Chapter 3 माझ्या अंगणात
Textbook Questions and Answers
1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?
उत्तरः
कवीच्या अंगणात मोती-पवळ्याची म्हणजे धान्याची रास पडते.
प्रश्न आ.
रानमेवा कुठे उगवला आहे?
उत्तरः
रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे.
प्रश्न इ.
कवी गुण्यागोंविदाने सनमेवा खायला का सांगत आहे?
उत्तरः
रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो म्हणून कवी गुण्यागोंविदाने रानमेवा खायला सांगत आहे.
प्रश्न ई.
कवीच्या अंगणात पाखरे का येतात?
उत्तरः
कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात.
2. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.
प्रश्न अ.
गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत.
उत्तर:
गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं.
प्रश्न आ.
काळ्याभोर मातीतून टपोरे, दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते.
उत्तर:
काळ्याशार मातीतुनी मोती-पवळ्याची रास.
प्रश्न इ.
शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते.
उत्तर:
जीव दमतो, शिणतो घास भरवते माय.
प्रश्न ई.
रानातला रानमेवा एकमेकांना देत, घेत आनंदाने खाऊया.
उत्तरः
रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्यागोविंदानं खावा.
3. तुम्ही पाहिलेल्या एखादया धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा.
प्रश्न 1.
तुम्ही पाहिलेल्या एखादया धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा.
उत्तरः
दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या गावाला गेलो होतो. माझे गाव खेडेगाव आहे. गावातली वाट शेतमळ्याच्या मधून जाते. भाताच्या धान्याने शेतमळा भरला होता. पिवळीजर्द अशी भाताची शेते दिसत होती. त्यावर पाखरे येऊन भाताच्या लोंब्या आपल्या चोचीने काढून खात होती.
चर्चा करा. सांगा.
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
खेळूया शब्दांशी.
(अ) कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
प्रश्न 1.
काळ्याशार मातीतुन मोती – पवळ्याची…………
(मिजास’, आस, रास)
उत्तरः
रास
प्रश्न 2.
घरामंदी घरट्यात जशी दुधातली ………….. .
(माय, साय, जाय)
उत्तरः
साय
प्रश्न 3.
दूर उडुनिया जाता, आसू येती ……………….. .
(गालावर, सारेजण, घरट्यात)
उत्तरः
गालावर
(आ) समूहदर्शक शब्दांची यादी करा.
प्रश्न 1.
समूहदर्शक शब्दांची यादी करा.
- लाकडाची
- पक्ष्यांचा
- केळीचा
- प्राण्यांचा
- मुलांचा
- द्राक्षांचा
उत्तरः
- मोळी
- थवा
- घड
- कळप
- घोळका
- घड
(इ) खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
प्रश्न 1.
खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
(अ) सांडलं, (आ) रास, (इ) माय
उत्तरः
(अ) पडलं, (आ) मिजास, (इ) साय
(ई) खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा.
प्रश्न 1.
खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा.
(अ) खावा, (आ) माय, (इ) घरामंदी
उत्तरः
(अ) खाणे, (आ) आई, (इ) घरामध्ये
उपक्रम:
तुमच्या परिसरातील एखादया अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
खेळ खेळूया.
प्रश्न 1.
‘स’ चा शब्दपंखा पूर्ण करा.
- वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
- जंगलातील एक भित्रा प्राणी.
- नेहमी.
- एक शीतपेय.
- रस्ता
- उत्सव.
- ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा…
उत्तरः
कविता करूया
प्रश्न 1.
उत्तर:
घराभोवती प्रशस्त अंगण,
खेळ खेळी तेथे सारेजण, सडा, रांगोळी अन् तोरण, साजरे करतो सगळे सण.
प्रश्न 2.
उत्तर:
आला दिवाळीचा सण
दारा बांधूया तोरण
काढू दारापुढे रांगोळी
गोडधोड करू पुरणपोळी
प्रश्न 3.
उत्तर:
गुढीपाडव्याचा हा सण
दारा बांधू रंगीबेरंगी
पाना-फुलांचे तोरण
देवास देऊ नारळाचा मान
वरील आकृत्यांमध्ये गोलात दिलेल्या शब्दांशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचे निरीक्षण करा. यांमध्ये शेवट समान असणारे काही शब्द आहेत.
उदा., खेळ, मेळ, नारळ
सण, तोरण, सारेजण
दार, घर, सुंदर
अशा शब्दांना यमक जुळणारे शब्द म्हणतात.
या शब्दांचा वापर करून आपल्याला लयबद्ध वाक्ये तयार करता येतात.
उदा., घराभोवती प्रशस्त अंगण,
जमले तेथे सारेजण,
सडा, रांगोळी अन् तोरण,
साजरे करतो सगळे सण.
याप्रमाणे वरील आकृत्यांमध्ये दिलेल्या इतर शब्दांचा उपयोग करून कवितेच्या ओळी तयार करा..
Important Additional Questions and Answers
कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
प्रश्न 1.
तुम्ही आम्ही सारेजण, गुण्यागोंविदानं ……………. .
(खावा, जावा, रहावा)
उत्तरः
खावा
प्रश्न 2.
जीव दमतो, शिणतो’, घास भरवते ………………. .
(माय, हाय, जाय)
उत्तरः
माय
प्रश्न 3.
आणि माझ्या अंगणात लख्ख ………………… पडलं.
(प्रकाश, चांदणं, सोने)
उत्तरः
चांदणं
प्रश्न 4.
दिला-घेतला वाढतो, रानातला ……………….. .
(सुकामेवा, खवा, रानमेवा)
उत्तरः
रानमेवा
खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
‘माझ्या अंगणात’ या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
‘माझ्या अंगणात’ या कवितेचे कवी ‘ज्ञानेश्वर कोळी’ हे आहेत.
प्रश्न 2.
काळ्या रानात काय सांडले आहे?
उत्तर:
काळ्या रानात गहू व ज्वारीचे दाणे सांडले आहेत.
प्रश्न 3.
थकलेल्या जीवाला घास कोण भरवते?
उत्तरः
थकलेल्या जीवाला घास माय भरवते.
प्रश्न 4.
कवीच्या गालावर आसू का ओघळतात?
उत्तर:
कवीच्या अंगणातील दाणे टिपून पाखरं तृप्त होऊन दूर उडून जातात तेव्हा कवीच्या गालावर आसू ओघळतात.
खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.
प्रश्न 1.
आज माझ्या अंगणात पाखरे दाणे टिपत आहेत.
उत्तर:
अंगणात आज माझ्या दाणं टिपती पाखरं.
प्रश्न 2.
माझ्या अंगणात रानमेवा ऐटीने डुलत आहे.
उत्तर:
अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास.
प्रश्न 3.
अंगणातील पाखरं दूर उडून गेल्यावर कवीच्या गालावर आसू ओघळतात.
उत्तरः
दूर उडुनिया जाता आसू येती गालावर.
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न 1.
गहू ………………………….
……………………… सांडलं,
आणि ……………………….
……………………….. पडलं।।
उत्तर:
गहू शाळवाचं मोती
काळ्या रानात सांडलं,
आणि माझ्या अंगणात
लख्ख चांदणं पडलं ।।1।।
प्रश्न 2.
काळ्याशार …………………
……………………………रास,
अंगणात ……………………..
रानमेव्याची ………………..
उत्तर:
काळ्याशार मातीतुनी
मोती-पवळ्याची रास,
अंगणात माझ्या डुले
रानमेव्याची मिजास
प्रश्न 3.
जीव दमतो, ……………….
…………………………. माय,
घरामंदी ……………………..
……………………………साय।।
उत्तरः
जीव दमतो, शिणतो
घास भरवते माय,
घरामंदी घरट्यात
जशी दुधातली साय।।
प्रश्न 4.
अंगणात ………………….
…………………….. पाखरं,
दूर …………………………..
…………………….गालावर।।
उत्तरः
अंगणात आज माझ्या
दाणं टिपती पाखरं,
दूर उड्डुनिया जाता
आसू येती गालावर
खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
काळ्याशार मातीतून काय मिळते, असे कवी म्हणतात?
उत्तर:
काळ्याशार मातीतून मोती-पोवळ्या प्रमाणे गहू-ज्वारीचे पीक मिळते, ते चांदण्याप्रमाणे लखलखते, असे कवी म्हणतात.
प्रश्न 2.
रानातल्या रानमेव्याची मिजास आहे, असे कवी का म्हणतात?
उत्तरः
कवीच्या घराजवळ रानमेव्याची झाडे डुलत आहेत. ती फळे एकमेकांना दिल्या घेतल्याने आपला आनंद अजून वाढतो म्हणून कवी म्हणतात की, रानातल्या रानमेव्याची मिजास म्हणजेच तोरा आहे.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1.
कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्ये लिहा.
- आणि माझ्या अंगणात ……………………. चांदणं पडलं. (शुभ्र, लख्ख, मस्त)
- अंगणात आज माझ्या ………………….. टिपती पाखरं. (दाणं, फळं, धान्य)
उत्तर:
- लख्ख
- दाणं
जोड्या जुळवा.
प्रश्न 2.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. लख्ख | (अ) साय |
2. मोती-पवळ्याची | (ब) मिजास |
3. रानमेव्याची | (क) रास |
4. दुधातली | (ड) चांदणं |
उत्तर:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. लख्ख | (ड) चांदणं |
2. मोती-पवळ्याची | (क) रास |
3. रानमेव्याची | (ब) मिजास |
4. दुधातली | (अ) साय |
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
कवीने मोती-पवळ्याची उपमा कशास दिली आहे?
उत्तरः
कवीने मोती-पवळ्याची उपमा ज्वारीच्या धान्याच्या दाण्यांना दिली आहे.
प्रश्न 2.
दिल्या घेतल्याने काय वाढते?
उत्तरः
दिल्या घेतल्याने रानातला रानमेवा वाढतो.
कृती 3: काव्यसौंदर्य
प्रश्न 1.
‘दूर उडुनिया जाता आसू येती गालावर’ या काव्यपंक्तीतून सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर:
कवीने आपल्या कवितेतून शेतात धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला होणारा आनंद व्यक्त केला आहे. धान्याने, समृद्धीने भरलेल्या अंगणात अनेक पाखरे दाणे टिपण्यास येतात. मात्र नंतर दूर उडून जातात. त्यांचा सहवास न लाभल्याने डोळ्यांतील अश्रू गालावर ओघळतात. सवयीच्या पाखरांचा सहवास न लाभल्याचे दु:ख प्रस्तुत पंक्तीतून व्यक्त होते.
व्याकरण व भाषाभ्यास
समूहदर्शक शब्दांची यादी करा.
प्रश्न 1.
- चाव्यांचा
- फुलांचा
- पेपरांची
- पुस्तकांचा
- वाळूचा
- मेंढ्यांचा
उत्तरः
- जुडगा
- गुच्छ
- रद्दी
- गट्ठा
- ढीग
- कळप
खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
प्रश्न 1.
- रानमेवा
- दमतो
- तुम्ही
उत्तरः
- खावा
- शिणतो
- आम्ही
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
प्रश्न 1.
- रान
- रास
- मिजास
- जीव
- शिणणे
- माय
उत्तरः
- वन, जंगल
- ढीग
- ऐट, तोरा
- प्राण
- थकणे
- आई
खालील नामांना कवितेतील विशेषणे शोधून लिहा.
प्रश्न 1.
- चांदण
- रान
उत्तरः
- लख्ख
- काळे
खालील शब्दांचे वचन बदला.
प्रश्न 1.
- घरटं
- रास
- पाखरं
- अंगण
उत्तरः
- घरटी
- राशी
- पाखरे
- अंगण
खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा.
प्रश्न 1.
- आसू
- पवळ्याची
- दाणं
उत्तर:
- अश्रू
- पोवळ्याची
- दाणे
‘ख’ चा शब्दपंखा पूर्ण करा.
प्रश्न 1.
1. खोटेच्या विरुद्ध
2. बैलगाडी
3. गाईच्या दुधापासून तयार होणारा एक पदार्थ
4. मोठा दगड
5. पक्षी या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द पा …
उत्तरः
लेखन विभाग:
खालील विषयावर चर्चा करा व लिहा.
प्रश्न 1.
खालील विषयावर चर्चा करा व लिहा.
उत्तरः
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, या विषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
- गणू – “बाबा, रानमेवा कशाला म्हणतात?”
- बाबा – “रानात मिळणाऱ्या फळांना ‘रानमेवा’ असे म्हणतात.”
- गणू – “बाबा, मौ तर कधीही रानमेवा पाहिला नाही.”
- बाबा – “यावर्षी मे महिन्याच्या सुट्टीत आपण गावाला गेलो की मी तुला रानात घेऊन जाईन.”
- गणू – बाबा खरंचं!
- बाबा – होय, आमच्या लहानपणी आम्ही रानात जाऊन करवंद, जांभळ, तोरण, अळू, खूप खायचो,
- गणू – करवंद कोणत्या रंगाची असतात?
- बाबा – करवंद काळ्या रंगाची व खायला खूप गोड असतात. त्यांची झुडपे असतात व त्या झुडपांना काटे असतात.
- गणू – बाबा ते काटे टोचत नाही का?
- बाबा – टोचतात म्हणून ती अलगद काढावी लागतात. ही करवंदे, जांभळे, अळू, यांवर कोणतीही जंतूनाशक फवारणी नसते, त्यामुळे ही नैसर्गिकरित्या पिकतात. त्यामुळे ती चवीला खूपच छान असतात. जांभळाचे फळ तर खूप औषधीही आहे.
प्रश्न 2.
तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
- शेतकरीदादा, तुम्ही तुमच्या शेतात कोणकोणती पिके घेता?
- बी पेरण्याआधी कोणकोणती कामे करावी लागतात ?
- शेताची मशागत केल्यावर का ?
- शेतात रोपे उगवल्यानंतर त्याची पुन्हा लागवड करावी लागते का?
- शेतात चांगले पीक येण्यासाठी कोणत्या खताचा वापर करावा लागतो?
- धान्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करता?
- धान्य शेतात तयार झाल्यावर प्रथम काय करावे लागते?
- धान्याची कापणी झाल्यावर सर्व पीक कुठे ठेवतात?
- धान्य मळ्यात पक्षी किंवा प्राणी येऊ नयेत म्हणून कोणती काळजी घेता?
- धान्य तयार झाल्यावर सर्व धान्य कुठे नेऊन विकता?
Summary in Marathi
काव्य परिचयः
घराला जसं स्वतंत्र अस्तित्व असतं तसं अंगणालाही असतं. आशा-आकाक्षांच्या वृक्षवेली, स्वप्नांची फुलपाखरं, सृजनाच्या कळ्याफुलं या अंगणातच भेटत राहतात असे हे अंगण – ‘माझ्या अंगणात’ या कवितेत आले आहे. रात्रंदिवस कष्ट केल्यावर शेतातील धान्य, समृद्धता अंगणात येऊन पसरते. तेव्हा शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नाही. शेतकऱ्याच्या मनातील याच विविध भावनांचे, वर्णन कवीने केले आहे.
Every house has its own identity. The same way every courtyard is unique. One can meet to the creepers of wishes, butterflies of dreams, birds of innovation in this courtyard. Poet has described such a ‘courtyard’ in his poem. After a core hardship when farmer pours his wealth of grains in the courtyard, his joy becomes boundless. The feelings and emotions of a farmer are described in this poem.
कवितेचा भावार्थ:
शेतात धान्य डौलात डुलत असलेले पाहून आनंदित झालेला शेतकरी म्हणतो की, माझ्या काळ्याशार शेतात मोत्यांप्रमाणे गहू, ज्वारीचे दाणे उगवून आले आहेत, छान पिकले आहेत आणि त्यांच्या प्रकाशाने जणू माझ्या अंगणात शुभ्र चांदणे पडल्याचा भास होत आहे.।।1।।
शेतातील काळ्या मातीतून मोती-पोवळ्यांसारखी सुरेख व किमती अशा धान्याची रास सांडली आहे. माझ्या अंगणात रानमेव्याची अर्थात रानातील फळे, कंदमुळांची रास आनंदाने पसरली आहे.।।2।।
रानातल्या फळे व कंदमुळांचा मेवा एकमेकांना दिल्या-घेतल्याने वाढतो. तुम्ही, आम्ही, सगळ्यांनी हा रानमेवा एकत्र आनंदाने, प्रेमाने, समजुतीने खाऊ या.।।3।।
शेतामध्ये कष्ट करून दमलेल्या जीवाला घरी आल्यावर आई मायेने घास भरवते. घरामध्ये मायेने करणारी, छोट्याशा घरट्यात सुखाने राहणारी आई जणू दुधावरची साय आहे.।।4।।
आज माझ्या अंगणात अनेक पाखरे दाणे टिपत आहेत, त्यांना पाहून जीव सुखावून जातो आहे. परंतु हिच पाखरे जेव्हा अचानक दूर उडून जातात, तेव्हा डोळ्यांतील अश्रू गालावर ओघळतात.।।5।।
शब्दार्थ:
- शाळवाचं मोती – ज्वारीचे दाणे – Jowar
- काळ्या रानात – काळ्याभोर शेतात – (farm with black soil)
- लख्ख चांदण – चमचमणारे तारे – shining stars
- काळ्याशार – काळ्या कुळकुळीत – dark
- माती – अवील, मृदा – Soil, mud
- रास – ढीग – a heap
- चांदणं – चंद्राचा प्रकाश – the moonlight
- रानमेवा – रानातील – jungle fruits
- फळफळावळ गुण्यागोविंदाने – स्नेहाने – amicably
- शिणणे – थकणे – to be fatigued
- माय – आई, माता – mother
- दूध – क्षीर – milk
- आसू – अश्रू – tear
- दुधातली साय – दुधावरील मलई – milkcream
- घरटे – पक्ष्यांच घर – nest
- मोती-पवळे – ज्वारीच्या धान्याचे – pearl दाणे मोती व पोवळ्याप्रमाणे
- वाटणे डौलात – तोऱ्यात – with pride
- मिजास – गर्व, तोरा (arrogance)
- शिणतो – थकतो (to be fatigued)
- तृप्त होणे – समाधानी होणे (to get satisty)
- प्रशस्त – ऐसपैस (spacious)
- भित्रा – घाबरट (Timid)
वाकाचार:
1. गुण्यागोविंदाने राहणे – आनंदाने राहणे