Chapter 10 शब्द

Day
Night

Chapter 10 शब्द

Textbook Questions and Answers

कृती

1. कृती करा.

प्रश्न 1.


उत्तरः

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न अ.
बिकट संकटांना कवीने म्हटले –

1. पोटाशी घेणारे शब्द.
2. निरुत्तर निखारे.
3. धावून आलेले शब्द.
उत्तरः
2. निरुत्तर निखारे.

प्रश्न आ.
शब्दांचा उजेड म्हणजे

1. शब्दांचे मार्गदर्शन.
2. शब्दांची मदत.
3. शब्दांचा हल्ला.
उत्तरः
1. शब्दांचे मार्गदर्शन.

प्रश्न इ.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे

1. कठीण प्रसंग.
2. झाडाची सावली
3. तापदायक प्रसंग.
उत्तरः
3. तापदायक प्रसंग.

3. अ. खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.

प्रश्न 1.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
उत्तरः

कवींच्या जीवनात असेही प्रसंग आले जे झेलणे कठीण होते. त्यांना काहीच मार्ग या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी सापडत नव्हता. समस्यांनी गांजून गेलेल्या कवींच्या डोळ्यांसमोर अंधारून येत होते तेव्हा शब्दांनीच मार्गदर्शन केले. समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी जणू या शब्दांनीच अंधारात वीज दाखवण्याचे कार्य केले.

प्रश्न 2.
‘मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.’
उत्तरः

आयुष्यातील काही क्षण मन त्रस्त करणारे, जगूच नये अशी भावना निर्माण करणारे, निराशेच्या गर्तेत खोलवर नेणारे होते तेव्हा मृत्यूला जबळ करावे असे वाटू लागले. त्याही वेळी शब्दांनीच आयुष्याच्या या मार्ग भरकटलेल्या गलबताला किनारा दिला असे कवी म्हणतात.

आ. सूचनेप्रमाणे सोडवा.

प्रश्न अ.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः

वाऱ्याने व निवाऱ्याने टाळले तेव्हा शब्दांनी कवीला केलेली मदत कोणती?

प्रश्न आ.
‘शब्द’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः

आकान्ताने हाका घातल्या तेव्हा कोण धावून आले?

प्रश्न इ.
‘शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहुना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही’, या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
उत्तरः

मी भिकारी : मी शब्दांना काय देऊ?
मी कर्जदार : शब्दांचा कसा उतराई होऊ?

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न अ.
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला….’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
उत्तरः

माणसाच्या आयुष्यात अशा काही आठवणी असतात ज्यांनी खोलवर मनावर जखम केलेली असते. त्या आठवणी कायम मनात आग ओकत असतात. तेव्हा या आठवणींना, भावनांना शब्दांतून मोकळे करण्याचा मार्ग असतो. शब्दांमधूनही मनातील आग व्यक्त करता येते. ज्यामुळे काही प्रमाणात तरी आठवणींचा दाह कमी होण्यास मदत होते. आपले दुःख, मनातील तडफड कोणाशी तरी व्यक्त केल्यावर मनाला शांती मिळते हीच भावना वरील ओळीतून व्यक्त होते.

प्रश्न आ
‘मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तरः

कवींसाठी ‘शब्द’ हे सर्वस्व आहे. शब्दांशिवाय ते जगूच शकत नाहीत. त्यांनी शब्दांना आपलेसे केले; म्हणजेच ते शब्दांत शिरले. त्यांनी त्यामळेच जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांना, अडथळ्यांना दर्लक्षित करून ते आपले लिखाण करीत ष्टिीमधन मनाने बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडला. त्यांनी स्वत:ला वाचवले. जेव्हा त्यांना जळजळीत मनातील भाव व्यक्त करावे असे वाटले तेव्हाही त्यांनी ते व्यक्त केले. आयुष्यातील अन्यायाची चीड मी व्यक्त केली. शब्दांद्वारे माझे सर्व भाव हे शाब्दिक होते म्हणून शब्दांनी जहर पचवले.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत. ते लिहा.
उत्तरः

आयुष्य हे सुखदुःखाने भरलेले आहे. जीवनात चम-उतार हे असतातच, जीवनातील समस्या, वाटेला आलेले दुःख म्हणजेच जीवनातील नकार होत. कवी भोवतालच्या जगातील विषमता, संधिसाधुपणा इत्यादी गोष्टींनी त्रासलेले आहेत. आयुष्यात वाट्याला आलेले आकान्त, अंधारनिष्ठ आयुष्य, चीड यावी असे प्रसंग, काही वाईट आठवणी, आप्तेष्टांनी, समाजाने फिरवलेली पाठ या सर्व जीवनातील वाईट अणांना कवीने आयुष्यातील नकार म्हणून उल्लेखले आहे. कवीने या सर्व नकारांना आपल्या लेखणीतून उत्तर दिले आहे. प्रत्येक वेळी सुचलेले शब्द हेच त्यांचे आधारस्तंभ म्हणून उभे राहिले आहेत.

प्रश्न आ.
‘शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः

कवीला आयुष्यातील सगळ्यात महत्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे शब्द. शब्द हे त्यांचे जीवन आहे. कवींची लेखणी हे सर्वस्व व शस्त्र आहे. कवीने आपले सर्व आयुष्य हे साहित्याला वाहिलेले आहे. त्यामुळे ते शब्दांचीच पूजा करतात. आजच्या या स्वार्थी, संधीसाधू, मूल्यविरहित जगात कवीला अनेक गोष्टी खटकतात. अनेक गोष्टींची चीड येते. लेखकाची लेखणी हे त्याचे शस्त्र असते व लेखक त्यांचा योग्य वापर करून समाजपरिवर्तन करू शकतात, चांगले विचार पिढीमध्ये रुजवू शकतात. कवीनाही वेळोवेळी शब्दांनीच दिलासा दिला, मार्गदर्शन केले, उमेद दिली म्हणूनच शब्द हे कवीचे सामर्थ्य आहेत.

प्रश्न इ.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः

शब्दाशिवाय मानव ही कल्पनाच करता येणार नाही. मानवाच्या विचार प्रकटीकरणाचे, संवादाचे प्रमुख माध्यम शब्द आहेत. शब्दांशिवाय भावना प्रकट करणाऱ्याला आपले मत व्यक्त करण्यासाठी खाणाखुणांचा वापर करावा लागतो. पण त्यातूनही जे सांगायचे आहे ते प्रभावीपणे मांडण्यासाठी शब्दच हवेत, शब्दांमुळे स्पष्टता येते, भाषा तयार होते, गैरसमज, गोंधळ होण्याची शक्यता कमी होते.

शब्द वळवावे तसे वळतात, काही शब्दांचे अनेक अर्थ असतात ज्यातून चमत्कृती, विनोद साधता येतो. शब्द हे मानवाचे सामर्थ्य आहे. शब्द फुलांसारखे वापरता येतात, शब्द धारदार शस्त्रासारखेही वापरता येतात. शब्दांनी एखादयाचे मन जिंकता येते तर शब्दांनी एखादयाला घायाळ करता येते. एकूणच मानवी व्यवहार, विचारांचे आदान-प्रदान योग्य रितीने होण्यासाठी मानवी जीवनात शब्दांचे अनन्यसाधारण महत्व आहे.

6. ‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तरः

माणूस शब्दाविना जगाला पारखा आहे. हेच शब्द एका लेखकाचे/कवीचे जीवन सर्वस्व असतात. कवी यशवंत मनोहर एक विचारवंत, समीक्षक आहेत. त्यांच्या ‘शब्द’ या कवितेतून प्रत्ययकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी लेखनशैली व्यक्त होते. त्यांची कविता शोषणाचा, जगातल्या विषमतांचा निषेध करते. कवींच्या जगलेल्या, भोगलेल्या जीवनाचा जीवनानुभव यातून व्यक्त होतो. कवींनी आपल्या मनातील त्वेष व्यक्त करण्यासाठी ‘शब्दांचा आधार घेतला आहे.

कवींना जेव्हा जेव्हा समाजातील मूल्यव्यवस्थेची चीड आली किंवा एखादया प्रसंगाने मन उदविग्न झाले तेव्हा मनाच्या आकांताला वाट फोडण्यासाठी शब्दांचाच आधार मिळाला. कवींनी मांडलेल्या मनातील उद्वेगाला उत्तर मिळाले नाही. तेव्हा मनातील राग शांत करण्यासाठी माऊलीने आपल्या लेकरास पोटाशी घेऊन समजवावे तसेच मनातील निखाऱ्यांना शब्दांनी मायेची कुंकर घातली. लोकांच्या वागण्यातला संधिसाधपणा, समाजात पसलेले विषमतांचे जाळे, समाजातला वाढत जाणारा असंतोष यामळे कवींच्या आले.

तेव्हा शब्दांनीच त्यातून बाहेर येण्यासाठी उजेडाचा मार्ग दाखवला. आयुष्यात घडून गेलेली जिव्हारी लागलेली आग ओक लागली तेव्हा शब्दांनीच मनातील विचारांचा हल्ला झेलला. शब्दांनीच त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखविला. समाजातील कवीला सहन न होणाऱ्या विषमतांमुळे मनातील ऊन, चीड बाहेर पडून बघत होती. तेव्हा शब्दांनीच व्यक्त होण्यास मनाची समजूत घालण्यास मदत केली, सायली धरली. मनातील चीडचिडीमुळे दिवसाही अंधारल्यासारखे व्हायचे.

आपण हतबद्ध आहोत असे वाटायचे तेव्हा शब्दांनीच यातून बाहेर पडण्यासाठी प्रकाशाचा मार्ग दाखविला. कवींच्या आयुष्यात काही क्षण हे मन प्रसन्न करणारे आले. त्यांना ते क्षण आयुष्यातून दूर घालवायचे होते, विसरायचे होते, शब्द हे वेळोवेळी मार्गदर्शक ठरले. वाहणाऱ्या नदीच्या जोरावर प्रवाहात अडकलेला माणूस मरणाच्या धारेत वाहत असतो, तशा परिस्थितीत काही वेळा कवी अडकले तेव्हासुद्धा शब्दांनीच त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केले.

जेव्हा कवी आयुष्यात कोणीच नव्हते, प्रसिद्ध नव्हते तेव्हा स्वतःविषयी त्यांच्या मनात भीती होती. तेव्हा शब्दांनी एखादया मित्रासारखा आधाराचा पाठीवर हात ठेवला, कधी जगाच्या वाऱ्याबरोबर ते टिकू शकले नाहीत. कोणी आप्तांनी निवारा दिला नाही, आधार दिला नाही तेव्हा कवीला आपलेसे वाटणारे शब्दच होते. या शब्दांनीच त्यांना आधार दिला.

कवींच्या आयुष्यातील शब्दांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण ते त्यांचं शस्त्र आहे. शब्दांमुळेच कवी आज प्रसिद्ध आहेत. ‘ आयुष्यातील प्रत्येक वळणावर साथ देणारे शब्द यांनी मला सर्व काही दिले आहे असे कवी म्हणतात. या श्रीमंत शब्दांना मी काय देक? मी त्यांचा कसा उतराई होऊ? असे कवीला वाटते. मी शब्दांना आपले शस्त्र बनवून त्यावर माझ्या मनातील जहर, चीड उतरवली व शब्दांनी तीही पचवली, या शब्दांना काही देण्याची ताकद माझ्यात नाही, असे त्यांना वाटते. आपण या शब्दांचे कर्जदार आहोत. या शब्दसंपत्तीपुढे आपण भिकारी आहोत असे त्यांना वाटते.

एका कवीच्या मनातील शब्दांविषयीची भावना अतिशय योग्य प्रकारे कवी यशवंत मनोहरांनी ‘शब्द’ या कवितेत व्यक्त केली आहे. शब्दबद्ध केली आहे.

Additional Important Questions and Answers

आकलन कृती

खालील पठित पदध पंक्तींच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. शब्दांनी पोटाशी घेतले → [ ]
  2. डोळ्यांपुढे अंधारून आल्यावर शब्दांचे कार्य → [ ]
  3. चिडून सांडत होते → [ ]
  4. दिवसाचा अंधार दूर करण्यासाठी शब्दांनी केलेली मदत → [ ]

उत्तर:

  1. निरुत्तर निखाऱ्यांना
  2. उजेडाचा हात दिला
  3. ऊन
  4. शब्दांनी बिजली दिली

स्वमत :

प्रश्न 1.
‘शब्दांचे सामर्थ्य अफाट असते’ या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा.
उत्तरः

मी नववीत असतानाची गोष्ट. आठवीत पहिला क्रमांक आल्याने सर्वच मित्र माझ्या अवती-भवती फिरायचे. त्यामुळे मीही जरा हवेतच तरंगत होतो, परिणाम व्हायचा तोच झाला, मी अभ्यासात मागे पडलो आणि पहिल्या घटक चाचणीत नापास झालो. मला स्वत:चीच लाज वाटू लागली. आता घरी काय सांगू? आई-बाबांना तोंड कसे दाखवू? असे मला झाले. माझी ही अवस्था गोरे सरांनी पाहिली.

माझ्या मनातले विचारही कसे कोण जाणे पण त्यांनी जाणले. त्यांनी मला जवळ बोलावले. माझे काय चुकले, ते मला सांगितले. इतकेच नाही तर मला धीरही दिला, प्रत्येकाच्या आयुष्यात चुका होतात, परंतु त्या सुधारून पुढे जाणारा यशस्वी होतो, ते त्यांनी समजावले. पुन्हा नव्याने उभं राहायला ते मदत करतील, असं आश्वासन दिलं. त्यांच्या शब्दांनी मलाही उभारी आली आणि मी जोमाने अभ्यास करून नववीला पुन्हा यश संपादन केलं व पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. गोरे सरांच्या शब्दांनी त्यावेळी माझ्या विद्यार्थी दशेत योग्य दिशा दिली म्हणून मी आज आयुष्यात आत्मविश्वासाने उभा राहू शकलो.

आकलन कृती

खालील पठित पदय पंक्तींच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. कविला विसरायचे होते
  2. कवी सापडले होते
  3. शब्दांनी कविला आश्रय दिलेली जागा
  4. शब्दांनी हल्ला झेलण्याचे कारण

उत्तरः

  1. कविला विसरायचे होते – जगून देणाऱ्या गोष्टी
  2. कवी सापडले होते – मरणाच्या धारत
  3. शब्दांनी कविला आश्रय दिलेली जागा – उरात
  4. शब्दांनी हल्ला झेलण्याचे कारण – एखादी आठवण आग घेऊन धावला

आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.

उत्तरः

शब्दांचे कार्य :

प्रश्न 1.

उत्तरः

स्वमत :

प्रश्न 1.
‘शब्दाला शस्त्राची धार असते’ असे म्हणतात याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर :

‘शब्द, शब्द जपून बोल’ ही ओळ आपल्याला खूप काही सांगते. शब्द माणसाच्या भावना व्यक्त करण्याचे साधन असले तरी बोलताना प्रत्येकाने आपण काय बोलतो आहोत याचे भान ठेवणे जरूरी आहे. अनेक वेळा शब्दांचे गैर अर्थ निघतात. तर कधी आपला एखादा शब्द दुसऱ्याच्या भावना दुखावतो, त्याच्या जिव्हारी लागतो. एक वेळ शरीरावर झालेली जखम भरून निघेल पण शब्दांनी एखादयाच्या मनाला झालेली जखम, कधीही भरून निघत नाही. एखादयाला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी, एखादया गोष्टींवर टिका करण्यासाठी, विरोध दर्शवण्यासाठी शब्दांचा शस्त्रासारखा उपयोग होतो.

स्वाध्यायासाठी कृती

1. ‘शब्द’ हे विचार परिवर्तन करण्याचे काम करतात सोदाहरण स्पष्ट करा.
2. ‘कविता’ हा कविमनाचा आरसा असतो तुमचे विचार लिहा.

Summary in Marathi

प्रस्तावना :

परिवर्तनवादी जीवनमूल्ये जपणारे कवी यशवंत मनोहर यांनी आपल्या आक्रमक शब्द शैलीतून आजच्या जगातील विषमता, मूल्यांची होणारी पायमल्ली, संधिसाधुपणा, समाजातील वाईट गोष्टींवर ताशेरे ओढले आहेत.

‘शब्द’ या कवितेत त्यांनी आपल्या जीवनातील शब्दांचे स्थान सांगितले आहे. शब्द हेच त्यांचे सर्वस्व आहे ही भावना या कवितेतून व्यक्त होते.

कवितेचा आशय :

कवी म्हणतात समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींविरोधात माझे मन आक्रोश करू पाहत होते तेव्हा तो आक्रोश मी शब्दांद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनातील चीड निरुत्तर होती कारण बजबजलेल्या समाजाकडे त्याची उत्तरे नव्हती तेव्हा माझ्या मनातील आग शांत करण्यासाठी शब्दांनीच आसरा दिला, एक माता जशी आपल्या मुलाला पोटाशी घेऊन समजवण्याचा प्रयत्न करते तसेच शब्द माझ्याबरोबर उभे राहिले. जेव्हा कधी आयुष्यात असे क्षण आले की पुढचा मार्गच शोधता येईना, अंधारून आले तेव्हासदधा शब्दांनीच मार्ग दाखवून उजेडाचा हात, दिला.

रू लागली तेव्हाही शब्दांनीच मन मोकळे करण्याची, मनाला समजावून हल्ला झेलण्याची शक्ती दिली. मनातील हतबलतेची चीड उन्हाचा दाह देत होती तेव्हाही शब्द सावली बनून आले. भरदिवसाही जेव्हा असहाय्यतेने डोळे भरून यायचे, डोळ्यापुढे अंधार दाटायचा, तेव्हा पुन्हा प्रकाशाचा किरण दाखवणारे शब्दच होते.

आयुष्यातील काही क्षण मन त्रस्त करणारे, जगू नये अशी भावना निर्माण करणारे होते. तेव्हा स्वत:चा तोल सावरण्यासाठी शब्दच मार्गदर्शक | ठरले. मरणाच्या दारात उभे राहून मरणाला जवळ करावे असे वाटू लागले. आयुष्याची नाव डुबत आहे असे वाटू लागले तेव्हा या मरणाच्या दारातून बाहेर पडण्यासाठी उमेदीचा, आशेच्या किरणांचा किनारा शब्दांनीच दिला.

काहीही हातात शिल्लक नव्हते, आपण काय करावे हे सुचत नव्हते, जेव्हा मी आयुष्यात अपयशाने ग्रासलो होतो. स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसलो होतो. स्वत:चीच भिती वाटू लागली होती. कोणाच्या तरी आधाराची अपेक्षा होती तेव्हाही शब्दांनीच पाठीवर धीराचा हात ठेवला. कधी आप्तस्वकियांनी तर कधी समाजाने झिडकारले तेव्हाही शब्दच आश्रयास उभे राहिले.

हे शब्द जे माझे सर्वस्व आहेत. या शब्दांनी कधी मला लेखणीतून मनाला आधार दिला तर कधी चांगल्या वाचनातील विचारातून. या शब्दांमुळेच मी आज जगण्यास लायक आहे अशी कवीची भावना आहे म्हणून ते म्हणतात. शब्दांनी मला भरभरून दिले पण मी या शब्दांचा उतराई कसा होऊ? मी शब्दांना आपलेसे केले व त्यांनी मला वाचविले. मी माझ्या मनातील जळजळ, जहर शब्दांतून उतरविले म्हणजेच समाजातील अन्यायाची, विषमतेची चीड मी शब्दांतून मांडली. पण शब्दांनी माझ्या रागाचे त्यांवर होणारे प्रहारही पचविले.

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. आकान्त – आक्रोश, अनर्थ, कोलाहल – (loud wailing).
  2. निखारा – धगधगता कोळसा – (blaxing coal).
  3. बिजली – वीज – (lightning).
  4. किनारा – काठ, तट – (shore).
  5. निवारा – आश्रय – (shelter).
  6. कर्जदार – ऋणको, कर्ज घेणारा – (borrower)
  7. जहर – विष – (poison).

वाक्प्रचार:

  1. पोटाशी धरणे – मायेने जवळ घेणे.
  2. निरुत्तर होणे – शब्दच न सुचणे.
  3. धावून येणे – मदतीस येणे.
  4. अंधारून येणे – काळोखी येणे.
  5. हात देणे – साथ देणे.
  6. सावली धरणे – आश्रय देणे.
  7. पाठीवर हात ठेवणे – धीर देणे.
  8. उतराई होणे – कर्जातून मुक्त होणे.