Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
खालील वाक्यांचे संयक्त, मिश्रव केवल वाक्य असे वर्गीकरण करा.

a. मी माणसे मोजून पाहिली; पण ती आठच भरली.
उत्तरः

संयुक्त वाक्य (‘पण’ न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

b. सोनाली चहा किंवा कॉफी घेते.
उत्तरः

संयुक्त वाक्य (‘किंवा’ विकल्पबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

c. आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या.
उत्तरः

संयुक्त वाक्य (‘आणि’ समुच्चयबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

d. पाऊस पडला, तर शेतकरी वर्ग आनंदी होईल.
उत्तरः

मिश्र वाक्य (‘तर’ या ठिकाणी ‘जर’ अध्याहृत धरावा) संकेतबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

e. मुले बागेत खेळली. ती खूप दमली.
उत्तरः

केवल वाक्य (दोन स्वतंत्र केवल वाक्ये – मुले उद्देश्य. खेळली – विधेय. ती उद्देश्य, दमली – विधेय

f. सर म्हणाले, की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते.
उत्तरः

मिश्र वाक्य (‘की’ स्वरूपबोधक गोणत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

प्रश्न 2.
सूचनेनुसार वाक्यसंश्लेषण करा.

a. तो उत्तीर्ण झाला. सर्वांना आनंद झाला. (केवल वाक्य करा.)
उत्तरः

तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला.

b. श्याम घरी आला. वादळाला सुरुवात झाली. (मिश्र वाक्य करा.)
उत्तरः

श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली.

c. आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले. आमच्या अडचणी दूर झाल्यात. (संयुक्त वाक्य करा.)
उत्तरः

आम्हांला शिकवायला नवीन शिक्षक आले आणि आमच्या अडचणी दूर झाल्या.

d. माझे वडील म्हणाले. मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला. (मिश्र वाक्य करा.)
उत्तरः

माझे वडील म्हणाले, की तुझे यश बघून मला तुझा खूप अभिमान वाटला.

e. हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे. जाहिरातीला महत्त्व आहे. समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा. (केवल वाक्य करा.)
उत्तरः

आधुनिक लोकशाही युगात जाहिरातींना महत्त्व असल्यामुळे समाजाने जाहिरातींचा योग्य अर्थ समजून घ्यावा.

Additional Important Questions and Answers

सरावासाठी कृती

प्रश्न 1.
सूचनेनुसार वाक्यसंश्लेषण करा.

(a) प्रार्थना संपते, ‘जनगणमन’ ची इशारत मिळते. (केवल वाक्य करा)
(b) पुस्तकं आपल्याला घडवतात; काही वेळा उद्ध्वस्तही करतात. (संयुक्त वाक्य करा)
(c) वाक्य संपलं आणि त्यांचे डोळे लकाकले. (केवल वाक्य करा)
(d) घरातली कामं मला दिसतात. त्यांना दिसत नाहीत. (मिश्र वाक्य करा)
(e) टॉलस्टायला वाचनाची आवड होती. त्याचा वाचनाचा वेग उत्तम होता. (संयुक्त वाक्य करा)
उत्तर :
(a) केवल वाक्य प्रार्थना संपताच ‘जनगणमन’ ची इशारत मिळते.
(b) संयुक्त वाक्य पुस्तकं आपल्याला घडवतात; पण काही वेळा उद्ध्वस्तही करतात.
(c) केवल वाक्य वाक्य संपताच त्यांचे डोळे लकाकले.
(d) मिश्र वाक्य घरातील कामं जशी मला दिसतात, तशी त्यांना दिसत नाहीत.
(e) संयुक्त वाक्य टॉलस्टायला वाचनाची आवड होती आणि त्याचा वाचनाचा वेगही उत्तम होता.

प्रश्न 2.
खालील वाक्यांचे संयुक्त , मिश्र, केवल वाक्य असे वर्गीकरण करा.
उत्तर :

  • शाळेत तो शिपाई आहे; शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. – संयुक्त वाक्य
  • जे आवडेल ते खुशाल घेऊन जा. – मिश्र वाक्य
  • एक गोष्ट मात्र खरी की, उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. – मिश्र वाक्य
  • त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. – संयुक्त वाक्य
  • पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामे होणारच – मिश्र वाक्य

वाक्यसंश्लेषण प्रास्ताविक:

एक पूर्ण विचार व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहास वाक्य असे म्हणतात. वाक्य म्हटले की, त्यात कोणाविषयी तरी बोलणे असते आणि ज्याच्याविषयी बोलायचे आहे त्याबद्दल काहीतरी सांगितलेले म्हणजे विधान केलेले असते. यामुळेच वाक्याचे दोन भाग पडतात.

उदा. सूर्य रोज पूर्वेला उगवतो.

वरील वाक्य सूर्याबद्दल आहे. ‘सूर्य’ हे वाक्याचे उद्देश्य आहे. सूर्याबद्दल ‘रोज पूर्वेला उगवतो’ हे विधान केलेले आहे.

व्याकरणाच्या भाषेत उद्देश्य म्हणजे कर्ता (सूर्य) व विधेय म्हणजे क्रियापद (उगवणे – उगवतो), वाक्यातील इतर शब्द हे उद्देश्य विस्तार आणि विधेय विस्तार आहेत.

एका वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्याचे पुढील प्रकार पडतात.

वाक्यप्रकार:

वाक्यातील विधानांवरून वाक्यांचे पुढील प्रकार पडतात.


केवल, मिश्र व संयुक्त वाक्य प्रकारांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.


लक्षात ठेवा :

मिश्र व संयुक्त वाक्यांत काही अव्यये समान असली तरी जोडली जाणारी वाक्ये आणि वाक्यांतील अव्ययांचे अर्थ लक्षात घेऊन वाक्य मिश्र वा संयुक्त आहे हे निश्चित करा.

वाक्यसंश्लेषण/वाक्यसंकलन :

एकमेकांशी संबंध असलेलली दोन वा अधिक केवल वाक्ये दिली असता त्यांचे एक वाक्य तयार करण्याच्या प्रक्रियेला वाक्यसंश्लेषण असे म्हणतात.

वाक्यसंश्लेषणाचे महत्त्वः

  • वाक्यरचनेवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी
  • आपल्या मनातील भाव नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी
  • सुटी – सुटी वाक्ये विस्कळीतपणे मांडण्याऐवजी ती एकत्रित करून मांडल्यामुळे आपल्या विचारात सुसूत्रता येते. वाक्य आटोपशीर, व्यवस्थित तयार करता येते.
  • उत्तम लेखनकौशल्य आत्मसात करण्यासाठी वाक्यसंकलनाची कला प्रत्येकास अवगत असणे आवश्यक आहे.

वाक्यसंश्लेषणाचे प्रकारः
वाक्य संकलनाच्या वेळी दोन वा अधिक वाक्ये एकत्र करून आपण एक जोडवाक्य तयार करतो. हे जोडवाक्य केवल, मिश्र वा संयुक्त यांपैकी एक असते. म्हणजेच वाक्यसंश्लेषण हे तीन प्रकारचे असते.