व्याकरण शब्दांच्या जाती

Day
Night

व्याकरण शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती

  • शब्द व शब्दांच्या जाती:
  • ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहास काही अर्थ प्राप्त झाला तर त्यास शब्द असे म्हणतात.
  • शब्दांचे विकारी (सव्यय – व्यय – बदल) व अविकारी (अव्यय – बदल न होणारे) असे दोन प्रकार आहेत.
  • नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापदाच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्ती व काळानुसार बदल होतात म्हणून त्यांना विकारी शब्द असे म्हणतात.
  • लिंग तीन प्रकारची आहेत – पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसकलिंग.
  • वचनाचे दोन प्रकार आहेत – एकवचन, अनेकवचन.
  • नाम / सर्वनामांचा वाक्यातील क्रियापदाशी / इतर शब्दांशी असणारा संबंध ज्या विकारांनी दर्शविला जातो त्यास विभक्ती असे म्हणतात.
  • विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या / सर्वनामांच्या रूपात जो बदल होतो त्यास सामान्यरूप असे म्हणतात.
  • क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी अव्ययांच्या रूपात कोणताच बदल होत नाही. म्हणून त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात.

Additional Important Questions and Answers

1. अधोरेखित केलेल्या शब्दांच्या जाती ओळखा.

प्रश्न 1.
उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात पाहिलं.
उत्तरः

उषावहिनी – विशेषनाम

प्रश्न 2.
तो कधी खाली पडत नाही.
उत्तरः

तो – सर्वनाम

प्रश्न 3.
काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात.
उत्तरः

पुस्तकं – सामान्यनाम

प्रश्न 4.
त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा ओथंबलेला आहे.
उत्तरः

आणि – उभयान्वयी अव्यय

प्रश्न 5.
माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता.
उत्तरः

माझा – सार्वनामिक विशेषण

प्रश्न 6.
पुष्कळशी त्यांच्याबरोबर गेली.
उत्तरः

पुष्कळशी – क्रियाविशेषण अव्यय

प्रश्न 7.
अगदी पहिली आठवण अशी, की आपणास दुपट्यात घट्ट गंडाळून ठेवले आहे.
उत्तरः

की – उभयान्वयी अव्यय

प्रश्न 8.
तिथे संवाद नसतो.
उत्तरः

तिथे – क्रियाविशेषण अव्यय

प्रश्न 9.
उषावहिनींनी घड्याळाकडे पाहिलं.
उत्तरः

कडे – शब्दयोगी अव्यय

प्रश्न 10.
मोहरीएवढ्या बिजापासून प्रचंड अश्वत्थ वृक्ष उभा रहावा तशी ही कादंबरी वाढत गेली.
उत्तरः

पासून – शब्दयोगी अव्यय

प्रश्न 11.
अलंकारामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त होते.
उत्तरः

सौंदर्य – भाववाचक नाम

प्रश्न 12.
हे हायस्कूल शंभर वर्षांवर जुनं आहे.
उत्तरः

शंभर – संख्यावाचक विशेषण

प्रश्न 13.
कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो.
उत्तरः

इमानीपणाच्या – गुणवाचक विशेषण

प्रश्न 14.
त्याच्या वाचनाचा वेग उत्तम होता.
उत्तरः

उत्तम – विशेषण

प्रश्न 15.
समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो.
उत्तरः

समाधानी – भाववाचक नाम

प्रश्न 16.
मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत.
उत्तरः

पण – उभयान्वयी अव्यय

प्रश्न 17.
ड्रायव्हर वर आला.
उत्तरः

वर – क्रियाविशेषण अव्यय

प्रश्न 18.
शीऽ, ही कसली साडी?
उत्तरः

शी – केवलप्रयोगी अव्यय

2. सूचनेनुसार सोडवा.

प्रश्न 1.
निशाने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. (क्रियापदाचा प्रकार ओळखा) – ………………………………
उत्तरः

सकर्मक क्रियापद

प्रश्न 2.
भूमीवरही फार मोठा भार पडू लागला. (क्रियापदाचा प्रकार ओळखा) – ………………………………
उत्तरः

संयुक्त क्रियापद