Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

Textbook Questions and Answers

1. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:
उत्तर:

2. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

3. पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:

प्रश्न 1.
पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:
उत्तर:
(अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
(आ) संतांना सन्मानाची अपेक्षा असते.
(इ) संत निंदा आणि स्तुती समान मानत नाहीत.
(ई) संत सुख आणि दु:ख समान मानतात.

4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
1. वृक्ष
2. सुख
3. सम

5. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती । तया न म्हणती छेदूं नका ।।’ या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
वृक्षाला मान-अपमान यांची फिकीर नसते. कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले, तरी त्या माणसांना ते ‘मला तोडू नका’ असेही म्हणत नाहीत. अशा प्रकारे वृक्षांना मान-अपमान समान असतात.

प्रश्न (आ)
‘निंदास्तुति सम मानिती जे संत । पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।’ या काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे. संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली, तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत. त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात. हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे, असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे.

6. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिली आहे. वृक्ष एका ठायी निश्चल असतात. वृक्ष उदारवृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात. त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत. संतसज्जनही निरिच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही. संतसज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात. त्यांना निंदास्तुती समान असते. वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे.

प्रश्न (आ)
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा.
उत्तर:
‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।। तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे. त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. अशा प्रकारे रंजल्या-गांजल्या माणसांची जो मदत करतो, त्यालाच देवत्व प्राप्त होते. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. ‘पुण्य परउपकार । पाप ते परपीडा’ असा उदात्त संदेश या अभंगातून मला मिळतो.

उपक्रम:
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे….’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

भाषा सौंदर्य:

खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद.
(रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे) यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या.

भाषाभ्यास:

आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो, तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा बाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजे अलंकार.

अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत. अर्थालंकारांमध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात, आता उपमेय आणि उपमानातील साधावर आधारित काही अलंकारांचा आपण परिचय करून घेऊया.

1. रूपक अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळींतील उपमेय व उपमान ओळखा :
1. नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।

2. ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 4
उत्तर:

2. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये-

1. उपमेय व उपमान यांच्यात साम्य.
2. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे.
3. अनेकदा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इ. साधर्म्य दर्शक शब्दांचा वापर.

उपमेय व उपमान (कमल व नयन) यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात म्हणून इथे ‘रूपक’ अलंकार होतो. यात नयन हे कमळासारखे आहेत (उपमा) किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहे (उत्प्रेक्षा) असे न म्हणता नयन हेच कमल असे दर्शवले आहे, म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे.

3. जेव्हा वाक्यांत उपमेय, उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक’ अलंकार होतो.

खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥
उपमेय – [ ]
उपमान – [ ]

Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.

वृक्ष

संत

मान-अपमान जाणत नाहीत.

निंदा-स्तुती समान मानतात.

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 5.1

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. सज्जनांची भेट होणे म्हणजे ……..”ची गाठ पडणे होय. (भक्ती-मुक्ती/जिवा-शिवा/सुख-दु:ख/निंदा-स्तुती)
2. कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला ——— नका असे म्हणत नाहीत. (मोडू/सोडू/तोडू/छेडू)
उत्तर:
1. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
2. सज्जनांची भेट होणे म्हणजे जिवा-शिवाची गाठ पडणे होय.
कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला तोडू नका असे म्हणत नाहीत.

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:

उत्तर:
[पूर्ण धैर्यवंत] [संत]

कृती 4 : (काव्यसौंदर्य)

प्रश्न 1.
प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणरक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गाचे रक्षण आपण करायला हवे. निसर्ग आपल्याला निरोगी पर्यावरणाची शिकवण देतो. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी पूर्ण धैर्यवंत संतांची तुलना वृक्षांशी केली आहे. संतांचे वर्तन वृक्षांसारखे असते. वृक्षांना मान-अपमान ठाऊक नसतो. कुणी पूजा केली काय किंवा घाव घातला काय, वृक्ष अविचल असतात. माणसाचे वागणेही वृक्षाप्रमाणे असावे. वृक्षतोड करून पर्यावरणाचा -हास करू नये, उलट वृक्षलागवड व संवर्धन करावे, असा संदेश संत नामदेवांनी या अभंगात दिला आहे.

लक्षात ठेवा:

1. इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (आ) हा कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा असेल. यामध्ये प्रश्न 2 (अ) आणि (इ) यांत दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील. त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे:

2. वरील 8 कृतींपैकी कृतिपत्रिकेत 1-1 गुणाच्या पहिल्या 2 कृती आणि 2 गुणांची कोणतीही 1 कृती विचारली जाईल.
उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या कवितेचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

3. ही कृती सोडवण्यासाठी अभ्यास असा करा:

1. कवींचे/कवयित्रींचे नाव, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार, आवड किंवा नावडीची कारणे इत्यादींसाठी पुढील उत्तर नीट अभ्यासावे.
2. कवितेतील दिलेल्या ओळींच्या सरळ अर्थासाठी कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.
3. कवितेतील शब्दांच्या अर्थासाठी कवितेच्या सुरुवातीला दिलेले शब्दार्थ अभ्यासावेत.

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे.

महत्त्वाची नोंद: परीक्षेत आठपैकी कोणत्याही 3 कृती विचारल्या जाणार आहेत. तथापि विदयार्थ्यांना सर्व कृतींचा सराव मिळावा म्हणून इथे सर्व 8 कृती उत्तरांसह सोडवून दाखवल्या आहेत. आशयावर आधारलेल्या प्रत्येकी 2 गुणांच्या कृतींची उत्तरे येथे नमुन्यादाखल दिलेली आहेत. ही उत्तरे विदयार्थी स्वत:च्या मतानुसार व स्वत:च्या शब्दांत लिह शकतात.

उत्तर: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत नामदेव.
  2. कवितेचा विषय → या कवितेत संतसज्जनांची महती सांगितली आहे.
  3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ → (इथे सरावासाठी अनेक शब्दार्थ दिले आहेत.)
  4. वृक्ष = झाड
  5. चित्त = मन
  6. निंदा = नालस्ती
  7. सम = समान
  8. धैर्य = धीर
  9. जीव = प्राण.

4. कवितेतून मिळणारा संदेश → संतांचे वर्तन जसे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते, तशी आपली वागणूक ठेवावी. स्थिरबुद्धीने वागावे हा संदेश या अभंगातून दिला आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत यमक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → संतसज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान-अपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदास्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जिवाशिवाची, म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।
→ निंदा आणि स्तुती जे समान लेखतात, ते संत असतात. असे साधुसंत संपूर्ण धैर्यवान असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे, हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंगरचना असल्यामुळे ती मला खूप आवडली.

रसग्रहण:

इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (इ) हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतिपत्रिकेत 4 गुणांचा हा नवीन प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल:

1. पठित पदयांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन पंक्ती देऊन, त्यांचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल.
2. दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण करणे अपेक्षित आहे:

1. आशयसौंदर्य: यामध्ये कवीचे/कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.
2. काव्यसौंदर्य: यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
3. भाषिक वैशिष्ट्ये: यामध्ये कवींची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती); तसेच आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्दयांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील.

वरील मुद्द्यांना अनुसरून प्रस्तुत कवितेसाठी सर्वसाधारण रसग्रहणाचा ढाचा कसा असावा, हे पुढे मार्गदर्शनार्थ दिले आहे. तो अभ्यासून कवितेतील अन्य कोणत्याही दोन पंक्तींसाठी रसग्रहण लिहिण्याचा सराव विदयार्थ्यांनी करावा.

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
“निंदास्तुति सम मानिती जे संत।
पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे ।।
उत्तर:

आशयसौंदर्य: ‘जैसा वृक्ष नेणे’ या अभंगामध्ये संत नामदेव यांनी झाडाचे प्रतीक वापरून संत-सज्जनांची महती सांगितली आहे. संतांचे वागणे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते. तशी आपली वागणूक ठेवावी स्थिर चित्ताने वर्तन करावे, हा संदेश या अभंगातून दिला आहे.

काव्यसौंदर्य : झाडाची पूजा केली किंवा झाड तोडले तरी झाडाला दुःख होत नाही. त्याला मान-अपमान वाटत नाही. संतसज्जन झाडासारखे असतात. निंदा व स्तुती त्यांना समान वाटते. स्तुतीने ते हुरळून जात नाहीत अथवा निंदेने नाराज होत नाही. ते पूर्ण धीरवंत व स्थिरबुद्धीने वागतात. अशा धैर्यवंत साधूंची गाठ पडणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होणे असते.

भाषिक वैशिष्ट्ये: ‘अभंग’ या प्राचीन लोकछंदात ही रचना आहे. पहिल्या तीन चरणात सहा व चौथ्या चरणात चार अक्षरे असा हा ‘मोठा अभंग’ छंद आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणात यमक साधले आहे. झाडाचे सर्वमान्य प्रतीक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. नेमके तत्त्व सांगून लोकमानसाला योग्य शिकवण सहजपणे देण्याची विलक्षण हातोटी शब्दांनी साधली आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:
नोंद : सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.

2. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. निंदा करणे
2. स्तुती करणे.
उत्तर:

1. निंदा करणे – अर्थ : नालस्ती करणे.
वाक्य: कुणीही कुणाची कधीही निंदा करू नये.
2. स्तुती करणे – अर्थ : प्रशंसा करणे.
वाक्य: गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या मोहितची सरांनी वर्गात स्तुती केली.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :

  1. वृक्ष
  2. सुख
  3. सम.

उत्तर:

  1. वृक्ष = झाड, तरू
  2. सुख = आनंद, समाधान
  3. सम = समान, सारखेपणा.

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. मान
  2. निंदा
  3. सुख
  4. पूर्ण.

उत्तर:

  1. मान × अपमान
  2. निंदा × स्तुती
  3. सुख × दुःख
  4. पूर्ण × अपूर्ण.

प्रश्न 3.
पुढे दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा:
नोंद: सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद (रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे)
उत्तर:

  1. रेखणे – रेखीव – रेखीव आकृती
  2. कोरणे – कोरीव – कोरीव काम
  3. ऐकणे – ऐकीव – ऐकीव गोष्ट
  4. घोटणे – घोटीव – घोटीव शिल्प
  5. राखणे – राखीव – राखीव जागा.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. सतजन, सज्जन, सजन्न, साज्जन.
2. स्तुती, स्तूती, स्तुति, स्तूति.
उत्तर:

1. सज्जन
2. स्तुती.

उपक्रम:

प्रश्न 1.
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

Summary in Marathi

कवितेचा आशय:

या अभंगात संत नामदेवांनी संतांना झाडांची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केली आहे.

शब्दार्थ:

  1. जैसा – जसा.
  2. वृक्ष – झाड.
  3. नेणे – जाणत नाही.
  4. मान – सन्मान, गौरव.
  5. अपमान – अवमान.
  6. तैसे – तसे.
  7. सज्जन – संत.
  8. वर्तताती – वागतात, वर्तन करतात.
  9. चित्ती – मनात.
  10. तया – त्यांना.
  11. अथवा – किंवा. छेदू
  12. नका – तोडू नका.
  13. निंदा – नालस्ती, अपमानकारक बोलणे.
  14. स्तुती – प्रशंसा.
  15. सम – समान, सारखे.
  16. धैर्यवंत – हिंमतवान, गंभीर, निश्चल.
  17. भेटी – गाठभेट.
  18. जीव – प्राण.
  19. शिव – परब्रह्म, परतत्त्व.
  20. गांठी – एकत्र येणे.
  21. जाय – होते.

कवितेचा (अभंगाचा) भावार्थ:

संतांची महती वर्णन करताना संत नामदेव म्हणतात – ज्याप्रमाणे वृक्षाला (झाडाला) मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही, मानापमान ते जाणत नाहीत; त्याप्रमाणे, त्या वृक्षाप्रमाणे संतांचे (सज्जनांचे) वर्तन असते. ।।1।।

कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली, तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही. ।।2।।
किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले, तरी तो त्या माणसांना ‘तोडू नका’ असे म्हणत नाही. तो अविचल राहतो. ।।3।।

तसे संतसज्जन निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. असे हे साधुसंत पूर्णतः धैर्यवंत असतात. निश्चल असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. ।।4।।

संत नामदेव म्हणतात, अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लागते. ।।5।।