Chapter 14 संतवाणी

Chapter 14 संतवाणी

Textbook Questions and Answers

सुविचार

प्रश्न 1.
संकटांना घाबरून न जाता जो जीवन यशस्वी करतो तोच खरा पराक्रमी होय.

प्रश्न 2.
मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.

प्रश्न 3.
नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया होय.

आम्ही कथा लिहितो.

विदयार्थ्यांनो, तुम्हांला गोष्ट ऐकायला, वाचायला, सांगायला आवडते ना? तुम्हांला गोष्ट लिहायलाही नक्कीच आवडेल. आज तुम्ही गोष्ट लिहिणार आहात. त्याचे नीट आकलन करून घ्या. कोणता प्रसंग आहे, कोण बोलत आहे, कोणाशी बोलत आहे, त्यांच्यात कोणता संवाद चालला असेल? या सगळ्यांची कल्पना करा. त्या त्या प्रसंगामधील पात्रांचा संवाद तुमच्या वहीत लिहा. अगदी तुम्हांला पाहिजे तसा. तुम्हांला कोणते शब्द वापरावे लागतील? वाक्यरचना कशी करावी लागेल? कोणता काळ वापरावा लागेल? या सर्वांचा मनाशी विचार करा. गोष्ट लिहून झाल्यावर, त्यासंदर्भात शिक्षकांशी, मित्रांशी किंवा आईबाबांशी चर्चा करा. कथा लिहून झाल्यावर त्यास योग्य शीर्षक दया.

प्रश्न 1.


उत्तरः

गर्वाचे घर खाली

सुंदरवनात सगळे प्राणी गुण्यागोविंदाने रहात होते. एकदा एक हरिण चरता चरता जंगलाबाहेर गेले. बाहेरील जगाशी पहिल्यांदाच संबंध आल्याने ते हरखून गेले. समोरून एक प्रवासी रेल्वे येताना हरिणाला दिसली. ती प्रवासी रेल्वे जवळ येताच हरिणाने तिच्यासोबत धावायला सुरुवात केली. ती प्रवासी रेल्वे असल्यामुळे ती एका स्टेशनावर थांबली. हरिण मात्र पुढे पुढे धावतच राहिले. आपण रेल्वेला मागे टाकल्याचा हरिणाला फार आनंद झाला.

जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे हरिणाने आपण रेल्वेला हरवले, अशी फुशारकी’ मारण्यास सुरुवात केली. सर्व प्राण्यांनी आपल्या अज्ञानामुळे हरिणावर विश्वास ठेवला. मात्र कोल्ह्याला शंका आली. त्याने हरिणाबरोबर जंगलाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. जंगलाबाहेर येताच त्यांना रेल्वे येताना दिसली. पुन्हा एकदा हरिणाने रेल्वेशी शर्यत लावली. नक्की काय घडते हे पाहण्यासाठी कोल्हाही त्या दोघांच्यामागे धावत सुटला.

पण ती रेल्वे प्रवासी रेल्वे नसून मालगाडी असल्याचे हरिणाच्या लक्षात आले नाही. ती मालगाडी कोठेही न थांबता पुढे पुढे जात राहिली. हरिण मात्र दमून जमिनीवर बसले. मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात आले. यापुढे कुठल्याही गोष्टीची फुशारकी न मारण्याचे हरिणाने मनोमन ठरवून टाकले.

शिक्षकांसाठी:

वरीलप्रमाणे विविध प्रसंग देऊन विदयार्थ्यांकडून गोष्ट तयार करून घ्यावी. मुलांकडून ती गोष्ट वाचून घ्यावी.

Additional Important Questions and Answers

कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. पक्षी जाय ……….. बाळकांसी आणी चारा ।। (दिगंबरा / दिगंतरा)
  2. वानर हिंडे झाडावरी। पिली बांधुनी …. ।। (उदरीं/ उरी)
  3. ऐसे कैसे झाले भोंदू। ……. करोनि म्हणती साधू।। (काम / कर्म)
  4. अंगा लावूनियां राख। …………. झांकुनी करिती पाप।। (डोके / डोळे)

उत्तरः .

  1. दिगंतरा
  2. उदरों
  3. कर्म
  4. डोळे.

प्रश्न 2.
पुढील अभंगांच्या ओळी पूर्ण करा.

  1. पक्षी जाय दिगंतरा। ……………….
  2. माता गुंतली कामासी। …………….
  3. …………….. । जनी वेळोवेळां पाहे.
  4. ऐसे कैसे झाले भोंदू। ………………
  5. …………….. | जळो तयांसी संगती.

उत्तर:

  1. पक्षी जाय दिगंतरा। बाळकांसी आणी चारा ।।
  2. माता गुंतली कामासी। चित्त तिचे बाळापाशीं।।
  3. तैसी आम्हांसी विठ्ठल माये। जनी वेळोवेळां पाहे ।।
  4. ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधू।।
  5. तुका म्हणे सांगों किती। जळो तयांसी संगती।।

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय कोणता?
उत्तर:
वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे.

प्रश्न 2.
माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष कोठे असते?
उत्तर:
माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष आपल्या बाळापाशी असते.

प्रश्न 3.
माकड आपल्या पिल्लाला कुठे बांधते?
उत्तर:
माकड आपल्या पिल्लाला आपल्या उदराशी, पोटाशी बांधते.

प्रश्न 4.
संत तुकाराम आपल्या अभंगातून कोणता संदेश देतात?
उत्तर:
संत तुकाराम आपल्या अभंगातून सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश देतात.

प्रश्न 5.
संत तुकाराम कोणाच्या संगतीपासून दूर राहण्यास सांगतात?
उत्तर:
संत तुकाराम स्वत:ला साधू म्हणवणाऱ्या भोंदूंपासून दूर राहण्यास सांगतात.

खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
आपल्या अभंगातून आईचे बाळावरील प्रेम संत जनाबाईंनी कोणत्या विविध उदाहरणांतून पटवून दिले आहे?
उत्तर:
आपल्या बाळांसाठी दुरदूरपर्यंत जाऊन पक्षी चारा आणतो. आकाशात घिरट्या घालून घार आपल्या पिल्लांपाशी झेप घेते. आई कितीही कामात गुंतली असली तरी तिचे सारे लक्ष आपल्या बाळापाशी असते. झाडावरून इकडून तिकडे फिरताना माकड आपल्या पिल्लाला उदराशी बांधून फिरते. अशा विविध उदाहरणांतून संत जनाबाईंनी आईचे बाळावरील प्रेम पटवून दिले आहे.

प्रश्न 2.
संत तुकाराम भोंदूगिरी करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला का देतात?
उत्तर:
अंगाला राख फासून भोंदू लोक स्वत:ला साधू म्हणवून घेतात. डोळे झाकून पापही करतात. वैराग्याचा आभास’ निर्माण करतात, मात्र सर्व विषयविकारांचा उपभोग घेतात. अशा भोंदूगिरी करणाऱ्यांच्या संगतीत राहून काहीच मिळणार नसल्याने संत तुकाराम सामान्य लोकांना भोंदूगिरी
करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
कवितेच्या ओळी पूर्ण करा.
1. घार हिंडते आकाशी। …………………… ||
2. …………………….. | भोगी विषयांचा सोहळा।।
उत्तरे:
1. घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लांपासी ।।
2. दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ।।

कविता – पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 51

पक्षी जाय दिगंतरा ……………………..
…………………….. जनी वेळोवेळां पाहे

आणि

ऐसे कैसे झाले भोंदू ………………….
…………………. जळो तयांसी संगती

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.
1. पिल्लाला उदरी बांधून फिरणारे [ ]
2. अंगाला राख लावून पाप करणारे [ ]
उत्तर:
1. वानर
2. भोंदू

खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
भोंदू लोक साधू असण्याचा आव कसा आणतात?
उत्तर:
भोंदू लोक अंगाला राख लावून, वैराग्य धारण केल्याच्या बाता करून साधू असण्याचा आव आणतात.

प्रश्न 2.
पक्षी कोणासाठी चारा आणतात?
उत्तर:
पक्षी आपल्या पिल्लांसाठी चारा आणतात.

कृती 3: काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा।
तुका म्हणे सांगो किती । जळो तयांसी संगती’
या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत पंक्ती संत तुकाराम लिखित अभंगातील असून भोंदू लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला ते देतात. भोंदू, तोतया लोक आपण मोहमायेपासून दूर असल्याचा, वैराग्य स्वीकारल्याचा आव आणतात. मात्र प्रत्यक्षात सर्व सुखचैनीच्या गोष्टी उपभोगताना दिसतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, अशा भोंदू लोकांच्या अनेक गोष्टी सांगता येतील. तेव्हा अशा लोकांची संगती न लाभलेलीच बरी. संत तुकाराम महाराजांनी भोंदू लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
खालील चौकटींतून समानार्थी शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

उत्तर:

  1. गगन – आकाश
  2. खग – पक्षी
  3. लक्ष – चित्त
  4. नयन – डोळे
  5. महान – थोर

प्रश्न 2.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. आकाश
  2. माता
  3. सुंदर
  4. पाप
  5. सुसंगत

उत्तरः

  1. पाताळ
  2. पिता
  3. कुरूप
  4. पुण्य
  5. कुसंगत

प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. कवयित्री
  2. संत
  3. माता
  4. आई
  5. साधू

उत्तरः

  1. कवी
  2. संत
  3. पिता
  4. बाबा
  5. साध्वी

प्रश्न 4.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. पिल्लू
  2. पक्षी
  3. झाडे
  4. संत
  5. अभंग
  6. साधू

उत्तरः

  1. पिल्ले
  2. पक्षी
  3. झाड
  4. संत
  5. अभंग
  6. साधू

प्रश्न 5.
खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.

  1. चित्त
  2. विठ्ठल
  3. भोंदू
  4. पाप
  5. थोर

उत्तर:

  1. आपला लाडका लेक अमेरिकेतून परत येणार हे कळताच गोविंदरावांचे चित्त थाऱ्यावर रहात नव्हते.
  2. दिंडीच्या दिवसात वारकरी विठ्ठल नामात तल्लीन’ होऊन जातात.
  3. सामान्य जनतेला फसवणारे भोंदू गल्लोगल्ली फिरताना दिसून येतात.
  4. नकळत झालेल्या चुकीमुळे प्राणीहत्येचे पाप राहूलच्या माथी आले.
  5. महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे.

लेखन विभाग

प्रश्न 1.
संत जनाबाई व संत एकनाथांची थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर:
संत जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत कवयित्री होत्या. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. त्यांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. संत जनाबाईंच्या नावावर वेगवेगळ्या विषायांवरील सुमारे 350 अभंग मुद्रित झाले आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण कांडताना त्यांच्या ओव्या गातात. वात्सल्य, कोमल, ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षांने दिसून येतात.

संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. एकनाथांना लहानपणापासूनच अध्यात्मज्ञानाचीवहरिकीर्तनाची आवड होती. त्यांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. ‘एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. शांतिब्रम्ह, संतपदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ‘ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला पारेचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ होय.

प्रश्न 2.
महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेतील संतांची नावे सांगा.
उत्तर:
संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत तुकाराम, रामदासस्वामी, गजानन महाराज, साईबाबा, बसवेश्वर.

प्रश्न 3.

उत्तर:

एकीचे बळ

नाईक विदयालयात अध्यक्षांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. – विदयार्थ्यांनी मोठ्या संख्येने वृक्षारोपण केले. सोहम ही वृक्ष लावल्यामुळे खुश झाला. पुढे झालेल्या कार्यक्रमात त्याला विविध झाडांचे महत्त्वही कळले. एकंदरितच सर्व विद्यार्थ्यांच्या मनात झाडे लावण्याची व ती जगवण्याची भावना निर्माण झाली. आज कार्यक्रम छान झाल्याच्या खुशीतच घरी जात असताना त्याला रस्त्यालगतच्या एका जंगलात वृक्षतोड होत असताना दिसली. सोहमने तातडीने तेथे जाऊन त्या लोकांना ‘झाडे तोडू नका’ असे विनवले. मात्र त्याचे कोणीच ऐकले नाही. त्याचवेळी सोहमला शाळेत शिकवलेली ‘एकीचे बळ’ ही म्हण आठवली. त्याला एक कल्पना सुचली. त्याने तातडीने शाळेत जाण्याचा निर्णय घेतला.

शाळेतील सर्व विदयार्थ्यांना, शिक्षकांना त्याने घडलेला प्रसंग सांगितला. जमतील तितक्या लोकांना सोबत घेऊन सर्व जण तातडीने त्या जंगलात पोहचले. घटनेची गंभीरता लक्षात येऊन सगळ्यांनीच आवाज उठवला. इतक्या लोकांना समोर पाहून वृक्षतोड करणारे घाबरले व आपली हत्यारे तेथेच टाकून त्यांनी पळ काढला. जंगलात होणारी बेकायदेशीर वृक्षतोड सोहममुळे लक्षात
आल्याने सर्वांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आल्याने सोहनही खुश झाला.

Summary in Marathi

काव्य परिचयः

संतवाणी या काव्यात संत जनाबाई व संत तुकाराम यांच्या अभंगांचा समावेश आहे. संत जनाबाईंचा ‘वात्सल्य’ हा भक्तीचा विषय प्रस्तुत सुंदर अभंगात्मक काव्यातून दिसून येतो. पहिल्या अभंगात त्यांनी आईचे बाळावरील प्रेम विविध उदाहरणांतून पटवून दिले आहे. दुसऱ्या अभंगात संत तुकारामांनी सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे.

The verse ‘Santvani’ includes two Abhangas of Saint Janabai and Saint Tukaram. The poetess conveys the message of love and affection in the first Abhang. She has beautifully explained the love of mother towards her child with various examples. In second Abhanga Saint Tukaram has given the message to be cautions about the practices of fraudulent people.

अभंगाचा भावार्थः

अभंग 1. संत जनाबाई

  1. पक्षी दूर आकाशात उडतो आणि आपल्या पिल्लांसाठी चारा घेऊन येतो. ।।1।।
  2. घार आकाशात घिरट्या घालते. परंतु शेवटी जमिनीवरील आपल्या पिल्लांसाठी ममतेने झेप घेते. ।।2।।
  3. आई आपल्या कामांमध्ये गुंतलेली असली तरी तिचे सगळे लक्ष आपल्या बाळाकडे असते. ।।3।।
  4. माकड (वानर) झाडांवरून उड्या मारताना देखील आपल्या पिल्लाला पोटाशी पकडून ठेवते. ।।4।।
  5. त्याप्रमाणे आमचा विठ्ठल आम्हांला आईसमान असून मी माझ्या विठ्ठलामध्ये आई शोधत रहाते. ।।5।।

अभंग 2. संत तुकाराम

  1. भोंदू, तोतये असे कसे जे पाप करूनही स्वत:ला सज्जन म्हणवून घेतात.।।1।।
  2. साधूचे सोंग आणण्यासाठी अंगाला राख फासतात आणि नंतर मात्र डोळे झाकून पाप करण्यास मोकळे होतात. भोळ्या जनतेची फसवणूक करतात. ।।2।।
  3. आपण स्वत: मोहमायेपासून दूर असल्याचा, वैराग्य धारण केल्याचा आव आणतात. परंतु चैनीच्या सर्व गोष्टींचा भोग घेतात. ।।3।।
  4. संत तुकाराम म्हणतात, अशा भोंदू लोकांच्या किती गोष्टी सांगू? यांची संगती नसलेली बरी. अशांपासून दूर राहणे चांगले. ।।4।।

शब्दार्थ:

  1. पक्षी – खग – bird
  2. दिगंतर – आकाश – sky
  3. बालक – शिशु – child
  4. झाप – झेप, उडी – leap
  5. चित्त – लक्ष, ध्यान – mind, attention
  6. उदर – पोटाचा भाग – abdomen, belly
  7. पिली – पिल्ले – kids
  8. वात्सल्य – प्रेम, ममता – affection, love
  9. अनन्यसाधारण – अजिबात साधे नसलेले – ideographic
  10. कर्म – कृती – act
  11. उत्कट – अतिशय उत्साही, भरून वाहणारा – ardent
  12. मोदू – तोतया – imposter, counterfeit
  13. राख – भस्म, रक्षा – ash
  14. डोळे – नेत्र, नयन – eyes
  15. वैराग्य – मोहमायेपासून दूर, अलगपणा – dispassion
  16. संगती – सोबत – company
  17. जागरूक – सावध – vigilant, careful
  18. साधू – सज्जन, संत – saint
  19. पाप – कुकर्म – sin
  20. विषय – (येथे अर्थ) चैनीच्या गोष्टी – luxury
  21. तातडीने – घाईने (Hurriedly)
  22. गंभीरता – (Seriousness)
  23. बेकायदेशीर – कायदेशीर नसलेले (illegally)
  24. फुशारकी – बढाई (Boasting)
  25. तंत्रज्ञान – (Technology)
  26. तल्लीन – मग्न (engrossive)
  27. समकालीन – एकाच काळातील (contemporary)
  28. आभास – खोटा विश्वास, भास, भ्रम (illusion)
  29. चित्त – लक्ष (attention)
  30. चारा – अन्न (food)
  31. जनी – संत जनाबाई
  32. जागरूक – सावध (attentive, careful)