Bhag 5.4 व्याकरण काळ
Textbook Questions and Answers
कृती
1. खालील वाक्यांतील रीती काळाचा प्रकार ओळखा.
प्रश्न 1.
नजमा उत्तम कविता लिहीत असे. …………………………………………
उत्तर :
रीती भूतकाळ
प्रश्न 2.
मी लोकांना मदत करत राहीन. …………………………………………
उत्तर :
रीती भविष्यकाळ
प्रश्न 3.
अभिजित सतार उत्तम वाजवत असतो. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ
प्रश्न 4.
शिक्षक जे सांगतात, ते विदयार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ
प्रश्न 5.
एका गावात एक उत्तम चित्रकार राहत होता. …………………………………………
उत्तर :
रीती भूतकाळ
प्रश्न 6.
राहल प्रार्थनेला नेहमीच उशिरा येत असतो. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ
प्रश्न 7.
माधवराव नेहमीच सुगम संगीत ऐकत असत. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ
प्रश्न 8.
दादासाहेब दररोज फिरायला जात असतात. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ
प्रश्न 9.
तो सदोदित आजारी पडत असतो. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ
2. खालील वाक्यांतील काळ ओळखून त्यापुढे दिलेल्या कंसातील सूचनेनुसार वाक्यबदल करा.
प्रश्न 1.
मी तबला वाजवतो. (रीती भूतकाळ करा.)
उत्तर :
मी तबला वाजवत असे.
प्रश्न 2.
मुले खो-खो खेळत होती. (पूर्ण भूतकाळ करा.)
उत्तर :
मुले खो-खो खेळली होती.
प्रश्न 3.
रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. (साधा वर्तमानकाळ करा.)
उत्तर :
रस्त्याच्या डाव्या बाजूने चल.
प्रश्न 4.
तो विदयार्थी अडखळत वाचत असतो. (साधा भूतकाळ करा.)
उत्तर :
तो विदयार्थी अडखळत वाचत होता
प्रश्न 5.
वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते. (साधा भविष्यकाळ करा.)
उत्तर :
वर्गातील विदयार्थी लक्षपूर्वक ऐकतील / वर्गातील विदयार्थी लक्षपूर्वक ऐकत असतील.
Additional Important Questions and Answers
1. खालील कृती सोडवा व काळाचे नाव लिहा. (कंसातील क्रियापदांचे योग्य रूप वापरा)
प्रश्न 1.
या वर्षी मी काश्मीर सहलीला ……………………………. (जाणे)
उत्तर :
या वर्षी मी काश्मीर सहलीला जाईन. [भविष्यकाळ]
प्रश्न 2.
काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध ……………………………. (लिहिणे)
उत्तर :
काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध लिहिला. [भूतकाळ]
प्रश्न 3.
हे बघ आनंद, उदया तू सहलीला असल्यामुळे लवकर ……………………………. (जाणे, उठणे)
उत्तर :
हे बघ आनंद, उदया तू सहलीला असल्यामुळे लवकर ऊठ. [वर्तमानकाळ]
प्रश्न 4.
परवा सुरेशने सुरेल गीत ……………………………. (गाणे)
उत्तर :
परवा सुरेशने सुरेल गीत गायले. [भूतकाळ]
प्रश्न 5.
काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना ……………………………. (देणे)
उत्तर :
काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना दिले. [भूतकाळ]
प्रश्न 6.
वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू ……………………………. (देणे)
उत्तर :
वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू दिली. [भूतकाळ]
प्रश्न 7.
भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास ……………………………. (करणे)
उत्तर :
भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास करेन. [भविष्यकाळ]
प्रश्न 8.
हसणे हा मनुष्यस्वभाव ……………………………. असणे.
उत्तर :
हसणे हा मनुष्यस्वभाव आहे. [वर्तमानकाळ]
प्रश्न 9.
काल रात्री सारखा विजांचा गडगडाट ……………………………. (होणे)
उत्तर :
काल रात्री सारखा विजांचा गडगडाट होता. [भूतकाळ]
प्रश्न 10.
उदया मी ही मालिका पुन्हा ……………………………. (बघणे)
उत्तर :
उदया मी ही मालिका पुन्हा बघेन. [भविष्यकाळ]
सरावासाठी कृती :
1. खालील वाक्यांतील काळ ओळखा.
प्रश्न 1.
(a) दहा वर्षांपूर्वी मी या शाळेत रुजू झाले.
(b) आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार!
(c) माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं हात फिरविला.
(d) या मंडळींनी गेल्या पंचवीस वर्षांत साऱ्या जगाचं एका ‘मॉल’ मध्ये रूपांतर केलं.
(e) या वयातही ठणठणीत प्रकृती आहे माझी.
उत्तर :
(a) भूतकाल
(b) भविष्यत्काल
(c) वर्तमानकाल
(d) भूतकाल
(e) वर्तमानकाल
2. कंसातील सूचनेनुसार वाक्यबदल करा.
प्रश्न 1.
ही शाळा सरकारी आहे. (रीती भविष्यकाळ करा)
उत्तर :
ही शाळा सरकारी असेल.
प्रश्न 2.
सोपानदेवांची आणि माझी वीस-बावीस वर्षांची मैत्री आहे. (पूर्ण भूतकाळ करा)
उत्तर :
सोपानदेवांची आणि माझी वीस-बावीस वर्षांची मैत्री होती.
प्रश्न 3.
प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. (पूर्ण भविष्यकाळ करा)
उत्तर :
प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल.
प्रश्न 4.
एक फळ मात्र मी रोज नेमानं खात असतो. (रीती भूतकाळ करा)
उत्तर :
एक फळ मात्र मी रोज नेमानं खात असे.
प्रश्न 5.
सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली. (काळ ओळखा)
उत्तर :
वर्तमानकाळ
3. खालील वाक्यातील रीती काळाचा प्रकार ओळखा.
प्रश्न 1.
a. विदयार्थी मामूचा हात खेचून त्याला आग्रहाने चहाला नेतात.
b. टी.व्ही.ची गाडी रोजच्यासारखी चारला येणार होती.
c. उषा वहिनी नेहमीप्रमाणे पर्स घ्यायला आत जातील.
d. ही आजची भीषण स्थिती असे.
e. पुस्तकांचा अविट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत जाईल.
उत्तर :
a. रीती वर्तमानकाळ
b. रीती भूतकाळ
c. रीती भविष्यकाळ
d. रीती भूतकाळ
e. रीती भविष्यकाळ
काळ प्रास्ताविकः
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात. उदा. विदयार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा. यातील ‘करावा’ या शब्दातून अभ्यास करण्याची क्रिया दर्शविली जाते. वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो. तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो. क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात.
उदा.
- माधुरी गीत गाते. (गाण्याची क्रिया सुरू आहे – आता घडत आहे)
- माधुरीने गीत गाईले/गायले (गाण्याची क्रिया पूर्वी घडत आहे – पूर्वी कधी तरी)
- माधुरी गीत गाईल. (गाण्याची क्रिया पुढे घडणार आहे – भविष्यात कधी तरी)
यावरून काळाचे तीन मुख्य प्रकार पडतात.
- वर्तमानकाळ – (क्रिया आता घडली आहे.)
- भूतकाळ – (क्रिया पूर्वी घडली आहे.)
- भविष्यकाळ – (क्रिया पुढे कधी तरी घडेल)
काळ व काळाचे प्रकार :
‘वाचणे’ ही क्रिया काळाच्या सर्व प्रकारांत खालीलप्रमाणे दर्शविली जाते.
वर्तमानकाळ | भूतकाळ | भविष्यकाळ |
साधा/सामान्य
|
साधा/सामान्य
|
साधा/सामान्य
|
अपूर्ण
|
अपूर्ण
|
अपूर्ण
|
पूर्ण
|
पूर्ण
|
पूर्ण
|
रीती
|
रीती
|
रीती
|
लक्षात ठेवा :
- वाक्यात क्रियापद एकटेच असेल तर तो साधा काळ असतो.
- क्रिया सुरू आहे म्हणजेच संपलेली नाही तर अपूर्ण आहे हे समजते तो अपूर्ण काळ असतो.
- क्रिया पूर्ण झाली याचा बोध होतो तेव्हा तो पूर्ण काळ असतो.
- एखादी क्रिया नेहमी वा सतत घडत असेल तर तो रीती काळ असतो.
रीती काळ :
क्रियापदाच्या स्वरूपावरून त्या विशिष्ट क्रियेची रीत, पद्धत, सवय, वहिवाट समजते तेव्हा तो रीती काळ असतो.
उदा.
- धावपटू धावण्याचा सतत सराव करत असतात. (रीती वर्तमानकाळ) (धावण्याच्या कृतीचा सराव – रीत)
- माझ्या एकत्र कुटुंबात आजी उत्तम संस्कार करत असे. (रीती भूतकाळ) (आजीची उत्तम संस्काराची रीत)
हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील. (रीती भविष्यकाळ) (हिरव्या पालेभाज्यांची आवश्यकता सर्वांना – खात जातील.)
रीती काळाची वैशिष्ट्ये :
वैशिष्ट्ये | उदाहरण |
1. रीती काळात सामान्यपणे संयुक्त क्रियापदांचा वापर असतो. | 1. सुरेखा गीत गात असते. (वर्तमानकाळ) (नेहमी गीत गाण्याची सवय) गात असते संयुक्त क्रियापद |
2. संयुक्त क्रियापदावरून क्रियेचे सतत चालणारे रूप समजते. क्रियेची पुनरावृत्ती दिसते. | 2. तो वर्गात नेहमी बोलत असे. (भूतकाळ) (पूर्वी त्याला असणारी बोलण्याची सवय) |
3. क्रियापदाच्या स्वरूपावरून सतत चालणारी क्रिया कोणत्या काळात घडत आहे हे समजते. | 3. क्रीडांगणावर मुले खेळत असतील. (भविष्यकाळ) (मुलांची खेळण्याची सवय) |
4. धातूला प्रत्यय लावून क्रियापद तयार होते. उदा. खात, बोलत, करत इ. | 4. समीर पुस्तक वाचत असे. (भूतकाळ) (वाच पासून वाचत हे धातूसाधित रूप असे – क्रियावाचक शब्द वाचत असे संयुक्त क्रियापद |