MARCH 2019
मराठी (प्रथम भाषा)
विभाग १ : गद्य ( २८ गुण )
पठित गद्य
प्रश्न १.
(अ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) खाल्ग्रिल आकृती पूर्ण करा :
आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची राहानिशा व्हायची न् मग त्या गावभर जायच्या कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतन आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावण किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाच्या पितळी वाघाच्या जब्रड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलण फार अवघड गणित होत. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होत दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीच आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा.
(२) (i) पुठील घटना उतान्याच्या आधारे क्रमाने ल्हिए :
(अ) म्हातारीची ढाळज सुटायची
(ब) वाडा शांत क्हायचा
(क) कडुसं पडायच्चा आधी मैफिल मोडायची
(ङ) माणसं ढाळजंत बसायची
(ii) एका शाब्दात उत्तरे ल्हित :
(अ) लेखकाच्या गावच वर्तमानपत्र ……………………………………
(ब) त्या वर्तमानपत्राचे संपादक ……………………………………
(३) व्याकरण
तक्ता पूर्ण करा :
शाब्द | प्रत्यय | विभक्तीचे नाव |
म्हातारीची | ||
देवळीत |
(४) ‘आजी म्हणजे घराचा आधार’ हे विधान सोदाहरण पटवून द्या.
(आ) उतायाच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) आकृतिबंध पूर्ण करा :
सोनाल्र्रचं जेवप तीनदा होत असे. सकाळी नाश्ता. नाष्ट्यासाठी तिला दूध व अंडी देत होतो. दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे. रात्री मात्र सोनात्री शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे दूधपोळी नाहीतर दूधभाताचं आणि त्यासादी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकिपीशी ल्रडीगोडी त्रवी जेवायची वेळ झाल्र, की ती स्वयंपाकघरात जाई आणि आणि स्वयंपाकीणबाईच्या पायांत घोटाळत राही. त्यांच्याभोवती फिरत राही तोडानं त्रडिक “आव आव” करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी, पण तिचं जेवण ताटलीत टाकलं, की ती गुरगुरायल ल्गगे. ताटल्री खाली ठेवल्गी, की ताटलीवर तुटून पडे जिभेनं ताटली चाटून पुसून साफ करून होईपर्यंत तोंडान तिची गुरगुर चालूच राही. दूधपोळी नि दूधभात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी.
तिला व रूपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायल्ग नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली. ड्रायक्रच्या रोजारची सीट ही त्यांची जागा. जाणान्या येणान्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत. दोघींचे पुढील पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत. बैल्राड्या, टांगे, गुरं यांकडे ही जोडी डोळे विस्फारून पाहत असे.
(२) (i) सोनालीचे जागतिक दर्जाचे वेगळेपण दर्शावणारी गोष्ट
(ii) ‘सोनाली’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
(३) व्याकरण
(i) खाल्कील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा ल्कित्रा :
सोनाली जिभेन ताटली चाटून पुसून साफ करी.
(ii) खाल्रील वाक्यातील अव्यय ओळ्का :
सोनाली जेवणाची मागणी करी; पण तिचं जेवण ताटलीत टाकलं, की ती गुरगुरायला लागे.
अव्यये-
(४) स्वमत :
‘प्राण्यांनाही भावना असतात’ या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ? सोदाहरण स्पष्ट करा.
अपठित गद्य
( इ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) रिकाम्या जागी योग्य पर्याय भरून वाक्यं पुन्हा ल्हित्र :
(i) लेखकांच्या मते फुल्लांकडे पाहण्याची भावना ………………….. अशी असावी
(अ) हारतुरे व गजचांसाठी फुले
(क) पुजेसाठी फुले
(ब) फुलांसाठी फुले
(ङ) सजावटीसाठी फुले
(ii) फुल्लंख्या दृष्टीने योग्य कृती ही आहे………………………..
(अ) वेल्रीवर कळ्या आल्या की त्या तोडाव्या.
(ब) फुले कोमेजून खाली पडल्यानंतर उचलावी.
(क) कोमेजण्याच्या काही तास आधी तोडावीत.
(ङ) आफल्या मनाल्र वाटेल तेंव्हा तोडावी.
‘फुले कोणाला आवडत नाहीत ? ती सर्वांनाच आवडतात. कोणाला ती पूजेसाठी हवी असतात. कोणाला ती हारतुरे, गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात. पण ‘फुलांसाठी फुले’ या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. फुले राक्यतो वेल्लीवर किंवा फुल्झाडांवर राहू द्यावीत ती गळून पडली तर गोळा करावीत. पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भावनात्मक पातळीवरून करू नये, असे अनेकांना वाटेल; पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते. फुले म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू।
अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वांची असतात. रंग, रूप, गंध यांची अखंड उधळण करून आपले जीवन रसपूर्ण, अर्थपूर्ण, भावपूर्ण करण्याचे काम ती मूकपणे करीत राहतात. या फुलांचे उतराई क्हावे कसे ? जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ? ती अधिकच फुल्लतील आणि जगाचे नंदनवन करतील. गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत. घराघरांत केवळ फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा.
(२) आकृतिबंध पूर्ण करा.
(३) व्याकरण :
(i) खालील वाक्यातील अलंकार ओळखा :
‘फूल म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू ।’
(ii) खालील वाक्यातील अधोरेखित राब्दासारखे इतर दोन शब्द लिहा :
गावागावांत फुलांसाठी मंदिरे असावीत.
(४) स्वमत
तुमच्या आवडत्या कोणत्याही पाच फुलझाडांची नांवे लिहून त्यांपैकी कोणत्याही एका फुलझाडाचे वर्णन 2 ते 3 वाक्यांत करा.
उत्तर १ :
(अ) १. (१) सहा फूट लांब व पाऊण फूट रुंद सागवानी लाकडी पट्टी
(२) तोंडाल पितळी वाघाच्या जबड्यातील कडी
(३) दरवाजाचे अर्थात वाड्याचे फार मोठे संरक्षण कवच
(४) उन्हाच्या वेळी घराबाहेर जायची संधी आगळ देत नव्हते पण रात्री मात्र त्याचा आधार वाटायचा.
२. (i) (क) कडुसं पडायच्या आधी मैफिल मोडायची.
(अ) म्हातारीची ढाळज सुटायची.
(ड) माणसं ढाळजंत बसायची.
(ब) वाडा शांत क्हायचा.
(ii) (अ) लेखकाच्या घराची ढाळज.
(ब) लेखकाची आजी.
३.
शब्द | प्रत्यय | विभक्तीचे नाव |
म्हातारीची | ची | षष्ठी |
देवळीत | त | पंचमी |
४. लेखकाच्या आजोबांचे निधन झाले आणि आजीने संपूर्ण कुटुंबाची जबावदारी स्वतःकडे घेतली. तिने सान्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. तिने साच्या कुटुंबावर बहुमूल्य असा नातेसंबंध जपण्याचा संस्कार कुटुंबातील सदस्यावर केला. तिची करडी शिस्त, प्रेमळ माया, कुटुंबातील सदस्यांमधे करून दिलेली कामाची वाटणी, सर्वांवर दिलेल्या विविध प्रकारच्या जबाबदाय्या, मुळांवर व मानवांवर केलेले सुसंस्कार, गावातील लोकांवर असलेला तिचा वचक, दरारा या सान्यामधून आजी म्हणजे कुटुंबाचा आधार असल्याचे स्पष्ट होते.
(आ) १. (१) स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाकीण बाईच्या पायात घोटाळणे.
(२) त्यांच्या भोवती फिरत राहणे.
(३) तोंडाने लाडिक ‘ आव आव’ करणे.
(४) ताटली खाली ठेवली की ताटलीवर तुटून पडणे.
२. (i) दूधपोळी आणि दूधभात खाणारी सिंहीण.
(ii) दूधपोळ्ठी आणि दूधभात खाणारी जगातील एकमेव सिंहीण कोण ?
३. (i) सोनाली जिभेन ताटल्या चाटून पुसून साफ करी.
(ii) अव्यये : पण, को
४. एकदा मी माइया मामाच्या गावाळा गेलो होतो. माइया मामाचा घरात एक कुत्रा पाळला होता. त्याचे नाव टॉमी असे ठेवले होते. या टॉमीची घरातील सर्वांना इतकी सवय झाली होती की तो घरातील सदस्यच झाला होता. त्याला घरात येणान्या सर्वांची ओळख झाली होती. आम्ही वर्षांनी जरी गेलो तरी तो आमची ओळख विसरत नये आमचे स्वागतच करत असे. आमच्या सोबत राहत असे. आमच्या बरोबर खेळत असे. एकदा मामा काही कामानिमित्त बाहेर गेला बराच उशीर झाला तरी घरी परत आला नव्हता त्यामुळे घरातील सर्वांना काळजी वाटू लागली. आम्ही सर्वजण त्याची वाट पाहत बसलो होतो हे टॉमीलाही जाणवले व तो ही आमच्यात सहभागी झाला. मामीने त्याचासाठी दूधभात आणून ठेवला पण टॉमीने त्याच्याकडे पाहिलेही नाही. मला आरचर्य वाटला एरवी त्याच्यापुढे ठेवायचा अवकारा की त्यावर तुटून पडत असी पण आज मात्र त्याने तसे केले नाही.
रोवटी रात्री उरिरा मामा घरी आला तेव्हा टॉमीने धावत जाऊन त्याच्यावर भुंकून, त्याच्या अंगावर चढून त्याचे स्वागत केले रोपटी हलवून आपल्या प्रेमाची जाणीव करून दिली. टॉमीला घरच्यांविषयी वाटणारी माया, प्रेम, आपुलकी पाहून मुभ्या प्राण्यांनाही भावना असतात याची तंतोतंत प्रचिती मला आली.
अपठित गद्य
(इ) १. (i) (ब) फुल्गांसाठी फुले.
(ii) (क) कोमेजण्याच्या काही तास आधी तोडावीत.
२. (i) रंग, रूप, गंध.
(ii) जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनीकरणे.
३. (i) चेतनगुणोक्ती
(ii) गावागावांत-राज्याराज्यांत, घराघरांत, देशादेशांत.
४. पाच फुलझाडांची नावे-गुलाब, मोगरा, रोवंती, चाफा, बकुळी, मोगरा-मोगच्याचे फूल पांढरेशुभु असते. त्याचा वास चोहोंकडो दरवळतो. त्याच्या वासाने मन प्रसन्न होते. ही फुले देवाला वाहिली जातात तसेच त्याचे गजरे करूण वेणीत माळायला स्त्रियांना खूप आवडते. संध्याकाळच्या वेळी उमळणाच्या या फुलांच्या वासाने वातावरण प्रसन्न होण्यास व मन टवटवीत राहण्यात खूपच मदत होते.
विभाग २ : पद्य ( २० गुण )
प्रश्न २.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) आकृती पूर्ण करा :
श्रोतीं क्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण।
जेणें करितां बाणे खुण। सर्वज्ञपणाची।। १।।
वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये।
पडिली वस्तु घेऊं नये। येकायेकीं।। २॥
जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।। ३।।
तोंडळासीं भांडों नये। वाचाळासी तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं ॥४॥।
आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
रोधिल्याविण करूं नये। कार्य कांही।।५॥
सभेमध्ये लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।
पैज होड घालूं नये। कांही केल्या।। ॥
कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये।
परपीडा करूं नये। विश्वासघात॥। ७।।
व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये।
आपलें वोझें घालूं नये। कोणीयेकासी ॥ ८॥
सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा॥ ९॥
अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची। १०॥
(२) (i) अचूक विधान ओळ्खा :
(अ) पैज, होड लावावी.
(ब) सत्याची वाट धरावी.
(स) पापद्रव्य सहज जोडावे.
(द) नेहमी अभिमानाने वागावे.
(ii) खालील गोर्ष्टीबाबत संत रामदास कोणती दक्षता घ्यायल सांगतात ?
गोष्टी | दक्षता |
आळस | . |
उपकार |
(३) काव्यसौंदर्य :
‘अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।’ या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे विचारसौंदर्य स्पष्ट करा.
(४) काव्यसौंदर्य :
जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं ॥ या ओळीचा सरळ अर्थ लिहा.
(आ) खालील मुदद्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खाल्रील कृती सोडवा :
कविता : (१) वस्तू
(२) भरतवाक्य
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री……………………..
(२) कवितेचा विषय ……………………..
(३) कवितेचा काव्यसंग्रह ……………………..
(४) कवितेतून व्यक्त होणारा स्थायिभाव ……………………..
(५) कवितेतून व्यक्त होणारा विचार ……………………..
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे ……………………..
(इ) खाल्त्र दिलेल्या काव्यपंत्तीचे रसग्रहण करा :
झरा ल्गागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याल्ग
बळ लागते थोडेसे !
उत्तर २ :
(अ) १. (i) आळसात सुख मानू नये.
(ii) चाहाडी करू नये.
२. (i) (ब) सत्याची वाट धरावी.
(ii)
गोष्टी | दक्षता |
आळस | आळसे सुख मानू नये |
उपकार | कोणाचे उपकार घेऊ नये. |
३. ‘उत्तम लक्षण’ या ‘दासबोधातील’ उपदेशापर रचनेतुन संत रामदास आदर्श व्यक्ती कशी असावी याचे वर्णन करताना आपल्या वागण्यातून कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सांगतात.
माणसाने नेहमी चांगले वर्तन करावे आपली अपकीर्ती होऊ नये याची काळजी घ्यावी आपल्या चांगल्या वर्तनातून लौकिक वाढवावा. नेहमी विचारपूर्वक, सारासार बुद्धीने वागून सत्याच्या मार्गाने वाटचाल करावी. अशा रीतीने माणसाने आपल्या उत्तम वागणुकीतून स्वतःचा उत्कर्ष करावा असे काव्यपंक्तीतून सूचित होते.
४. संत रामदासांनी लिहिलेल्या ‘उत्तमलक्षण’ या उपदेश पर रचनेतून आदर्शा व्यक्तीची लक्षंणे सांगितली आहेत. यात त्यांनी माणसासाठी कोणत्या गोष्टी योग्य व कोणत्या गोष्टी अयोग्य याचे वर्णन केले आहे.
समर्थ रामदास म्हणतात जनसामान्यांच्या विनंतीला मान द्यावा सत्याच्या मार्गाने जावे. हे करताना पापद्रव्य म्हणजे वाईट मार्गाने धनसंचय करू नये, असे सांगतात.
नैतिक मूल्यांची जोपासना करावी. समाजाचा एक घटक म्हणून सामाजिक बंधने पाळावीत. सद्वर्तन केले पाहिजे. नेहमी चांगल्या मार्गाचा विचार करावा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये कारण पुण्यमार्ग हेच सर्वांत उत्तम लक्षण आहे हे यातून समर्थ रामदास यातून परवून देतात.
(आ) १. वस्तू-
(१) या कवितेचे कवी/कवयित्री-द. मा. धामणस्कर
(२) कवितेचा विषय-मानवाप्रमाणे वस्तूनांही भावना असतात.
(३) कवितेचा काव्यसंग्रह- भरून आले आकारा.
(४) कवितेतून व्यक्त होणारा स्थायिभाव-कोणत्याही निर्जीव वस्तूरी मानवी भावना जोडली गेली की त्या वस्तूचे मोल करता येत नाही.
(५) कवितेतून व्यक्त होणारा विचार-कृत्रिम वस्तूंनाही भावना असतात हे समजून त्यांप्रमाणे वस्तू जपून वापराण्यात, त्यांची काळजी घ्यावी.
(६) कविता मला खूप आवडते कारण त्यातून निर्जीव वस्तूंच्या मनात येणान्या भावनांचे अगदी यथार्थ राब्दांत वर्णन केले आहे.
२. भरतवाक्य-
(१) प्रस्तुत कवितेचे कवी-म मोरोपंत
(२) कवितेचा विषय-भक्तिमार्गाचे महत्त्व
(३) कवितेचा काव्यसंग्रह-केकावळी
(४) कवितेतून व्यक्त होणारा स्थायिभाव-सुसंगती व सद्विचारांच्या माणसांवर होणारा परिणाम.
(५) कवितेतून व्यक्त होणारा विचार-माणसाने कोणत्याहीं प्रलोभनांच्या आहारी न जाता ईश्वरभक्तीत लीन क्हावे.
(६) चांगली संगत आणि चांगले श्रवण केल्याने माणसांच्या वागण्यांत होणान्या वर्तनाचे वर्णन अतिशय समर्पक शाब्दांत केल्याने ही कविता मला आवडली.
(इ) ‘खोद आणखी थोडेसे’ ही कविता आसावरी काकडे यांनी लिहिली आहे.
प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोण यांना मानवी जीवनात अतिशाय महत्त्व असल्याचे या कवितेतून स्पष्ट केले आहे. माणूस सतत एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो पण प्रत्येक वेळी लगेचच यश मिळेलच याची खात्री नसते. अपयरा आले असता खचून जाऊन प्रयत्न करायचे सोडून देऊन नयेत तर आणखी थोडीशी चिकाटी बाळगून प्रयत्न केले तर निश्चितच यराचा मार्ग सापडतो की ज्याद्वारे आपण यश गाठू राकतो.
कवयित्री आसावरी काकडे यांनी यासाठी अतिशय सुंदर दृष्टान्त दिला आहे. त्या म्हणतात, बोअर किंवा विहीर खोदताना ८-१० फूट खोदल्यावर पाणी लागले नाही तर तेथेच प्रयत्न बंद न करता आणखी १-२ फूट खणले तर निश्चितच मिळणार येथे थोडेसे या राब्दाचा वापर चिकाटी, जिद्दी, आत्मविश्वास यासाठी वापरला आहे.
विभाग ३ : स्थूल्लाचन ( ६ गुण )
प्रश्न ३.
खाल्त्रिल्रैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
१. ‘माणुसकी पेरणे काळची गरज’ या विधानाचा तुम्हाल्त्र कळ्लेत्र अर्थ स्पष्ट करून ल्हि.
२. पुठील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर टीप ल्हिए :
३. साहित्यिक गिरिजा कीर यांच्या कथेची वैरिष्ट्ये ल्हि.
उत्तर ३ :
१. आज आपण पाहतो माणूस हा माणूसपणच हरवून बसलेला आहे. आज आपल्याला काय दिसते तर खून, भ्रष्टाचार, दरोडे, युद्ध दहरातवादी हल्ले. माणूस स्वार्थी बनत आपला स्वार्थ साधण्यासाठी तो किती ही हीन पातळी गाठत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचे रोध ल्रागत आहेत आणि माणसे आपल्याच माणसांपासून दुरावत चालली आहेत. आज पैशाच्या मागे लागून आपला गाव, देश सोडून माणसे बाहेर जात आहेत. स्वतःच्या आईवडिलांच्याकडे पाहायलाही त्यांच्याकडे वेळ नाही नाही तर ते इतरांना काय मदत करणार ? अशा या माणुसकी हरवलेल्या माणसांच्यात माणुसकीचे बीज रुजवायला हवे म्हणजे त्यांच्यावर योग्यप्रकारे संस्कार करायला हवेत तर त्यांच्यात माणुसकीचा गुण वाढीस लागेल. आणि अरी माणूसपण जपणारी माणसे निर्माण झाली तरच जगात सौख्य व शांतता नांदेल. यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करायला पाहिजे.
माणसांना सुखाने, आनंदाने व समाधानाने जगायचे असेल तर माणूसपण जपणे ही काळाची गरज आहे हे अगदी यथार्थ आहे.
२. लेफ्टनंट स्वाती महादिक
वीरांगना या पाठात लेफ्टनंट स्वाती महादिक यांच्या वीरपत्नी ते वीरांगना असा घडलेल्गा धाडसी व प्रेरक प्रवासाचे वर्णन केले आहे.
देराप्रेमी कर्नल संतोष महादिक यांनी देशासाठी केलेल्या बलिदानानंतर त्यांची पत्नी स्वाती यांनी दुःखाने न खचता, समाजाने दिलेल्या सुखासीन प्रलोभनांचा त्याग करून आपणही देरासेवेसाठीं भारतीय सैन्यदलात रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करून विरोष परवानगी घेऊण वयाची अट रिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्रान बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. शारीरिक व वैद्यकीय चाचणीत यरास्वी झाल्या. ‘ऑफिसर्स ट्रेनिंग ऑॅंडमी’ चेन्नई येथील लष्करी प्रशिक्षण संस्थेतून अकरा महिन्यांचे खडतर प्ररिक्षण घेतले. आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर सैन्यातील दोन अभिमानास्पद पदे जिंकली.
अशा रीतीने पतीच्या निधनानंतर झालेले दुःख बाजूला ठेवून पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यदलात भरती होऊन इतर अनेक स्त्रियांना प्रेरणादायी ठरणारा मार्ग अवलंबला यातून त्यांची जिद्द व निर्धार पूर्ण करण्याची चिकाटी दिसून येते.
३. साहित्यिका गिरिजा कीर यांच्या कथालेखनाची वैरिष्ट्ये म्हणजे त्या कथा खूप हौसेने लिहितात. त्यांच्या कथेतून मोठ्या मनाचे विस्मयचकित दर्शान घडून येते. स्वैर अनुवादाचे यथार्थ दर्शान घडते. माणुसकीचा ओळावा व संवेदनशीलता जपण्याचे महान कार्य या कथांमधून घडते. त्यांच्या लेखनात तोचतोचपणा नसून नावीन्य असते. वाचकांचे मन जिंकून घेण्यात कथा यरास्वी ठरण्या आहेत.
सामाजिक बांधीलकीची जाणीव करून देणाया कथानकातून प्रत्ययकारी संदेशावाचकांना दिला जातो.
सहज, सोप्या व ओघवत्या भाषारौलीचा वापर करून वाचकांच्या हृदयाला भिडणास्या अशा स्वरूपाच्या या गिरिजा कीर यांच्या कथा असतात.
विभाग ४ : भाषाभ्यास ( २० गुण )
प्रश्न ४.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती
(१) समास :
खालील तक्ता पूर्ण करा.
सामासिक शाब्द | विग्रह | समासाचे नाव |
तोंडपाठ | ||
बाप आणि लेक |
(२) अलंकार :
खालील कृती करा :
डोकी अलगद घरे उचलिती
काळोखाच्या उरीवरूनी
प्रस्तुत ओळीतील अचेतन घटक
प्रस्तुत ओळीतील मानवी क्रिया-
प्रस्तुत ओळीतील झालेला अलंकार-
(३) वृत्त :
सदा सर्वदा योग तूझा घडावा।
तुझे कारणी देह माझा पडावा॥
वरील ओळीतील वृत्त ओळखा।
(४) शब्दसिद्धी :
खालील तक्ता पूर्ण करा.
अवजड, लढाई, निरोगी, जमीनदार
प्रत्ययघटित | उपसर्गघटित |
(५) सामान्य रूप :
पुढील शब्दांची सामान्यरूपे लिहा :
घरात
जिभेला
(६) वाक्रचार
(i) खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा :
वाक्प्रचार | अर्थ |
कंठस्नान घालणे | खूप आनंद होणे. |
आनंद गगनात न मावणे | नाराजी व्यक्त करणे. |
ठार मारणे. |
(ii) कंसातील वाक्ट्रचारांचा त्या खालील वाक्यात योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
(कान देऊन ऐकणे, मुहूर्तमेढ़ रोवणे, अचंबित होणे)
(अ) सरांचे भाषण मी लक्षपूर्वक ऐकत होती.
(ब) सर्कशीतील रोमांचक कसरती पाहून राधा आश्चर्यचकित झाली.
(आ) भाषासौंदर्य
(१) शब्दसंपत्ती
(i) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
(अ) केलेले उपकार न जाणणारा –
(ब) कोणाचाही आधार नसलेल्ग –
(ii) गटात न बसणारा रब्द शोधा.
(अ) सदन, सधन, भवन, निकेतन –
(ब) जल, नभ, गगन, आकारा –
(iii) खालील राब्दाचे दोन अर्थ लिहा.
(iv) सहसंबंध ओळखा :
(अ) गुण दोष : : जहाल
(ब) प्रत्यक्ष : : आदर अनादर
(२) लेखननियमांनुसार लेखन
(i) अचूक राब्द ओळखा :
(अ) आरिर्वाद/आशीर्वाद/आर्शीवाद/आरिरवाद.
(ब) उपस्थिती/उपस्थीती/उपस्थीति/ऊपस्थिती.
(ii) खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
हीवाळा नूकताच सुरू झालेला होता.
(३) विरामचिन्हे
(i) खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा :
तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत
(ii) चुकीची विरामचिन्हे बदलून वाक्य पुन्हा लिहा.
ते म्हणाले. “लक्षात नाही आले” ?
(४) पारिभाषिक शाब्द
खालील राब्दांना प्रचलित मराठी भाषेतील राब्द लिहा.
(अ) Index
(ब) Honourable
(५) अकारविल्हे
खालील राब्द अकारविल्हे लिह्हा.
गणित, भूगोल, भाषा, इतिहास.
उत्तर ४ :
(अ) १.
सामासिक इबब्द | विग्रह | समासाचे नाव |
तोंडपाठ | तोंडाने पाठ | विभक्ती तत्पुरुष |
बापलेक | बाप आणि लेक | इतरेतर द्वंद्व |
२. प्रस्तुत ओळीतील अचेतन घटक-काळोख
प्रस्तुत ओळीतील मानवी क्रिया—डोकी अलगद घरे उचलिती
प्रस्तुत ओळीतील झालेला अलंकार-चेतनगुणोक्ती
३. भुजंगप्रयात
४.
प्रत्ययघटित | उपसर्गघटित |
जमीनदार | अवजड |
लढाई | निरोगी |
५. घरा, जिभे
६. (१) कंठस्नान घालणे-ठार मारणे.
आनंद गगनात न मावणे-खूप आनंद होणे.
(२) (अ) सरांचे भाषण मी कान देऊन ऐकत होतो.
(ब) सर्करीतील रोमांचक कसरती पाहून राधा अचंबित झाल्गी.
(आ) १. (i)
(अ) कृतघ्न (ब) निराधार
(ii) (अ) सधन (ब) जल
(iii)
(iv) (अ) मवाळ (ब) अप्रत्यक्ष
२. (i) (अ) आरीर्वाद. (ब) उपस्थिती.
(ii) हिवाळा नुकताच सुरू झालेला होता.
३. (i) “तुमचे केस अजून कसे काळे राहिले आहेत ?”
(ii) ते म्हणाले, “लक्षात नाही आलं”
४. अनुक्रमणिका, आदरणीय/माननीय
५. इतिहास, गणित, भाषा, भूगोल
विभाग ५ : उपयोजित लेखन ३० गुण
प्रश्न ५.
(अ) खालील कृत्ती सोडवा.
(१) पर्त्रिजन
(२) सारांशलेखन
विभाग-1 : गद्य (इ) (प्रश्न क्र. 1 (इ)) मधील अपठित उताच्याचा एवढा सारांरा तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) खरील कृती सोडवा.
(१) कथालेखन :
खालील मुद्द्यांच्या कथा लिहा :
वर्गातर्फे ‘सुंदर हात’ स्पर्धेचे आयोजन – सर्वांचा सहभाग – हात सुंदर दिसावे म्हणून प्रत्येकाचे प्रयत्न – स्पर्धेचा दिवस सर्वजण उत्सुक – मोनाचा स्पर्धेतील सहभागाला नकार – कष्टाने रापलेले न सजवलेले हात लपवणे – बाईंकडून सर्वांच्या हातांचे निरीक्षण – मोनाचे हात बक्षीसपात्र –
(२) बातमीलेखन :
खालील विषयावर बातमी तयार करा :
15 डिसेंबर रोजी जिल्हापरिषद माध्यमिक रिक्षण विभाग, अमरावतीतर्फे आयोजित आंतरशालेय निबंधस्पर्धेचा पारितोषक वितरण सोहळा संपन्न.
(इ) खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. :
(१) प्रसंगलेखन :
पारनेर गावक्यांतर्फे जाहीर सत्कार
मुख्य उपस्थिती – मा. सूर्यकांत आगाशे
( निवृत्त कर्नल)
दि. -9 जून
वेळ – सायंकाळी 5.00
स्थळ – अजिंक्य क्रीडा मैदान, पारनेर.
वरील कौतुक सोहळ्याला तुम्ही गावकरी म्हणून उपस्थित होता. कल्पना करून प्रसंगलेखन करा.
(२) खालील चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
[वरील मुद्दे केवळ मार्गदर्राक आहेत.]
उत्तर ५. :
(अ) ९. दिनांक : ९ मार्च, २००x
प्रति,
मा. व्यवस्थापक,
ज्ञान प्रकाशान,
आनंदनगर, औरंगाबाद.
विषय : पुस्तक मागणी पत्र
महोदय,
मी अ.ब.क. ज्ञानदा विद्याल्य औरंगाबाद या शाळेचा विद्यार्थी प्रमुख या नात्याने आपणास हे मागणी पत्र पाठवित आहे. आम्हाला आमच्या विद्याल्यासाठी खालील पुस्तकांची आवश्यकता आहे. कृपया आपण आठ ते दहा दिवसांत आमच्या विद्याल्याकडे सदरची पुस्तके पाठवून देणेची व्यवस्था. करावी तसेच सोबत बील आणि आपल्या बैंक खाते नंबर पाठवावा म्हणजे बीलाची रक्कम सत्वर आपल्या खात्यावर पाठविता येईल त्याचप्रमाणे ही पुस्तके शाळेसाठी वापरण्यात येत असलेले त्यावर विरोष सवल्त्र मिळवी ही विनंती.
पुस्तकांची यादी खालीलग्रमाणे-
अ.न. | पुस्तकाचे नांव | लेखकाचे नांव | प्रती |
1. | शामची आई | पांडुरंग साने | ३ |
2. | शालेय मराठी व्याकरण | दामले | ५ |
3. | व्यक्ती आणि वर्ली | पु. ल. देशापांडे | २ |
4. | एक होता कार्कर | वीणा गवाणकर | २ |
कृपया पुस्तके ल्वकरात लवकर पाठविणेची व्यवस्था क्हावी. कळावे,
आपला विश्वासू,
अ. ब. क,
विद्यार्थी प्रमुख,
ज्ञानदा विद्याल्य,
औरंगाबाद.
किंवा
अभिनंदन पत्र
दिनांक : ३ मार्च, २०xx
प्रिय मित्र,
डॉ. विजया वाड,
विषय-उत्कृष्ट बाळसहित्य पुरस्कार मिळलेबाबत
महोदया,
सस्नेह नमस्कार,
कांही दिवसापूर्वी वर्तमान पत्रामध्ये ज्ञान प्रकाशनची जाहिरात वाचली आणि मनाला खूप खूप आनंद झाला. प्रथमतः मी आपले त्रिवार अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
बरेच दिवसापासून मी आपल्या पुस्तकांचा एक रसिक वाचक आहे. आपल्या पुस्तकामधून एखादी घटना किंवा गोष्ट इतक्या सहजतेने मांडली जाते की, ती पटकन वाचकांच्या मनाची पकड घेते हे आपल्या पुस्तकांचे खास वैरिष्ट असे म्हणावे लागेल. आपल्या साहित्यातून लहानांच्या तसेच मोठ्यांचा विचारासं धरून केलेले लेखन वाचकांना सहजतेने समजते त्यामुळे त्यांच्या विचारात आणि वागण्यात बदल घडून येतो अशी अनेक वैरिष्ट सांगता येतील पण आता येथेच थांबतो.
पुन्हा एकदा आपले उत्कृष्ट बाळसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन असेच योग वरचेवर येवोत ही अपेक्षा. कळावे
आपला रसिक वाचक,
शामसुंदर छत्रे,
पता – ४३२ ई जॉर्ड,
औरंगाबाद.
२. फुले सर्वांनाच आवडतात ती हारतुरे गजरा, वेणी किंवा पुजेसाठी वापरतात. पण फुलांसाठी फुले या भावनेने त्यांच्याकडे पहावे. ती कोमेजण्याच्या आंत तोडावीत म्हणजे फुलांल्या दृष्टीने न्याय होईल. भावनात्मकदृष्ट्या फुलांची कोमलता निसर्गाचे भावकाव्यच आहे. ही फुले रंग, रूप, गंध यांची उधळण करून आपले जीवन रसपूर्ण, अर्थपूर्ण व भावपूर्ण करतात, म्हणून यांची उतराई आपण भावनांनी फुलांची पूजा करून फुल्रांसाठी मंदिर किंवा घरामध्ये चौरंगावर ठेवून करावी.
( आ ) १.
सुंदर हात
औरंगाबाद येथील आदर्शा विद्याल्यामध्ये शाळाबाद प्रमाणे स्नेह संमेलनाची तारीख जाहिर झाली. त्यानिमित्त विविध स्पर्धा खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम यांची आखणी होवून विविध स्पर्धामध्ये ‘सुंदर हात’ या स्पर्धेचे इ. च्या वर्गाने आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये मुलांच्या पेक्षा मुल्लींनीच जास्त भाग घेतलेल्र होता. मुलांची संख्याखुपच कमी होती.
सुंदर हात दिसण्यासाठी आणि बक्षीस मिळविण्यासाठी सर्वांची खूप धड़पड़ सुरू होती. स्पर्धेच्या आधीपासूनच हात स्वयं ठेवणे, नखे काढणे, हाताला जास्तीत जास्त काम न करावयास लागेल याची काळजी घेणे अरी अनेक पथ्ये ने विद्याथ्यांकडून पाळली जात होती. प्रत्येक जण हात सुंदर दिसण्यासाठी प्रयत्नशील होता. एकमेकांना विचारून त्यांच्या कडून माहिती घेवून तसेच बाजारामधून मेंदी किंवा सुंदर दिसण्यासाठी अन्य साहित्य आणणे असा उद्योग सुरू झाला आणि या धावपळीमध्ये स्पर्धेचा दिवस उजाडला. सर्वानी खूपच तयारी केली होती. कोणी खूप सुंदर मेंदी काढली होती, कोणी खूप नक्षी हातावर काढली होती, कोणी हातावर आकर्षक रंग रंगोटी केली होती.
परीक्षेमध्ये कायम पहिला नंबर मिळवणाच्या आणि अभ्यासामध्ये हुशार असणान्या मोनाने मात्र या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला नक्हता. याचे सर्वांना आश्वर्य वाटले. याचे कारण फक्त मोनाच जाणू शकत होती. घरची अत्यंत गरीबी, खाण्यापिण्याचे हाल यामुळे मोनाला भांडी घासणे, कपडे धुणे अरी अनेक घरची कामे करावी लागत होती त्या कष्टाने तीचे हात राबलेले होते म्हणून तीने भाग घेतला नव्हता. बाईंनी सर्व स्पर्धकांचे हात पाहिले तेव्हा हुरार मोनाने यात कसा भाग घेतला नाही ? याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी मोनाला हात दाखण्यास सांगितले. कामाने आणि कष्टाने राबलेले हात न दाखविता जिथे ते लपविले बाईनी आपल्या हाताने तिचे कष्टी हात हातात घेतले आणि पाहिले. त्यांनो मोनाच्या हाताला बक्षीस जाहिर केले.
सर्वाना याचे आश्चर्य वाटले तेव्हा बाईं म्हणाल्या हात हे फक्त दिखाऊपणासाठी नसून उत्तम कामकरून सुंदर जीवन घडवण्यासाठी आहेत. हे लक्षात घ्यावे हा बोध दिला.
२. निबंधस्पर्धेचा पारितोषक वितरण सोह्नळा
९ मार्च, २०१९
प्रतिनिधिकडून
अमरावती येथे ता १४ डिसेंबर रोजी जिल्हापरिषद माध्यमिक रिक्षण विभाग अमरावती तर्फे घेण्यात आलेल्या आंतरशालेय निबंधस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यास जिल्ह्यातील बच्याच शाळांंनी विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. आपल्या मार्गदर्रानपर भाषणात जिल्हाधिकान्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना अभ्यासातील कांही मार्गदर्शक तत्त्वांचे विश्लेषण करून सांगितले. भविष्यातील या चढाओढीच्या युगामध्ये आपण कसे टिकून राहिले पाहिजे हे सांगितले, रोवटी जिल्हापरिषद् माध्यमिक रिक्षण विभागाचे प्रमुखानी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
(इ)
१. मी पाहिलेल्र कौतुक सोहळा
जून महिन्याचे दिवस होते पावसाळा नुकतीच सुरुवात झाली होती, त्यामुळे बाहेरील भटकंती कमी होऊन घरातच लोळत पडणे सुरू होते. त्यामुळे वर्तमानपत्रातील जास्तीत जास्त मजकूर वाचून होत होता, वाचता वाचता एक जाहिरात दिसली त्यामध्ये ता. जून रोजी सायं पूवाजता आमच्या पारनेर गांवातील अजिंक्य क्रीडा मैदानावर आमच्याच गांवातील विनय जाधव यांचा सैन्यात भरती झाल्याबद्दल जाहिर सत्कार ठेवलेला होता या कार्यक्रमास मोजाण्याचे ठरवून त्या दिवशी सायंकाळी ४.३० ला. मैदानावर हजर राहिलो. पाहतो तर बरीच ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने हजर होती. स्टेजची भव्यता मोठी होती. सर्वांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था केलेली होती. कार्यकर्तांची हलडूल तिकडे धावपळ सुरू होती. बरोबर प्रवांजना निवृत्त कर्नल-मा. सूर्यकांत आगारो यांचे आगमन झाले. हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. आता कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सूत्र संचालकानी पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर व्यासपिठावरील कांही गांवकच्यांनी आणि मान्यवरांनी विनय जाधव यांना मिळालेल्या यशाबद्दल कौतुक केले. पाहुण्यांच्या हस्ते यांचा सत्कार झाला या सत्काराने ने भाराऊन गेले त्यांच्या डोळयातून आनंदाश्रु वाहु लागले. एक मोठा अवंढा गिळून त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. सैन्यात भरती होण्यासाठी कसे खडतर प्रशिक्षण पूर्ण कराव लागल. त्यासाठी आपली मुळ्ठतच प्रकृती सुदृढ पाहिजे छाती, दृष्टी, उंची या गोष्टी नियमाप्रमाणे व्यवस्थित असल्या पाहिजेत. प्रशिक्षणाच्या काळात विविध कौशाल्य शिकवली जातात. प्रतिकुल हवामानमध्ये राहण्यांची सवय पाहिजे. अर्या अनेक गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत व सैनिकांचे जीवन किती खडतर प्रवासातून जाते हे सांगितले.
या नंतर निवृत्त कर्नल मा. आगाशे यांनी आपले सैन्यातील कांही अनुभव सांगितले. सैनिकांचे जीवन किती खडतर आणि अवघड आहे. सरकार देखील सैनिकांची खूप काळजी घेते. चांगला व योग्य पगार मुलांना रिक्षणात आणि नोकरीत सवलत. कुटुंबांची काळजी घेणे. सैनिकांना कांही वेळा अपंगत्व येते किंवा प्राण हानी होते. तेव्हा सरकार किती मदत करते. या सर्व गोष्टींचा खुलासा केला. तेव्हा ते म्हणाले सरकार नेहमी आपल्या पाठीशी असते. तेक्हा कोणीही घाबरून बसू नये मोठ्या संख्येने सैन्यात भरती झालेस. संरक्षण खाते सुसज्ज होईल. यांतर आभार प्रदर्शान होऊन कार्यक्रम संपलां मी मात्र सैनिकांच्या जीवनातील प्रसंगांची कल्पना करत केव्हा घरी पोहोचले हे समजलेच नाही.
२. सायकल्चे आत्मकथन :
आज रविवार असलेले घरातील आवरा आवरीची कामे शुरू होती. अंगणातील वहानावर बरीच धूळ दिसून आली म्हणून मी ती पुसू लागलो. तेव्हा एका कडेला पडलेल्या सायकलमधून. आवाज आल्यासारखे वाटले म्हणून पाहिले तर सायकल माइयाशी चक्क बोलत होती. ती म्हणत होती कि बंडूच्या वाढदिवसाची भेट म्हणून मला घरी आणले पहिल्यांदा बंडू माझी खूप काळजी घेत असे आता माझ्याकडे पहात देखील नाही. आता तो मोठा झाला आहे. कॉलेजला बाईक वरून जातो. मग माझी गरज काय ? पण असे म्हणून चालणार आहे काय. सर्वांनी सायकल सोडून बाईक वापरायची ठरविली तर आपल्याल्गा पेट्रोल्ची प्रचंड आघात करावी लागेल. यासाठी मोठे परदेशी चलन पाहिजे. आपला देशा अजून ही विकसनशील आहे. देशासमोर इतर मोठे प्रश्न आहेत मग आपण पेट्रोलची बचत केली पाहिजे. शिवाय पेट्रोलच्या वापराने प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल विघडतो. तेव्हा पेट्रोलच्या वापराने प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल बिघडतो. तेक्हा पेट्रोल वाहनांचा वापर मर्यादितच पाहिजे.
हल्ली या पिढीकडून माझी उपेक्षा चाल्ली आहे. पण पूर्वी मात्र मी कारखान्यातून चकचकीतपणाने दुकानात आलेली राला कॉलेजमधील मुलं माइयाकडे आशाळभूत पणाने बघत होती. मुलांना वाढदिवसाला किंवा परीक्षेतील कराबद्दल सायकल भेट म्हणून दिली जात होती. सिनेमामध्ये सुद्धा एखादे गाणे सायकल वरून म्हंटले जात होते. आणि महत्त्वाचे म्हणजे पोस्टमन काका तरी मैलोतमैली प्रवास सायकली वरून करून पत्र वाटत होते त्याचप्रमाणे डॉक्टर सुद्धा आरोग्यासाठी व फुप्फुसाला व्यायाम मिळावा म्हणून सायकल वापरण्याचा सल्ला देत होते. हा सर्व वापर बघून मला खूप आनंद होत होता. त्यामुळे या सर्व माणसांस केही माझे नाते घट्ट झाले होते.
आता परिस्थिती बदलत चालली आहे. खेड्यातील लोकसंख्या कमी होऊन शाहराच्या विस्तार वाढत चाल्ला आहे. शहरातील एका टोकापासून दुसया टोकास जाण्यास वेगवान वाहनाची गरज पडत आहे. यामुळे कांही जण बाईकचा वापर करू लागले यातूनच बाईक वापरणे एक फैशान किंवा प्रतिष्ठेची बाब बनली आणि माझा वापर कमी होत चालला. पण असे असले तरी माझी उपयोगिता आता सर्वांच्या लक्षात येत आहे. इंधन समस्येवर उपाय म्हणून चीनमध्ये एक माणूस एक सायकलची घोषणा लोकप्रिय आहे. त्याप्रमाणे तेथे सायकलचा वापर सुरू आहे. हल्ली सायकल स्पर्धांचे मोठ्या प्रमाण आयोजन केले जाते. सायकल रैली, स्लो सायक्लींग क्रीडास्पर्घेत सायक्लींगचा समावेश गोष्टीमुले सध्या माझे महत्त्व लोकांना पटू लागले आहे. तेक्हा तू पण माझा वापर सोडू नकोस एवढे ऐकण्यावर रस्त्यावरील कर्णकर्कटा हार्नच्या आवाजाने भानावर आलो आणि सायकल म्हणजे बरोबर आहे हे पटले.