Chapter 14 बीज पेरले गेले
Textbook Questions and Answers
   प्रश्न 1.   
   कारणे लिहा. 
   (अ) लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण ………………………….   
   उत्तर:   
   लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने मन घट्ट करून लेखकाच्या आई -वडिलांनी मुलांचा निरोप घेतला.
   (आ) लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली. कारण ………………………….   
   उत्तरः   
   लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण लेखकांचे चुलते वाय.एम.सी.ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. लेखकही शिक्षणासाठी काकांकडे राहत होते. त्या कम्पाऊंडमध्ये अनेक सभासद खेळण्यासाठी येत असत.
   (इ) ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण ………………………….   
   उत्तरः   
   ‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे लेखकाला वाटले कारण लेखकाला क्रिकेट खेळ आवडू लागला होता. त्यांच्या कम्पाऊंडमध्ये सभासद खेळण्यासाठी येत त्यावेळी लेखकालाही चेंडू फेकण्यासाठी बोलावले जाई आणि लेखकाला हा खेळ आवडत असल्यामुळे तेही या कामासाठी तयार असत.
   (ई) दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण ………………………….   
   उत्तरः   
   दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे कारण तुटपुंज्या पगारात लेखकाचे वडील घरखर्च भागवत होते. त्यामुळे लेखकासाठी खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.
   प्रश्न 2.   
   आकृती पूर्ण करा.   
   
   उत्तरः   
    
   
   
   प्रश्न 3.   
   ओघतक्ता तयार करा.   
    
   
   उत्तरः   
   
   प्रश्न 4.   
   खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.   
   (i) सही   
   (ii) निवास   
   (iii) क्रीडा   
   (iv) प्रशंसा   
   उत्तरः   
   (i) सही – स्वाक्षरी   
   (ii) निवास – घर   
   (iii) क्रीडा – खेळ   
   (iv) प्रशंसा – स्तुती
   प्रश्न 5.   
   खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पन्हा लिहा. (आनंद गगनात न मावणे, हेवा वाटणे, खूणगाठ बांधणे, नाव उज्ज्वल करणे)
   (अ) मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.   
   उत्तरः   
   मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनाशी खूणगाठ बांधली.
   (आ) दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.   
   उत्तरः   
   अचानक दारात मामा-मामींना बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
   (इ) आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.   
   उत्तरः   
   आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळांत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
   (ई) मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.   
   उत्तर:   
   मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा हेवा वाटला.
   प्रश्न 6.   
   स्वमत. 
   (अ) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.   
   उत्तरः   
   वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.
दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.
अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.
   (आ) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.   
   उत्तर:   
   लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.
   (इ) तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.   
   उत्तर:   
   लेखक जेव्हा शिक्षणासाठी काकांकडे राहत होते त्यावेळी क्रिकेट खेळ त्यांना आवडू लागला. ते वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये सभासदांसोबत खेळत असत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करत, आपणही यांच्या सारखे खेळावे. एक क्रिकेट खेळाडू व्हावे असे त्यांनी मनाशी ठरवले. मॅच पाहण्यासाठी ते मित्रांसोबत जात, त्यांच्यांशी क्रिकेटच्या खेळाच्या गप्पा मारत, इतकेच नव्हे तर वडिलांनीही त्यांचे खेळाचे वेड पाहून जुनी बॅट खरेदी करून दिली. तसेच आंतरशालेय स्पर्धेत १०० धावांचा विक्रम त्यांनी केला. अशाप्रकारे क्रिकेटचे बीज लेखकांत उगवले.
   (ई) प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा.   
   उत्तर:   
   प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ज्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे सुखी, समाधानी जीवन प्राप्त न होणे. अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगणे होय.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी धैर्य, जिद्द याची गरज असते जी गोष्ट पूर्ण करायची आहे, त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, स्वत:चा आत्मविश्वास विकसित करणे, मेहनतीशिवाय यश नाही. त्यामुळे श्रमाला महत्त्व देणे. ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणे या गोष्टींची आवश्यकता असते.
Important Questions and Answers
   प्रश्न १. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.   
   कृती १ : आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   कृती पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   कारणे लिहा. 
   (i) वडिलांना मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्हते.   
   उत्तर:   
   लेखकाचे वडील त्या वेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. त्यामुळे घरखर्च भागवताना फार त्रास होत असे म्हणून पैशाअभावी ते मुलांना खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.
   (ii) लेखक व त्यांच्या थोरल्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.   
   उत्तर:   
   लेखकाचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची बदली वडगावला झाली. चांगले शिकावे, मोठे ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे यासाठी त्यांना व त्यांच्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.
   प्रश्न 3.   
   उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा. 
   (i) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.   
   (ii) वडिलांची बदली वडगावला झाली.   
   (iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.   
   (iv) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.   
   उत्तर:   
   (i) वडिलांची बदली वडगावला झाली.   
   (ii) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.   
   (iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.   
   (iv) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.
   प्रश्न 4.   
   एका वाक्यात उत्तरे लिहा. 
   (i) लेखकाचा जन्म कुठे झाला?   
   उत्तर:   
   लेखकाचा जन्म पुण्यात झाला.
   (ii) लेखकाचे वडील कुठल्या खात्यामध्ये नोकरी करत?   
   उत्तर:   
   लेखकाचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरी करत.
   (iii) वडिलांची बदली कोठे झाली?   
   उत्तरः   
   वडिलांची बदली वडगावला झाली.
   (iv) लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी कोठे रहावे लागले ?   
   उत्तर:   
   लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी पुण्यातच त्यांच्या काकांकडे रहावे लागले.
   प्रश्न 5.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) दुसऱ्या मुलांच्या हातात ……………………….. पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे. (वही, पेन, खेळणी, विटी)   
   (ii) तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती ……………………….. प्रेमळ कुशीत. (आईच्या, ताईच्या, बायकोच्या, बाबांच्या)   
   (iii) ……………………….. नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. (शालेचे, गावाचे, घराण्याचे, देशाचे)   
   उत्तर:   
   (i) खेळणी   
   (ii) आईच्या   
   (iii) घराण्याचे
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   उत्तरे लिहा.   
   (i) पोलीस खात्यात नोकरी करणारे – [लेखकाचे वडील]   
   (ii) लेखक व भाऊ शिक्षणासाठी यांच्याकडे राहिले – [काकांकडे]
   प्रश्न 2.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 3.   
   खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा.   
   (i) बॅट – लाकडी फळी   
   (ii) स्टंप – यष्टी   
   (iii) बॉल – चेंडू   
   (iv) कॅम्प – शिबीर
   प्रश्न 4.   
   चूक की बरोबर ते लिहा. 
   (i) वडिलांची बदली मडगावला झाली.   
   (ii) लेखक खेळकर होते.   
   (iii) भाऊ व लेखक यांना शिक्षणासाठी मामांकडे रहावे लागले.   
   (iv) मुलांनी ऑफिसर व्हावे अशी मामीची इच्छा होती.   
   उत्तर:   
   (i) चूक   
   (ii) बरोबर   
   (iii) चूक   
   (iv) चूक
कृती ३ : स्वमत
   प्रश्न 1.   
   लेखकाच्या आईवडिलांनी मन घट्ट करून का निरोप घेतला असेल? तुमच्या शब्दांत सांगा.   
   उत्तरः   
   प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपले मूल मोठे व्हावे, आपले व आपल्या घराण्याचे नाव त्याने उज्ज्वल करावे. मुलांच्या नावाने आपण ओळखले जावे. प्रत्येक पालकांची ही एकच इच्छा असते की, आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्याची प्रसिद्धी व्हावी. त्याप्रमाणेच लेखकांच्या आईवडिलांचीही लेखक व त्यांचे भाऊ मोठे व्हावे, मोठे ऑफिसर व्हावे, आपले नाव उज्ज्वल करावे ही इच्छा होती. लेखकांच्या वडिलांची बदली वडगावला झाल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना काकांकडे पुण्यातच ठेवण्यात आले. आपल्या मुलांना सोडून राहणे आईवडिलांना त्रासदायक होते; परंतु त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मन घट्ट करून लेखकाच्या आईवडिलांनी निरोप घेतला असेल असे मला वाटते.
प्रश्न २. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   कृती पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   एका वाक्यात उत्तरे लिहा. 
   (i) सर्व खेळात लेखकांस कोणता खेळ आवडत असे?   
   उत्तर :   
   सर्व खेळात लेखकांना क्रिकेट खेळ आवडत असे.
   (ii) लेखकाचे काका कुठे राहत?   
   उत्तर :   
   लेखकाचे काका पुण्याच्या वाय.एम.सी.ए. कंपाऊंडमध्ये राहत.
   (iii) लेखकांनी काय व्हायचे ठरविले?   
   उत्तर :   
   लेखकांनी क्रिकेट खेळाडू व्हायचे ठरविले.
   (iv) लेखक कोणाची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे?   
   उत्तर :   
   लेखक सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे.
   प्रश्न 3.   
   उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा. 
   (i) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.   
   (ii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.   
   (iii) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.   
   (iv) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत,   
   उत्तर:   
   (i) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.   
   (ii) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.   
   (iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.   
   (iv) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.
   प्रश्न 4.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. 
   (i) साहजिकच याचा …………………………… माझ्या बालमनावर होई. (संस्कार, परिणाम, आनंद, दुःख)   
   (ii) कोणी नाही असे पाहून ते मला …………………………… फेकायला (दगड, गोळा, चेंडू, भाला)   
   (iii) दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी …………………………… आनंदाने मदत करत असे. (खेळाडूंना, पोलिसांना, ग्राऊंड्समनला, पंचना)   
   उत्तर:   
   (i) परिणाम   
   (ii) चेंडू   
   (iii) ग्राऊंड्समनला
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   उत्तरे लिहा 
(i) खेळासाठी प्रसिद्ध संस्था – वाय. एम. सी. ए.
(ii) लेखकाचा आवडता खेळ – क्रिकेट
   प्रश्न 3.   
   चूक की बरोबर ते लिहा.
   (i) काका सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.   
   (ii) क्रिकेट खेळाडू बनण्याची लेखकाची इच्छा होती.   
   (iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी लेखकास मिळाली.   
   (iv) लेखकाचे मामा रात्री प्रार्थना व अभ्यास घेत.   
   उत्तर:   
   (i) चूक   
   (ii) बरोबर   
   (iii) बरोबर   
   (iv) चूक
   प्रश्न 4.   
   योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा, 
   (i) शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन   
   (अ) मी प्रथम सिनेमागृहात हजर होत असे.   
   (आ) मी प्रथम मंदिरात हजर होत असे.   
   (इ) मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.   
   (ई) मी प्रथम नाट्यगृहात हजर होत असे.   
   उत्तर :   
   शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.
कृती ३ : स्वमत
   प्रश्न 1.   
   ‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन!’ असे लेखकाला का वाटले याबाबत तुमचे मत लिहा.   
   उत्तरः   
   लेखक शिक्षणासाठी जेव्हा काकांकडे राहण्यास गेले. त्यावेळी त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. काका वाय, एम. सी. ए. कंपाऊंड मध्ये राहत होते. तेथे वाय.एम.सी.ए.चे सभासद क्रिकेट खेळण्यासाठी येत असत. त्यामुळे लेखक हा खेळ पाहण्यासाठी जात असत. त्याचवेळी त्यांची क्रिकेट खेळण्याची इच्छा वाढीस लागली. शाळा सुटली रे सुटली की ते ग्राऊंडवर हजर होत असत. त्यावेळी ते सभासद लेखकास खेळण्यासाठी बोलवत. त्यांना चेंडू फेकण्यास सांगत आणि लेखकही त्या कामासाठी सदैव तयार होत असत.
अशाप्रकारे क्रिकेटची आवड आणि प्रत्यक्ष खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद व्यक्त करताना लेखक ‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे मत व्यक्त करतात.
   प्रश्न ३. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.   
   कृती १ : आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   कृती पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   कारणे लिहा. 
   (i) वडिलांनी संतापाने लेखकास छड्या मारल्या.   
   उत्तरः   
   लेखक एके दिवशी शाळा चुकवून ग्राऊंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहण्यास गेले. त्यामुळे वडिलांनी लेखकास छड्या मारल्या.
   (ii) लेखकांस त्यांचे वडील खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.   
   उत्तरः   
   लेखकांचे वडील स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे ते लेखकांस खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.
   प्रश्न 3.   
   घटनांचा क्रम लावा. 
   (i) लेखकाची धडपड सुरू झाली.   
   (ii) मैदानावर कनात घालण्यास आली.   
   (iii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.   
   (iv) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.   
   उत्तर:   
   (i) मैदानावर कनात घालण्यास आली.   
   (ii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.   
   (iii) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.   
   (iv) लेखकाची धडपड सुरू झाली,
   प्रश्न 4.   
   सातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. 
   (i) माझे ………………………….. स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. (वडील, काका, मामा, तात्या)   
   (ii) मी तसाच ती बॅट घेऊन ………………………….. दाखवत सुटलो. (आईला, मित्रांना, खेळाडूंना, सभासदाना)   
   (iii) ………………………….. साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेसचा एक संघ पुण्यात आला होता. (१९६०, १९४०, १९४५, १९८३)   
   उत्तर:   
   (i) वडील   
   (ii) मित्रांना   
   (iii) १९४५
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   उत्तरे लिहा. 
(i) लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर वाय. एम. सी. ए. चे – उद्गार काढणारे खेळाडू
(ii) वडील या खेळात चॅम्पियन होते – व्हॉलीबॉल
   प्रश्न 2.   
   खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा. 
(i) चॅम्पियन – सर्वोत्कृष्ट खेळाडू
(ii) ग्राऊंड – मैदान
   प्रश्न 3.   
   चूकी की बरोबर ते लिहा. 
   (i) वडील फूटबॉल चॅम्पियन होते.   
   (ii) पूना क्लब ग्राऊंडवर एक मॅच झाली.   
   (iii) आईने लेखकास संतापाने छड्या मारल्या.   
   (iv) वडिलांनी जुनी बॅट विकत घेतली.   
   उत्तर:   
   (i) चूक   
   (ii) बरोबर   
   (iii) चूक   
   (iv) बरोबर
   प्रश्न 4.   
   योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 
   (i) ………………………….. ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.   
   (अ) पूना क्लबच्या.   
   (आ) मुंबई क्लबच्या.   
   (इ) सातारा क्लबच्या.   
   (ई) महाराष्ट्र क्लबच्या.   
   उत्तर:   
   पूना क्लबच्या ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.
   (ii) त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा …………………………. .   
   (अ) तीस रूपये होता.   
   (आ) शंभर रूपये होता.   
   (इ) चोवीस रूपये होता.   
   (ई) दहा रूपये होता.   
   उत्तरः   
   त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा चोवीस रूपये होता.
   प्रश्न 5.   
   एका वाक्यात उत्तरे लिहा. 
   (i) लेखकांचे वडील कोणत्या खेळात चॅम्पियन होते?   
   उत्तर:   
   लेखकांचे वडील ‘व्हॉलीबॉल’ या खेळात चॅम्पियन होते.
   (ii) लेखकांच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट किती रूपयांची होती?   
   उत्तर:   
   लेखकाच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट सहा रूपयांची होती.
   प्रश्न ४. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.   
   कृती १ : आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   कृती पूर्ण करा. 


   प्रश्न 2.   
   उत्तरे लिहा. 
(i) मॅच संपल्यावर यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते – खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी.
(ii) या तासाला लेखकांच्या स्वाक्षरीने वही भरत असे – गणित
   प्रश्न 3.   
   घटनांचा क्रम लावा. 
   (i) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.   
   (ii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.   
   (iii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.   
   (iv) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.   
   उत्तर:   
   (i) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.   
   (ii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.   
   (iii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.   
   (iv) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.
   प्रश्न 4.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपणही एक मोठे …………………………….. व्हावे. (कलाकार, पंच, खेळाडू, नट)   
   (ii) माझ्या मनात क्रिकेटचे …………………………….. पेरले गेले आणि उगवले ते असे. (बीज, रोप, स्थान, रहस्य)   
   उत्तर:   
   (i) खेळाडू   
   (ii) बीज
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   कारणे लिहा. 
   विद्यार्थी व शिक्षकांनी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.   
   उत्तरः   
   लेखकांनी आंतरशालेय सामन्यात १०० धावा केल्या. त्यांचे नाव शाळेच्या बोर्डावर झळकले म्हणून विदयार्थी व शिक्षकांनी कौतुकासाठी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(i) विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य …………………………..
   (अ) मनाला लागले.   
   (आ) काळजात भिडले.   
   (इ) आनंद मिळाला.   
   (ई) सुंदर होते   
   उत्तरः   
   विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य काळजात भिडले.
   प्रश्न 3.   
   एका वाक्यात उत्तरे लिहा. 
   (i) क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला काय वाटले?   
   उत्तरः   
   क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला धन्य-धन्य वाटले.
   (ii) लेखक दिवसभर कोठे बसून मॅच पाहत हाते?   
   उत्तरः   
   लेखक दिवसभर झाडावर बसून मॅच पाहत होते.
स्वाध्याय कृती
*(६) स्वमत
   (१) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवलेले प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.   
   उत्तरः   
   वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.
दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.
अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.
   (२) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.   
   उत्तर:   
   लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.
बीज पेरले गेले Summary in Marathi
बीज पेरले गेले पाठपरिचय
‘बीज पेरले गेले’ हा पाठ लेखक ‘चंदू बोर्डे’ यांनी लिहिला आहे. या पाठात त्यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले हे सांगितले आहे.
बीज पेरले गेले Summary in English
‘Bij Perle gele’ is written by Chandu Borde. He speaks of his childhood memories, including how he got inclined towards playing cricket.
बीज पेरले गेले शब्दार्थ
- कष्ट – मेहनत – (hard work)
- यथेच्छ – मन भरे पर्यंत, मनसोक्त – (to one’s heart’s content)
- संध्याकाळ – सांजवेळ – (evening time)
- आऊट – बाद करणे – (out)
- इच्छा – मनिषा, मनोकामना – (wish)
- पॅक्टिस – सराव – (practice)
- ग्राऊंड – मैदान – (a playground)
- स्तुती – कौतुक, प्रशंसा – (praise)
- मित्र – सखा – (friend)
- संताप – राग – (violent anger)
- क्लब – मंडळ – (club)
- मनसोक्त – मनापासून – (from one’s heart)
- स्वाक्षरी – सही – (signature)
- बालमित्र – लहानपणीचे सवंगडी – (childhood friends)
- खेळकर – (asportive)
- खोडकर – खोड्या करणारा – (naughty)
- उपद्व्यापी – खोडकर, त्रासदायक – (mischievous)
- तुटपुंजा – गरजेपेक्षा कमी, अपुरा, पुरेसा नसलेला – (meagre)
- परिस्थिती – (condition)
- खेळणी – खेळण्याच्या वस्तू (बाहूली, चेंडू इ.) – (a toy)
- विटीदांडू – विटी व दांडू घेऊन खेळायचा खेळ – (the game of trapstick)
- पतंग – (akite)
- तक्रार – गा–हाणे – (complaint)
- पाऊल – पाय, पाऊलखूण – (footmark, a foot)
- चापटपोळी – थप्पड – (slap)
- परिणाम – प्रभाव – (an effect)
- हट्ट – हेका – (obstinacy)
- उद्देश – (intention)
- सभासद – सदस्य – (a member)
- प्रयत्न – मोठा यत्न – (an attempt)
- प्रार्थना – आराधना – (a prayer)
- उद्गार – बोल, उच्चार – (utterance, word)
- मासिक पगार – महिन्याला मिळणारा पगार – (salary)
बीज पेरले गेले बाकाचार
- भुरळ पडणे – आवड निर्माण होणे
- शाबासकीची थाप देणे – कौतुक करणे
- आनंद गगनात मावेनासा होणे – खूप आनंद होणे
- धन्य वाटणे – कृतकृत्य होणे
- खूणगाठ मनाशी बांधणे – पक्का निश्चय करणे
- छाती आनंदाने फुगणे – खूप आनंद होणे
- नाव उज्ज्वल करणे – कीर्ती मिळवणे/प्रसिद्धी मिळणे