MARCH 2020
मराठी (प्रथम भाषा)
विभाग १ : गद्य
प्रश्न १.
(अ) उतास्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) एका राब्दात उत्तर लिहा.
(i) फणसांच्या कोक्यांचा रंग-
(ii) पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड-
फणस ? त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आहे. आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत. लादली गेलेली नजरेत भरताहेत. फणसाला फुले धरत नाहीत तर पौष-माधात त्याला हिरवे कोके येतात, फुगीर मिरचीसारखे मग एकेक कोका दुभंगतो. वरचे टरफल तपकिरी होऊत गळते. आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकात असतो. मग काही दिवसानी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वदिल पांढच्या किडीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्याएवढा फणस तयार होतो. अगदी बुंध्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्धे मातीत पण गाडले जाते.
रूपरसगंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणच्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही पसरट गोल, अशी ही काळीकबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात मला.
(२) चूक की बरोबर ते लिहा:
(i) चैत्रात फणस फुलांनी डवरतो.
(ii) कधी कधी फणसाचे फळ अर्धे मातीत पण गाडले जाते.
(३) स्वमत:
तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
(अ) उतायाचा आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कृती करा :
सुरुवातीला रूपालीचं आणि सोनालींच मुळीच पटेना. रूपाली सोनालीवर भूंकायची आणि सोनालीही फिसकून अंगावश जायची. तीन चार दिवस हा प्रकार चालू होता; पण चार दिवसानंतर दोघींचीही गट्टी जमली. मग एकत्र बसणं, झोपणं सुरू झालं. हिंडताना रूपाली पुढे व सोनाली मागे. रूपाली सीनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता. पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका लळा लागला, की त्यांच जेवणही एकत्र होऊ लागलं आणि रूपालीप्रमाणे सोनालीही माइयाजवळ माइयां पायथ्याशी झोपू लागली.
झोपायची वेळ झाली. की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे; पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नक्तता. बिछान्यात आली. की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन् रूपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछान्यात चालायची. दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत, थकल्या-दमल्या, की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत.
(२) कोण ते लिहा :
(i) झोपताना लहान मुलासारखं थोपटावं लागणारी-
(ii) फुस्स करून अंग टाकून झोपी जाणारी-
(३) स्वमत:
‘प्राण्यांना प्रेमाने वागवले तर ते ही माणसांशी प्रेमाने वागतात’, या विधानाविष तुमचे मत लिहा.
(इ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) उत्तरे लिहा :
(i) आनंदी होण्याचा उपाय लिहा.
(ii) जीवनात चालू असलेला प्रत्येकाचा प्रयत्न लिहा.
जीवनात प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी चालू असतो अनेक प्रकारच्या संकटांनी ग्रस्त व त्रस्त झालेली माणसे दुःखी असावीत यात आश्चर्य ते काय ? पण जीवनातील सर्व सुविधांची सुबत्ता ज्यांच्याजवळ आहे, अशी सधन माणसेही दु:खाचीच कहाणी सांगतात. अनेक बाह्य कारणानी स्वतःला माणसे दुःखी बनवीत असतात. विवेकानंदांच्या मते, अहंकाररहितता व स्वार्थनिरपेक्षता यांशिवाय आनंदप्राप्ती होणार नाही.
मनुष्य मूर्खपणाने व स्वार्थाने स्वतःलाच केवळ आनंदी बनविण्याचा विचार करतो. त्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा करतो; पण खरा आनंद स्वार्थाला मारण्याने मिळणार आहे. आनंदी होण्यासाठी इतरत्र धावण्याची गरज नाही. स्वार्थी वृत्ती अशी आहे की, स्वार्थामध्ये बाधा आल्यास ती दुःखी बनविते. त्यामुळे ती स्वार्थी वृत्तीच त्यागावी. हा आनंदी होण्याचा उपाय ठरेल, असे ते म्हणतात.
(२) आकृतिबंध पूर्ण करा :
उत्तर १ :
(अ) .
(i) फणसांच्या कोक्यांचा रंग- हिरवा
(ii) पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड- फणस
२. (i) चैत्रात फणस फुलांनी डवरतो. चूक.
(ii) कधी कधी फणसाचे फळ अर्धे मातीत पण गाडले जाते. बरोबर
३. चैत्र महिना म्हणजे जणू बसंत ऋतूचे हदयच होय. चैत्रास बसंत ऋतूचा राजा म्हणून ओळखले जाते. या महिन्यातच झाडांना फुल-फळांचा बहर आलेला असतो. म्हणूनज यास मधुमास असे सुद्धा म्हणतात. झाडांची जुनी पाने गळून त्यांना नवी पालवी फुटलेली असते. पिंपळा झाड़ाकडे पाहिल्यावर जेव्हा गुलाबी रंगाची भडक पाने दिसतात तेव्हा वाटते गुलाबी रंगाच्या रेशमी पताका नाचवत ही झाडे उभी आहेत. करंज्याच्या झाडावर पांढरी, हिरवी, निळी, जांभळी या रंगांची नाजूक वळी पाहिल्यावर वाटते जणू टोपडे घातलेला घनश्याम या फुलांच्या रूपाने पृथ्वीवर अवतरला आहे.
सर्वत्र उत्साहाने आनंदाचे वातावरण असते. जुनी मरगळ जाऊन नवचैतन्य निर्माण होते.
(अ) १. रूपाली सोनालीवर भूकायची
सोनाली फिसकून रूपालीच्या अंगावर जायची
२. (i) सोनाली
(ii) रूपाली
३. प्राण्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात. त्यांना आपण त्यांचाशी कसे वागतो हे समजते. त्यांचा रागराग केला किंवा त्यांच्याशी प्रेमाने वागले तर आपल्या मनातील भावना त्यांना ओळखतात पण त्यांना बोलता येत नसल्याने त्या भावना तो शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत पण त्यांच्या कृतीतून त्या निश्चितच व्यक्त होतात.
माणूस जसा प्राण्यांबरोबर वागतो तसेच प्राणीही माणसांबरोबर वागत असतात. अगदी माणसे अशी आपल्या जवळच्या माणसांची आतुरतेने वाट पाहताात तसेच प्राणीही आपल्यावर माया करणान्या माणसाची वाट पाहतात. तो दिसताच त्याच्या पायात घुटमळणे, त्याने आपल्या अंगावरून हात फिरावा म्हणूनच त्याच्या मागे-पुढे करणे यातून ते आपल्या भावना व्यक्त करत असतात.
यावरून प्राण्यांना प्रेमाने वागविले असता ते ही आपल्याशी प्रेमाने वागतात. हे विधान अतिशय सार्थ आणि योग्य आहे हे पटते.
(इ)
१. (i) स्वार्थी वृत्तीचा त्याग (ii) आनंदी होण्यासाठी प्रयत्न
२. (i) अहंकाररहितता (ii) स्वार्थनिरपेक्षता
विभाग २ : पदच्च
प्रश्न २.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) उत्तरे लिहा :
(i) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
(ii) मुलगा खेळत असलेला खेळ लिहा.
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खेळते आहे एक मुलगी केव्हाची
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.
ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर.
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’ ती म्हणते,
‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील ?’
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
तशी हसून म्हणते ती, ‘आता तू.’
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर.
दोन्ही हातांनी थोपटत, झोपवतो बाहुलीला प्रथम,
मग शोधतो पातेलं भाजीसाठी……
हळ्ठहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
माइया घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उदयाच्या जगाचं
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) घराच्या झरोक्यातून पाहणारी-
(ii) चेंडूचे कसब दाखवणारा-
(३) खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा :
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
(४) काव्यसौंदर्य :
खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थसंदरंदर्य स्पष्ट करा:
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’ ती म्हणते,
‘मी दोन्ही करु शकते एकाच वेळी. तू करशील ?’
(आ) खाल्रील मुदद्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खाल्त्रिल कृती सोडवा :
(इ) रसग्रहण
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा:
‘वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.’
उत्तर २ :
१. (i) स्त्री-पुरुष समानता (ii) चेंडूचा खेळ
२. (i) कवयित्री निरजा (ii) मुलगा
३. ‘आश्वासक चित्र’ या कवितेतून कवयित्री निरजा यांनी लहान मुलांच्या खेळाच्या माध्यमातून समाजात-स्त्री-पुरुष समानता निश्चितीतच केव्हानरी रुजेल असा आशावाद व्यक्त केला आहे.
भातुकलीचा खेळ खेळणान्या मुढीपासून थोडचा अंतरावर एक मुलगा चेंडू खूप उंच उडवून तो हातात अचूकपणे हात झेलण्याचा खेळ खेळतो आहे.
४. आजच्या स्त्री-पुरुष विषमतेच्या काळात कवयित्री निरजा यांनी भावी काळत स्त्री-पुरुष समानता नक्कीच येईल हे आश्वासक चित्र या कवितेच्या माध्यमातून खात्रीपूर्वक सांगितले आहे.
या कवितेतील पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला मुलगा जेव्हा बाहुलीने खेळणान्या दृष्टीतून म्हणतो तू भाजी बनव पाल्याची छानपैकी तेव्हा सार्थ अभिमानाने ती म्हणते मी एकावेळी दोन्ही गोष्टी करू शकते तशा तू करू शकशील का ?
(आ)
‘उत्तमलक्षण’ किंवा ‘ खोद आणखी थोडेसे’ | ||||||||||||||||||||||||||||
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | संत रामदास | आसावरी काकडे | ||||||||||||||||||||||||||
(ii) कवितेचा विषय | आदर्श व्यक्तीची लक्षणे |
| ||||||||||||||||||||||||||
(iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे |
|
|
(इ) कवि द. भा. धामणस्कर यांनी वस्तू या कवितेतून भारलेने जोडल्या गेलेल्या कोणल्याही निर्जीव वस्तूचे आपल्या आयुष्यातील महत्त्व ओळखून त्या वस्तूशी असलेले आपणे भावनिक संबंध प्रत्येकाने जपावेत असा मोलोचा संदेश दिला आहे.
आपल्या आयुष्यात अनेक वस्तू येत असतात, खरेतर त्यावस्तू निर्जीव अल्यात पण त्या वस्तूंच्या रोजच्या वापराने आपत्याला त्या वस्तूंविषयी ओढ बाटू लागते त्यांच्याविषयी प्रेम बाव लागत त्यांची आपल्यात सवयच होऊन जाते आणि त्या निर्जीव वस्तूंना भावना असतात, मन असते समजून जर वापरू लागलो तर या वस्तू सुखावतात, त्यांना आनंद होतो असे या ओळींतून कवी आपले मन व्यक्त करतात.
या ओळीतून वस्तू ‘सुखावतान असा मानवी भावनाविषकार व्यक्त झाला आहे. म्हणजे यातून चेतनगुणोक्ती अलंकार संपला संवेदनशील मनामध्ये निर्माण होणारी भावव्याकूलता येथे निवेदनात्मक स्वरूपात साकार झाली आहे. ही काव्यपंक्ती मुक्त छंदात्मक असून याचे विशेष म्हणजे चिंतनशीलता भावोल्कता व प्रांजलपणा.
विभाग ३ : स्थूल्वाचन
प्रश्न ३.
खाल्रील्प्पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
१. ‘माणुसकी पेरणे काळाची गरज’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
२. ‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद लिहा.
३. स्वाती महाडिक यांनी स्वतःचा निर्धार पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमाविषयी माहिती तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर ३ :
१. आजच्या जगात माणूस आपल्यातील माणूसपण हरवत चालला आहे. दरोडे, खून, युद्ध, दहशतवाद, भ्रष्टाचार अशाअनेक घटनांमुळे हे सत्य आपल्यासमोर येत आहे. स्वार्थ, स्वतःचा फायदा आणि नवनवीन तंत्रज्ञान यांच्या आहारी जाऊन मायूस आपल्याच माणसांना दुरावत चालला आहे जर माणसाकडे माणुसकी नसेला तर त्याला माणूस कसे म्हणावे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आज जगात असे कितीतरी लोक आहेत की जे वेदनेने विह्ललत आहेत. मदतीसाठी राहो फोडत आहेत पाण माणुसकी हरवलेल्या या जगात यांच्याकडे लक्ष देण्यासही कोणाकडे वेळ नाही.
अशा या माणुसकी हरववेल्या माणसांमध्ये जर माणुसकीचे बीज रुजविले त्यांना जर चांगल्या संस्कारांचे खतपाणी पालतू घातले आणि त्यांची योग्यप्रकारे जपणूक केली तर माणुसकीचे हे रोप जोमाने वाढेल आणि माणुसकीचा गुण वागणारा माणूस
निर्माण होऊन जगभर सुख व समाधान नांदेल.
माणसात जर सुख, शांती आणि समाधानाने जगायचे असेल तर माणसाच्या ठिकाणी माणुसकी पेरणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येक माणसाने प्रयत्न केले पाहिजेत.
२. ‘यडबंबू ढब्बू’ या कादंबरीच्या नावातच लेखिकेने विनोद साधलेला आहे. लहामुलानां या नावाचीच गंमत वाटते. अतिशय मनोरंजक असलेल्या या कादंबरीतून लेखिकेने ढब्बूची स्वभाववैशिष्टये सांगितली आहेत. सुरुवातीला ढब्बू ताईच्या साखरपुडयासाठी केलेली मिठाई गरीब मुलांना देण्यास तयार होत नाही परंतु कोणाला दुखवू नये. सर्वांतर प्रेम करावे हे त्यांच्या आईंचे म्हणणे पटते जेक्हा दुपारी घरातील सर्व माणसे झोपले असतात तेक्हा वाह्यांना देण्यासाठी आणलेली मिठाई ढब्बू सर्व भिकान्यांना वाटून टाकतो.
या ढब्बूच्या कृतीतून त्याच्या संरकारक्षम मनाचे दर्शन घडते त्याच्या आईने केलेल्या संस्काराचा ठसा जसा त्याच्यामनावर उमटतो तसाच बालवाचकांच्या मनावरही उमटतो.
यातून विनोदातून बालमनावर संरकारनिर्मिती किमान साधली आहे.
३. ‘वीरांगना’ या पाठात महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी त्यांचा भावुक वीरपत्नी ते वीरांगना अशा घडलेल्या धाडसी प्रवासाचे वर्णन केले आहे.
विवाहानंतर अल्पावधीतच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. त्यावेळी त्यांना दोन छोटी अपत्ये होती पण परिस्थितीने खचून न जाता आपल्या दोन्ही अपत्यांना पती संतोष महाडिक यांच्याप्रमाणे मिलिटरीचे शिक्षण देऊन सैन्यात भरती करण्याचा धाडसी निर्णय घेतले होते. देशाला दोन फौजी देण्यात मला खूप मोठा आनंद व समाधान मिळेल असे त्यांना मनोमत वाटत होते.
पतीच्या निधनानंतर वयाच्या चाळिसावा वर्षी त्यांनी स्वतः सैन्यासत भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून वयाची अट शिथिल करून घेतली.
अहोरात्र अभ्यास करून स्टेट सिलेक्शन बोर्डची अत्यंत अवघड परीक्षा पहिल्या प्रयत्नातच यशस्वी झाल्या. लेफ्टनंट पदासाठी चेन्नई येथील कॅम्पमध्ये ट्रेनिंग चालू असताना त्यांच्याबरोबर असणाच्या इतर सहअध्ययनार्थीपेक्षा दहा, बारा वर्षांनी मोठच्या असूनही त्या प्रशिक्षणात कायम आघाडीवरच राहिल्या. त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागले.
त्यांनी केलेले कठोर परिश्रम व त्यासाठी लागणारी जिद्द आणि चिकाटी यामुळेच लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना त्यांचा देशसेवेचा निर्धारक पूर्ण करता आला.
विभाग : भाषाभ्यास
प्रश्न ४.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
१. समास :
योग्य जोडया लावा:
सामासिक शब्द | समासाचे नाव | ||
(i) विदच्चाधन | द्विगू | ||
(ii) पंचारती |
|
२. शब्दसिद्धी :
खालील तक्ता पूर्ण करा :
बिनचूक, शेजारीपाजारी, दुकानदार, वटवट
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
३. वाक्प्रचार:
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(१) तगादा लावणे
(३) कान देऊन ऐकणे
(२) अचंबित होणे
(४) कंठस्नान घालणे.
(आ) भाषासौंदर्य
१. शब्दसंपत्ती
(१) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
(i) महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे-
(ii) केलेले उपकार जाणणारा –
(२) खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा:
(i) वाट
(ii) शक्ती –
(३) खालील राब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) दुमत-
(ii) नापीक –
(४) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
(बाल व पण हे शब्द वगळून)
बालपण
२. लेखननियमांनुसार लेखन
अचूक शब्द ओळ्खा ( कोणतेही चार शब्द सोडवणे ) :
(i) आधूनिक, आधुनिक, आधूनीक, आधुनीक
(ii) दीपावली, दिपावली, दिपावलि, दीपावलि
(iii) परिक्षा, परीक्षा, परीकशा, परीक्षा
(iv) नीर्जीव, निर्जिव, निर्जीव, नीर्जिव
(v) हार्दीक, हार्दिक, हारदिक, हारदीक
(vi) पूरस्कार, पुरसकार, पुरस्कार, पूरसकार
३. विरामचिन्हे :
खालील विरामचिन्हे ओळख़न त्यांची नावे लिहा:
(i) ? –
(ii) –
૪. पारिभाषिक इाब्द
खालील राब्दांना प्रचलित मराठी भाषेतील राब्द लिहा.
(i) Drama
(ii)
उत्तर ४ :
(अ) १
सामासिक शब्द | समासाचे नाव |
(i) विदयाधन | कर्मधारय |
(ii) पंचारती | द्विगू |
२.
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
दुकानदार | बिनचूक | शेजारीपाजारी वटवट |
३. ( १ ) तगादा लावणे-एखादन्था गोष्टीसाठी मागे लागणे
वाक्य-रोहनने सहलीला जाण्यासाठी परवानगी दे असा आईच्या मागे तगादा लावला.
( २ ) अचंबित होणे-आश्चर्यचकित होणे
वाक्य-होस्टेलमधे राहिलेली माधवी अचानक आई-बाबांना समोर पाहून अचंबित झाली.
( ३ ) कान देऊन ऐकणे-लक्षपूर्वक ऐकणे.
वाक्य-परीक्षा हॉलमध्ये दिलेल्या सूचना सर्व मुले कान देऊन ऐकत होती.
( ४ ) कंठस्नान घालणे-ठार मारणे
कक्य-भारतीय सैनिकांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले.
(आ)
१. १. (i) महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे – मासिक
(ii) केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
२. (i) वाट – रक्षा माग्ग
(ii) शक्ती – ताकद, बल
३. (i) दुमत- एकमत
(ii) नापीक – सुपीक
४. बालपण-बाप, बाण
२. (i) आधूनिक, आधुनिक, आधूनीक, आधुनीक-आधुनिक
(ii) दीपावली, दिपावली, दिपावलि, दीपावलि-दीपावली
(iii) परिक्षा, परीक्षा, परीकशा, परीक्षा-परीक्षा
(iv) नीर्जीव, निर्जिव, निर्जीव, नीर्जिव-निर्जीव
(v) हार्दीक, हार्दिक, हारदिक, हारदीक-हार्दिक
(vi) पूरस्कार, पुरसकार, पुरस्कार, पूरसकार-पुरस्कार
३. (i) ? – प्रश्न चिन्ह
(ii) ! – उद्गार चिन्ह
४.
(i) Drama – नाटक
(ii) Tax – कर
विभाग ५ : उपयोजित लेखन
प्रश्न ५.
(अ) खात्त्रिल कृती सोडवा.
१. पत्रलेखन
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
किंवा
२. सारांशालेखन
विभाग-1 : गद्य (इ) (प्रश्न क्र. 1 (इ)) मधील अपठित गदय उताच्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या राब्दांत लिहा.
(आ) खास्रीसंकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
( शब्दमयादा प्रकारानुसार ६० ते ९० शब्द)
१. जाहिरात लेखन:
खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा:
२. बातमीलेखन :
‘नवमहाराष्ट्र विदयालय, शिरवळ’ या विदन्यालयात शिक्षक दिन साजरा झाला. या समारंभाची बातमी तयार करा.
३. कथालेखन :
खालील मुद्दन्चांच्या आधारे कथा लिहा:
एक गरीब मुलगा – पैसे नाहीत-शाळेचा खर्च करणे अशक्य – सकाळी पेपर टाकण्याचे काम —वाटेत पैशचे पाकिट मिळते – प्रामाणिकपणाने पोलिसस्टेशनवर नेऊन देतो — पाकिटाच्या मालकास आनंद — बक्षीस.
(इ) खाल्रील लेखनप्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. :
१. प्रसंगलेखन :
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
२. आत्मकथन :
दिलेल्या मुद्क्यचांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
३. वैचारिक :
‘भारत माझा देश आहे’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर ५. :
(अ) १.
पत्रलेखन
अमित जगदाळे,
ए-७, श्री निवास,
कर्वे रोड, अहमदनगर.
दिनांक : १० डिसेंबर, २०XX
प्रति,
माननीय व्यवस्थापन, अजय पुस्तकालय,
शिवाजीनगर, औरंगाबाद,
विषय : पुस्तकांच्या मागणी बाबत
महोदय,
सर्वप्रथम अजय पुस्तकालयच्या अमृतमहोत्सव निमित्त आपण सर्वांनास मनःपूर्वक शुभेच्छा !
मी अमित जगदाळे गेली ५ वर्षापासून नियमित वाचक आहे. नेहमी प्रमाणेच मी यंदाही आपल्या अजय पुस्तकालयातून अत्यंत महत्वपूर्ण पुस्तके मागबू इच्छितो. सोबत पुस्तकांची यादी पाठवत आहे. तरी ही सर्व पुस्तके दिलेल्या पत्यावर लवकरात लवकर पोहोच कराविन ही विनंती. मागविलेत्या पुस्तकांवर योग्य ती सवलत देबून पुस्तकांबरोबरच बील पाठवावे म्हणजे पुस्तके मिळाल्यावर रक्कम आपणास पाठवता येईल.
पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे :
क्र.म. | पुस्तकाचे नाव | लेखन | प्रती |
१. | माझी जन्मठेप | वि.दा. सावरकर | २ |
२. | मन में है विश्वास | विश्वास नांमरे पाटील | २ |
३. | वळीव | शंकर पाटील | ? |
४. | आनंद ओवरी | दि. बा. मोकाशी | १ |
५. | तुही यत्ता कंची | नामदेव ढसाळ | ? |
कृपया पुस्तके लवकरात लवकर पाठवावेही विनंती. कळावे,
आपला विश्वासू,
अमिता जगदाळे
ए-७, श्री निवास,
कर्वे अहमदनगर रोड,
ई-मेल : amitjag-3@gmail.com.
अमिता जगदाळे
आभारपन
ए-૪०७, अथर्व ,
सर्क्हे नं. ७, एम. जी. रोड, पुणे,
दिनांक : १० जाने, २०खX
प्रति,
मा. श्री व्यवस्थापक
अजय पुस्तकालय,
शिवाजी नगर, औरंगाबाद
महोदय,
अमृतमहोत्सवी दिनानिमित्त आपण मी केलेल्या मागणीनुसार सवलतीच्या दरात जी पुस्तके पाठवली आहेत त्याबद्दल मी आपले मनापसून आभार मानते. ही पुस्तके आपण वेळेवर व भरपूर सवलतीत दिल्यामुळे मला खूप आनंद झाला आपल्या अमृत महोत्सवी दिनाची खूप खूप शुभेच्छा. आपणाकडून आम्हास नवनवीन पुस्तके वांचानयास मिळतातय या निमित्त आणखी नवनवीन साहित्यळही मला वाचायला मिळाव्यात या अपेक्षासह आपल्या सर्विसाबद्दल पुनश्य आभार !
धन्यवाद.
आपला विश्वासू,
अमिता जगदाळे
ए-૪०७, अथर्व,
सर्क्हे नं. ७, एम.जी.रोड
पुणे.
ई-मेल ameeta071@gmail.com
२. सारांशलेखन:
प्रत्येक माणूस जीवनात आनंद शोधत असला तरी संकटग्रस्त व त्रस्त माणसे जी वनात दुःखी असतातच सुबत्ता, सघनता असलेली माणसेही दु:खी असतात. हे दुःखी असण्याचे कारण त्यांच्यातील स्वार्थीवृत्ती व अहंकार हे होय. स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वार्थीवृत्तीचा, अहंकाराचा त्याग केला तरच त्यांचे जीवन आनंदी होईल. मात्रात्या आनंदासाठी प्रत्येक माणसाने अहंकाररहितता व स्वार्थनिरपेक्षता सपलीपाहिजे.
(आ) १. जाहिरालेखन :
२. बातमीलेखि :
शिक्षक दिन समारोह
५ सम्टेंबर २०९९
शिख्क, प्रतिनिधी,
शिक्षक येथील नवमहाराष्ट्र विद्यालय ५ सम्टे, २०९९ रोजी शिक्षक दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गडबड सुरू होती. इयत्ता दहावीच्या विद्याथ्यांनी या दिवशी संपूर्ण शाळेची जबावदारी घेतली होती. स्वीपर, शिपायांपासून प्रचार्यांपर्यंतची भूमिका ते ते विद्यार्थी पार पाडत होते. तर कोणी कार्यालयीन नोंदी करत होते. कोणी मिटिंगच्या तयारीला लागले होते तर कोणी कार्यक्रमाच्या. नेहमीचे शिक्षक, प्राचार्य, शिपाई मात्र मारत. निरीक्षण करून. मारताना दिढाळे बेल वेळेवर न वाजविल्याने त्यास उपप्राचार्य रागवतही होते.
प्रत्यक्ष शिक्षकदिन समारंभाला सकाळी ११:३० वाजता झाली. विद्यालयाच्या प्राचार्य व उपप्राचार्य हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्ज्वल झाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्य नंद घणगे यांनी केले आपल्या आवडत्या शिक्षकांची भूमिका निभवनाय्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नेहमी शियायांवर व शिक्षकांवर भिडणारे विद्यार्थी आज त्यांचच भरभरून कौतुक करत होते. शिक्षकांचे आनंदी चेहरे खूप काही सांगून जात होते. इयत्ता दहावीच्या वर्ग शिक्षकांनी संहिता कुलकर्णी व निशांत माळे यांनी विदन्याथ्य्यांचे मार्गदर्शन केले. अभ्यासासाठी टिप्स् दिल्या तर विद्च्चालयाचे प्राचार्य यांनहीही विद्न्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रवासाविषयी सर्व माहिती दिली. सर्व विदच्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन शिक्षकांचे सत्कार केले तर वर्गशिक्षक नीती यांनी वीच्या वर्गप्रतिनिधिकडून शळा सांभाकणाय्या सर्व विद्यार्थी, शिक्षकांचे, प्राचार्य, उपप्राचार्य, शिपाई यांना गुलाबपुष्प व स्वामी विवेकानंद चरित्र हे पुस्तक भेट दिले. शेवटी अमिता दीक्षित हिने सर्वांचे आभार मानले व यास वर्षी शंभर टक्के इयत्ता दाहावीचा निकाल देण्याचे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता केली.
३. कथालेखन :
‘जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो’ हे गाणं ऋषीला खूप आवडतय. कारण तो नेहमी हे गाणं गुणगुणत असे. माझी आणित्याची दोस्ती तशी इयत्ता तिसरीतच झालेली होती. तो आमच्याघरी ‘ दैनिक सकाळ’ घेऊन यायचा. एवढ़्या लहान वयात तो काम करतो याच माइया आईला खूप कौतुक त्यामुळे सुरुवातीस राग येई पण तो अभ्यासात इतका हुशार की आभची मैत्री कधी झाली हे ही समजले नाही. वर्गात कायम आमच्या दोघांमध्ये पहिला, दुसरा नंबर असायचा. तसा तो स्वतःविषयी खूप कमी बोलत असे पण तो इथे मामाकडे राहतो. हे सर्व समजले होते. शिवाय घरात मामीला कामात मदत करणे. मामाच्या कामात मदत अणि मग राहिला वेळ त्याच्यापाठीचा असे. शाळेतही तो ऑल राऊंडर होता. खेळात त्याच विशेष प्राविण्य. अभ्यासेतर उपक्रमही त्याच्या जिक्हाळयाचे विषय.
गाण्यासाठीचा त्याचा गोड आवाज तो किशोर कुमारची हुबेहूब नक्कल करी. त्याला याच गाण्याचा सराव करायचा होता ‘ जिसका कोई नही उसका तो ‘….’ ‘ मी रागानेच आज त्यास थांबविले व त्याच्या आईबाबांविषयी चौकशी करू लागलो. तो मला टाळतोय हे लक्षात आले पण मी आज त्याच्याकडून उत्तर मिळवणारच होतो. शेवटी त्याच्याही मनाला माझा हट्ट समजला. आम्ही जवळच असलेल्या पोलिस ग्राउंडवर गेलो. जवळच्या रिकामी पाहून बाकावर बसलो आणि मला कळलही नाही तो खूप रडू लागला. मीही छरलो. पण नंतर त्यास धीर दिला. तो शांत झाला पण मला एक भयंकर घटना समजली तो जेव्हा सात वर्षाचा असेल तेव्हा त्याचे
प्रत्यक्ष तुकाराम महाराजांना आमचे सानिघ्य खूप आवडत असे. अशी माझ्या पूर्वजांची ओळख व इतिहास.
मी लिंबाच झाड़ मात्र तुमच्या शाळेच्यास बाजूला उभा आहे. तुम्ही मुलं माइया अवतीभोवती असला तेक्हा मला खूप आनंद होते. पण माझा गुण धर्म कडवट असल्याने काही मुले माझ्याजवळयेतही नाहीत तेक्हा मला वाईट वाटतय. माइया शेजारी गुलमोहरचे झाड़ उभा आहे तिथे तुम्ही त्याच्या अंगाखांद्यावर उड्या मारता, खेळता, बागडता. त्याची लाल, पिवळी फुले खाता. आंबट गोड अशा चवीमुळे ते इतरांनाही देता. इतकेच नाही तर त्याच्या कळयाही घेऊन जाता. तो सुंदर दिसतो. म्हणून तुम्हाला तो आवडतो पण खरे सांगू मित्रांनो माझा रंग हिरवा असला, माझा गुणधर्म कडू असला तरी मराठी वर्षाची (नवीन वर्ष) सुरुवात करताना प्रत्येकाच्या घरात ‘गुडी’ उभी करताना माइया कोवळचा फुलांना मान असतो. ते प्रसाद म्हणून तुम्ही सेवनही करता, कारण का तर तुमचे शरी आरोग्य निरोगी राहावे म्हणून. म्हणजे मी तुमच्या आरोग्याची काळची घेतो. हे तरी तुम्ही मान्य कराल ना ? दुसरे महत्त्वाचे म्हणजे मी तुमचे रक्तही शुद्ध करतो. तुमच्या शरीरातील आजार पळवून लावतो. दातही स्वच्छ ठेवतो. इतकेच नक्हे तर मी तुम्हाला हवाही शुद्ध देतो. मग आता सांगा ‘तुमच्या उपयोगी कोण पडतय ? मी का गुलमोहर ? दुसरे म्हणजे माइया फळांपांसून, पानांपासून तेल, शॅम्पू व साबणही तयार करतात. कृषी राजा-कीटनाशक म्हणून माझा वापर करतो. निंबोळी खत तयार केले जाते. माइयामुळे उपद्रव करणान्या कीटकांचा मी नाश करतो. तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवतो. तरीही तुम्ही माझ्याजवळ येत नाही. त्यामुळे मला वाईट वाटते.
पण पर्वा निशांत यशला माइयाविषयी माहिती देत होता. तो त्याला सांगत होता की कडूनिंब हे औषधी झाड आहे म्हणून याच्या सानिघ्यात आपण रोज दहा बसले पाहिजे. असेही तो म्हणत होता. हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला. आणि नंतर लक्षात आले की आता माझी ओळख निशांतला त्याच्या मराठी विषयातील ‘वसंत दृश्य चैत्र’ या पाठातून ‘दुर्गा भागवत’ या लेखिकेने करून दिली. मित्रांनो अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे माझा गुणधर्म कडवट असला तरी माझा गंध मंत्रमुग्ध करणारा असल्याने पंडित कुमार गंधर्वनी माझ्यावर एक राग गायला आहे. ‘ निमोरिका’……….असा, तो राग मला ऐकू ये तो आहे तेव्हा मी आता तुमची रजा घेतो. गुडबॉय मित्रांनो !
३. भारत माझा देश आहे-
गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे।
आणिन आरतीला हे सूर्य चंद्र तारे॥
ही कवीची रचना कानावर पडली की छाती अभिमानाने फुलते. मन आनंदाने बहरते. प्राचीन संस्कृतीने नटलेली संत महंतांची परंपरी अस्लेली, वीर श्रींचा इतिहासा असलेला, लोकशाही प्रधान माझा भारत देश. या देशाचा मी नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. वि. दा. सावरकरांनी साता समुद्रापलिकडून देशाला साद दिली होती.
ने फज्ञी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला।
निसर्गाच्या समृद्धिने नटलेला, धर्मनिरपेक्ष असा हा देश एकात्मतेने नांदतो आहे. या देशाची ‘कृषिप्रधान देश’ ही ओळखतर होतीय मात्र आता. ‘डिजीटल इंडिया’ अशीही ओळख आपल्या देशाची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांच्या हक्क, कर्तव्यासाठी राज्यघटना तयार केली. त्याचे पालन आजही केले जात आहे. आगरकर, टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, मा. गाँधी, पं. नेहरू, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, अशा दिग्गज नेत्यांनी भारतालाच नक्हे तर प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संगणक युगात त्याच बरोबर अंतराळात ही आपला देश झपाटच्याने प्रगती करतो आहे. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांनी भारतसाठी ‘ २०२०’ चे स्वप्न पाहिले होते. मात्र आज हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवत आपला देश एकविसाव्या शतकात झेपावतो आहे. जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरणासारखे धोरण स्वीकारून पुढे आपले स्थान आंतराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित करताना दिसतो. हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आज भारताला सन्माननीय नरेंद्र मोदींसारखे कुशल पंतप्रधान लाभले आहेत. तेव्हापासून देशाने मागे वळ्न न पाहता फक्त विकास, प्रगती यावरच भर दिलेला आहे. त्यांनी अनेक देशांशी भरताचे संबंध प्रस्थापित केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघातही देशाचे स्थान प्रस्थापित केले. ही प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इतकेच नक्हे तर विश्वशांतीसारखा संदेश देत प्रत्येक देशांबरोबर सत्कार व मित्रताचे नाते निर्माण केले जात असताना दहशतवादाचाही समूळ निःपात केला जात आहे. स्वच्छ भारत अभियान, प्लॉस्टिक बंदी, जम्मू-काश्मिरमधून ३७० आर्टिकल व ३५अ रद्द करणे, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री फसल योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना, प्रधानमंत्री छात्रवृत्ती योजना, असे कितीतरी उपक्रम राबविले जात आहेत. म्हणजेच या देशात प्रत्येक नागरिकांचा विचार केला जातो. त्यांना सक्षम बनविले जाते. भारत देशात दुराचारी वुत्तीमुळे वा विकृतीमुळे स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होत असले तरी कायद्यांतर्गत सुधारणा करून मुर्लीना, स्त्रियांना कायदयाद्वारे संरक्षण दिले जाते आहे. प्रत्येक मुलीला धाडसी बनविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या सर्व गोष्टींमुळे मला माझा भारत देश आवडतो कारण भारत माझा प्रिय देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माइया देशावर माझे प्रेम आहे कारण-
हे राष्ट्र देवताचे, हे राष्ट्र प्रेषितांचे।
हा चंद्र, सूर्य नांदो, स्वातंत्र भारताचे ॥