Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा
Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा
Textbook Questions and Answers
कृती
1. अ. लेखकाने खालील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतीके लिहा.
प्रश्न 1.
उत्तर :
आ. वैशिष्ट्ये लिहा.
प्रश्न 1.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तर :
इ. योग्य जोड्या लावा.
प्रश्न 1.
उत्तर :
ई. लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (✓) अशीखूणकरा.
प्रश्न 1.
- लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.
- लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली.
- लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती.
- अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत.
- प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती.
- नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता.
- इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती.
उत्तर :
- लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.(✓)
- लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली. (✗)
- लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती. (✓)
- अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत. (✓)
- प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती. (✓)
- नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता. (✓)
- इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती. (✓)
2. वर्णनकरा.
प्रश्न अ.
वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंबप्रमुख.
उत्तर :
चित्रकलेच्या प्रदर्शनाला साधारणपणे सुशिक्षित व उच्चभ्रू वर्गातील लोक जास्त असतात. ग्रामीण भागातील लोक तर अशा प्रदर्शनांकडे सहसा फिरकत नाहीत. मात्र वाई येथे लेखकांनी भरवलेल्या स्वत:च्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला शेतकरी कुटुंबातील थोडीथोडकी नव्हेत, तर चक्क वीस-बावीस माणसे भेट देण्यासाठी आली होती. त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना हे प्रदर्शन दाखवण्यासाठी घेऊन आला होता.
त्या शेतकरी कुटुंबप्रमुखाचे वय सत्तरीच्या आसपास होते. पांढऱ्या मिशा, रंग काळाकभिन्न, डोक्याला खूप मोठे बांधलेले मुंडासे असा नखशिखान्त शेतकरी पण अंगावर वागवीत होता. असा हा कुटुंबप्रमुख सर्वांना व्यंगचित्र समजावून सांगत होता. तो एकेका चित्रासमोर उभा राही आणि त्याला समजलेला चित्राचा अर्थ स्वत:च्या माणसांना समजावून सांगे. मुलानातवंडापासून लहानथोर सोबत आलेले ते कुटुंबीय आपल्या प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली चित्रांचा आस्वाद घेत होती. हे दृश्यच विलक्षण व दुर्मीळ होते. लेखकांच्या मनातली चित्र काढण्यामागील कल्पना आणि त्या कुटुंबप्रमुखाला जाणवलेला अर्थ यांतली तफावत लेखक समजावून घेत होते. फार मोठे अनौपचारिक शिक्षण लेखकांना या प्रसंगातून मिळत होते.
प्रश्न आ.
स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर
उत्तर :
लेखक एका कार्यक्रमाला गेले होते. पाहुणे म्हणून त्यांना पुष्पगुच्छ व नारळ दिला गेला. तो नारळ टेबलावर ठेवला. लेखक त्या नारळाचे निरीक्षण करीत बसले. त्या नारळात त्यांना चिमुरड्या मुलीचे डोके भासले. त्यांना नारळावरून, देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. हा प्रसंग आठवला. एवढ्या तपशिलाच्या आधारे त्यांनी स्त्रीभ्रूणहत्येविरुद्धचे पोस्टर तयार केले. एक पुरुषी हात. त्या हातात नारळ, नारळात मुलीचे रूप भासावे म्हणून बारीकसा कानातला डूल दाखवला. तो हात वरून खाली या दिशेने येत दगडावर नारळ फोडणार होता. तेवढ्यात एका तरुण हाताने तो पुरुषी हात अडवला. चिमुरड्या मुलींची, भ्रूणाची हत्या होऊ न देण्याचा निर्धार त्या चित्रातून व्यक्त झाला.
प्रश्न इ.
लेखकांनी रेखाटलेले आईचे काव्यात्म चित्र.
उत्तर :
लेखकांनी आईचे, आईच्या प्रेममय हृदयाचे अत्यंत हृदय चित्र रेखाटले आहे. चित्रातल्या परिसरात वैशाखातला वणवा पेटला आहे. त्यात एक सुकलेले झाड आहे. त्या झाडावर एकही पान नाही. अत्यंत भकास वातावरण आहे. तरीही त्या झाडावर एका पक्ष्याचे घरटे बांधले आहे. त्या घरट्यात चोच वासून आकाशाकडे व्याकुळपणे बघणारी तीनचार पिल्ले आहेत. अत्यंत हृदयद्रावक असे हे दृश्य आहे. त्या चित्रात वर दूरवर ठिपक्यासारखी दिसणारी पक्षीण पाण्याच्या ढगाला चोचीत धरून जिवाच्या आकांताने ओढीत घरट्याकडे नेत आहे. एवढ्या या एका कृतीतून त्या पक्षिणीची आपल्या पिल्लांना वाचवण्याची चाललेली जिवापाड धडपड प्रभावीपणे व्यक्त होते. आईची अपार माया या चित्रातून दिसून येते.
3. व्याकरण.
अ. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
प्रश्न 1.
या चित्रांचे स्रोत मला सापडतात.
उत्तर :
कर्तरी प्रयोग.
प्रश्न 2.
हा संदेश मला पोहोचवता आला.
उत्तर :
कर्मणी प्रयोग.
प्रश्न 3.
त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारुन दाखवली.
उत्तर :
कर्मणी प्रयोग.
प्रश्न 4.
मार्गदर्शन संपवून चहा मागवला.
उत्तर :
कर्मणी प्रयोग.
आ. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.
प्रश्न 1.
उत्तर :
इ. समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा
प्रश्न 1.
उत्तर :
ई. कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
(विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगू समास, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समा, समाहार द्वंद्व समास)
प्रश्न 1.
- चहापाणी – …………………. .
- सद्गुर – …………………. .
- सुईदोरा – …………………. .
- चौघडी – …………………. .
- कमीअधिक – …………………. .
- जलदुर्ग – …………………. .
उत्तर :
- चहापाणी – समाहार द्वंद्व समास
- सद्गुरू – कर्मधारय समास
- सुईदोरा – इतरेतर द्वंद्व समास
- चौघडी – द्विगु समास
- कमीअधिक – वैकल्पिक द्वंद्व समास
- जलदुर्ग – विभक्ती तत्पुरुष समास.
4. स्वमत.
प्रश्न अ.
‘एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते’, या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत अाहात ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
भाषा आणि व्यंगचित्र ही दोन भिन्न माध्यमे आहेत. त्यांचे सादरीकरण भिन्न असते आणि त्यांचे परिणामही भिन्न असतात. आपण घर हा शब्द लिहितो, तेव्हा घर या शब्दाचा आकार पाहून किंवा घर या शब्दाच्या उच्चारातून जो ध्वनी निर्माण होतो, तो ध्वनी ऐकून घराचा बोध होऊ शकणार नाही. फक्त मराठी भाषा समजणाऱ्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. घर शब्दाच्या आकाराशी व उच्चाराशी घर ही वस्तू जोडलेली आहे.
ज्याला हा संकेत माहीत आहे आणि ज्याने तो संकेत लक्षात ठेवला आहे, त्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. याउलट, घराचे चित्र दाखवल्यावर ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या चित्रातून व्यक्त होणाऱ्या वस्तूचा बोध होतो. तिथे भाषेची आडकाठी येत नाही. देशाच्या सीमा आड येत नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक दर्जाचा संबंध येत नाही. चित्रातून आशयाचे थेट आकलन होते. म्हणून भाषेपेक्षा चित्र आशयाला प्रेक्षकांपर्यंत पटकन व थेट पोहोचवते.
चित्र व व्यंगचित्र यांत काहीएक फरक आहे. व्यंगचित्रात काही व्यक्ती दाखवलेल्या असतात. व्यंगचित्रकार कधीही विषयवस्तूचे फक्त वर्णन करीत नाही. त्याला माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर काहीएक भाष्य करायचे आहे. त्या वृत्ती-प्रवृत्ती ठळकपणे लक्षात याव्यात म्हणून माणसांचे चेहेरे, त्यांवरचे हावभाव, त्यांच्या हालचाली यांतील काही रेषा मुद्दाम ठळकपणे चितारतो. त्यामुळे चित्र हे व्यंगचित्र बनते. व्यंगचित्रातून माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर केलेली टीका कोणालाही पटकन कळू शकते. तोच भाव समजावून सांगण्यासाठी खूप शब्द वापरावे लागतात. खूप शब्द वापरूनही सर्व आशय नेमकेपणाने व्यक्त होतोच असे नाही. व्यंगचित्राच्या बाबतीत असे घडत नाही. तेथे आशय स्पष्टपणे लक्षात येतो.
व्यंगचित्रात चालू घडामोडींवर भाष्य असते. व्यंगचित्र पाहणारा प्रेक्षक चालू घडामोडींचा साक्षीदारही असतो. म्हणून त्याला व्यंगचित्र पटकन कळू शकते.
प्रश्न आ.
‘वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते,’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर :
कलावंतांविषयी, कलेविषयी सर्वच समाजात विलक्षण कुतूहल असते. व्यंगचित्रकार हाही एक कलावंतच असतो. व्यंगचित्रकाराची व्यंगचित्र दररोज प्राधान्याने वर्तमानपत्रांतून लोकांसमोर येत असतात. दररोज त्याची लोकांशी गाठभेट होत असते. वर्तमानपत्र वाचणारा प्रत्येक वाचक व्यंगचित्र पाहतोच पाहतो. व्यंगचित्र पाहताच त्या वाचकाला त्याचे मर्म खाडकन जाणवते. ते मर्म क्षणार्धात त्याच्या मनात शिरते. चेहेऱ्यावर स्मित तरळते. त्याच क्षणी तो वाचक व्यंगचित्रकाराला मनोमन दाद देतो. किती सुंदर कल्पना आहे ही! कशी सुचली असेल या व्यंगचित्रकाराला? आपल्यासारखाच हा माणूस. हातपाय, नाक, कान, डोळे हे सर्व अवयव आपल्यासारखेच. यांना कशी काय सुचते हे व्यंगचित्र?
लोकांच्या मनातील या प्रश्नालाच मंगेश तेंडुलकर यांनी प्रस्तुत पाठात दोन वाक्यात उत्तर दिले आहे. ‘वाहत्या आयुष्यात सावधगिरीने उभे राहिले, तर व्यंगचित्राची कल्पना आपल्या जवळूनच जाताना नजरेस पडेल. तिथून ती उचलायची आणि कागदावर उतरवायची.’ त्यांनी अत्यंत सोप्या शब्दांत उत्तर दिले आहे. व्यंगचित्रकार कमीत कमी रेषांमध्ये आपला आशय व्यक्त करतो. तसेच इथे लेखकांनी कमीत कमी शब्दांत आशय व्यक्त केला आहे. वाहत्या आयुष्यात म्हणजे दैनंदिन जीवन जगत असतानाच. त्याच जीवनाचे निरीक्षण केले असता, आपण जगत असलेल्या प्रसंगातच व्यंगचित्राची कल्पना सापडते. या कल्पनेसाठी रानावनात जाऊन वेगळी तपश्चर्या करावी लागत नाही.
मग काय करावे लागते? तर आपल्या जगण्याचेच तटस्थपणाने, त्रयस्थासारखे निरीक्षण करावे लागते. लेखकांनी यासाठीच ‘सावधगिरीने’ हा शब्द वापरला आहे. सावधगिरीने याचा अर्थ समजून घ्यायला हवा. आपण आपल्या दैनंदिन जीवनात साधारणपणे आपल्या अनुभवांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांत पूर्णपणे बुडून जातो. त्यामुळे आपल्या अनुभवाचे मर्म आपल्या ध्यानात येत नाही. म्हणून काही क्षण तरी आपल्या अनुभवांकडे रेंगाळून पाहिले पाहिजे.
जो विचार आपल्याला उत्कटपणे सांगावासा वाटतो, त्याला साजेसा प्रसंग आपल्याला दिसतो, असे लेखकांना सुचवायचे आहे. एकदा कल्पना सुचली की चित्र काढणे सोपे असते. खरे सर्वच कलांच्या बाबतीत हे पूर्णपणे खरे आहे. लेखकांनी खूप गूढ अशा प्रश्नाला साध्या, सोप्या शब्दांत उत्तर दिले आहे.
प्रश्न इ.
लेखकांनी व्यंगचित्रांतून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
लेखक मंगेश तेंडुलकर हे अत्यंत मनस्वी वृत्तीचे होते. ते जे काही करायला घेत त्यावर ते उत्कटपणे प्रेम करीत. ते अत्यंत करारी होते. ते ऐहिक सुखसमृद्धीच्या मागे धावले नाहीत. कोणासमोर हात पसरले नाहीत. या सगळ्या गुणांची देणगी लेखकांना मिळाली. आयुष्यात अनेक संकटे आली, वावटळी आल्या. पण त्यांना तोंड देऊन लेखक भक्कमपणे स्वत:च्या पायावर उभे राहिले. हे ते करू शकले कारण त्यांना वडिलांकडून मिळालेला नैतिक वारसा. त्या बळावर आयुष्यात तग धरून राहिले. कोलमडले नाहीत. आपल्याला मिळालेल्या या वारशाबद्दल स्वत:च्या मनात लेखकांना अपार कृतज्ञता वाटत होती. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वडिलांना व्यंगचित्र मधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली.
ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी दोन चित्रे काढली. एका चित्रात लेखकांचे बालरूप आहे. बालरूपातले लेखक भर पावसात उभे आहेत. त्यांच्या डोक्यावर ‘बाबा’ ही दोन अक्षरे आहेत. ‘बाबा’ या शब्दाच्या दोन्ही बाजूंनी पाऊस पडत आहे. खाली इवलासा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे. बाबा या शब्दांनी, म्हणजे बाबांनी त्यांचे रक्षण केले.
दुसऱ्या चित्रात लेखक सरत्या वयातले, वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षातले, उभे आहेत. भर पावसात उभे आहेत. डोक्यावर बाबा हा शब्द नाही. तरीही पाऊस लेखकांना न भिजवता त्यांच्या बाजूने पडत आहे. ते आता पंच्याहत्तराव्या वर्षीही सुरक्षित आहेत. बाबांकडून मिळालेला नैतिक वारसा त्यांच्या मृत्यूनंतर लेखकांना खूप मोठा आधार, आश्रय देत आला आहे. वडिलांबद्दलची ही कृतज्ञता लेखक या व्यंगचित्रातून व्यक्त करू पाहतात. स्वत:च्या पित्याला इतकी उत्कट श्रद्धांजली क्वचितच कोणीतरी वाहिली असेल.
5. अभिव्यक्ती.
प्रश्न अ.
‘स्त्रीभ्रूणहत्या एक अपराध’ याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
आपला देश अंधश्रद्धेच्या मगरमिठीत पूर्णपणे अडकलेला आहे. मागासलेल्या विचारांच्या दलदलीत बुडालेला आहे. यामुळे समाजात सामाजिक – सांस्कृतिक दुर्गुण निर्माण झाले आहेत. अत्यंत दुष्ट, अन्यायकारक रूढी-परंपरा निर्माण झाल्या आहेत. या रूढींच्या बरोबरीने समाजाच्या मनात घातक व अन्यायकारक विचार रुजत चालले आहे. त्यांपैकी एक आहे – स्त्री पुरुष समानता. समाजमनात स्त्री ही कनिष्ठ व पुरुष हा श्रेष्ठ अशी धारणा निर्माण झाली आहे.
मुलगा हा कुलदीपक व मुलगी परक्याची धनसंपदा, अशी समजूत. मुलगी घरात जन्मणे हे अशुभ. आपल्या हातून पाप घडले असेल तरच आपल्या पोटी मुलगी जन्माला येते, यामुळे घरात मुलगा जन्माला यावा यासाठी लोक धडपड करतात. उपासतापास करतात. लोक मुलगी होणार असेल, तर तिला जन्म होण्याच्या आधीच मारतात. हे सर्रास होत होते. अनेक डॉक्टर यात सामील होते. याविरुद्ध आता कडक कायदे झालेले आहेत. तरीही अधूनमधून हे कृत्य घडताना दिसते.
खरे तर मुलगी जन्मण्याच्या आधीच तिला मारणे, हा खूनच होय. हा एका व्यक्तीचा खून या अर्थाने ही भीषणच घटना आहे. पण हे व्यक्तीच्या मृत्यूपुरते थांबत नाही. यामुळे संपूर्ण मानव जातच धोक्यात येऊ शकते. लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण जास्त आणि स्त्रियांचे प्रमाण कमी या वास्तवामुळे फार मोठे सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत. या प्रश्नांच्या आगीत संपूर्ण समाज होरपळून जाण्याची शक्यता आहे.
या वस्तुस्थितीकडे जरा नीट पाहिले, तिच्यातली विपरीतता स्पष्ट होईल. स्त्रियांची संख्या समाजात सामान्यत: निम्मी असते. आपला अर्धा समाज अन्यायग्रस्त राहिला तर त्याची प्रगती होणार तरी कशी?
स्त्रीभ्रूणहत्येच्या समस्येवर ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा?’ या नावाचे नाटकही येऊन गेले आहे. समाजाचा एक भाग या समस्येची भीषणता ओळखून आहे. पण ज्याला कळलेच नाही, असा समाजाचा जो भाग आहे तो खूप मोठा आहे. हा समाजगट कितीही मोठा असला, तरी सुज्ञ लोकांनी याविरुद्ध लढले पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या हा खूनच होय. आणि अशी कृत्ये करणारी माणसे खुनी होत, असेच समाजाने मानले पाहिजे. तरच या भीषण रूढीला आळा बसेल.
प्रश्न आ.
‘आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे,’ या वाक्यातील आशयसौंदर्य उलगडून दाखवा.
उत्तर :
रवींद्रनाथांची एक कथा आहे. एका आईचे आपल्या मुलावर अतोनात प्रेम होते. तिने त्याला कष्टपूर्वक वाढवले. एकदा त्याला देवाचा साक्षात्कार झाला. देवाने त्याला वर दिला, “बाळा काय हवे ते माग.” त्याने देवाकडे अमरत्व मागितले. देवाने ही मागणी मान्य केली, पण त्याने एक अट घातली. “मला तू तुझ्या आईचे हृदय आणून दे.”
बाळाला खात्री होती की आई आपल्याला तिचे हृदय देणारच. तिचे त्याच्यावर अपार प्रेम होते. मुलाने आईकडे येऊन हृदयाची मागणी केली. आईचे हृदय घेतले. आई मरून पडली. मुलगा धावत धावत देवाकडे निघाला. वाटेत त्याला ठेच लागली. त्याच्या हातातले हृदय जमिनीवर पडले. मुलगा हृदय उचलायला धावला तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द आले, “बाळा, तुला काही लागलं नाही ना?”
ही कथा काल्पनिक आहे, यात शंका नाही. पण या कथेतून आईचे अपार ममत्व, त्यातील उदात्तता, त्यातील शुद्धता, मुलाबाबतची ओढ हे सारे विलक्षण नजाकतीने व्यक्त झाले आहे. आई आपल्या बाळाला नऊ महिने आपल्या कुशीत सांभाळते. तो निव्वळ गोळा असतो, तेव्हा ती स्वत:चे रक्त देऊन त्याचे पालनपोषण करते. खरे तर आपल्याला जसे हात, पाय इत्यादी आपले अवयव असतात, तसाच कोणताही बाळ त्याच्या आईला स्वत:च्या देहाचाच भाग वाटत असतो.
त्यामुळे तिच्या आयुष्यातली सगळी शुद्धता, सगळे पावित्र्य त्या नात्यात एकवटलेले असते. बाळाची भूक प्रथम आईला लागते. बाळाला जरा कुठे काही लागले, तर त्याची कळ आईच्या हृदयात प्रथम उमटते. नीट बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की, बाळाच्या वाटचालीकडे, त्याच्या शिक्षणाकडे, त्याच्या प्रकृतीकडे आईचे पूर्ण लक्ष असते. त्याच्या विकासाबाबत ती आत्यंतिक संवेदनशील असते. आईचे प्रेम शुद्ध, पवित्र असते, याचे कारण ती आपल्या बाळासाठी जे काही करते, त्याबदल्यात बाळाकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. म्हणून जगभरात, सर्व मानवी समाजात आई-मूल हे नाते सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे.
उपक्रम :
अ. तुमच्या शाळेतील/महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात ‘व्यंगचित्रांतून सामाजिक प्रबोधन’ या विषयावर चित्रप्रदर्शनाचे आयोजन करा.
आ. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ।’ यासारखी स्त्री शिक्षणाशी संबंधित पाच घोषवाक्ये तयार करा.
खाली दिलेल्या मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्राचे निरीक्षण करा. या चित्रातून व्यंगचित्रकाराला काय सुचवायचे असेल असे तुम्हांला वाटते. ते तुमच्या शब्दांत लिहा.
प्रश्न 1.
उत्तर :
कुल्हाड हे दहशत, दडपशाही, हिंसा यांचे प्रतीक आहे. मुलगी हे शांतताप्रेमींचे प्रतीक आहे. पाणी शिंपणे हे शांततेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. कु-हाडीवरील रोपटे हे शांततेचे, प्रेमाचे प्रतीक आहे. हिंसेला हिंसेने उत्तर देऊन हिंसा कधीच संपत नाही. हिंसाचारी माणसांचे मन प्रेमानेच बदलता येते. शांतता, प्रेम निर्माण करण्याचा तोच एक मार्ग आहे.
लेखकांनी पुढील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतीके लिहा :
प्रश्न 1.
पाठातील गोष्टी – प्रतीके
1. नारळ घेतलेला हात – [ ]
2. जवळून जाणारी व्यंगचित्राची कल्पना – [ ]
उत्तर :
1. नारळ घेतलेला हात : रूढीग्रस्त पुरुष
2. जवळून जाणारी व्यंगचित्राची कल्पना : जवळून जाणारे मासे
जोड्या लावा :
प्रश्न 1.
उत्तर :
कृती करा :
प्रश्न 1.
लेखकांनी नोंदवलेल्या व्यंगचित्र सुचण्याच्या दोन प्रक्रिया सांगा.
प्रश्न 1.
लेखकांनी नोंदवलेल्या व्यंगचित्र सुचण्याच्या दोन प्रक्रिया सांगा.
उत्तर :
1. जवळून जात असलेली एखादी व्यंगचित्राची कल्पना तिथून उचलली जाते आणि कागदावर उतरवली जाते.
2. आधी एखादी कल्पना मनात निश्चित करून चित्र रेखाटता रेखाटता कधीतरी अचानकपणे आपली मनातील सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन येते.
लेखकांना लागू पडणाऱ्या व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (✓) अशी खूण करा आणि लागू न पडणाऱ्या व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (✗) अशी खूण करा :
प्रश्न 1.
वाईच्या व्यंगचित्र प्रदर्शनात लेखकांना मोलाचे शिक्षण मिळाले. ( )
उत्तर :
वाईच्या व्यंगचित्र प्रदर्शनात लेखकांना मोलाचे शिक्षण मिळाले. (✓)
कारणे लिहा :
प्रश्न 1.
- ‘दीपावली’त स्वत:ची चित्रे प्रसिद्ध व्हावीत असे लेखकांना वाटत होते; कारण –
- लेखक खोटे बोलले, हे दीनानाथांना कळले होते, पण ते त्या वेळी काहीही बोलले नाहीत; कारण –
- दीनानाथांना लेखकांचे स्पष्टीकरण आवडले; कारण –
उत्तर :
- ‘दीपावली त स्वत:ची चित्रे प्रसिद्ध व्हावीत असे लेखकांना वाटत होते; कारण दीपावली हे मासिक दर्जेदार असल्याने त्यात आपली चित्रे प्रसिद्ध झाली; तर आपल्याला मान्यता मिळेल, असे लेखकांना वाटत होते.
- लेखक खोटे बोलले, हे दीनानाथांना कळले होते, पण ते त्या वेळी काहीही बोलले नाहीत; कारण लेखक कधी कबूल करतात, हे त्यांना पाहायचे होते.
- दीनानाथांना लेखकांचे स्पष्टीकरण आवडले; कारण लेखकांसारखी माणसे क्वचितच आढळतात.
रंगरेषा व्यंगरेषा Summary in Marathi
पाठ परिचय :
- व्यंगचित्रांसाठी विषय मिळण्यात लेखकांना कधीही अडचण आली नाही. त्यांना खोलवर विचार करण्याची सवय होती. या विचार करण्याच्या वाटेवर त्यांना व्यंगचित्रांचे विषय मिळत असत.
- लेखक अनेक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत. अशा कार्यक्रमांतील घडामोडींमधून व्यंगचित्रांसाठी त्यांना विषय मिळत. उदा., स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे पोस्टर.
- व्यंगचित्रांचे विषय आपल्या अवतीभवतीच असतात. जवळून जात-येत असतात. त्यांनाच अलगद उचलायचे आणि कागदावर चितारायचे.
- व्यंगचित्र ही नि:शब्द भाषा असते. अंत:करणातील खोलवरचे भाव व्यंगचित्रातून उत्तम रितीने व्यक्त होऊ शकतात, ही त्यांची ठाम धारणा होती, आपले हे मत त्यांनी आपल्या चित्रांतून समर्थपणे व्यक्त केले. उदा., आईवरील चित्र आणि बाबांना श्रद्धांजली वाहणारे चित्र.
- देशविदेशात 80 हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शने भरवली.
- व्यंगचित्र म्हणजे एक छान भाषाच होय, हा संदेश देण्यासाठी त्यांनी प्रदर्शने भरवली.
- वाईच्या प्रदर्शनात एक प्रेक्षक शेतकरी आपल्या कुटुंबीयांना चित्रे समजावून देत होता. चित्र निर्माण करण्याचा आपला हेतू आणि
- चित्राचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम यातून आपल्या चित्रांचे यशापयश समजून घेण्यातून चित्रकलेचे फार मोठे शिक्षण लेखकांना मिळाले.
- प्रारंभीच्या काळात प्रसिद्धीसाठी धडपड करावी लागली. दीनानाथ दलालांनी संधी दिली. त्यांनी लेखकांची मुलाखत घेतली. लेखकांना व्यंगचित्रांचा नवीन ट्रेंड समजावून सांगितला. या भेटीतून खूप मोठा लाभ लेखकांना झाला. त्यांची चित्रेही दलालांनी स्वीकारली.
- दलालांनी चित्र काढण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. व्यंगचित्र कलेतील नवा प्रवाह समजावून सांगितला. चित्राचा ‘परस्पेक्टिव्ह’ समजावून सांगितला.
- दलालांशी झालेल्या बोलण्यात लेखकांनी विजय तेंडुलकर हे आपले बंधू आहेत, हे प्रथम नाकारले, नंतर स्वीकारले. विजय तेंडुलकरांच्या ओळखीमुळे आपली चित्रे स्वीकारली गेली, असे होऊ नये; आपल्या चित्रांच्या दर्जामुळे ती स्वीकारली जावीत, असा लेखकांचा आग्रह होता.
शब्दार्थ :
- स्रोत – उगमस्थान.
- प्रत्यंतर – अनुभव, पुरावा, खात्री.
- स्वारस्य – मनापासून असलेली, उत्कट इच्छा, नैसर्गिक आवड.
- कणसदृश्य – कणाएवढी.
- अपार – अमर्याद (पार = काठ, बांध. बांध नसलेला, अमर्याद पसरलेला.)
- इझेल – लिहिण्याचा फळा अडकवण्याचे साधन, घोडा.
- परस्पेक्टिव्ह – विशिष्ट कोनातून पाहिल्यास नजरेस पडणारे दृश्यरूप.
वाक्प्रचार व त्याचा अर्थ
हात देणे – मदत करणे.