Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
(अ) कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा.
(i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [          ]
(ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [          ]
उत्तरः

(i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [फुलाफुलांचे ताटवे]
(ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [सृषृ]

प्रश्न 3.
कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
(i) आभाळाचे छत्र ……………………………………
(ii) गर्भरेशमी सळसळ ……………………………………
उत्तरः

(i) आभाळाचे छत्र – पाण्याने भरलेल्या ढगांचे आच्छादन
(ii) गर्भरेशमी सळसळ – हिरव्या पानांची, हिरव्याशार गवताची वाऱ्यामुळे सळसळ.

प्रश्न 4.
कृती पूर्ण करा.

(अ) ‘कष्ट करणाऱ्यांना मदत करू’ या आशयाची ओळ शोधा.
उत्तरः

मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी.

(आ) ‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः

यंत्रांच्या संगतीने काय मिळणार आहे?

(इ) कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.
उत्तरः

सृष्टी-दृष्टी, वृष्टी-कष्टी, तुष्टी-गोष्टी.

प्रश्न 5.
काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’

(आ) पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.
उत्तरः

पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.

(इ) वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तरः

वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील.
(i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल.
(ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या.
(iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी.
(iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके,
(v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.

प्रश्न १.पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.

प्रश्न 2.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
(i) फुलाफुलांचे दाट …………………………………… जिथे पोचते दृष्टी. (थवे, गुच्छ, ताटवे, झुडपे)
(ii) …………………………………… देईना संगणक हा, काळी आई जगवू. (पैसे, दौलत, संपत्ती, धान्य)
(iii) उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील …………………………………… झाडे. (निलगिरी, आंब्याची, देशी, घनदाट)
(iv) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी …………………………………… (दृष्टी, तुष्टी, वृष्टी, पुष्टी)
उत्तर:

(i) ताटवे
(ii) धान्य
(iii) देशी
(iv) तुष्टी

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) कवी कोणाला पुष्टी क्यायला सांगतात?
उत्तर:

कवी मातीमध्ये काम करणाऱ्या हातांना पुष्टी दयायला सांगतात.

(ii) यंत्राबरोबर राहिल्यास काय मिळेल?
उत्तरः

यंत्राबरोबर राहिल्यास पैसा, दौलत मिळेल.

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.

(i) जिथे दृष्टी पोचते तेथे असतात – [फुलांचे ताटवे]
(ii) संगणक हे देत नाही – [धान्य]
(iii) जगास या गोष्टी सांगू – [गर्भरेशमी सळसळण्याच्या]

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.


उत्तरे:
(i- क),
(ii – अ),
(iii – ड),
(iv – ब)

प्रश्न 3.
काव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा.
(i) गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी . . .
(ii) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी . . .
(iii) फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
(iv) गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी . . .
उत्तर:

(i) गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी . . .
(ii) फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
(iii) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी . . .
(iv) गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी . . .

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) फूल
(ii) दाट
(iii) ताटवे
(iv) दृष्टी
उत्तरे:

(i) कुसूम, सुमन
(ii) गच्च
(iii) बगिचे, उद्यान
(iv) नजर

प्रश्न २. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:
अंजली कुलकर्णी

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
पर्यावरणाचे रक्षण केले तर मानवाला काही कमी पडणार नाही अशा भावनांचे वर्णन केले आहे.

(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ:
डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी
फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?

आभाळातून होणाऱ्या पावसाच्या वृष्टीमुळे डोंगरातून खळाळत पाणी वाहत येईल. डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे व त्यातून फेसाप्रमाणे उधळणाऱ्या पांढऱ्या तुषारांना पाहिल्यावर आपण आपली सारी दु:खे विसरून जाऊ व निसर्गाच्या सान्निध्यात खऱ्या अर्थाने आपण आनंदी होऊ, खळाळत्या पाण्याला पाहून आपल्याही मनात हास्याचे तुषार उधळले जातील व आपली सारी दुःखे राहणारच नाहीत, आपण कष्टी होणारी नाही? असे कवयित्री म्हणते.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः

निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे नाते हे अगदी घट्ट असेच आहे. निसर्गाच्या सहवासात माणूस अगदी आनंदी जगणे जगत असतो, पण आजच्या जागतिकीकरणाच्या या युगात संगणकामुळे आणि इतर वैज्ञानिक गोष्टींमुळे माणूस निसर्गापासून दूर होत चालला आहे. असे झाले तर माणसाला आपले अस्तित्व टिकवणे कठीण होऊन बसेल. पर्यावरणाची, निसर्गाची जोपसना केली तर मानवाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन आनंदमय करण्यासाठी निसर्गाच्या हातात हात घालून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे, असा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो.

(५) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण :

‘रंग मजेचे रंग उदयाचे’ ही ‘अंजली कुलकर्णी’ यांची कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कवयित्रीचे चित्रदर्शी वर्णन. त्यांच्या शब्दांमधून माणसाचा मातीशी, निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध मनापासून जाणवतो. पर्यावरणाची काळजी घेणे हे आपले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे याची सोप्या व योग्य शब्दात कवयित्रीने करून दिलेली जाणीव खूप छान आहे. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन कसे आनंदी होऊन जाते, त्याचे वर्णन अप्रतिम आहे.

(६) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थः
(i) जपणे – सांभाळणे
(ii) सृष्टी – निसर्ग, जग
(i) माती – मृदा
(ii) पुष्टी – पाठबळ, पाठिंबा

स्वाध्याय कती

प्रश्न 1.
पृथ्वीला वाचवण्यासाठी काय करावे असे कवयित्रीला वाटते?
उत्तरः

पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.

प्रश्न 2.
वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तरः

वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील.
(i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल.
(ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या.
(iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी.
(iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके,
(v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.

Summary in Marathi

रंग मजेचे रंग उदयाचे काव्यपरिचय‌
‘रंग‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌उदयाचे’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌’अंजली‌ ‌कुलकर्णी’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌जागतिकीकरणाच्या‌ ‌या‌ ‌काळात‌ ‌तंत्रज्ञानाशी‌ ‌मैत्री‌ ‌करणारा‌ ‌मानव‌ ‌निसर्गाकडे‌ ‌पाठ‌ ‌फिरवत‌ ‌आहे,‌ ‌पण‌ ‌निसर्गाचे,‌ ‌पर्यावरणाचे‌ ‌रक्षण‌ ‌करणे‌ ‌ही‌ ‌अतिमहत्त्वाची‌ ‌बाब‌ ‌आहे.‌ ‌पर्यावरणाची‌ ‌जोपासना‌ ‌केली‌ ‌तर‌ ‌माणसाला‌ ‌कधीच‌ ‌काही‌ ‌कमी‌ ‌पडणार‌ ‌नाही,‌ ‌असा‌ ‌विचार‌ ‌कवयित्रीने‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌मांडला‌ ‌आहे.‌

Summary in English

As‌ ‌a‌ ‌result‌ ‌of‌ ‌globalization,‌ ‌a‌ ‌human‌ ‌being‌ ‌appears‌ ‌to‌ ‌be‌ ‌more‌ ‌connected‌ ‌to‌ ‌technology‌ ‌rather‌ ‌than‌ ‌nature.‌ ‌The‌ ‌preservation‌ ‌of‌ ‌nature‌ ‌and‌ ‌environment‌ ‌should‌ ‌be‌ ‌the‌ ‌first‌ ‌priority‌ ‌of‌ ‌a‌ ‌human‌ ‌being.‌ ‌Only‌ ‌then‌ ‌can‌ ‌he‌ ‌live‌ ‌a‌ ‌satisfied‌ ‌life.‌ ‌The‌ ‌poetess‌ ‌has‌ ‌tried‌ ‌to‌ ‌elaborate‌ ‌on‌ ‌this‌ ‌understanding‌ ‌in‌ ‌her‌ ‌poem.‌

भावार्थ‌ ‌फुलाफुलांचे‌ ‌दाट‌ ‌ताटवे,‌ ‌जिथे‌ ‌पोचते‌ ‌दृष्टी‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उद्याचे‌ ‌जपून,‌ ‌ठेवू‌ ‌सृष्टी….‌

निसर्ग‌ ‌हा‌ ‌खरा‌ ‌जादूगार‌ ‌आहे.‌ ‌त्याच्या‌ ‌जादूई‌ ‌दुनियेमध्ये‌ ‌रंगा–गंधाचे‌ ‌साम्राज्य‌ ‌पसरले‌ ‌आहे.‌ ‌आभाळाची‌ ‌निळाई‌ ‌पाहत,‌ ‌पाण्याची‌ ‌खळखळ‌ ‌आणि‌ ‌वाऱ्याची‌ ‌अंगाई‌ ‌ऐकत‌ ‌धरतीच्या‌ ‌कुशीत‌ ‌फुलाफुलांचे‌ ‌म्हणजेच‌ ‌अनेक‌ ‌रंगाच्या‌ ‌फुलांचे‌ ‌बाग‌ ‌बगीचे‌ ‌आपण‌ ‌फुलवूया‌ ‌आणि‌ ‌हे‌ ‌बगीचे‌ ‌फक्त‌ ‌एका‌ ‌ठिकाणी‌ ‌फुलवायचे‌ ‌नाहीत‌ ‌तर‌ ‌कवयित्रीच्या‌ ‌मते‌ ‌जिथे‌ ‌जिथे‌ ‌नजर‌ ‌पोचते‌ ‌तेथे‌ ‌तेथे‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्याचे‌ ‌रंग,‌ ‌उद्याच्या‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌आपण‌ ‌फुलवूया‌ ‌म्हणजेच‌ ‌निसर्गाच्या‌ ‌रंगात‌ ‌आणि‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌राहून‌ ‌जो‌ ‌आनंद,‌ ‌जी‌ ‌मजा‌ ‌मिळणार‌ ‌आहे.‌ ‌अशी‌ ‌एक‌ ‌सुंदर‌ ‌सृष्टी‌ ‌आपण‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्यासाठी‌ ‌जपून‌ ‌ठेवूया.‌

धान्य‌ ‌देईना‌ ‌संगणक‌ ‌हा,‌ ‌काळी‌ ‌आई‌ ‌जगवू‌
‌मातीमध्ये‌ ‌जे‌ ‌हात‌ ‌राबती,‌ ‌तयांस‌ ‌देऊ‌ ‌पुष्टी….‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

कवयित्री‌ ‌म्हणते‌ ‌आजचे‌ ‌युग‌ ‌कितीही‌ ‌आधुनिक‌ ‌झाले,‌ ‌तंत्रज्ञान‌ ‌विकसित‌ ‌झाले‌ ‌तरी‌ ‌निसर्ग‌ ‌तुमचा‌ ‌खरा‌ ‌मित्र‌ ‌आहे.‌ ‌तुमचा‌ ‌पोषण–कर्ता‌ ‌आहे.‌ ‌कारण‌ ‌तंत्रज्ञानाच्या‌ ‌विकासामुळे‌ ‌संगणकाची‌ ‌निर्मिती‌ ‌झाली.‌ ‌पण‌ ‌हा‌ ‌संगणक‌ ‌तुम्हांला‌ ‌धान्य‌ ‌देऊन‌ ‌तुमचे‌ ‌पोषण‌ ‌करू‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌तर‌ ‌काळी‌ ‌आई‌ ‌म्हणजेच‌ ‌धरतीमाता‌ ‌आपण‌ ‌जगवली‌ ‌तरच‌ ‌आपण‌ ‌जगू‌ ‌शकतो.‌ ‌तीच‌ ‌खरी‌ ‌आपले‌ ‌पोषण‌ ‌करणारी‌ ‌जननी‌ ‌आहे.‌ ‌तिला‌ ‌आपण‌ ‌जगवूया‌ ‌असे‌ ‌कवयित्री‌ ‌सांगते.‌ ‌या‌ ‌काळ्या‌ ‌मातीमध्ये‌ ‌जे‌ ‌हात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌राबतात,‌ ‌कष्ट‌ ‌करतात‌ ‌आणि‌ ‌तिचे‌ ‌संगोपन‌ ‌करतात‌ ‌अशा‌ ‌शेतकऱ्याचे,‌ ‌भूमिपुत्राचे‌ ‌सुद्धा‌ ‌आपण‌ ‌संरक्षण‌ ‌केले‌ ‌पाहिजे‌ ‌त्याच्या‌ ‌कष्टांना‌ ‌पाठबळ,‌ ‌दुजोरा‌ ‌दिला‌ ‌पाहिजे.‌ ‌तरच‌ ‌आपल्याला उदयाच्या‌ ‌उज्ज्वल‌ ‌भविष्याचे‌ ‌रंग‌ ‌व‌ ‌जीवनातील‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌पाहायला‌ ‌मिळतील‌ ‌आणि‌ ‌ही‌ ‌धरती‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌सुजलाम्‌ ‌सुफलाम्‌ ‌होऊन‌ ‌इथला‌ ‌मनुष्यप्राणी‌ ‌सुखी‌ ‌होईल.‌

उधळू,‌ ‌फेकू‌ ‌बिया‌ ‌डोंगरी,‌ ‌रुजतील‌ ‌देशी‌ ‌झाडे‌
‌गच्च‌ ‌माजतील‌ ‌राने,‌ ‌होईल‌ ‌आभाळातून‌ ‌वृष्टी….‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌ ‌

‘झाडे‌ ‌लावा,‌ ‌झाडे‌ ‌जगवा’.‌ ‌हा‌ ‌मंत्र‌ ‌सत्यात‌ ‌उतरविण्यासाठी‌ ‌आपण‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌कोणती‌ ‌कृती‌ ‌केली‌ ‌पाहिजे‌ ‌हे‌ ‌सांगताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणते‌ ‌की,‌ ‌आपण‌ ‌आपल्या‌ ‌देशामध्ये‌ ‌पिकणारी,‌ ‌उगवणारी‌ ‌जी‌ ‌फळे,‌ ‌फुले‌ ‌आहेत,‌ ‌त्यांच्या‌ ‌बिया‌ ‌डोंगरावर,‌ ‌पर्वतावर‌ ‌उधळूया‌ ‌म्हणजे‌ ‌डोंगरावर‌ ‌त्या‌ ‌रुजतील‌ ‌आणि‌ ‌देशी‌ ‌झाडांनी‌ ‌आपली‌ ‌जंगले‌ ‌परत‌ ‌गच्च‌ ‌भरून‌ ‌जातील,‌ ‌माजतील‌ ‌ज्यामुळे‌ ‌जमिनीची‌ ‌धूप‌ ‌थांबेल‌ ‌आणि‌ ‌वृष्टी‌ ‌होईल.‌ ‌भरपूर‌ ‌पाऊस‌ ‌पडला‌ ‌तर‌ ‌ही‌ ‌सृष्टी‌ ‌हिरवी‌ ‌समृद्ध‌ ‌होईल‌ ‌आणि‌ ‌समृद्ध‌ ‌अशा‌ ‌भविष्याचे‌ ‌आपले‌ ‌स्वप्न‌ ‌पूर्ण‌ ‌होईल.‌

डोंगरातून‌ ‌वाहात‌ ‌येते,‌ ‌खळाळते‌ ‌हे‌ ‌पाणी‌
‌फेनधवलशा‌ ‌तुषारांमध्ये,‌ ‌राहाल‌ ‌कैसे‌ ‌कष्टी?‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

आभाळातून‌ ‌होणाऱ्या‌ ‌पावसाच्या‌ ‌वृष्टीमुळे‌ ‌डोंगरातून‌ ‌खळाळत‌ ‌पाणी‌ ‌वाहत‌ ‌येईल.‌ ‌डोंगर‌ ‌दऱ्यातून‌ ‌वाहणारे‌ ‌धबधबे,‌ ‌त्यातून‌ ‌फेसाप्रमाणे‌ ‌उधळणाऱ्या‌ ‌पांढऱ्या‌ ‌तुषारांना‌ ‌पाहिल्यावर‌ ‌आपण‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌दुःखे‌ ‌विसरून‌ ‌जाऊन‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌जावू.‌ ‌खळाळत्या‌ ‌पाण्याला‌ ‌पाहून‌ ‌आपल्याही‌ ‌मनात‌ ‌हास्याचे‌ ‌तुषार‌ ‌उधळले‌ ‌जातील‌ ‌व‌ ‌आपली‌ ‌दुःखे‌ ‌राहणारच‌ ‌नाहीत.‌ ‌किंबहुना‌ ‌त्यांना‌ ‌पाहिल्यावर‌ ‌कसे‌ ‌राहू‌ ‌आपण‌ ‌कष्टी?‌ ‌असाच‌ ‌प्रश्न‌ ‌कवयित्री‌ ‌आपल्याला‌ ‌विचारते‌ ‌आहे.‌

मिळेल‌ ‌पैसा,‌ ‌मिळेल‌ ‌दौलत,‌ ‌यंत्रांच्या‌ ‌संगती‌ ‌
आभाळाच्या‌ ‌छत्राखाली,‌ ‌एक‌ ‌अनोखी‌ ‌तुष्टी….‌ ‌
रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌ ‌

तंत्रज्ञानामुळे‌ ‌आपल्याला‌ ‌पैसा,‌ ‌दौलत‌ ‌मिळेल‌ ‌पण‌ ‌त्या‌ ‌कागदी‌ ‌नोटांना‌ ‌समाधानाचा,‌ ‌तुष्टीचा‌ ‌गंध‌ ‌येणार‌ ‌नाही.‌ ‌त्यातून‌ ‌स्पर्धा,‌ ‌अवहेलना‌ ‌वाढेल,‌ ‌दुसऱ्याचे‌ ‌दुःख‌ ‌जाणून‌ ‌घेण्याची‌ ‌मनाची‌ ‌दौलत‌ ‌तिथे‌ ‌नसेल.‌ ‌परंतु‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌एकाच‌ ‌आभाळाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌आपण‌ ‌सारे‌ ‌भेदभाव‌ ‌विसरून‌ ‌जाऊ,‌ ‌कुणी‌ ‌लहान–मोठा,‌ ‌श्रीमंत,‌ ‌गरीब‌ ‌राहणार‌ ‌नाही,‌ ‌आभाळाची‌ ‌आम्ही‌ ‌लेकरे,‌ ‌काळी‌ ‌माती‌ ‌आई‌ ‌असे‌ ‌म्हणण्यातच‌ ‌आपल्याला‌ ‌खरी‌ ‌तुष्टता,‌ ‌समाधान‌ ‌मिळेल‌ ‌आणि‌ ‌एकत्वाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌आपण‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्याचे,‌ ‌आनंदाचे‌ ‌रंग‌ ‌जपून‌ ‌या‌ ‌सृष्टीलाही‌ ‌जपून‌ ‌ठेवू.‌

हिरवी‌ ‌हिरवी‌ ‌मने‌ ‌भोवती,‌ ‌किती‌ ‌छटा‌ ‌हिरव्याच्या‌ ‌
गर्भरेशमी‌ ‌सळसळण्याच्या‌ ‌जगास‌ ‌सांगू‌ ‌गोष्टी….‌ ‌
रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

या‌ ‌निळ्या‌ ‌आभाळाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌साऱ्यांची‌ ‌मने‌ ‌हिरवी‌ ‌होतील,‌ ‌आनंदी‌ ‌होतील.‌ ‌नवीन‌ ‌विचारांनी,‌ ‌सुखा–समाधानाने‌ ‌भरून‌ ‌जातील‌ ‌आणि‌ ‌या‌ ‌आनंदाच्या‌ ‌विविध‌ ‌छटा‌ ‌आपल्याला‌ ‌आपल्या‌ ‌अवतीभोवती‌ ‌पाहता‌ ‌येतील.‌ ‌पर्यावरणाच्या‌ ‌रक्षणासाठी‌ ‌डोंगरावर‌ ‌उधळलेल्या‌ ‌बियांमुळे‌ ‌झाडे‌ ‌निर्माण‌ ‌होतील.‌ ‌घनदाट‌ ‌जंगले‌ ‌तयार‌ ‌होतील‌ ‌व‌ ‌त्यामुळे‌ ‌भरपूर‌ ‌वृष्टी‌ ‌होईल.‌ ‌त्यामुळे‌ ‌सर्वत्र‌ ‌उगवलेल्या‌ ‌गवताची‌ ‌रेशमासारखी‌ ‌नाजूक,‌ ‌मऊ‌ ‌पाती‌ ‌डोलतील.‌ ‌हिरव्यागार‌ ‌धरणीमुळे‌ ‌मनाला‌ ‌समाधान‌ ‌मिळेल.‌ ‌निसर्गसौंदर्यामुळे‌ ‌जगण्याचा‌ ‌खराखुरा‌ ‌आनंदही‌ ‌मिळेल.‌ ‌आपली‌ ‌मनेही‌ ‌हिरवी‌ ‌हिरवी‌ ‌अर्थात‌ ‌प्रसन्न‌ ‌होतील,‌ ‌आपण‌ ‌सर्व‌ ‌जगाला‌ ‌या‌ ‌हिरवाईचा‌ ‌आनंद‌ ‌सांगूया.‌ ‌सगळ्या‌ ‌जगाला‌ ‌आनंदी‌ ‌करत‌ ‌आपण‌ ‌उदयाच्या‌ ‌भविष्याचे,‌ ‌आनंदाचे‌ ‌रंग‌ ‌जपून‌ ‌या‌ ‌सृष्टीलाही‌ ‌जपून‌ ‌ठेवू.‌ ‌

‌रंग मजेचे रंग उदयाचे शब्दार्थ‌

  • ‌दृष्टी‌ ‌– ‌नजर‌ ‌– ‌(sight)‌
  • सृष्टी‌ ‌– ‌निसर्ग,‌ ‌जग‌ ‌– (nature)‌
  • संगणक‌ ‌– ‌(computer)‌ ‌
  • काळी‌ ‌आई‌ ‌– ‌माती‌ ‌– (earth)
  • पुष्टी‌ ‌– ‌पाठबळ,‌ ‌दुजोरा‌‌ ‌– ‌(support)
  • वृष्टी‌ ‌– ‌पाऊस‌ ‌– ‌(rain)‌ ‌
  • आभाळ‌ ‌– ‌आकाश,‌ ‌नभ‌ ‌– ‌(sky)‌ ‌
  • छटा‌ ‌– ‌विविध‌ ‌रंग,‌ ‌स्तर‌ ‌– ‌(shades)‌ ‌
  • गर्भरेशमी‌ ‌– ‌मऊ‌ ‌– ‌(soft‌ ‌silk)‌ ‌
  • सळसळणे‌ ‌– ‌पानांच्या‌ ‌हालचालीचा‌ ‌आवाज‌ ‌– (rustling)‌ ‌
  • फुल‌ ‌‌– ‌सुमन,‌ ‌पुष्प‌ ‌– ‌(flower)‌ ‌
  • घाट – ‌गच्च‌ ‌– ‌(dense)‌ ‌
  • ताटवे‌ ‌– ‌बगीचे‌ ‌– ‌(gardens)‌
  • ‌मजा‌ ‌– ‌गंमत‌ ‌– (‌fun)‌ ‌
  • जपणे‌ – ‌सांभाळून‌ ‌ठेवणे‌ ‌– (to‌ ‌preserve‌ ‌carefully)‌ ‌
  • माती‌ ‌– मृदा (Soil)
  • हात‌ ‌– ‌कर‌ ‌– ‌(hand)‌ ‌
  • राबती‌ ‌– ‌राबणे,‌ ‌कष्ट‌ ‌करणे‌ ‌– ‌(to‌ ‌work‌ ‌hard)‌ ‌
  • उधळू‌ ‌– ‌उडवू,‌ ‌उडवणे‌ ‌– ‌(throw)‌ ‌
  • बीया‌ ‌– ‌बीज‌ ‌– (seeds)‌ ‌
  • डोंगर‌ ‌– ‌पर्वत‌ – (mountain)‌
  • ‌रुजणे‌ ‌– ‌अंकुरणे‌ ‌– (to‌ ‌germinate)‌ ‌
  • झाड‌ ‌– ‌वृक्ष‌ ‌– (tree)‌ ‌
  • रान‌ ‌– ‌जंगल,‌ ‌वन‌ ‌– ‌(forest)‌
  • ‌पाणी – ‌जल‌ ‌– (water)‌ ‌
  • फेनधवलशा‌ ‌– ‌फेसाप्रमाणे‌ ‌पांढऱ्या‌ ‌– ‌(white‌ ‌like‌ ‌foam)‌ ‌
  • कष्टी‌ ‌– ‌थकलेले,‌ ‌दुःखी‌ ‌– ‌(Sad)‌ ‌
  • पैसा‌ ‌– ‌अर्थ‌ ‌– ‌(money)‌ ‌
  • दौलत‌ ‌– ‌संपत्ती‌ ‌– (wealth)‌ ‌
  • संगत‌ ‌सोबत‌ ‌– ‌(company)‌ ‌
  • छत्र‌ ‌– ‌सावली‌ ‌– (shade)‌ ‌
  • अनोखी‌ ‌– ‌वेगळी‌ ‌– (special)‌ ‌
  • तृष्टी‌ ‌– ‌तृप्ती,‌ ‌समाधान‌ ‌– ‌(satisfaction)‌ ‌
  • मन‌ – ‌चित्त‌ ‌– (mind)‌