MARCH 2023
मराठी (द्वितीय भाषा)
विभाग 1 : गदय
प्रश्न 1.
(अ) उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा :
(i) पहाटे चार वाजता शेवटची गाडी इथून जाते.
(ii) निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठले.
(iii) स्टेशन इथून खूप दूर होतं.
(iv) पुलावरचे रूळ चांगल्या स्थितीत होते.
रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुर्जींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परन्तुं मन मनायला तयार नक्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेक्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती.
निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं, त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रूळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या.
(2) आकृती पूर्ण करा :
(3) स्वमत:
तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.
(आ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) चौकटी पूर्ण करा :
(i) मावर्शींचे राहण्याचे ठिकाण
(ii) मावर्शींना लेकाने दिलेली भेट
(iii) झोपडीपुढे लावलेले झाड
(iv) निक्या तुकड्याच्या मधोमध उमटलेली
“मावशी, तुम्ही राहता कुठं ?”
“त्या टेकडीपल्याड”, मावशी म्हणाल्या.
“इथून किती कि.मी. आहे?”
“तीन.”
“तुम्ही कशा आलात इथपर्यंत ?”
“गेल्या मयन्यापतूर चालतच येत हुते; पन आता माज्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते”, अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते ? ही फिरस्ती तुम्ही कशी करता ? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत ?
रेखामावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यांतलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखामावशी तर फार गडबडून गेल्या. “आणि आता पाहा, या आहेत रेखामावशींच्या फूटप्रिन्टस
! असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसण तीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळ ‘आ’ वासून पाहत होते आणि त्या निळया तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली……..एकदम चंदेरी बखांत मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले…… सिल्कर फूटप्रिन्टस ! दि मोस्ट क्लिन फूटप्रिन्टस !!
“वाड पाहयलंत रेखामावर्शींचे पाय चंदेरी आहेत.”
(2) कोण ते लिहा :
(i) रेखामावर्शींची माहिती घेणारा-
(ii) चंदेरी पाय असलेल्या-
(3) स्वमत :
‘ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम’ तुमच्या शब्दात लिहा.
अपठित गद्य
(इ) उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) आकृती पूर्ण करा :
दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला तर आई त्याला भिक्षा घालत असे. एके दिवशी एक धडधाकट भिकारी आला असता रूक्मिणीबाई त्याला भिक्षा घालू लागल्या. विनोबा त्यांना म्हणाले,” हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा देत गेलो तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान केले तर त्यामुळे दान देणाच्याचेही अकल्याण होते.”
रूक्मिणीबाईंनी ते शांतपणे ऐकले आणि म्हणाल्या, “विन्या, पात्र-अपात्र यांची परीक्षा करणारे आम्ही कोण ? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्वररूप समजून त्याला शक्तीनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण”? विनोबांनी त्यावर टिपणी केलीय की, ‘आईच्या या युक्तिवादावर विन्याला दुसरा, युक्तिवाद सुचला नाही.’
(2) जोड्या लावा :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(i) दारावर भिक्षा मागायला येणारा | (1) रूक्मिणीबाई |
(ii) भिकाज्याला भिक्षा घालणाज्या | (2) विनोबा |
(iii) आईच्या युक्तिवादावर टिपणी करणारे | (3) भिक्षेकरी |
(iv) मुलाचे म्हणणे शांतपणे एकून घेणाज्या | (4) रूक्मिणीबाई |
उत्तर 1.
(अ)
(1) (i) चूक (ii) बरोबर (iii) बरोबर (iv) चूक
(2)
(3) स्वमत : आदर्श विद्यार्थी नेहमी साधी रहाणी व उच्च विचारसरणी या मंत्राचे पालन करतो. आदर्श विदयार्थ्यांचे उद्दिष्ट हे असते की, सदाचारी आणि आदर्श बनून इतरा वर्गबंधूंना मदन करणे. म्हणून तो गुरूजन, माता-पित्यांचा नेहमी आदर करतो. आपल्या वर्गबंधूवर प्रेम करतो. त्यांना मदत करतो.
(आ) (1)
(i) मावर्शींचे राहण्याचे ठिकाण टेकडीपल्याड
(ii) मावर्शींना लेकाने दिलेली भेट सायकल
(iii) झोपडीपुढे लावलेले झाड लिंबोणी
(iv) निळ्या तुकड्याच्या मधोमध उमटलेली सिलव्टर फुटप्रिन्टस
(2) (i) सुमित (ii) रेखामावशी
(3) ग्लोबल वार्मींगचे दुष्परिणाम :
ग्लोबल वार्मिंग म्हणजे पृथ्वीवरील तापमानात होणारी सातत्याने वाढ. आज पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. याल्गाच ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणून ओळखल्या जाते. पाण्याची वाफ, मिथेन आणि नायट्रोस ऑक्साइड हे ग्रीनहाउस वायू आहेत. पृथ्वीवरील हवामान बदलांना ग्लोबल वार्मिंग जबाबदार आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाहीं.
(इ) (1) वातावरणातील ऋतुचक्र बदलत आहे. ज्या प्रदेशात पावसाची गरज नाही तिथे पाऊस पडमो आणि जिथे गरज आहे तिथे नाही. अशामुळे हिमनद्या वितळून समुद्राची पातळी वाढते व त्यामुळे पूर येतात.
‘अ’ गट | |
(i) दारावर भिक्षा मागायला येणारा | (3) भिक्षेकरी |
(ii) भिकाज्याला भिक्षा घालणाज्या | (1) रूक्मिणीबाई |
(iii) आईच्या युक्तिवादावर टिपणी करणारे | (2) विनोबा |
(iv) मुलाचे म्हणणे शांतपणे एकून घेणाज्या | (4) रूक्मिणीबाई |
विभाग 2 : पद्य
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) चौकटी पूर्ण करा :
(i) डोळे भरून पहावी अशी-
(ii) मुठीमध्ये नसलेले-
नाही मुठीमधे द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त
काय करावें कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य;
जीव ओवाळ्यावा तरी
जीव किती हा लहान;
तुइ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;
वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,
धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचें;
तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी;
डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी
अशा असंख्य ज्योतींची
तुइयामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.
(2) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(i) कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते ? (ii) सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
(3) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा :
(i) द्रव्य – (iii) औक्षण –
(ii) आसवे – (iv) कल्लोळ –
(4) ‘सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा.
(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा :
उत्तर 2.
(अ) (1) (i) डोळे भरून पहावी अशी- विजयाची घोडदौड
(ii) मुठीमध्ये नसलेले- द्रव्य
(2) (i) हातात धन नाही, शरीरात रक्त नाही, काय करावे ते कळ्ठत नाही.
(ii) अवघड परिस्थितीतही सैनिक पुढेच पुढे जात आहे.
(3) (i) द्रव्य – धन, पैसा (iii) औक्षण – ओवाळणे
(ii) आसवे – अश्रू (iv) कल्लोळ – लोळ
(4) ‘होय, अगदी बरोबर आहे-कारण सैनिक सीमेवर तैनात आहे, त्यामुळेच देशात शांतता सुव्यवस्था नांदत आहे. नाहीतर सर्वत्र गोंधळ उडाला असता. सैनिक सीमेवर लढताना स्वतःच्या प्राणांचीही तमा बाळगत नाही. म्हणूनच आपले प्राण सुरक्षित आहे. सैनिक यासाठी प्राणांची आहुती देतांना आपल्या कुटुंबांचीही पर्वा करत नाही. म्हणून आपण आपले जीवन आपल्या निकटवर्ती यांसोबत आनंदाने व्यतीत करतो.
म्हणूनच सीमेवर तैनात असणाज्या सैनिकांसाठी आपण आदर व्यक्त केला पाहिजे.
(आ)
मुद्दे | ‘दोन दिवस’ किंवा ‘स्वज करू साकार’ | ||||||||||||||||||||||||||||
| कवी-नारायण सुर्वे | कवी-किशोर पाठक | |||||||||||||||||||||||||||
प्रस्तुत कवितेचा विषय- |
| देशभक्तीपर | |||||||||||||||||||||||||||
|
|
| |||||||||||||||||||||||||||
|
|
| |||||||||||||||||||||||||||
(5) |
|
|
|
विभाग 3 : स्थूलवाचन
प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याह्नी दोन कृती सोडवा :
(1) टीप लिहा – डॉ. होमी भाभा.
(2) सूर्य आणि पफती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिह्न.
(3) टीप लिह्म-
उत्तर 3.
(1) टीप लिह्य : डॉ. होमी भाभा
डों. होमी भाभा हे प्रख्यात अणुशास्त्रज होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हवा यासाठी ‘भाभा अंटॉमिक रिचर्स सेंटर’ या संस्थेला त्यांचे नाव देष्यात आले. लेखक डॉ. अनिल काकोडकर यांना भाभा अणुसंशोधन केंद्रात काम करत असताना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे व्यक्तिमत्व प्रचंड स्फूरी देजारे होते. ‘आपण काय काम करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केले पाहिजे’ ह अतिशय महत्वाचा व प्रेरणादायी विचार डॉ. भाभांनी डॉ काकोकडकरांच्या मनात रूजवला.
(2) सूर्य आणि पणती
सूर्य : अहो, कोणी ऐकतय का ? माझी अस्ताची वेळ झाली आहे. मी अस्ताला गेल्यानंतर या धरतीचे कसे होईल ?
पणती : हे महान सूर्या! मला तुइयाशी काहीतरी बोलायचे आहे.
सूर्य : बोल….पणती!
पणती : मी तुझी चिंता दूर करू इच्छिते. मला माहिती आहे, मी तुइयाइतकी सामर्थ्यवान नाही; पण मला जमेल तसा पृथ्वीवरील अंधकार दूर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
सूर्य : खरचं पणती, तू वाचवशील या पृथ्वीला ? तू करशील मदत मला ?
पणती : हो आनंदाने.
सूर्य : तू लहान आहेस; परंतु तुझी जिद्द मोठी आहे. तुझे हे बोल ऐकून माइ्या मनाला मोठा दिलासा मिळासा आहे.
(3) टीप लिहा:
सग्वारो कॅक्टस : सग्वारो कॅक्टस ही कॅक्टसच्या सर्व जार्तीमधील आकाराने मोठी आणि दीर्घ जीवनकाल असणारी जात आहे.
(i) साग्वारो कॅक्टसचे दिसणे: सग्वारो कॅक्टस हा हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. तो 50 फूट उंचीपर्यंत वाढतो; पण त्याची ही वाढ अतिशय मंद गतीने होते. 50 वर्षाच्या कालावधीत सग्वारो कॅक्टस फक्त 3 फूट वाढतो. याचा जीवनकाल 200 वर्षांचा असतो. सम्वारो कॅक्टसच्या शेंड्यावर येणारी फुलं पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. या फुलांमुळ बोचन्या ओसाड वाळवंटाला थोड्या कालावधीसाठी सौंदर्याचा स्पर्श होतो. याच्या या अनोखा वैशिष्ट्यांमुळे याला कॅक्टसचा राजा म्हणून ओळखले जाते.
(ii) सग्वारो कॅक्टसचे उपयोगः सग्वारो कॅक्टस हे वाळवंटातील प्रवासी आणि रहिवासी यांना वरदान ठरणारे एक उपयुक्त झाड आहे. पूर्वीच्या काळी अमेरिकेतील रेड इंडियन लोक याचा उपयोग अनेक प्रकारे करून घेत असत. दुष्काळात कॅक्टस ठेचून त्यातील पाणी कादून ते पीत असत. या कॅक्टसला येणान्या फळ्ठमधला गर कलिंगडाच्या गरासारखा लागतो. ही फळे रेड इंडियन लोक चवीने खात असत. या फळाचा गर साखर घालून मोरावळयासारखा टिकवताही येतो.
विभाग 4 : भाषाभ्यास
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
(1) खालील वाक्यांचा प्रकार ओकखा :
(i) राष्ट्रगीताचा मान राखा.
(ii) हुशारीचे किती ते तेज त्याच्या चेहच्यावर!
(2) कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा :
(i) तो दररोज व्यायाम करतो
(ii) मन अशांत नक्हते.
(3) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (फक्त दोन) :
(i) आर्जव करणे
(ii) उत्साहाला उधाण येणे
(iii) अंगाचा तिळपापड होणे,
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(i) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
शालीन ……………., आनंद ………………………..
(ii) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
खाजगी ………………….. चूक …………………..
(iii) वचन बदला :
बांगडी………………….. मित्र…………………..
(iv) लिंग ओळखा :
डोंगर ………………….. शिक्षिका …………………..
(2) लेखननियमांनुसार लेखन :
खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(i) इथले शीक्षक मनाने खुप श्रीमंत होते.
(ii) वाघीणीनं नाला पार करून बांबुच्या गंजीत पाय ठेवला.
(3) विरामचिन्हे :
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा :
(i) लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले
(ii) आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का
उत्तर 4.
(अ)
(1) (i) आज्ञार्थी वाक्य
(ii) उद्गारवाचक वाक्य (उद्गारार्थी)
(2) (i) दररोज व्यायाम कोण करतो ?
(ii) मन शांत होते.
(3) (i) आर्जव करणे – याचना करणे, विनंती करणे
सहलीला जाण्यासाठी सोहमने आईची आर्जव केली.
(ii) उत्साहाला उधाण येणे-खूप उत्साही वाटणे.
आवश्यक तसे वातावरण पाहून बळ्रीराजाच्या उत्साहाला उधाण येते
(iii) अंगाचा तिळपापड होणे – खूप राग येणे
मुलांनी केलेला घरभर पसारा पाहून आईच्या अंगाचा तिळपापड झाला.
(आ) (1) (i) शालीन- नम्र आनंद – हर्ष
(ii) खाजगी-सार्वजनिक; चूक-बरोबर
(iii) बांगडी-बांगड्या मित्र- मित्र
(iv) डोंगर-पुल्लिंग शिक्षिका-स्त्रीलिंग
(2) (i) इथले शिक्षक मनाने खुप श्रीमंत होते.
(ii) वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला.
(3) (i). लाल, हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले.
(ii) आईने नाराजी व्यक्त केली; पण त्याचा उपयोग झाला का ?
विभाग 5 : उपयोजित लेखन
प्रश्न 5.
(अ) (1) पत्रलेखन :
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा :
किंवा
(2) सारांशलेखन :
विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उतन्याचा एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
(1) जाहिरातलेखन :
योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.
(2) बातमीलेखन :
तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.
(3) कथालेखन :
खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा :
मुद्दे : अनाथ मुलगा-रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत- रस्त्यात एक पाकीट मिळते-वर्गशिक्षकांकडे देणे-पाकिटावरील पत्त्यावरून योग्य व्यक्तीपर्यंत पोहचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.
(इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा :
(1) प्रसंगलेखन :
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
(2) आत्मकथन :
चौकटीत घटकाचें आत्मकथन लिहा.
(3) वैचारिक :
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्तव’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर 5.
(अ) 1.
पत्रलेखन
अभय जोशी,
Le/2, कर्वे रोड,
गांधी कॉलनी,
अहमदनगर -431116
दिनांक : 15 डिसेंबर, 2022
प्रति,
माननीय, मुख्याध्यापक महोदय,
जनता विद्यालय,
अहमदनगर
मोबा. 0211556680
E-mail : jantavidyalay02@gmail.com
विषय : स्पर्धेसाठी सहभागी करून घेण्याबाबत विनती
आदरणीय सर,
मी अभय जोशी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, आपणांस विनंती करू इच्छितो की आपल्या विद्यालयात संपन्न होण्याज्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये नावे प्रविष्ट करण्यासाठी मी पत्र लिहीत आहे.
स्पर्धेकांची नावे व शळेचे लेटर हेड सोबत जोडत आहे. आवश्यक ती सर्व माहिती मी या पत्रासोबत जोडत आहे. स्पर्धा 2 जानेवारी सकाळी 10.00 वाजता असल्याने प्रविष्ट मुलांसाठी आवश्यक ती नियमावली आपण पाठवावी ही विनंती.
आपला विश्वासू
आपला विश्वासू
अभय जोशी
किंवा
आर्या जोशी.
75/3, सहकार नगर,
शिक्षक कॉलनी,
अहमदनगर -413001
प्रति,
मा. मुख्याध्यापक महोदय,
जनता विद्यालय,
अहमदनगर -413001
मोबा. -0211556686
E-mail : jantavidyalay02@gmail.com
विषय : अभिनंदन पर पत्र
आदरणीय सर,
आपल्या विद्यालयात नुकतीच संपन्न झालेली जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धा ही अतिशय उत्साहात पार पडली. सर्व विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने चित्र काढली. सर्वांनी स्पर्धेचा खूप आनंद घेतला
आपले अभिनंदन पर हे पत्र मी लिहीत आहे. सर सर्व तयारी अगदी उत्तम होती. प्रतिवर्षी आपण विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संकल्पना आणतात, ज्याचा आम्हा विशेष फायदा होतो.
धन्यवाद
आपली विश्वासु
आर्या जोशी
2. सारांशलेखन :
दारावर भिक्षा मागणाज्या, प्रत्येकाला आई भिक्षा घालत असे. भिकारी जर गरजवंत असेल तरच भिक्षा द्यावी असे विनोबांचे म्हणणे असे. अपात्राला दान केल्यास देशात आळस व देण्याज्याचे अकल्याण होईल. विनोबांनी आईंना टिपणी केली, पण आईनेही त्याच्या टिपणीवर युक्तीवाद केला. रूक्मिणीबाईंनी सांगितले की पात्र किंवा अपात्र ओळखणे हे आपल्या हातात नसते. दारावर आलेला प्रत्येक व्यक्ती हा परमेश्वररूप असतो. व्यक्तीने आळस न करता सतत कामात व्यस्त रहावे.
(आ) (1) जाहिरातलेखन :
(2) बातमीलेखन :
आर्या विद्धालय, अमळनेर ह्या आमच्या शाळेन 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला. विद्यार्थी व इतर यांनी सर्वांनी शिक्षकांचे कौतुक व कृतज्ञता व्यक्त किली. तसेच मुत्सद्दी, विद्वान, भारताचे राष्ट्रपती यांचे ही स्मरण करून श्रद्धाजली दिली. शळेच्या सरस्वती गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिय शिक्षकांसाठी नृत्यही सादर केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबाचे फुल व शुभेच्छापत्र देऊन अभिनंदन केले. विद्याथ्य्यांनी काही मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर केले. तसेच शिक्षकांनीही आपल्या शिक्षण क्षेत्रातील होणारे बदल सांगून त्यांच्या अपेक्षा वजा आमच्यावरील जबाबदान्या सांगितल्या.
अशा पद्धतीने कार्यक्रम अतिशय थाटामाटात व उत्साहात पार पडला. विद्याथ्र्यांचे कौतुक करत मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
(3) कथालेखन :
रोजच्याप्रमाणे गौतम सकाळीच उठला. त्याची रोजची दैनंदिन कामे उरकून तो शाके जात असे. गौतम अनाथ होता त्यामुळे त्याला स्वतः काम करून शिकवणीसाठी पैसा गोळा करावे लागत होते.
गौतम वर्तमानपत्र वाटपाचे काम करत असे. ते काम उरकून मग तो शाके जात असे. एकेदिवशी शाळेत जाता जाता त्याच्या पायाखाली काहीतरी वेगळीच वस्तू आली असे त्याला जाणवले. त्यानी वाकून पाहिले तर ते पैशाचे पाकीट होते. त्याने आश्चर्यांने आणि घाबरून ते पाकिट उचलले. कुणालाही काही न बोलता तो शाळेत हजर झाला.
शाळा सुरू झाली पण त्याचे मन बेचैन होते ही गोष्ट वर्गशिक्षकांच्या नजरेत आली. त्यांनी त्याला विचारल्यावर गौतमने पैशाचे पाकीट उघडल्यावर त्यात त्या व्यक्तीचा पत्ता तसेच नाव होते. वर्गशिक्षकांनी पाकिटातील सर्व माहिती पोलीसांना दिली.
दोन दिवसांनी एक तरुण ते पाकीट नेण्यास आला. पुरावे आणि ओळखपत्र दाखवून त्यानी पाकीट आपल्या ताब्यात घेतले. ते पाकीट बघून त्याचा आनंद गगनात मावेना. कारण त्या पाकिटामध्ये अति महत्त्वपूर्ण कागदपत्रे होती. त्याला गौतमबद्दल समजल्यावर त्याने त्याला बक्षीस दिले. अणि त्याचबरोबर त्याचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी संपूर्णतः मदत करण्याची जबाबदारी पण घेतली.
तात्पर्य : प्रामाणिकपणाचे फळ सदैव चांगलेच असते..
(इ) (1) प्रसंगलेखन :
एक हात मदतीचा!!
पुणे, येथील अश्वमेध सभागृहात दिनांक 15 डिसेंबर, मंगळवारी दिव्यांग मुलांनी तयारां केलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन सादर झाले. वेळ सं 10 ते रा. 8 पर्यंत होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्रीमती कला परांजपे यांच्या हस्ते झाले. ज्यामध्ये त्यांनी 35 दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वैशिष्टयपूर्ण वस्तूंचे दालनाचे भरून कौतुक केले. एकप्रकाचे त्यांना बळच दिले. खरचं मेला पण ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाइण्याची संधी मिळाली.
हे प्रदर्शन 15 ते 25 डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. ज्यामध्ये आपण निसर्गावर व अलेल्या परिस्थितीवर मात देऊन काहीतरी मिळवण्याच्या धडपडीवर काम करण्याचे कौतुक करणार आहोत व त्यांना आर्थिक निधी उभी करणार आहोत. हे प्रदर्शन पाहून माझे डोळे दिपून गेले. कला देताना व उपजत असताना निसर्ग माणसाची नक्हे तर त्याच्या गुणांची निवड करत असतो हे मात्र मी जाणून घेतले.
(2) आत्मकथन :
पुस्तक:
मी पुस्तक बोलतोय! लहान-मोठे, स्त्री-पुरूष सर्वांचा खरा साथीदार आणि खरा मार्गदर्शक आहे. मी प्रत्येकासाठी काम करतो. लहान मुलांना माझी रंगीत चित्र पाहून खुप आनंद होतो. मी त्यांचे मनोरंजन करतो, तसेच त्यांना शिक्षित करतो. जीवनाचे खरे यश मला वाचूनच मिळते, म्हण्जेच मी यशाची खरी गुरुकिल्ली आहे.
माझी असंख्य रूपे आहेत, जर हिंदूसाठी मी ‘रामायण’, ‘गीता’ किंवा ‘महाभारत’ आहे, तर मुस्लिमासाठी मी ‘कुराण-ए-शरीफ’ आहे. तर ख्रिश्चन मला ‘बायबल’ मानतात, तर सिख जण मला ‘गुरू ग्रंथ साहिब’ म्हणून वाचतात.
ज्यामुळे मानवी समाजात अनेक जाती आहेत, त्याचप्रमाणे माइ्याही अनेक जाती आहेत. कथा, नाटक, कांदबरी, कविता, टिका, निबंध इ. अनेक जाती आहेत. आणि मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, ज्ञान-विज्ञान शिक्षण इ. अनेक प्रकार आहेत.
माझे प्राचीन काळात जे रूप होते ते आता पूर्णपणे बदलले आहे. ज्यावेळी छपाईचा शोध लागला नक्हता, त्यावेळी, मौखिक ज्ञान देऊन गुरुज्ञान जीवनात अवलंबा लागायचे परंतु आता तसे नाही. आधुनिक काळात मी अगदी वेगळयाच स्वरूपात तुमच्या समोर आहे.
माझे वाचन करून तुम्ही तुमच्या वेळेचा चांगला उपयोग करू शकता. कारण मी ज्ञानाचे भांडार आहे. जगातील महापुरुष, शास्त्रज, ज्योतिषी सर्वांनी माझे वाचन करूनच उच्चांक गाठला.
म्हणूनच म्हट आहे “वाचाल तर वाचाल”.
(3) वैचारिक :
मानवी जीवनातील पाण्याचे महत्तव
पाण्याला माणसाच्या आयुष्यात जीवनाइतकेच स्थान आहे. म्हणजेच पाणी हे आपल्या जीवनात महत्तम स्थानी आहे. पाणी नसेल तर काय; या कल्पनेनेच आपण अस्वस्थ होतो. खरे आहे, पाणी हे फक्त मानवासाठीच नक्हे तर, पशु, प्राणी, वन्यजीव आणि सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. पाणी हे जीवनात सर्वंच गोष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका बंजावत असते.
पाण्यामुळे आपले जीवन, निसर्ग यांसर्वांमध्ये सुसुत्रता येते. दैनंदिन जीवनात; मोठमोठ्या कारखान्यामध्ये तसेच इतर सर्वच ठिकाणी पाण्याची आवश्यकता असते, पाणी जपून वापरावे यासांठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. यांसाठी सरकार वेगवेगळया योजना राबवत आहे.
महाराष्ट्रात काही भागात. अगदी कोरडवाहू जमीन आहे. अशा जमिनीला ओलावा प्राप्त करून तिला सुपीक जमीन बनवण्यासाठी तेथे पाण्याचा साठा वाढवावा लागेल. त्यासाठी आपल्याला पावसाच्या पाण्याचा साठा करून ठेंवणे आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीत आपोआपच ओलावा होण्यास सुरूवानी होईल. ‘पाणी अडवा, पाणी वाढवा’, ‘अशा नवीन संकल्पना सरकारद्वारे राबविण्यात येत आहेत. यासाठी समाजातील सर्वच स्तरातील नांगरिक पुढे येऊन समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत.