Chapter 13 तिफन(कविता)
Chapter 13 तिफन(कविता)
Textbook Questions and Answers
1. खालील अर्थाच्या शब्दसमुहाला कवितेतील योग्य शब्द दया.
प्रश्न 1.
खालील अर्थाच्या शब्दसमुहाला कवितेतील योग्य शब्द दया.
- पेरणीसाठी लागणारे बियाणे …….…………
- शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार …………………
- पाराबती करते त्या दोन कृती ……………, …………………..
उत्तर:
- बजवाई
- तिफण
- पोटाला वटी बांधणे, झोळी काठीला टांगणे
2. खालील ओळींतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
प्रश्न 1.
काकरात बिजवाई जस हासरं चांदन.
उत्तरः
ज्याप्रमाणे आकाशात चांदणं चमकत असतं, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेतात पेरलेले बियाणे चमकत आहे, हसत आहे असे वाटते.
प्रश्न 2.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते.
उत्तरः
शेतकरी भर दिवसा (शेतात) स्वप्न पाहत आहे. शेतकऱ्याची काळी कसदार सुपीक जमीन आहे. त्या जमिनीत हिरवंगार शेत पिकवून खूप धान्य मिळवयाचं त्याचं स्वप्न आहे.
3. या कवितेत आलेले वहाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
प्रश्न 1.
या कवितेत आलेले वहाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
उत्तरः
4. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
प्रश्न 1.
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तरः
5. अभिव्यक्ती
प्रश्न 1.
‘काया ढेकलात डोया हिर्व सपान पाहेते’ या ओळीतील भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर:
कृती 3: काव्यसौंदर्य, प्रश्न (1) मधील (vi) चे उत्तर पाहा.
प्रश्न 2.
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’ या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
उत्तरः
कृती 3 : काव्यसौंदर्य, प्रश्न (1) मधील (v) चे उत्तर पाहा
भाषाभ्यास:
प्रश्न 1.
खालील वाक्ये वाचा.
1. मी शाळा जातो.
2. मी शाळेत जातो.
ही दोन वाक्ये तुम्ही वाचलीत. यांपैकी पहिले वाक्य चुकीचे आहे आणि दुसरे वाक्य बरोबर आहे. या दोन्ही वाक्यांमध्ये काय फरक आहे? पहिल्या वाक्यात ’शाळा’ हा शब्द आहे. दुसऱ्या वाक्यात ’शाळा’ या शब्दाला ’-त’ हा प्रत्यय लागला आहे.
प्रश्न 2.
खालील वाक्ये वाचा.
1. राम मित्राशी बोलतो.
2. रेश्मा पालीला घाबरते.
3. कल्पना दुकानात जाते.
या वाक्यांमध्ये, मित्र, पाल, दुकान या नामांना अनुक्रमे -शी, -ला, -त हे प्रत्यय जोडलेले आहेत. प्रत्यय लागण्यापूर्वी या शब्दांमध्ये काही बदल झाले आहेत. उदा., मित्र~मित्रा-, पाल~पाली-, दुकान~दुकाना- शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या या बदलाला शब्दाचे सामान्यरूप म्हणतात. शब्दाच्या मूळ रूपाला सरळरूप म्हणतात. उदा., ’दुकान’ हे सरळरूप आणि दकाना- हे सामान्यरूप.
नामांना किंवा सर्वनामांना लागणारे प्रत्यय अनेक प्रकारचे असतात. -ला,-त,-ने,-शी,-चा,-ची,-चे इत्यादी. नामांना व सर्वनामांना प्रत्ययांबरोबरच शब्दयोगी अव्यये जोडली जातात. तेव्हासुद्धा सामान्यरूप होते.
Additional Important Questions and Answers
पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा.
उत्तरः
प्रश्न 3.
उत्तर लिहा.
उत्तरः
नंदी बैलांच्या जोडीला हाकणारा - [सदाशीव]
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1.
कोण रडत आहे?
उत्तरः
तानुलं रडत आहे.
प्रश्न 2.
पाराबतीने पोटाला काय बांधले आहे?
उत्तर:
पाराबतीने पोटाला वटी बांधली आहे.
प्रश्न 3.
शेतात पेरलेले धान्य कवीला कसे वाटत आहे?
उत्तरः
शेतात पेरलेले धान्य कवीला जणू हसरे चांदणे वाटत आहे.
प्रश्न 4.
जीवाला कोणाची भूल पडत आहे?
उत्तरः
जीवाला मातीच्या कस्तुरीच्या वासाची भूल पडत आहे.
प्रश्न 5.
भिजलेली ढेकळं पायाला कशाप्रमाणे भासतात?
उत्तरः
भिजलेली ढेकळं पायाला लोण्याप्रमाणे भासतात. .
प्रश्न 6.
शेतकरी काळ्या ढेकळात काय पाहत आहे?
उत्तर:
शेतकरी काळ्या ढेकळात हिरवं सपन पाहत आहे.
प्रश्न 7.
योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.
- नंदी बैलाच्या जोळीले …….” हकालते. (महादेव, सदाशीव, शीव, शेतकरी)
- ……………. काटीले टांगते त्यात तानुलं लळते. (मोळी, चोळी, झोयी, पताका)
- काया मातीत मातीत …………….’ चालते. (गोफन, रापन, चाखन, तिफन)
- सरीवरी सरी येती ……………….. न्हातीधुती होते. (माती, धरनी, काया, पृथ्वी)
- मैना वाटुली पाहेते ..………….. तिफन हानते. (राघू, शूक, सदाशीव, पाराबती)
- वला टाकती तिफन ……………… वखर पाहेते. (शितू, राघू, चंदू, मैना)
- डोया सपन पाहेते …..………… पायात रुतते. (खिळा, मोळा, चूक, काटा)
उत्तर:
- सदाशीव
- झोयी
- तिफन
- माती
- राघू
- शितू
- काटा
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.
- आकाशात विजा चमकत असतात. जणू त्यांचा थयथय नाच चालू असतो.
- काठीला टांगलेल्या झोळीत झोका घेणारे बाळ रडत आहे.
- पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत जणू या सरी मातीला अंघोळ घालत आहेत.
- शेतकरी तिफन चालवत आहे. पाऊस बरसत आहे.
- शेतकरी तिफणीत बीज टाकत आहे. त्याचं लक्ष जमिनीवर ढेकळं फोडत पुढे जाणाऱ्या वखरावर आहे.
- त्याचं हिरवं स्वप्न (धान्य पिकवण्याचं) खरं झालं आहे.
उत्तर:
- ईज नाचते थयथय.
- झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते.
- सरीवरी सरी येती माती न्हातीधुती होते.
- राघू तिफन हानते ढग बरसते.
- वला टाकती तिफन शितू वखर पाहेते.
- हिर्व सपन फुलते ढग बरसते.
जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
प्रश्न 2.
प्रश्न 3.
काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.
प्रश्न 1.
काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.
उत्तर:
- त्यात तानुलं लळते ढग बरसते.
- ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवते.
- वटी बांधून पोटाले पाराबती उनारते.
- काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते.
- राघू तिफन हानते ढग बरसते.
- काकरात बिजवाई जसं हासरं चांदनं
- सरीवरी सरी येती माती न्हातीधुती होते.
- मैना वाटुली पाहेते राघू तिफन हानते.
- हिर्व सपन फुलते ढग बरसते.
- वला टाकती तिफन शितू वखर पाहेते.
- काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते.
- पानी भिजलं ढेकूल लोनी पायाले पाटते.
उत्तर:
- काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते.
- ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवते.
- वटी बांधून पोटाले पाराबती उनारते.
- त्यात तानुलं लळते ढग बरसते.
- काकरात बिजवाई जसं हासरं चांदनं
- सरीवरी सरी येती माती न्हातीधुती होते.
- मैना वाटुली पाहेते राघू तिफन हानते.
- राघू तिफन हानते ढग बरसते.
- वला टाकती तिफन शितू वखर पाहेते.
- पानी भिजलं ढेकूल लोनी पायाले वाटते.
- काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते.
- हिर्व सपन फुलते ढग बरसते.
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.
प्रश्न 1.
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.
- बरसते, टांगते, हकालते, उनारते
- ढोल, तानुलं, पाराबती, सदाशीव
- बरसते, गोंदन, पाहेते, चांदनं
- राघू, मैना, माती, कस्तुरीचा
- तिफन, ढग, काटा, डोया
- वखर, वला, लोनी, हिर्व
उत्तर:
- हकालते, उनारते, टांगते, बरसते
- ढोल, सदाशीव, पाराबती, तानुलं
- चांदनं, गोंदन, पाहेते, बरसते
- माती, कस्तुरीचा, मैना, राघू
- तिफन, डोया, काटा, ढग
- वला, वखर, लोनी, हिर्व
प्रश्न तयार करा.
प्रश्न 1.
झोयी काटीले टांगते.
उत्तरः
काटीला काय टांगते?
प्रश्न 2.
काया मातीत तिफन चालते.
उत्तरः
काया मातीत काय चालते?
प्रश्न 3.
तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते.
उत्तर:
कोणता वास जिवाला भूल पाडत आहे?
प्रश्न 4.
धरतीच्या आंगोपांगी लाळानौसाचं गोंदनं
उत्तरः
कोणाच्या आंगोपांगी लाळानौसाचं गोंदनं आहे?
प्रश्न 5.
वला टाकती तिफन शितू वखर पाहेते.
उत्तरः
शितू काय पाहत आहे?
कृती 3: काव्यसौंदर्य
खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
प्रश्न 1.
काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवते
उत्तरः
शेतकऱ्याच्या कष्टकरी जीवनाचे व निसर्गाचे नितांत सुंदर व जिवंत चित्र कवी आपल्या डोळ्यांसमोर उभे करतात. शेतकऱ्याचे संपूर्ण जीवन हे शेतीवर आणि पर्यायाने पावसावर अवलंबून असते. शेतीची नांगरणी आटोपून पाऊस सुरू झाल्याने शेतकरी धान्याची पेरणी करत असतो. शेतात बैलांच्या मदतीने तिफन चालवून पेरणी चालू असते. आकाशात विजा चमकत असतात. जणू त्यांचा थयथय नाच चालू आहे असे वाटते. ढगांचा होणारा गडगडाट ऐकून ढग ढोल वाजवत आहेत, असे कवीला वाटते.
प्रश्न 2.
झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते. त्यात तानुलं लळते ढग बरसते
उत्तरः
पार्वतीने (शेतकऱ्याच्या पत्नीने) आपले रडणारे छोटे बाळ झोळीत ठेवले आहे. ती झोळी तिने काठीला टांगून ठेवली आहे. झोळीत झोका घेणारे बाळ रडत आहे. आकाशात ढग बरसू लागले आहे. पाऊस सुरू झाला आहे. शेतकरी शेतीच्या कामात मग्न झाला आहे.
प्रश्न 3.
काकरात बिजवाई जसं हासरं चांदनं
उत्तरः
काळ्या मातीत तिफन चालवून शेतकरी धान्य पेरतो. हे पेरलेले धान्य म्हणजे जणू काही हसरं चांदणं आहे. शिवारात पेरलेले बियाणं हे आकाशात चमकणाऱ्या चांदण्यासारखं भासत आहे असे कवीला वाटते.
प्रश्न 4.
सरीवरी सरी येती माती न्हातीधुती होते.
उत्तरः
पावसाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसाच्या पडणाऱ्या सरी जमिनीवर बरसत आहेत. धरणी ओली चिंब झाली आहे. भिजून गेली आहे. जणू या पावसाच्या सरी मातीला न्हाऊ घालत आहेत, असे कवीला वाटते.
प्रश्न 5.
काटा पायात रूतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते.
उत्तरः
आपल्या कष्टाने, मेहनतीने हे शेत हिरवेगार होऊन उठेल, शेतात धान्य डोलू लागेल असे स्वप्न डोळ्यांनी पाहत असताना किंवा मनात तसा विचार चालू असताना अचानक शेतकऱ्याच्या पायात काटा टोचतो. काटा टोचल्यामुळे पायातून लाल रक्त येऊ लागते; पण शेतकऱ्याला ती वेदना जाणवत नाही. कारण त्याच्या कष्टातून, श्रमातून हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात उतरेल असा त्याला विश्वास वाटतो.
प्रश्न 6.
काया ढेकलात डोया हिर्व सपान पाहेते.
उत्तरः
पाऊस आल्यामुळे तिफन धरली जाते आणि बियाणाची पेरणी होते. मातीच्या काळ्या ढेकळात चालताना ती ढेकळं पावसाने भिजली आहेत. त्यामुळे पायाला ती मऊ लोण्यासारखी जाणवतात. या ढेकळातून आता हिरवंगार पीक येईल असं स्वप्न शेतकरी पाहत आहे. या ओळीतून शेतकऱ्याचा आशावाद दिसून येतो.
पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न 1.
ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवते.
उत्तरः
शेताची नांगरणी आटोपून पाऊस सुरू झाल्याने शेतकरी धान्याची पेरणी करत असतो. शेतात बैलांच्या मदतीने तिफन चालवून पेरणी चालू असते. काळ्या मातीत तिफन चालत असते. आकाशात विजा चमकत असतात जणू त्यांचा थयथय नाच चालू असतो. त्याचवेळी ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागतो जणू ढग ढोल वाजवत आहेत असे वाटते.
प्रश्न 2.
नंदी बैलाच्या जोळीले सदाशीव हकालते.
उत्तरः
पाऊस आल्यामुळे पेरणीसाठी सदाशीव म्हणजेच शेतकरी यार झालेला आहे. तो आपल्या शेतामध्ये स्वत: नंदीबैलाच्या जोडीला तिफन चालवत आहे.
प्रश्न 3.
धरतीच्या आंगोपांगी लाळानौसाचं गोंदनं
उत्तरः
पेरलेले धान्य जणू हसणारं चांदणं वाटत आहे. शिवाय पेरलेले ते धान्य पाहून असे वाटते, जणू धरतीच्या अंगावर लाडाने, कौतुकाने नवसाचे छान गोंदण केलेले आहे.
प्रश्न 4.
मैना वाटुली पाहेते राघू तिफन हानते
उत्तरः
शेतकऱ्याची बायको संध्याकाळच्या वेळी घरी आपल्या राघूची म्हणजेच शेतकऱ्याची मनापासून वाट पाहते आहे. ती घरी वाट पाहते पण इकडे शेतात हा शेतकरी तिफन चालवत आहे. पाऊस बरसत आहे.
प्रश्न 5.
बैल, काळी माती, तिफन आणि शेत यांमध्येच शेतकरी राजाचा संसार गुरफटलेला असतो. तुमचे विचार लिहा.
उत्तरः
शेतकरी म्हटला म्हणजे शेत हे आलेच. शेत आले की, माती, बैल व तिफन असे सर्व काही आले. शेतकरी राजाचे विश्व यांतच गुरफटलेले असते. दिवसभर बैलांच्या मदतीने शेत नांगरताना त्याचे अनवाणी पाय काळ्या मातीला स्पर्श करीत असतात. तिफन हातात घेऊन शेत नांगरताना त्याला सुखाची अनुभूती येत असते. पेरणी, नागरणी, कापणी, मळणी यांशिवाय दुसरे काहीही त्यास सुचत नसते. म्हणून शेतकरी राजाचा संसार हा बैल, काळी माती, तिफन आणि शेत यांमध्ये गुरफटलेला असतो.
प्रश्न 6.
पावसाच्या दिवसातील मातीच्या सुगंधाचा तुम्ही जरूर आस्वाद घेतला असेल. त्यावेळी तुम्हांला झालेल्या आनंदाचे वर्णन करा.
उत्तरः
पाऊस पडण्याअगोदर माती उन्हात तापून गरम झालेली असते. तिच्यातून गरम वाफा निघत असतात. पण जेव्हा पावसाला सुरुवात होते आणि तप्त धरती पावसात न्हाऊन निघते, तेव्हा मातीतून निघणारा सुगंध आपणास मोहून टाकतो व तो कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे सारा आसमंत दरवळून टाकतो. जणू धरणी मातेने त्यात स्नानच केलेले असते. मी प्रत्येक वर्षी पावसात न्हाऊन निघालेल्या मातीच्या सुगंधाचा आस्वाद घेतलेला आहे. त्या प्रत्येक वेळी माझे मन प्रसन्न व टवटवीत झालेले आहे. माझ्या मनात एक प्रकारचा जोश व उत्साह निर्माण झालेला आहे.
प्रश्न 7.
शेतकरीच नसता तर हिरवे सपन फुललेच नसते. या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सांगा.
उत्तरः
शेतकरीच नसता तर हिरवे सपन फुललेच नसते. हिरवे सपन म्हणजे शेतात बहरून आलेले पीक. जर शेतकरी नसता तर शेती कोणीच करू शकले नसते. मग पेरणी, नागरणी, कापणी व मळणी या प्रक्रिया कोणालाही पूर्ण करता आल्याच नसत्या. देशातील लोकांना अन्नधान्य खाण्यास मिळालेच नसते. त्यामुळे लोकांची अन्नान्न दशा झाली असती. संपूर्ण मानव जीवनच संपुष्टात आले असते. खरेच शेतकऱ्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता आली नसती.
प्रश्न 8.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी / कवयित्रीचे नाव -
विठ्ठल वाघ
2. संदर्भ -
‘तिफन’ ही कविता कवी ’विठ्ठल वाघ यांनी लिहिली आहे. ही कविता त्यांच्या काळ्या मातीत मातीत’ या कवितासंग्रहातील आहे.
3. प्रस्तावना -
‘तिफन’ ही कविता कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी लिहिली आहे.आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेतीच्या कामांची लगबग याचे चित्रदर्शी वर्णन या कवितेत कवीने केले आहे.
4. वाङ्मयप्रकार –
‘तिफन’ ही कविता एक ‘लोकगीत’ आहे.
5. कवितेचा विषय –
शेतकरी, कष्टकरी लोकजीवनाचे चित्रण करणारी ’तिफन’ ही एक ग्रामीण कविता आहे.
6. कवितेतील आवडलेली ओळ –
सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते
7. मध्यवर्ती कल्पना -
पडणाऱ्या पावसावर, शेतीवर शेतकऱ्याचे सारे जीवन अवलंबून असते. पाऊस आल्यावर त्याची शेतीच्या कामाची धांदल सुरू होते. पेरणी, बैलांविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसांतील मातीचा सुगंध, शेतकऱ्यांचे स्वप्न, शेतीच्या कामांची लगबग याचे सुंदर चित्र ’तिफन’ कवितेत दिसून येते.
8. कवितेतून मिळणारा संदेश –
शेतकरी खूप कष्टाने शेतात धान्य पिकवत असतो. आपल्या अनेक सुखाचा, आनंदाचा तो त्याग करत असतो. प्रसंगी रडणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष करून, आपल्या जखमांना विसरून तो शेतीची कामे करत असतो. खूप यातना, त्रास सोसून आपल्या ताटात भाजी-भाकरीची सोय करणाऱ्या शेतकऱ्यांचा आपण आदर केला पाहिजे. तो मातीत कष्ट करतो म्हणून आपण पोटभर जेऊ शकतो, हे आपण कधीही विसरू नये. हा संदेश ‘तिफन’ या कवितेतून आपणास मिळतो.
9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
“तिफन’ ही कविता मला खूप आवडली आहे. त्याचे कारण म्हणजे हे एक लोकगीत आहे. छान चालीवर आपण ते गाऊ शकतो. शिवाय ही कविता वाचत असताना शेतकऱ्याचे आयुष्य आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.
10. भाषिक वैशिष्ट्ये –
‘तिफन’ या कवितेमध्ये कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी वहाडी बोलीचा छान वापर केला आहे. या कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर करून छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते.
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.सोडवा.
प्रश्न 1.
काया मातीत मातीत तिफन चालते
ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवते
उत्तरः
‘तिफन’ ही कविता कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी लिहिली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना होणारा आनंद शिवाय शेतीच्या कामांची लगबग याचे सुंदर चित्रदर्शी वर्णन या कवितेत दिसून येते.
शेतकऱ्याच्या कष्टकरी जीवनाचे व निसर्गाचे नितांत सुंदर व जिवंत चित्र कवी आपल्या डोळ्यांसमोर उभे करतात. शेतकऱ्याचे संपूर्ण जीवन हे शेतीवर आणि पर्यायाने पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पाऊस सुरू झाला की त्याच्या शेतीच्या कामाची लगबग सुरू होते. पाऊस सुरू झाल्याने शेताची नांगरणी आटोपून शेतकरी धान्याची पेरणी करत असतो. शेतात बैलांच्या मदतीने तिफन चालवून पेरणी चालू असते. काळया मातीत तिफन चालत असते. आकाशात विजा चमकत असतात जणू त्यांचा थयथय नाच चालू असतो. त्याचवेळी ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागतो. जणू ढग ढोल वाजवत आहेत असे वाटते.
या काव्यपंक्तीमध्ये कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी व-हाडी बोलीचा छान वापर केला आहे. या कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर करून छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते.
प्रश्न 2.
नंदी बैलाच्या जोळीले सदाशीव हकालते
वटी बांधून पोटाले पाराबती उनारते
वटी पोटाले बांधते झोयी काटीले टांगते
झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते
त्यात तानुलं लळते ढग बरसते
उत्तरः
‘तिफन’ ही कविता कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी लिहिली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना होणारा आनंद शिवाय शेतीच्या कामांची लगबग याचे सुंदर चित्रदर्शी वर्णन या कवितेत दिसून येते.
पाऊस आल्यामुळे पेरणीसाठी सदाशीव हा शेतकरी तयार झालेला आहे. तो आपल्या शेतामध्ये नंदीबैलाच्या जोडीला तिफनया काव्यपंक्तीमध्ये कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी वहाडी बोलीचा छान वापर केला आहे. या कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर करून छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते.
प्रश्न 3.
काकरात बिजवाई जसं हासरं चांदनं
घरतीच्या अंगोपांगी लाळानौसाचं गोंदन
उत्तरः
‘तिफन’ ही कविता कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी लिहिली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना होणारा आनंद शिवाय शेतीच्या कामांची लगबग याचे सुंदर चित्रदर्शी वर्णन या कवितेत दिसून येते.
पाऊस सुरू झाल्यामुळे सदाशीव शेतकऱ्याने शेतात नंदीबैलाच्या साथीने तिफन जोडून पेरणीला सुरुवात केली आहे. या पेरणीच्या कामात त्याची पत्नी पार्वती त्याला साथ देत आहे. त्यांनी शेतात पेरलेले धान्य जणू हसणारं चांदणं वाटत आहे. शिवाय पेरलेले ते धान्य पाहून असे वाटते जणू धरतीच्या अंगावर लाडाने, कौतुकाने नवसाचे छान गोंदण केलेले आहे.
या काव्यपंक्तीमध्ये कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी वहाडी बोलीचा छान वापर केला आहे. या कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर करून छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते.
प्रश्न 4.
सरीवरी सरी येती माती न्हातीधुती होते
तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते
भूल जीवाले पाळते वाट सांजीले पाहेते
मैना वाटुली पाहेते राघू तिफन हानते
राघू तिफन हानते ढग बरसते
उत्तरः
’तिफन’ ही कविता कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी लिहिली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना होणारा आनंद शिवाय शेतीच्या कामांची लगबग याचे सुंदर चित्रदर्शी वर्णन या कवितेत दिसून येते.
पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. सर्वत्र पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. जणू या सरी मातीला न्हाऊ घालत आहेत. या बरसणाऱ्या सरींमुळे माती चिंब भिजून गेली आहे. या मातीचा कस्तुरीसारखा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. हा सुगंध जीवाला भूल पाडत आहे, मन मोहीत करत आहे. इकडे भिजलेल्या मातीचा सुगंध मनाला धुंद करत आहे तर तिकडे संध्याकाळच्या वेळी मैना म्हणजेच शेतकऱ्याची बायको घरी आपल्या राघूची म्हणजेच शेतकऱ्याची मनापासून वाट पाहते आहे. ती घरी वाट पाहते पण इकडे शेतात हा शेतकरी तिफन चालवत आहे आणि आकाशातून छान पाऊस बरसत आहे.
या काव्यपंक्तीमध्ये कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी व-हाडी बोलीचा छान वापर केला आहे. या कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर करून छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते.
प्रश्न 5.
वला टाकती तिफन शितू वखर पाहेते
पानी भिजलं ढेकूल लोनी पायाले वाटते
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
उत्तर:
’तिफन’ ही कविता कवी ‘विठ्ठल वाघ’ यांनी लिहिली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना होणारा आनंद शिवाय शेतीच्या कामांची लगबग याचे सुंदर चित्रदर्शी वर्णन या कवितेत दिसून येते.
शेतीची नांगरणी करून शेतकरी शेतात धान्याची पेरणी करत आहे. बैलांच्या मदतीने तिफन चालवून पेरणी सुरू आहे. तिफनीतून धान्य जमिनीमध्ये पेरले जाते. त्यानंतर नांगरणी केल्यामुळे मातीची छोटी-मोठी ढेकळं जी जमिनीतून वर आलेली असतात ती फोडून त्याची माती या पेरलेल्या धान्यावर हळूच सारली जाते, त्याला वखरणी म्हणतात. पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याचे तिकडेही लक्ष आहे. पडणाऱ्या पावसामुळे माती भिजलेली आहे. पाण्याने भरलेली ही मातीची ढेकळं पायाला लोण्याप्रमाणे वाटतात. या मातीच्या काळ्या ढेकळातच शेतकरी उदयाच्या नव्या हिरव्यागार पिकाचं हिरवं स्वप्न पाहू लागतो.
या काव्यपंक्तीमध्ये कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी वहाडी बोलीचा छान वापर केला आहे. या कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर करून छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते.
प्रश्न 6.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
डोया सपन पाहेते काटा पायात रुतते
काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते
हिर्व सपन फुलते ढग बरसते
उत्तर:
’तिफन’ ही कविता कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी लिहिली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना होणारा आनंद शिवाय शेतीच्या कामांची लगबग याचे सुंदर चित्रदर्शी वर्णन या कवितेत दिसून येते.
बैलांच्या मदतीने शेतीची नांगरणी आटोपून शेतकरी धान्याची पेरणी करत असतो. पेरणी करून झाल्यावर मातीच्या काळ्या ढेकळातच शेतकरी उदयाच्या नव्या हिरव्यागार पिकाचं हिरवं स्वप्न पाहू लागतो. आपल्या कष्टाने, मेहनतीने हे शेत हिरवेगार होऊन उठेल, शेतात धान्य डोलू लागेल असे स्वप्न डोळ्यांनी पाहत असताना किंवा मनात तसा विचार चालू असताना अचानक त्याच्या पायात काटा टोचतो. काटा टोचल्यामुळे पायातून लाल रक्त येऊ लागते. पण शेतकऱ्याला ती वेदना जाणवत नाही. कारण त्याच्या कष्टातून, श्रमातून त्याच्या हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात उतरेल असा त्याला विश्वास वाटतो. पाऊस पडतो, ढग बरसू लागतात आणि त्या शेतकऱ्याचे हिरवे स्वप्न खरे होऊ लागते.
या काव्यपंक्तीमध्ये कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी वहाडी बोलीचा छान वापर केला आहे. या कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर करून छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते.
पाठाखालील स्वाध्याय:
अभिव्यक्ती:
प्रश्न 1.
‘काया ढेकलात डोया हिर्व सपान पाहेते’ या ओळीतील भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर:
कृती 3: काव्यसौंदर्य, प्रश्न (1) मधील (vi) चे उत्तर पाहा.
Summary in Marathi
कवीचा परिचय:
नाव: विठ्ठल वाघ
जन्म: 1945
सुप्रसिदध कवी व लेखक. ’काळ्या मातीत मातीत’, ’पंढरीच्या वाटेवर’, ’कपाशीची चंद्रफुले’, ’पाऊसपाणी’ हे कवितासंग्रह; ’अंधारयात्रा’ हे नाटक; ’डेबू’ ही कादंबरी; ’वहाड बोली आणि इतिहास’, ’वहाडी म्हणी’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध.
प्रस्तावना:
‘तिफन’ ही कविता कवी ’विठ्ठल वाघ’ यांनी लिहिली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना होणारा आनंद शिवाय शेतीच्या कामांची लगबग याचे सुंदर चित्रदर्शी वर्णन या कवितेत दिसून येते.
Poet Vitthal Wagh has written the poem ’Tiphan’. This poem describes a picture of rural area at the onset of the monsoons. A farmer’s joy knows no bounds as the monsoon showers drench his farm thoroughly. The poem depicts the various activities of the farmer and that of his wife in sowing seeds in the farm. The rain showers kindle the hope of an abundant green crop in the farmer’s mind.
भावार्थ:
काया मातीत …… ढोल वाजवते
शेतकऱ्याच्या कष्टकरी जीवनाचे व निसर्गाचे नितांत सुंदर व जिवंत चित्र कवी आपल्या डोळ्यांसमोर उभे करतात. शेतकऱ्याचे संपूर्ण जीवन हे शेतीवर आणि पर्यायाने पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पाऊस सुरू झाला की त्याच्या शेतीच्या कामाची लगबग सुरू होते.
शेताची नांगरणी आटोपून पाऊस सुरू झाल्याने शेतकरीधान्याची पेरणी करत असतो. शेतात बैलांच्या मदतीने तिफन चालवून पेरणी चालू असते. काळ्या मातीत तिफन चालत असते. आकाशात विजा चमकत असतात जणू त्यांचा थयथय नाच चालू असतो. त्याचवेळी ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागतो जणू ढग ढोल वाजवत आहेत असे वाटते.
नंदी बैलाच्या ….. ढग बरसते
]पाऊस आल्यामुळे पेरणीसाठी सदाशीव म्हणजेच शेतकरी तयार झालेला आहे. तो आपल्या शेतामध्ये नंदीबैलाच्या जोडीला तिफन बांधून हाकारत आहे. त्यावेळी सदाशीवची पत्नी पार्वती आपल्या पोटाला पदराची ओटी बांधून त्यात बियाणे घेऊन पेरणी करत आहे.
आपले रडणारे छोटे बाळ पार्वतीने झोळीत ठेवले आहे. ती झोळी तिने काठीला टांगून ठेवली आहे. झोळीत झोका घेणारे बाळ रडत आहे आणि आकाशातून ढग बरसू लागले आहेत. पाऊस सुरू झाला आहे.
काकरात बिजवाई …… हानते ढग बरसते
पाऊस सुरू झाल्यामुळे सदाशीव शेतकऱ्याने शेतात नंदीबैलाच्या साथीने तिफन जोडून पेरणीला सुरुवात केली आहे. या पेरणीच्या कामात त्याची पत्नी पार्वती त्याला साथ देत आहे. त्यांनी शेतात पेरलेले धान्य जणू हसणारं चांदणं वाटत आहे. शिवाय पेरलेले ते धान्य पाहून असे वाटते जणू धरतीच्या अंगावर लाडाने, कौतुकाने नवसाचे छान गोंदण केलेले आहे.
पुढे कवी म्हणतात की, आता पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. सर्वत्र पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. जणू या सरी मातीला न्हाऊ घालत आहेत. या बरसणाऱ्या सरींमुळे माती चिंब भिजून गेली आहे. या मातीचा कस्तुरीसारखा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. हा सुगंध जीवाला भूल पाडत आहे, मन मोहीत करत आहे.
इकडे भिजलेल्या मातीचा सुगंध मनाला धुंद करत आहे तर तिकडे संध्याकाळच्या वेळी मैना म्हणजेच शेतकऱ्याची बायको घरी आपल्या राघूची म्हणजेच शेतकऱ्याची मनापासून वाट पाहते आहे. ती घरी वाट पाहते पण इकडे शेतात हा शेतकरी तिफन चालवत आहे. पाऊस बरसत आहे.
वला टाकती तिफन ….. फुलते ढग बरसते
शेतीची नांगरणी करून शेतकरी शेतात धान्याची पेरणी करत आहे. बैलांच्या मदतीने तिफन चालवून पेरणी सुरू आहे. तिफनीतून धान्य जमिनीमध्ये पेरले जाते. त्यानंतर नांगरणी केल्यामुळे मातीची छोटी-मोठी ढेकळं जी जमिनीतून वर आलेली असतात ती फोडून त्याची माती या पेरलेल्या धान्यावर हळूच सारली जाते, त्याला वखरणी म्हणतात. पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याचे तिकडेही लक्ष आहे. पडणाऱ्या पावसामुळे माती भिजलेली आहे. पाण्याने भरलेली ही मातीची ढेकळं पायाला लोण्याप्रमाणे वाटतात. या मातीच्या काळ्या ढेकळातच शेतकरी उदयाच्या नव्या हिरव्यागार पिकाचं हिरवं स्वप्न पाहू लागतो.
आपल्या कष्टाने, मेहनतीने हे शेत हिरवेगार होऊन उठेल, शेतात धान्य डोलू लागेल असे स्वप्न डोळ्यांनी पाहत असताना किंवा मनात तसा विचार चालू असताना अचानक शेतकऱ्याच्या पायात काटा टोचतो. काटा टोचल्यामुळे पायातून लाल रक्त येऊ लागते. पण शेतकऱ्याला ती वेदना जाणवत नाही. कारण त्याच्या कष्टातून, श्रमातून त्याच्या हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात उतरेल असा त्याला विश्वास वाटतो. पाऊस पडतो, ढग बरसू लागतात आणि त्या शेतकऱ्याचे हिरवे स्वप्न खरे होऊ लागते.
शब्दार्थ:
- काया - काळ्या (black)
- पानी - पाणी
- ईज - वीज (lightning)
- जोळीले - जोडीने (together, with)
- वटी - ओटी
- पोटाले - पोटाला
- पाराबती - पार्वती
- काटीले - काठीला
- लळते - रडते (is crying)
- वाटुली पाहेते - वाट पाहते (is waiting)
- झोयी - झोळी (traditional cradle)
- तानुलं - तान्हुलं, छोटे बाळ
- लोनी - लोणी (butter)
- बिजवाई - बियाणं
- चांदनं - चांदणं (moon light)
- लाळानौसाचं - लाडा नवसाचं
- जीवाले - जीवाला (here-mind)
- डोया - डोळा (eye)
- तिफन - धान्य पेरणीसाठीचे तीन नळकांड्या असलेले शेतीचे अवजार
- नौसाचं - नवसाचं
- रगत - रक्त (blood)
- सपन - स्वप्न (dream)
- सांजीले - सायंकाळी (evening)
- हानते - हाकतो (moving forward)
- हिर्व - हिरवं (green)
- काकरात - शेतात
- कस्तुरी - कस्तुरीमृगाच्या नाभीत उत्पन्न होणारे एक सुगंधी द्रव्य (an aromatic substance)