Chapter 10 आप्पांचे पत्र
Textbook Questions and Answers
कृति
कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…
प्रश्न 1.
कारणे लिहा.
(अ) आजची मुले सुदैवी आहेत, कारण ………………………….
(आ) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ………………………….
उत्तर:
(अ) आजची मुले सुदैवी आहेत; कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानांवर पडतात.
(आ) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात; कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खादय असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते.
प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
(i)
उत्तर:
(ii)
उत्तर:
प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडा.
(अ) आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त – ………………………………….
(१) हृदयाची धडधड वाढते.
(२) कपाळावरच्या आठ्या वाढतात.
(३) विदयार्थ्याचे गुण वाढतात.
उत्तर:
आप्पांच्या मते, चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात.
प्रश्न 4.
विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.
(आ) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा – ………………………………….
(१) तो रोज उपस्थित असतो.
(२) तो सर्वांची काळजी घेतो.
(३) तो चांगलं काम करतो.
(४) तो सर्वांशी चांगले बोलतो.
उत्तर:
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा तो चांगलं काम करतो.
प्रश्न 5.
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
(अ) आप्पांचे शिक्षणप्रेम – ………………………………….
(आ) स्वच्छता – ………………………………….
उत्तर:
(अ) आप्पांचे शिक्षणप्रेम: मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात, ते खिडकीतून ऐकत असतो.
(आ) स्वच्छता: आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो.
प्रश्न 6.
चौकटी पूर्ण करा.
आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा
उत्तर:
प्रश्न 7.
खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे ओळखा.
(अ) ती लगबगीने घरी पोहोचली.
(आ) जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.
(इ) आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.
उत्तर:
क्रियाविशेषणे –
(i) लगबगीने
(ii) सहज
(iii) आज.
प्रश्न 8.
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये शोधा.
(अ) पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली.
(आ) तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.
(इ) छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता.
(ई) परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.
उत्तर:
शब्दयोगी अव्यये –
(i) वर
(ii) समोर
(iii) बरोबर
(iv) मुळे.
प्रश्न 9.
स्वमत.
(अ) ‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे, हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते.
आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल, जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल, वेगळ्या शब्दांत, ‘लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.’ वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.
(आ) ‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले ? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.
उत्तर:
मुले मैदानावर खेळताना-बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत, असे वरवर पाहता वाटते. हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नसतो. त्यांचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. आप्पांच्या मते, मुलांची ऊर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण ज्यांच्याकडे असतात, ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत.
(इ) आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर:
सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही. पण ते आवडीने पार पाडायचे, हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वत:साठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रितीने कसा शिकवायचा, याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेशाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल ? कोण समजून घेईल? पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईनच.
Additional Important Questions and Answers
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
कारणे लिहा:
(i) आप्पांना विदयार्थ्यांशी बोलायची कधी संधीच मिळाली नाही; कारण
(ii) शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण
उत्तर:
(i) आप्पांना विद्यार्थ्यांशी बोलायची कधी संधीच मिळाली नाही; कारण विद्यार्थी नेहमी घाईत असायचे.
(ii) शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण त्यांना शिपाई हे पद कमी महत्त्वाचे वाटते.
प्रश्न 2.
आकृत्या पूर्ण करा:
उत्तर:
कृती २: (आकलन)
प्रश्न 1.
विधाने पूर्ण करा:
(i) बिस्मिल्लाह खान जगभर लोकप्रिय झाले; कारण ……………………………….
(अ) त्यांनी जगभर सनई वादनाचे कार्यक्रम केले.
(ब) हिंदी चित्रपटांतील खूप गाण्यांसाठी सनई वादन केले.
(क) ते खूप मन लावून सनई वाजवायचे.
(ड) त्यांचे वडील फार मोठे सनई वादक होते.
उत्तर:
(i) बिस्मिल्लाह खान जगभर लोकप्रिय झाले; कारण ते खूप मन लावून सनई वाजवायचे.
(ii) शाळेतले शिक्षक जे शिकवत, ते आप्पा खिडकीतून ऐकत असत; कारण ……………………………….
(अ) ते शिक्षक खूप चांगले शिकवत असत.
(ब) ते सगळे शिकायचे लहानपणी राहून गेले.
(क) त्या शिकवण्याचा जीवनात उपयोग झाला असता.
(ड) स्वत:च्या मुलांचा अभ्यास घेताना उपयोग झाला असता.
उत्तर:
(ii) शाळेतले शिक्षक जे शिकवत, ते आप्पा खिडकीतून ऐकत असत; कारण ते सगळे शिकायचे लहानपणी राहून गेले.
प्रश्न 2.
आप्पांचे पुढील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा:
(i) उत्कृष्टतेचा ध्यास: …………………………….
उत्तर:
(i) उत्कृष्टतेचा ध्यास: तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे, असं मला वाटतं.
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1.
अनेकवचन लिहा:
- वर्ष
- उपदेश
- माणूस
- शाळा
- वाटा
- शिपाई
- गाडी
- वस्तू
- लाडू
- केळे
- सासू
- लांडगा.
उत्तर:
- वर्ष – वर्षे
- उपदेश – उपदेश
- माणूस – माणसे
- शाळा – शाळा
- वाटा – वाटे
- शिपाई – शिपाई
- गाडी – गाड्या
- वस्तू – वस्तू
- लाडू – लाडू
- केळे – केळी
- सासू – सासवा
- लांडगा – लांडगे.
प्रश्न 2.
पुढील शब्दांतून विशेषणे व विशेष्ये यांचे दोन गट करा:
अर्धा, मुली, खूप, रुपये, तीव्र, किरण, वेडी, माणसे, लाडू, पक्का, दोन, वाटा, चांगले, रंग, अक्षर, लहान.
उत्तर:
विशेषणे: अर्धा, खूप, तीव्र, वेडी, पक्का, दोन, चांगले, लहान, विशेष्ये: मुली, रुपये, किरण, माणसे, लाडू, वाटा, रंग, अक्षर.
प्रश्न 3.
पुढील वाक्यांतील क्रियापदे ओळखून लिहा:
(i) तो चालताना पाय घसरून पडला.
(ii) खाता खाता उष्टे हात त्याने अंगाला पुसले.
(iii) तो जेवून आला.
उत्तर:
(i) पडला
(ii) पुसले
(iii) आला.
उतारा क्र.२
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
कारणे लिहा:
(ii) एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला आपले पैसे दिले; कारण
उत्तर:
एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला आपले पैसे दिले; कारण त्या मुलांना नाल्यावरच्या एका तुटक्या पुलावरून जावे लागे.
प्रश्न 2.
चूक की बरोबर ते लिहा:
(i) आजकाल मुलांना कार्टून्सची नावे पाठ असतात, पण झाडांची नावे विचारली, तर दहासुद्धा सांगता येणार नाहीत.
(ii) माणसे कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही.
(iii) आप्पांचा मुलांवर तितकासा विश्वास नाही.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) बरोबर
(iii) चूक.
प्रश्न 3.
पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा: (सराव कृतिपत्रिका -२)
(i) पुस्तकाच्या पानांत डोक्याचं खादय असतं.
(ii) एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे.
उत्तर:
(i) पुस्तकाच्या पानांत ज्ञान साठवलेले असते.
(ii) शाळेतला एकतरी विदयार्थी लेखक झाला पाहिजे.
कृती २: (आकलन)
प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
तक्ता पूर्ण करा:
उत्तर:
(i)
(सराव कृतिपत्रिका-२)
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1.
पुढील वाक्यांत योग्य वाक्प्रचार योजून वाक्ये पुन्हा लिहा:
(i) समोरचा वाणी धान्यात भेसळ करतो, लोकांच्या बोलण्यातून कळते.
(ii) गावातल्या स्वच्छता मोहिमेच्या यशाबाबत लोक गुरुजींचीच स्तुती करतात.
(iii) ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम यशस्वी करून ग्राम पंचायतीने लोकांचे दुःख दूर केले.
(iv) मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे स्वरूपच बदलून जाईल.
उत्तर:
(i) समोरचा वाणी धान्यात भेसळ करतो, असे कानावर पडते.
(ii) गावातल्या स्वच्छता मोहिमेच्या यशाबाबत लोक गुरुजींचेच नाव घेतात.
(iii) पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम यशस्वी करून ग्राम पंचायतीने लोकांच्या डोळ्यांतले पाणी पुसले.
(iv) मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे चित्रच बदलून जाईल.
प्रश्न 2.
कंसातील प्रत्यय जोडून होणारे पूर्ण रूप लिहा:
(i) लिहिणे (चे)
(ii) कॉलेज (त)
(iii) शिपाई (नी)
(iv) सगळे (हून)
उत्तर:
(i) लिहिणे (चे) = लिहिण्याचे
(ii) कॉलेज (त) = कॉलेजात
(iii) शिपाई (नी) = शिपायांनी
(iv) सगळे (हून) = सगळ्यांहून.
प्रश्न 3.
पुढील शब्दांचा संधिविग्रह करा: (सराव कृतिपत्रिका-२)
शब्द – संधिविग्रह
(i) ग्रंथालय ……………………………..
(ii) महोत्सव ……………………………..
उत्तर:
(i) ग्रंथालय = ग्रंथ + आलय
(ii) महोत्सव = महा + उत्सव
कती ४: (स्वमत / अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
लेखकांनी उताऱ्यात व्यक्त केलेला पर्यावरणविषयक विचार तुमच्या शब्दांत व्यक्त करा. (सराव कृतिपत्रिका-२)
उत्तर:
लेखकांनी आपले पर्यावरणविषयक विचार तळमळीने सांगितले आहेत. त्यांच्या मते, प्रत्येकाने दहा झाडे लावली, तरी आपला देश निसर्गसंपन्न होईल आणि हे खरेच आहे. या निसर्गसंपन्नतेचा देशाला, म्हणजेच आपणा सर्वांनाच फायदा होईल. पर्जन्यमान वाढेल. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळाच्या छायेतून देश मुक्त होईल, मात्र त्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला जमेल तेवढे काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. आपल्याला पाणी निर्माण करता येत नाही, हे खरे आहे. पण अपव्यय तरी टाळू शकतो की नाही? प्रत्येकाने वाया जाणारे पाणी वाचवले तरी लक्षावधी लिटर पाणी वाचेल.
वाचलेले पाणी तहानेने व्याकूळ झालेल्यांना मिळेल; पाण्यासाठी आ वासून बसलेल्या पशुपक्ष्यांना मिळेल; सुकून चाललेल्या वृक्षवेलींना मिळेल. हे कळण्यासाठी सर्वांनी निसर्गाशी प्रेमाने वागायला शिकले पाहिजे. म्हणूनच लेखक सांगतात की, सर्वांनी फुलपाखरांचा अभ्यास केला पाहिजे. मधमाश्यांच्या पोळ्यापासून लांब न जाता त्याचा अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्या अवतीभवतीच्या निसर्गाशी आत्मीयतेने वागल्यास पर्यावरण रक्षणाचे अनेक मार्ग दिसतील, असे लेखक सुचवतात.
व्याकरण व भाषाभ्यास
कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती:
१. समास:
पुढील समासांचा प्रत्येकी एक सामासिक शब्द लिहा:
(i) अव्ययीभाव
(ii) विभक्ती तत्पुरुष
(iii) इतरेतर द्वंद्व
(iv) वैकल्पिक द्वंद्व
(v) समाहार वंद्व
(vi) द्विगू.
उत्तर:
(i) अव्ययीभाव – घरोघर
(ii) विभक्ती तत्पुरुष – कार्यालय
(iii) इतरेतर द्वंद्व – आईवडील
(iv) वैकल्पिक द्वंद्व – दोनचार
(v) समाहार वंद्व – खाणेपिणे
(vi) द्विगू – त्रिकोण.
२. अलंकार:
(१) पुढील ओळीतील उपमेय, उपमान व अलंकार ओळखा: परीहून सुंदर असे ही चिमुरडी गालावर विलसे चांदण्याची खडी
उपमेय- [ ] उपमान- [ ] अलंकार- [ ]
उत्तर:
उपमेय – [लहान मुलगी] उपमान – [परी]
अलंकार – [व्यतिरेक]
(२) पुढील वैशिष्ट्यांवरून अलंकार ओळखा व समर्पक उदाहरण दया: (सराव कृतिपत्रिका-१)
(i) एखादया घटकाचे वर्णन करणे.
(ii) ते वर्णन पटवून देण्यासाठी योग्य उदाहरण देणे.
(अ) अलंकाराचे नाव →
(आ) अलंकाराचे उदाहरण →
उत्तर:
(अ) अलंकाराचे नाव → [दृष्टान्त]
(आ) अलंकाराचे उदाहरण → [लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा]
३. वृत्त:
(१) पुढील ओळींचे गण पाडून वृत्त ओळखा:
स्वजन गवसला तो त्याज पासी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो.
उत्तर:
वृत्त: हे ‘मालिनी’ वृत्त आहे.
(२) वृत्त ओळखा:
सदा सर्वदा योग तूझा घडावा।
तुझे कारणी देह माझा पडावा।। (मार्च १९)
उत्तर:
वृत्त: हे ‘भुजंगप्रयात’ वृत्त आहे.
४. शब्दसिद्धी:
(१) पुढील शब्दांना ‘त्व’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा:
(i) महत् – …………………………………..
(ii) कर्तृ – …………………………………..
(iii) प्रौढ – …………………………………..
(iv) वक्त – …………………………………..
उत्तर:
(i) महत् – महत्त्व
(ii) कर्तृ – कर्तृत्व
(ii) प्रौढ – प्रौढत्व
(iv) वक्तृ – वक्तृत्व.
(२) पुढील अभ्यस्त शब्द पूर्ण करा:
(i) अधून – ………………………………..
(i) दंगा – ………………………………..
(iii) हेवे – ………………………………..
(iv) काम – ………………………………..
उत्तर:
(i) अधूनमधून
(ii) दंगामस्ती
(iii) हेवेदावे
(iv) कामकाज,
(३) कंसातील शब्दांचे पुढे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा: (सराव कृतिपत्रिका-३)
(महत्त्व, लुटूलुटू, निकामी, घेईघेई, चढाई, सुकुमार)
प्रत्ययघटित – उपसर्गघटित – अभ्यस्त
(i) महत्त्व (i) …………………… – (i) ……………………
(ii) …………………… – (ii) …………………… – (ii) लुटूलुटू
उत्तर:
प्रत्ययघटित – उपसर्गघटित – अभ्यस्त
(i) महत्त्व – (i) सुकुमार – (i) घेईघेई
(ii) चढाई – (ii) निकामी – (ii) लुटूलुटू
५. सामान्यरूप:
(१) पुढील शब्दांची सामान्यरूपे लिहा:
(i) अभ्यासाविषयी – ………………………………..
(ii) खेळपट्टीचा – ………………………………..
(iii) कौतुकास – ………………………………..
(iv) महोत्सवात – ………………………………..
उत्तर:
(i) अभ्यासा
(ii) खेळपट्टी
(iii) कौतुका
(iv) महोत्सवा.
(२) पुढील शब्दसमूहातील शब्दांची योग्य सामान्यरूपे लिहा: (सराव कृतिपत्रिका-३)
(i) भूगोलची वही/भूगोलाची वही →
(ii) कोकराचे पाय/कोकरूचे पाय →
(iii) इंदिरेचे पुस्तक/इंदिराचे पुस्तक →
(iv) पेनने लिही/पेनाने लिही →
उत्तर:
(i) भूगोला
(ii) कोकरा
(iii) इंदिरा
(iv) पेना।
६. वाक्प्रचार:
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
(i) कपाळाला आठ्या पाडणे
(ii) डोळ्यांतले पाणी पुसणे
(iii) वाया जाणे
(iv) आनंद गगनात न मावणे.
उत्तर:
(i) कपाळाला आठ्या पाडणे – नाराजी व्यक्त करणे. वाक्य: कुठलेही काम सांगितले की महादू कपाळाला आठ्या पाडत असे.
(ii) डोळ्यांतले पाणी पुसणे – अश्रू पुसणे, सांत्वन करणे, वाक्य: दुःखितांच्या डोळ्यांतले पाणी पुसणे, हीच खरी समाजसेवा होय.
(iii) वाया जाणे – फुकट जाणे. वाक्य: अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली.
(iv) आनंद गगनात न मावणे – खूप आनंद होणे. वाक्य: विजयला बोर्डाच्या परीक्षेत ९०% गुण मिळाल्यामुळे त्याच्या आईबाबांचा आनंद गगनात मावला नाही.
भाषिक घटकांवर आधारित कृतीः
१. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) चांगले x ………………..
(ii) जास्त x ………………..
(iii) ओळख x ………………..
(iv) आवश्यक x ………………..
(v) पूर्वज x ………………..
(vi) शिस्त x ………………..
(vi) गुण x ………………..
(viii) राग x ………………..
उत्तर:
(i) चांगले x वाईट
(ii) जास्त x कमी
(iii) ओळख x अनोळख
(iv) आवश्यक x अनावश्यक
(v) पूर्वज x वंशज
(vi) शिस्त x बेशिस्त
(vii) गुण x अवगुण
(viii) राग x लोभ.
प्रश्न 2.
गटात न बसणारा शब्द शोधा:
(i) कावळा, कबुतर, चिमणी, ससा, गरूड.
(ii) अजंठा, शाळा, वर्ग, शिक्षक, विदयार्थी.
उत्तर:
(i) ससा
(ii) अजंठा.
प्रश्न 3.
पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
(i) समुद्रकिनारी → [ ] [ ] [ ] [ ]
(ii) फुलपाखराच्या → [ ] [ ] [ ] [ ]
उत्तर:
(i) समुद्रकिनारी → [समुद्र] [नारी] [सरी] [किनारी]
(ii) फुलपाखराच्या→ [खरा] [राख] [पारा] [पाल]
प्रश्न 9.
लेखननियम:
(१) अचूक शब्द लिहा:
(i) नीसर्ग/नीसंग/निसर्ग/निर्सग,
(ii) निर्पण/निष्पर्ण/नीर्पण/नीष्पर्ण.
(iii) मुहूर्त/मूहुर्त/मुहुर्त/मूहूर्त.
(iv) क्रिडांगण/क्रिडागंण/क्रीडागंण/क्रीडांगण.
उत्तर:
(i) निसर्ग
(ii) निष्पर्ण
(iii) मुहूर्त
(iv) क्रीडांगण.
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
(i) मला वीश्वास आहे, खुप खूप शुभेच्छा!
(ii) तूमच्या शीक्षकांनी तुम्हाला वगात शीस्तीत बसलेलं बघितलंय.
उत्तर:
(i) मला विश्वास आहे, खूप खूप शुभेच्छा!
(ii) तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय.
३. विरामचिन्हे:
पुढील परिच्छेदातील विरामचिन्हे ओळखा:
तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही; पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो यावर तुमचा विश्वास नाही का?
उत्तर:
चिन्हे – नाव
(i) [ ; ] – अर्धविराम
(ii) [ , ] स्वल्पविराम
(iii) [ ? ] प्रश्नचिन्ह
४. पारिभाषिक शब्द:
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:
(i) Due Date –
(ii) Exchange –
(iii) Express Highway –
(iv) Earn Leave – —
(v) Bio-data – ——
उत्तर:
(i) Due Date – नियत दिनांक
(ii) Exchange – देवाण-घेवाण/विनिमय
(iii) Express Highway – द्रुतगती महामार्ग
(iv) Earn Leave – अर्जित रजा
(v) Bio-data – स्व-परिचय,
५. अकारविल्हे
(१) पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा:
(i) डॉक्टर → इंजेक्शन → पेशंट → नर्स.
(ii) वेरूळ → अजंठा → बेसिन → कार्टून.
उत्तर:
(i) इंजेक्शन → डॉक्टर → नर्स → पेशंट.
(ii) अजंठा → कार्टून → बेसिन → वेरूळ.
(२) दिलेल्या सूचनांनुसार पुढील शब्दकोडे सोडवा:
उभे शब्द- …………………… करी काम
आडवा शब्द – मन मोहित करणारा.
उत्तर: