MARCH 2020
HISTORY AND POLITICAL SCIENCE
इतिहास
प्रश्न १.
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
१. आधुनिक इतिहासाचा जनक ‘…………… यास म्हणता येईल.
(अ) व्हॉल्टेअर
(ब) रेने देकार्त
(स) लिओपोल्ड रांके
(द) कार्ल मार्क्स
२. विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची …………………….. ही जननी मानली जाते.
(अ) तत्त्वज्ञान
(ब) नीतिशास्त्र
(स) इतिहास
(द) मानववंशशास्त्र
३. महाबळेश्वरजवळील भिंलार हे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
(अ) वनस्पतींचे
(ब) आंब्याचे
(स) पुस्तकांचे
(द) किल्लयांचे
(ब) पुढीलयैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून ल्हिए.
१. (i) वि. का. राजवाडे मराठ्यांच्या इतिहासाची साधने
(ii) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर – द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स ( 1857 चे स्वातंत्र्य समर)
(iii) पंडिता रमाबाई स्त्री-पुरुष तुलना
(iv) महात्मा फुले गुलामगिरी
२. (i) दर्पण बाळशास्त्री जांभेकर
(ii) केसरी बाळ गंगाधर टिळक
(iii) दीनबंधू गोपाळ हरी देशमुख
(iv) प्रभाकर भाऊ महाजन
३. (i) लेणी माथेरान, चिखलदरा
(ii) रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
(iii) अभयारण्य दाजीपूर
(iv) नैसर्गिक वारसा पश्चिम घाट व तेथील कास पठार
उत्तर १ :
(अ) १. १. (अ) क्लॉल्टेअर २. (अ) तत्त्वज्ञान ३. (स) पुस्तकांचे
(ब) १. चुकीची जोड़ी : पंडिता रमाबाई – स्त्री-पुरुष तुलना
योग्य जोड़ी : पंडिता रमाबाई – द हाय कास्ट हिंदू वुमन
२. चुकीची जोड़ी : दीनबंधू — गोपाळ हरी देशमुख
योग्य जोड़ी : दीनबंधू— कृष्णराव भालेकर
३. चुकीची जोड़ी : लेणी — माथेरान, चिखलदरा
योग्य जोड़ी : लेणी- घारापुरी (एलिफंटा लेणी)
प्रश्न २.
(अ) पुरील आकृतिबंध पूर्ण करा.
१.
पश्चिम घाट |
|
२. पुढ्ठील संकल्पना चित्र पूर्ण करा.
(ब) थोडक्यात टिपा लिहा. ( कोणत्याही दोन ) :
१. स्त्रीवादी इतिहास
२. मनोरंजनाची आवश्यकता
३. खेळांचे महत्त्व
उत्तर २ :
(अ) १.
पश्चिम घाट |
| केवल देव राष्ट्रिय उद्यान | |||
मानस वन्यजीव अभयारण्य | नंदादेवी आणि वैली ऑफ फ्लॉवर्स | ||||
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान | वारसास्थळ | काझीरंगा राष्ट्रीय उद्यान |
२.
(ब) १. स्त्रीवादी इतिहासलेखनाची भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोक्हा यांनी मांडली. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना स्त्रीवादी इतिहासलेखनाची भूमिका आहे. स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचादेखील पुनर्विचार करण्यावर भर देण्यात आला. पुढील काळात स्त्रियांशी संबंधित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांसाठी काम करणाया संस्था, कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण
बाबींवर संशोधन सुरू झाले. इ. स. १९९० नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला.
२. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते. चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीरास उत्साह तसेच कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करत असते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. मनोरंजनामुळेच मनाला विरंगुळा मिळून मनावरील ताण हलके होतात. मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येक मानवास मनोरंजनाची आवश्यकता असते.
३. खेळांमुळे शरीर काटक आणि बळकट बनण्यास मदत होते. मनोधैर्य, चिकाटी, व खेळाडूवृत्ती इत्यादी गुणांची वाढ होते. सांघिक खेळांमुळे सहकार्य, संघभावना वाढीस लागून नेतृत्त्व गुणांचा विकास होतो. आपल्या जीवनातील व्यथा, चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळांत आहे. मनाला विरंगुळा देऊन मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. म्हणून आपल्या जीवनात खेळाला महत्त्वाचे स्थान आहे.
प्रश्न ३.
पुठील विधाने सकारण स्पष्ट करा ( कोणतेही दोन ).
१. क्हॉल्टेअर हा आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हटले जाते.
२. जागतिक वारश्याच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
३. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाच्या तज्जांची आवश्यकता असते.
४. अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.
उत्तर ३.
१. क्हॉल्टेअर हा फ्रेंच तत्त्वज्ञ असून त्याचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूह असे होते. त्याने इतिहासलेखनासाठी घटनाचा कालक्रम आणि वस्तुनिष्ठ सत्य या गोष्टींकडे लक्ष केंद्रित न करता तत्कालीन आर्थिक व्यवस्था; व्यापार, शेती; समकालीन सामाजिक रूढी-परंपरा इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, असा विचार मांडला. त्याच्या या विचारांमुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनात सर्वांगीण विचार क्हायला हवा, हा विचार पुढे आला. याचमुळे. व्हॉल्टेअर यास आधुनिक इतिहासलेखनाचा जनक असे म्हणतात.
२. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती आणि परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतुहलाबरोबरच आपुलकीही असते. हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जतन करणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते. काळाच्या ओघात हा सांस्कृतिक ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारश्यांच्या पदास पात्र ठरणारी स्थळ अणि परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
३. कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र असे जग आहे. कलावस्तूतील कलेचा दर्जा हा कलाकारच ओळखू शकतात. कलावस्तू नकली आहेत की खच्या, त्यातील बारकावे, कलेत वापरलेली साधने, साहित्य, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील तज्जच सांगू शकतात. एकंदरीतच कलावस्तूंचे मूल्य ठरविताना वरील सर्व बाबींची पारख होणे आवश्यक असते, त्यासाठीच कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणान्या तज्ञांची आवश्यकता असते.
४. ग्रंथालयात ग्रंथांचे संकलन आयोजन तसेच जतन आणि संवर्धनही केले जाते. जे दस्तऐवज प्रसिद्ध केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. ग्रंथालये ग्रंथाच्या जतनाबरोबरच संशोधन आणि ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामेही करत असतात. जतन केलेला हा ऐतिहासिक ठेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असते. म्हणून अभिलेखागारे व ग्रंथालये ही नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.
प्रश्न ४.
दिल्लेल्या उतान्याचे वाचन करून खाल्रिल प्रश्नांची उत्तरे ल्हि.
दशावतारी नाटके : दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे.
१. दशावतारी नाटके हा कोणत्या लोकनाट्याचा प्रकार आहे ?
२. दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला सूत्रधार कोणाला आवाहन करतो ?
३. दशावतारी नाटकाच्या सादरीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा.
उतर ४.
१. दशावतारी नाटके पौराणिक असून महाराष्ट्रातील ‘लोकनाट्य’ या प्रकारचाच एक प्रकार आहे.
२. दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला सूत्रधार विद्नहर्ता गणपतीला आवाहन करतो.
३. विष्णुच्या दहा अवतारांवर आधारित ही नाटके असतात. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध व कल्की या दहा अवतारांवर आधारित सोंगे घेऊन पात्रांचे सादरीकरण केले जाते. नाटकातील संवाद पद्यमय असतात. पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. नाटकाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला वाटून आरती करतात. नाटकातील अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असतात.
प्रश्न ५.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे ल्हि ( कोणतेही दोन ).
१. मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?
२. लिखित साधनांचा अभ्यास करणान्यांनी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते ?
३. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ? हे स्पष्ट करा.
४. वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत ?
उतर ५.
१. स्वांतंत्योतर काळातील भारतीय इतिहासलेखनाच्या नवीन वैचारिक प्रवाहातील एक प्रमुख लेखनप्रवाह म्हणजे ‘मार्क्सवादी इतिहासलेखन’ होय. मार्क्सच्या विचारधारेवर आधारित केलेल्या इतिहासलेखनास मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. यात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास मार्क्सवादी इतिहासकारांनी केला. भारतातही कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादीनी आपल्या इतिहासलेखनात या पद्धतीच अवलंव प्रभावीपणे केलेला दिसून येतो. आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि प्रक्रियेतील मानवी संबंध या घटकांचा प्रामुख्याने विचार या इतिहासलेखन पद्धतीत केल आहे.
२. इतिहासाच्या अभ्यासकास लिखित साधनांचा अभ्यास करणे अनिवार्य असते. लिखित साधनांचा अभ्यास करणान्या अभ्यासकाला ब्राम्ही, मोडी, पर्शियन यांसारख्या प्राचीन लिपी आणि त्यांचा विकासाचा क्रम यांचे ज्ञान असणे आवश्यक असते. तो ज्या काळातील घटनांचा अभ्यास करत असेल त्या काळतील परंपरा आणि समाजरचना त्याने जाणून घेतल्या पाहिजेत. तात्कालीन साहित्य तसेच लिहिण्याच्या पद्धतीचीही ओळख असावी. त्या काळातील संस्कृती, शासनव्यवस्था, राजसत्ता यांचेदेखील प्राथमिक ज्ञान असावे. तात्कालीन विविध शैलींचा म्हणजेच, शिल्पकल, चित्रशैली आणि त्यांचा विकासक्रम याचाही अभ्यास केलेला असावा. विविध दस्तऐवज हाताळण्यासंबंधी व जतन करण्यासंबंधीचे ज्ञान अवगत असावे. कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड आणि धातू, कागदाचा प्रकार, शाई व रंग, भूर्जपत्रे इत्यादींबाबत ज्ञान असावे.
३. विविध कलाक्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. नाटक आणि चित्रपटनिर्मितीसाठी नेपथ्य, दिग्दर्शक, छायाचित्रकार, कलाकार, प्रकाशयोजना यांसारख्या कलाकारांची आवश्यकता असते. घरसजावटीच्या व मुद्रणक्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन, भारतीय प्राच्यविधा, संग्रहालये इत्यादी ठिकाणी कलेच्या अभ्यासकांना व्यवसायाच्या विविध साया उपलब्ध असतात. कलेचे अभ्यासक, पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. लाकडी किंवा धातूंच्या शोभेच्या वस्तू, दागदागिने बनविणे, हस्तकला या क्षेत्रांतही अनेक संधी उपलब्ध असतात.
४. इजिप्तमध्ये इसवीसन पूर्वकाळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी राखून ठेवत असत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात असत. या कागदावर देशातील आणि राजधानीतील महत्त्वाच्या घटनांची माहिती लिहिलेली असे. ज्युलिअस सीझरच्या काळात ‘अक्य टायर्ना’ (रोजच्या घटना) नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत. सातव्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटली जात असत. इंग्लंडमध्येही लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके वाटत असत. प्रवासी, फिरस्ते स्थानिक लोकांना दूरच्या बातम्या रंगवून सांगत असत. अनेक राज्यांमध्ये राजाचे प्रतिनिधी राजांचे आदेश किंवा हुकूम जनतेपर्यंत आणि राज्यातील महत्त्वाच्या बातम्या व घडामोडी राजदरबारात पोहोचवत असत.
राज्यशास्त्र
प्रश्न ६.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
१. लोकशाहीचा गाभा म्हणजे………………………..
(अ) प्रौढ मताधिकार
(ब) सत्तेचे विकेंद्रीकरण
(स) राखीव जागांचे धोरण
(द) न्यायालयीन निर्णय.
२. शेतकरी चळवळीची ……………….. ही प्रमुख मागणी आहे.
(अ) वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा.
(ब) शेतमाळाला योग्य भाव मिळावा
(स) ग्राहकांचे संरक्षण करणे
(द) धरणे बांधावीत
उत्तर ६.
१. (ब) सत्तेचे विकेंद्रीकरण २. (ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा
प्रश्न ७.
पुठील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (कोणतेही दोन )
१. भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
२. राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
३. डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
उत्तर ७ :
१. हे विधान बरोबर आहे; कारण- भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मताधिकाराचा संकोच करणाय्या प्रचलित सर्व तरतुदी नष्ट केल्याने मतदारांची संख्या वाढली आहे. संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ़ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ़
भारतीय स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. मताधिकारासाठी असणारी २१ वर्षांची अट १८ वर्षे पूर्ण अशी केल्यामुळ मताधिकार अधिक व्यापक झाला. लोकशाहीची व्याप्ती वाढविणान्या या बदलांमुळेच भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
२. हे विधान बरोबर आहे; कारण-जनतेच्या मागण्या आणि गान्हाणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम राजकीय पक्ष करतात. शासन पक्षांमार्फत आपल्री धोरणे, योजना आणि कार्यक्रम यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन आणि जनता भांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
३. हे विधान चूक आहे; कारण-शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी जमीनदारांनी बलकावल्या. यामुळे भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी नक्षलवादी म्हणजेच डाव्या उग्रवाद्यांची चळवळ सुरू झाली. या चळवळीचा मुख्य आणि मूळ उद्देश बाजूला पडून ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करू लागली, पोलीसांवर हल्ला करू लगली. म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
प्रश्न ८.
(अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा ( कोणताही एक )-
१. माहितीचा अधिकार २. प्रादेशिकता
(ब) दिल्लेल्या सूचनेनुसार कृती करा. ( कोणतेत्ही एक )-
१. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
२. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करो.
उत्तर ८ :
(अ) १. शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद वाढावा तसेच त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढावा यासाठी २००५ साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. शासन कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनास होते. या माहिती अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिक यांच्या अधिकारांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आणि शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली.
२. भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि विविध परंपरांनी नटलेला देश आहे. भौगोलिक विविधतेबरोबरच इतिहास, साहित्य, शिक्षण आदीबाबतीतही भारतात विविधता आढळते. प्रत्येकालाच आपली भाषा, साहित्य, परंपरा, इतिहास,
शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक, प्रादेशिक अस्मिता प्रबळ होत जाते. आपल्या भाषेच्या व प्रदेशाच्या विकासाल्ग लोक प्राधान्य देऊ लागतात, यालाच ‘प्रादेशिकता’ असे म्हणतात.
(ब) १.
२.
प्रश्न ९.
पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तरे ल्हि. ( कोणताही एक)
१. निवडणुक आचारसंहिता म्हणजे काय ? हे स्पष्ट करा.
२. स्वांतंत्रपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या ?
उत्तर ९.
१. निवडणूक आयोगाने निवडणुकांद्रम्यान होणाय्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ज्या उपाययोजना राबविल्या आहेत त्यात आचारसंहितेचा समावेश आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत काही काळ राजकीय पक्ष, उमेदवार, मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन टाळावे, यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते, त्या नियमावल्गीस ‘निवडणूक आचारसंहिता’ असे म्हणतात.
२. स्त्रियांवर होणारा अन्याय दूर क्हावा. स्त्रियांचे होणारे शोषण थांबून त्यांना सन्मानाने जगता यावे. स्त्रियांना सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा तसेच सन्मानाने जगता यावे. सतीप्रथा बंदी विधवा, पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाह प्रथा बंदी, यांसारख्या सुधारणांसाठी स्वातंत्रपूर्व काळात स्त्री चळवळी लढत होत्या.