Chapter 11 जंगल डायरी
Textbook Questions and Answers
   प्रश्न 1.   
   लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.   
   (i) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.   
   (ii) ___________________________   
   (iii) ___________________________   
   (iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.   
   (v) ___________________________   
   (vi) ___________________________   
   उत्तर:   
   (i) जंगलच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.   
   (ii) लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायची खूण केली.   
   (iii) दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.   
   (iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.   
   (v) बिबळ्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो लेखकाला मुळीच दिसला नसता.   
   (vi) त्याची पाठ लेखकाकडे होती, त्यामुळे त्याने अदयाप त्यांना पाहिले नव्हते.   
   (vii) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.
   प्रश्न 2.   
   कारणे लिहा.   
   (i) वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण ……………………………..   
   (ii) वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण ……………………………..   
   उत्तर:   
   (i) वाघिणीचे पिल्लू तिच्या पाठीवरून घसरले व पाण्यात पडल्यामुळे वाघीणीच्या तोंडावर पाणी उडले.   
   (ii) वाघांच्या पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो.
   प्रश्न 3.   
   विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.   
   
   प्रश्न 4.   
   स्वमत.   
   (अ) ‘लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली’, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.   
   उत्तरः   
   अतुल धामनकर यांनी ‘जंगल डायरी’ या पाठात जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करतांना आलेल्या विविध अनुभवांचे वर्णन तसेच वाघिणीत दिसलेल्या ‘आईची झलक’ मार्मिक पणे व्यक्त केली आहे.
वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. संभाव्य शत्रूच्या हल्ल्या पासून आईने पिल्लांना सुरक्षित ठिकाणी लपवले होते. शिकारीनंतर ती सरळ पाण्यात येऊन बसली. मुलांचा दंगाधोपा सुरू होता. थोड्यावेळाने शिकारीपर्यंत पिल्लांना नेण्यासाठी ती उठली. बाबूंच्या गंजीत जिथे शिकार ठेवली होती तिथे पिल्ले आपल्यासोबत येताहेत की नाही हे पाहिले. दोन पिल्ले तिच्या मागोमाग निघाली पण अदयाप दोघे पाण्यातच खेळत होती. वाघिणीने परत त्यांना बोलवणारा आवाज काढला.
वाघिणीने चारही पिल्ले आपल्याबरोबर येताहेत याची पूर्ण खात्री केली. बाकीची दोन्ही पिल्ले आपला खेळ थांबून आईच्या मागे पळत सुटली. या तिच्या प्रेमाचे, खबरदारीचे लेखकाने निरिक्षण केले व त्याला तिच्यातील आईची झलक बघायला मिळाली. पिल्लांची देखभाल करणे, सांभाळणे, त्यांना शिकार आणून खाऊ घालणे हे वाघिणीनेही जबाबदारीने केले होते. आईचे कर्तव्य निभावले होते. त्याला वाघिणीतील आईची झलक अशाप्रकारे जाणवली.
   (आ) वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.   
   उत्तरः   
   जंगल डायरी या पाठात अतुल धामनकर यांनी चंद्रपूर येथील जंगल प्रसंगाचे जीवंत चित्रण शब्दबद्ध केले आहे.
वाघीण चारही पिल्लांना वाघ, बिबळा, रानकुत्री यांच्यापासून धोका असल्याने नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीला गेली होती. तिने पिल्लांसाठी खास खबरदारी घेतली होती. ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली. थकलेली वाघीण पाण्यात विश्रांतीसाठी बसली.
पण पिल्लांना आईला बघून उधान आले. त्यातील एका पिल्लाने वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. तिथून ते घसरले व धपकन पाण्यात पडले. वाघिणीच्या तोंडावर पाणी पडल्याने तिने नापसंती व्यक्त केली. पण पिल्ले खेळतच होती. आईच्या भोवती दंगाधोपा चालू होता. एकमेकांचा पाठलाग करणे, पाण्यात उड्या मारणे, आईला मायेने चाटणे असे खेळ चालू होते. आईच्या भेटीने लपवून ठेवलेली पिल्ले मनमोकळेपणाने खेळत होती.
   (इ) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, याविषयी तुमचे मत लिहा.   
   उत्तर:   
   डायरी म्हणजे दैनंदिनी. रोज आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्या ठळक गोष्टी करतो याची नोंद ठेवणे केव्हाही उपयुक्त. डायरी लिहिण्याने दिवसभराचा गोषवारा हाती येतो. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद केली जाते. आजपर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी डायरीचा उपयोग होतो. चांगल्या गोष्टींच्या नोंदीने पुन्हापुन्हा त्या वाचताना मनाला समाधान वाटते, प्रेरणा मिळते. काही प्रेक्षणीय स्थळे बघितल्यास त्याचीपण नोंद करावी. त्यामुळे विपुल माहिती जमा करता येते. डायरीतील प्रत्येक पान म्हणजे त्या दिवसाचा आरसा असतो. स्थळे, प्रदर्शने, उद्घाटने, करावयाची कामे इ. नोंद आवश्यक असते. त्याची पडताळणी घेऊन आपल्याच कामावर आपण लक्ष ठेवू शकतो. कितीतरी उपयुक्त माहिती भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरते. स्वत:वर शिस्त, नियंत्रण व सच्चेपणा राखण्यासाठी डायरी लिहिण्याचा छंद प्रत्येकाने जोपासावा असे माझे मत आहे.
प्रश्न १. उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
    
   
   
   प्रश्न 2.   
   खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 
   (i) लेखकाने कोणता रस्ता धरला?   
   उत्तरः   
   लेखकाने डावीकडं जाणारा झरीचा रस्ता धरला.
   (ii) वनमजूर अचानक का थबकला?   
   उत्तरः   
   नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं झरीच्या रस्त्यावर उमटलेली दिसली, म्हणून वनमजूर थबकला.
   (iii) दुर्बिणीने काय स्पष्ट दिसले?   
   उत्तरः   
   तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बसलेला बिबळ्या दुर्बिणीने स्पष्ट दिसला.
   (iv) बिबळ्या जंगलात अदृश्य का झाला?   
   उत्तर:   
   टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडून झालेल्या ‘कट्’ आवाजाने बिबळ्या सावध होऊन जंगलात अदृश्य झाला.
   प्रश्न 3.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) गावातून ………………………………….. वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. (रेगे, टोंगे, दिघे, पोंगशे)   
   (ii) हा एक ………………………………….. असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभर आधीच इथून गेला असावा. (वाघ, रेडा, नर, गेंडा)   
   (iii) एका ………………………………….. झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता. (आंब्याच्या, तेंदूच्या, बाभळीच्या, सागाच्या)   
   (iv) थोड्याच अंतरावर ………………………………….. जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. (रायबाकडं, ज्योतिबाकर्ड, पन्हाळ्याकडं, जंगलाकड)   
   उत्तर:   
   (i) टोंगे   
   (ii) नर   
   (iii) तेंदूच्या   
   (iv) रायबाकडं
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   सकारण लिहा.   
   (i) बिबळ्यानं अदयाप लेखकाला पाहिलं नव्हतं, कारण –   
   (अ) लेखक लपून बसला होता.   
   (आ) झुडपांची दाट झाडी होती.   
   (इ) लेखकाकडे त्याची पाठ होती.   
   (ई) बांबूचे बन होते.   
   उत्तर:   
   बिबळ्यानं अदयाप लेखकाला पाहिलं नव्हतं, कारण लेखकाकडे त्याची पाठ होती.
   (ii) तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती, कारण   
   (अ) बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.   
   (आ) नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहात होतं.   
   (इ) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.   
   (ई) रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता.   
   उत्तरः   
   तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती, कारण नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहात होतं.
   प्रश्न 2.   
   ‘बिबळ्याच्या निरीक्षणाची’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.   
   उत्तरः   
   कोणती चांगली संधी हातची गेली म्हणून लेखक हळहळला?
   प्रश्न 3.   
   सहसंबंध लिहा.   
   (i) वनरक्षक : टोंगे :: तिखट कानांचा : …………………………………..   
   (ii) वाळक्या : काट्या :: दाटी : …………………………………..   
   उत्तर:   
   (i) बिबळ्या   
   (ii) झुडपांची
   प्रश्न 4.   
   चूक की बरोबर लिहा.   
   (i) गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले.   
   (ii) बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून लेखक आनंदी होते.   
   उत्तर:   
   (i) बरोबर   
   (ii) चूक
   प्रश्न 5.   
   उताऱ्यानुसार पुढील वाक्यांचा योग्य क्रम लावा.   
   (i) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.   
   (ii) बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं.   
   (iii) दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते.   
   (iv) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला.   
   उत्तर:   
   (i) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला.   
   (ii) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.   
   (iii) बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिले.   
   (iv) दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते.
कृती ३ : स्वमत
   प्रश्न 1.   
   तुम्ही अनुभवलेल्या जंगल सफारीचे वर्णन लिहा.   
   उत्तरः   
   मी इयत्ता ८ वीत असताना नाताळाच्या सुट्टीत जंगल सफारीचा अनुभव घेतला आहे. कोचीन, पेरीयार व टेकाडी या केरळाच्या टूरवर असताना. टेकाडीच्या घनदाट जंगलात हत्तीवरून जंगल सफारीची मजा लुटली. हत्तीवर बसण्याचा, संथ पण हेलकावे घेत जाण्याचा अनुभव निराळाच होता. आम्ही चारजण हत्तीवर बसून जंगल फिरलो. हरणांचे कळप दिसले, रानम्हशी दिसल्या. रानगव्यांचा कळप जाताना आमच्या गाईडने दाखवला. मुंग्यांची मोठ-मोठी वारूळे दिसली. मधमाश्यांचे पोळे पाहिले. वाघही पहायला मिळाला. खूप दूरवर असल्याने वाघाची अंधूकशी झलक दिसली. कोल्हे तर दोन-तीन वेळा दिसले. बहिरीससाणेही दिसले.
आमच्या रस्त्यावरून मुंगूस जाताना पाहिले. त्याची मोठी तुरेदार शेपूट शोभून दिसत होती. सांबरशिंग काळ्याकभिन्न रंगाचे होते. त्याची शिंगे मोठी डौलदार होती. हत्तींचा कळप टेकडीच्या नदीवर पाणी प्यायला आला होता. हत्तींची दोन पिल्ले फारच मोहक होती. पक्ष्यांचा किलबिलाट होता. दाट जंगलातून जाताना पानांची सळसळ होती. झाडांच्या फांदया अक्षरश: आमच्या अंगाखांदयाला लागत होत्या. हत्तीवर असल्याने कोणत्याही वन्यप्राण्यापासून आम्हाला धोका नव्हता. दिवस कसा संपला हे कळलेही नाही. जंगलातील अनुभवांचे गाठोडे घेऊन आम्ही परतलो.
   प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :   
    कृती १ : आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   एका वाक्यात उत्तरे लिहा. 
   (i) लेखकाला ओलसर चिखलात काय दिसले?   
   उत्तरः   
   लेखकाला ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली.
   (ii) लेखक कशासाठी अधीर होता?   
   उत्तर:   
   लेखक वाघिणीची पिल्ले बघण्यासाठी अधीर होता.
   (iii) लेखकाचे हृदय केव्हां धडधडू लागले?   
   उत्तर:   
   पाणवठा जवळ आला तसे लेखकाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले.
   (iv) वाघीण कोठे लपली असावी असे लेखकाला वाटते?   
   उत्तरः   
   वाघीण जांभळीच्या झुडपात लपली असावी असे लेखकाला वाटते.
   प्रश्न 3.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) प्रचंड ………………………………….. दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. (थंडीचे, उष्णतेचे, पावसाचे, गरमीचे)   
   (ii) सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक दडपण आलं होतं. (अनामिक, सहज, भरभरून, दु:खाचे)   
   (iii) जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका ………………………………….. साचून होता. (पाचोळा, पालापाचोळा, पाला, कचरा)   
   उत्तर:   
   (i) उष्णतेचे   
   (ii) अनामिक   
   (iii) पाचोळा
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.   
   (i) लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात …………………………………..   
   (अ) उत्तम जनावर!   
   (आ) धोकादायक जनावर!   
   (इ) विश्वासू प्राणी!   
   (ई) घाबरट जनावर!   
   उत्तर:   
   लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर!
   (ii) आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच.   
   (अ) खूण करून सूचना केली.   
   (आ) सावध करून इशारा केला.   
   (इ) खूणवत संकेत केला.   
   (ई) इशारा करून सावध केला.   
   उत्तर:   
   आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली.
   प्रश्न 2.   
   चूक की बरोबर लिहा. 
   (i) लेखकांना वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती.   
   (ii) सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकांच्या मनावर एक अनामिक दडपण आलं नव्हतं.   
   उत्तर:   
   (i) बरोबर   
   (ii) चूक
   प्रश्न 3.   
   सहसंबंध लिहा.   
   (i) ओलसर : चिखल :: पानांची : …………………………………..   
   (ii) पिल्लांच्या : पाऊलखुणा :: वाघीणीचे : …………………………………..   
   उत्तर:   
   (i) सळसळ   
   (ii) गुरगुरणे.
कृती ३: स्वमत
   प्रश्न 1.   
   तुम्ही पाहिलेल्या सर्कशीमधील चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.   
   उत्तरः   
   आजही तो प्रसंग डोळ्यांसमोर जसाचा तसा आठवतो. ‘द ग्रेट रॉयल सर्कस’ चा अविस्मरणीय प्रसंग चित्तथरारक होता, सर्कशीची सुरुवात अतिशय शानदार झाली. एका पायावरच्या कसरती झाल्या. मग खास आकर्षण असणारा सिंह पिंजऱ्यात आणला गेला. पिंजऱ्यातून त्याला बाहेर काढले, मग रिंग मास्टर ने त्याला पेटलेल्या चक्रातून उडी मारण्याचा हुकूम दिला. सिंहाने ५ उड्या मारल्या, सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. रिंग मास्टरने देखील त्याला हंटर दाखवून पुन्हा पिंजऱ्यात जाण्याचा आदेश दिला. आता मात्र सिंहाने तो आदेश साफ नाकारला. तो तेथूनच रिंगणातून पळत सुटून प्रेक्षकांच्या दिशेने धावत गेला. एकच हाहा:कार माजला. सगळे लोक गडबडले. किंचाळ्या आणि आक्रोशांनी परिसर गंभीर झाला. लोक इतस्तत: धावू लागले. चेंगराचेंगरीत अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. सिंह येऊन आपल्याला खाणार या भीतीने मृत्यूच डोळ्यांपुढे दिसू लागला. सर्कशीतील कलाकारांची तारांबळ उडाली. अनेक खुर्ध्या तुटल्या. सर्कशीच्या तंबूलाही आग लागली. जो तो जीव घेऊन पळत सुटला. अनेकांच्या प्रयत्नांनी परिस्थिती आटोक्यात आली.
   प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.   
   कृती १ : आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 
   (i) वाघीण कशाबद्दल दक्ष असते?   
   उत्तर:   
   वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष असते.
   (ii) पिल्लांना कां उधाण आले होते?   
   उत्तर:   
   आईला पाहून पिल्लांना उधाण आले होते.
   (iii) वाघिणीने शिकारीला जाण्यापूर्वी पिल्लांना कोठे लपवले होते?   
   उत्तर:   
   शिकारीला जाण्यापूर्वी वाघिणीने पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपविले होते.
   (iv) लेखकाच्या अंगावर काटा आला व तो जागीच का थबकला?   
   उत्तरेः   
   ‘ऑऽव्हऽऽ!’ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या बारीक आवाजानं लेखकाच्या अंगावर काटा आला व तो जागीच थबकला.
   (v) बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात कोणी उडी मारली?   
   उत्तर:   
   वाघिणीच्या एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी मारली.
   प्रश्न 3.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) ………………………………….. पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. (सिंहीण, वाघीण, हरीण, कोल्हीण)   
   (ii) ………………………………….. च्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. (आई, वाघीणी, पिल्लां, लेखका)   
   उत्तर:   
   (i) वाघीण   
   (ii) आई
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   योग्य पर्याय निवडा. 
   (i) वाघीण विश्रांती घेत होती, कारण …………………………………..   
   (अ) पिल्लांचा जबरदस्त दंगाधोपा चालू होता   
   (आ) रात्रभरच्या वाटचालीनं ती थकली होती.   
   (इ) पिल्लांच्या सुरक्षिततेबद्दल दक्ष होती.   
   (ई) तीनही पिल्लं पाण्यात उतरली होती.   
   उत्तरः   
   वाघीण विश्रांती घेत होती, कारण रात्रभरच्या वाटचालीनं ती थकली होती.
   प्रश्न 2.   
   घटनेनुसार वाक्यांचा क्रम लावा.   
   (i) एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली.   
   (ii) अचानक पाण्यात धपकन’ काहीतरी पडल्याचा आवाज आला.   
   (iii) लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली.   
   (iv) मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो.   
   उत्तरः   
   (i) अचानक पाण्यात धपकन’ काहीतरी पडल्याचा आवाज आला.   
   (ii) मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो.   
   (iii) एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेड पाण्यात उडी घेतली होती.   
   (iv) लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली.
   प्रश्न 3.   
   चूक की बरोबर लिहा.   
   (i) वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती.   
   (ii) पिल्लांच्या उत्साहाला लेखक बघताच उधाण आलं होतं.   
   उत्तर:   
   (i) बरोबर   
   (ii) चूक
कृती ३: स्वमत.
   प्रश्न 1.   
   ‘भारताचा राष्ट्रीय पशू-वाघ’ याबद्दल तुम्हांला असलेली माहिती तुमच्या शब्दांत मांडा.   
   उत्तरः   
   वाघ हा जंगलात राहणारा मांसाहारी सस्तन पशू आहे. हा भूतान, नेपाळ, भारत, कोरिया, अफगाणिस्तान व इंडोनेशिया मध्ये जास्त संख्येने आढळतो. लाल, पिवळ्या पट्ट्यांचे याचे शरीर असून पायाकडचा भाग पांढरा असतो. त्याचे वैज्ञानिक नाव ‘पॅथेरा टिग्रिस’ आहे. संस्कृत मध्ये ‘व्याघ्र’ असे संबोधले जाते. दाट वनांत, दलदलीच्या भागात रहाणारा हा प्राणी आहे. सांबर, चित्ता, म्हैस, हरणे यांची तो झडप घालून शिकार करतो. वाघीण साडेतीन महिन्यानंतर साधारणत: दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. ही पिल्ले शिकार करण्याची कला आपल्या आईकडून म्हणजे वाघिणीकडून शिकतात. साधारणपणे १९ वर्षांचे आयुर्मान यांना लाभलेले असते. असा हा ‘वाघ’ आपल्या भारताचा राष्ट्रीय पशू आहे.
   प्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,   
   कृती १ : आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   आकृतीबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 
   (i) वाघिण पिल्लांना कोठे घेऊन जात होती?   
   उत्तर:   
   वाघिण पिल्लांना शिकारीकडे घेऊन जात होती.
   (ii) वाघिणीने पिल्लांना कोणता इशारा केला?   
   उत्तर:   
   वाघिणीने पिल्लांना ‘ऑऽव’ आवाज करून मागे येण्याबद्दल इशारा केला.
   प्रश्न 3.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) आई वळून एखादया पिल्लाला ………………………………….. चाटत होती. (ममतेने, प्रेमाने, आपुलकीने, मायेने)   
   (ii) वाघिणीनं ………………………………….. पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. (नाला, ओढा, नदी, ओहोळ)   
   (iii) ………………………………….. मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. (चारच, पाचच, एकच, दोनच)   
   उत्तर:   
   (i) मायेने   
   (ii) नाला   
   (iii) दोनच
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   एका शब्दात चौकटी पूर्ण करा,   
   (i) दोनच मिनिटांत वाघीण येथे गेली दिसेनाशी झाली.   
   (ii) लेखकाच्या यात मोलाची भर पडली.   
   उत्तर:   
   (i) जंगलात   
   (ii) व्याघ्रअनुभवात.
   प्रश्न 2.   
   परिच्छेदात आलेल्या वन्यप्राण्यांची नावे लिहा.   
   उत्तर:   
   सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्कर, वाघीण
   प्रश्न 3.   
   ओघतक्ता योग्यक्रमाने पूर्ण करा.   
   
   प्रश्न 4.   
   चूक की बरोबर लिहा.   
   (i) वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला.   
   (ii) लेखकांच्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव नव्हता.   
   उत्तर:   
   (i) बरोबर   
   (ii) चूक
(स्वाध्याय कृती)
   प्रश्न 1.   
   (i) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, या विषयावर तुमचे मत लिहा.   
   उत्तर:   
   डायरी म्हणजे दैनंदिनी. रोज आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्या ठळक गोष्टी करतो याची नोंद ठेवणे केव्हाही उपयुक्त. डायरी लिहिण्याने दिवसभराचा गोषवारा हाती येतो. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद केली जाते. आजपर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी डायरीचा उपयोग होतो. चांगल्या गोष्टींच्या नोंदीने पुन्हापुन्हा त्या वाचताना मनाला समाधान वाटते, प्रेरणा मिळते. काही प्रेक्षणीय स्थळे बघितल्यास त्याचीपण नोंद करावी. त्यामुळे विपुल माहिती जमा करता येते. डायरीतील प्रत्येक पान म्हणजे त्या दिवसाचा आरसा असतो. स्थळे, प्रदर्शने, उद्घाटने, करावयाची कामे इ. नोंद आवश्यक असते. त्याची पडताळणी घेऊन आपल्याच कामावर आपण लक्ष ठेवू शकतो. कितीतरी उपयुक्त माहिती भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरते. स्वत:वर शिस्त, नियंत्रण व सच्चेपणा राखण्यासाठी डायरी लिहिण्याचा छंद प्रत्येकाने जोपासावा असे माझे मत आहे.
जंगल डायरी Summary in Marathi
जंगल डायरी पाठपरिचय 
‘जंगल डायरी’ हा पाठ लेखक ’अतुल धामनकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात ताडोबा अभयारण्यात सफर करताना आलेले अनुभव रोमहर्षक पद्धतीने मांडले आहेत. त्याचबरोबर वाघिणीमध्ये दडलेल्या ’आईचे’ रोमहर्षक वर्णन केलेले आहे.
जंगल डायरी Summary in English
“Jungle Diary’ is written by Atul Dhamankar. Thrilling experiences are mentioned, of a jungle safari at Tadoba Sanctuary. The motherhood of a tigress is beautifully depicted in this lesson.
जंगल डायरी शब्दार्थ 
- विश्रामगृह – आरामालय – (guest house) 
- थबकणे – थांबणे – (pause) 
- चारही बाजूंना – चारही दिशांना – (in all directions) 
- कोपरा – आडोसा – (corner) 
- अदयाप – अजूनही – (till now) 
- वाळकी – सुकलेली – (dried) 
- काटकी – वाळक्या काटक्या – (twings) 
- अदृश्य – दिसेनासा – (disappear) 
- वन्यप्राणी – रानटी प्राणी – (wild animals)
- हळहळणे – वाईट वाटणे – (to feel bad)
- शरमिंदा – लाजणे – (awkward) 
- दाट – गर्द – (dense) 
- सावध – दक्ष – (careful) 
- अनामिक – नाव नसलेले – (unknown) 
- ओलसर ओला – (damp) 
- परिसर – आजुबाजूची जागा – (surrounding) 
- पानगळ – पानझड – (fall) 
- वाळका पाचोळा – सुकलेली पाने – (dry leaves) 
- कसरत – कठीण बाब – (difficult task) 
- चौकस – जिज्ञासू, – (inquisitive), काळजीपूर्वक – (careful) 
- खूण – इशारा – (a sign) 
- दडपण – ताण – (pressure) 
- पाणवठा – पाण्याची जागा – (reservoiour) 
- आश्वासक – पाठींबा देणारा – (supportive) 
- विरळ – संख्येने कमी – (rare) 
- संभाव्य – अपेक्षित – (expected) 
- खबरदारी – काळजी – (precaution)
- आवश्यक – जरुरी – (necessary)
- राबता – ये जा – (movements)
- भलतीच – खुप – (too much)
- दडून बसणे – लपून बसणे – (to hide)
- विश्रांती – आराम – (to take rest)
- गुरगुरणे – वाघाचा आवाज – (roaring)
- मायेने – प्रेमाने – (with love)
- घटकाभर – थोडावेळ – (for a while)
- झलक – रूप – (glimpse)
- व्याघ्र – वाध – (tiger) 
जंगल डायरी वाक्प्रचार
- हातची संधी गमावणे – हातचा मोका घालवणे,
- सरसरून काटा येणे – घाबरणे. 
- पारंगत असणे – तरबेज असणे. 
- दंग होणे – मग्न होणे. 
- उधाण येणे – उत्साह संचारणे. 
- आश्चर्याने थक्क होणे – नवल वाटणे.