Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)

Day
Night

Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)

Textbook Questions and Answers

1. कारण लिहा:

प्रश्न 1.
कारण लिहा:
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे –
उत्तर:
लंडनच्या पावसात रस्त्यात चिखल होत नाही. वातावरणात मजेदार गारवा असतो. चार-पाच मैल चालूनही थकवा येत नाही. परिसर हिरवागार राहतो; म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटायची.

2. तुलना करा:

प्रश्न 1.
तुलना करा:


उत्तर:

भारतामधील धुके

लंडनमधील धुके

1. मनाला सुखद संवेदना देते.

1. लंडनचे धुके औरच आहे.

2. धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो.

2. वर्षाचे दहा दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते.

3. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते.

3. काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते.

4. धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते.

4. वर्षातून एक-दोनदा काळे धुके लंडनवर पसरते.

3. इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.

प्रश्न 1.
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
उत्तर:
इंग्लंडमध्ये काळसर पांढुरक्या धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो कारखाने व कोळशावर चालणाऱ्या घरांतील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर सोडत असतात. घरात अनवाणी चालले की पाय काळे होतात. झाडाला हात लावला की हात काळे होतात.

अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसू लागतात. काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो. आपण हवेच्या आवरणाच्या तळाशी आहोत, याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो. समुद्राच्या तळाशी होणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना येते. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात. रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात. मुले रस्ता चुकतात. अशा प्रकारे तेथील जनजीवन विस्कळीत होते.

4. स्वमत:

प्रश्न (अ)
‘हिवाळ्यातील एक क्षण,’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
उत्तर:
गेल्या वर्षी आम्ही सर्व कुटुंबीय चारधामच्या यात्रेला ऑक्टोबर महिन्यात गेलो होतो. गंगोत्रीच्या काठावर आम्ही वस्ती केली होती. रात्र असल्यामुळे त्या परिसराची कल्पना नव्हती. पहाटेच मला जाग आली. बाहेर थंडी होती. उबदार शाल लपेटून मी बाहेर आलो. गच्च धुक्याची चादर लपेटलेली झाडे नि गंगेच्या धारेवर बर्फाची ओढणी अंथरली होती. ऑक्टोबर महिना असल्यामुळे पर्वतावरील बर्फ वितळले होते. पण शिखराशिखरांवर बर्फाचे भलेमोठे पुंजके होते. मी त्यांच्याकडे भान हरखून पाहत होतो. इतक्यात एक सूर्याचा किरण शिखरावर पडला नि तिथला बर्फ सोन्याच्या रंगाने तळपला. हे दृश्य केवळ विलोभनीय होते. एक क्षणभरच हे अलौकिक सौंदर्य उमटले नि लुप्त झाले. हिवाळ्यातील हा अविस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरू शकत नाही.

प्रश्न (आ)
तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर:
वर्षाऋतू किंवा पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे. तापलेल्या मातीवर पावसाचा शिडकावा झाला की मातीचा है सुगंध येतो. सारी सृष्टी न्हाऊन निघते. डोंगरदऱ्यांत पाणी खळाळते. झाडे अंघोळ करून स्वच्छ होतात. नदीनाले भरभरून वाहू लागतात. गुरेढोर, पशुपक्षी यांना पाणी मिळते. शेतकरी आनंदित होतात व नांगरलेल्या शेतात पेरणी करायला उत्सुक असतात. मुले आनंदाने बागडतात. सर्वत्र हिरवेगार होते. सृष्टी आपले रूप पालटते. चराचरावर आनंदाची लकेर घुमते. कवी लेखकांना नवनवीन कल्पना सुचतात. खरेच! पाऊस हा नवसृजनाचा ऋतू आहे!

प्रश्न (इ)
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
ऐन हिवाळ्यात आम्ही काही मित्र पाचगणीला गेलो होतो. आमच्या तीन दिवसांच्या मुक्कामात एकदाही आम्हाला स्वच्छ आकाशाचे दर्शन झाले नाही. सर्व परिसराला धुक्याने जणू बाहूत कवटाळले होते. डोंगरदरी धुक्याच्या आइसक्रीमने ओतप्रोत भरली होती. झाडे धुक्याचे पांघरूण घेऊन पेंगत होती. रस्त्यावर दहा फुटांच्या पुढचे दिसत नव्हते. तोंडातून कुंकर मारली की धुक्याची धुरासारखी वलये उमटत होती. आम्ही रस्त्यावरून हिंडत असताना एक जादू झाली.

अवतीभवती शिरिषाची विस्तारलेल्या फांदयांची खूप झाडे होती. अचानक क्षणभर ढगातून सूर्याची फिकट कोवळी किरणे धुक्याने लपेटलेल्या झाडातून खाली उतरली नि झाडाच्या पायथ्याशी उन्हाच्या गोल-गोल चकत्या उमटल्या. मला अशोक बागवे याच्या कवितेची एक ओळ आठवली – ‘सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे। मखमलीची झीळ त्याला हिवळे दर्वळे’ धुक्यातील दिवसांतील हा क्षण माझ्यासाठी केवळ मोलाचा ठरला.

5. खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

प्रश्न 1.
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

अपठित गद्य आकलन:

आपण पाठ्यपुस्तकात गदय व पदय पाठांचा अभ्यास करतो. विविध साहित्यप्रकारांच्या अभ्यासाबरोबर भाषिक अंगाने प्रत्येक पाठाचा अभ्यास आपणांस करायचा असतो. विद्यार्थ्यांची भाषासमृद्धी, भाषिक विकास ही मराठी भाषा अध्ययन-अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, म्हणूनच पाठ्यपुस्तकातील पाठांच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्याला कोणतेही साहित्य वाचल्यानंतर त्याचे आकलन होणे, आस्वाद घेता येणे व त्या भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे ही उद्दिष्टे साध्य करता येतात. अशा पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे, मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात अपठित गद्यउतारा हा घटक समाविष्ट केला आहे. गदय उतारा वाचून त्याचे आकलन होणे व त्यावरील स्वाध्याय तुम्ही स्वयंअध्ययनाने करणे येथे अपेक्षित आहे.

1. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

प्रश्न 1.
दुष्परिणाम लिहा.

2. अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी तुमच्या मते कोणते गुण जोपासावेत व कोणते दोष दूर ठेवावेत, ते लिहा.

भाषा सौंदर्य :

एकच भाव वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त करणे-
एखादे रिकामे घर पाहिल्यावर तुमच्या मनात येणारे विचार.

  1. घर उदास वाटते.
  2. घर कुणाची तरी आठवण काढते.
  3. घर स्वत:चे एकेकाळचे वैभव आठवून उदास झाले आहे.
  4. घराला गाव सोडून गेलेल्या माणसांची आठवण येते.
  5. एकेकाळी माणसांनी भरलेले घर आज एकाकी वाटते.

विद्यार्थ्यांनो, ही यादी कितीही वाढवता येईल. भाषेच्या अशा अर्थपूर्ण आणि सृजनशील रचनांचा अभ्यास कराव आपले लेखन अधिक परिणामकारक करा.

Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
इंग्लंडमधील हिवाळा आणि भारतातील हिवाळा यांची तुलना करा.
उत्तर:
इंग्लंडमध्ये हिवाळ्यात कित्येक आठवडे संधिप्रकाशाइतकाच उजेड असतो. भारतात मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. भारतातील काही भागांत तर अत्यंत प्रखर, तीव्र उजेड असतो; तर काही भागांत उजेड भरपूर प्रमाणात असतो, पण तापमान कमी असते. इंग्लंडमध्ये अर्धवट उजेडात प्रकाश व सावली यांचा अभाव आढळतो. भारतात मात्र, माणसे, प्राणी व वाहने सावलीसोबतच चालत, धावत असतात. इंग्लंडमध्ये पर्णहीन वृक्षांची सावली खालच्या हिरवळीवर पडत नाही.

भारतामध्ये झाडाखालच्या दाट सावलीत प्रकाशाचे गोल कवडसे चमकत असतात. सावली पडावी इतका प्रकाश इंग्लंडमध्ये महिनोन् महिने पडत नाही. त्यामुळे वस्तूंवर छायाप्रकाशाचे खेळ दिसत नाहीत. पण भारतात प्रत्येक वस्तूची एक बाजू प्रकाशमय व दुसरी बाजू सावलीची असते. असा इंग्लंडमधील हिवाळा व भारतातील हिवाळा यांत फरक दिसून येतो.

Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात इरावती कर्वे यांनी इंग्लंडमधील पावसाळी धुके व हिवाळ्याचे वर्णन केले आहे. तसेच या ऋतूंमधील आपल्याकडील वातावरणाशी तुलना केली आहे. अतिशय विलोभनीय शब्दांत ऋतूंमधील साम्य व भेद यांचे दृश्य चितारले आहे.

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर इंग्लंडमध्ये रोज पाऊस पडायचा. लंडनवासी या पावसावर वैतागत असायचे, पण कायम पडणाऱ्या पावसाची लेखिकेला खूप मौज वाटायची.

2. आपल्याकडचे धुके मनाला सुखद संवेदना देते. पावसानंतरचे प्रसन्न आकाश, सकाळ-संध्याकाळची थंडी, लांबवर दिसणारे स्वच्छ वातावरण, त्यात थोडा वेळ राहणारा धुक्याचा पडदा, अशी आपल्याकडील धुक्याची वैशिष्ट्ये! महाबळेश्वरावर किंवा सिंहगडावर खालची दरी धुक्याने भरलेली दिसते. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्ये उमटतात. सूर्य आणखी थोडा वर आला की धुके निघून जाते व गवताच्या पात्यांवर असंख्य दवबिंदू चकाकतात. संध्याकाळचे धुके रात्र निवळली की नाहीसे होते व रात्री आकाश तारकांनी चमकत असते.

3. लंडनचे धुके औरच आहे. काळसर पांढुरके धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते. लंडनमधील कारखाने व लक्षावधी चुली वातावरणात धूर ओकत असतात. अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसतात. काळोख डोळ्यांना दिसतो. हाताने धरता येतो. असे काळे धुके वर्षातून एक-दोनदा लंडनवर पसरते. या धुक्याने हाहाकार माजतो.

4. हिवाळ्यात लंडनमध्ये कित्येक आठवडे संधिप्रकाशाइतकाच उजेड असतो. या अर्धवट उजेडात प्रकाश व सावली यांचा अभाव असतो. निरनिराळ्या बगिच्यांत पर्णहीन वृक्ष उभे असतात. त्यांची सावली खालच्या हिरवळीवर पडत नाही. येथे सावली पडेल इतका स्वच्छ उजेड महिनेच्या महिने पडत नाही.

5. आपल्याकडील हिवाळ्यात रखरखीत ऊन व त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने चकाकतो. माणसे व वाहने सावलीनिशी धावत असतात. प्रत्येक वस्तूची एक बाजू प्रकाशमय व दुसरी बाजू सावलीची ! खांबाला चिकटून असलेल्या सावलीत पक्षी टेलिग्राफच्या तारावर बसलेले दिसतात. पायी चालणारी माणसे घरांची सावली धरून चालतात. झाडाखालच्या दाट सावलीत प्रकाशाचे गोल कवडसे चमकतात.

6. एकदा लेखिका हिवाळ्यातच सेंट जेम्स बगिच्यात गेल्या. तेथील तळ्यावरचा प्रकाश खालून वर फाकला होता; कारण वर सूर्य नसलेले अभ्राच्छादित आकाश होते. तळ्याच्या पाण्यावर बर्फाचा पातळ थर साचला होता. त्यावर प्रकाश परावर्तित होऊन सगळीकडे फाकला होता. या विशेष प्रकाशात सर्व रंग आंधळे वाटतात. वसंतऋतूत एखादया दिवशी इथे सूर्यप्रकाश पडला की सृष्टी रंगाने नटते. येथील रंग जरा मंद व सौम्य वाटतात. आपल्याकडे दाट सावल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक भासतात.