Chapter 11 वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
Textbook Questions and Answers
कृती
1. खालील कृती पूर्ण करा.
अ. टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.
प्रश्न 1.
उत्तरः
ज्ञानेंद्रिये | संवेदनांची उदाहरणे |
डोळे | दाईचे मोकळे हात दिसतात |
कान | पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो |
नाक | सुगंधी द्रव्याचा वास जाणवतो |
त्वचा | टबच्या आतील गुळगुळीत स्पर्श कळतो |
2. आकृत्या पूर्ण करा.
प्रश्न 1.
प्रश्न 2.
प्रश्न 3.
इ. सूचनेप्रमाणे सोडवा.
प्रश्न 1.
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
अ. मन:पटलावरील प्रतिमा [ ]
आ. ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी [ ]
उत्तरः
अ. शोभादर्शक
आ. न भूतो न भविष्यति अशा स्वरूपाचे कैलास लेणे
प्रश्न 2.
‘कादंबरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ हे अवाढव्य लिखाण साहित्यातील कोणत्या प्रकारात मोडते?
2. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न 1.
अ. मनाची कोरी पाटी.
आ. लोकोत्तर कल्पनाशक्ती.
इ. तपशिलांचा महासागर.
उत्तरः
अ. मनाची कोरी पाटी : ज्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार नसतात किंवा जे मन निरागस असते. चांगले किंवा वाईट यांचा विचार न करणारे मन म्हणजेच निर्विकार मन होय. लहान मुलांचे मन असे असते. जे समोर असते तेच त्यांच्यासाठी वास्तव असते. समोरचे वास्तव ते सहजपणे स्वीकारतात. त्यातल्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचा विचार करण्याची त्यांची तयारी नसते किंवा त्यांचे मन तेवढे प्रगल्भ नसते. त्यामुळे त्या वयात त्यांच्याकडून झालेल्या चुकासुद्धा क्षम्य असतात. कारण त्यांच्या मनाची पाटी कोरी असते. जी गोष्ट त्यांच्यासमोर असते त्याच गोष्टीचा ते विचार करीत असतात. बालमन कधीही अमूर्तासंबंधी विचार करीत नसते. ज्या ठिकाणी बालमन जाईल त्या सर्व गोष्टींचा ते मनापासून आनंद घेते कारण त्यांच्या मनाची पाटी कोरी असते.
आ. लोकोत्तर कल्पनाशक्ती : लोकोत्तर कल्पनाशक्ती म्हणजे विलक्षण असामान्य, अलौकिक अशी कल्पनाशक्ती, सर्वसामान्य माणसांमध्ये अशी विचार करण्याची क्षमता नसते. तत्त्वज्ञ, कवी, शास्त्रज्ञ, लेखक इत्यादी असामान्य माणसेच वेगळा विचार करू शकतात. त्यांच्या कल्पनाशक्तीची धाव असीम असते. जिथपर्यंत आपण साधारण माणसे पोहचू शकत नाही, अशी विलक्षण, असामान्य, अलौकिक अशा कल्पनाशक्तीची टॉलस्टॉयला जणू देणगीच लाभलेली होती. म्हणूनच या अजरामर, उदात्त, कितीतरी वेगळ्या, श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.
इ. तपशिलांचा महासागर : महासागर म्हणजे मोठा समुद्र. समुद्राच्या पाण्याची खोली किंवा व्याप्ती आपण मोजू शकत नाही. लेखिकेने टॉलस्टॉय यांनी लिहिलेल्या ‘युद्ध आणि शांती’ या अवाढव्य कादंबरीच्या लिखाणासाठी त्यांनी जे तपशील, संदर्भ गोळा केले त्यांना तपशिलांचा महासागर अशी उपमा दिली आहे. त्यावरून त्याने जमवलेल्या तपशिलांच्या माहितीची कल्पना येते. त्याने विविध प्रकारचे संदर्भ ग्रंथ रशियाचा इतिहास, रशियातील लोकांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केला मुलाखती घेतल्या. त्याने प्रवासातून, वाचनातून, लोकांच्या मनांतून, इतिहासातून इ. विविध माध्यमांतून तपशील गोळा केले व समुद्रमंथन करून एक अवाढव्य कलाकृती जगासमोर आणली.
3. व्याकरण.
अ. तक्ता पूर्ण करा.
प्रश्न 1.
उत्तरः
विशेषणे | विशेष्ये |
अर्थपूर्ण | आठवण |
अमर्याद | शक्ती |
वाङ्मयीन | शिल्प |
अजोड | कलाकृती |
आ. खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
प्रश्न 1.
- न्यून असणे
- मातीशी मसलत करणे
- अवाक् होणे
- अभ्यासाचे डोंगर पेलणे
उत्तरः
- न्यून असणे : आई गेल्यावर रमेशच्या मनात काहीतरी न्यून असल्याची भावना निर्माण झाली.
- मातीशी मसलत करणे : पाऊस पडल्यानंतर शेतकरी विविध कामांच्या आधारे मातीशी मसलत करतात.
- अवाक होणे : गणेशला दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळल्याचे ऐकून घरातले सगळेच अवाक झाले.
- अभ्यासाचे डोंगर पेलणे : डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यासाचे डोंगर पेलावे लागतात.
4. स्वमत.
प्रश्न अ.
टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तरः
सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोल्विच टॉलस्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते. लहानपणापासूनच त्यांच्या तरल संवेदनांची जाणीव लेखनातून स्पष्ट होते. त्यांची आई गेल्यानंतर त्यांच्या आत्याने त्यांचा संभाळ केला, त्यांना कुठेही आईची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांनी त्यांच्या तान्हेपणाच्या दोन आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यांच्या संवेदनांची आठवण सांगताना ते सांगतात की त्यांना दुपट्यात घट्ट गुंडाळून ठेवले आहे. त्यांना हतपाय हालवता येत नाहीत, त्यांना मोकळेपणा हवा आहे. म्हणून ते जोरजोरात रडत आहेत.
पण त्यांची व्यथा कोणीही समजू शकत नाही. दुसरी आठवण अशी की, पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या चिमुकल्या देहाचे अस्तित्व जाणवले. त्यांना दाईचे मोकळे हात दिसतात, त्यांना सगंधी द्रव्याचा वास येतो, पाण्याची उष्णता जाणवते, पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो, टबच्या आतील मऊ स्पर्श कळतो इतक्या लहानपणी संवेदना कळून प्रत्यक्षात त्यांचे वर्णन करणारा टॉलस्टॉय हा कदाचित जगातील पहिला माणूस असेल. मऊ, काळाभोर लाकडाचा टब, बाहया मागे दुमडलेला दाईंचा हात, पाण्याच्या कढत वाफा, चिमुकल्या हातांनी पाण्याशी खेळताना होणारा आवाज या सर्व संवेदनांची संकलित जाणीव आनंद देणारी आहे. त्यांच्या या तरल संवेदनांमुळेच मोठेपणी त्यांच्या हातून लिखाणाचे महान कार्य घडत गेले. प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या त्यांच्या संवेदना लहानपणापासून खूप तल्लख असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.
प्रश्न आ.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉयने केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कादंबरी दर्जेदार होण्यासाठी अनेक वेळा पुनर्लेखन केले. त्यामुळे ‘वॉर अण्ड पिस’ हे जगातील साहित्यातील वाङ्मयीन लेणे ठरले. लग्नानंतरची 15 – 16 वर्षे टॉलस्टॉयचा जीवनप्रवाह फारशी वळणे न घेता अनिरूद्धपणे वाहत राहिला. 1863 च्या अखेरीस ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लेखनास त्याने सुरुवात केली. ही कादंबरी लिहून पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा वर्षे लागली, या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड कष्ट घेतले. वास्तवाच्या चारही बाजूंचा अभ्यास करून त्यांनी लिखाण केले, त्यांच्या अभ्यासाचा आवाका फारच मोठा होता. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास केला आणि हा अभ्यास त्यांनी लिखाण पूर्ण होईपर्यंत चालू ठेवला.
अधिकृत इतिहास, रशियन व फ्रेंच इतिहासकारांनी लिहिलेला, त्या कालखंडाचा परामर्श घेताना एकाच घटनेतून दोन विरुद्ध पक्षांचे लोक असा काय अर्थ काढतात त्याचे सबंध, अन्वयार्थ त्याने समजावून घेतले. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले अपरंपार लिखाण हे सारे काही त्याने अक्षरश: घुसळून काढले. जणू काही तो त्याच काळात जगत होता, इतका अभ्यास त्याने या कादंबरीच्या लिखाणासाठी केला.
या सगळ्या अभ्यासामुळेच कादंबरीतली पात्रे जणू देहधारण करून त्याच्याशी वार्तालाप करू लागली होती. कादंबरी लिखाणासाठी त्याने विविध तपशिलांचा अतिशय चिकित्सकपणे अभ्यास केला, ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची त्याने खूप कसून नांगरणी केली, म्हणजेच शेतकरी ज्याप्रमाणे जमिनीची खूप मशागत करतो व त्यानंतर पीक घेतो, त्याचप्रमाणे टॉलस्टॉयने कादंबरी लिखाणाअगोदर विविध संदर्भाचा व दाखल्यांचा प्रचंड अभ्यास केला.
प्रश्न इ.
स्वत:चे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉयने केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
टॉलस्टॉयला स्वत:च्या सुप्तशक्तीवर विश्वास होता. लेखनवाचनाच्या बाबतीतही तो खूप चिकित्सक होता. त्याचे बालमनही त्या काळात प्रचंड व्यापक होते. विशेष म्हणजे त्याला दैनंदिनी लिहायची सवय लहानपणापासून होती. लहानपणापासूनच आपण इतरांसारखे सामान्य जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही ही त्याला जाणीव होती.
‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉयने जी मेहनत घेतली, अभ्यास केला ते पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. स्वतःचे लिखाण परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉयने कादंबरीचा मूळ आराखडाच तीन वेळा बदलला. कित्येक व्यक्तिरेखा मूळ आराखड्यात नव्हत्या. त्यांना नंतर प्रवेश मिळाला. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळेच हे शक्य झाले. त्याने विविध ऐतिहासिक घटनांचा तपशीलवार अभ्यास करून एकाच घटनेतून दोन विरुद्ध पक्षाचे लोक कसा काय अर्थ काढतात त्याचे सर्व अन्वयार्थ त्याने समजावून घेतले.
युद्धाचे वर्णन प्रत्ययकारी होण्यासाठी त्याने बोरोडिनोच्या युद्धभूमीस भेट दिली. त्याने कादंबरी लिखाणाला सुरुवात केली आणि कमीत-कमी बारा – पंधरा वेळा लिखाण थांबवले. तो रोज दिवसभर लिखाण करायचा आणि संध्याकाळी तो पत्नीच्या टेबलवर आणून ठेवी, त्यातील तिने केलेल्या खाणाखुणांसह तो परत लिखाण करीत असे. त्यात खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात लिखाण करायचे होते त्यामुळेच त्याने ही दोन हजार पानांची कादंबरी 1869 साली पूर्ण केली. ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणासाठी त्याने अपार कष्ट घेतले, जणू काही तो 1863 ते 1869 या काळात नेपोलियनच्या काळातच जगत होता. त्याने या कादंबरीच्या लिखाणासाठी अगणित संदर्भग्रंथांचे वाचन केले. कदाचित त्याच्याएवढे कष्ट कादंबरी लिखाणासाठी खूप कमी लोकांनी घेतले असतील.
5. अभिव्यक्ती.
प्रश्न अ.
‘टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो, या विधानाची यथार्थता पटवून दया.
उत्तरः
लेखिका सुमती देवस्थळे यांनी प्रसिद्ध साहित्यिक टॉलस्टॉय यांच्या संबंधी मराठीत लिखाण केले आहे आणि हे लिखाण पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही त्यांना मिळाले आहे. कोणताही साहित्विक हा आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षणाच्या जोरावर साहित्यनिर्मिती करत असतो. साहित्यिकाला जर आपल्या लिखाणाबदद्ल समाधान वाटत नसेल तर अगदी मनाला समाधान मिळेपर्यंत वारंवार लिखाण करीत असतो. ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या निर्मितीसाठी टॉलस्टॉय यांनी अपार कष्ट घेतले.
टॉलस्टॉयला मुळातच वाचनाची आवड होती. वाचनाची आवड असल्यामुळे त्याचे लिखाणही उत्तम दर्जाचे झाले. त्याच्या लिखाणात मानवतावाद दिसून येतो. टॉलस्टॉयने कादंबरी लिखाणाअगोदर असंख्य व्यक्तिरेखा अभ्यासल्या. अनेक लहान – मोठ्या घटनांचा भव्य विस्तार, नेपोनियनची रशियावर स्वारी, युद्धातील चित्तथरारक प्रसंग, तत्कालीन खानदानी रशियन लोकांचे आणि सामान्य लोकांचे वैयक्तिक जीवन, लष्करी कारवाया इ. बाबींचा त्याने चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला. त्याने आपल्या मूळच्या आराखड्यातसुद्धा अनेक वेळा बदल केला.
सुरुवातीला जे चित्रित करायचे होते त्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ व उदात्त लिखाण होत गेले. त्याने अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मनमोकळ्या मुलाखती घेतल्या. युद्ध प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाला तो वेड्याच्या इस्पितळात जाऊन भेटला. ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनदर्शन हा त्याच्या कादंबरीचा खरा विषय होता.
या कादंबरीत त्याने 500 पेक्षा जास्त व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत, त्या व्यक्तिरेखांमध्ये प्रत्येकाला अगदी प्राण्यांनासुद्धा वेगवेगळे, स्वयंपूर्ण, सुस्पष्ट व्यक्तिमत्त्व आहे. केवळ आपण व्यक्तिचित्रणांकडे जरी दृष्टिक्षेप टाकला तरीसुद्धा या कादंबरीने फार मोठे यश साध्य केल्याचे आपणास दिसून येते. म्हणूनच टॉलस्टॉय हा पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो.
प्रश्न आ.
‘ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणापूर्वी टॉलस्टॉय या महान साहित्यकाराने जी अपार मेहनत घेतली त्यांचे वर्णन या पाठात लेखिका सुमती देवस्थळे यांनी अत्यंत मार्मिकपणे केल्याचे दिसून येते. मोहरीएवढ्या बिजापासून प्रचंड अश्वत्थ वृक्ष उभा राहावा तशी ही कादंबरी वाढत गेली. या कादंबरीतील निसर्गवर्णने कादंबरीच्या पोतात अशी काही एकरूप झालेली आहेत की जणू काही त्यां या कादंबरीतील प्रसंगांना एक प्रकारचा जिवंतपणा आलेला आहे.
वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भात व्यक्तिमनाचा वेध घेण्यात टॉलस्टॉयने जी मानवी उकल केली आहे. ती केवळ आश्चर्यकारक म्हटली पाहिजे. कादंबरी लिखाणासाठी टॉलस्टॉयने अपार मेहनत घेतली. अभ्यासाचे डोंगर पेलले, अगणित संदर्भ ग्रंथांचा त्याने सतत अभ्यास केला. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले सर्व लिखाण त्याने अक्षरशः घुसळून काढले. 1863 ते 1869 या सहा वर्षांच्या काळा तो जणूकाही नेपोलियनच्या काळातच जगत होता असे वाटते.
ज्याप्रमाणे एखादा शेतकरी शेतात पीक घेण्याअगोदर अतिशय काळजीपूर्वक शेतीची मशागत करतो व त्यानंतर त्यात पेरणी करतो. व्यवस्थित मशागत केल्यानंतर येणारे पीकही चांगले येते, चांगले पीक आल्यानंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकते. त्याचप्रमाणे ‘युद्ध आणि शांती’ कादंबरी लिहिण्याअगोदर त्याने सर्व माहिती गोळा करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, असंख्य व्यक्तिरेखांचा अभ्यास केला, रशियातील त्या काळातील जीवनपद्धतीचा त्याने अभ्यास केला, अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मुलाखती घेतल्या. त्याला जे जे जमते ते त्याने सर्वकाही केले. कोणतीही कमतरता त्याने ठेवली नाही म्हणूनच असे म्हणता येईल की, ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती.
प्रकल्प.
संगणकावर उपलब्ध असणाऱ्या ‘गुगल अॅप’चा वापर करून लिओ टॉलस्टॉय यांच्याविषयी अधिक माहिती मिळवून संपादित करा.
Additional Important Questions and Answers
आकलन कृती
खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.
प्रश्न 1.
खालील घटनेचे परिणाम लिहा.
प्रश्न 1.
घटना | परिणाम |
कादंबरीचा मूळचा आराखडा व नाव तीन वेळा बदलले | ……………………….. |
उत्तर:
घटना | परिणाम |
कादंबरीचा मूळचा आराखडा व नाव तीन वेळा बदलले | कित्येक व्यक्तिरेखांना मूळच्या आराखड्यात स्थान नव्हते नंतर प्रवेश मिळाला. जे चित्रित करण्याचे प्रांरभी ठरवले होते, त्याहून कितीतरी वेगळी, कितीतरी श्रेष्ठ, उदात्त अशी कलाकृती हळूहळू तयार होत गेली. |
प्रश्न 2.
1869 च्या अखेरीस’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणास कोणत्या वर्षी सुरुवात झाली?
प्रश्न 3.
स्टॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा ‘बुद्ध आणि शांती’ या कादंबरीवरील अभिप्राय म्हणजे – [ ]
उत्तरः
स्टॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीवरील अभिप्राय म्हणजे – कादंबरीच्या शिफारशीचा एक ताम्रपटच
उपयोजित कृती
प्रश्न 1.
एखादे लिखाण वाचल्यानंतर स्वत:चे मत मांडणे या अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द
उत्तरः
अभिप्राय
प्रश्न 2.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रत्यक्ष लेखनास पुरी सहा वर्षे लागली.
उत्तरः
सहा – संख्यावाचक विशेषण
प्रश्न 3.
खालील शब्दांसाठी उताऱ्यात वापरलेले पर्यायी शब्द लिहा.
(अ) प्रचंड
(ब) ठिकाण
उत्तरः
(अ) प्रचंड – भव्य
(ब) ठिकाण – स्थान
स्वमतः
प्रश्न 1.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते, तुमचे मत लिहा.
उत्तरः
सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांची जोपासना करणारे थोर तत्त्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ टॉलस्टॉय लिखित ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी आहे. या कादंबरी लिखाणाअगोदर टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कादंबरीचा दर्जा जपण्याचा त्याने अतोनात प्रयत्न केला. पूर्वीच्या काळी साम्राज्यवादाला महत्त्व असल्यामुळे जो बलवान असेल तो राज्य करीत असे, पण त्याच्यापुढेही साम्राज्य टिकवणे हे आव्हान होते. कारण त्या काळात वर्चस्वासाठी सैन्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर बंडाळी होत असे. अनेक साम्राज्ये उभी राहिल्याचा व ती साम्राज्ये जगासमोर आहेत. याचा सखोल अभ्यास टॉयस्टॉय यांनी केला. त्यांनी कादंबरी लिखाणाअगोदर लोकांची मते विचारून घतला. लिखाणात आवश्यक बाबी कोणत्या आहेत? हे त्याने जाणून घेतले.
प्रत्यक्ष युद्धभूमीला त्याने भेट दिली. त्याने ऐतिहासिक माफत लिखाणाला परिपूर्ण अशी सर्व माहिती गोळा केली. जवळजवळ तीन वेळा मूळ लिखाणाचा ढाचा व नाव बदलले. लिखाणात अतिशयोक्ती होणार नाही याची त्याने काळजी घेतली. मानवी जीवनदर्शन अगणित संदर्भ ग्रंथांचा त्याने अभ्यास केला. 1863 साली सुरू झालेले लिखाण 1869 साली पूर्ण झाले. या सहा वर्षांच्या काळात प्रत्यक्ष तो त्याच जगात वावरत होता. इतके परिपूर्ण लिखाण मानवी मनावर व्यापक परिणाम करते. यद्धाच्या माध्यमातून कोणतेही जगातील प्रश्न सुटत नाहीत हा कादंबरीचा मूळ विषय आहे. टॉलस्टॉयच्या लेखन शैलीमुळे वाचक कादंबरी वाचताना खिळून राहतो म्हणूनच ही कादंबरी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते असे आपल्याला म्हणता येईल.
आकलन कृती
खालील पठित गदव उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.
प्रश्न 1.
प्रश्न 2.
प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पाने त्याला अधिक जवळची वाटू लागली कारण ।
उत्तरः
प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पात्रे त्याला अधिक जवळची वाटू लागली. कारण कादंबरीतील पात्रे जणू देहधारण करून त्याच्याशी बातचीत करत होती.
प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 1.
उपयोजित कृती
वाक्यरूपांतर ओळखा.
प्रश्न 1.
कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला. (विधानार्थी वाक्य)
सूचना : प्रश्नार्थी रूप ओळखा.
पर्याय : 1. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला का?
2. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला तर !
3. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागेलच असेही नाही.
उत्तरः
कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला का?
प्रश्न 2.
गटात न बसणारा शब्द ओळखा कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, संदर्भग्रंथ
उत्तरः
संदर्भग्रंथ
प्रश्न 3.
योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.
निर्मितीची प्रक्रिया शक्य तेवढ्या वेगाने सुरू होती ; पण मूळच्या अति चोखंदळपणापायी रचलेला पुष्कळसा आकृतिबंध विस्कटून जात होता.
स्वल्पविराम, पूर्णविराम, दुहेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह., अर्धविराम पूर्णविराम
उत्तरः
(अर्धविराम, पूर्णविराम)
स्वमतः
प्रश्न 1.
लेखकाच्या अतिचोखंदळ वृत्तीमुळे रचलेला पुष्कळसा आकृतिबंध विस्कटून जातो, तुमचे मत लिहा.
उत्तरः
लिखाण परिपूर्ण होण्यासाठी बरेच साहित्यिक चोखंदळ मार्गाचा अवलंब करतात. एखादा विषय जर अर्थपूर्ण किंवा व्यापक असेल तर त्या विषयाच्या मांडणी संदर्भात अतिशय काळजी घेतली जाते. आपल्या लिखाणाचा विषय किंवा अर्थ वाचकांच्या मनाला भिडणारा असावा असा प्रयत्ल लेखकाचा असतो. आपल्यासारखे लिखाण संबंधित विषयावर अजूनपर्यंत कोणीही केलेले नसावे व आपल्याला यश मिळावे हा त्यामागील हेतू असतो. लिखाणाअगोदर विविध गोष्टींचा परामर्श घ्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. अभ्यासाचे डोंगर पेलायची त्यांची ताकद असते.
दंबरीचा विषय समजून घेताना लिखाणाचा मूळ ढाचा बदलण्याची त्यांची तयारी असते. प्रवास, मुलाखती, चर्चा, भेटीगाठी, विविध संदर्भ ग्रंथ इ. प्रकारच्या मार्गाचा अवलंब ते करतात. त्यामळे लिखाणाला सरुवात होण्यास वेळ ला पात्रे विषयाला अनुसरून असतील याची काळजी घेतली जाते. कल्पनेतले लिखाण वास्तववादी वाले परिणामकारक होण्यासाठी अनेक वेळा लिखाण केले जाते. या चोखंदळ वत्तीमळे रचलेला पुष्कळसा आकृतिबंध खरोखरच विस्कटन गेलेला दिसून येतो कारण मूळ लिखाणामध्ये अनेक बदल झालेले असतात, पण लिखाण मात्र परिणामकारक व वास्तववादाला स्पर्श करते.
Summary in Marathi
प्रास्ताविकः
सुप्रसिद्ध लेखिका, चरित्रकार, ‘टॉलस्टॉय एक माणूस’, ‘मॅक्झिम गॉर्को’, ‘डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर’, ‘एक विचारवंत’ (कार्ल मार्क्ससंबंधी) ‘छाया आणि ज्योती’ ही चरित्रे त्यांनी लिहिली. चरित्रलेखनाला आवश्यक असणारी मेहनत, विषयासंबंधीचा जिव्हाळा, समरसता आणि प्रवाही शैली या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या लेखनाला आगळेपण प्राप्त झाले आहे. टॉलस्टॉय आणि श्वाइट्झर यांच्यासंबंधी एवढे मार्मिक लेखन मराठीत पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही त्यांना मिळाले आहे.
पाठ परिचयः
सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्त्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोल्विच टालस्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते. सत्याग्रह, असहकार या शांततामय प्रतिकाराचे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले. टॉलस्टॉय यांच्या लेखक म्हणून बडणीचे आणि ‘वॉर अॅण्ड पिस’ या महान कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचे प्रत्ययकारी चित्रण ‘टॉलस्टॉय एक माणूस’ या पुस्तकातून आले आहे. या कादंबरी लेखनासाठी टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास करून कादंबरी दर्जेदार होण्यासाठी अनके वेळा पुनर्लेखन केले. त्यामुळे ‘वॉर अॅण्ड पिस’ हे जागतिक साहित्यातील वाङ्मयीन लेणे ठरले. मानवी जीवनातील गुंतागुतीचे प्रश्न युद्धाने सुटत नसून ते शांती आणि प्रेमाने सुटतात हे टॉलस्टॉय यांनी या कादंबरीत सांगितले आहे.
समानार्थी शब्द / पर्यायी शब्दः
- मातृविहीन – ज्याला माता नाही तो.
- न्यून – काहीतरी कमी असल्याचे जाणवणे.
- उणीव – (less, deficient).
- उत्तेजित – प्रोत्साहित.
- चिमुकले – छोटेसे – (very small, tiny).
- संकलित – एकत्रित – (collected).
- बालपण – लहानपण – (childhood).
- छंद – आवड – (liking, hobby).
- पिंजण – चक्र – (मनातले विचार).
- दैनंदिनी – रोजनिशी – (diary).
- सुप्त शक्ती – अंतर्गत शक्ती – (दडलेले ज्ञान).
- चिकित्सा – संशोधन – (minute examination).
- अभिप्राय – स्वत:चे मत (एखादया लिखाणावरचे) – (opinion).
- यातना – त्रास, दुःख – (great pains)
- बांडगुळ – झाडावरील वाढलेला अतिरिक्त भाग जो झाडाच्या वाढीवर परिणाम करतो – (a parasitical (living an another).
- मेहनत – कष्ट – (hard work)
वाक्यप्रचारः
- न्यून असणे – कमी असणे.
- मातीशी मसलत करणे – मातीची मशागत करणे.
- अवाक होणे – चकित होणे.
- अभ्यासाचे डोंगर पेलणे – खूप अभ्यास करणे.
- कृतकृत्य होणे – समाधानी होणे.
- अभिप्राय देणे – स्वत:चे एखादया लिखाणाविषयी किंवा कलाकृतीविषयी मत मांडणे.