Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

Day
Night

Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

Textbook Questions and Answers

1. फरक सांगा:

प्रश्न 1.
फरक सांगा:


उत्तर:

यंत्राद्वारे केली जाणारी कामे

माणसांद्वारे केली जाणारी कामे

1. नाटक, सिनेमा, प्रवास यांची तिकिटे काढणे.

1. स्वयंपाक करणे.

2. घरातला हिशोब ठेवणे.

2. कपडे धुणे, भांडी घासणे.

3. बँका वगैरे कचेरीतील कामे.

3. घर-इमारतीची स्वच्छता.

4. पुस्तक छपाई इत्यादी.

4. मुलांना सांभाळणे.

2. पाठात पुढील यंत्रे कोणती कार्ये करतात?

प्रश्न 1.
पाठात पुढील यंत्रे कोणती कार्ये करतात?

उत्तर:

यंत्र

कार्य

1. रोबो फोन

1. फोन करणे व घेणे.

2. यंत्रमानव

2. कार्यालयीन कामे.

3. सयाजी

3. कोणाच्याही सहयांची हुबेहूब नक्कल करणे.

3. दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.

प्रश्न 1.
दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.
1. …………………………….
2. …………………………….
उत्तर:
1. यंत्रे किंवा यंत्रमानव यांना जगाचा ताबा कधीच घेता येणार नाही.
2. यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकणार नाहीत.

4. खालील शब्दांची विशेषणे, विशेष्य शोधा व लिहा :

प्रश्न 1.
खालील शब्दांची विशेषणे, विशेष्य शोधा व लिहा :

  1. [ ] – यंत्र
  2. [ ] – उद्गार
  3. हुबेहूब – [ ]
  4. परिपूर्ण – [ ]

उत्तर:

  1. [उद्धट] – उद्गार
  2. [अमानुष] – यंत्र
  3. हुबेहूब – [नक्कल]
  4. परिपूर्ण – [मनोव्यापार]

5. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. हकालपट्टी करणे.

(अ) आश्चर्यचकित होणे.

2. स्तंभित होणे.

(आ) योग्य मार्गावर आणणे.

3. चूर होणे.

(इ) हाकलून देणे.

4. वठणीवर आणणे.

(ई) मग्न होणे.

6. खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित शब्द व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकण करा व लिहा:

प्रश्न 1.
खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित शब्द व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकण करा व लिहा:
अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्त, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन.
उत्तर:
उपसर्गघटित शब्द – अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार, प्रतिदिन.
प्रत्ययघटित शब्द – भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, विद्वत्त, गावकी, दगाबाज.

7. स्वमत.

प्रश्न (अ)
तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोतम पर्याय ‘यंत्र’ ठरू शकेल का ? सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
प्रथम हे मान्य करावे लागेल की काही बाबतीत यंत्रे माणसापेक्षा श्रेष्ठच आहेत. उदाहरणार्थ संगणकच बघा. तो अनेक कामे अचूक व अफाट वेगाने करतो. त्याचे गणिती कौशल्यही अचाट आहे. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या विकासामुळे सर्व कामकाजात तर अचाट प्रगती झाली आहे. दैनंदिन व्यवहार खूपच सुरळीत व वेगवान झाले आहेत. आपण अनेक कामे घरबसल्या करू शकतो. आपला वेळ व कष्ट टळतात.

अनेक लोक तर कार्यालयीन कामे घरूनच करतात. माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो काम करतात. उदा., खाणी, अंतराळयाने. यंत्रांच्या फायदयांची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल. ही यंत्रे माणसाला सर्वोत्तम पर्याय मात्र कधीच ठरू शकणार नाहीत. सांगितलेले काम यंत्रे उत्तम रितीने पार पाडतील, हे खरे. पण, सांगितलेले काम चांगले की वाईट, त्या कामामुळे मानवजातीचे काही नुकसान होईल का, केलेली कृती सौंदर्यपूर्ण आहे का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे यंत्रे देऊ शकत नाहीत. ती माणूसच देऊ शकतो.

प्रश्न (आ)
‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली, तर…’ कल्पनाचित्र रेखाटा.
उत्तर:
यंत्रांची कार्यक्षमता वाढू लागताच यंत्रमानवांची झपाट्याने निर्मिती होऊ लागली. यंत्रमानवांची मागणीही वाढली. प्रत्येक कामासाठी यंत्रमानव वापरण्याची लोकांना सवयच जडली. शेती, दुकाने, कार्यालये, रस्ते, मंदिरे, शाळा-कॉलेजे वगैरे सर्व ठिकाणी यंत्रमानवांची नेमणूक होऊ लागली. इतकेच काय, घरात सकाळी उठल्यापासून करायची सर्व कामेसुद्धा यंत्रमानवांकडे देण्यात येऊ लागली. यामुळे कामे भराभर व कार्यक्षमतेने होऊ लागली.

या स्थितीचा एक उलटाही परिणाम होऊ लागला. माणसांना कामे कमी राहिली. रिकाम्या वेळामुळे नको नको ते विचार मनात येऊ लागले. एकमेकांविरुद्ध कारस्थाने रचणे सुरू झाले. त्यासाठी यंत्रमानवांचाच वापर होऊ लागला. प्रतिस्पर्धीसुद्धा यंत्रमानवांचा वापर करू लागले. यामुळे भलतेच दृश्य ठिकठिकाणी दिसू लागले. माणसे राहिली बाजूला आणि यंत्रमानवांमधील लढाया सुरू झाल्या. लोक गर्दी करून यंत्रमानवांमधील भांडणे, मारामाऱ्या पाहू लागले. चलाख लोकांनी ही भांडणे सोडवण्यासाठी बुद्धिमान यंत्रमानवांची समिती स्थापन केली. या सगळ्यांतून एक हास्यास्पद चित्र उभे राहू लागले. करमणुकीचा एक वेगळाच मार्ग निर्माण झाला.

उपक्रम:

प्रश्न 1.
‘मानवाचा खरा मित्र – यंत्रमानव’ ही लेखक सुबोध जावडेकर यांची विज्ञानकथा मिळवा व तिचे वर्गात वाचन करा.

भाषाभ्यास:

प्रश्न 1.
पुढे दिलेली उदाहरणे वाचा. त्यांतील भाव समजून घ्या व त्यांतील रसाचे नाव लिहा: (चौकटीत उत्तरे दिली आहेत.)
उत्तर:
1. “दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी”
– [शृंगार रस]

2. “जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले
दैवाने नाही पडले
तोवरती तू झोप घेत जा बाळा
काळजी पुढे देवाला” .
– [करुण रस]

3. “लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता
कवटाळूनि त्याला माता।
अति आक्रोशें, रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी”
– [वीर रस]

4. ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
… शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे ।
– [बीभत्स रस]

5. आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड गाडुनी
फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला?
– [हास्य रस]

6. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल”
– [अद्भुत रस]

7. “ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती”
– [भयानक रस]

8. “पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपात्रती
झाड खटखट तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रुद्र । ये चहकडे।”
– [रौद्र रस]

9. “जे खळांची व्यंकटी सांडो
तयां सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे”
– [शांत रस]

Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:

उत्तर:

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

पाठातील वाक्य

स्वभावगुण/भावना

1. त्याचा आनंद असे तो खेळण्याच्या आतली रचना समजावून घेण्यात.

2. तू मोडलेल्या खेळण्यांतली यंत्रं पाहा कशी तुझ्याकडे चिडून पाहताहेत.

उत्तर:

पाठातील वाक्य

स्वभावगुण/भावना

1. त्याचा आनंद असे तो खेळण्याच्या आतली रचना समजावून घेण्यात.

चौकसपणा

2. तू मोडलेल्या खेळण्यांतली यंत्रं पाहा कशी तुझ्याकडे चिडून पाहताहेत.

यंत्रांविषयी सहानुभूती

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

प्रश्न 2.
कारणे लिहा:
1. दीपकच्या वडिलांनी कचेरीत माणसांच्या जागी यंत्रांची नेमणूक केली.
2. दीपकला यंत्रांबद्दल जवळीकही फार वाटत असे.
उत्तर:
1. दीपकच्या वडिलांना यंत्रांबद्दल विश्वास व प्रेम वाटत होते.
2. यंत्रे दीपकचे ऐकत असत, त्यांनी सांगितलेली कामे करीत असत.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
दीपकने मोडलेल्या यंत्राचे मनोगत लिहा.
उत्तर:
दीपक, तुला आज सांगून टाकतेच बघ. पूर्वी मला तुझा खूप राग यायचा. दुःख व्हायचे. कारण मला निर्माण केले होते मुलांशी खेळण्यासाठी. वाटायचे, मुलांबरोबर काही काळ खेळता येईल. त्यांच्याबरोबर खेळात रममाण होता येईल. पण तू थोड्याच वेळात आमची मोडतोड करून टाकायचास! आणि त्याचे दु:ख होत राही.

मग मी तुझ्या चेहेऱ्याकडे बारकाईने पाहू लागले. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. तू केवळ बेदरकारपणे आमची मोडतोड करीत नाहीस. तुझ्या मनात कुतूहल असते, जिज्ञासा असते. आम्हांला हालतेचालते करण्यासाठी कोणती युक्ती केली असेल, हे तुला जाणून घ्यायचे असते. खरे सांगू का ? हे कळल्यापासून मला तुझे कौतुकच वाटते. तुझ्यासारख्या जिज्ञासू, चौकस लोकांमुळेच आमची निर्मिती झाली आहे आणि असंख्य मुलांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. म्हणूनच, तू केलेल्या मोडतोडीचाही आता आम्हांला आनंदच होतो!

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा:

उत्तर:

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
उताऱ्यातून यंत्र व सजीव यांबाबत जाणवणाऱ्या दोन परस्परविरोधी गोष्टी:
1. ……………………………
2. ……………………………
उत्तर:
1. दीपक यंत्रांना सजीव कसे करता येईल, याचा विचार करीत होता.
2. दीपकचा यंत्रमित्र सजीवासारखा वागत होता.

प्रश्न 2.
का ते लिहा:
दीपक अस्वस्थ झाला.
उत्तर:
यंत्रमित्राप्रमाणे बाबांच्या कचेरीतील सर्व यंत्रे चिडली आणि त्यांनी असहकार पुकारला, तर? या चिंतेने दीपक अस्वस्थ झाला.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
“मित्रा ! जरा गृहपाठ करून देतोस का?” या उद्गारांवर तुमचे मत नोंदवा.
उत्तर:
कल्पना छान वाटते. यंत्रमानवाकडून किती वेगवेगळ्या प्रकारची कामे करवून घेता येतील, नाही का ? बहुसंख्य विदयार्थी क्लासला जातात. बहुसंख्य विदयार्थी मार्गदर्शके खरेदी करतात. हळूहळू विदयार्थ्यांचा अभ्यास करणारे यंत्रमानव तयार होतील. यंत्रमानवांमुळे मुलांचे गृहपाठ झटपट व अचूक होतील. कोणालाही , शिक्षा होणार नाही. वरवर पाहता हे सर्व साधे, सोपे वाटते. पण हे , माझ्या मते साधे सोपे नाही. हे भयंकर आहे!

विदयार्थ्यांना गृहपाठ दिला जातो, तो त्यांचा अभ्यास पक्का व्हावा म्हणून. पण विदयार्थ्यांनी अभ्यास केलाच नाही, तर तो पक्का होणार तरी कसा? आपण स्वतः अभ्यास करतो, तेव्हा वर्गात शिकवलेले आपल्या स्मरणात राहते. आपली आकलनशक्ती, विचारशक्ती व कल्पनाशक्ती वाढते. आपली बदधिमत्ता वाढते. आपण अभ्यास केला नाही, तर आपला विकासच होणार नाही. या पाठातील दीपक हा चौकस मुलगा आहे. तो स्वत:चा अभ्यास यंत्रमानवाला करायला सांगतो, हे पटत नाही.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. तो यंत्रासारखा हालचाली करू लागला.
2. मुलं हसली. शिक्षकांनाही हसू आवरेना.
उत्तर:
1. दीपकच्या डोक्यात यंत्राविषयीचेच विचार घोळत राहिले. तो त्या विचारांत बुडाला होता. यंत्रांचे विचार त्याच्या अंगात भिनले. म्हणून तो यंत्रासारख्या हालचाली करू लागला.
2. यंत्राच्या विचारात दीपक इतका बुडाला होता की, आपण यंत्रासारख्या हालचाली करीत आहोत, हे त्याच्या लक्षात आले नाही. “दीपक! काय चाललंय ?” असे शिक्षकांनी विचारलेसुद्धा, संपूर्ण वर्गात त्याच्या हालचाली विसंगत दिसत होत्या. म्हणून सगळ्यांना हसू येत होते.

प्रश्न 2.
अर्थ स्पष्ट करा:
यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही.
उत्तर:
दीपक यंत्रांच्या विचारांनी भारावून गेला होता. शिक्षक यंत्रमानव झाले व विदयार्थी यंत्रमानव झाले, तर काय होईल? हा विचार करता करता तो कल्पनेच्या राज्यात शिरलासुद्धा. सगळेजण यंत्रेच बनली आहेत, असा त्याला भास होऊ लागला. म्हणून त्याच्या तोंडून ‘यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही,’ असे उद्गार बाहेर पडले.

प्रश्न 3.
नातेसंबंध सांगा:
दीपकचे बाबा आणि मिस अय्यंगार.
उत्तर:
दीपकचे बाबा: एका कंपनीचे मालक.
मिस अय्यंगार: दीपकच्या बाबांची स्टेनो-टायपिस्ट.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
स्वयंचलित यंत्रमहिलेचे स्वरूप.
उत्तर:
यंत्रमहिलेच्या तोंडावर धातूची जाळी बसवली होती. तिचे शरीर पिंपासारखे बनवलेले होते, जणू काही तिलाच पिंपात घातले होते, असे वाटावे. हातापायात मोजे होते. स्टेनलेस स्टीलचे बूट होते. असा एकूण त्या यंत्रमहिलेचा अवतार होता.

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती).

प्रश्न 1.
मिस अय्यंगारची (यंत्रमहिलेची) घरातल्या कामांसाठी नेमणूक करायची झाल्यास तिच्याकडून कोणकोणती कामे करून घेता येतील?
उत्तर:
खरे तर घरातली सर्व कामे यंत्रमहिलेकडून करून घेता येतील. सकाळी उठल्यावर अंथरूण-पांघरुणांची घडी करून ठेवणे, आदल्या दिवशी धुतलेले कपडे घडी करून कपाटात ठेवणे, घरातील सर्व फर्निचरवरील धूळ पुसणे, खिडक्या-दारे स्वच्छ करणे, केरकचरा काढणे वगैरे कामे सहज करून घेता येतील. स्वयंपाकघरातील उदा., भाज्या चिरणे वगैरे कामेसुद्धा करून घेता येतील.

वेगवेगळे पदार्थ विशिष्ट प्रमाणात मिसळणे व ते शिजवणे यांचाही प्रोग्रॅम तयार करून तो यंत्रमानवाच्या स्मृतिकोशात भरला, तर प्रत्यक्ष पदार्थ शिजवण्याचे कामही यंत्रमानव करू शकतो. मग कपडे धुण्याचे काम सांगता येईल. घरातल्या कामांचे नियोजन करणे, हिशेब ठेवणे वगैरे कामे; तसेच संगणकावरून करता येण्यासारखी सगळी कामे यंत्रमानवाकडून करून घेता येतील. म्हणजे जवळजवळ सर्व कामे यंत्रमानवाला सांगता येतील.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.
अर्थ स्पष्ट करा:
हा रोबो फोन! केवळ ध्वनिलहरीवर काम करतो.
उत्तर:
आदेश देणाऱ्याचे केवळ बोलणे ऐकून रोबो फोन काम करतो.

प्रश्न 2.
रोबो फोनच्या कार्यपद्धतीचा ओघतक्ता तयार करा :

  1. ………………………………………
  2. ………………………………………
  3. ………………………………………
  4. ………………………………………
  5. ………………………………………

उत्तर:
रोबो फोनची कार्यपद्धत:

  1. रोबो फोनला तोंडाने बोलून फोन लावण्याचे काम सांगितले जाते.
  2. बोललेले ऐकून तो लगेच फोन जोडून देतो. तेव्हा पलीकडील व्यक्तीच्या फोनमधील दिवा पेटतो.
  3. 10 सेकंदांत प्रतिसाद मिळाला नाही, तर पलीकडच्या व्यक्तीच्या फोनचा बझर वाजू लागतो.
  4. व्यक्ती जागेवर नसेल, तर मिळालेला निरोप ध्वनिमुद्रित करून ठेवतो.
  5. आदेश देणारी व्यक्ती आल्यावर तिला ध्वनिमुद्रित केलेला निरोप दिला जातो.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
दीपक या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता.
उत्तर:
यंत्रे माणसांसारखी कामे करतात, हे पाहून दीपक अस्वस्थ झाला होता. काम करण्याची बुद्धी यंत्राकडे आहे. पण माणूस जसे चांगले-वाईट ठरवू शकतो, तशी यंत्रे ठरवू शकतील का? ती अमानुष आहेत. त्यांनी वाईट गोष्टी करायला सुरुवात केली तर? या शंकेमुळे तो अस्वस्थ होऊन तळमळत होता.

प्रश्न 2.
डोळा लागताच दीपकच्या कानांवर पडलेल्या शब्दांतून उभे राहणारे दृश्य लिहा.
उत्तर:
दोन व्यक्तींचे बोलणे दीपकच्या कानांवर पडले. त्यांपैकी एकाचे नाव होते सयाजी. तो कोणाचीही हुबेहूब सही करू शकत होता. दुसऱ्याने दीपकच्या वडिलांच्या नावे संपत्ती दान करणारे पत्र लिहिले होते. त्या पत्रावर तो सयाजीला दीपकच्या वडिलांची सही करण्यास सांगत होता.

प्रश्न 3.
माहिती लिहा:
1. दीपकने पाहिलेले दृश्य
2. त्या दृश्याचा दीपकला जाणवलेला अर्थ.
उत्तर:
1. कानावर पडलेले शब्द ऐकून दीपकला धक्का बसला. भयंकर कारस्थान चालले होते. म्हणून उठून त्याने शेजारच्या खोलीत डोकावून पाहिले. तिथे माणसांसारखी दिसणारी यंत्रे होती. ती यंत्रमानव होती आणि त्याच्या बाबांच्या कचेरीतच काम करणारी होती. त्यापैकी एक यंत्रमानव सयाजी म्हणजे सहयांची हुबेहूब नक्कल करणारा. दीपकने तिथे जाऊन त्यांना जाब विचारला. ते सर्व यंत्रमानव दीपकच्या बाबांच्या इस्टेटीचा ताबा घेऊ बघत होते.
2. दीपकच्या लक्षात आले की, केवळ आज्ञापालन करणारे यंत्रमानव आता बंडखोर बनले होते. इतकेच नव्हे, तर त्यांनी दरोडेखोरी आरंभली होती. ते बेकायदेशीरपणे बाबांची संपत्ती हडप करू बघत होते.

प्रश्न 4.
अर्थ स्पष्ट करा:
तुझे बाबाच याला कारण आहेत.
उत्तर:
दीपकच्या बाबांचा यंत्रांवर फार विश्वास होता. त्यामुळे यंत्रांवर त्यांचे प्रेमही होते. त्यांनी आपल्या कचेरीत यंत्रमानवांची नेमणूक केली होती. इतकेच नव्हे, तर यंत्रांना माणसांसारखे बनवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यांनी तज्ज्ञांकरवी माणसांप्रमाणे विचार करू शकणारे यंत्रमानव तयार करवून घेतले होते. माणसांसारखा विचार करू लागल्यामुळे ते स्वतंत्र झाले. ते केवळ आज्ञापालन करणारे राहिले नाहीत. असे यंत्रमानव हे माणसाचे फार मोठे शत्रू ठरणार आहेत.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
कचेरीत जमलेल्या सर्व यंत्रमानवांपैकी कोणत्याही एका यंत्रमानवाचे बोलणे तुमच्या कल्पनेनुसार लिहा.
उत्तर:
कचेरीतल्या त्या खोलीत पाचसहा यंत्रमानवांची लगबग चालू होती. त्यांतला एकजण इतरांना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. “मित्रांनो, हे काही चांगलं चाललेलं नाही. मला अजिबात पटत नाही. काय म्हणता? यात काय वाईट आहे? अरे, या । माणसांनी आपली निर्मिती केली. त्यांनीच आपल्यात बुद्धी पेरली.

त्यांचाच घात करायचा? अरे, मग आपण व ती रानटी जनावरे यांत फरक काय राहिला? ते काही नाही. मी काही तुमच्यात सामील होणार नाही. काय म्हणता? आपणच राजे होणार आहोत? पृथ्वीवर आपली सत्ता? विसरा, विसरा ते. अरे माणसांना हे कळल्यावर तुम्हांला सहजी असं करू देतील? आपले सगळे अवयव वेगळे करतील ते. आणि एकदा का आपला मदर बोर्ड काढला की, आपले आयुष्यच संपले. तेव्हा, जेवढे जीवन मिळाले आहे, तेवढे आनंदाने जगू या. हे सर्व ताबडतोब थांबवा.”

उतारा क्र. 5

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
दीपकला बाबांचे झालेले दर्शन:
1. …………………………
2. …………………………
उत्तर:
दीपकला बाबांचे झालेले दर्शन:
1. बाबा त्यांच्या खोलीत पाठमोरे उभे होते.
2. प्रत्यक्षात पाहिले तेव्हा लक्षात आले की, ते बाबांसारखे दिसत होते, पण बाबा नव्हते. यंत्रमानव होते किंवा बाबा पूर्णपणे गुलाम झाले होते.

प्रश्न 2.
नातेसंबंध सांगा:
दीपक व ज्यूली.
उत्तर:
दीपक व ज्यूली : मित्रमैत्रीण.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
समर्पक उदाहरण लिहा:
1. दीपकला गुलाम केले.
2. दीपकच्या बाबांना गुलाम केले.
उत्तर:
1. दीपकला गुलाम केले: दीपकला त्याच्या बाबांनी लोखंडी हातांनी धरले; खुर्चीत दामटून बसवले. त्याची इच्छा नसताना जबरदस्तीने न्याहरी खायला लावली. त्याने गृहपाठ केला होता. पण एक चूक झाली होती, तरीही त्याला संपूर्ण गृहपाठ पुन्हा करायला लावला.
2. दीपकच्या बाबांना गुलाम केले: यंत्रमानवांनी दीपकच्या बाबांना जवळजवळ यंत्रमानवच करून टाकले होते. दीपक ओरडत, किंचाळत प्रतिकार करीत असतानाही बाबांनी त्याला जबरदस्तीने खुर्चीत बसवले. कोणतेही बाबा आपल्या मुलावर बळजोरी करणार नाहीत, इतकी बळजोरी बाबांनी दीपकवर केली. दीपकचे बाबा स्वत:चा बाबापणा विसरले होते, इतके ते गुलाम बनले होते.

प्रश्न 2.
ज्यूलीच्या घरी दीपकला आलेला अनुभव लिहा.
उत्तर:
दीपक ज्यूलीकडे खेळायला गेला. पण ती त्याला दिसली नाही. त्याने त्यांच्या बंगल्याभोवती शोध घेतला. पण तिथेही ती दिसली नाही. एक यंत्रमानव एखादे बोचके काखेतून आणावे, तसे तो ज्यूलीला आणत होता. ती ओरडत होती. किंचाळत होती. आक्रोश करीत होती. पण त्याला किंचितही दया आली नाही. यंत्रमानवांनी सर्वत्र उच्छाद मांडला होता, हे दीपकच्या लक्षात आले.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारे यंत्रमानवांचे स्वभावगुण लिहा.
उत्तर:
माणसांमध्ये जे जे गुण वा अवगुण आहेत, ते ते यंत्रमानवांनी प्राप्त केले आहेत. माणसे गुलामीविरुद्ध लढतात, स्वतंत्र होऊ पाहतात, तसे यंत्रमानव स्वतंत्र होऊ पाहत आहेत. त्यांच्यात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. माणूस जसा स्वत:च्या शत्रूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न प्रथम करतो, तसा प्रयत्न यंत्रमानव करीत आहेत. ते माणसांप्रमाणेच बंड करतात. कटकारस्थाने करतात. दीपकच्या बाबांच्या संपत्तीवर दरोडा घालतात. ही एक प्रकारची लढाईच आहे. या लढाईत ते निष्ठुरपणे वागतात.

माणसांप्रमाणेच इतरांना गुलाम करू पाहतात. दीपकला जबरदस्तीने दामटून खुर्चीत बसवतात. आपल्या आज्ञेप्रमाणे वागायला लावतात. ज्यूलीलाही ते एखादया बोचक्याप्रमाणे उचलून आणतात. तिच्या आक्रोशाकडे जराही लक्ष देत नाहीत. दीपकच्या वडिलांना त्यांनी गुलाम केले आहे. ते यंत्र असल्याने त्यांच्याकडे भावना नाहीत. म्हणून क्रूरपणे, निष्ठुरपणे वागतात. थोडक्यात, यंत्रमानव जर खरोखर स्वतंत्रपणे विचार करू लागला, तर माणूस हा प्राणीच नष्ट होईल!

उतारा क्र. 6

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. दीपककडे ज्यूलीने केलेली तक्रार.
2. यंत्रमानवाने सांगितलेली वस्तुस्थिती.
उत्तर:
1. दीपकने ज्यूलीकडे खेळायला यायला उशीर केला. त्यामुळे ती यंत्रमानवाच्या तावडीत सापडली. त्याने तिला एखादया निर्जीव वस्तूसारखे उचलून आणले.
2. कोणीही कितीही दंगामस्ती केली, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जगातल्या यंत्रांनी बंड करून जगावर ताबा मिळवला आहे. आता जगावर यंत्रांचे राज्य आहे.

प्रश्न 2.
विधान पूर्ण करा:
यंत्रमानवांचा मेंदू गणिती असल्याने …………………
उत्तर:
यंत्रमानवांचा मेंदू गणिती असल्याने ते कोणालाही कुठूनही शोधून काढू शकतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. दीपक यंत्रमानवाच्या डोक्याच्या मागे असलेले बटण दाबतो; कारण ……………………..
2. आणि तो पुटपुटला, “भयानक स्वप्न!” कारण ………………………
उत्तर:
1. दीपक यंत्रमानवाच्या डोक्याच्या मागे असलेले बटण दाबतो; कारण दीपकला वाटते की, त्या बटणात यंत्रमानवाची शक्ती असणार आणि ते बटण दाबल्यास त्याची शक्ती बंद होईल.
2. आणि तो पुटपुटला, “भयानक स्वप्न!” कारण दीपक यंत्रमानवाच्या डोक्यामागचे बटण दाबतो. त्या क्षणीच मोठा गजर होतो. त्याला जाग येते. त्याच्या लक्षात येते की, त्यानेच सकाळी ७ वाजताचा घड्याळाचा गजर लावला होता. तोच आता वाजत होता. म्हणजे सकाळचे सात वाजले होते. हेच वास्तव होते. यंत्रमानव वगैरे सर्व स्वप्न होते.

उतारा क्र. 7

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:

  1. “अरे बापरे! बाबा!” असे ओरडून पळत सुटणारा.
  2. दीपकसाठी चहा घेऊन येणारा.
  3. सकाळी लवकरच न्याहरी करून कचेरीत गेलेले.

उत्तर:

  1. दीपक
  2. स्वयंपाकी
  3. दीपकचे बाबा.

प्रश्न 2.
का ते लिहा:
दीपकच्या बाबांना कचेरीत एकटं एकटं आणि सुनं सुनं वाटायला लागलं होतं.
उत्तर:
दीपकच्या बाबांनी कचेरीतील माणसे काढून टाकली होती आणि त्यांच्या जागी यंत्रांची नेमणूक केली होती. यंत्रे अचूक व वेगाने काम करतात यात शंका नाही. पण ती निर्जीव असतात. त्यांच्यात जिवंतपणा नसतो. ती विचारांची व भावनांची देवाणघेवाण करू शकत नाहीत. त्यांची माणसांसारखी सोबत होऊ शकत नाही. म्हणून दीपकच्या बाबांना कचेरीत एकटं एकटं आणि सुनं वाटू लागलं होतं.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. दीपकने बाबांना केलेली सूचना.
2. दीपकच्या बाबांनी केलेली कार्यवाही.
उत्तर:
1. रात्री पडलेल्या स्वप्नामुळे दीपक पुरता हादरला होता. यंत्रांचा धोका बाबांना सांगावा म्हणून तो बाबांकडे धावला. यंत्र-अधिकाऱ्यांना काढून टाकावे आणि पूर्वीच्या माणसांना कामावर घ्यावे, अशी सूचना त्याने बाबांना केली.
2. दीपकच्या बाबांनी आदल्याच दिवशी यंत्र-अधिकाऱ्यांना काढून टाकायचे ठरवले होते आणि पूर्वीच्या माणसांना पुन्हा कामावर घ्यायचे ठरवले होते. त्याप्रमाणे त्यांनी सर्वांना फोन केले, तारा केल्या आणि विमानाने बोलावून घेतले.

प्रश्न 2.
का ते लिहा:
यंत्रे कधीही माणसांची जागा घेऊ शकणार नाहीत.
उत्तर:
यंत्रे कार्यक्षम असली तरी ती निर्जीव असतात. त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण होऊ शकत नाही. कचेरीत माणसे आल्याबरोबर गजबज निर्माण झाली. हास्यविनोद, कामाची धावपळ यांनी कचेरीतील वातावरणात जिवंतपणा आला. यंत्रांनी असे वातावरण निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच यंत्रे कधीही माणसांची जागा घेऊ शकणार नाहीत.

भाषाभ्यास:

(अ) अव्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
जोड्या लावा:

सामासिक शब्द

समास

1. पंचप्राण

समाहार द्ववंद्ववं

2. महाराज

इतरेतर द्ववंद्ववं

3. बरेवाईट

द्विगू

4. गुरेवासरे

कर्मधारय

5. आईबाबा

वैकल्पिक द्ववंद्ववं

उत्तर:

  1. पंचप्राण – द्विगू
  2. महाराज – कर्मधारय
  3. बरेवाईट – वैकल्पिक द्वंद्व
  4. गुरेवासरे – समाहार वंद्व
  5. आईबाबा – इतरेतर द्वंद्व

3. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
उपसर्गघटित व प्रत्ययघटित यांत वर्गीकरण करा:
(अलौकिक, आजन्म, शत्रुत्व, भांडखोर)
उत्तर:

उपसर्गघटित

प्रत्ययघटित

अलौकिक

शत्रुत्व

आजन्म

भांडखोर

4. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:

  1. पळता भुई थोडी होणे
  2. दुःखाची किंकाळी फोडणे
  3. चूर होणे
  4. वठणीवर आणणे.

उत्तर:

  1. पळता भुई थोडी होणे – अर्थ : फजिती होणे.
    वाक्य : गावात वाघ येताच गावकऱ्यांची पळता भुई थोडी झाली.
  2. दु:खाची किंकाळी फोडणे – अर्थ : खूप दुःख व्यक्त करणे.
    वाक्य: आई वारल्यावर मधूने दुःखाची किंकाळी फोडली.
  3. चूर होणे – अर्थ : मग्न होणे.
    वाक्य : रेडिओवरचे गाणे ऐकण्यात मंदा अगदी चूर झाली.
  4. वठणीवर आणणे – अर्थ : योग्य मार्गावर आणणे.
    वाक्य: खोड्या करणाऱ्या बाबूला काकांनी चांगलेच वठणीवर आणले.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
अनेकवचन लिहा:

  1. यंत्र
  2. नक्कल
  3. गठ्ठा
  4. खुर्ची.

उत्तर:

  1. यंत्रे
  2. नकला
  3. गठे
  4. खुार्ची.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
1. दुखाची कींकाळी फोडुन तो यंत्रमीत्र चालता झाला.
2. तो सहयाजि हुकुमत गाझवणारा यंत्रमानव म्हनाला.
उत्तर:
1. दु:खाची किंकाळी फोडून तो यंत्रमित्र चालता झाला.
2. तो सयाजी हुकूमत गाजवणारा यंत्रमानव म्हणाला.

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
योग्य विरामचिन्हे घालून पुढील वाक्य पुन्हा लिहा:
ती ओरडली दीपक तू केव्हा आलास
उत्तर:
ती ओरडली, “दीपक, तू केव्हा आलास?”

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Corporation
  2. Census
  3. Programme
  4. Refreshment

उत्तर:

  1. महामंडळ
  2. जनगणना
  3. कार्यक्रम
  4. अल्पोपाहार.

Summary in Marathi

प्रस्तावना:

एकाच वेळी विविध गोष्टींमध्ये रस असलेले व चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले लेखक. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व्हावा, विज्ञानवाङ्मयाचा प्रसार व्हावा म्हणून भरपूर लेखन केले, व्याख्याने दिली, चर्चा-संमेलनांत सहभागी झाले.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस यंत्रांवर विसंबून राहू लागला आहे. यंत्रांची मदत घेता घेता तो यंत्रांच्या आहारी जाऊ लागला आहे. याचे अनेक दुष्परिणाम मानवी जीवनावर होतील, असा इशारा खेळकर पद्धतीने लेखकांनी या पाठातून दिला आहे.

शब्दार्थ:

1. चौकस – जिज्ञासू.
2. फड – ताफा.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. मग्न होणे – गुंग होणे.
  2. वाटेला जाणे – मार्गात अडथळे निर्माण करणे.
  3. पळता भुई थोडी होणे – पळून जाणे.
  4. चूर होणे – गळाठूण जाणे, स्तब्ध होणे.
  5. स्तंभित होणे – आश्चर्यचकित होणे.
  6. वठणीवर आणणे – नमवणे, रुबाब घालवणे.
  7. हकालपट्टी करणे – नोकरीवरून, कामावरून काढून टाकणे.