Chapter 1 भारतमाता
Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
रिकाम्या जागा भरा.
- रंग वेगळे ……….. वेगळे, तरी येथली सर्व फुले.
- मानव सारे ………… असती, शिकवण ही जगतास दिली.
- या मातेची मुले ………. सदा तिचा ध्वज उंच धरु.
- प्रियतम अमुचे …………… हे, प्रियतम या गंगा जमुना.
उत्तर:
- गंध
- समान
- सद्गुणी
- सह्यविंध्य
प्रश्न 2.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. पाणी | (अ) डुलणारी |
2. हिमालय | (ब) सळसळते |
3. वारे | (क) धवल |
4. भारतमाता | (ड) झुळझुळते |
5. शेते | (इ) प्रियतम |
उत्तर:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. पाणी | (ड) झुळझुळते |
2. हिमालय | (क) धवल |
3. वारे | (ब) सळसळते |
4. भारतमाता | (इ) प्रियतम |
5. शेते | (अ) डुलणारी |
प्रश्न 3.
कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
- प्रियतम अमुची …………………. तिची मुले.
- रंग वेगळे …………….. सर्व फुले.
- प्रिय आम्हाला …………… झुळझुळते.
- प्रियकर ही डुलणारी ……………. सळसळते.
- प्रियतम आमुचा ………….. जो गगना.
- प्रियतम अमुचे सह्यविंध्य …………. जमुना.
- या मातेची …………. प्रिय झाली.
- या मातेची ………….. उंच धरु.
उत्तर:
- भारतमाता, आम्ही सारी
- गंध वेगळे, तरी येथली
- येथील माती, प्रिय हे पाणा
- शेते, प्रिय हे वारे
- धवल हिमालय, बघे भिडाया
- हे, प्रियतम या गंगा
- मुले सद्गुणी, सर्व जगाला
- मुले लाडकी, सदा तिचा ध्वज प्रश्न
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
सारी मुले कुणाची आहेत?
उत्तर:
सारी मुले भारतमातेची आहेत.
प्रश्न 2.
फुले कशी आहेत?
उत्तर:
फुले विविध रंगांची व गंधाची आहेत.
प्रश्न 3.
हिमालय कसा आहे?
उत्तर:
हिमालय धवल व गगनाला भिडणारा आहे.
प्रश्न 4.
भारतमातेने जगतास कोणती शिकवण दिली?
उत्तर:
सारे मानव समान आहेत ही शिकवण भारतमातेने जगतास दिली.
प्रश्न 5.
भारतमातेची मुले काय करणार आहेत?
उत्तर:
भारतमातेची मुले ध्वज उंच करणार आहेत.
खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
कवयित्रीला कोण कोण प्रिय आहे?
उत्तर:
कवयित्रीला भारतमाता, सर्व फुले, माती, पाणी, शेते, वारे, हिमालय, सह्याद्री व विध्य पर्वत, गंगा, जमुना, सर्व मुले प्रिय आहेत.
प्रश्न 2.
भारतमातेची मुले कशी आहेत? त्यांनी कोणती शिकवण दिली?
उत्तर:
भारतमातेची मुले सद्गुणी आहेत. त्यांनी मानव सारे समान आहेत ही शिकवण सर्व जगाला दिली.
प्रश्न 3.
भारतमातेविषयी कृतज्ञता कशी व्यक्त केली आहे?
उत्तर:
भारतमाता सर्वांना प्रिय आहे. तिला सर्व वंदन करत आहेत. तिचा ध्वज उंच फडकवून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
वचन बदला.
- मुलगा
- माती
- पाणी
- नदी
- किडा
- भाजी
- घर
- झाड
- शेत
उत्तर :
- मुले
- माती
- पाणी
- नदया
- किडे
- भाज्या
- घरे
- झाडे
- शेते
प्रश्न 2.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- वंदन
- माता
- सदा
- गंध
- लाडकी
उत्तर:
- नमस्कार
- आई
- नेहमी
- सुवास
- आवडती, प्रिय
प्रश्न 3.
खालील शब्दांचे विरूद्धार्थी अर्थाचे शब्द लिहा.
- प्रियतम
- समान
- उंच
- सद्गुणी
उत्तर:
- अप्रिय
- असमान
- बुटका, ठेंगणा
- दुर्गुणी
प्रश्न 4.
कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द शोधा.
- मुले
- झुळझुळते
- गगना
- दिली
- करू
उत्तर:
- फुले
- सळसळते
- जमुना
- झाली
- धरू
लेखन विभाग:
प्रश्न 1.
‘भारतमाता’ शब्द वापरून चार वाक्ये लिहा.
उत्तर:
- भारतमाता आम्हाला प्रिय आहे.
- आम्ही भारतमातेला वंदन करू.
- भारतमातेचा ध्वज उंच धरू,
- आम्ही भारतमातेची मुले आहोत.
प्रश्न 2.
भारतमाता विविध गोष्टींनी नटलेली आहे. चौकटीत त्यांची नावे लिहा.
उत्तर:
- हिमालय
- फुले
- माती
- पाणी
- गंगा, जमुना
- सयविंध्य
Summary in Marathi
काव्य परिचय:
भारतमाता ही भारतभूमीचे वैशिष्ट्य सांगणारी कविता आहे. भारताच्या मातीत विविधता आहे. निसर्ग भरभरून फुलला आहे. पर्वतराजी उंच उंच आहेत. हिची प्रजा गुणी असून जगतासाठी आदर्श आहे. भारतमातेविषयी आदर व कृतज्ञता बाळगून आपण तिचा गौरव वाढवू व ध्वज उंच फडकवू हा अर्थ या कवितेतून प्रतित होतो.
शब्दार्थ:
- प्रियतम – आवडती, प्रियकर (darling)
- अमुची – आपली (ours’)
- गंध – वास (odour, smell)
- माती – मृत्तिका (earth, soil)
- डुलणारी – वाऱ्यावर हलणारी (oscillating)
- शेते – शेती (farming)
- धवल – पांढराशुभ्र, सफेद (white)
- भिडणे – पोहोचणे (to meet)
- गगन – आकाश (sky)
- सयविंध्य – सह्याद्री, विंध्याचल पर्वत (Sahyadri)
- मानव – माणूस (human being)
- शिकवण – उपदेश (to advise, teaching)
- सद्गुणी – गुणवान (virtuous)
- सदा – नेहमी (always)
- ध्वज – झेंडा (flag)
- वंदन – नमस्कार (salutation)
वाक्प्रचार व अर्थ:
1. भिडणे – जाऊन ठेपणे, पोहोचणे