Chapter 14 काळे केस

Chapter 14 काळे केस

Textbook Questions and Answers

कृति

कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 14 काळे केस 8


उत्तर:

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 14 काळे केस 5
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 14 काळे केस 6

प्रश्न 2.
कारणे शोधा.
(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ………………..”
(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण …………………”
उत्तर:

(i) लेखकांना स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.
(ii) लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.

प्रश्न 3.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(अ) केसभर विषयांतर ……………………..
(आ) केसांत पांढरं पडण्याची लागण ……………………..
(इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड ……………………..
उत्तर:

(i) केसभर विषयांतर – अगदी थोडेसुद्धा विषयांतर.
(ii) केसांत पांढरं पडण्याची लागण – केस पांढरे होणे

प्रश्न 4.
खालील शब्दसमूहांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा.
वाक्प्रचार – अर्थ

(अ) गुडघे टेकणे. – ………………………………
(आ) खनपटीला बसणे. – ………………………………
(इ) तगादा लावणे. – ………………………………
(ई) निकाल लावणे. – ………………………………
(उ) पिच्छा पुरवणे. – ………………………………

प्रश्न 5.
खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.
(i) निष्णात,
(ii) झिलई,
(iii) नित्यनेम,
(iv) लहरी,
(v) तगादा
उत्तर:

(i) माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे.
(ii) झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात.
(iii) मधू नित्यनेमाने व्यायाम करतो.
(iv) आपण कधी लहरी वागू नये.
(v) ‘खाऊ दे’ असा छोट्या मनूने आईकडे तगादा लावला.

प्रश्न 6.
खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.

(अ) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात.
(आ) तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो.
(इ) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते.

प्रश्न 7.
खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.
(अ) मातीच्या ढिगात सुख-दुःखांचे माणिकमोती आढळतात.
(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.
(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.
(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.
उत्तर:

(अ) सुख – दुःख
(आ) गर्भित – उघड
(इ) स्तुती – निंदा
(ई) प्रश्न – उत्तर.

प्रश्न 8.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) अवरोह x
(आ) अल्पायुषी x
(इ) सजातीय x
(ई) दुमत x
(उ) नापीक x

प्रश्न 9.
स्वमत.
(अ) लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर :

खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात.

वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत, माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखादया क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे, तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.

(आ) परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :

लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले-बागडलेले लोक भेटायचे.

जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली-घेतली जायची. लेखकांकडे आकर्षक बाब होती. त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.

(इ) प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.
उत्तर:

मला माझा अभ्यास रात्री करायला खूप आवडते. सर्व जग निवांत झालेले असते. कुठेही खट्टखुट्ट होत नाही. आपण आणि फक्त आपला अभ्यास, मग कितीही जागरणं करावी लागली, तरी मला त्याचा थोडासुद्धा त्रास होत नाही, माझी एक मैत्रीण आहे. तिला सकाळी लवकर उठून, आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते. सकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत ती सलग’ शांतपणे अभ्यास करू शकते. आमच्या एका मित्राला संध्याकाळी दणकून खेळून आल्यानंतर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते. आमच्यापैकी काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसणे आवडते. कारण काय, तर सकाळी वर्गात शिकवलेले मनात ताजे असते! विशेष म्हणजे त्या त्या वेळी ज्याचा त्याचा अभ्यास चांगला होतो. म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ वेगवेगळी असते, हेच खरे.

तत्पुरुष समास
खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.

सामासिक शब्द – विग्रह – विभक्ती
(अ) सभागृह – सभेसाठी गृह – …………………………………
(आ) कलाकुशल – कलेत कुशल – …………………………………
(इ) ग्रंथालय – ग्रंथांचे आलय – …………………………………
(ई) कष्टसाध्य – कष्टाने साध्य – …………………………………
(उ) रोगमुक्त – रोगापासून मुक्त – …………………………………

विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये-
(अ) समासातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते.
(आ) विग्रह करताना प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्ती लागते.
ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास ‘विभक्ती तत्पुरुष समास’ म्हणतात.

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दांचा विग्रह करा.
(अ) आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.
(आ) सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.
(इ) प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.
(ई) पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.

Additional Important Questions and Answers

प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती १: (आकलन)

प्रश्न 1.
पुढील आलंकारिक शब्दांचा सूचित अर्थ लिहा :
(i) मातीचा ढिगारा : ……………………………
(ii) माणिक मोती : ……………………………
(iii) सुस्कारे सोडले : ……………………………
(iv) घड्याळाचे काटे मागे फिरवणे : ……………………………
उत्तर:

(i) मातीचा ढिगारा : कित्येक वर्षांपूर्वीचे दिवस,
(ii) माणिक मोती : सुखदुःखांच्या आठवणी.
(iii) सुस्कारे सोडले : जुने दिवस संपल्याचे दुःख, विषाद.
(iv) घड्याळाचे काटे मागे फिरवणे : भूतकाळात जाणे,

प्रश्न 2.
‘तुमचे केस अजूनही काळे कसे राहिले आहेत?’ या प्रश्नामागील गर्भित प्रशंसा लिहा.
उत्तर:

तुमचे केस अजूनही काळे कसे राहिले आहेत, ही आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे.

प्रश्न 3.
आकृती पूर्ण करा :

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 14 काळे केस 1
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 14 काळे केस 2

प्रश्न 4.
‘तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? ‘ प्रश्नामागील अभिप्रेत अर्थ :
(i) …………………………………
(ii) …………………………………
उत्तर:

(i) तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत, हा प्रश्न विचारणाऱ्याला त्याचे उत्तर हवेच असते, असे नाही.
(ii) मात्र, ती गोष्ट आश्चर्याची व भाम्याची आहे, असे सुचवायचे असते.

कृती २ : (आकलन)

प्रश्न 1.
खनपटीला बसणाऱ्या गृहस्थाच्या मनातला हेतू स्पष्ट करा.
उत्तर:

लेखकांच्या खेनपटीला बसलेल्या गृहस्थाचे केस पिकले होते. तो कलप लावी. पण केसांचा मूळ रंग मिळवणे अशक्य असते. त्यातून सुटण्याचा मार्ग त्या गृहस्थाला हवा होता.

प्रश्न 2.
खनपटीला बसलेल्या गृहस्थाला लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण लिहा.
उत्तर:

खूप विचार करण्यानेही केस पांढरे होतात. खनपटीला बसलेला गृहस्थ विचारी आहे, असे अप्रत्यक्षपणे सुचवून त्याला खुश करण्याचा लेखकांचा प्रयत्न होता.

प्रश्न 3.
पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :
(i) केसांचा बुजलेला पांढरेपणा –
उत्तर:

(i) केसांचा बुजलेला पांढरेपणा – कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो.

कृती ३ : (व्याकरण)

प्रश्न 1.
पुढील वाक्यातील अव्यये शोधून लिहा :
मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे, तर गॅलरीतल्या खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो.
उत्तर:

उशिरा, आणि, वर, तर, पुढे, रोज.

प्रश्न 2.
पुढील शब्दांना लागू होतील अशी कोणतीही प्रत्येकी दोन विशेषणे लिहा :
(i) विचार
(ii) कल्पना
(iii) मन.
उत्तर:

(i) विचार : घातकी, सुंदर.
(ii) कल्पना : नवीन, जुनी.
(iii) मन : प्रसन्न, निराश.

प्रश्न 3.
योग्य नामाच्या ठिकाणी सर्वनाम लिहून वाक्ये क्र. (ii), (iii), (iv) पुन्हा लिहा :
(i) एकदा एक गृहस्थ माझ्या खनपटीला बसले.
(ii) मी त्या गृहस्थांकडे आश्चर्याने पाहिले.
(iii) ते गृहस्थ मला केसभर विषयांतर करू देत नव्हते.
(iv) मला त्या गृहस्थांची चेष्टा करण्याची लहर आली.
उत्तर:

(ii) मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले.
(iii) ते मला केसभर विषयांतर करू देत नव्हते.
(iv) मला त्यांची चेष्टा करण्याची लहर आली.

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
कल्पना हीदेखील लक्ष्मीप्रमाणे लहरी असते,’ या विधानाबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर :

लक्ष्मी ही वैभवाची देवी. ती प्रसन्न व्हावी, आपण श्रीमंत व्हावे, असे प्रत्येक माणसाला वाटते. पण प्रत्येक माणूस कधीही श्रीमंत होत नाही. किंबहुना लक्ष्मीची कितीही आराधना केली तरी ती प्रसन्न होत नाही. लक्ष्मी कधी प्रसन्न होईल, याचा कधीही नेम नसतो. तसेच कल्पनेचे आहे. एखादी कल्पना सुचावी म्हणून १ खप घडपड केली, तिच्या मागे लागलो, तरीही ती प्रसन्न होत नाही.

याचे कारण एखादी कल्पना सुचण्याचा एखादा ठरावीक मार्ग नसतो. एखादी कल्पना कोणत्या विशिष्ट परिस्थितीत सुचते, हे सांगता येत नाही. मात्र तिच्याकडे पाठ फिरवल्यावर ती अचानक केव्हातरी प्रकट होते. म्हणजे, मनाला मुक्त सोडले तरच नवनवीन कल्पना स्फुरतात. पक्ष, पंथ, जात, परंपरा, धर्म वगैरेंच्या चौकटीमध्ये आपण विचार करीत राहिलो तर नवीन काहीही सुचणार नाही. म्हणून समाजात स्वातंत्र्याचे वातावरण असले पाहिजे. मुक्त वातावरणातच समाजाचा व संस्कृतीचा विकास होतो.

उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती १ : (आकलन)

प्रश्न 1.
स्वत:चे विचार करण्याच्या वेळेबाबतचे लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण लिहा.
उत्तर:

लेखक असे सांगतात की, त्यांची विचार करण्याची विशिष्ट अशी वेळ ठरलेली नाही. खरे तर कोणीही अमुक एका वेळेला विचार करतो आणि अमुक एका वेळेला विचार करीत नाही, असे कधीही नसते. ते स्वतः सदासर्वकाळ विचार करीत असतात. कोणत्याही लेखकांना तर त्याची गरजच असते. लेखनासाठी त्यांना नवनवीन कल्पना हव्या असतात. काही कल्पना अर्धवट लिहून झालेल्या असतात. त्या पूर्ण करायच्या असतात. गाढ झोपेचा काळ सोडला तर लेखक सतत विचारच करीत असतात.

प्रश्न 2.
आकृत्या पूर्ण करा :

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 14 काळे केस 4
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 14 काळे केस 7

कृती २ : (आकलन)

प्रश्न 1.
चूक की बरोबर ते लिहा :
(i) लेखनाची वेळ सांगता येते.
(ii) विचार करण्याची वेळ सांगता येते.
(iii) विचार करण्याची आवडती वेळ सांगता येते.
उत्तर:

(i) लेखनाची वेळ सांगता येते. – [बरोबर]
(ii) विचार करण्याची वेळ सांगता येते.
(iii) विचार करण्याची आवडती वेळ सांगता येते.

प्रश्न 2.
पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :
(i) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड –
(ii) मुके शब्द
(iii) कल्पनांच्या आकृत्या पूर्ण करणे
(iv) लक्ष्मीसारखी लहरी
उत्तर:

(i) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड – [प्रकाशामुळे चमकणारे झाड]
(ii) मुके शब्द – [उच्चारले न गेलेले शब्द]
(iii) कल्पनांच्या आकृत्या पूर्ण करणे – [अर्धवट सुचलेल्या कल्पना पूर्ण करणे.]
(iv) लक्ष्मीसारखी लहरी – [खूप लहरी]

कृती ३ : (व्याकरण)

प्रश्न 1.
या उताऱ्यात ‘गुडघे टेकणे’ हा वाक्प्रचार आहे. अशा प्रकारचे शरीराच्या अवयवांवरून तयार झालेले चार अन्य वाक्प्रचार लिहा.
उत्तर:

(i) डोकेफोड करणे.
(ii) पाय धरणे.
(ii) पोटात धस्स होणे.
(iv) खांद्याला खांदा लावणे.

प्रश्न 2.
कंसांतील सूचनांप्रमाणे कृती करा :
(i) मी सकाळी …….. उठतो. (गाळलेल्या जागी ‘उशिरा’ हे क्रियाविशेषण वगळून अन्य कोणतेही योग्य क्रियाविशेषण योजून वाक्य पुन्हा लिहा.)
(ii) उत्तर थोडेसे चमत्कारिक आहे. (अधोरेखित शब्दाच्या जागी अन्य कोणतेही योग्य विशेषण योजून वाक्य पुन्हा लिहा.)।
(iii) या निश्चयाने मी स्वत:च बरेच दिवस निरीक्षण केले. (अधोरेखित नामांचे अनेकवचन योजून वाक्य पुन्हा लिहा.)
उत्तर:

(i) मी सकाळी लगबगीने उठतो.
(ii) उत्तर थोडेसे किचकट आहे.
(iii) या निश्चयांनी आम्ही स्वत:च बरेच दिवस निरीक्षणे केली.

प्रश्न 3.
विशेषणे व नामे यांचे वेगळे गट करा :
विचार, वेळ, अमुक, प्रश्न, नव्या, अर्धवट, निकाल, निरोप, पूर्ण, जास्त, निश्चय, उंच, तिसरा, कल्पना, उभ्या, झोप.
उत्तर:

(i) विशेषणे : अमुक, नव्या, अर्धवट, पूर्ण, जास्त, उंच, तिसरा, उभ्या.
(ii) नामे : विचार, वेळ, प्रश्न, निकाल, निरोप, निश्चय, कल्पना, झोप.

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
पुढील जोडशब्द पूर्ण करा :
(i) उंच ……………………………………”
(ii) आडव्या ……………………………………”
(iii) माणिक ……………………………………..”
(iv) नित्य ……………………………………”
उत्तर:

(i) उंचसखल
(ii) आडव्याउभ्या
(iii) माणिकमोती
(iv) नित्यनेम.

प्रश्न 2.
पुढील शब्दांच्या अक्षरांमधून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :
(i) सदासर्वकाळ →
(ii) स्नानगृहात →
उत्तर: :

(i) सदासर्वकाळ → [सदा] [सर्व] [काळ] [सकाळ]
(ii) स्नानगृहात → [स्नान] [हात] [तन] [गृहात]

प्रश्न 3.
लेखननियम :
(१) पुढील शब्द अचूक लिहा :
(i) समाजिक /सामाजीक / सामाजिक / समाजीक.
(ii) क्रीयाशील / क्रियाशील क्रीयाशिल / क्रियाशिल.
(iii) अस्तित्व / अस्तित्त्व / आस्तीत्व / अस्तीत्व.
(iv) दैनंदीनी / दैनंदिनि / देनंदिनी / दैनंदिनी.
(v) प्रसीद्ध / परसिद्ध / प्रसिद्ध / प्रसिद्द.
उत्तर:

(i) सामाजिक
(ii) क्रियाशील
(iii) अस्तित्व
(iv) दैनंदिनी
(v) प्रसिद्ध.

प्रश्न 4.
पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(i) कधि गजारी वृष्टि सुरु असते.
(ii) पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात,
उत्तर:

(i) कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते.
(ii) पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात.

प्रश्न 5.
विरामचिन्हे :

(१) पुढील वाक्यांमधील विरामचिन्हे ओळखा :
(i) ते म्हणाले, “लक्षात नाही आलं!”
(ii) “आता कसं बोललात?” ते म्हणाले.
उत्तर:

(i) [ , ] → स्वल्पविराम [ ” ” ] → दुहेरी अवतरणचिन्ह [ ! ] → उद्गारचिन्ह
(ii) [ ” ” ] → दुहेरी अवतरणचिन्ह
[ ? ] → प्रश्नचिन्ह [ . ] → पूर्णविराम.

(२) पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला : (सराव कृतिपत्रिका-३)
(i) तुम्ही खरं सांगत नाही केस आपोआप काळे राहतात काय
(ii) तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत (मार्च १९)
उत्तर:

(i) तुम्ही खरं सांगत नाही. केस आपोआप काळे राहतात काय?
(ii) “तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत?”

प्रश्न 6.
पारिभाषिक शब्द :

पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांसाठी पर्यायी मराठी प्रतिशब्द लिहा :
(i) Mortgage – ……………………………………….
(ii) Medical Examination – ……………………………………….
(iii) Government Letter – ……………………………………….
(iv) Patent – ……………………………………….
उत्तर:

(i) Mortgage – गहाण, तारण.
(ii) Medical Examination – वैदयकीय तपासणी.
(iii) Government Letter – शासकीय पत्र.
(iv) Patent – एकस्व / अधिहक्क,

प्रश्न 7.
अकारविल्हे / भाषिक खेळ :
पुढील शब्द अकारविल्हेनुसार लावा :
(i) रंगपंचमी → अभिप्राय → स्वरूप → प्रसन्नता
(ii) पांढरे → केस → काळे → केले.
उत्तर:

(i) अभिप्राय → प्रसन्नता → रंगपंचमी → स्वरूप
(ii) काळे → केले → केस → पांढरे.

काळे केस वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

  • घड्याळाचे काटे मागे फिरवणे : भूतकाळात जाणे.
  • सुस्कारे सोडणे : विषाद व्यक्त करणे.
  • खनपटीला बसणे : खूप आग्रह धरणे, शेवटास नेणे.
  • तगादा लावणे : पुन्हा पुन्हा सतत आग्रह धरीत राहणे.
  • पिच्छा पुरवणे : खूप आग्रह धरणे, शेवटास नेणे.
  • निकाल लावणे : निर्णयापर्यंत येणे.
  • गुडघे टेकणे : शरण जाणे.