Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

Day
Night

Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

Textbook Questions and Answers

1. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.


उत्तर:

प्रश्न (आ)

उत्तर:

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा:

प्रश्न 1.
पहिले ऑलिंपिक व्हिलेज ……….. येथे वसले.
(अ) ग्रीस
(आ) मेलबोर्न
(इ) फ्रान्स
(ई) अमेरिका
उत्तर:
पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबोर्न येथे वसले.

प्रश्न 2.
पहिले ऑलिंपिक सामने ……… साली झाले.
(अ) 1894
(आ) 1956
(इ) इ. स. पूर्व 776
(ई) इ. स. पूर्व 394
उत्तर:
पहिले ऑलिंपिक सामने इ. स. पूर्व 776 साली झाले.

3. पुढील वाक्य वाचा. त्यातील शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखादया शब्दाला पुढील मुद्दे लागू नसतील, तर तिथे – हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ या शब्दासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.

प्रश्न 1.
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.

उत्तर:

4. स्वमत:

प्रश्न 1.
‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर:
ऑलिंपिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात. ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे लक्ष असते. या क्रीडास्पर्धा आहेत. त्यांत जातिभेद, धर्मभेद व वर्णभेद नसतो. सगळेजण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश. तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला! त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला! या क्रीडास्पर्धांमुळे माणसामाणसांतील द्वेष, वैर या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात. म्हणून ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व होय.

उपक्रम:

प्रश्न 1.
सन 2016 साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून पुढील तक्त्यात लिहा:

Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

ब्रीदवाक्यातील शब्द

अर्थ

1. सिटियस

1. ………………….

2. ……………………..

2. ………………….

3. ……………………..

3. तेजस्विता

उत्तर:

ब्रीदवाक्यातील शब्द

अर्थ

1. सिटियस

1. गतिमानता

2. ऑल्टियस

2. उच्चता

3. फॉर्टियस

3. तेजस्विता

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
ऑलिंपिक ध्वजावरील वर्तुळांचे रंग:

  1. …………………
  2. …………………
  3. …………………
  4. …………………
  5. काळा.

उत्तर:

  1. लाल
  2. पिवळा
  3. निळा
  4. हिरवा
  5. काळा.

प्रश्न 2.
विधाने पूर्ण करा:
ऑलिंपिक ध्वजावरील पाच वर्तुळे म्हणजे जगातील

  1. …………………
  2. …………………
  3. …………………
  4. …………………
  5. युरोप हे पाच खंड.

उत्तर:

  1. आफ्रिका
  2. अमेरिका
  3. आशिया
  4. ऑस्ट्रेलिया

प्रश्न 3.
ऑलिंपिक ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे
उत्तर:
ऑलिंपिक ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
ऑलिंपिकच्या खेळांचा तुमच्या मते असलेला फायदा समजावून सांगा.
उत्तर:
माणूस हा मुळात प्राणीच आहे. त्याच्या मनात हिंसा ठासून भरलेली आहे. या ना त्या कारणाने मनातली हिंसा स्फोटासारखी बाहेर पडते आणि माणसे एकमेकांच्या जिवावर उठतात. आदिमानवाच्या काळापासून हे चालू आहे. परका एखादा माणूस दुसऱ्या माणसाला दिसला, तरी ते एकमेकाला ठार मारायला धावत. आतासुद्धा धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने माणसे लढाया करतात हे थांबावे, आपापसात प्रेम वाढावे, जगात शांतता नांदावी यासाठी ऑलिंपिकसारखे खेळ भरवले जातात. या खेळांमुळे जिंकण्याची इच्छा पूर्ण होते. दुसऱ्यांना हरवण्याचे समाधान मिळते. जगात बंधुभाव निर्माण होण्यास मदत होते, ऑलिंपिक खेळांचा हा फार मोठा फायदा आहे.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा:

प्रश्न 1.
……………. या वर्षी ऑलिंपिक सामने बंद पडले.
(अ) इ. स. पू. 1936
(आ) इ. स. पू. 18965
(इ) इ. स. पू. 394
(ई) इ. स. पू. 776
उत्तर:
(३) इ. स. पू. 394 या वर्षी ऑलिंपिक सामने बंद पडले.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

प्रश्न 3.
सूचनेनुसार कृती करा:
इसवी सन पूर्व काळातील ऑलिंपिकमधील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्याच्या रिती लिहा.

  1. …………………………….
  2. ……………………………
  3. ……………………………

उत्तर:
इसवी सन पूर्व काळातील ऑलिंपिकमधील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्याच्या रिती:

  1. ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येई.
  2. अनेक शहरे भेदभाव विसरून यशस्वी खेळाडूंचे प्रचंड स्वागत करीत असत.
  3. राष्ट्रीय सणांच्या वेळी या खेळाडूंना मानाचे स्थान देण्यात येई.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
ऑलिंपिक स्पर्धांचा तुम्हांला जाणवणारा महत्त्वाचा गुण सांगा आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर:
विराटता हा ऑलिंपिक स्पर्धांचा महत्त्वाचा गुण आहे, असे मला वाटते. पृथ्वीवरील जवळजवळ सर्व देश यात सहभागी होतात. त्यामुळे ऑलिंपिकच्या स्पर्धा संपूर्ण जगाला व्यापून टाकतात. या स्पर्धांचे आयोजनही विराट असते. एक विशाल ऑलिंपिक गाव वसवले जाते. खेळांसाठी एक विशाल मैदान केले जाते. त्याभोवती एक प्रचंड प्रेक्षागार उभारले जाते. रहदारीसाठी खास सडका, लोहमार्ग बांधले जातात.

खेळाडूंसाठी असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे उभारली जातात. त्याच्या जोडीने विशाल उपाहारगृहे बांधली जातात. संपूर्ण जगातून आलेले पाच-सहा हजार खेळाडू सहभागी होतात. लाखभर प्रेक्षक मैदानातील खेळ प्रत्यक्ष पाहतात. संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक रूप तिथे अवतरते. या विराटतेमुळे आपण कोणा एका देशाचे, धर्माचे राहत नाही. सर्व मानवजात एक बनते. संकुचितपणा कमी होतो. वैर नाहीसे होते. संपूर्ण जगातील लोकांना एका माळेत गुंफण्याचे कार्य ऑलिंपिक स्पर्धा करतात. हे ऑलिंपिक स्पर्धांचे सर्वांत मोठे कार्य आहे.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. आधुनिक ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारा.
2. 1936 सालच्या ऑलिंपिकमधील अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला.
उत्तर:
1. कुबर टीन
2. फ्रान्समध्ये

प्रश्न 2.
कुठे ते लिहा:
1. 1894 साली ऑलिंपिक काँग्रेस भरवण्यात आली.
2. 1936 साली ऑलिंपिक स्पर्धा भरल्या.
उत्तर:
1. जेसी ओवेन्स.
2. बर्लिनमध्ये.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. 1894 सालच्या ऑलिंपिक काँग्रेसमध्ये प्राचीन ऑलिंपिक सामन्यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले.
2. क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते.
उत्तर:
1. शरीरसंपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि विविध देशांतील मैत्री वाढवण्यासाठी.
2. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही म्हणून.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोणी ते लिहा:
1. ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी ख्याती मिळवली.
2. अनवाणी पायाने मॅरेथॉन शर्यत जिंकली.
उत्तर:
1. एमिल झेटोपेक याने.
2. अबेबे बिकिला याने.

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
1. 1948 साली ऑलिंपिकचे मैदान दणाणून सोडणारी.
2. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू.
उत्तर:
1. फॅनी बँकर्स
2. ध्यानचंद.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
खेळामुळे एकात्मतेचा संदेश देणारा तुमच्या आठवणीतील प्रसंग लिहा.
उत्तर:
सचिन तेंडुलकर हा माझा अत्यंत लाडका क्रिकेट खेळाडू अवस्था झाली होती. पाकिस्तानातील क्रीडारसिकही तन्मयतेने त्याचे आहे. माझा एकट्याचाच नव्हे, तर तो सर्वांचाच, सर्व क्रीडारसिकांचा भाषण ऐकत होते. ही खरी एकात्मता. ती सचिन या अलौकिक . लाडका खेळाडू आहे. त्याला भारतरत्न देण्याची सूचना जेव्हा पुढे का खळाडू आह. त्याला भारतरत्न चाचा सूचना जहा पुन , खेळाड़मळे निर्माण झाली होती.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
तक्ता भरा:
उत्तर:

सामासिक शब्द

समास

1. त्रिभुवन

द्विगू

2. छोटेमोठे

वैकल्पिक द्ववंद्ववं

3. गंधफुले

समाहार द्ववंद्ववं

4. गुणिजन

कर्मधारय

5. अहिनकुल

इतरेतर द्ववंद्ववं

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
तक्ता भरा: (सामाजिक, राष्ट्रीय, अनंत, विशेष)
उत्तर:

उपसर्गघटित

प्रत्ययघटित

अनंत

सामाजिक

विशेष

राष्ट्रीय

3. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:

  1. पर्वणी असणे
  2. हास होणे
  3. ख्याती मिळवणे
  4. प्रशंसा करणे.

उत्तर:
1. पर्वणी असणे- अर्थ: आनंदसोहळा असणे.
वाक्य: ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणी असते.

2. -हास होणे- अर्थ : नाश होणे.
वाक्य : पुढे ग्रीक सत्तेचा -हास झाला.

3. ख्याती मिळवणे- अर्थ : प्रसिद्धी मिळवणे.
वाक्य : ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी झेटोपेकने ख्याती मिळवली.

4. प्रशंसा करणे- अर्थ : स्तुती करणे.
वाक्य: ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सगळे विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
प्रतिशब्द लिहा:

  1. ध्वज
  2. धवल
  3. श्रम
  4. देश.

उत्तर:

  1. ध्वज = झेंडा
  2. धवल = पांढरे
  3. श्रम = कष्ट
  4. देश = राष्ट्र.

प्रश्न 2.
वचन ओळखा:

  1. वर्तुळ
  2. गोफ
  3. क्रीडा
  4. खेळ.

उत्तर:

  1. नपुंसकलिंग
  2. पुल्लिग
  3. स्त्रीलिंग
  4. पुल्लिग.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील शब्द शुद्ध करून लिहा:

  1. वसतीगृहे
  2. तेजस्वीता
  3. अंतरराष्ट्रिय
  4. बलंसर्वधन
  5. ईतीहास
  6. वीश्वबंधूत्त्व

उत्तर:

  1. वसतिगृहे
  2. तेजस्विता
  3. आंतरराष्ट्रीय
  4. बलसंवर्धन
  5. इतिहास
  6. विश्वबंधुत्व.

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा:
1.  साऱ्या जगाने या खेळाडूचा केवढा गौरव केला केवढे कौतुक केले

2. रहदारीसाठी अनेक सडका लोहमार्ग पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी इमारती वसतिगृहे बांधली.
उत्तर:
1. साऱ्या जगाने या खेळाडूचा केवढा गौरव केला! केवढे कौतुक केले!
2. रहदारीसाठी अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी इमारती, वसतिगृहे बांधली.

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:
1. Government Letter
2. Medical Examination.
उत्तर:
1. शासकीय पत्र
2. वैदयकीय तपासणी.

Summary in Marathi

प्रस्तावना:

बाळ ज. पंडित हे ख्यातनाम क्रीडासमालोचक होते. विशेष म्हणजे ते मैदानावरही क्रिकेट प्रत्यक्ष खेळले होते. रणजी चषक सामन्यांत त्यांचा सहभाग होता. त्यांना महाराष्ट्र संघातही स्थान मिळाले होते. मात्र, समालोचक म्हणून ते जास्त प्रसिद्ध झाले. त्यांनी मराठीतून अत्यंत रोचक भाषेत क्रिकेटचे समालोचन केले आणि मराठी समालोचन लोकप्रिय केले. खेळ व खेळाडूंवर त्यांनी भरपूर लेखन केले. साध्यासोप्या भाषेत लेखन करणे हा त्यांचा विशेष होता.

प्रस्तुत पाठात लेखकांनी ऑलिंपिकचे स्वरूप मोजक्या शब्दांत कथन केले आहे. ऑलिंपिकचा इतिहास, खेळांसाठी केली जाणारी अवाढव्य तयारी, जगभरातील राष्ट्रांचा सहभाग, ऑलिंपिकचे महत्त्व, ऑलिंपिकमधील गाजलेले काही खेळाडू इत्यादी माहिती त्यांनी प्रस्तुत पाठात दिली आहे. ऑलिंपिकमुळे बंधुभाव निर्माण होण्यास फारच मदत होते, हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

शब्दार्थ:

  1. अनन्यसाधारण – एकमेव, त्याच्यासारखे तेच.
  2. ब्रीदवाक्य – घोषवाक्य.
  3. शिकस्त – प्रयत्न.
  4. बलसंवर्धन – सामर्थ्याची जोपासना.
  5. बसवण्याची – स्थापन करण्याची, निर्माण करण्याची.
  6. पुनरुज्जीवन – नूतनीकरण, जीर्णोद्धार, मृतवत असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे.
  7. अनवाणी – पायात चपला वगैरे काहीही न घालता.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

1. पुनरुज्जीवन करणे – बंद पडलेली, स्थगित असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे, मृतवत पडलेली गोष्ट जिवंत करणे.
2. ज्योत तेवत ठेवणे – चांगले प्रयत्न सतत चालू ठेवणे.