Chapter 10.1 मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन)

Chapter 10.1 मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन)

Textbook Questions and Answers

कृति

कृतिपत्रिकेतील प्रश्न ३ साठी…

प्रश्न 1.
खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा.


उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10.1 मनक्या पेरेन लागा 5

प्रश्न 2.
‘माणसं पेरायला लागू’ या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा.
उत्तर:

कवी वीरा राठोड यांनी ‘मनक्या पेरेन लागा’ या कवितेत ‘बीज’ व ‘माती’ यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसे पेरण्याचा बहुमोल सल्ला दिला आहे.

त्यांनी माती व बीज यांच्या प्रतीकांतून एक सुंदर विचार मांडला आहे. एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते, बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे. त्याप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल, हा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो. म्हणून ‘माणसं पेरायला लागू’ हे शीर्षक अतिशय समर्पक ठरते.

प्रश्न 3.
‘माणसे पेरा । माणुसकी उगवेल’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:

मातीत बीज पेरलं की, मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते. माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तींपासून वाचवते. दुष्काळाशी लढते. बीजाची मायेने निगराणी करते. या सर्व प्रक्रियेतून बीजाचा वृक्ष होतो. त्याप्रमाणेच आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना पेरले, तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील, अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे. नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल व मानवजात सुखी होईल, असा सर्जनशील आशय ‘माणूस पेरा! माणुसकी उगवेल!’ या विधानातून व्यक्त होतो.

प्रश्न 4.
‘माणुसकी पेरणे काळाची गरज’ या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर:

मातीमध्ये बी पेरले की, मातीच्या मायेच्या संस्कारांमधून वृक्ष जन्माला येतो. माती ऊन-वारा-पाऊस-वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते. बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये; म्हणून ती दुष्काळाशी सामना करते. या प्रतीकांतून कवीनं सामाजिक आशय मांडला आहे. आज भ्रष्टाचार, दैन्य, अंधश्रद्धा व इतर धर्माध घटक यांमुळे समाज पोखरलेला आहे व त्यात माणुसकी लयाला जात आहे. अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणून माणुसकी पेरणे म्हणजेच विवेकी माणूस निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज अधोरेखित होते.

उपक्रम:
वरील कविता तुमच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेत/बोलीभाषेत (उदा., पावरी, गोंडी, कोरकू, वारली, व-हाडी, अहिराणी, मालवणी इत्यादी.) रूपांतरित करा व तिचा आस्वाद घ्या.

वाचा
विचारांचं संतुलन हवं! माणसाचं मन एक अजब यंत्रणा आहे. अनेक परस्परविरोधी भावना आणि विचारप्रवाह तिथे वास करत असतात, पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या अमलाखाली वावरतो. त्यामुळे आपण निष्क्रिय तरी होतो किंवा हातून चांगलं काम घडत असलं तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही. अशा नकारात्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावेत. अशी इच्छा बाळगून वावरतो. ते शक्य असतं का?

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे होकारात्मक आणि सृजनात्मक विचार झाले तरी त्यांना विरुद्ध बाजूही असतेच. त्याचप्रमाणे नकारात्मक विचार व भावना यांचादेखील काही उपयोग होतच असतो. तो उपयोग करून घेणं हे आपलं कौशल्य आणि हुशारी, हे लक्षात ठेवायला हवं, म्हणून तर अशा परस्परविरोधी भावना व विचार मनात वावरतात. त्या नकारात्मक गोष्टींनी गांगरून जाण्याचं जरासुद्धा कारण नाही. त्यांचं संतुलन राखणं महत्त्वाचं

ज्याप्रमाणे चार चाकी गाडीत ब्रेक व अॅक्सिलेटर म्हणजे वेगनियंत्रक व प्रवर्तक असतात. त्याप्रमाणे मनाला वेगानं पुढे नेणारे होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात. गाडीच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकची आवश्यकता भासते म्हणून ते असतात. त्यांना भिण्याचं काहीच कारण नाही. त्याप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात. त्यांच्या मदतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होतं आणि चुकीच्या निर्णयांनादेखील आळा बसतो. अर्थात नुसताच ब्रेक दाबला तर गाडी सुरूही होणार नाही आणि वेगदेखील घेणार नाही. म्हणूनच सतत आपल्या विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे.

– (गंमत शब्दांची- डॉ. द. दि. पुंडे)

Additional Important Questions and Answers

कृती: (स्वमत / अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
पुढील ओळींतील भावसौंदर्य विशद करा:

(i) ‘माती त्याला लावते जीव’ (धुड वोनं लगाडछ जीव)
उत्तर:

‘मनक्या पेरेन लागा’ या कवितेत वीरा राठोड यांनी बीजाला माती कशी जपते याविषयी हृदय शब्दांत सांगितले आहे.
कवी म्हणतात, एक बीज मातीत पडते. तेव्हा माती त्या बीजाला आईच्या मायेने जोपासते. मातीचे व त्याचे घट्ट नाते तयार होते. माती त्याच्यावर माया ओतते. त्याचे पालन-पोषण करते. त्याला सांभाळते. त्याची निगराणी करते. माती बीजाला जीव लावते. ऊन-वारा-पाऊसवादळ यांपासून त्याचे संरक्षण करते. जणू ते तिचे बाळ असते. त्याचा वृक्षापर्यंतचा प्रवास ती ममतेने घडवते. माती व बीजाचे मानवीकरण करून कवीने ही हृदयस्पर्शी ओळ लिहिली आहे.

(ii) ‘एक दिवस त्याला झाड करूनच सोडते’ (एक दन वोनं झाड करूनच छोडचं)
उत्तर:

कवी वीरा राठोड यांनी मनक्या पेरेन लागा’ या कवितेमध्ये मातीची महती सांगितली आहे. कवी म्हणतात, एक चिमुकले बीज मातीत पडते. माती त्याला आईच्या ममतेने जोपासते. मातीशी त्याचे दृढ नाते जडते. माती त्याला जीव लावते. एखादया लहान बाळासारखे त्याचे पालन-पोषण करते.

ऊन-वारा-पाऊस-वादळ यांची त्याला झळ लागू देत नाही. दुष्काळाशी माती लढते. कारण तिला बीजाचा वृक्ष करण्याचा आंतरिक ध्यास लागलेला असतो. बघता बघता तिचे स्वप्न साकार होते. एक दिवस त्या बीजाचे पूर्ण झाड होते, तेव्हा मातीला धन्यता वाटते.

या ओळीतून मातीचे कष्ट व जिद्द यांचा प्रत्यय येतो.