, की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच. तो अनुभवता मात्र यावा लागतो.
हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो; पण अंतरंगात आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो, तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो, तोही आनंदच.
आपल्या शवासाचंही आपल्याला भान नसतं. खरंतर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हो सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खेलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं, असं नक्छे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनार्यत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं.
काहींना एखादं बक्षीस मिळ्यलं, तरीत्या ‘ तरी त्या ‘अमक्या’ ला चार बक्षिसं मिळ्याली याचं वैषम्य वाटतं किंवा मग ‘त्या लेकाला एकही बक्षीस मिळ्गलं नाहीं, याचाच अधिक आनंद होतो. स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसच्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं, ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. तुलना आली, की आनंद संपलाच. खरा आनंद दुसन्याच्या दुःखावर कधीच पोसला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नक्हे, तर चित्ताला शुद्ध करत असतो.
अनेकदा आयुष्यात असं काही घडतं, की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो,
माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत. त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील, तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं?
त्यांचा नाइलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाड् शकतो. कृत्रिम नव्हे.. .नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल, म्हणून वाट पाहात बसलं, तर आनंद येईलच याची खात्री नसते.
आनंद हा आपण घ्यायचा असतो. कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं, की मग मात्र ‘ नाही आनंदा तोटा’ अशी अवस्था होते.
सौंदर्य जसं पाहणा याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणान्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस, आनंदी वृत्तीची असतात, म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी ‘हात’ केल्यावर चिमण ती भुर्रकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो. किती आतून हसतात ती!
शिकण्यातला आनंद हा तर आयुष्भर न संपणारा असतो. शिकलेलं शिवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नके, परीक्षा देण्यासाठी नक्ठे की कुणावर उपकार म्हणून नक्े, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पाहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. खेळ्यचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटापाण्यासाठी उदयोग आणि आनंदासाठी छंद इतकं हे साधं गणित आहे आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळ करण्याचं किंवा पक्षी निरीक्षाणाचं…कसलं कसलं वेड घेतात लोक डोक्यात; पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल, तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी ‘शहाणंसुरत’ राहून जमत नाही.
खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाहय यश, वैभव मिळ्खण्यातही आनंद असतो; पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल, तर बाह्य यश तुम्हांला आनंद देक शकत नाही. जेन्हा भरपूर सुख, वैभव मिळवूनही माणसाला आनंद मिळ्त नाही. स्वतः बद्दल ‘छान’ वाटत नाही, समाधान होत नाही, तेक्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं, मला अजून काहीतरी मिळवायला हवंय. ते मिळ्यलं, तरच मला आनंद वाटेल. हीच गल्लत होते. अशा वेळी त्यानं बाहेर नक्हे, आत डोकवायला हवं. एवढं मिळ्ळूही मी आनंदात का नाहीये ? मला अशांत, अस्वस्थ का वाटतं आहे? मला नेमकं काय हवं आहे? अशा वेळी उत्तर मिळू शकतं, ‘मला विरंगुळ्ब हवा आहे, मला बायको-मुलांत रमायला हवंय, मला मित्रांशी जिवाभावाचं बोलायला हवंय, मला लिहायला हवंय, मला लॉन्डस्केप्सू करायला हवीत. ‘तुम्ही आनंदी नसता, त्यावेळ्ठी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं.
ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा. अर्थात काही वेळ्ठा हे शक्य नसतं. हवं तेच काम मिळ्ठतं, असं नाही; पण अशा वेळी जे काम करायचंच आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत, मजेत काम कसं करू शकतात, ते जाणलंत, तर तुम्हीही हसत, आनंदात काम करू शकाल, यश मिळ्ळूा शकाल. शांत चित्तानं, आनंदी वृत्तीनं काम केलं, तर यश मिळत जातं. मिळणान्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो, त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद-अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहातं. आयुष्य हा संघर्ष राहात नाही….ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो.
(१) दिलेल्या उतान्याच्या आधारे आकृतिबंध पूर्ण करा.
(i)
लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती
(ii) (a) आनंदाला आकर्षित करणारा-
(b) शरीर आणिमन यांना जोडणारा सेतू-
(२)
‘जे काम करायच आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असत, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
(३) खरा, टिकाऊ आनंद मिळ्वण्यासाठी करावे लागणाने प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
3. किंवा
” सॉददर्य जसं पाहणान्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणान्याच्या वृत्ततीत असतो, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
(इ) दिलेल्या उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ‘कंदिलाची ज्योत मंद करून विश्वनाथ बिछान्यावर पडला. मुंबईत रात्री देखील सतत चालू असलेला रहदारीचा आवाज इथं नाही. रेडियो ओरडत नाहीत. मधूनच ब्रेकच्या कर्कश किंकाळ्या इथं ऐकायला येत नाहीत.
अशीच शांतता अंबेरीला आहे. अंधान्या, एकाकी घरात बाबा असेच बिछान्यात पडले असतील. आयुष्यात त्यांनी कुठंही तडजोड स्वीकारली नाही. मनात आलं तशी स्वातंत्यसंग्रामात त्यांनी उडी घेतली. तुरुंगवास पत्करला. कैद्यांना बरच काही सहन कराव्या लागतात. त्यापलीकडील हालअपेष्टा, तुरुंगाबाहेरही त्यांनी ताठ मानेने सोसल्या. स्वातंत्य मिळाल्यावर राजकारण हा व्यवसाय झाला. आणि तुरुंगवास हे त्याचं भांडवल झालं, तसे ते ह्या सवांपासून दूर झाले. एस.टी. देखील अदयाप न पोहोचलेल्या अंबेरीसारख्या आडगावी जाऊन त्यांनी शिक्षकाचा पेशा पत्करला.
शेकडो मैल दूर असलेल्या वडिलांच्यात आणि आपल्यामध्ये हे एकटेपण, हा अंधार, ही शांतता एक जवळ्किकीचा धागा हल्ुवारपणे विणत आहे. हा हिमालय आपणा दोघांना एकत्र आणत आहे. आपण आजवर जे सोसलंत आणि तरीही निश्चयानं जपलंत, त्याचा प्रत्यय, कुणी सांगावं, मलादेखील इथं येईल.
केवल रक्ताच्या ऐवजी विचारांचा आणि कृतीचा वारसा मला आपणाकड्न लाभेल, हिमालयाची मला तिचमोठी देन होईल! रात्री केक्हातरी कंदिलाची ज्योत हलकेच मालवली, आणि विचारात हरवलेल्या विश्वनाथच्या पापण्यांवरून झोप हल्केच डोक्यात उतरली.
(१) (i) मुंबईत जाणवणान्या गोष्टी
(ii) लेखकाच्या बाबांची वैशिष्ट्ये
(२) कृत्रिम पायाच्या मदतीने दिव्यांगावर मात करता येते’ सोदाहरण स्पष्ट करा.
4. विभाग २: पद्य
प्रश्न २.
(अ) पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं: पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोक्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वक्ववतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतलया रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळ्यांवरील रहदारी
पाहत,
हातांवर डोकं डेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी.
समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साय्याच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.
(?)
(i) कविप्रमाणे कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया
(ii) (a) कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण
(b) समुद्र शिणून जातो, कारण
(२) शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.
(३) ‘समुद्र कोंडून पडलाय’, या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत उलगडून दाखवा.
(आ) ‘अनेकदा तुला मी अशी पाहते की काळ्ठीजच हंबरते रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हदय नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळ्ग’ -या ओळ्ठीतील विचार सौँदर्य स्पष्ट करा.
(इ) ‘स्वपांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा नि आज नखशिखांत तू….तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी’ -या ओळ्ठीतील काव्य साँदर्य स्पष्ट करा.
किंवा
रंगुनी रंगांत सान्या रंग माझा वेगळ।
गुंतुनी गुंत्यात सान्या पाय माझा मोकळा।
कोण जाणे कोठुनी हया सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती हया सावल्यांच्याही झळ्ा
राहती माझ्यासवें ही आसवें गीतांपरी
हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळ्ग।
कोणत्या काळ्ठीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळ्ग।’
-या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
प्रश्न ३.
(अ) पुढील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. नाट्यमयता/संघर्ष: कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळ्ठी संघर्ष किंवा नाट्य
हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो.
संवाद: कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होते असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळ्ठी उंची प्राप्त करून देतात.
भाषाशैली: कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांतुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते.
वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्परविरोधी भूमिकांतून तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे साँदर्य प्राप्त होते.
कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते.
(९)
(i)
कथेचे घटक
(ii) कथेचे टप्पे
(२)
(२)
टैक्सी ड्रायव्हरचे स्वभावविशेष ‘शोध’ कथेच्या आधारे लिहा. किंवा
‘चाल क्ययरे पोरा आन् वयरे ढोरा’ या म्हणीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
(२)
तुम्हाला भावलेली भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी’ थोडक्यात लिहा.
किंवा
‘गढी’ या प्रतीकातून लेखिकेने गुरुजींच्या कार्याशी जोडलेला सहसंबंध स्पष्ट करा.
विभाग ४: उपयोजित मराठी
प्रश्न ४.
(अ) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) मुलाखत घेताना कराव्या लागणान्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.
(२) माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.
(३) अहवाललेखनाची कोणतीही दोन वैशिष्टये लिहा.
(४) व्यक्तीमधील ‘माणूस’ समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.
(आ) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.
(i) मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती
(ii) मुलाखत दात्याचे कार्य
(iii) प्रश्नांची निर्मिती
(२) आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा.
(३) तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी अहवाललेखन करा.
( ) माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.
5. विभाग ५: व्याकरण व लेखन
प्रश्न ५.
(अ) कंसातील सूचनेनुसार कृती करा.
(१) (i) विद्यार्ध्यांनी संदर्भग्रंथाचे वाचन करावे. (आज्ञार्थी करा)
(ii) त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी स्क्कम आहे. (नकारार्थी करा)
(२) पुठील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
(i) विनाकारण
(ii) लोकप्रिय
(३) पुठील वाक्यातील प्रयोग ओळखा.
(i) अस्मिता रोज क्रिकेट खेळते.
(ii) अथर्वने बक्षीस मिळवले.
(४) पुढील तक्ता पूर्ण करा. अलंकाराची वैशिष्ट्ये अलंकार
(i) उपमेयाचा निषेध केला जातो.
उपमेय हे उपमेय असूनही ते उपमेय
नाही तर उपमानच
आहे असे सांगितले जाते
(ii)
अनन्वय अलंकार
(५) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(i) मन समेवर येणे
(ii) मनातील मळभ दूर होणे
(आ) पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
१. खेळांचे जीवनातील स्थान
२. महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
३. अंधश्रद्धांचे थैमान
४. मी रेडिओ बोलतोय
५. गप्पा मारण्याचे व्यसन
6. Answer Key
7. विभाग १ : गद्य
उत्तर ९.
(अ)
(१)
(i) लडाख इथे सरहद्दीवर गेल्यावर गेल्या पाच वर्षात लेखिकेला जाणवलेली गोष्ट म्हणजे तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव व प्रतिष्ठितपणाची चढलेली पूटं निखळ्ूून पडताहेत.
(ii) म्हणजे २९९९ मधील कारगील युद्धाच्या वेळ्ठी कर्नल कुशल ठाकूर हे तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार ते लेखिकेला भेटले.
(२)
आपल्या सरहद्दीवर ठामपणे उभे असलेले सैनिक पाहताच त्यांच्या शौर्याची, धाडसाची, त्यांच्या त्याग, समर्पणाची आठवण येते. आपल्यातील बडेजाव, अहंकार व प्रतिष्ठितपणाची पुटे गळ्ठून पडतात. जिथे हिरवळ्ठीचा दुरान्वयानेही संबंध नाही अशा विभिन्न दन्याखो ज्यात एकाकी, रौद्र अशा भूप्रदेशात राहून ममत्व, बंधुभाव जपतात, नाती जोडतात आणि ती टिकवतात. अशा सैनिकांना भेटल्यानंतर आपल्या माणसांना भेटल्याचा भास होतो. मन भरून येते व या सैनिकांबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे असे लेखिकेस वाटते व तशी ती भावना व्यक्तही करते.
(३) अनुराधा प्रभुदेसाई लिखित ‘वीरांना सलामी’ या पाठात आपल्या सुरक्षेसाठी सरहद्दीवर उभे असलेले सैनिक, त्यांचे जीवन यावर प्रकाश टाकत असतानाच कारगील युद्धाविषयी काही न समजल्याची खंत आणि या युद्धात कामी आलेले सैनिक त्यांच्या वीरत्वाला सलाम करण्यासाठी लेखिका 4 वर्षासाठी ‘लडाख मिशन’ सुरू करते आणि त्यांच्यासमोर वीर सैनिकांचा जीवनपट त्यांच्यासमोर उलगडत जातो. लेखिकेचे लडाखला जाण्याचे हे शेवटचे वर्ष आणि याच वर्षी कारगील युद्धात तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार कर्नल कुशल ठाकूर लेखिकेसारख्या सामान्य माणसाला भेटायला जातात हे लेखिका स्वत:चे भाग्य समजते.
ब्रिगेडियर ठाकूर जेन्हा लेखिकेशी संवाद साधतात तेक्हा आपल्या देशातील तरुणांसाठी महत्त्वाचा संदेश देतात तो पुढीलप्रमाणे-‘ तुम्ही हे लडाख मिशन बंद करू नका. तर सैनिकांना भेटण्यासाठी नेहमी येत चला. त्यामुळे आमच्या तरुण जवानांचा हौसला बुलंद होतो. आणि शहरातील तुमच्या कुशाग्र बुद्धीच्या तरुणांनाही सांगा की, आम्हाला त्यांची गरज आहे. कमीतकमी पाच वर्षे तरी कमीशंड ऑफिसर म्हणून त्यांनी डिफेन्स सर्क्रिसेस जॉईन करावी. मगपुढील आयुष्यात तुम्ही तुमचे करीअर करू शकाल तसेच तरुण मुलींनीही जवानांशी विवाह करताना डगमगू नये तसेच
लेखिकेने लष्कर आणि नागरिकांमध्ये भावनिक सेतू बांधण्याचे काम जे सुरू केले आहे ते थांबवू नये’
अनुराधा प्रभुदेसाई लिखित ‘वीरांना सलामी’ या पाठामध्ये इ. स. १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धाविषयीची माहिती न झाल्याने खंत व्यक्त करून या युद्धात कामी आलेल्या वीरांना सलामी देण्यासाठी म्हणून लेखिकेने लडाख मिशन सुरू केले. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सरहद्दीवर पाय ठेवून उभा राहिलेला सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असतो. तसेच कुटंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकासोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेन्हा खच्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्ययकारी अनुभव या पाठातून मिळतो. जवानांच्या ठाण्यापर्यन्त पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेला प्रवास आणि या प्रवासात आलेले अनुभव याचा प्रत्यय येथे येतो.
जीवाची बाजी लावून सरहद्दीवर काम करणारे हे शूर जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. देशाचे आणि देशातील प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून उभा असतो. देशाची सरहद्द म्हणजे एकाकी, रौद्र असा परिसर जिथे दूरान्वयानेही हिरवळीचा संबंध नसतो. अशा कठीण प्रदेशात राहृन ममत्व, बंधुभाव जपणारे, नाती जोडणारे सैनिक प्रसंगी त्याग, आत्मसमर्पण करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेले हे सैनिक शात्रूला सरहद्दीवरच रोखून ठेववात. त्यांच्या कोणत्याही कारवायांना चोख प्रत्युत्तर देतात, प्रतिकार करून आपल्या देशाचे तसेच देशातील प्रत्येक नागरिकांचे रक्षण करतात. क्वचित प्रसंगी युद्धात देशाच्या कामी ही येतात आणि म्हणूनच लडाख मिशन सुरू करणान्या या लेखिकेस लडाख सरहद्दीवरील सैनिक लेखिकेस सांगतात की माघारी परतून जाल तेव्हा देशातील नागरिकांना आमची ओळख द्या आणि त्यांना सांगा की तुमच्या ‘उदयांसाठी ज्यांनी आपला ‘आज’ दिला. त्यांचा हा संदेश अतिशय सूचक असून सरहद्दीवरील सैनिकांमुले देशातील प्रत्येक नागरिक हा सुखी आणि निश्चित असतो.
(?) (i)
तुम्ही शोधू पकडू गेलात जितका आटापिटा जितका सहजपणे | |||
लागलात | की, | कराल | घ्याल, नितका |
की, | हातातून | नितका तो | तो सहज प्राप्त |
तो दडून बसतो | निसटतो | हुलकावण्या | होतो |
देतो |
(ii) (a) आनंदाला आकर्षित-
(b) शरीर आणिमन यांना जोडणारा सेतू-
(२) शिक्षण घेताना आपण आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतो, हे खरे आहे. काही वेळ्ठ आईवडिलांच्या आग्रहाला आपण बळ्ठी पडतो किंवा आपले सर्व मित्र जिकडे जातात. ती शाखा आपण निवडतो. कालांतराने आपली आपल्या चूक कबून येते. पण उशीर झालेला असतो. त्यांनतर काहीही करता येत नाही. निराश मनाने आपण शिक्षण घेतो आणि आयुष्यभर तशाच मन: स्थितीत जीवन जगत राहतो. त्यात सुख अजिबात नसते. शिक्षणानंतर नोकरी-व्यवसाय निवडताना तसाच प्रश्न उद्भवतो. इथे मात्र आपल्याला निवड करण्याची बरीच संधी असते. या वेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो. मग काम कष्टाचे राहत नाही. आपल्या कामातून, कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो.
मात्र इथेही एक अडचण असतेच. पण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असले, तरी नोकरी-व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात. पण नोकच्या मात्र संख्येने खूप कमी असतात. त्यामुले आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते. उपजीविका तर पार पाडायची असते. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते. अशा वेळी काय करायचे?
अशा वेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. पण आनंदाने करायचा म्हणजे काय करायचे? कसे करायचे ? तोपर्यंत आपण जे शिक्षण घेतलेले आहे, त्यातील सर्व ज्ञान, सर्व कौशल्येपणाला लावली पाहिजेत. मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल. तसेच एवढे प्रयल अपुरे पडले तर आपले काम उत्तम पद्धतीने करण्यासाठी गरज पडली. तर नवीन कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत. काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे, असा आग्रह हवा. मग आपोआपच आपले काम सुंदर होईल. आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल.
(३) टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम टाकायचे पाऊल म्हणजे स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे. आपण स्वतः असे प्रेम करायचेच; पण इतरांनाही तो मार्ग शिकवायचा.
स्वतःच्या शरीरावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? शरीर नीटनेटके, स्वच्छ व प्रसन्न राखायचे. आपल्याला पाहाताच कोणालाही आनंद झाला पाहिजे. त्याला प्रसन्न वाटले पाहिजे. त्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगी घेतले पाहिजेत. आहार विचारपूर्वक घ्याचा, व्यसने करायची नाहीत. दररोज नियमितपणे योगासने किंवा अन्य व्यायाम किंवा रोज तीन-चार किमी चालणे. कामासाठी चालणे यात मोजायचे नाही. काहीही करण्यासाठी नक्हे, तर चालण्यासाठी चालायचे. चालणे हेच काम समजायचे.
मनात ईर्षा, असूया, हेवा, मत्सर, सूड अशा कुभावना बाळगायच्या नाहीत. आपले मन या भावनांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणजे चांगले होण्यासाठी स्वतः कोणत्या तरी एका क्षेत्रात, एखाद्या
कौशल्यात प्रभुत्व मिळवले पाहिजे. स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवायचा. त्यामुळे अन्य कोणाहीबद्दल मनात कुभावना बाळगण्याची इच्छाच होणार नाही.
यश, वैभव मिळवण्याचा प्रयत्ल करण्यात गैर काहीच नाही. मात्र यश, वैभव या गोष्टी बाह्म असतात. आत्मिक समाधानाशी संबंध नसतो. म्हणून यश, वैभव मिळाल्यावरही मन अशांत, अस्वस्थ होक शकते. अशा वेळी आणखी यश, आणखी वैभव यांच्या मागे न लागता आपल्याला नेमके काय हवे आहे. याचा शोध घेतला पाहिजे.
मात्र, एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. पैशाने खरा, टिकाऊ कधीही मिळवता येत नाही. आपल्या मनाच्या सोबत राहण्यासाठी आवडेल तेच काम करायला घ्यावे. आवडेल त्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय स्वीकार करावा अर्थात, प्रत्येकाला स्वतःच्या आवडीप्रमाणे नोकरी, व्यवसाय मिळेलच असे नसते. अशा वेळी मिळालेले काम आवडीने केले पाहिजे. एवढी पथ्ये प्रामाणिकपणे पाळली तर आपण खन्या आनंदाच्या जवळ असू. किंवा
एखादी व्यक्ती काहीजणांना सुंदर दिसते. तर अन्य काहीजण ती सुंदर नाहीच, यावर पैज लावायला तयार होतात. हा व्यक्ती-व्यक्तींच्या दृष्टींतला फरक आहे. कोणत्या कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल काहीही सांगता येत नाही. त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेत, हेही सांगता येत नाही. आनंदाचे प्रकारे वेगवेगळया असतात. प्रत्येकाचा आनंद वेगळ्ध असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळ्ञ करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण एकाला लोकांकडीच जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता. एकजण आठवड्यातून एकदा आसपासचा एकेक गाव पायी चालून यायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात सात-आठ वेळ्ठा पाहणारेही सापडतात. सिनेमातले सर्व संवाद त्यांना तोंडपाठ असतात. ते संवाद ते सिनेमाप्रेमी पुन्हा पुन्हा ऐकवतात. यातून त्याला कोणता आनंद मिळत असेल ? यावरून एकच दिसते की, प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते.
व्यक्तिव्यक्तींमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला. तर समाजातील अनेक भांडणे संपतील; समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. आवडीनिवडी भिन्न असतात. हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.
व्यक्तींची ही विविधता ओळ्खली पाहिजे. या विविधतेची मान्यता राखली पाहिजे. मग समाजात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तू निर्माण होतील. रंगीबेरंगी घटना घडत राहतील. समाजजीवन अनेक रंगांनी बहरून जाईल.
(i)
(ii)
(२)
आपल्या वडिलांपासून शेकडो मैल दूर असलेल्या हिमालयात जेक्हा लेखक नोकरीसाठी येतो येक्हा यांना त्यांच्या वडिलांचे एकाकीपण जाणवते. कारण जसे अंबेरीपासून दूर एकटे लेखक राहतात तशाचप्रकारे त्यांचे वडील अंबेरीला एकाकी घरात बिछान्यात पडले असतील असे लेखकास वाटते. हेच एकटेपण, अंधार आणि शांतता दोघांमध्ये जवक्किकीचा धागा हळ्बूवारपणे विणत आहे हे लक्षात येते. कारण वडिलांनी जे आजपर्यन्त सोसले, भोगले आहे हे लक्षात येते आणि कदाचित त्याचा प्रत्यय लेखकास इथे येईल असे लेखकास वाटते शिवाय रक्ताऐवजी विचारांचा आणि कृतीचा वारसाही मला आपल्याकड्नच मिळेल हिच हिमालयाची मोठी देन असेल असे ‘विश्वनाथ’ ला (लेखकास) वाटते.
विभाग २: पद्य
उत्तर २.
(अ)
(?) (i)
(ii) (a) कारण समुद्र गगनचुंबी इमारतीच्या गजांआड कोंडून पडलाय
(b) कारण त्याला शहरातल्या सगळयांच्या बालपणाची खूप काळजी वाटते.
(२) ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे घोर वास्तव भावपूर्ण शब्दांत ग्रथित केले आहे. किनान्यावरील उभारलेल्या उंचचठंच गगनभेदी इमारतीच्या गजाआड समुद्र कोंडलेला आहे. तो हतबल होऊन इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे. तो विचार करतो की या मुलाचे बालपण निमुळ्ठते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे. त्याला जमिनीवरचे आनंददायी अंगण दिसत नाही. ही त्याच्या बाल्यावस्थेची ट्रँजेडी आहे. दुसरीकडे एक, दुसरे निरागस बालक स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आवटरून झोपले आहे. एक गगनचुंबी इमारतीत दुसरे अनिकेत जमिनीवर हा विरोधाभास वेदनामय आहे. दोघांचेही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजेच पर्यायाने निकोप जीवनाला येणे, हे दु:खमय आहे. समुद्र या दोन्ही अवस्थांकडे हताश पाहत बसतो. दाढी व झिंजा पिंजारून
अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तीमधून सैरभैर हिंडत राहतो. अशाप्रकारे शहरातील बाल्याची अवस्था कवितेतून कवीनी समर्थपणे चितारली आहे.
समुद्र म्हणजे अमर्याद असलेले प्रवाही मानवी जीवन होय! समुद्रासारखे सर्जनशील अधांग जीवन जेक्हा महानगरांच्या मयदित बंदिस्त होते, त्या बेळची बेचैन अवस्था, जीवघेणी घुसमट ‘ ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेच्या शीर्षकातून कवी वसंत आबाजी डहाके यांनी सार्थपणे प्रत्ययास आणली आहे.
शहरांमध्ये उंचचठंच टोलेजंग इमारतीचे तुरुंग उभारले गेले आहेत. त्यात बाल्यावस्था घुसमटते आहे. या उत्तुंग इमारतींच्या गजांआड समुद्र असाहाय्य होऊन अडकला आहे. समुद्राचे अस्तित्व हे विस्तीर्ण, अफाट व विशाल असते. ते सतत हर्षणे व जिवंत असते; परंतु भौतिक सुखाच्या हव्यासाने येणान्या महानगरीय चंगळवादाने या विशाल जीवनाला कैद केले आहे. जणू संजीवन पाण्याची कबर बांधली आहे किंवा अमृताचे विषात रूपांतर झाले आहे. समुद्राची ही भावविवशता कर्वींनी ‘समुद्र कोंडून पडलाय’ या शीर्षकामधून प्रत्ययकारकरीत्या साकारली आहे. त्यामुळे हे शीर्षक या कवितेला अगदी सूचक व सार्थ आहे.
सुप्रसिद्ध कवयित्री हिरा बनसोडे लिखित ‘आरशातली स्त्री’ या कवितेतील पद्यपंक्ती असून ही कविता त्यांच्या ‘फिनिक्स’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे. कवितेतील नायिका आपले प्रतिबिंब आरशात पाहते तेव्हा आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीशी संवाद साधते. तिच्या गतआयुष्यातील आठवर्णीना उजाळा देत नायिकेच्या वर्तमानस्थितीबद्दल तिच्या मनातील भावना ती प्रकट करते.
आरशातील प्रतिबिंब म्हणजे नायिकचे अंतर्मन आरशाबाहेरील स्त्रीला पाहून व्यथित होते. तिचे काळीज ठंबरते. तिला अनामिक भीती वाटते कारण आरशाबाहेरील स्त्रीच्या एकांतात आपले मनातील हुंदके कंठात दाट्न ठिकठिकाणी फाटलेले हददय शिवत असते व मनातील असहय वेदना पदराखाली झाकून टाकते. फाटलेले हदय, रात्रीचा एकांत, असह्य कळा, पदराखाली झाकणे असे सूचक शब्दप्रयोग मनाला अंतर्मूख होऊन विचारप्रवृत्त करतात. इथे नायिका समाजव्यवस्थेनुसार पारंपरिक वरदान म्हणून संसाराचा स्वीकार करते तसे तिचे विश्व बदलते. तिचे स्वातंत्य, तिचे अस्तित्व, हरवून वाट्याला येतात फक्त संसारातील खडतर अनुभव आणि कष्टमयी जीवन, गतादुष्यातील स्वप्न, ध्येय, आकांक्षा, इच्छा संसाराच्या यज्ञकुंडात जळ्ून भस्म होतात, आणि मग खन्या अर्थाने जीवन जगण्याची धडपड सुरू होते. संसारात मिळ्ठलेले तिचे दुख्यम स्थान, संसाराचे ओझे ओढताना तिची होत असलेली ससे होलपट, तिच्या मनातील इच्छा-आकांक्षांना यत्किंचितही न मिळ्यलेली किंमत हे सारे पाहता तिच्या मनाचा कुठेही विचार केला जात नाहीं. त्यामुळे तिला होणा य्या वेदना ती निमूटपणे सहन करते. संसाराची स्थिती-गती सुधारताना तिच्या मनाला कितीतरी जखमा होतात. मात्र ती हे सारं निमूटपणे सहन करते. येथे स्त्री मनाचा शोध घेता स्त्री मनातील तिच्या अस्तित्वाविषयीचा संघर्ष पाहावयास मिळतो. ही नायिका स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करत असून कवितेतून व्यक्त झालेला हा
विचार सर्वसमावेशक असून नायिकेच्या माध्यमातून कवयित्रीला आलेले अनुभव हे अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात है स्पष्ट होते.
(इ)
‘आरशातील स्त्री’ या कवितेच्या कवयित्री हिरा बनसोडे असून त्याच्याच ‘ फिनिक्स’ या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली आहे. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध या कवितेत घेतला असून काव्यलेखनासाठी संवादात्मशैलीचा प्रभावी वापर केला असून ही कविता मुक्तछंदात्मक आहे.
प्रस्तुत काव्यपंक्तीत स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेत असताना तिला सहन कराव्या लागत असलेल्या व्यथावेदना शब्दबद्ध केल्या आहेत. ही कवितेची मध्यवर्ती कल्पना असून आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी साधलेला संवाद हा स्व:ताशीच केलेला सार्थ संवाद आहे.
कवितेतील नाविका सहज आरशात पाहते आणि तिच्या मनात त्याक्षणी गतकाळातील आठवणी जाग्या होतात. तसे तिच्या लक्षात येते की, ‘मी ती हीच का ?’ आणि मग तिच्या लक्षात येते की आरशातील स्त्रीने आपले रूप घेतलेले दिसत असले तरी ती आपण नाही आहोत कारण आपल्यात अंतर्बाह्य बदल झालेला आहे आणि मग तिचे आरशातील प्रतिबिंब तिचे अंतर्मन तिच्याशी संवाद साधू लागते. तिच्या मनातील तिच्या पूर्वरंगाविषयीच्या स्मृतींना ती उजाळ्म देते. ती पूर्वरंगात कशी होती याचे एक जिवंत चित्र तिच्यासमोर उभे करते.
8. किंवा
कविवर्य गझलसम्राट सुरेशभट यांनी ‘रंग माझा वेगळ्य’ ही गझल लिहिली असून त्यांच्याच ‘रंग माझा वेगळ्व’ या मराठी गझल संग्रहातून घेतली आहे. सामाजिक आशय असलेला या कवितेत माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थीपणा, ढोंगीपणा, लाचारी, आणि ‘ मी’ ची समाजाने केलेली मानहानी या विषयीच्या प्रखर संतापावर कवीने प्रकाश टाकला आहे.
प्रस्तुत गझलमध्ये मानवी जीवन जगत असताना मानवाचे अनेक पैलू पाहावयास मिळतात. त्यात रंगून जावे लागते. असे असले तरी सर्व गुंत्यात गुंतूनही कवीचा पाय मोकव्मच राहतो. येथे कवी सर्वामध्ये गुंतूनही आपले वेगळेपण वस्तूनिष्ठपणे जपत आहे. आपले अस्तित्व, वेगळेपण जपणारा हा कवी कलंदर व्यक्तिमत्त्वाचा असून त्यांना येणारे अनुभव सुद्धा जगावेगळे आहेत. कवीपुढे येणान्या सावल्या कोटून येतात हे समजत नसून या सावल्यांच्याही झळ्ठ कवीमनाला लागत आहेत. अन्यायाखाली भरडल्या जाणाज्या वर्गासाठी कवीमनाचा संघर्ष चालू असतानाच त्यांना न्याय देण्यासाठी कवीमन कार्यतत्पर आहे. हे करत असताना त्यांच्यासमोर भौतिक सुख, प्रलोभनेसमोर येतात ज्यामुळे कवीला सुख, संपत्ती, ऐश्वर्य लाभणार असले तरी अशाप्रकारचे सुख कवीला नको आहे कारण अशा सुखाचा कवीमनाला त्रासच होताना दिसतो कारण अशा प्रलोभनामुळे आपण आपल्या कर्तव्यापासून दुरावले जावू असे मूल्यहीन लोकांना वाटते आहे. हे स्वार्थी समाजाचे रूप पाहून माइया डोळ्यातून अश्रू वाहात असली तरी या अश्रूरूपी
शब्दांचे गीत होऊन ते चिरंतन बनते आहे. आणि कधीकाळी मिळणारे सुख हे आनंदापेक्षा दुःखच देते. कारण असे कोणते दु:ख आहे की ज्याला माझा म्हणजेच कवीमनाचा लळ्ठा लागला आहे. कदाचित या दु:खाचा हसतमुखाने स्वीकार करत असल्याने त्यास आपला लळ्ठ लागला असावा कारण या आणि अशा दु:खातूनच कवी जगण्याचे तंत्र शिकतात. वाट्याला येणारे दुःख पचवून कधी जगायला शिकलो हे कवीलाच कळता नाही. मात्र अचानकपणे आयुष्यच कवीमनाचा गळा कापत आहे. जगण्यास आताशी सुरुवात होत असतानाच आयुष्यच कवीमनाचा विश्वासघात करते आहे अशा परिस्थितीतही कवी आनंदाने आयुष्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करते आहे.
सामाजिक विषमतेत जगत असता कवी आपले अस्तित्व, वेणळेपण जपत असताना त्यांना येणारे अनुभव या गझल काव्यातून व्यक्त होताना दिसतात. जीवनातील वैविध्यपूर्ण पैलू, विविधरंग, आयुष्याचा गुंता, संघर्षात्मक जीवनात येणान्या सावल्या, सावल्यांच्या झळ्ठ, आसवांची गीते, दुःख जागविणारे क्षण आणि अशा संघर्षात्मक प्रवासात विश्वासघात करणारे आयुष्य या बाबींचा विचार करता ‘मी’ ची समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप व्यक्त करतानाची त्यांची मृद, हळ्ूूवार शब्दयोजना प्रसंगी अधिक तीक्ष्ण, धारदार आणि उपरोधिक व परखड बनते. तसेच प्रखर सामाजिक बांधिलकीचे भान कविमनात असल्याचे दिसून येते. अंतरात्म्याच्या शब्दसमातून प्रकट झालेले गीत आणि आयुष्य या प्रतिमा शाश्वत असून त्याचा कवीने अचूक असा वापर केला असून सावल्यांच्या झळ्ठा, दुःखाचा लळ्ग, या परस्पर विरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल ही एका वेगळ्या उंचीवर पोहोचते आहे हे लक्षात येते.
9. विभाग ३: साहित्यप्रकार-कथा
उत्तर ३.
(१)
(i)
(ii)
कोणतीही कथा त्या लेखकाची अभिजात कला असून त्यामध्ये चांगल्या-वाईटाचा अनुभव हा असतोच कारण अशा अनुभवातूनच नाट्यात्मता निर्माण होते. अशा संघर्षातूनच कथा उत्कर्षाबिंदूपर्यन्त पोहोचते. कथेत प्रत्येक वेळ्ठी संघर्ष वा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही तर आनंद आणि सुखातिला अशा घटनांतूनही नाट्यात्मता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो असे असले तरी कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे केलेला शेवट हा वाचकांची मने आकर्षित करत असते. आणि म्हणून कथेमध्ये नाट्यात्मता या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
(आ)
(१) ‘शोध’ या कथेचे लेखक व. पु. काले असून या कथेत ‘टैक्सी ड्रायव्हर’ महत्त्वाचे पात्र असून कथानकाच्या गतिमानतेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरते.
एज्युकेटेड असलेला हा टैक्सी ड्रायव्हर मुंबईसारख्या शहरात टैक्सी चालविण्यासाठी नवशिका आहे त्यामुळे टैक्सी चालवताना नियम पाळणारा, यत्किंचितही चुका न करणारा, अतिशय सालस आणि तितकाच विनम्र असा होता. मदतीला धावणे हा त्याचा स्वभाव असल्याने अनु इनामदारची एक रुयाची नोट तिला परत मिळवून देण्यासाठी आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर हॉटिलवाल्या पर्यन्त पोहोचतो व अनुला ती नोट परत मिळ्वून देतो.
त्या नोटेविषयीचा अनु सांगत असलेली आठवण तिची त्या पाठीमागची भावना समजून घेतो ती तटस्थवृत्तीने, तिच्या मनाची गुंतागुंत समजून घेऊन तिला मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगतो. मनाने पेशंटमध्ये गुंतून न राहता ड्रायव्हरसारखी नजर हवी असे सांगत असतानाच भूतकाव्यत अडकलात की संपला. त्याचा भविष्यकाळ्ठही खराब होतो. अशाप्रकारचा जीवनाकडे पाहण्याचा तटस्थ दृष्टिकोन सांगतो. टैक्सीत बसणाज्या प्रत्येक व्यक्तीचे डेस्टीनेशन ठरलेले असते. त्यामुळे गाडीत बसलेल्या व्यक्तीने स्टॉप दाखविताच गाडी थांबवायची. आणि नवीन पैसेंजरच्या स्वागतासाठी सज्ज क्हायचे. अनुनेही असेच करायला हवे असे त्यास वाटते. पेशंट आला, गेला विचार न करता आपण आपला कॉटचा नंबर सांभाळ्ठयचा. तसेच ज्या गोष्टी हातात आहेत त्यांचाच शोध घ्यायचा मात्र ज्या गोष्टी मिळणारच नाहीत त्याचे काय? असे सांगून त्याने त्याच्या मुलीविषयी सांगितले की आपली मुलगी आपणास सोडून कायमची गेली. तिचा शोध आपण कसे घेणार? म्हणजेच एखादी गोष्ट मिळणारच नसेल तर त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही या वरून टंक्सी ड्रायव्करची जीवनाकडे पाहण्याची तटस्थवृत्ती दिसून येते. अशाप्रकारे टैक्सी ड्रायव्हरची जीवनाकडे पाहण्याची तटस्थवृत्ती दिसून येते. अशाप्रकारे टैक्सी ड्रायव्हरचे स्वभावविशेष आपणास पाहावयास मिळ्बते.
10. किंवा
डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘गढी’ ही कथा ‘अकसिदीचे दाने’ या कथासंग्रहातून घेतली असून ‘ बापू गुरुजी’ च्या कार्यकर्तुत्वाचे मनोज़ दर्शन घडविले असून या कथेत वैदर्भी बोलीचे विशेषतत्व जाणवत असताना वैद्भी लोकजीवनातील रीतिरिवाजाचाही प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.
‘बापू गुरुजींनी गावच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांना गावात विधायक योजना आणायच्या होत्या. त्यांनी गावासाठी शाळ्ा सुरू केली. आता त्यांना गावासाठी पोस्ट चालू करायचे होते. परंतु गावातल्या उचापती करणाज्या लोकांनी त्यांच्या कार्यास विरोध करायचे ठरविले. गावातून फक्त मुलाच्या जन्माची अन् माणसाच्या मृत्यूचीच चिठ्ठी जर पोष्टातून जात असेल तर कशाला हवे पोस्ट ? या विचाराने गावात पोस्ट चालू करण्यास विरोध केला मात्र तरीही गुरुजींच्या प्रयत्नाने पोस्ट आले. त्यातून पत्राची खरेदी, बिक्री होत नव्हती. यावरून पोस्ट खात्यालाही वाटू लागले की गावाला पोस्टाची गरज नाही. आणि गावातील लोकांनाही चांगले-वाईट समजत नव्हते. त्या गावातील लोकांची वृत्ती, किंमत न देता कोणालाही कामाला लावायचे
अशीच होती. त्यामुले त्यांना पोस्ट म्हणजे विनाकारण खर्च असे वाटत होते. लोकांची मानसिकता म्हणजे केलेल्या कामाचा मोबदला न देता काम करवून घेणे अशी होती. त्यामुळ ‘चाल क्हयरे पोरा आन् वयरे ढोरा ‘ ही म्हण प्रचलित झाली.
‘शोध’ या कथेचे लेखक व. पु. काळे असून मुंबईसारख्या महानगरीत दिवसेंदिवस माणुसकी हरवत असतानाच लेखकाने या कथेत जबावदार, कृतीशील असे ‘भिडे दाम्पत्य’ हे पात्र योजले असून कथेतील प्रमुख पात्र ‘अनु इनामदार’ असून ती मुंबईसारख्या महानगरीत के.ई.एम. हॉस्टिपटलमध्ये ‘नर्स’ म्हणून सेवा करत असल्याने ती हॉस्पिटल समोरच गल्लीतील तिस्या मजल्यावर एक खोली घेऊन राहत असताना तिच्याकडे कथेतील नायक व मुक्ता काही कारणास्तव जातात. तेक्हा त्यांना भेटण्यासाठी भिडे दाम्पत्य येते ते स्त्रीच्या वेळी व माघारी घरी जाताना उशीर झाल्याने टैक्सीने जायचे ठरते. मात्र टैक्सीला सुटे पैसे हवेत म्हणून ते पैशाची शोधाशोध करून त्यांना पैसे दिले जातात. त्यातच अनुने टेबलवर ठेवलेली एक रुपयाची नोट’ घेऊन (ती घरात नसताना) ती त्यांना दिली जाते. भिडे दाम्पत्य त्यांच्या घरी नायकाला भेटून परत माघारी टैक्सीने जात असता त्यांच्या घराजवळ्ठील चौकात अपघात होतो. एक म्हतारा टैक्सी खाली येतो. त्यावेळी त्या प्रसंगातून भिडे सहजपणे बाहेर पडले असते, सुटले असते मात्र त्यांच्यातील चांगुलपणामुळे त्यांनी सामाजिक बाधिलकीचे भान ठेवून टैक्सीवाल्याला मदत करायची ठरवले कारण त्या अपघातात टैक्सीवाल्याची चूक नब्हती शिवाय तो होतकरू, प्रामाणिक होता त्यासाठी टैक्सीवाल्याच्या बाजूने जबानी द्यायला भिडे पोलीस स्टेशनला जातात. त्याचवेळी ते त्या म्हता य्यास इसमास नायर हॉस्पिटलमध्ये अंडमिट करतात. अशाप्रकारे एका चांगल्या व्यावसायिक, होतकरू टैक्सीवाल्याच्या पाठीशी भिडे खंबीरपणे उभे राहून त्याच्या बाजूने जबाब देवून त्यास त्या अपघाताच्या प्रसंगातून सहीसलामत वाचवतात. अशाप्रकारे भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी दिसून येते.
11. किंवा
सुप्रसिद्ध कथालेखिका डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘गढी’ या कथेत स्वांतत्रप्राप्तीनंतर विकासाच्या वाटेवरील गावगाड्या समोरील प्रश्न, ते सोडविताना येणाज्या अडचणी व ग्रामसुधारणेसाठी निष्ठापूर्वक काम करणारे समाजसेवक बापू गुरुजी. त्यांचे कार्य आणि कथेत योजलेली प्रतीके याचा धागा कथालेखिकेने संवेदनशील भावभावनांतून जोडण्याचे कार्य केले आहे. ‘गढी’ या प्रतीकातूनही गावातील चांगले वाईट स्थित्यंतरे आणि गुरुर्जींचे कार्य याचा सहसंबंध आपणास पाहावयास मिळ्तो.
गढी-सातपुड्याच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. शेजारून वाहणारी वाननदी आणि या गावातच गावाच्या पाटलाची ‘गढ़’ उभी आहे ही गढ़ी म्हणजे त्या गावाचे पूर्व वैभव पांढन्या शुभ्र मातीत बांधलेली, ऊनवान्यात आपले वैभव जपत उभी असलेली मात्र अलीकडे दिवसेंदिवस खचत चाललेली ‘बापू गुरुजीं’ च्या उमेदीसारखी. पाटलाचा वाडा पडला तशी तीही उघडी पडली मात्र अजूनही ती ऊनपावसात तग धरून उभी आहे. गुरुजीही गावाचा विकास करत होते. मात्र गावातील उचापती करणारे लोक गुरुजींच्या कार्यात अडथळे निर्माण करू लागले त्यामुळे गुरुजींना वाईट वाटत असे परंतु विरोधकांसमोर, उचाफी करणान्या लोकांसमोर ते तग धरू शकत नव्हते. तर ते फक्त
मनातल्या मनात दुःख व्यक्त करत होते. तसेच ‘गढ़’ ने ही आता ऊनपावसमोर हात टेकले होते. काठाकाठाने ती आता खचत चालली होती. त्या गढीची पांढरी मगी मिटत असल्या कारणाने गढी दिवसेंदिवस खचावी असेच गाववाल्यांना मनोमन वाटत असे. आणि गुरुजींही विकास कामापासून दूर झाले तर तेच काम करण्याची संधी गावातील विरोधकांना मिळणार होती. गढी दर पावसाळ्यात खचत होती आणि उन्हाळ्यात गावातील माणसे गढीची माती विल्याने खणुन नेत होते. आता मात्र ती पुरती खचल्याने तिच्या जागी मोट्ठ पांढरं मैदान तयार झाले होते. एकेकाळ्री तिचे उभे असलेले वैभव आज असे पायदळी पडले होते. तेच गुरुज्जींच्या विकासात्मक कार्याचे झाले. त्यांना गावासाठी नवनव्या योजना आणुन विकास करायचा होता. मात्र गावात उलापती करणाज्या, गुरुजींच्या कार्यास विरोध करणान्यांना तो विकास नको होता. त्यामुळे प्रसंगावधान राखून गुरुजीही माघार घेत होते. आणि निवृत्तीच्या काव्ठत तर ते स्वत: हुन बाजूला सरू लागले. अशाप्रकारे ‘गढी’ या प्रतीकातून गुरुजींच्या कार्याशी सहसंबंध जोडला आहे.
12. विभाग ४: उपयोजित मराठी
उत्तर ४.
(१) (a) मुलाखत घेणान्याने मुलाखत घेताना आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून मुलाखत देणान्यास प्रश्न विचारावेत.
(b) प्रश्नांची उत्तरे देण्याचे वा न देण्याचे स्वातंत्य अबाधित ठेवावे.
(c) मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय वा उत्स्कूर्त असावे.
(d) संयम, विवेक व नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देवून मुलाखत रंगतदार करावी. अशाप्रकारे मुलाखत घेताना या चार गोष्टी कराव्या लागतात.
(२) माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना माहितीपत्रकामध्ये दिली जाणारी माहिती आकर्षक पद्धतीने मांडता आली पाहिजे.
(i) माहितीपत्रकातील मांडणी सरधोपटपणे न कसा दिसताक्षणी ती वाचण्याची इच्छा झाली पाहिजे.
(ii) माहितीपत्रकासाठीचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी.
(iii) मुखपृष्ठ व मलपपष्ठ आकर्षक असावे.
(iv) शब्दांचा आकार योग्य असावा, शीर्षक, बोधवाक्य ठसठशीत असावे.
(v) माहितीपत्रकातील मांडणी आकर्षक करण्यासाठी त्यात्या क्षेत्रातील कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ञांची मदत घेता येईल.
(३) अहवाललेखनाची एकण पाच वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
(i) वस्तुनिष्ठता आणि सुस्पटता
(ii) विश्वसनीयता
(iii) सोपेपणा
(iv) शब्दमर्यादा
(v) नि:ष्पक्षपातीपणा
(i) विश्वसनीयता: अहवाललेखनामध्ये दिलेली विश्वासाई माहिती व तथ्यांच्या नोंदीमुळे अहवाललेखनास विश्वसनीयता प्राप्त होते. अशा विश्वसनीयतेमुळेच कित्येकदा गुंतागुंतीच्या
समस्यांमध्ये असे अहवाल पुराव्यासाठी ग्राह्य धरले जातात हेच त्या अहवालाचे खास वैशिष्ट्य होय.
(ii) वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता: कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार अहवाललेखनात तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाज्याची नावे, पदे, घटना, हेतू, संस्थात्मक माहिती, निष्कर्ष अशा अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूक पद्धतीने केल्या जात असल्याने अशा नोदी अधिक प्रमाणात सुस्पष्ट असतात.
( ४) मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखत त्याचे अंतरंग रसिक-श्रोत्यांसमोर उलगडत असते. मुलाखतीत मुलाखतदाता संघर्षमय जीवनाचा कथापट उत्तरांतून मांडत असतो. विशिष्ट ध्येय गाठत असताना वाटेत आलेल्या खाचखळग्यांचा केलेला सामना, त्या त्या वेळ्ठी दाखवलेली जिद्द अशा विविध प्रसंगांचे जणु स्मरणच मुलाखतदाता सर्वीसमक्ष करीत असतो. मुलाखतीत आपले अनुभव सांगत असताना आनंद आणि वेदना यांचे मिश्रण शब्दरूपातून अवतरत असते. मुलाखतदाता आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, कार्य यांचा आढावा उत्तरांतून घेत असतो. थोडक्यात, व्यक्तीच्या आयुष्याचा काळपट जाणून घेणे म्हणजे व्यक्तीमधील माणूस समजून घेणे होय. मुलाखतीतून हे शक्य होते.
(१) मुलाखत घेण्यापूर्वी मुलाखतीची पूर्वतयारी काही प्रमाणात करावी लागते कारण या पूर्वतयारीवर मुलाखतीचे यश अवलंबून असते म्हणून काही मुद्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी करावी लागते.
(i) मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती:मुलाखत घेणायाला मुलाखत देणान्याची वैयक्तिक माहिती असणे महत्त्वाचे असते. त्यामध्ये मुलाखतदात्याचे पूर्ण नाव, असेलतर टोपणनाव, त्याचे वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्रा, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व हुद्दा, मानसन्मान, मिळालेले पुरस्कार, लेखनकार्य, संस्कार, पडलेला प्रभाव इत्यादीविषयीची माहिती असावी लागते.
(ii) मुलाखतदात्याचे कार्य: मुलाखतदाता करत असलेले कार्य-सामाजिक-राजकीय धार्मिकरैक्षणिक-साहित्यिक यापैकी कोणत्या स्वरूपाचे आहे तसेच ते राज्यापुरते मर्यादित आहे की राष्ट्रस्तरीय याची माहिती घेणे अत्यावश्यक असते. मुलाखतदात्याच्या कार्यावर कोणाची छाप, प्रेरणा तसेच कार्य करतानाचे आलेले अनुभव याविषयीची माहिती मिळविते मुलाखतीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. मुलाखतदात्याला त्याच्या कार्यासाठी काहीवेळ्ठी मदत मिळते ती मदत आर्थिक, मानवी स्वरूपातीलही असू शकते. संघटना, शासनाने घेतलेली दखल, मुलाखतदाता करत असलेल्या कार्याचा विस्तार त्याविषयी मिळविलेले पुरस्कार, मानसन्मान याविषयीही माहिती मिळवणे महत्त्वाचे असते कारण अशी माहिती मुलाखतीची पूर्वतयारी करण्यासाठी उपयुक्त उरते.
(iii) प्रश्नांची निर्मिती: मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी मुलाखतकत्यने मुलाखतीसाठी जो विषय घेतला आहे त्या विषयानुसार मुलाखत देणान्या व्यक्तीस कशाप्रकारे प्रश्न विचारता येतील याविषयी विचार करून प्रश्नांची निर्मिती
करता येते. प्रश्नाच्या माध्यमातून मुलाखत देणान्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जास्तीत जास्त प्रभावी कसे करता येईल याचा विचार करून प्रश्ननिर्मिती करावी लागते. प्रश्नांची निर्मिती करताना मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वातील सर्व पैलूंना स्पर्श होईल हे पाहावे लागते मात्र होकारार्थी, नकारार्थी उत्तरे येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. विचारलेल्या प्रश्नातून जास्तीत जास्त प्रभावी उत्तरे कशी मिळतील तसेच मुलाखतीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने प्रश्नांची निर्मिती करावी.
(२) आडवडी बाजाराचे माहितीपत्रक: आठवडी बाजार! खास जनसामान्यांच्या आग्रहास्तव
‘सकस’ आठवडी वाजार गोळीबार मैदान, सोलापूर
(2)
वेबसाइट: http//www.bajar.com
ई-मेल: aathabajar@gmail.com
आठवडी बाजार खास तुमच्या भेटीला, भरगच्च भाजीपाला रोजच्या जेवणासाठी असो वा पाटी, लग्न, सणसमारंभ खास पार्टी, जेवण वा बुफेडिनरसाठी आवश्यक असे सर्वकाही खास तुमच्या आठवडी बाजारात खरेदी करा
0 आठवडी बाजाराची खास वैशिष्हये
देशी गाईंचे शेण आणि गोमूत्र यांचा शेतीमध्ये
वापर करून नैसर्गिक शेती पद्धतीने पिकवलेल्या विषमुक्त भाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय भाज्या तसेच कडधान्य विक्रीसाठी उपलब्ध बटाटा, कांदा, आद्रक, टोमेटो, मीरची, हिरवा वटाणा, शेवगा, फ्लॉवर, दुधी भोपळ्ठ, लाल भोपव्ठ, चक्की भोपळ्ठ, भेडी, भरताचे वांगे, गोसावळे, कोबी, काकडी, वांगे, आवळ्ठ, लिंबू, स्विटकॉर्न, गाजर, सोललेला ऊस, पावटा, वाल, घेवडा प्पालेभाज्या 0
पालक, शेपू, मेथी, कांदापात, मीक्सभाजी, बिट, मुळ्ठ, पुदिना, आळ्, गवती, चहा, कोधिंबीर
फळे
चिक, सीताफळ, शहाळे, देशीबोरे, पपई, डाळ्ठींब, पेरू कडधान्ये हुलगे, चवळी, मटकी, तूर, जीवस, देशीतीळ, कारळे, बाजरी, मूग घरपोच डिलिव्ररीची मोफत सोय…..
तुम्हाला परवडतील अशा किफायतशीर किमतीत सकस खा! मनसोक्त आनंद लुटा!!
वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:००
वार: आठवड्यातील प्रत्येक रविवार
आठवडी बाजार…..सकस आहार…..
शेतकन्याच्या कष्टाचा खास पाहुणचार!
(३) वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी अहवाललेखन-
वृक्षारोपण कार्यक्रम सन २०९९-२०
शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२९-२० रोजी सकाळ्ठी ११:०० वाजता
कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात सन् २०९९ या शैक्षणिक वर्षात ‘वृक्षारोपण कार्यक्रम’
मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘ अश्वस्थ ‘ संस्थेचे अध्यक्ष कुशल सावंत यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी ग्रामपंचायतीचे लाडके सरपंच आशुतोष पाटील उपस्थित होते. साला बादप्रमाणे याही वर्षीच्या वृक्षारोपण कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिलवडी येथे कनिष्ठ महाविद्यालयात सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सरपंच आशुतोष पाटील यांनी सुमारे एकहजार रोपे सोबत आणलेली भिलवडी येथे गोरस गडाच्या परिसरात व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कुशल सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण केले, सन्माननीय प्रमुख पाहुणे, प्राचार्य यांनीही वृक्षारोपण केल्यानंतर ‘अस्वस्थ’ संस्थेच्या अध्यक्षांनी, २७ सप्टेंबर हे जागतिक वृक्षारोपण दिनाचे महत्त्व विद्याध्यांना समजावून सांगितले. सर्व विद्यार्थ्यानी मिळ्ूू वृक्षारोपण दिंडी काढली, त्यामध्ये सन्माननीय पाहुणे, अध्यक्ष, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. वृक्षारोपण दिंडी महाविद्यालयाच्या प्रांगणात येताच. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या समवेत सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. दोन विद्याध्थ्यानी कार्यक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षीही सुस्वरे अलविती या अभंगातून वृक्षारोपणाविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थानी एका सुरात वृक्षजोपासण्याची शाथ घेतली.
कार्यक्रमात शेवटी विद्यार्थी प्रतिनिधी संकेत गाडगीळ याने आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व प्राचार्याच्यां अनुमतीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.
दिनांक : २७ सप्टेंबर, २०१९-२०
सचिव-
अध्यक्ष
(४) माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. वेगवेगळया संस्था/कंपन्या आपले उत्पादन लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक काढत असतात. माहितीपत्रक यामुळे एकावेळी मोठ्या जनसमुदायापर्यत सविस्तर माहिती पोहोचवता येते. कमी खर्चांत, कमी वेळ्बेत अधिकाधि ग्राहकांपर्यत पोहोचणे शक्य होते. माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करीत असते. माहितीपत्रकात ‘माहिती ‘ला अधिक महत्त्व असते. त्यामुळे माहितीपत्रकाच्या हेतूशी सुसंगत माहिती ग्राहकांर्पत पोहोचवली जाते. जनमत आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रक म्हणजे पहिली पायरी असते. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद माहितीपत्रकाने साधला जातो. माहितीपत्रकामुले उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते, तर ग्राहकाला उत्पादनाचा विश्वासाई आढावा घेता येतो. माहितीपत्रक उत्पादनविषयी उतावळ्ठी निर्माण करून ग्राहकाला आपलेसे करीत असते. त्यामुळे माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरात असते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही.
विभाग ५: व्याकरण व लेखन
उत्तर ५. (अ)
(१) (i) विद्यार्यांनी संदर्भंग्रंथाचे वाचन करा.
(ii) त्याच्यासाठी हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही.
(२) (i) कारणाशिवाय-अव्ययी भाव समास
(ii) लोकांना प्रिय-विभक्ती तत्पुरुष समास
(३) (i) कर्तरी प्रयोग
(ii) कर्मणी प्रयोग
(४) अलंकाराची वैशिष्टये अलंकार
(i) अपन्हुती अलंकार
(ii) उपमेय हे गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते उपमेयाला योग्य असे उपमान मिळत नाही तर उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते
(५)
(i) मन शांत व एकरूप होणे’
बागेत ल्गवलेली गुलाबाची झाडे फुलांनी बहरलेली पाहताच माझे मन समेवर आले
(ii) मनातील गैर समज दूर होणे
विद्याध्थ्यांच्या मनात सकारात्मक विचारांचे खतपाणी घातले तर त्यांच्या मनातील मोहमायेचे मळभ दूर होऊन तिथे विवेकरूपी दीप प्रज्वलित होतो.
(आ)
“आई, मी खेळायला जाक का ?”
“इंग्रजीचे शब्द पाठ झाले का ? विज्ञानाचा धडा वाचला का ? होमवर्क पूर्ण झालं का ? उद्याचं दप्तर भरलं का ?”
आई आणि मुलं यांची ही प्रश्नोत्तरं रोज घराघरांत चाललेली असतात. यातून लक्षात येतं की, आईच्या दृष्टीने खेळ्यचा प्राधान्यक्रम सर्वांत शेवटचा आणि मुलाच्या दृष्टीने तो सर्वांत पहिला. आईला हेही माहीत असतं की, खेळ्यायला गेलेला मुलगा परत येण्याची सक्ती केल्याशिवाय मनाने येणार नाही. कारण ती त्याची मनापासूनची आवड आहे. खेळ्यात रंगून जाणं, हा त्याचा (माणसाचा) स्वभाव आहे.
इतका अग्रक्रम ज्या विषयाला असतो तो विषय बाल्यावस्थेबरोबरच संपतो. जसजशा इयत्ता वाढत जातात तसतसा खेळ खाली-खाली, शेवटी ढकलला जातो. ‘सहामाहीचे मार्क्स बघा. आतातरी खेळ कमी करा.’, ‘नुसतं खेळून परीक्षेत पास होता येत नाही.’ ‘ खेळ तुझया आयुष्याचा खेळ्खंडोबा करील.’ असं जाता-येता ऐकून घ्यावं लागतं आणि नाइलाजाने मूल खेळाला आपल्या जीवनातून हद्दपार करतं.
जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर खेळ्यचं जीवनातलं स्थान अनन्यसाधारण आहे. खेळ माणसाला तणावापासून दूर ठेवतात. जीवनातलं अपयश, दुःख, निराशा यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत देतात. त्या गोष्ट्टीकडेही खिलाड् वृत्तीने पाहायला शिकवितात. खेळ्यमुले व्यायाम घडतो. स्नायू आणि सांधे लवचीक राहतात. त्यामुळे मनाचं बळ वाढतं आणि आत्मविश्वास मिळतो.
‘बालः तावत् क्रीडासक्तः’ आद्य शंकराचार्यानी चर्पटपंजरीत आसक्त हे क्रियापद किती यथार्थ वापरलं आहे! बालपणात खेळ्गाशिवाय त्याला दुसरं काहीच नको असतं. व्यसनासारखी ती आसक्ती असते. पण त्यातून लहान मूल कितीतरी गोष्टी शिकतं आणि जगाचा अनुभव घेतं. खेळ्यातून शिक्षण इतकं सहजपणे घडतं, म्हणूनच माँटिसरीबाईनी शिक्षणपद्धतीत प्लेवेचा आग्रह धरला. सृष्टीतली रहस्यं अशा आनंददायी शिक्षणातून मुलांना समजतील असा त्यांचा विश्वास होतात.
मुलं शाळेत जाऊ लागली की, त्यांच्या खेळ्यांवर थोडी वेळेची बंधनं येतात. खेळ्ठाबरोबर अभ्यासही करावा लागतो. शाळ्ठेतही
खेळांचे तास असतात. ते ठेवण्यामागेही मुलांमध्ये संघभावना निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावं, पराभव झाला तरी तो खिलाडू वृत्तीने स्वीकारावा, दुसन्याचा विजय आनंदाने साजरा करावा अशी मनोवृत्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी हा उद्देश असतो. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्यामुळे बहुतेक शाळ्यंमध्ये खेळ्यंचं चित्र निराशाजनक दिसतं. आनंदासाठी खेळ हा विचार दुर्लक्षित होतो. एक तर स्पर्धेसाठी खेळा नाही तर खेलाच्या तासाला अभ्यास करा. असा सल्ला दिला जातो आणि एकदा का मुलगा-मुलगी दहावीला गेले की, त्यांच्या खेळ्यच्याच नक्हे तर आनंद मिळविण्याच्या सर्व वाटा बंद होतात.
महाविद्यालयातही ज्यांना खेळ्याची विशेष आवड असते अशीच मुले फक्त खेळतात. शालेय स्तरावरच बहुतेकांच्या जीवनातला खेळ संपुष्टात येतो.
क्रीडा ही एक कलाच आहे. त्यामुळे कलेचं माणसाच्या जीवनात जे स्थान आहे तेच क्रीडेचं आहे. परंतु आपल्या लोकसंख्येच्या मानाने आपल्या देशात खेळण्याच्या सुविधा अपुन्या आहेत. सुट्टीच्या दिवशी रहदारीच्या रस्त्यावर क्रिकेटचे रंगलेले डाव पाहिले की, याची कल्पना येते. खेळाची साधनं आणि मैदानं ही मुलानां, घराजवळ सहज उपलब्ध झाली पाहिजेत. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला देश ऑलिंपिक पदकात खालून तिसरा-चौथा कुठेतरी असतो. ही एकच गोष्ट खेळाला आपण किती नगण्य स्थान दिले आहे याचा पुरावा आहे. स्पर्धा संपेपर्यत त्याची चर्चा होत राहते. क्रीडासंस्कृती रुजविण्याच्या घोषणा होतात. परंतु मग पुढचं ऑलिंपिक येईपर्यत सारं कसं शांत-शांत असतं!
भारतात क्रिकेटचं वेड फार आहे. त्यामुळे त्यापेक्षा अवघड, अधिक कौशल्य आवश्यक असणान्या खेळ्रांचीदेखील प्रचंड उपेक्षा होते. ज्या खेळ्यांमध्ये कमी गुंतवणुक करावी लागते, असे खो-खो, कबड्डी आणि देशी खेळ यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.
‘खेळ’ या विषयाच्या अनुषंगाने असे अनेक विचार मनात येतात. कारण त्याचं जीवनातलं महत्त्वच तेवढ़ं आहे. या जीवनालासुद्धा परमेश्वराची क्रीडा म्हटलं जातं, ते काही उगीच नाही.
२. महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
महात्मा जोतीबा गोविंदराव फुले हे एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसुधारक होते. समाजपरिवर्तनाच्या चळवळ्ठीचा पाया त्यांनी घातला. मानवी समानतेचा पुरस्कार करणारी आणि जातिभेद व धर्मभेद यांना धिक्कारणारी विचारसरणी जोतीरावांनी आवेशाने सांगितली. समाजातील कनिष्ठ वर्गाच्या आर्थिक व सामाजिक शोषणाविरुद्ध त्यांनी लढा दिला. समाजात अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे ते पहिले उद्धारक होते.
महात्मा फुले यांचा जन्म १८२७ साली माळ्ठी समाजातील गोने यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले, शाळेत घातले. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. परंतु घरून विरोध झाला. मार्गात अनंत अडचणी आल्या तरीही जोतीरावांनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले.
‘ज्ञान ही एक शक्ती आहे’ अशी ठाम श्रद्धा बाळगणाय्या जोतीरावांनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे.
“विद्येंविना मति गेली। मतीविना नीति गेली।। नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले।।
(२) (i) कारणाशिवाय-अव्ययी भाव समास
(ii) लोकांना प्रिय-विभक्ती तत्पुरुष समास
(३) (i) कर्तरी प्रयोग
(ii) कर्मणी प्रयोग
(४) अलंकाराची वैशिष्टये अलंकार
(i) अपन्हुती अलंकार
(ii) उपमेय हे गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते उपमेयाला योग्य असे उपमान मिळत नाही तर उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते
(५)
(i) मन शांत व एकरूप होणे’
बागेत ल्गवलेली गुलाबाची झाडे फुलांनी बहरलेली पाहताच माझे मन समेवर आले
(ii) मनातील गैर समज दूर होणे
विद्याध्थ्यांच्या मनात सकारात्मक विचारांचे खतपाणी घातले तर त्यांच्या मनातील मोहमायेचे मळभ दूर होऊन तिथे विवेकरूपी दीप प्रज्वलित होतो.
(आ)
“आई, मी खेळायला जाक का ?”
“इंग्रजीचे शब्द पाठ झाले का ? विज्ञानाचा धडा वाचला का ? होमवर्क पूर्ण झालं का ? उद्याचं दप्तर भरलं का ?”
आई आणि मुलं यांची ही प्रश्नोत्तरं रोज घराघरांत चाललेली असतात. यातून लक्षात येतं की, आईच्या दृष्टीने खेळ्यचा प्राधान्यक्रम सर्वांत शेवटचा आणि मुलाच्या दृष्टीने तो सर्वांत पहिला. आईला हेही माहीत असतं की, खेळ्यायला गेलेला मुलगा परत येण्याची सक्ती केल्याशिवाय मनाने येणार नाही. कारण ती त्याची मनापासूनची आवड आहे. खेळ्यात रंगून जाणं, हा त्याचा (माणसाचा) स्वभाव आहे.
इतका अग्रक्रम ज्या विषयाला असतो तो विषय बाल्यावस्थेबरोबरच संपतो. जसजशा इयत्ता वाढत जातात तसतसा खेळ खाली-खाली, शेवटी ढकलला जातो. ‘सहामाहीचे मार्क्स बघा. आतातरी खेळ कमी करा.’, ‘नुसतं खेळून परीक्षेत पास होता येत नाही.’ ‘ खेळ तुझया आयुष्याचा खेळ्खंडोबा करील.’ असं जाता-येता ऐकून घ्यावं लागतं आणि नाइलाजाने मूल खेळाला आपल्या जीवनातून हद्दपार करतं.
जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर खेळ्यचं जीवनातलं स्थान अनन्यसाधारण आहे. खेळ माणसाला तणावापासून दूर ठेवतात. जीवनातलं अपयश, दुःख, निराशा यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत देतात. त्या गोष्ट्टीकडेही खिलाड् वृत्तीने पाहायला शिकवितात. खेळ्यमुले व्यायाम घडतो. स्नायू आणि सांधे लवचीक राहतात. त्यामुळे मनाचं बळ वाढतं आणि आत्मविश्वास मिळतो.
‘बालः तावत् क्रीडासक्तः’ आद्य शंकराचार्यानी चर्पटपंजरीत आसक्त हे क्रियापद किती यथार्थ वापरलं आहे! बालपणात खेळ्गाशिवाय त्याला दुसरं काहीच नको असतं. व्यसनासारखी ती आसक्ती असते. पण त्यातून लहान मूल कितीतरी गोष्टी शिकतं आणि जगाचा अनुभव घेतं. खेळ्यातून शिक्षण इतकं सहजपणे घडतं, म्हणूनच माँटिसरीबाईनी शिक्षणपद्धतीत प्लेवेचा आग्रह धरला. सृष्टीतली रहस्यं अशा आनंददायी शिक्षणातून मुलांना समजतील असा त्यांचा विश्वास होतात.
मुलं शाळेत जाऊ लागली की, त्यांच्या खेळ्यांवर थोडी वेळेची बंधनं येतात. खेळ्ठाबरोबर अभ्यासही करावा लागतो. शाळ्ठेतही
खेळांचे तास असतात. ते ठेवण्यामागेही मुलांमध्ये संघभावना निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावं, पराभव झाला तरी तो खिलाडू वृत्तीने स्वीकारावा, दुसन्याचा विजय आनंदाने साजरा करावा अशी मनोवृत्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी हा उद्देश असतो. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्यामुळे बहुतेक शाळ्यंमध्ये खेळ्यंचं चित्र निराशाजनक दिसतं. आनंदासाठी खेळ हा विचार दुर्लक्षित होतो. एक तर स्पर्धेसाठी खेळा नाही तर खेलाच्या तासाला अभ्यास करा. असा सल्ला दिला जातो आणि एकदा का मुलगा-मुलगी दहावीला गेले की, त्यांच्या खेळ्यच्याच नक्हे तर आनंद मिळविण्याच्या सर्व वाटा बंद होतात.
महाविद्यालयातही ज्यांना खेळ्याची विशेष आवड असते अशीच मुले फक्त खेळतात. शालेय स्तरावरच बहुतेकांच्या जीवनातला खेळ संपुष्टात येतो.
क्रीडा ही एक कलाच आहे. त्यामुळे कलेचं माणसाच्या जीवनात जे स्थान आहे तेच क्रीडेचं आहे. परंतु आपल्या लोकसंख्येच्या मानाने आपल्या देशात खेळण्याच्या सुविधा अपुन्या आहेत. सुट्टीच्या दिवशी रहदारीच्या रस्त्यावर क्रिकेटचे रंगलेले डाव पाहिले की, याची कल्पना येते. खेळाची साधनं आणि मैदानं ही मुलानां, घराजवळ सहज उपलब्ध झाली पाहिजेत. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला देश ऑलिंपिक पदकात खालून तिसरा-चौथा कुठेतरी असतो. ही एकच गोष्ट खेळाला आपण किती नगण्य स्थान दिले आहे याचा पुरावा आहे. स्पर्धा संपेपर्यत त्याची चर्चा होत राहते. क्रीडासंस्कृती रुजविण्याच्या घोषणा होतात. परंतु मग पुढचं ऑलिंपिक येईपर्यत सारं कसं शांत-शांत असतं!
भारतात क्रिकेटचं वेड फार आहे. त्यामुळे त्यापेक्षा अवघड, अधिक कौशल्य आवश्यक असणान्या खेळ्रांचीदेखील प्रचंड उपेक्षा होते. ज्या खेळ्यांमध्ये कमी गुंतवणुक करावी लागते, असे खो-खो, कबड्डी आणि देशी खेळ यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.
‘खेळ’ या विषयाच्या अनुषंगाने असे अनेक विचार मनात येतात. कारण त्याचं जीवनातलं महत्त्वच तेवढ़ं आहे. या जीवनालासुद्धा परमेश्वराची क्रीडा म्हटलं जातं, ते काही उगीच नाही.
२. महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
महात्मा जोतीबा गोविंदराव फुले हे एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसुधारक होते. समाजपरिवर्तनाच्या चळवळ्ठीचा पाया त्यांनी घातला. मानवी समानतेचा पुरस्कार करणारी आणि जातिभेद व धर्मभेद यांना धिक्कारणारी विचारसरणी जोतीरावांनी आवेशाने सांगितली. समाजातील कनिष्ठ वर्गाच्या आर्थिक व सामाजिक शोषणाविरुद्ध त्यांनी लढा दिला. समाजात अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे ते पहिले उद्धारक होते.
महात्मा फुले यांचा जन्म १८२७ साली माळ्ठी समाजातील गोने यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले, शाळेत घातले. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. परंतु घरून विरोध झाला. मार्गात अनंत अडचणी आल्या तरीही जोतीरावांनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले.
‘ज्ञान ही एक शक्ती आहे’ अशी ठाम श्रद्धा बाळगणाय्या जोतीरावांनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे.
“विद्येंविना मति गेली। मतीविना नीति गेली।। नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले।।
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
स्त्री-शद्वांनी शिक्षण घेतले तरच त्यांच्यातील मानसिक गुलामगिरी नाहीशी होईल व त्यांची उन्नती होईल. या विचाराने जोतीबांनी मुलींसाठी शाळा स्थापन केल्या, प्रौढांसाठी रात्रीचे वर्ग काढले. पाच हजार वर्षाच्या भारताच्या इतिहासात मुलींसाठी शाव्ध स्थापन करणारे पहिले भारतीय म्हणजे महात्मा फुले हे भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक म्हणून ओळ्खले जातात.
१८४८ साली जोतीबांनी पुण्यातील बुधवार पेठेत पहिली मुलींची शाळ्ा काढली. १८५? साली रास्ता पेठेत मुलींची दुसरी तर १८५२ साली मुलींची तिसरी शाळ्ठ सुरू केली. मुलींना शिकविण्यासाठी स्त्री-शिक्षका म्हणून त्यांनी आपल्या पलीला-सावित्रीबाईना तयार केले. स्त्री-शिक्षणाला अनुकूल नसलेल्या समाजाचा प्रचंड रोष या पतिपत्नीला सहन करावा लागला. सावित्रीबाईंचा या शाळेत जाता-येता छळ झाला. तसेच जोतीरावांच्या वडिलांनी जोतीरावांना व सावित्रीबाईना घराबाहेर काढले.
२८६० साली महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणेचे आणखी एक पाऊल टाकले. विधवा केशवपनास विरोध आणि त्यांचा पुनर्विवाह ही ती सुधारणा होय. २८६० व १८६४ साली जोतीरावांनी शेणवी विधवेचा विवाह लावला. तसेच १८६३ साली त्यांनी बालहत्याप्रतिबंधकगृह काढले. दलितांना पाणी भरण्यासाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. ब्राह्मण म्हणजे भूदेव ही त्या काळ्यतील सामान्य माणसाची श्रद्धा होती. मुलाच्या जन्मापासून त्याच्या निधनानंतर त्याच्या दहाव्यापर्यंत ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागत असे. त्याशिवाय माणसाला मोक्ष मिळणार नाही अशी त्या काळ्यत ठाम समजूत होती. या ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध आणि मानसिक गुलामगिरीविरुद्ध ‘ब्र’ काढण्याची कुणाचीही हिंमत नव्हती या काळ्यत जोतीबांनी समाजक्रांतीचे निशाण फडकवले.
१८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली. विद्या, सत्य आणि सत्रील यांचाच सदैव आग्रह धरला. हजारो अनुयायी घडवले. डॉ. कीर व डॉ. मालरो यांनी ‘महात्मा फुले-समग्र वाड्मय’ या ग्रंथात म्हटले आहे की, “ही चळवळ म्हणजे खेडुतांना शिक्षण नि ज्ञान देऊन त्यांच्या ठायी बसत असलेली अज्ञानादि पूर्वग्रहांची जळमटे झटकून टाकून आधुनिक संस्कृतीचे आणि ज्ञानाचे लोण त्यांच्यापर्यत पोहोचविणारी एक सामाजिक प्रबोधिनी होती.” पारंपरिक धार्मिक गुलामगिरीतून समाजाला मानसिक मुक्ती मिळवून देण्याचे कार्य या संस्थेतर्फे केले गेले.
महात्मा फुले यांनी ते या काव्यत ‘तृतीय रल’ ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकच्यांचा आसूड’, ‘सत्सार-२’, ‘सत्सार-१ ‘, ‘अस्पृश्यांची कैफियत’ व ‘ सार्वजनिक सत्यधर्म’ ही पुस्तकें लिहिली. आपले क्रांतिकारी विचार त्यांनी त्यांच्या वाड्मयातून पददलितांपर्यत पोहोचविले. ‘ शेतकन्याचा आसूड’ या ग्रंथात शेतन्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी काही विधायक उपायही सुचवले आहेत. शंभर वर्षापूर्वीचे हे मौलिक विचार आजही लागू पडतात. यावरून जोतीरावांचे अलौकिक द्रष्टेपण दिसून येते.
लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात त्याप्रमाणे “हे विचार भारतातील लोकशाहीच्या क्रांतीच्या अग्रदूताचे विचार होत. सर्व मानवांचे जे जीवन व्यक्तिस्वातंत्य आणि समता यांनी भरलेले आहे ते सामाजिक जीवन हेच पृथ्वीवरील ईश्वराचे राज्य होय.”
अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर जोतीराव झगडत राहिले. विद्या, सत्य व सत्रील यांचाच सदैव आग्रह धरला. म्हणूनच जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना ‘ महात्मा’ म्हणून गौरवले. अशा या थोर समाजसुधारकाची प्राणज्योत २८ नोर्केबर, १८९० रोजी मावळली. सामाजिक न्याय, बंधुभाव, सामाजिक समता या शाश्वत मूल्यांची देणगी समाजाला देऊन हा महापुरुष काळ्ठाच्या पड्यद्याआड गेला. जोतीराव गेले, पण त्यांच्या महान कार्याने ते अमर झाले.
13. ३. अंधश्रद्धांचे थैमान
‘नजीकच्या काळ्यात शनी वक्री होत असून त्याचा वाईट प्रभाव आपल्या राशीवर पडून आपल्याला वाईट फळे मिळणार आहेत.’ ज्योतिषाच्या या भाकितावर विश्वास ठेवून, घाबरून एका गृहस्थाने स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची जीवनयात्रा संपवली. वृत्तपत्रात आलेल्या या बातमीवरून समाजमनावर अंधश्रद्धेचा किती जबरदस्त पगडा आहे हेच दिसून येते. बुवा, साधू, महंत, महाराज यांच्याकड्न फसवल्या गेलेल्या तरुण-तरुणींच्या शोकांतिकेच्या दुःखद वार्ता सतत आपल्या कानांवर येतात. माणसांचा दुःखद अंत करणारी अंधश्रद्धेची विषवल्ली समाजात सर्व ठिकाणी किती खोलवर पसरलेली आहे याचा प्रत्यय आपल्याला ठायी-ठायी येतो.
आज एकविसाव्या शतकात एकीकडे नवनवीन शोध लागून विज्ञान क्षेत्रात प्रगतीची घोडदौड सुरू असताना दुसरीकडे आपला समाज मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी न बाणता अंधश्रद्धेच्या घोर अंधारातच चाचपडत आहे. अंधश्रद्धा हा आपल्या समाजाला मिळालेला शाप आहे.
तथाकथित बुवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवणे, देवाला केलेला नवस फेडण्यासाठी पळ्ळत येऊन मंदिराच्या दगडी भिंतीवर टक्कर देऊन डोके फोड्न घेणे, पाठीच्या कातडीतून धारदार गळ आरपार घालून घेणे, बैलगाडीवर ठेवलेल्या काठीवरच्या बगाडाला टांगून सकाळपासून संध्याकाळपर्यत ती बैलगाडीवर ठेवलेल्या काठीवरच्या बगाडाला टांगून सकाळपासून संध्याकाळपर्यत ती बैलगाडी पळ्वत नेणे, नवस फेडण्यासाठी हजारोंच्या संख्येने देवापुढे बोकड मारून रक्तमांसाचा चिखल करणे, आगीवरून चालणे, धुळ्ठीत लोटांगणे घालत देवळ्ठाला प्रदक्षिणा घालणे, गणपतीपुढ़ील यज्ञात लक्ष मोदकांची आहुती देणे, केसात जट निर्माण झाली की त्या मुलीचा देवदासीत समावेश करणे, पोटी मुलगा आला नाही, मरणोत्तर क्रियाकमें त्याच्याकड्न घडली नाहीत तर स्वर्गाचे दार खुले होत नाही ही समजूत, शुभकार्यात विधवेचे पांढरे पाऊल न पडेल याची दक्षता घेणे, देवाच्या मूर्तीवर शेकडो लीटर दही, दूध, तूप, मध यांचा वर्षाव करणे अशासारख्या असंख्य अंधश्रद्धा समाजात मूळ धरून आहेत.
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवणजवळच्या जंगलात सात जणांचा निर्घुण संहार करण्यात आला. मुलगा व्हावा म्हणून बालकांचा बळ्ठी देण्याच्या घटना तर वारंवार ऐकायला मिळ्तात. मध्यंतरी केरळमध्ये एक भलामोठा पुत्रकामेष्ठी यज्ञाला. २००८ जोडन्यांनी हा यज्ञा केला व शेकडो टन शुद्ध तूप, उत्तम तांदूळ व लाकूड यज्ञासाठी वापरले गेले. समाजात अंधश्रद्धा कशी फोफावली आहे याची अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. ग्रह, तारे, ग्रहण या सगक्या गोष्टींची शास्त्रीय माहिती आज विज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे तरीदेखील ग्रहणकाल हा अशुभ असतो, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये यासारख्या अंधश्रद्धा असूनही समाजात मूळ धरून असल्याचे दिसते.
अंधश्रद्धा या केवळ अशिक्षित किंवा अल्पशिक्षितांतच असतात असे नाही तर उच्चशिक्षित व स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवणारी कित्येक उच्चपदस्थ माणसेही अंधश्रद्धा असे आचरण करताना दिसतात. १९९२ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, पावसाने ओढ दिली होती. तेव्हा प्रत्यक्ष राज्यपालांनी आवाहन केले की, ‘अमुक दिवशी सकाठी ११ वाजता पावसासाठी सर्वानी प्रार्थना करावी, करुणा भाकावी.’ प्रार्थनेचे आवाहन करताना राज्यपाल आणि ते पाळणारे सर्व जण नेमकी एक मुद्दयाची गोष्ट विसरले की दुष्काळ्ठाे प्रमुख कारण पावसाने दिलेला हिसका हे नाही तर महाराष्ट्राने पाण्याचा वापर नियोजनशून्यतेने, अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केला हे आहे आणि त्यावर प्रार्थना हा उपाय नाही.
अंधश्रद्धांचे प्रमाण वाढतच असल्याचे आढब्ून येते. सध्याचा समाज अनेक ताणतणाव, दहशतवादाचे सावट इत्यादी समस्यांमुळे अस्थिर, भयग्रस्त झालेला आहे. वाढती लोकसंख्या, वाढते अपघात यामुळे आणखी समस्या निर्माण होते आहे. एकट्या मानवाची शक्ती विश्वातील भयानकतेला अपुरी पड्णारी आहे याची जाणीव माणसाला अंधश्रद्धेकडे नेते. स्वतःच्या अगतिकतेतून, शोषणातून, अस्थिरतेतून मनाला प्रासंगिक दिलासा देण्यासाठी अंधश्रद्धेचा भ्रामक पण हवाहवासा वाटणारा आधार माणसे घेतात. पण अंतिमतः तो माणसाला अधोगतीला नेणारा असतो.
अंधश्रद्धेची ही व्याधी नष्ट करायची असेल तर सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या हजारो संस्था या कार्यासाठी पुढे यायला हव्यात. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार समाजात करायला हवा. घटनेचा तर्कशुद्ध विचार करावयाचा, त्याला प्रयोगाची जोड देऊन मगच जरूर ते निष्कर्ष काढायचे. अशा पद्धतीने अनुभवाचा अर्थ लावण्याची कुवत निर्माण करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे व अंधश्रद्धा निर्मूलन करणे. १९७५ साली इंदिरा गांधींनी घटनादुरुस्ती करून नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हा भाग समाविष्ट केला. या कर्तव्यांच्या यादीत शास्त्रीय दृष्टिकोनाचा मानवतावादी विचारांचा विकास करणे, चौकस बुद्धी वाढविणे यासाठी मनोवृत्ती सजग ठेवणे हे भारतीय नागरिकांचे प्रमुख कर्तव्य मानले आहे. प्रत्येक नागरिकाने जागरूकतेने कर्तव्य पालन केले पाहिजे. मानवी मूल्ये सर्वश्रेष्ठ मानून जगले पाहिजे. म्हणजे मग अंधश्रद्धांचे थैमान आपोआपच लयास जाईल व निकोप अशा विज्ञाननिष्ठ प्रगत समाजाच्या निर्मितीस सुरुवात होईल.
४.मी रेडिओ बोलतोय…
“नमस्कार मंडळ्ठी, ओळखलत का मला ? हे काय? तुमच्या चेहन्यावर चक्क प्रश्नचिन्ह दिसतय. म्हणजे ओक्ठखलं नाहीत तर! काय म्हणताय, आवाज ओळखीचा वाटतोय. अहो नुसतं ओळखीचा वाटतोय असं काय म्हणताय, आठवा बरं जरा कोणाचा आवाज आहे ते. साधारण पंचवीस वर्षापूर्वी सकाळच्या मंगलसमयी माझे गोड सूर घराघरातून ऐक यायचे. तसेच व्हायोलीनची सुंदर धून ऐकूनच नवीन आशांनी भरलेला तुमचा नवा दिवस सुरू व्हायचा आणि ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना घेऊन, रात्री आपल्या आवडीची मधुर गीते ऐकत ऐकतच तुम्ही निद्रादेवीच्या अधीन होत होता. ‘आपली आवड’ म्हटल्यावर आता तर नक्कीच तुम्ही ओळखलं असेल मी कोण ते! माइयावरून प्रसारित होणान्या सुमधुर हिंदी-मराठी गाण्यांनी ज्यांचे तारुण्याचे दिवस मंत्रमुगध झाले त्या बुजुर्ग मंडळींना तर माझी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.”
आँ? काय म्हणालात ? हो हो तोच मी. अगदी बरोबर ओळखलत मला. आहे मीच तो तुमचा एकेकाळचा सखा रेडिओ! आजकाल तुमच्यापैकी बन्याच जणांना माझा विसर पडला आहे. दूरचित्रवाणीचे आगमन झाले अन् तुम्ही सर्व जण तच्या झगमगाटात इतके गुंतून गेलात की एकेकाळच्या तुमच्या सख्याचा आवाजही तुम्हाला ओळखू येईना! जाऊ घ्या, कालाय तस्मै नम: पण मी तुम्हाला सांगतो की, माझे कार्यक्रम अधिक जोमाने सुरू आहेत. त्यांची व्याप्ती आणि विषयांचे वैविध्यही वाढले आहे.
माझा आवाज लहरींच्या रूपाने हवेतून तुमच्यापर्यत येतो. म्हणून तुम्ही मला आकाशवाणी, नभोवाणी असे संबोधता आणि माझे ब्रीदवाक्य आहे, ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’, समाजशिक्षण, समाजप्रबोधन, समाजाची वैचारिक, सांस्कृतिक उन्नती हेच माइया कार्यक्रमांमागचे मुख्य प्रयोजन आहे.
तुम्हाला ठाऊक आहे का ? भारताच्या स्वातंत्यलढयात मी केवढी मोठी कामगिरी केली आहे. सन् १९४२ च्या ‘ चले जाव’ लढ्याच्या वेळी अनेक कार्यकर्तें भूमिगत झाले होते व त्यांनी स्वतः चे नभोवाणी केंद्र चालवले होते. नेताजी सुभाषचंद्रांनी ‘ चलो दिल्ली’ चा संदेश जनतेला माइयाच माध्यमातून दिला.
तुम्ही शहरातले लोक मला विसरत चाललाय याचा खेद वाटतोय खरा. पण आशेचा किरण अजूनही आहे तो ग्रामीण भागात. शेतावरून दमून-भागून आलेले शेतकरी दादा जेव्हा भजन, कीर्तन असे माझे कार्यक्रम ऐकण्यात रंगून जातात व त्यामुळे त्यांचे श्रम हलके होतात तेब्हा मला मनापासून आनंद होतो. रानावनात एकटाच हिंडणारा गुराखी सुमधुर गीते, बातम्या, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकतो तेव्हा त्याचे या विश्वासी चटकन नाते जोडले जाते. तेव्हा मला समाधान होते.
कृषिप्रधान भारतीय समाजातील ग्रामीण जनतेशी अनेकविध उपयुक्त कार्यक्रमांद्वारे आकाशवाणी संपर्क राखते. चालू जमाना, माझं घर, माझं शेत, कृषिसल्ला, शेतीतील नवीन प्रयोगांची माहिती अशा अनेकविध कार्यक्रमांमुळे आकाशवाणीची ग्रामीण भागाशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. बालसंगोपन, आरोग्य शिक्षण याविषयीची जी थोडीफार जागृती ग्रामीण व आदिवासी भागात होत आहे ती आकाशवाणीवरील कार्यक्रमांमुळेच होय.
आकाशवाणी आणि संगीत यांचं नातं तर अतूट असं आहे. रेडिओवरील संगीताचे कार्यक्रम सामान्यांना चटकन आपलेसे करतात तर गानरसिक श्रोत्यांना आणि कलावंतांना आनंदाच्या खजिन्याची गुहाच उघडून देतात. आकाशवाणीच्या संग्रहातील अवीट गोडीची जुनी गाणी, शास्त्रीय संगीत तसेच वाद्यसंगीत म्हणजे आपल्या गानसंस्कृतीचा अमोल अक्षय असा ठेवाच!
महाराष्ट्राचे वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या साजाने अजरामर झालेले गीतरामायण सर्वप्रथम प्रसारित झाले ते रेडिओवरूनच! त्यावेळेला गीतरामायणाचा कार्यक्रम सुरू होण्याआधी लोक मला हार घालून माझीच भक्तिभावाने पूजा करत असत.
उत्तमोत्तम साहित्यकृतींची नाह्यरूपांतरे सादर करून मी सर्वसामान्यांना वाड्मयाभिमुख बनवतो तर साहित्य रसिकांना भरभरून आनंद देतो.
महिलांच्या भावविश्वाचा, साहित्यउर्मीचा, कर्तृत्वाचा तसेच प्रगतीच्या नव्या वाटांचा शोध महिलांच्या कार्यक्रमात घेऊन महिलांच्या मनात आकाशवाणीने हक्काचे घर प्रस्थापित केले.
खया अर्थने समृद्ध सहजीवन कसे जगावे हे सांगताना पती-पत्नीमधील समृद्ध सहजीवन, पालक आणि मुलं यांच्यातला सुसंवाद, भावी जोडीदाराबद्दलच्या नवीन पिढीच्या उचित अशा अपेक्षा यासारख्या विषयांवर तज्ञांच्या चर्चा माझ्या कार्यक्रमातून होतात. त्या खरोखरच मार्गदर्शक असल्याचा अभिप्राय श्रोत्यांकड्न मिळ्याल्यावर मला संतोष होतो, घटस्फोट, बालगुन्हेगारी, कैद्यांचे मानसशास्त्र अशांसारख्या मानसशास्त्रीय आणि सामाजिक प्रश्नांवरचेही तज्ञांचे विचारमंथ श्रोत्यांना उपयुक्त ठरते. मुला-मुलींना वाढविताना भेद करू नये, स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होण्याच्या दिशेने प्रयलशील राहिले पाहिजे हा महत्त्वाचा विचार तर माझया अनेक कार्यक्रमांतून जनमानसात सातत्याने रुजवण्याचा प्रयल्न होतो.
लोकाभिमुखता हे माइया कार्यक्रमांचे एक वैशिष्टयच आहे. गण, गवळण, भारूड, धनगरी ओव्या गाणारे गायक, पारंपरिक वाद्य वाजवणारे वादक यांच्या लोकसंगीताचा मनोरम आविष्कार माझया कार्यक्रमातून होतो. सामान्यांच्या असामान्य कलेची, त्यांच्या मतांची तसेच त्यांच्या प्रश्नांची दखल माइया कार्यक्रमातून घेतली जाते. तेव्हा माझं ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य सार्थ झाल्याचं समाधान मला वाटतं.
तुमच्या कार्यक्रमात बाधा न आणता तुमचं मनोरंजन, उद्बोधन करण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता माइयात आहे. तुमचा एकटेपणा दूर करण्याची जादू माइयात आहे. तुम्ही तुमच्या मित्राशी जसे हितगुज करता अगदी त्याप्रमाणेच मी तुमच्याशी हितगुज करतो आणि मी तुमच्याबरोबर कुठेही येऊ शकतो. हा आणखी एक फायदा.
कार्यक्रमात कोणताही भडकपणा, अतिरंजितपणा न आणता प्रेम, दया, करुणा, सहकार्य अशा मानवी मूल्यांचे संस्कार करणे, (ज्याची आज समाजाला नितांत गरज आहे.) हेच तर माझे उद्दिष्ट आहे आणि यासाठी मला तुमची निरंतर साथ हवी आहे. द्याल ना मला साथ ?
14. ५. गप्पा मारण्याचे व्यसन
एकदा मी कर्णबधिर मुलांच्या मंडव्यत गेले होते. त्यांच्यापैकीच एक मुलगा सापांबद्दल काही माहिती सांगणार होता. पण सगळे महिन्याभरांनी भेटलेले मित्र एकमेकांशी गप्पा मारण्यात इतके गुंतले होते की, त्याच्याकडे कोणाचं लक्षच जाईना! बरं ओरडून, काहीतरी आवाज करून लक्ष वेधावं तर त्याचा काही उपयोग नव्हता, कोणालाही बोलायला आणि ऐकायला येत नक्हतं, तरी हावभावांनी, खाणाखुणांनी त्यांच्या जिवाभावाच्या मित्रांशी गप्पा मात्र रंगल्या होत्या. शेवटी त्याने लाईटच्या बटणाची उघडझाप केली आणि आपल्याकडे लक्ष वेधलं.
अबोल माणसांची ही कथा तर मग बोलणाया गप्पांबद्दुल काय बोलावं ? माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला दुसन्याशी अनेक मार्गानी संवाद साधायला आवडतो. माणसाला भाषा अवगत असल्यामुळे दोन माणसं एकत्र आली की त्यांच्या गप्पा सहज रंगतात.
काहींना तर सारखं बोलायला आवडतं, गप्पांचं त्यांना व्यसनच असतं. असं वाटतं की या लोकांचं तोड चामड्याचं असतं तर फाटून गेलं असतं. आपलं बोलणं दुसन्याला ऐकायचं आहे की नाही, त्यात त्याला रस वाटतो आहे की नाही याचा विचार ते करत नाहीत. त्यांचे विषय तरी काय असतात? उठल्यापासून मी काय-काय केलं? तोच तो कंटाळवाणा विषय. काहींच्या बोलण्यात नुसती दुसन्याची टिंगल-टवाळी, स्वतःबद्दलची प्रौढी आणि स्वतःला सर्व काही समजतं असा भाव. अशा, लोकांशी गप्पा करणं म्हणजे शिक्षा वाटते. लोक त्यांना टाळतात. त्यांच्यापासून लांब राहतात किंवा त्यांचं बोलणं मध्येच तोडून टाकतात. पण ते या व्यसनाच्या इतके आहारी गेलेले असतात की, त्यांना अपमानही कळ्ञत नाही.
काही व्यक्तीचं बोलणं मात्र श्रवणीय असतं. त्यांच्या सहज गप्पाही तर्कशुद्ध, स्पष्ट विचार व्यक्त करतात. अनुभवांची गाठोडी त्यातून उलगडतात. कधी एखाद्या राजकीय, सामाजिक घटनेवर किंवा कधी वाचलेल्या पुस्तकावर ते मतप्रदर्शन करतात तेब्हा आपणही विचारसमृद्ध होतो. अशा व्यक्तींना थोडं बोलतं करून ऐकत राहणं हा एक आनंद असतो.
गप्पांतून माणूस सहज व्यक्त होतो. तो जसा आहे तसा कळ्ठो. विरंगुळ्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, मार्गदर्शन मिळविण्यासाठी माणसं गप्पा मारतात. गप्पांमुळे चित्त हलकं, होतं. खेड्यातले वड, पिंपळांचे पार, देवळं, नदीकाठ, समुद्रकाठ, कॉलेजकट्टे, बागा हे वेगवेगक्या वयोगटातल्या माणसांचे गप्पांचे अड्डे ओसंड्न चाललेले असतात.
आज तर फोन आणि मोबाईलमुळे एकमेकांना न भेटताही गप्पा मारता येतात. त्यात एसएमएसच्या लिखित गप्पांचीही भर पडली आहे. गप्पांचं व्यसन असणारी माणसं या सगळ्या गोष्ट्टींचा अवलंब करतातच. पण एखादा माणूस त्यांच्या तावडीत सापडला की, ते त्यांना हवं आणि नको असलेलं सारं ऐकवितात. त्यांनी कितीही वेळा घड्याळ्ठकडे पाहिलं तरी ते त्यांना सोडत नाहीत. समोरच्या माणसाची मोठी कठीण परिस्थिती होते. त्यातच झोप आली असेल तर त्याचं रागात रूपांतर होतं. म्हणून गप्पा मारताना वेळेचं भान, मनावर संयम, आपल्या बोलण्यामुळे कोणात गैरसमज होणार नाहीत ना याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण शब्द हे एक शस्त्रही आहे, म्हणूनच ते जपून वापरलं पाहिजे.
या शस्त्राचा विधायक उपयोगही होतो. रविकिरणमंडळाची निर्मिती अनेक कवीलेखकांच्या साहित्यिक गप्पांतूनच झाली. एखाद्या मोठ्या माणसाला मुलाखतीद्वारे बोलतं करून त्याच्याशी गप्पा मारत त्याच्या जीवनकार्याविषयी माहिती करून देणारी गप्पष्टकं खूपच रंगताना आपण पाहतो-ऐकतो. त्यातून ऐकणान्या गप्पा असोत की विवाहासाठी मुली पाहताना किंवा नोकरीसाठी मुलाखत घेताना मारलेल्या हवा-पाण्याच्या गप्पा असोत, त्या आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत.
आजकाल या कम्युनिकेशन स्किलला खूपच महत्त्व आहे. लोकांना बोलतं करणं, त्यांना हव्या त्या विषयावर बोलायला लावणं, सूचक प्रश्न विचारणं, यात करिअर करणंसुद्धा आज शक्य आहे. तेन्हा गप्पांची आवड असणाय्या लोकांना आता आपल्या गप्पा कॅशही करता येणार आहेत.