Chapter 5 वसंतहृदय चैत्र
Textbook Questions and Answers
कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…
प्रश्न 1.
पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये – झाडाचे/वेलीचे नाव
(अ) निळसर फुलांचे तुरे – …………………………………
(आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी – …………………………………
(इ) गुलाबी गेंद – …………………………………
(ई) कडवट उग्र वास – …………………………………
(उ) दुरंगी फुले – …………………………………
(ऊ) तीन पाकळ्यांचे फूल – …………………………………
(ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे – …………………………………
उत्तर:
(अ) निळसर फुलांचे तुरे – [कडूनिंबाचे झाड]
(आ) तांबूस रंगाची कोवळी पालवी: पिंपळ
(इ) गुलाबी गेंद : मधुमालती
(ई) कडवट उग्र वास – [करंजाचे झाड]
(उ) दुरंगी फुले : घाणेरी
(ऊ) तीन पाकळ्यांचे फूल – [माडाचे झाड]
(ए) पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड – [फणस]
प्रश्न 2.
खालील संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
(१) चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे.
उत्तर:
वसंतऋतूतील सर्व सर्जन, निसर्गातील सौंदर्य, विविध वृक्षावर डोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे, यांमुळे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण, उत्कट दर्शन चैत्रातच होते. म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे.
(२) काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.
उत्तर:
अवतीभोवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्गदृश्ये म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय. निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते. पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो.
प्रश्न 3.
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट – ‘ब’ गट
a. लांबलचक देठ – (अ) माडाच्या लोंब्या
b. अर्धवर्तुळ, पांढरी टोपी – (आ) कैन्याचे गोळे
c. भुरभुरणारे जावळ – (इ) करंजाची कळी
उत्तर:
a. लांबलचक देठ – (आ) कैऱ्यांचे गोळे
b. अर्धवर्तुळ, पांढरी टोपी – (इ) करंजाची कळी
c. भुरभुरणारे जावळ – (अ) माडाच्या लोंब्या
प्रश्न 4.
खालील तक्ता पूर्ण करा.
शब्द – अर्थ
निष्पर्ण – पाने निघून गेलेला
निर्गंध – ……………………..
निर्वात – ……………………..
निगर्वी – ……………………..
निःस्वार्थी – ……………………..
उत्तर:
शब्द – अर्थ
(i) निष्पर्ण – पाने निघून गेलेला
(ii) निगंध – गंध निघून गेलेला
(iii) निर्वात – हवा नसलेला
(iv) निगर्वी – गर्व नसलेला
(v) नि:स्वार्थी – स्वार्थ नसलेला
प्रश्न 5.
खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्ये पुन्हा लिहा. (रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे)
(अ) लहानसहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच.
(आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
(इ) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
(ई) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
उत्तर:
(i) लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच.
(ii) गुंजारव करीत भ्रमर फुलांभोवती रुंजी घालतात.
(iii) मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा करणे हासुद्धा अपराधच.
(iv) सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
प्रश्न 6.
खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.
शब्द – प्रत्यय – त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द
(१) अतुलनीय – …………………….. – ……………………..
(२) प्रादेशिक – …………………….. – ……………………..
(३) गुळगुळीत – …………………….. – ……………………..
(४) अणकुचीदार – …………………….. – ……………………..
उत्तर:
शब्द – प्रत्यय – त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द
(i) अतुलनीय – नौय – प्रसंशनीय
(ii) प्रादेशिक – इक – सामाजिक
(iii) गुळगुळीत – ईत – मुळमुळीत
(iv) अणकुचीदार – दार – टोकदार
प्रश्न 7.
खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटींत लिहा.
(अ) अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. [ ] [ ]
(आ) अजय आजच मुंबईहून परत आला. [ ] [ ]
(इ) गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. [ ] [ ]
(ई) रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे. [ ] [ ]
उत्तर:
(i) अश्विनी → [विशेष नाम] पुस्तक → [सामान्य नाम]
(ii) अजय → [विशेष नाम] मुंबई → [विशेष नाम]
(iii) गुलाब → [विशेष नाम] सौंदर्य → [भाववाचक नाम]
(iv) रश्मी → [विशेष नाम] गोडवा → [भाववाचक नाम]
प्रश्न 8.
खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.
जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते.
(अ) कर्ण –
(आ) सोबती –
(इ) मार्ग –
(ई) हर्ष –
उत्तर:
(i) कर्ण – कान
(ii) सोबती – मित्र
(iii) मार्ग – वाट
(iv) हर्ष – आनंद.
प्रश्न 9.
स्वमत.
(अ) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य त्मच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंतऋतूच आहे. वसंतऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंतऋतू ऐन भरात आलेला असतो. त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात. पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच. किंबहुना पिंपळपानांच्या सळसळीवरूनच ‘झाडांच्या पानांची सळसळ’ हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हृदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.
(आ) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून दया.
उत्तर:
चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. अनेक रंगांचे विविध आकार फुलांच्या रूपांत डोळ्यांचे पारणे फेडतात. सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यांत, पक्ष्यांची घरटीसुद्धा कशी, अनेक लोभस आकारांत निर्मिलेली. काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात. काही लोंबत्या आकारांची, काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल, अशी विविध रूपांतील असतात. ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते, ते जणू निसर्गाचे साहित्य होय. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतो. म्हणून ती विरामचिन्हे ठरतात.
(इ) वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.
उत्तर:
आम्ही एकदा आमच्या गावी गेलो होतो. वसंतऋतूच होता तो. त्या काळात रानातून नुसता फेरफटका मारणे म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच असतो. काही खायला नको किंवा काही प्यायला नको. फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे.
असेच फिरत असताना आम्रफुलांचा सुगंध आला. आमचे जवळच्याच आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेले. झाड मोहराने भरलेले होते. अनेक फांदयांवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसल्या. आमच्या तोंडाला पाणी सुटले. नकळत आमच्या हातात दगड आलेच, ते भराभर झाडावर मारू लागलो. बाजूने जाणारा एकजण कळवळला. त्याने आम्हांला थांबवले. स्वतः झाडावर चढला. आम्हांला कैऱ्या काढून दिल्या. लगोलग घरी गेलो. आईने मीठमसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले. आणि काय सांगू? हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्या दिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलेलो नाही. अजूनही वसंतऋतू म्हटला की मला ती कैरी आठवतेच.
Additional Important Questions and Answers
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
रिकाम्या चौकटी पूर्ण करा:
(i) वसंत ऋतूचा आत्मा असलेला महिना – [ ]
(i) गच्च फुलापानांनी डवरलेली व मधुरसाने भरलेल्या फळांनी लगडलेल्या वनश्रीचा महिना – [ ]
(iii) गहिऱ्या गुलाबी रेशमी पताका नाचवणारे झाड – [ ]
(iv) गडद गुलाबी गेंदांनी खच्चून भरलेली वेल – [ ]
उत्तर:
(i) वसंत ऋतूचा आत्मा असलेला महिना – [चैत्र]
(ii) गच्च फुलापानांनी डवरलेली व मधुरसाने भरलेल्या फळांनी लगडलेल्या वनश्रीचा महिना – [चैत्र]
(iii) गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवणारे झाड – [पिंपळ]
(iv) गडद गुलाबी गेंदांनी खच्चून भरलेली वेल – [मधुमालती]
कृती २: (आकलन)
प्रश्न 1.
साम्यभेद लिहा:
पिंपळ – मधुमालती
(i) ……………….. – (i) ………………..
(ii) ……………….. – (ii) ………………..
(iii) ……………….. – (iii) ………………..
(iv) ……………….. – (iv) ………………..
उत्तर:
पिंपळ – मधुमालती
(i) पिंपळ हे झाड आहे. – (i) मधुमालती ही वेल आहे.
(ii) पानांचा रंग गडद गुलाबी व तांबूस गुलाबी असतो. – (ii) पानांचा रंग गुलाबी असतो.
(iii) लालगुलाबी पानांनी पिंपळ डवरलेला असतो. – (iii) गुलाबी पाने वेलीवर खच्चून भरलेली असतात.
(iv) गोल, लहान, हिरवी फळे येतात. – (iv) गोल, लहान, हिरवी फळे येतात.
प्रश्न 2.
निसर्गातील भडक रंगांबाबतचे लेखिकांचे मत लिहा.
उत्तर:
एरवी भडक व विसंगत वाटणारे रंग निसर्गाच्या दुनियेत विशोभित दिसत नाहीत. ते एकमेकांची शोभा वाढवतात.
प्रश्न 3.
लेखिकांच्या मते, भारतीय रंगाभिरुचीचे मूळ कुठे आहे, ते लिहा.
उत्तर:
गुजरात-राजस्थानात घाणेरी मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने तेथील लोकांच्या वस्त्रप्रावरणात गडद रंगांचा प्रभाव जाणवतो.
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1.
संधी सोडवा:
(i) रंगाभिरुची
(ii) नामाभिधान
(iii) वसंतात्मा.
उत्तर:
(i) रंगाभिरुची = रंग + अभिरुची.
(ii) नामाभिधान = नाम + अभिधान,
(iii) वसंतात्मा = वसंत + आत्मा.
प्रश्न 2.
कुचेष्टा’ व ‘सुमन’ यांसारखे ‘कु’ आणि ‘सु’ हे उपसर्ग असलेले प्रत्येकी दोन शब्द लिहा.
उत्तर:
(i) कु – कुकर्म, कुवचन
(ii) सु – सुभाषित, सुवास.
प्रश्न 3.
पुढील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा:
शब्द प्रत्यय त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द
(i) वैशिष्ट्य
*(ii) अतुलनीय
(iii) गुलाबी
*(iv) प्रादेशिक
उत्तर:
शब्द प्रत्यय त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द
(i) वैशिष्ट्य य सामान्य
(ii) अतुलनीय अनीय पूजनीय
(ii) गुलाबी ई शहरी
(iv) प्रादेशिक इक स्वाभाविक
प्रश्न 4.
पुढील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा:
(i) पताका नाचवणे
(ii) डोळ्यात भरणे
(iii) शिरोधार्य मानणे.
उत्तर:
(i) आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाल्याची पताका नाचवतच मानसी घरात शिरली.
(ii) नगरसेवक झाल्यानंतर पहिल्याच वर्षात त्याने कमावलेली संपत्ती सर्वांच्याच डोळ्यात भरत होती.
(iii) गांधीजींचे आवाहन शिरोधार्य मानून दुर्गा भागवत यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली.
कृती ४: (स्वमत / अभिव्यक्ती)
प्रश्न.
राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे लेखिकांना उमगलेले रहस्य तुमच्या शब्दांत समजावून सांगा.
उत्तर:
राजपुताना हा प्रदेश म्हणजे रखरखीत वाळवंटच. नजर जाईल तिथपर्यंत हिरवागार, डेरेदार वृक्ष दिसतच नाही. असलीच तर कुठे कुठे खुरटी झुडपे असतात. त्यामुळे या परिसरातील माणसे निसर्गाच्या सुंदर रूपांच्या दर्शनासाठी तहानलेली असतात. अशा स्थितीत या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात ती घाणेरीची झाडे. अनेक गडद रंगांच्या फुलांनी ही झाडे डवरलेली असतात. सुंदर निसर्गरूपांसाठी आसावलेल्या मनांना या रंगांनी आकर्षित केले नसते तरच नवल. म्हणून या परिसरातील माणसांच्या वस्त्रप्रावरणात, विविध प्रकारच्या सुशोभनात भडक रंगांचा आढळ मोठ्या प्रमाणात होतो. खरेतर, निसर्गाच्या सान्निध्यात सतत वावरणाऱ्यांना विविध रंगांची ओढ असतेच, शहरी भागात राहणारी माणसे मुक्त निसर्गदर्शनाला मुकतात. ती बहुतांशी कृत्रिम वातावरणात राहतात. म्हणून त्यांच्या वस्त्रप्रावरणात, सुशोभनात फिक्या रंगांचा प्रभाव असतो. ही माणसे या फिक्या रंगांच्या निवडीला उच्च अभिरुची समजतात. थोडक्यात, माणसांच्या रंगांविषयीच्या अभिरुचीमध्ये त्यांच्या अवतीभोवतीच्या निसर्गाच्या रूपाचा प्रभाव खूप असतो.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
*(२) योग्य जोड्या जुळवा:
‘अ’ गट – ‘ब’ गट
(i) भुरभुरणारे जावळ – (अ) करंजाची कळी, (आ) पक्ष्यांची घरटी, (इ) माडाच्या लोंब्या
उत्तर:
(i) भुरभुरणारे जावळ – माडाच्या लोंब्या
कृती २: (आकलन)
प्रश्न 1.
नावे लिहा:
(i) बारमहा फळे धरणारे झाड : ……………………..
(ii) रात्रीच्या वेळी मनोरम सुगंध देणारे झाड : ……………………..
उत्तर:
(i) बारमहा फळे धरणारे झाड: माड
(ii) रात्रीच्या वेळी मनोरम सुगंध देणारे झाड: कडुनिंब
प्रश्न 2.
पुढे काही झाडांची वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यांतील चुका दुरुस्त करून योग्य वैशिष्ट्ये लिहा:
(i) कडुनिंबाचे झाड: निळसर फुलांचे तुरे. कडवट उग्र वास. पांढरी-हिरवी कळी करंजीच्या आकाराची.
(ii) करंजाचे झाड: माथ्यावर फिक्या रंगाचे जावळ भुरभुरत असते, फुललेल्या फुलाच्या आत एक नाजूक सुंदर कळी असते. तिचा रंग निळा-जांभळा असतो. तिच्या डोक्यावर वर्तुळाकार लाल टोपी असते.
(iii) माडाचे झाड: बारमहा हिरवेगार असते. वसंतऋतूत फळे घरतात. नारळाची फुले सुगंधी व मुलायम असतात. ही फुले कधी तीन पाकळ्यांची सुद्धा असतात.
उत्तर:
(i) कडुनिंबाचे झाड: निळसर फुलांचे तुरे, त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी मनाला खूप सुखावणारा असतो.
(ii) करंजाचे झाड: फुललेल्या फुलाच्या आत एक नाजूक सुंदर कळी असते. तिचा रंग निळाजांभळा असतो. तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळाकार पांढरी टोपी असते.
(iii) माडाचे झाड: बारमहा हिरवेगार असते. बारमहा फळे धरतात. नारळाच्या फुलांना गंध नसतो. ती टणक असतात. या फुलांना तीन पाकळ्या असतात.
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1.
चतुर + य = चातुर्य. असे आणखी दोन शब्द लिहा.
उत्तर:
(i) सुंदर + य = सौंदर्य
(ii) समान + य = सामान्य.
प्रश्न 2.
पिवळा + सर = पिवळसर. असे आणखी दोन शब्द लिहा.
उत्तर:
(i) काळा + सर = काळसर
(ii) लाल + सर = लालसर.
प्रश्न 3.
पुढील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा:
शब्द – प्रत्यय – तत्सम वेगळा शब्द
(i) गुळगुळीत
(ii) अणकुचीदार
उत्तर:
शब्द – प्रत्यय – तत्सम वेगळा शब्द
(i) गुळगुळीत – ईत – करकरीत
(ii) अणकुचीदार – दार – नोकरदार
कृती ४: (स्वमत / अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
तुम्ही अनुभवलेला चैत्र’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर:
वेगवेगळे ऋतू आणि त्या ऋतूंची वेगवेगळी रूपे, त्यांचे विभ्रम शहरात कधी दिसतच नाहीत. शहरातील वातावरण तसे निरंगी, फिकट, चैत्र अनुभवायचा असेल, तर गावीच गेले पाहिजे. आम्ही अनेकदा सहलीला गेलो आहोत, पण गावी गेल्यावर निसर्गाचा जो सहवास लाभतो, त्याचा आनंद अवर्णनीय असतो. सुदैवाने माझे काका आमच्या गावी राहतात. यामुळे वसंत ऋतूत गावी जाण्याचे भाग्य आम्हांला लाभते. तिथे गेल्यावर मन मोहित होऊन जाते. जे कधीही जाणवलेले नसते, ते सौंदर्य तिथे दिसते. कोणीही समजावून न सांगता दिसते.
आता हे चाफ्याचे झाड पाहा, वास्तविक, त्या झाडाच्या रूपात आकर्षक म्हणावा असा एकही घटक नाही. पण तोच पांढरा चाफा फुलांनी डवरल्यावर पाहा, मन लोभावतेच. आपण नकळत वाकून जमिनीवर पडलेले फूल उचलतो. पाकळ्यांवरून हात फिरवतो. आत डोकावून पाहतो. चिमूटभर हळदपूड अलगद सोडलेली असावी, तसा पिवळा रंग तिथे शोभून दिसतो. गडद पिवळ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांनी डवरलेली सुरंगी तर पाहतच राहावी. सूर्याचा प्रकाश पडताच, ती फुले पूर्ण उमलतात, सारे रान सुगंधाने भरून जाते. जिकडे पाहावे तिकडे कोवळी कोवळी हिरव्या रंगांची पाने आणि शेकडो रंगछटा लेवून बसलेली फुले! निसर्ग या विविध रंगांनीच आच्छादलेला असतो, हे मला आमच्या गावी कोकणात पाहायला मिळते. मी तर ठरवलेच आहे… मोठा झालो की कोकणातच कायम राहायचे.
उतारा क्र.३
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
रिकाम्या चौकटी भरा:
(i) आंब्याला मोहोर येण्याचा सुरुवातीचा काळ –
(ii) फणसाला कोके येतात ते महिने
(iii) आंब्याचे झाड मोहोरांच्या झुबक्याने भरून जाते तो महिना
उत्तर:
(i) आंब्याला मोहोर येण्याचा सुरुवातीचा काळ – [पौषअखेर]
(ii) फणसाला कोके येतात ते महिने – पौष व माघ
(iii) आंब्याचे झाड मोहोरांच्या झुबक्याने भरून जाते तो महिना – [माघ]
प्रश्न 2.
जोड्या लावा:
‘अ’ गट – ‘ब’ गट
(i) फुलाऐवजी कोके येतात ते झाड – (अ) आंबा
(ii) कोकिळाचे कूजन चालते ते झाड – (आ) पक्ष्यांची घरटी
(iii) चैत्राची रूपरसगंधमय शोभा पूर्णत्वाला नेणारी – (इ) काळाकबरा
(iv) पक्ष्यांच्या घरट्यांचा रंग (ई) कैऱ्यांचे गोळे, (उ) फणस
उत्तर:
(i) फुलाऐवजी कोके येतात ते झाड – [फणस]
(ii) कोकिळाचे कूजन चालते ते झाड – [आंबा]
(ii) चैत्राची रूपरसगंधमय शोभा पूर्णत्वाला नेणारी – [पक्ष्यांची घरटी]
(iv) पक्ष्यांच्या घरट्यांचा रंग – [काळाकबरा]
कृती २: (आकलन)
प्रश्न 1.
पुढील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा:
(i) माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो.
उत्तर:
(i) एखादे लोभसवाणे दृश्य, ते चिमुकले असले तरी, मनाला खिळवून ठेवते. त्या चिमुकल्या रूपातले अल्पस्वरूप दर्शन म्हणजे माधुर्याचा एक थेंब असतो.
प्रश्न 2.
चूक की बरोबर ते लिहा:
(i) चैत्रात फणस फुलांनी डवरतो.
(ii) फणसाला चैत्रात नव्या पालवीचे घोसच्या घोस येतात.
(iii) निसर्गाचा विराट आविष्कार डोळ्यात न मावणारा असतो.
(iv) चिमुकल्या निसर्गदृश्यात निसर्गाच्या विराट आविष्काराचे दर्शन घडते.
उत्तर:
(i) चूक
(ii) चूक
(iii) बरोबर
(iv) बरोबर.
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1.
पुढील वाक्यातील प्रत्येक शब्दाचा प्रकार लिहा:
माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो.
उत्तर:
- माधुर्य – नाम
- हा – सर्वनाम
- थेंब – नाम
- अभिरुची – नाम
- पुरेसा – विशेषण
- वाटतो – क्रियापद
प्रश्न 2.
सहसंबंध लक्षात घेऊन उत्तर: लिहा:
(i) फुगणे: फुगीर:: पसरणे : [ ]
(ii) दरवळणे: दरवळ:: सांगणे : [ ]
उत्तर:
(i) फुगणे: फुगीर:: पसरणे: [पसरट]
(ii) दरवळणे: दरवळ:: सांगणे: [सांगावा]
कृती ४: (स्वमत / अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
निसर्गाचे प्रतिबिंब साठवण्यास मानवी बुद्धीचे चिमुकले विश्व असमर्थ असते’, या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत असल्यास त्याचे स्पष्टीकरण करा.
उत्तर:
हे विश्व अमर्याद आहे. त्याला अंत नाही. म्हणून माणूस कधीही हे संपूर्ण विश्व ओलांडू शकणार नाही. संपूर्ण विश्व पाहिलेच नाही, तर त्याचे स्वरूप कळणार कसे? म्हणजे हे विश्व माणसाच्या आवाक्यात कदापिही येणार नाही. माणसाला माहीत झालेल्या विश्वाच्याही पलीकडे अनंतापर्यंत हे विश्व पसरले आहे. माणूस स्वतः निसर्गापुढे क्षुद्र आहेच, पण त्याला ज्ञात झालेले विश्वसुद्धा या अनंत पसरलेल्या विश्वापुढे क्षुद्रच आहे. म्हणूनच निसर्गाचे प्रतिबिंब साठवण्यास माणसाच्या बुद्धीचे चिमुकले विश्व असमर्थ असते, हे मला मनोमन पटते.
व्याकरण व भाषाभ्यास
कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी….
अव्याकरण घटकांवर आधारित कृतीः
प्रश्न 1.
समास:
(१) पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा:
(i) स्वर्गवास
(ii) सत्यासत्य
(iii) भाऊबहीण
(iv) पानोपानी
(v) चौकोन
(vi) गंधफुले.
उत्तर:
(i) स्वर्गवास – विभक्ती तत्पुरुष समास
(i) सत्यासत्य – वैकल्पिक द्वंद्व समास
(iii) भाऊबहीण – इतरेतर द्वंद्व समास
(iv) पानोपानी – अव्ययीभाव समास
(v) चौकोन – द्विगू समास
(vi) गंधफुले – समाहास द्वंद्व समास
प्रश्न 2.
सामासिक शब्द व त्यांचे प्रकार यांच्या जोड्या लावा:
(सराव कृतिपत्रिका-१)
‘अ’ – ‘ब’
(i) हरघडी – (अ) द्विगू
(ii) क्रीडांगण – (आ) अव्ययीभाव
(iii) आईवडील – (इ) विभक्ती तत्पुरुष
(iv) पंचप्राण – (ई) वंद्व
उत्तर:
(i) हरघडी – अव्ययीभाव
(ii) क्रीडांगण – विभक्ती तत्पुरुष
(iii) आईवडील – वंद्व
(iv) पंचप्राण – द्विगू
प्रश्न 3.
अलंकार:
पुढील ओळीतले उपमान, उपमेय व अलंकार ओळखून स्पष्टीकरण दया: शाळा म्हणजे दुसरी माता होय!
उत्तर:
उपमेय’- शाळा, उपमान – माता
अलंकार – हा रूपक अलंकार आहे.
स्पष्टीकरण – वरील उदाहरणात उपमेय व उपमान यांत अभेद असून दोन्हींची एकरूपता साधली आहे. म्हणून हा ‘रूपक’ अलंकार आहे.
३. वृत्त:
प्रश्न 1.
पुढील काव्यपंक्तीचा लघु-गुरु क्रम लिहा: (सराव कृतिपत्रिका-२)
रघूनायका मागणे हेचि आता
उत्तर:
प्रश्न 2.
पुढील ओळींचे गण पाडा:
(i) भूपाळ जो मम मनोमुकरी उभासे
(ii) अभंगात गोडी तुझ्या भाकरीची
(iii) गवतहि सुमभूषा दाखवी आज देही
उत्तर:
(i)
४. शब्दसिद्धी:
प्रश्न 1.
चार अभ्यस्त शब्द लिहा → जसे – सळसळ.
उत्तर:
(i) भळभळ
(ii) झळझळ
(iii) खळखळ
(iv) वळवळ,
प्रश्न 2.
‘दुः’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा:
(i) …………………..
(ii) …………………..
(iii) …………………..
(iv) …………………..
उत्तर:
(i) दुष्काळ
(ii) दुर्दैव
(iii) दुःख
(iv) दुर्दशा.
प्रश्न 3.
पुढील उपसर्ग असलेले दोन शब्द लिहा:
(i) अभि ………………..
(ii) अभि ………………..
उत्तर:
(i) अभिरुची
(ii) अभिमान.
प्रश्न 4.
सामान्यरूप:
• तक्ता पूर्ण करा:
मूळ शब्द + विभक्ती – शब्द – सामान्यरूप
(i) फूल + ने – ………………. – ……………….
(ii) फळ + त – ………………. – ……………….
(iii) पिंपळ + च्या – ………………. – ……………….
(iv) रस्ता + ला – ………………. – ……………….
उत्तर:
मूळ शब्द + विभक्ती – शब्द – सामान्यरूप
(i) फूल + ने – फुलाने – फुला
(ii) फळ + त – फळात – फळा
(iii) पिंपळ + च्या – पिंपळाच्या – पिंपळा
(iv) रस्ता + ला – रस्त्याला – रस्ता
६. वाकप्रचार:
(१) पुढील अर्थासाठी योग्य वाक्प्रचार निवडा:
(i) सुसंगत न वाटणे – ………………………
(१) डोळ्यांत भरणे
(२) विसंगत वाटणे.
उत्तर:
(i) विसंगत वाटणे
(ii) भरभरून मिळणे – ………………………
(१) पेव फुटणे
(२) सहकार करणे.
उत्तर:
(ii) पेव फुटणे
(iii) लक्ष वेधणे —–
(१) शिरोधार्य मानणे
(२) नजरेत भरणे.
उत्तर:
(iii) नजरेत भरणे.
आ – भाषिक घटकांवर आधारित कृती:
प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) जुनी × ………………..
(ii) सुंदर × ………………..
(iii) भडक × ………………..
(iv) पांढरा × ………………..
(v) संपूर्ण × ………………..
(vi) प्रचंड × ………………..
उत्तर:
(i) जुनी × नवी
(ii) सुंदर × कुरूप
(iii) भडक × फिकट
(iv) पांढरा × काळा
(v) संपूर्ण × अपूर्ण
(vi) प्रचंड × चिमुकले.
प्रश्न 2.
गटात न बसणारा शब्द लिहा:
(i) जांभळा, जांभूळ, लाल, शेंदरी, पिवळा. ……………………..
(ii) झाड, वड, पिंपळ, माड, फणस. ……………………..
उत्तर:
(i) जांभूळ
(ii) झाड
प्रश्न 3.
पुढील शब्दांच्या अक्षरांतून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा:
उत्तर:
प्रश्न 4.
पुढील शब्दाचे दोन अर्थ लिहा: (सराव कृतिपत्रिका-१ व २)
उत्तर:
प्रश्न 5.
लेखननियम:
(१) अचूक शब्द लिहा:
(i) दूर्मीळ / दुर्मिळ / दुर्मिळ / दुर्मीळ. ………………………
(ii) मेत्रीण / मैत्रीण / मैत्रिण / मेत्रिण. ………………………
(iii) उज्ज्वल / ऊज्वल/उज्वल / ऊज्ज्वल. ………………………
(iv) दूष्काळ / दुष्कळ / दुष्काळ / दूश्काळ. ………………………
उत्तर:
(i) दुर्मीळ
(ii) मैत्रीण
(ii) उज्ज्वल
(iv) दुष्काळ,
प्रश्न 6.
पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
(i) ही घरटि म्हणजे वसंताच्या चित्रलीपीतली सूंदर वीरामचीन्हे वाटतात.
(ii) चेत्रातल्या पालविचे रुप कूठेही मनोहर असते.
(iii) हीवाळा नुकताच सुरू झालेला होता. (मार्च १९)
उत्तर:
(i) ही घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.
(ii) चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मनोहर असते.
(iii) हिवाळा नुकताच सुरू झालेला होता.
३. विरामचिन्हे:
प्रश्न.
प्रस्तुत वाक्यातील विरामचिन्हे ओळखून चिन्हे व नावे अचूक लिहा:
जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंदरी आणि जांभळा, किती म्हणून झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगांचे वर्णन करावे?
उत्तर:
४. पारिभाषिक शब्द:
प्रश्न.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द लिहा:
(i) Labour Court –
(ii) Zone –
(iii) Show Cause Notice –
(iv) Wall Paper –
उत्तर:
(i) Labour Court – कामगार न्यायालय
(ii) Zone – परिमंडळ/विभाग
(iii) Show Cause Notice – कारणे दाखवा नोटीस
(iv) Wall Paper – भिंतीला चिकटवण्याचा कागद.
५. अकारविल्हे/भाषिक खेळ:
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
रंगांच्या छटा लिहा:
उत्तर:
प्रश्न 3.
पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा:
मोहर → फळ → पान → फूल
उत्तर:
पान → फळ → फूल → मोहर.