MARCH 2022
मराठी (प्रथम भाषा)
विभाग 1 : गदय
प्रश्न 1.
(अ) उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) कोण ते लिहा :
(i) भरपूर दूध देणारी –
(ii) जवळपास साडेपाच फूट उंचीची –
माझी आजी. जवळपास साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. नवन्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसच्या – आमच्या – पिढीवर हुकूमत गाजवणाच्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच; पण मोत्यासारखे चमकत राहयचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहच्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहन्याची ठेवण, ताठ कणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी. कपाळावरचं गोंदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते.
आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. कपिली दूधही भरपूर दयायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न् चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची.
(2) खलील वाक्ये चूक की बरोबर ते लिहा :
(i) लेखकाची आजी धार काढायला निघायची. –
(ii) लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती.-
(3) स्वमत:
लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
(आ) उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) नावे लिहा :
(i) गर्दीनं फुललेलं स्टेशन –
(ii) अरुणिमाचे गाव –
दोस्तांनो; मी अरुंणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर ‘माऊंट एक्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी! पण एक सांगू? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही नव्हते धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला
लखनऊपासून 200 किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे माझं गाव. घरी मी. आई., लहान भाऊ. मोठ्या बहिण तीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुंुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणान्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य, पण फुटबॉल आणि क्हॉलीबॉलची नेशनल चैम्पियनशिप मिळाल्यावर ‘आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील’, हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि. ‘कॉल लेटर’ आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुक़वलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. 11 एप्रिल, 2011 चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली.
(2) कारणे लिह्न :
(i) अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते, कारण- ………………………….
(ii) अरुणिमाने ‘सीआयएससफ’ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला, कारण -………………………….
(3) स्वमत:
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
अपठित गद्य
(इ) (1) आकृती पूर्ण करा :
सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना
सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशांच्याजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणूस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभावच जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावतः पशूची असते. त्यामुळे त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे ? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते.
(2) चौकटी पूर्ण करा :
(i) सुजनांकडून अपेक्षित असलेले-
(ii) सौजन्यातून व्यक्त होणारे-
उत्तर 1. (अ)
(1)
(i) भरपूर दूध देणारी – कपिला गाय
(ii) जवळपास साडेपाच फूट उंचीची – आजी
(2) (i) लेखकाची आजी धार काढायला निघायची. – चूक
(ii) लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती.- बरोबर
(3) स्वमत: आजी जवळपाच साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची नवन्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसन्या – आमच्या – पिढीवर हुकूमत गाजवणाच्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नक्हती. दात सगळे शाबूत तर होतेच. पग मोत्यासारखे चमकत राहयचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहन्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेसन्याची ठेवण. ताठ कणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नऊवारी बरकल लुगडी. कपाळावरचं गोंदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का.
(आ) (1) नावे लिहा :
(i) गर्दीनं फुललेलं स्टेशन – लखनऊ
(ii) अरुणिमाचे गाव – आंबेडकरनगर
(2) कारणे लिहा :
(i) अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते, कारण- फॉर्ममध्ये जन्मतारीख चुकलेली होती.
(ii) अरुणिमाने ‘सीआयएससफ’ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला, कारण – तिला खेळाशी जोडलेले रहाता यावे.
(3) स्वमत : प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. तसेच त्यांच्या आवडीही वेगळ्या असतात. कोणाला नृत्य आवडते तर कोणाला गाणी अवडतात. तर कोणाला इतरांना मदत करायला आवडते. असेच आपल्यामधे कुठले गुणकौशल्य आहेत हे आपण शोधून ते अंगीकृत केले पाहिजेत. नेमके हेच अरुणिमाने केले. अपंग असलेली अरुणिमा स्वभावाने खूप जिद्दी होती. तिने तिच्यातला वेगळेपणा शोधून त्यालाच स्वतःची ढाल बनवून आयुष्याच्या लढाईत ती उत्तमपणे लढली.
अशीच अरुणिमा प्रत्येकामधे असते, गरज आहे फक्त तिला शोधण्याची.
(इ) (1) (i)
सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना
(2) चौकटी पूर्ण करा :
(i) सुजनांकडून अपेक्षित असलेले – सौजन्य
(ii) सौजन्यातून व्यक्त होणारे प्रेम
विभाग 2 : पद्य
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) चौकटी पूर्ण करा :
(i) कष्टाने मिळणारे –
(ii) घामातून फुलणारे –
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले….
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा
(2) योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा :
(i) सुखलोलुप झाली काया म्हणजे ………………………
(अ) सुखाचा तिरस्कार वाटतो (इ) सुखाचे आकर्षण वाटते
(आ) सुखाबद्दल प्रेम वाटते (ईं) सुख उपभोगण्याची सवय लागते
(ii) पिंजरा सोडून झेप घेतल्याने………………………..
(अ) काया सुखलोलुप होते (इ) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते
(आ) पाखराला आनंद होतो (ईं) आकाशाची प्राप्ती होते
(3) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा :
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
(4) काव्यसौन्दर्य :
‘आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा’
या ओठ्ठीमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
(आ) खालील मुद्दयांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा :
मुद्दे | ‘आश्वासक चित्र’- किंवा-‘वस्तू’ | |
(i) प्रस्तुत कवितेचे | ||
कवी/कवयित्री- | ||
(ii) कवितेचा विषय- | ||
(iii) शब्दांचे अर्थ लिह्र- | (i) झरोका- | (i) स्नेह- |
(ii) कसब- | (ii) निखालस- |
($) खासी दिलेल्या काष्यपंष्तींचे रसग्रहण करा :
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको; सारी
खोटी नसतात नाणी.
उत्तर 2.
(अ) (1)
(i) कष्टाने मिळणारे फळ
(ii) घामातून फुलणारे मोती
(2) (i) सुखलोलुप झाली काया म्हणजे-(ई) सुख उपभोगण्याची सवय लागते
(ii) पिंजरा सोडून झेप घेतल्याने-(इ) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते
(3) या कवितेमध्ये कवीला असे सांगायचे आहे की, हे पाखरा देवाने तुला आकाशात उडण्यासाठी पंख दिलेले आहेत. स्वतःच्या सामर्थ्याचा स्वीकारं करून तू दरी, डोंगर, हिरवी राने यांना ओलांडून नद्या – समुद्रा पलीकडे उंच आकाशात उडत रहा.
(4) कवी जगदीश खेबूडकर यांनी वरील कवितेत पारतंत्र्यात निपचीत पडलेल्या माणसांना तसेच परावलंबी झालेल्या मनाला मोलाचा उपदेश करून स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगितले.
कवी पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन करतात. स्वतः जवळ असलेली सत्ता, संपत्ती, वैभव या गोष्टी कवीला सोन्याचा पिंजरा वाटतात. त्यामुळे जिवाची गती मंदावते आणि प्रगतीही थाबते. जवळ असलेल्या सुखसोईमुळे माणसाचे कर्तृत्व थांबते.
म्हणून ध्येयरूपी मोकक्या उंच आकाशात तू झेप घे. अशी शिकवण देणारे आवाहन कवी पाखराला करतो.
(आ)
(इ) ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमध्ये कवयित्रीने जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी संयम, जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी या गुणांची माणसाला सकारात्मक उमेद दिली आहे. आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगितले आहे.
कोणतेही कार्य करतांना धीर सोडू नये. जेवढी माती खोलवर खणाल तरपाण्याचा झरा निर्मळच मिळेल आणि हे प्राप्त करण्यासाठी हतबल न होता अविरत प्रयत्न चालू ठेवावेत. यामधून मिळणारा आनंद हा अक्षय झराच असतो, असे वरील ओळींद्वारे कवयित्रीने स्पष्ट केले आहे.
विभाग 3 : स्थूलवाचन
प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोड़वा :
(1) भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(2) गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.
(3) व्युत्पत्तीकोशाचे कार्य स्पष्ट करा.
उत्तर 3.
(1) रेखा मिश्रार्जींचे कार्य हे राष्ट्राला संतुलित वळणावर आणण्याचे आहे. आज समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढलेला असून त्याचे विपरीत परिमणामही आपल्याला दिसून येतात. या माध्यमांद्वारे मुल्र-मुलींची फसवणूक केली जाते. अशाच वेळी रेखाजी त्यांना त्यांच्या भविष्य काळाची जाणीव करून देत त्यांना चुकीच्या मार्गापासून दूर करतांना दिसून येतात.
कायद्याची मिती ही प्रेमाने समजावून सांगतात आणि अशाच पद्धतीचे युवा पिढीला घडवण्याचे देशकार्य रेखाजी करतांना दिसून येतात.
(2) गिरिजा कीर यांनी बालकांसाठी विलक्षण साहित्य निर्मिती केली आहे. यामधे त्यांनी दोन विशिष्ट वयोगटाचा (नऊ ते बारा वर्ष) आणि (पाच ते नऊ वर्ष) यांसाठी नाटिका लेखन केले. साध्या सोप्या भाषेत पण विनोदात्मक लेखन त्यांनी केलेले आहे.
कुणालाही दु:खी ठेवू नये’ आईने असा दिलेला उपदेश कायम स्मरणात ठेवला व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट त्याने भिकान्यांना वाटले, त्यामुळे भिकारी खूप आनंदी झाले पण घरातील मंडळी प्रचंड रागावली. भिकारीही माणसेच असतात असा व्यापक विचार डब्बूने मांडला. बोलणे आणि आचरणात आणणे यातील विरोधाभास वरील उदाहरणाद्वारे आपण पाहू शकतो.
(3) Refer SSC Paper March, 2023, Answer 3. (1).
विभाग 4 : भाषाभ्यास
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
(1) समास :
योग्य जोयया जुळवा :
सामासिक शब्द | समासाचे नाव |
(i) विटीदांडू | द्विगू |
(ii) नीलकमलं | समाहार द्वंद्व |
(iii) पंचपाळे | इतरेतर द्वंद्व |
(iv) भाजीपाला | कर्मधारय |
(2) शब्दसिद्धी :
खालील तक्ता पूर्ण करा :
अभिनंदन, हळ्ठहळ्ू, सामाजिक, उपमुख्याध्यापक
प्रत्ययघटित | उपसर्गघटित | अभ्यस्त |
(3) खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(i) कानोसा घेणे
(ii) आनंद गगनात न मावणे
(iii) कंठस्नान घालणे.
(iv) पित्त खवळणे.
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
(i) दुसन्यावर अवलंबून असलेला –
(ii) दररोज प्रसिद्ध होणारे –
(2) खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा :
(i) पृथ्वी – …………………………….
(ii) नभ – …………………………….
(3) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(i) सुरुवात – …………………………….
(ii) सोय – …………………………….
(4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा :
राखणदार (राखण व दार हे शब्द वगळून)
(2) लेखननियमांनुसार लेखन :
अचूक शब्द ओळखा (कोणतेही चार शब्द सोडवणे) :
(i) दूर्मीळ/दुर्मिळ/दूर्मिळ//दुर्मिळ (iv) आशिर्वाद/आर्शीवाद/आशीर्वाद/आर्शिवाद
(ii) पीढी/पिढी/पिढि/पीढि (v) उज्ज्वल/उज्वल/ऊज्ज्वल/ऊंज्वल
(iii) कुटुंब/कुटूंब/कूटूंब/कूटुंब (vi) सामुहिक/सामूहिक/सामूहीक/सामुहीक
(3) विरामचिन्हे :
खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा :
(4) पारिभाषिक शब्द :
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा :
(i) Unit –
(ii) Action –
उत्तर 4.
(अ) (1) योग्य जोड्या जुळ्वा :
सामासिक शब्द | समासाचे नाव |
(i) विटीदांडू | इतरेतर द्वंद्व |
(ii) नीलकमलं | कर्मधारय |
(iii) पंचपाळे | द्विगू |
(iv) भाजीपाला | समाहार द्वंद्व |
(2) अभिनंदन, हळूहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक
प्रत्ययघटित | उपसर्गघटित | अभ्यस्त |
सामाजिक | अभिनंदन, उपमुख्याध्यापक | हळूहळू |
(3) (i) कानोसा घेणे
अर्थ : अंदाज घेणे
वाक्य : चॉकलेट घेतांना कोणी बघत तर नाही याचा राजूने कानोसा घेतला
(ii) आनंद गगनात न मावणे
अर्थ : खूप आनंद होणे
वाक्य : मामाला घरात पाहून चिकूचा आनंद गगनात मावेनसा झाला.
(iii) कंठस्नान घालणे.
अर्थ : ठार मारणे
वाक्य : युद्धात सैनिकांनी शत्रूला कंठस्नान घातले.
(iv) पित्त खवळणे.
अर्थ : खूप राग येणे
वाक्य : राजूने अभ्यास केला नाही हे पाहून आईचे पित्त खवळले.
(आ) (1) शब्दसंपत्ती :
(i) दुसन्यावर अवलंबून असलेला परावलंबी
(ii) दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक
(2) (i) पृथ्वी – वसुंधरा (ii) नभ – आकाश
(3) (i) सुरुवात – शेवट (ii) सोय – गैरसोय
(4) राखणदार – खण, राख
(2) (i) दुर्मीळ (ii) पिढी (iii) कुटुंब
(iv) आशीर्वाद (v) उज्ज्वल (vi) सामूहिक
(3)
4. (i) Unit – घटक
(ii) Action – क्रिया
विभाग 5 : उपयोजित लेखन
प्रश्न 5.
(अ) खालील कृती सोडवा :
(1) पत्रलेखन :
किंवा
(2) सारांशलेखन :
विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उतान्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
(1) जाहिरात लेखन :
योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.
(2) बातमीलेखन :
कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.
या समारंभाजी बातमी तयार करा.
(3) कथालेखन :
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :
शाळेत जाणारा कष्टाळ, प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्यांची खरेदी – एक डागाळलेला – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – तात्पर्य.
(इ) खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा :
(1) प्रसंगलेखन :
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
(2) आत्मकथन :
दिलेल्या मुद्द्यांचा आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
(3) वैचारिक :
‘पर्यावरण जतन – काळाची गरज’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर 5.
(अ) 1.
पत्रलेखन
दिनांक :
प्रति,
मा. आयोजक,
साहित्य सेवा वाचनालाय, साखरवाडी.
E-mail : sahityaseva@gmail.com
विषय : राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत व पारितोषिक वितरण सोहळा यात सहभागी करून घेण्यासाठी विनंती पत्र
महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज करतो की, नूतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी विनंती पत्र लिहीत आहे.
ही स्पर्धा दि. 20.03.2021, सकाळी नऊ वाजता, हुतात्मा सभागृह, साखरवाडी येये आयोजित केली असून या उत्तम सोहळ्यान प्रमुख पाहुणे म्हणून श्री विक्रम मेहेंदळे व अध्यक्षा श्रीमती रेखा महाजन उपस्थित राहणार आहेत तरी आमच्या विद्यालयातील विद्याथ्यांना आपण संधी देऊन त्यांच्या गुण कौशल्यास वाव द्यावा ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
विनय देशमुख
(विद्यार्थी प्रतिनिधी)
किंवा
दिनांक : 25.03.20XX
प्रति,
अजय जोशी,
नूतन विद्यालय,
मोती नगर, सेलू
जि. परभणी.
पिन-431503
E-mail : ajayjoshi@gmail.com
प्रिय अजय,
स. नमस्कार.
आज सकाळी वर्तमानपत्रात, साहित्य सेवा वाचनालय साखखाडीद्वारे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तुला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याचे वाचले. त्यासाठी तुझे मनपूर्वक अभिनंदन! तुझे भाषण कौशल्य आणि स्पष्ट उच्चार यावर तूझे प्रभुत्व आहेच त्याचबरोबर शब्दांची योग्य ती निवड आणि मापक शब्दात विषय समजावून सांगण्याची कला ही तुझ्यात अंगीकृत आहे. हे मी सुरुवातीपासूनच जाणतो.
मित्रा, त्यामुळेच तर हे सर्व शक्य झाले आहे.
कळावे,
तुझा मित्र
विनय देशमुख
किंवा
- सौजन्याची अपेक्षा ही सुजनांकडून करायची कारण मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता व त्याबरोबरच नम्रतेची जोड मिळळी नर सोन्याहून पिवळ. अशा गुणांमुळेच आपण माणूस आहोत पशू नाही याची जाणीव होते सौजन्य ही मानसिक वृत्ती असून आपण जे चांगले आचरण करतो त्यालाच सौजन्य असे म्हणतो.
(आ) 1. जाहिरात लेखन :
- बातमीलेखन : मराठी भाषा गौरव दिन व राजभाषा मराठी दिन महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजे २७ फेब्रुवारीला साजरा करतात. साधनां विद्यालय, प्रांगणात मराठी भाषा दिन निमित्त विविध नृत्य, भाषणे आणि विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
माननीय श्री. शशीकांतराव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. पोवाडा गावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित पाहुण्यांनी विद्याथ्य्यांचे कौतुक केले आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी द्वारे करण्यात आले व सोहळा संपन्न झाला.
- कथालेखन-सीतापूरच्या ‘आदर्श विद्यालयात’ मुलांच्या वस्तिगृहात अमित नावाचा कष्टाळू व प्रामाणिक मुलगा रहात होता. तो अभ्यासात व खेळात हुशार असल्याने शिक्षकांना त्याचे कौतुक वाटायचे. तो जाधव सरांचा ल्खाडका होता. मात्र त्याची एक वाईट सवय होती. तो वाईट मित्रांच्या संगतीत रहात होता. त्याचे मित्र चोन्या करायचे, लोकांना त्रास दयायचे, ते वाईट व्यसनी आहारी गेले होते. पण ते अमितला देखील चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करायचे.
जाधव सरांना त्याची काळजी वाटायची. त्यांनी ठरवाल की अमितला समजावच आणि वाईट सवयीपासून परावृत्त करायच. त्यांना एक युक्ती सुचली. ते अमितला घेऊन बाजारात गेले. तिथे त्यांनी चांगले दर्जाचे आंबे घेतले. नतर वस्तिगृहात येऊन एक खराब आंबा त्यामधे ठेवायल्ग सांगितला, अमितने तसे केले. दोन दिवसांनी सरांनी अमितला आंब्याच्या पेटीतून थोडे आंबे आणायला सांगितले. आंवे खायला मिळणार या आनंदात त्याने पेटी उघडली आणि पाहणी केली तर त्या नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब झाले होते. अमितल्र धक्का बसला. जाधव सर म्हणाले, “हा सगळा संगतीचा परिणाम आहे! एका नासक्या आंब्यामुळे. बाकीचे आंबे खराब ₹ ले. त्याचप्रमाणे चुकीच्या माणसाच्या संगतीने चांगली माणसे विघडवू शकतात. यासाठी नेहमी चांगली संगत धरावी” सरांचे बोलणे स्त अभिते डोळे उघडके. त्याने वाईट मित्रांची संगत सोडण्याचे ठरविले.
तात्पर्य : नेहमी चांगल्या माणसाची संगत धरावी।
1. प्रसंगलेखन : बालकलाकारांनी विविध रंगेबेरंगी विविध चित्रांनी आलेल्या प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतले. चित्रांद्वारे त्यांचे आपले स्वतःची कल्पना व विचार व्यक्त करताना दिसून आले. परंतु मुलांच्या या प्रतिमेला संयोजक सुबक आकार देताना दिसले. यासाठी संयोजकांचे आभार मानले पाहिजे.
विशिष्ट चित्रकलेसाठी माइया मैत्रिणीचे सर्व प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. प्रोत्साहन हेच सर्वांसाठी मोठे पारितोषिक आहे असे मला वाटते.
प्रमुख पाहुण्यांनी माझ्या मैत्रिणीला व इतर मुलांना पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित तर केलेच पण त्याचबरोबर मुलांना चित्रकलेची अजून कोप्या पद्धतीने कुशी अवगत होते हे अगदी सोप्या पद्धतीने समजाबून सांगितले.
2. आत्मकथन : अरे जहाजामध्ये प्रवास करणारे प्रवास्यांनो ! आपण कोठून आला आहात हे मला ठाऊक नाही. जर तुम्ही येथे माइया किनान्याजवळीत भागात राहत असाल तर तुम्ही माझे जीवन चांगले पाहिले असेल. मात्र जर आपण दुर्गम भाग किंवा डोंगराळ भागातील असाल तर माझी जीवनकथा ऐकणे आपल्यासाठी अधिक मनोरंजक ठरेल.
माझ्या जन्मास लाखो वर्षे झाली. जेव्हा सूर्याने तयार केलेली पृथ्वी थंड होऊ लागली, तेव्हा त्याचे काही भाग संकुचित झाले आणि प्रचंड खड्डे बनले. वर उठलेल्या भागांना पर्वत म्हणू लागले आणि खाली असलेले खड्डे पाण्याने भरून गेले. असा माझा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत कोणालाही माहित नाही किती युग निघून गेले, मी आनंदाने आयुष्य जगत आहे.
आपण हा अतुलनीय जलस्त्रोत पाहात आहात, परंतु माझे पाणी त्याच्या वास्तविक स्वरूपात कोणाच्याही कामात येत नाही. बर्याच दिवसांपर्यंत या खारट पाण्याबद्दल मला वाईट वाटले. परंतु जेक्हापासून मनुष्याने या पाण्यापासून मीठ बनवण्यास सुरुवात केली आणि माझ्या ढगांनी गोड पाण्याने पृथ्वीला आनंदाने भरले, तेक्हापासून मला खूप समाधान वाटू लागले. आकाशात माझे सुंदर ढग खेळताना पाहून माझे अंग अंग हसते. त्यांज्चाकडून प्रथम वनस्पती, नंतर वनौषधी आणि तंतर मानवी सभ्यता जगात जन्मली. एक दिवस नौका आणि मोठी जहाजे माइयावर धावू लागली. मी या सर्वाबद्दल खूप आनंदी आहे. पण जेव्हा माणूस माइ्या प्रिय माशांना मारू लागला, तेव्हा माझे हददय रडू लागले.
खरेतर, माझ्या खान्या पाण्यात बर्याच मौल्यवान पदार्थ आहेत. माझे स्वतःचे सौंदर्य देखील अनन्य आहे. माझे सौंदर्य सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पाहण्यासारखे असते. पौर्णिमेच्या रात्री माझे सौंदर्य पाहून लोकांना आनंद होतो. माइया सौदर्यामुळे कितीतरी कवी आणि चित्रकारांना प्रेरणा मिळते. माझ्या अतंत लाटांचे संगीत किती गोड आहे! माझमुळेच माइयाशी समपर्वती असलेल्या ठिकाण ती वातावरण अगदी सारखे राहते, ना जास्त गरमी ना जास्त थंडी !
प्रभू रामचंद्रांनी माझा अहंकार मोडून मला आशीर्वाद दिला. मी माझ्या दीर्घ आयुष्यात बरेच अपघात देखील पाहिले आहेत. माइया प्रचंड पोटात किती जहाजे आहेत. बर्याच लोकांनी माइयामध्ये आत्महत्या देखील केल्या. कधीकधी माइया पाण्यामुळे आसपासच्या ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. वा वाईट आठवनीनी मला त्रास होतो.
मी शक्य तितक्याप्रकारे जगाचे चांगले करण्याचा प्रयत्न करतो. नद्या येतात आणि मला भेटतात, परंतु त्यांची स्वतःची इच्छा आहे, माझी हीच इचछा आहे की मी नेहमी आनंदाने लहरत राहिलो पाहिजे, मानवांची सेवा करत राहिलो पाहिजे!
- पर्यावरण जतन : पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवणे याला पर्यावरण संवर्धन असे म्हणले जाते. आणि ही आजच्या काळाची खूप मोठी गरज झाली आहे. मानवाच्या प्रगतीमुळे पर्यावरणाचे प्रदूषण खूप वाढले आहे. आणि त्याचमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचत आहे. पृथ्वीवरील अनेक प्राणी अन्नासाठी झाडावर अवलंबून आहेत. देशातील वाढती लोकसंख्या व कारखाने ह्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. अशामुळे ऑक्सीजनचे प्रमाण कमी होत आहे.
असाच जर पर्यावरणाचा ह्रस होत राहिला तर ही खूप मोठी समस्या बनेल. यासाठी सर्वप्रथम पर्यावरणाला हानिकारक असे जलप्रदूषण, वायुप्रदूषण व ध्वनि प्रदूषण यावर आपल्याला उपाय काढावे लागतील.
जगात ५ जुनला विश्व पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. प्रत्येक देशात पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून वृक्ष लगवडीसाठी ल्रोकांना आवाहन केले जाते.
आपणही अशा पर्यावरण संवर्धनात संपूर्ण योगदान देऊन होणारी पर्यावरणाच्या हानीची तीव्रता टाळू आगि पर्यावरणाची काळजी घेऊ.
“हिरवे शहर – स्वच्छ शहर”