Chapter 10 पंडिता रमाबाई
Textbook Questions and Answers
1. खालील प्रश्वनांची थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली?
उत्तर:
स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत,अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली.
प्रश्न 2.
पंडिता रमाबाईंनी स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारांवरून समजते?
उत्तर:
मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदुमात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री-जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराङ्मुख होणार नाही. स्त्री-जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना स्त्री-जाती विषयी अपार प्रेम होते हे समजते.
प्रश्न 3.
पंडिता रमाबाईंनी कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते?
उत्तर:
अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर (चर्च) बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वत:च तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे वरील प्रसंगातून जाणवणते.
2. खालील चौकटी पूर्ण करा.
प्रश्न 1.
- पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. [ ]
- यांच्या मुलीचे नाव [ ]
- अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी [ ]
- सहस्त्रकातील कर्मयोगिनी [ ]
उत्तर:
- बिपिनबिहारी मेधावी
- मनोरमा
- ब्रेल लिपी
- पंडिता रमाबाई
3. पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उदयोगांची नावे लिहा.
प्रश्न 1.
पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उदयोगांची नावे लिहा.
उत्तर:
स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनची स्थापना केली. मुक्तिमिशनमध्ये रमाबाईंनी एक-एक लहान उदयोग-व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्ध्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई-बैलांचे खिल्लार, शेळ्या-मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दुधदुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी-मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कल्हई करणे, हातमागावर कापड-सतरंज्या विणणे, घाण्यावर तेले काढणे, छापखान्यातील टाइप जुळवणे – सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे-पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे अनेक प्रकारचे उदयोग पंडिता रमाबाईंनी स्त्रियांसाठी सुरू केले.
4. पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
प्रश्न 1.
पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
उत्तर:
- पंडिता
- कर्मयोगिनी
- सत्शील साध्वी
- सूर्यकन्या
खेळूया शब्दांशी
प्रश्न अ.
खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
उदा. मारवा – गार, रवा, वार, वागा
- आराखडा
- सुधारक
उत्तर:
- राख, आख, खडा, खरा, राडा, डाख
- सुधा, सुर, धार, धाक, कर, कसुर, धारक, सुधार
प्रश्न आ.
असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर ‘रं’ आहे त्याची यादी करा.
उदा. करंजी, चौरंग, कारंजे
उत्तर:
- बेरंग
- सारंगी
- सुरंगी
- मोरंबा
- सारंग
प्रश्न इ.
खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा. खजूर (कामकार) – मजूर
- पुस्तक (डोके)-
- समता (माया)
- घागर (समुद्र)-
- कडक (रस्ता)
- गाजर (पाळीव प्राणी) –
- प्रवास (घर) –
उत्तर:
- मस्तक
- ममता
- सागर
- सडक
- मांजर
- निवास
ई. हे शब्द असेच लिहा.
स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, पराङ्मुख, दुःख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य.
खेळ खेळूया.
प्रश्न 1.
खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
उत्तरः
- अतिशाणा त्याचा बैल रिकामा
- एक ना धड भाराभार चिंध्या
- ऐकावे जनाचे करावे मनाचे
- चोर सोडून संन्याशाला फाशी
- घरोघरी मातीच्या चुली
शोध घेऊया.
प्रश्न 1.
महाराष्ट्रामधील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवून.
उत्तर:
कर्तृत्ववान महिला | प्रेरणादायी कार्य |
1. लता मंगेशकर | संगीतक्षेत्र |
2. राणी लक्ष्मीबाई | स्वातंत्र्यसेनानी |
3. सावित्रीबाई फुले | स्त्री-शिक्षण |
4. मेधा पाटकर | सामाजिक चळवळ |
5. सिंधुताई सपकाळ | अनाथ मुलांसाठी कार्य |
6. बहिणाबाई | संतसाहित्य |
7. शांता शेळके | कविता |
8. आनंदी जोशी | पहिल्या स्त्री डॉक्टर |
9. इंदिरा गांधी | राजकारण |
प्रश्न 2.
खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ …………… बाबांबरोबर फिरायला …………….. झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ……………… किलबिल शुद्ध हवा …………….. आल्हाददायक वातावरण बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ……………….. दिवसभर ताजेतवाने वाटणे.
उत्तर:
‘आल्हाददायक सकाळ’: सुट्टी सुरू झाली होती. पण नेहमीच्या सवयीने सकाळी सकाळीच जाग आली. बाबा सकाळचा फेरफटका मारण्यासाठी निघत होते. मग मी देखील बाबांबरोबर फिरायला बाहेर पडले. प्रथमच अशी शांत सकाळ अनुभवत होते. दुतर्फा असणाऱ्या झाडांवर बसलेले पाखरांचे थवे नयनरम्य वाटत होते. त्यांची किलबिल कानांना सुखद अनुभव देत होती. शुद्ध हवा शरीरात भरून घ्यावीशी वाटत होती. हे आल्हाददायक वातावरण मनाला प्रसन्नता देत होते. या अशा वातावरणाचा आस्वाद घेत, बाबांशी गप्पा मारत घराकडे निघाले. एकंदरीतच सकाळच्या या अनुभवाने दिवसभर ताजेतवाने वाटत राहिले.
प्रश्न 3.
चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करून रिकाम्या जागा पूर्ण करा. (परंतु, म्हणून, वा, तरी, आणि, किंवा, अन्, कारण, शिवाय)
- मंगल खंजिरी ……………….. टाळ छान वाजवते.
- काका आला ……………… काकी आली नाही.
- कुंदाचा पाय मुरगळला ………………… ती शाळेत येऊ शकली नाही.
- मला बूट …………….. चप्पल खरेदी करायची आहे.
- धोधो पाऊस पडत होता ……………… मुले पटांगणावर खेळत होती.
- तुझी तयारी असो ……………….. नसो, तुला गावी जावेच लागेल.
उत्तर:
- आणि
- परंतु
- म्हणून
- किंवा
- तरी
- वा
आपण समजून घेऊया.
प्रश्न 1.
खालील वाक्ये वाचा.
आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखादया उद्गारावाटे व्यक्त करतो. वरील वाक्यांतील शाब्बास, अरेरे, बापरे, अहाहा ही केवलप्रयोगी अव्यये आहेत. या शब्दांमुळे आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त होतात. या शब्दांना उदगारवाचक शब्द असेही म्हणतात..
प्रश्न 2.
खालील वाक्यात कंसातील योग्य केवलप्रयोगी अव्यये घाला.
- ………………. ! काय दशा झाली त्याची!
- ………………. ! एक अक्षरह बोलू नकोस!
- ………………. ! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.
- ………………. ! केवढा मोठा अजगर!
उत्तर:
- चूप!
- अरेरे!
- शी!
- अबब!
शिक्षकांसाठी:
विदयार्थ्यांना केवलप्रयोगी अव्ययांची विविध उदाहरणे देऊन अधिक सराव करून घ्यावा. विदयार्थ्यांना शब्द, चित्र, चित्र व शब्द या वेगवेगळ्या स्वरूपांत अपूर्ण गोष्ट दयावी व ती पूर्ण करून घ्यावी.
Textbook Questions and Answers
रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा.
- पंडिता रमाबाईंना त्यावेळी …………….. भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या ……………… भाषेतून भाषण केले.
- त्यांचे पहिले व्याख्यान ………………. यांच्या घरी झाले.
- ………….. सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे.
- पंडिता रमाबाईंनी ……………… ची स्थापना केली.
- रमाबाईंचे आयुष्य म्हणजे …………. आणि ………………. एक दीर्घ साखळी होती.
उत्तर:
- बंगाली, संस्कृत
- न्यायमूर्ती रानडे
- स्त्री जातीची
- मुक्ति-मिशन
- संघर्षाची, संकटांची
खालील चौकटी पूर्ण करा.
- यांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. [ ]
- पंडिता बाईच्या अटीची आठवण यांनी लिहून ठेवली आहे. [ ]
- लग्नाच्यावेळी रमाबाईंचे वय [ ]
उत्तरः
- महाराष्ट्रातील सुधारकांच्या
- काशीबाई कानिटकर
- 11 वर्ष
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
भारतातील स्त्रियांची पहिली सभा कोणी व कोठे बोलावली?
उत्तर:
भारतातील स्त्रियांची पहिली सभा देशभक्त आनंद मोहन यांनी कोलकाता शहरात बोलावली.
प्रश्न 2.
स्त्रियांच्या पहिल्या सभेची वैशिष्ट्ये कोणती होती?
उत्तरः
स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही स्त्रियांच्या पहिल्या सभेची वैशिष्ट्ये होती.
प्रश्न 3.
रमाबाईंनी विवाह करण्याचे का ठरविले?
उत्तरः
आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे याचा अनुभव घेतल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरविले.
प्रश्न 4.
एका उदार गृहस्थाने रमाबाईंना आर्थिक मदत करताना कोणती अट घातली?
उत्तर:
एका उदार गृहस्थाने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे चाळीस हजार रुपयांत होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली.
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
कोलकाता शहरात झालेली स्त्रियांची पहिली सभा आगळीवेगळी का होती?
उत्तर:
कोलकाता शहरात झालेल्या स्त्रियांच्या पहिल्या सभेत पंडिता रमाबाईंनी संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्याचा अनुवादही करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना, एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते हा ही एक विशेष होता. म्हणूनच स्त्रियांची ही पहिली सभा आगळीवेगळी होती.
प्रश्न 2.
पुण्यात होणाऱ्या पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य काय होते?
उत्तरः
पुण्यात आल्यावर पंडिता रमाबाईंचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्याकडे झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिता बाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेतील एक अट त्यांच्या व्याख्यानांचे वैशिष्ट्य होते.
पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
प्रश्न 2.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. गाई-बैल | अ. चरणी |
2. म्हशी | ब. खिल्लार |
3. शेळ्या -मेंढ्या | क. गोठा |
उत्तरः
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. गाई-बैल | ब. खिल्लार |
2. म्हशी | क. गोठा |
3. शेळ्या -मेंढ्या | अ. चरणी |
उतारा – पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 35
रमाबाईंची कन्या मनोरमा ………………..
…………………….. मुलींना नेहमीच दिला.
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
1. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेली संस्था [ ]
2. पंडिता रमाबाईंनी स्वत: तयार केलेली वास्तू [ ]
उत्तर:
1. मुक्तिमिशन
2. प्रार्थनामंदिर (चर्च)
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय कशी झाली?
उत्तर:
पंडिता रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय झाली.
प्रश्न 2.
प्रार्थना मंदिराच्या बांधकामाला रमाबाईंनी कशा प्रकारे हातभार लावला?
उत्तर:
डोक्यावर विटांचे घमेले वाहून रमाबाईंनी प्रार्थनामंदिराच्या बांधकामाला हातभार लावला.
कृती 3: व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला,
- शेळया
- चर्च
- सतरंजी
- दोरी
उत्तर:
- शेळी
- चर्च
- सतरंज्या
- दोऱ्या
अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुहा लिहा.
प्रश्न 1.
कुठलेही काम करण्यात त्यांना कधीच कमीपणा मानला नाही.
उत्तरे:
कुठलेही काम करण्यात त्यांना कधीच मोठेपणा मानला नाही.
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
बेल लिपी बद्दल तुम्हांला असलेली माहिती सांगा.
उत्तर:
ब्रेल लिपी म्हणजे बोटांच्या साहाय्याने वाचनाची पद्धत जी खास अंध व्यक्तींसाठी विकसित केली गेली. लुई ब्रेल ह्या शास्त्रज्ञाने जानेवारी 2607 मध्ये ब्रेल लिपीची रचना केली, फ्रान्सच्या या शास्त्रज्ञाने स्वत: अंध असल्यामुळे इतर अंधांना शिक्षण घेणे सोपे जावे या उद्देशाने या लिपीचा शोध लावला.
व्याकरण व भाषाभ्यास
प्रश्न 1.
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा
- स्त्री
- मायबोली
- विवाह
- उत्कंठा
- प्रोत्साहन
- अनुवाद
- ख्याती
- नंदनवन
- बंधू
उत्तर:
- महिला
- मातृभाषा
- लग्न
- उत्सुकता
- उत्तेजन
- भाषांतर
- प्रसिद्धी
- स्वर्ग
- भाऊ
प्रश्न 2.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- पहिली
- ज्ञान
- अनाथ
- विधवा
- स्वावलंबी
- अंध
उत्तर:
- शेवटची
- अज्ञान
- सनाथ
- सधवा
- परावलंबी
- डोळस
प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला.
- स्त्री
- वडील
- पाय
- रेडा
- कन्या
उत्तर:
- पुरुष
- आई
- बैल
- म्हैस
- पुत्र
प्रश्न 4.
खालील शब्दांचे वचन बदला.
- सभा
- वक्ता
- वकील
- व्याख्याने
- पुढारी
- भांडी
- कामद
उत्तर:
- सभा
- क्क्ते
- वकील
- व्याख्यान
- पुढारी
- भांडे
- कामद
प्रश्न 5.
खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
उदा. मारवा – गार, रवा, वार, वागा
- हातमाग
- परभाषक
- महाभारत
- अहमदाबाद
उत्तर:
- ह्रत, माम, मात, मत, मायत, तमा, तम
- पर, भाषक, कर, कप, भार, भाप, भाकर
- महा, मर, मत, हत, हर, भार, भात, रत, रहा, भारत, तम, तर
- अहम, अदा, हद, मद, दाद, दाम, दाह, बाद, बाम
प्रश्न 6.
खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा. खजूर (कामकार) – मजूर
- आरोप (सांगावा) –
- पावली (छाया) –
- प्रकाश (गमन)-
- मंगल (वन) –
- साजण (मोठे माठ)-
- पातक (शंभर)
उत्तर:
- निरोप
- सावली
- आकाश
- जंगल
- रांजण
- शतक
प्रश्न 7.
खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
उत्तरः
नाचता येईना अंगण वाकडे
वासरात लंगडी गाय शहाणी
प्रश्न 8.
चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करून रिकाम्या जागा पूर्ण करा. (परंतु, म्हणून, वा, तरी, आणि, किंवा, अन्, कारण, शिवाय)
- अजय आणि विजय शाळेत पोहचले …………….. पावसाची टिपटिप सुरू झाली.
- पावसाळा माझा आवडता ऋतु आहे, …………….. मला पावसात भिजायला आवडते
- सोनालीने वाचनाच्या पुस्तकांचा संग्रह केला होता, ……………….. वाचनालयातही नाव नोंदवले होते.
उत्तर:
- अन्
- कारण
- शिवाय
केवलप्रयोगी अव्यये
व्याख्या – आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण ज्या उद्गारांवाटे वा शब्दांद्वारे व्यक्त करतो, त्या शब्दांना ‘केवलप्रयोगी अव्यये’ म्हणतात. मनातील भावना प्रभावीपणे मांडणारे शब्द उद्गारवाचक शब्द’ म्हणूनही ओळखले जातात.
उदा.
शाब्बास! चांगले काम केलेस बाळा!
अरेरे! फार वाईट झाले!
बापरे! केवढा मोठा साप!
प्रश्न 1.
खालील वाक्यात कंसातील योग्य केवलप्रयोगी अव्यये घाला.
- ………………. ! किती सुरेख लाजता तुम्ही!
- ………………. ! फार छान गुण मिळवलेस!
- ………………. ! पिसारा फुलवलेला मोर!
- ………………. ! केवढा तो अभ्यास!
उत्तर:
- अय्या!
- शाबास!
- अहाहा!
- बापरे!
Summary in Marathi
पाठ परिचय:
स्वत:चे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिका डॉ. अनुपमा उजगरे यांनी ‘पंडिता रमाबाई’ या पाठातून केले आहे.
Pandita Ramabai had a life full of struggle and hardships and still she tried to improve the lifestyle of other women. She tried to create a heaven for all others. The life and works of Pandita Ramabai has been narrated in this write-up in very inspiring words by writer Dr. Anupama Ujgare.
शब्दार्थ:
- अनुवाद – भाषांतर – translation
- सभा – मेळा, जमाव – meeting
- मौखिक – तोंडी – oral
- विनंती – याचना – request
- व्याख्यान – भाषण – a lecture
- अट – नियम – rule
- शिष्यवृत्ती – विद्यावेतन – scholarship
- शिफारस – प्रशंसा – recommendation
- अनाथ – पोरका – orphaned
- अपंग – विकलांग – handicapped
- जुजबी – क्षुल्लक, किरकोळ – negligible
- खिल्लार – कळप – a flock
- संघर्ष – कलह, झुंज – conflict
- साखळी – शृंखला – chain
- सहस्त्रक – एक हजार वर्ष – thousandofyears
- सराव – अभ्यास, राबता (practice)
- तान्हया – लहान (small)
- शिष्यवृत्ती – विद्यावेतन (scholarship)
वाक्प्रचार:
- ख्याती मिळविणे – प्रसिद्धी मिळविणे
- हातभार लावणे – सहकार्य करणे
- उत्कंठा असणे – उस्तुकता असणे
- काटकसर करणे – बचत करणे
- शिफारस करणे – दुसऱ्याजवळ तारीफ करणे, प्रशंसा करणे
- प्रोत्साहन देणे – उत्तेजन देणे