Chapter 15 खरा नागरिक
Textbook Questions and Answers
   प्रश्न 1.   
   आकृती पूर्ण करा.   
   
उत्तरः
 
      प्रश्न 2.   
   खालील घटनांचे परिणाम लिहा.   
    
   
   उत्तरः   
    
   
   प्रश्न 3.   
   निरंजनची दिनचर्या लिहा.   
    
   
   उत्तरः   
    
   
   प्रश्न 4.   
   खालील शब्दांना पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. 
   (१) अप्रामाणिक x   
   (२) बेसावध x   
   (३) हळूहळू x   
   (४) पास x   
   उत्तर:   
   (i) प्रामाणिक   
   (ii) सावध   
   (iii) चटकन, भरभर   
   (iv) नापास
   प्रश्न 5.   
   निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा. 
   (i) स्वप्नाळू –   
   (ii) तार्किक विचार करणारा –   
   (ii) संवेदनशील –   
   उत्तर:   
   (i) स्वप्नाळू – कोकण गाडी बद्दल वाटले की ही कोकण गाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते लगेच बोगद्यात शिरते काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला? आपण ही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला.   
(ii) तार्किक विचार – त्याचं लक्ष डाव्या बाजूस रूळाखाली करणारा पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेले. हे छिद्र कसलं? रोज नसतं असं. प्रवाशांनी भरलेली ९.५० ची गाडी येईल तर भयंकर अपघात होईल. हा त्याने तर्कपूर्ण विचार केला.
(iii) संवेदनशील – भीषण अपघात टळण्याची बातमी वर्तमानपत्रात फोटोसह छापून आली होती. घरी मोठमोठी माणसे आली होती. खुद्द जिल्हाधिकारी आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरूजीही आले. निरंजनने धावत येऊन गुरूजींचे पाय धारले. रडत रडत तो म्हणाला, गुरूजी, मी नापास होणार माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला.
   प्रश्न 6.   
   स्वमत. 
   (अ) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.   
   उत्तरः   
   निरंजन कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. घरची, गोठ्यातली कामे करून अभ्यासातही हुशार होता. नागरिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी सकाळपासून अभ्यास करून तो वाराने जेवायला म्हणून देशमुखांकडे जात होता; पण पुलावर त्याने अघटितच पाहिले. कुणीतरी पुलाचे काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले होते. घातपात करण्याचा कट त्याच्या लक्षात आला. तो सावध झाला. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनाकडे धाव घेतली. प्रसंग व धोका समजावून सांगितला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी हजर झाले. संभाव्य धोका निरंजनामुळे टळला. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून गुण मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता स्वार्थ बाजूस सारून त्याने सर्वांचा जीव वाचविला. खऱ्या नागरिकाचे कर्तव्य त्याने निभावले होते.
   (आ) तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विदयार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.   
   उत्तरः   
   विद्यार्थी अनेक गुणांनी युक्त असेल तर त्याला आदर्श विद्यार्थी म्हणवला जातो. सर्वप्रथम अभ्यास, नीटनेटके अक्षर, लेखन कौशल्य अंगी असले पाहिजे. शिस्त, समयपालन, नम्रपणा याला प्राधान्य देणेही तितकेच गरजेचे आहे. अंगच्या गुणांमध्ये अभिमानी न होता विनयशील व मोठ्यांचा आदर राखणारा विद्यार्थी खरा आदर्श विदयार्थी असतो. समयसूचकता, धारिष्ट्य, दुसऱ्यांना मदत हे गुण जीवनात फार महत्त्वाचे असतात. अशा गुणांनी युक्त विद्यार्थी सर्वप्रिय होतो.   
   (इ) तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.   
   उत्तरः   
   निरंजनला आईवडील नाहीत, त्याच्या मनातील हा सल काढून टाकण्यासाठी त्याला चांगल्या मित्राची गरज आहे. म्हणून मला निरंजनचा मित्र व्हायला आवडेल. त्याची आर्थिक परिस्थितीही कमकुवत असल्यामुळे जेवणाच्या व शिक्षणाच्या खर्चासाठी मी त्याला काही मदत करू शकतो. याचबरोबर निरंजन हा निस्वार्थी, प्रसंगावधान असलेला, हुशार, मेहनती मुलगा आहे. त्यामुळे या सर्वगुणसंपन्न निरंजनशी मैत्री करायला मला आवडेल.   
   खालील तक्ता पूर्ण करा.   
    
   
   उत्तरः   
    
   
   
Important Questions and Answers
प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती
   प्रश्न 1.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 
   (i) कोणता विषय जरा अवघडच असतो?   
   उत्तरः   
   नागरिकशास्त्र हा विषय जरा अवघडच असतो.
   (ii) मामाने निरंजनला कोठे आणून सोडले?   
   उत्तर:   
   मामाने निरंजनला चिपळूणला मावशीकडे आणून सोडले
   (iii) मावशीचे घर कोठे होते?   
   उत्तर:   
   चिपळूण शहरालगतच्या उपनगरात गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी मावशीचे घर होते.
   (३) कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) ………………………… टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. (सकाळच्या, दुपारच्या, थंडीच्या, रात्रीच्या)   
   (ii) ………………………… गुरुजींचा सल्ला त्याला मोलाचा वाटे. (भोसले, फाटक, भडसावळे, देशमुख)   
   (iii) गुरुजींचंही ………………………… खूप प्रेम होतं. (सदानंदवर, निरंजनवर, अतुलवर, सचिनवर)   
   उत्तर:   
   (i) सकाळच्या   
   (ii) भडसावळे   
   (iii) निरंजनवर
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   योग्य पर्याय निवडा.   
   (i) निरंजन भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला, कारण   
   (i) त्याला झोप येत नव्हती.   
   (ii) अभ्यास पूर्ण झाला नव्हता.   
   (iii) पहाटे उठायला त्याला आवडत असे.   
   (iv) त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर होता.   
   उत्तर:   
   निरंजन भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला कारण त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर होता.
   प्रश्न 2.   
   ‘मुंबईला’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.   
   उत्तरः   
   मामा कोठे निघून गेला?
   प्रश्न 3.   
   सहसंबंध लिहा.   
   रेडिओ : भक्तिगीत :: पक्षी : …………………………   
   उत्तरः   
   सुमधुर संगीत
   प्रश्न 4.   
   कोण कोणास म्हणाले ते लिहा.   
   
कृती ३ : स्वमत
   प्रश्न 1.   
   ‘अभ्यासासाठी पहाटेचे वातावरण पोषक असते’ यावर तुमचे विचार मांडा.   
   उत्तरः   
   ‘लवकर निजे, लवकर उठे त्यास उत्तम आरोग्य लाभे’ या वचनानुसार राहाणाऱ्यांना आरोग्यप्राप्ती होतेच व आयुष्यात यशप्राप्तीही होते. लवकर उठल्याने पहाटेच्या वेळेचा सदुपयोग करता येतो. पहाटे अभ्यासही छान होतो. केलेला अभ्यास लक्षात राहातो. पहाटे गोंगाट, कलकलाट नसल्याने चित्त एकाग्र होते. पुरेशी झोप झाल्याने शरीर व मन दोन्हीही प्रफुल्लित असतात. हवेत सुखद गारवा असतो. पक्ष्यांचा किलबिलाट असतो. पहाटेची भूपाळी, जात्यावरच्या ओव्या किंवा रेडिओवरची मधुर सनई मन प्रसन्न करते. शांततेत पाठांतर होते. मनन व चिंतन होते. पहाटे कामांची लगबग नसते, वाहनांची ये-जा नसते म्हणून मन स्थिर होण्यास वेळ लागत नाही. एकाग्र मनाने अभ्यास करता येतो.
   प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.   
   कृती १ : आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   एका वाक्यात उत्तरे लिहा. 
   (i) निरंजन दुपारी कोठे जेवायला जायचा?   
   उत्तरः   
   दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा.
   (ii) निरंजन कोणाच्या घरी काम करायचा?   
   उत्तरः   
   निरंजन मावशीच्या घरी काम करायचा.
   (iii) परीक्षा किती वाजता सुरू होणार होती?   
   उत्तरः   
   परीक्षा साडेदहा वाजता सुरू होणार होती.
   प्रश्न 3.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. 
   (i) ………………………… परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. (काकांची, मावशीची, मामाची, आत्याची)   
   (ii) गुरुजींवर श्रद्धा ठेवायची आणि परीक्षेत ………………………… नंबर पटकवायचा. (दुसरा, पहिला, तीसरा, चौथा)   
   (iii) साडेदहाची परीक्षा. त्याआधी ………………………… जायचं होतं. (देशमुखांकडे, थोरातांकडे, भडसावळे गुरुजींकडे, मावशीकडे)   
   उत्तर:   
   (i) मावशीची   
   (ii) पहिला   
   (iii) देशमुखांकडे
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   योग्य पर्याय निवडा.   
   भडसावळे गुरुजींनी निरंजनला येथे वार लावून दिले.   
   (i) स्वत:च्या घरी   
   (ii) थोरामोठ्यांच्या घरी   
   (iii) मुख्याध्यापकांकडे   
   (iv) मावशीकडे   
   उत्तरः   
   (ii) थोरामोठ्यांच्या घरी
   प्रश्न 2.   
   सकारण लिहा. 
   (i) निरंजन आज मनोमन खूश होता कारण …………………………   
   (ii) निरंजन वार लावून जेवायचा कारण …………………………   
   उत्तर:   
   (i) आधीचे पेपर्स चांगले गेले होते.   
   (ii) मावशीची परिस्थिती यथातथाच होती.
   प्रश्न 3.   
   ‘गुरुजींवर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.   
   उत्तर:   
   निरंजन कोणावर श्रद्धा ठेवायचा?
   प्रश्न 4.   
   चूक की बरोबर लिहा. 
   (i) निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा.   
   (ii) गुरुजींचं वाक्य लक्षात ठेवून निरंजन खेळायला जायचा.   
   उत्तर:   
   (i) बरोबर   
   (ii) चूक
कृती ३ : स्वमत
   प्रश्न 1.   
   गरीब विद्यार्थी मित्राला तुम्ही केलेली मदत स्पष्ट करा.   
   उत्तरः   
   अक्षय हा माझ्या बालपणापासूनचा मित्र. घरची परिस्थिती यथातथाच असून तो नेटाने शिकत आहे. दिवसभर स्वत: मोलमजूरी करून तो रात्रशाळेत शिकतो. माझी आई प्रत्येक सणवाराला त्याला जेवायला बोलावते. गोडधोड खाऊ घालते.
माझ्यासारखे त्याला कपडेही घेऊन देते. माझे वडील त्याची वर्षभराची फी भरतात. मी ही जमेल तेवढी त्याला अभ्यासात मदत करतो. त्याचे वडील वाहनचालक आहेत. माझे वडील त्यांनाच गाडी चालवण्यासाठी बोलावून पगार देतात.
   प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.   
   कृती १ : आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   एका वाक्यात उत्तरे लिहा. 
   (i) शेवटची गाडी केव्हां जाते?   
   उत्तरः   
   रात्री दोन वाजता शेवटची गाडी जाते.
   (ii) निरंजनला कशाचा राग येई?   
   उत्तर:   
   लोकांच्या बेफिकीर प्रवृत्तीचा राग येई.
   (iii) निरंजनचे लक्ष कुठे गेले?   
   उत्तरः   
   डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या मोठ्या भगदाडाकडे निरंजनचे लक्ष गेले.
   (iv) निरंजनाच्या काय ध्यानी आले?   
   उत्तरः   
   कुणीतरी काँक्रिट फोडून रेल्वेचे रुळ वेडेवाकडे करून ठेवल्याचे निरंजनच्या ध्यानी आले.
   प्रश्न 3.   
   उत्तरे लिहा. 
(i) गावाबाहेर डोंगरपायथ्याशी
घर होते + निरंजनच्या मावशीचे
(ii) निरंजनला भयंकर
राग येई + लोकांच्या बेफिकीर प्रवृत्तीचा
   प्रश्न 4.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) आता ………………………… आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. (मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, हार्बर रेल्वे)   
   (ii) या ………………………… जाणं-येणं सोपं झालं होतं. (मार्गामुळं, रस्त्यामुळं, वाटेमुळं, पुलामुळं)   
   उत्तर:   
   (i) कोकण रेल्वे   
   (ii) पुलामुळं
   प्रश्न 5.   
   उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा. 
   (i) रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते.   
   (ii) प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल   
   (iii) धाडधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल   
   (iv) निरंजनला आश्चर्य वाटलं.   
   उत्तर:   
   (i) धाधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल.   
   (ii) निरंजनला आश्चर्य वाटलं.   
   (iii) रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते.   
   (iv) प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल.
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   खालील घटनांचे परिणाम लिहा. 
घटना – परिणाम
(i) आता नऊ पन्नासची गाडी येईल. – धाडधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल.
(ii) जर दगड बाजूला ठेवायचे विसरलात. – तर दुसरा ठेचकाळून  जीवाला मुकेल.
   प्रश्न 2.   
   सकारण लिहा –   
   पूर्वीसारखे या नदीच्या पाण्यात उतरून चालत चालत नदी पार करावी लागत नाही कारण –   
   उत्तरः   
   आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला.
   प्रश्न 3.   
   योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.   
   निरंजनला लोकांच्याया बेफिकीर प्रवृत्तीचा. …………………………   
   (i) भयंकर संताप येई.   
   (ii) भयंकर राग येई.   
   (iii) भयंकर चिड येई.   
   (iv) भयंकर आपुलकी वाटे.   
   उत्तर:   
   निरंजनला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई.
   प्रश्न 4.   
   कोण कोणास म्हणाले ते लिहा.   
   
   प्रश्न 5.   
   चूक की बरोबर ते लिहा.   
   (i) रात्री पाच वाजता शेवटची गाडी जाते.   
   (ii) कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला.   
   उत्तर:   
   (i) चूक   
   (ii) बरोबर
कृती ३ : स्वमत
   तुमच्या खबरदारीने भावी धोका टळला असा प्रसंग तुमच्या शब्दात मांडा.   
   उत्तरः   
   आम्ही सर्व मुले मे महिन्याच्या सुट्टीत हिमाचलप्रदेशाच्या डोंगरात गिर्यारोहणासाठी गेलो होतो. नदीवरचा पूल ओलांडायचा होता. २५ जणांचा चमू घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. निसर्ग सौंदर्य न्याहाळत सर्वजण पुलावरून जात असताना माझे लक्ष पुलाच्या पुढच्या टोकाकडे गेले. दोरखंडांनी बांधलेल्या पुलाचे एक दोरखंडी टोक तुटून गेले होते. प्रसंगावधान राखून मी सर्व मुलांना मागे जाण्याचे आदेश दिले. दुसऱ्या बाजूने उतरून गावकऱ्यांना सूचित केले. पूल ताबडतोब वापरण्यासाठी बंद करण्यात आला व मोठी मनुष्यहानी टळली.
   प्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे पुढील सूचनेनुसार कृती करा:   
   कृती १: आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
    
   
   
   प्रश्न 2.   
   खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 
   (i) निरंजनने धावतच कोणाला गाठले?   
   उत्तर:   
   निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं.
   (ii) निरंजनने स्टेशनमास्तरांना काय सांगितले?   
   उत्तर:   
   निरंजनने स्टेशनमास्तरांना पुलावरच्या खराब झालेल्या रूळांबद्दल सांगितले.
   (iii) निरंजनने कोणती आर्जवं केली?   
   उत्तर:   
   निरंजनने आर्जवं केली की, निदान जागा पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका.
   प्रश्न 3.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) ………………………… इथून खूप दूर होतं. (गाव, स्टेशन, शहर, वाडी)   
   (ii) ………………………… किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. (पाच-सहा, दोन-तीन, तीन-चार, सहा-सात)   
   उत्तर:   
   (i) स्टेशन   
   (ii) तीन-चार.
   (४) कोष्टक पूर्ण करा.   
   
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   खालील घटनांचे परिणाम लिहा.   
   घटना – परिणाम   
   परीक्षा बुडाली की – नापास
   प्रश्न 2.   
   घटनाक्रम लिहा. 
   (i) निरंजनने नेमकी जागा दाखवली.   
   (ii) निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.   
   (iii) स्टेशनमास्तरांनी गाडी थांबवण्याचा आदेश दिला.   
   (iv) निरंजन एकदम सावध झाला.   
   उत्तर:   
   (i) निरंजन एकदम सावध झाला.   
   (ii) निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.   
   (iii) निरंजनने नेमकी जागा दाखवली.   
   (iv) स्टेशनमास्तरांनी गाडी थांबवण्याचा आदेश दिला.
   प्रश्न 3.   
   योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 
   (i) निरंजनने क्षणभर विचार केला आणि   
   (अ) स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.   
   (ब) घटनास्थळी पोहचला.   
   (क) गाववाल्यांना बोलवायला गेला.   
   (ड) शाळेत निघून गेला.   
   उत्तर:   
   निरंजनने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.
   (ii) ………………………… लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले.   
   (अ) जिल्हाधिकाऱ्याने   
   (ब) पोलीसांनी   
   (क) शिक्षकांनी   
   (ड) स्टेशनमास्तरांनी   
   उत्तर:   
   स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले.
   प्रश्न 4.   
   चूक की बरोबर ते लिहा.   
   (i) निरंजन स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती.   
   (ii) निरंजनचे रेल्वेने फिरायचे स्वप्न पूर्ण होणार होते.   
   उत्तर:   
   (i) बरोबर   
   (ii) चूक
   प्रश्न 5.   
   कोण कोणास म्हणाले ते लिहा.   
   
कृती ३ : स्वमत
   प्रश्न 1.   
   ‘भावनेपेक्षा कृती श्रेष्ठ’ या विचारांवर स्वमत प्रकट करा.   
   उत्तरः   
   आपल्याला मनात काय वाटते यापेक्षा जे वाटते ते विधायक काम प्रत्यक्ष केले पाहिजे. गरिबांना मदत करावीशी वाटते. अंधांना सहारा दयावासा वाटतो; ही भावना जपणे ठिक आहे पण प्रत्यक्ष कृती करणे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आईला, आजीला, कामात मदत करणे, आजोबांची पिशवी उचलणे, बागकाम करून झाडांना पाणी घालणे इ. कितीतरी लहानमोठी कामे करण्यासारखी असतात, ती केली की मनाला समाधान मिळते म्हणून नुसतीच भावना मनात बाळगून अर्थ नाही तर कृती करणे महत्वाचे आहे. भावनेपेक्षा कृती केव्हाही श्रेष्ठच!
   प्रश्न ५. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.   
   कृती १: आकलन कृती 
   प्रश्न 1.   
   आकृतीबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   उत्तरे लिहा.   
   (i) अपघाताची पहिली खबर देणारा – निरंजन   
   (ii) निरंजनचा फोटो काढणारे – वार्ताहर
   प्रश्न 3.   
   खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.   
   (i) निरंजनने धावत पुढे जाऊन कोणाचे पाय धरले?   
   उत्तर:   
   निरंजनने धावत पुढे जाऊन भडसावळे गुरुजींचे पाय धरले.
   (ii) निरंजनला सरकारी वसतिगृहात प्रवेश क्यायचं असे कोणी ठरवलं?   
   उत्तर:   
   निरंजनला सरकारी वसतिगृहात प्रवेश दयायचं असे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं.
   प्रश्न 4.   
   कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.   
   (i) निरंजनचा ………………………… पेपर चुकला होता. (भूगोलाचा, गणिताचा, नागरिकशास्त्राचा, मराठीचा)   
   (ii) हे बघ, शाळेचे सगळे ………………………… आलेत. (शिक्षक, विदयार्थी, अधिकारी, कर्मचारी)   
   उत्तर:   
   (i) नागरिकशास्त्राचा   
   (ii) अधिकारी
कृती २ : आकलन कृती
   प्रश्न 1.   
   आकृतिबंध पूर्ण करा.   
   
   प्रश्न 2.   
   कोण कोणास म्हणाले.   
   
   प्रश्न 3.   
   सकारण लिहा. 
   (i) निरंजनचे कौतुक झाले कारण –   
   उत्तर:   
   रेल्वेचा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला होता.
   प्रश्न 4.   
   चूक की बरोबर लिहा. 
   (i) निरंजनला वया पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार नव्हती.   
   (ii) गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं, तेव्हां साऱ्यांचेच डोळे पाणावले.   
   उत्तर:   
   (i) चूक   
   (ii) बरोबर
स्वाध्याय कृती
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.
   (i) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.   
   उत्तरः   
   निरंजन कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. घरची, गोठ्यातली कामे करून अभ्यासातही हुशार होता. नागरिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी सकाळपासून अभ्यास करून तो वाराने जेवायला म्हणून देशमुखांकडे जात होता; पण पुलावर त्याने अघटितच पाहिले. कुणीतरी पुलाचे काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले होते. घातपात करण्याचा कट त्याच्या लक्षात आला. तो सावध झाला. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनाकडे धाव घेतली. प्रसंग व धोका समजावून सांगितला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी हजर झाले. संभाव्य धोका निरंजनामुळे टळला. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून गुण मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता स्वार्थ बाजूस सारून त्याने सर्वांचा जीव वाचविला. खऱ्या नागरिकाचे कर्तव्य त्याने निभावले होते.
खरा नागरिक Summary in Marathi
खरा नागरिक पाठपरिचय
‘खरा नागरिक’ हा पाठ लेखक ‘सुहास बारटक्के’ यांनी लिहिला आहे. या पाठात शालेय विषय केवळ अभ्यासायचे नसून आचरणात आणायचे असतात, हे ‘निरंजन’ या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे.

खरा नागरिक Summary in English
“Khara Nagrik’ is written by Suhas Bartakke. He has beautifully expressed how school subjects are not simply to be studied, but are also meant for their application to daily activities. He spreads this message through a character named Niranjan.
खरा नागरिक शब्दार्थ
- सल्ला – उपदेश – (advice)
- चटकन – लगेच – (quickly)
- आल्हाददायक – सुखावह, सुखद – (pleasant)
- रीत – पद्धत – (trick)
- मोलाचे – उपयुक्त – (valuable)
- अपार – खूप – (a lot)
- श्रद्धा – विश्वास – (belief)
- लाडका – आवडता – (favourite)
- शेण – गाईचा मल – (cow dung)
- गोठा – गुरे बांधण्याची जागा – (cow shed)
- यथातथा – बेताचा – (below average)
- प्रगती – सुधारणा – (progress)
- उजळणी – मनन, चिंतन – (revision)
- बेफिकीर – निष्काळजी – (carelessness)
- जाणीवपूर्वक – मुद्दाम – (deliberately)
- प्रवृत्ती – मानसिकता – (attitude)
- दिमाख – ऐट – (pomp)
- बोगदा – डोंगराच्या पोटातून आरपार केलेला मार्ग – (a tunnel)
- भगदाड – जमिनीत, भिंतीत – (a large पडलेला खड्डा : uneven hole)
- क्षणभर – थोड्या वेळासाठी – (for a moment)
- घातपात – अपघात – (casualty)
- कट – कारस्थान – (plan)
- उपद्व्याप – कारभार – (fright work)
- किंकाळ्या – कर्कश आवाज – (cheerfulness)
- अपुरे – अपूर्ण – (incomplete)
- स्फोट – ब्लास्ट – (blast)
- आर्जव – विनंती – (request)
- तथ्य – अर्थ – (reason)
- नेमकी – योग्य – (appropriate)
- दीर्घकाळ – खूपवेळा – (a long time)
- पंचनामा – शहानिशा – (scrutiny)
- गांभीर्य – महत्त्व – (seriousness)
- चाणाक्ष – धूर्त, बुद्धिमान – (adroit)
- कौतुक – वाहवा, प्रशंसा – (appreciation)
- निराश – उदास – (disappointed)
- सवलती – सोयी – (facilities)
- रद्द – बाद – (to cancel)
- वार्ताहर – बातमीदार – (reporter)
- स्तुती – प्रशंसा – (appreciation)
- भीषण – भयंकर – (fierce, dire)
- जिल्हाधिकारी – (District Collector)
- खास बाब – विशिष्ट गोष्ट – (special case)
- वसतिगृह – छात्रालय – (hostel)
खरा नागरिक वाक्प्रचार
- मोलाचा वाटणे – महत्वाचा वाटणे, उपयुक्त वाटणे
- वार लावून जेवणे – अगोदर ठरवल्याप्रमाणे दररोज एकेकाच्या घरी जेवायला जाणे.
- जीवाला मुकणे – मृत्यू पावणे
- हुरळून जाणे – आनंदी होणे
- कानठळ्या बसणे – अती मोठ्या आवाजाचा त्रास होणे
- कानात घूमणे – वारंवार तेच ऐकू येणे
- ताब्यात देणे – हवाली करणे, सोपविणे
- हृदयाशी धरणे – प्रेमाने जवळ घेणे
- डोळे पाणावणे – आनंदाश्रू येणे
- यथातथा असणे – बेताचा असणे
- तथ्य वाटणे – अर्थ असणे
- मनोमन खूश होणे – मनात आनंद वाटणे