Chapter 2 माझा अनुभव

Chapter 2 माझा अनुभव

Textbook Questions and Answers

1. का ते लिहा.

प्रश्न अ.
रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
उत्तर:
आगगाडीने मामाच्या गावाला जायचे म्हणून रिमाने आनंदाने उड्या मारल्या.

प्रश्न आ.
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
उत्तर:
मावशींच्या मांडीवर बसलेले बाळ खुदकन हसले म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले.

प्रश्न इ.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
उत्तर:
पानांची सळसळ, नदीची खळखळ, पक्ष्यांची किलबिल, गाईंचे हंबरणे, पशु, पक्षी, शेते पाहून मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.

प्रश्न ई.
मुलांना गहिवरून आले.
उत्तर:
आजीच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ अन् बोलका होता म्हणून मुलांना गहिवरून आले.

2. ‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
सुट्टीत विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणे, बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे, कधी शेतावर तर कधी आमराईत मामाबरोबर फिरायला जाणे या सर्व मजेत सुट्टी कधी संपली ते मुलांना कळलेच नाही.

3. वाचा. सांगा. लिहा.
नादमय शब्द उदा., छुमछुम, झुकझुक.

प्रश्न अ.
वाचा. सांगा. लिहा.
नादमय शब्द उदा., छुमछुम, झुकझुक.
उत्तर:
फडफड, खडखड, सळसळ, खळखळ, खुळखुळ, थुईथुई

4. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
(अ) वारा, (आ) तोंड, (इ) रस्ता, (ई) आई, (उ) शेत

प्रश्न अ.
वारा
उत्तर:
वारा – पवन, वायू

प्रश्न आ.
तोंड
उत्तर:
तोंड – मुख, चेहरा

प्रश्न इ.
रस्ता
उत्तर:
रस्ता – मार्ग, सडक

प्रश्न ई.
आई
उत्तर:
आई – माता, जननी

प्रश्न उ.
शेत
उत्तर:
शेत – शिवार

5. जोड्या जुळवा.

प्रश्न अ.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. आगगाडी

(अ) खुळखुळ

2. पैंजण

(ब) खडखड

3. घुंगूरमाळा

(क) झुकझुक

4. बैलगाडी

(ड) खळखळ

5. पाणी

(इ) छुमछुम

उत्तर:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. आगगाडी

(क) झुकझुक

2. पैंजण

(इ) छुमछुम

3. घुंगूरमाळा

(अ) खुळखुळ

4. बैलगाडी

(ब) खडखड

5. पाणी

(उ) छुमछुम

6. गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.

प्रश्न 1.
गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
उत्तर:
(अ) बकरी – बेंऽ बेंऽ
(आ) वाघ – डरकाळी
(इ) बेडूक – डराँव डराँव
(ई) कुत्रा – भुंकणे
(उ) मांजर – म्याँव म्याँव करणे
(ऊ) मोर – माओ माओ

7. खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
(अ) खुदकन हसणे – बाळ खुदकन हसले.
(आ) गाढ झोपणे – आई गाढ झोपली होती.
(इ) कडकडून भेटणे – अमेरिकेतून आल्यावर मी भावाला कडकडून भेटलो.
(ई) टुकुटुकु पाहणे – बाळ सर्वांकडे टुकुटुकु पहात होते.
(उ) आनंदाने थुईथुई नाचणे – काळे मेघ पाहून मोर आनंदाने थुईथुई नाचतो.
(ऊ) गहिवरून येणे – निरोप देताना मला गहिवरून आले.

8. बाजारहाट’ यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.

प्रश्न 1.
बाजारहाट’ यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.
उत्तर:

  1. धावपळ
  2. नातीगोती
  3. पाटपाणी
  4. नरमगरम
  5. भाजीपाला
  6. धुणीभांडी
  7. गणगोत

9. तुम्ही एखादे चांगले काम केले आहे त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.

प्रश्न 1.
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
उत्तर:
आमच्याकडे घरकामासाठी येणाऱ्या बाईच्या मुलीला मी रोज खाऊ देतो. ती दुसरीत असल्याने तिचा अभ्यासही घेतो. तिची आई काम करेपर्यंत गाणी, कविता शिकवतो. कधी कधी गोष्टीची पुस्तके वाचून दाखवतो. मी तिला चार वया व काही पेन्सीलीही दिल्या आहेत. तिच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. खाल्लेल्या गोळीचा कागद कचरापेटीत टाकायला शिकवले. नखे कापायला व स्वच्छ रहायला शिकवले. तिच्यात बरीच सुधारणा आहे. या चांगल्या कामाने मला समाधान मिळाले.

10. तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी

प्रश्न 1.
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी
उत्तर:

11. खालील शब्दांसारखे दोन – दोन शब्द लिहा. 

प्रश्न 1.
खालील शब्दांसारखे दोन – दोन शब्द लिहा.
उत्तर:
(अ) सळसळ – (1) मळमळ (2) जळजळ
(आ) भुरभुर – (1) फुरफुर (2) गुरगुर
(इ) लुकलुक – (1) झुकझुक (2) टुकटुक
(ई) खडखड – (1) धडधड (2) बडबड

12. हे शब्द असेच लिहा.

प्रश्न 1.
हे शब्द असेच लिहा.
उत्तर:
उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.

13. खालील शब्द आपण कधी वापरतो?


आपण एका वस्तूबद्दल बोलू लागलो, की त्यास एकवचन म्हणतो आणि अनेकांबद्दल बोलू लागलो, की त्यास अनेकवचन म्हणतो.
उदा., एक झाड – अनेक झाडे.
खालील शब्दांच्या जोड्या वाचा व समजून घ्या.

उत्तर:

  • कृपया – विनंती करताना.
    उदा. ’कृपया, मला एक पेन्सिल दे.“
  • माफ करा – क्षमा मागताना.
    उदा. ’माफ करा. तुम्हांला चुकून धक्का लागला.“
  • आभारी आहे – आभार मानताना.
    उदा. ’तू मला पेन्सिल दिलीस, त्याबद्दल मी आभारी आहे.“

14. खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

प्रश्न अ.
बाबांचा सदरा उसवला.
उत्तर:
बाबांचा सदरा उसवला.

प्रश्न आ.
सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.
उत्तर:
सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.

प्रश्न इ.
पाकिटात पैसे नव्हते.
उत्तर:
पाकिटात पैसे नव्हते.

प्रश्न ई.
मुले बागेत खेळत होती
उत्तर:
मुले बागेत खेळत होती.

प्रश्न उ.
समोरून बैल येत होता.
उत्तर:
समोरून बैल येत होता.

प्रश्न ऊ.
सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.
उत्तर:
सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.

प्रश्न ए.
पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला.
उत्तर:
पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला.

Important Additional Questions and Answers

खालील वाक्यात रिकाम्या जागा भरून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.

  1. पायांतले …………… छुमछुम वाजवत ती घरभर फिरली.
  2. आगगाडी ………… करत चालली होती.
  3. तिचा चेहरा …………. दिसत होता.
  4. मी ……………. मांडीवर घेतले.
  5. स्टेशनवर ………….. घेऊन मामा आला होता.
  6. बैलांच्या गळ्यातील …………. खुळखुळ वाजत होत्या.
  7. मन …………… थुईथुई नाचत होते.
  8. आम्ही …………………. बिलगलो.
  9. आमची ………….. कधी संपली ते आम्हांला समजलेच नाही.

उत्तर:

  1. पैंजण
  2. झुकझुक
  3. प्रसन्न
  4. बाळाला
  5. बैलगाडी
  6. घुगूरमाळा
  7. आनंदाने
  8. आजीला
  9. सुट्टी

का ते लिहा.

प्रश्न 1.
रिमाचे डोळे लुकलुकत होते.
उत्तर:
खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे रिमाचे डोळे लुकलुकत होते.

प्रश्न 2.
सुट्टी कधी संपली, ते मुलांना समजलेच नाही.
उत्तर:
पोहणे, बागडणे, आंबे खाणे, शेतात-आमराईत जाणे या सर्व मजेत सुट्टी कधी संपली ते कळलेच नाही.

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
मावशींच्या मांडीवर कोण बसले होते?
उत्तर:
मावशींच्या मांडीवर छोटेसे बाळ बसले होते.

प्रश्न 2.
स्टेशनवर बैलगाडी घेऊन कोण आला होता?
उत्तर:
स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता.

प्रश्न 3.
शेतातली पिके कशी डुलत होती?
उत्तर:
शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती.

प्रश्न 3.
घरी येताच कोणी स्वागत केले?
उत्तर:
घरी येताच मामीने स्वागत केले.

प्रश्न 4.
आजीने मुलांचे लाड कसे केले?
उत्तर:
आजीने मुलांच्या डोक्यावरून, तोंडावरून प्रेमाने हात फिरवून मुलांचे लाड केले.

प्रश्न 5.
मुले कोठे पोहायला जात?
उत्तर:
मुले विहिरीवर पोहायला जात.

प्रश्न 6.
सुट्टी संपल्यावर सगळे कुठे परतले?
उत्तरः
सुट्टी संपल्यावर सगळे गावी आपल्या घरी परतले.

प्रश्न 7.
मुले मामाबरोबर कुठे फिरायला जात?
उत्तर:
मुले मामाबरोबर आमराईत फिरायला जात.

प्रश्न 8.
मामाच्या मुलांची नावे लिहा.
उत्तर:
राजू आणि चिमी ही मामाच्या मुलांची नावे आहेत.

खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
मामाच्या गावातील सायंकाळचे वर्णन करा.
उत्तर:
घरी जाण्यासाठी सर्व बैलगाडीत बसले. तोवर सायंकाळ झाली होती. पाने सळसळत होती. पाण्याची खळखळ, पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गाईंचे हंबरणे, बकऱ्यांचे बेंऽ बेंऽ ऐकू येत होते. शेतातील पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती.

प्रश्न 2.
मामाच्या घरी सर्वांचे स्वागत कसे झाले?
उत्तर:
मामा स्वत: बैलगाडी घेऊन स्टेशनवर घ्यायला आला होता. घरी येताच मामीने तोंडभर हसून सगळ्यांचे स्वागत केले, राजू व चिमी ही मामाची मुले वाटच पहात होती. ते सगळ्यांना कडकडून भेटले. आजी हळूहळू काठी टेकवत आली व तिने मुलांच्या डोक्यावरून, तोंडावरून प्रेमाने हात फिरवला.

व्याकरण व भाषाभ्यास:

  • एकवचन – जेव्हा आपण एका वस्तूबद्दल बोलतो तेव्हा ते एकवचन असते.
  • अनेकवचन – जेव्हा आपण अनेक वस्तूंबद्दल बोलतो तेव्हा ते अनेकवचन असते.

खालील शब्दांचे वचन बदला.

प्रश्न 1.

  1. आंबा
  2. आगगाडी
  3. केस
  4. खिडकी
  5. पीक
  6. धुंगूरमाळ
  7. पान
  8. घर
  9. पक्षी
  10. चेहरा
  11. नदी
  12. परीक्षा
  13. कैऱ्या

उत्तर:

  1. आंबे
  2. आगगाड्या
  3. केस
  4. खिडक्या
  5. पिके
  6. घुगूरमाळा
  7. पाने
  8. घरे
  9. पक्षी
  10. चेहरे
  11. नदया
  12. परीक्षा
  13. कैरी

खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

प्रश्न 1.
मुलांनी खाऊ खाल्ला.
उत्तर:
मुलांनी खाऊ खाल्ला.

खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. धमाल
  2. बिलगणे
  3. झुळूक
  4. छोटे
  5. बागडणे

उत्तरः

  1. मजा
  2. प्रेमाने जवळ येणे
  3. वाऱ्याची लहर
  4. लहान
  5. खेळणे.

प्रश्न 2.
‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.

  1. कोल्हा
  2. चिमणी
  3. कोकीळ
  4. कावळा

उत्तर:

  1. कुई कुई
  2. चिव-चिव
  3. कुहू कुहू
  4. काव-काव

प्रश्न 3.
खालील शब्दांसारखे दोन दोन शब्द लिहा.
उत्तर:

  • सरसर – (1) झरझर (2) घरघर
  • झपझप – (1) धपधप (2) रपरप

प्रश्न 4.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
तल्लीन होणे – मालिनी सतार वाजवताना तल्लीन होते.

लेखन विभाग:

प्रश्न 1.
खालील शब्द आपण कधी वापरतो? (कृपया, माफ करा, आभारी आहे.)

उत्तर:

  1. कृपया येथे माझे सामान ठेवाल कां?
  2. माफ करा माझ्या हातून कप फुटला.
  3. आपण मला मदत केलीत, आभारी आहे.

प्रश्न 2.
तुमच्या वर्गात तुम्ही कोणते सुविचार लिहाल?
उत्तर:

  1. प्रयत्न केल्याने यश मिळते. अपयशाने खचू नका.
  2. निसर्ग तुमचे भविष्य आहे. त्याची काळजी घ्या. निसर्ग जपा. झाडांशी मैत्री करा.
  3. चांगला आहार मन, बुद्धी व शरीराला पोषक असतो.
  4. खूप वाचा. खूप शिका. मोठ्यांचा आदर करा.
  5. अंधश्रद्धेला बळी पडू नका. ज्ञानाची ज्योत पेटवा.

प्रश्न 3.
बागेत तुम्ही कोणते सुचना फलक पाहता?
उत्तर:

प्रश्न 4.
सामाजिक समस्यांवर आधारित घोषवाक्ये लिहा.
उत्तर:

  1. पाणी जीवन आहे. जपून वापरा.
  2. नका तोडू वृक्ष, रहा नेहमी दक्ष.
  3. निसर्गाचा ठेवा मान, राखा पर्यावरणाचे भान.
  4. वीज, पाणी, पेट्रोल, डिझेल ही साधनसंपत्ती; नका करू नाश, नाहीतर ओढवेल आपत्ती.
  5. कापडी पिशव्यांची साथ खरी; प्लॅस्टिक नको दारोदारी.

Summary in Marathi

पाठ परिचयः

प्रस्तुत पाठात वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मामाच्या गावाला जाण्याचे प्रवासवर्णन व मामाच्या गावात पोहचल्यावर केलेली मौजमजा शब्दचित्रीत केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद कसा लुटला याचा अनुभव मांडला आहे.

शब्दर्थ:

  1. झुळूक – वाऱ्याची लहर (breeze)
  2. छोटे – लहान (small)
  3. गाढ झोपणे – शांत झोपणे (deep sleep)
  4. हंबरणे – गाईचा आवाज (bellow)
  5. प्रेमळ – प्रेमाने भरलेला (loving)
  6. धमाल – मजा (enjoyment, great fun)
  7. बागडणे – खेळणे (to play)
  8. कैऱ्या – कच्चे आंबे (raw mangoes)
  9. पाडाचा आंबा – अर्धवट पिकलेला आंबा (half riped mango)
  10. आमराई – आंब्यांची बाग (mango orchard)

वाक्प्रचार व अर्थ:

  1. तल्लीन होणे- दंग होणे, गुंग होणे
  2. गहिवरून येणे – मन भरून येणे
  3. कडकडून भेटणे – प्रेमाने मिठी मारणे
  4. गाठणे – जाऊन भेटणे
  5. बिलगणे – प्रेमाने आलिंगन देणे