Chapter 2 रोज मातीत

Day
Night

Chapter 2 रोज मातीत

Chapter 2 रोज मातीत

Textbook Questions and Answers

कृती 

1. अ. कृती करा

प्रश्न अ.
कृती करा


उत्तर :

आ. संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.

प्रश्न आ.

उत्तर :

2. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न 1.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
उत्तर :
कष्टकरी शेतकरी स्त्री शेतमळ्यामध्ये खणलेल्या चरात कांद्याची रोपे लावते. ते कांदे नव्हतेच; जणू ती स्वत:चा जीव कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न अ.
‘काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत आर्त शब्दांत व्यक्त केले आहे.

काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे. शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोसले जाते. म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री ‘आई’ असे संबोधते. लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते. ती तिची ‘काळी आई’ आहे. या काळ्या मातीवर स्वत:च्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते. तेव्हा या काळ्या-आईचे आपण पांग फेडले, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. जणू ती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.

पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंदण अशी हृदय कल्पना कवयित्रींनी केली आहे. स्त्रीसुलभ नितळ, प्रेमळ भावना या ओळीतून कमालीच्या साधेपणाने व्यक्त झाली आहे. शेतकरी स्त्रीच्या मनातील हृदय भाव या ओळींतून समर्पकरीत्या प्रकट झाला आहे.

प्रश्न आ.
‘नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवयित्री कल्पना दुधाळ यांनी ‘रोज मातीत’ या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन यथायोग्य शब्दांत चित्रित केले आहे.

शेतकरी स्त्री दिनरात शेतामधील अनेक कष्टांची कामे करते. ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते, तशी ती उसाची लागवडही करते. उसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये उसाची छोटी कांडे पेरावी लागतात. हे उसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते. बेणे नव्हे तर ती स्वत:चे मन त्यात दाबते. स्वत:ला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते. अशा प्रकारे काडी-काडी जोडून ती तिचा संसार सावरते. शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे.

शेतकरी स्त्री जी अहोरात्र शेतात जीव ओतून काम करते, त्याचे वर्णन करताना ‘मन दाबणे’ हा वाक्यप्रयोग करून शेतकरी स्त्रीचे मनोगत समर्थपणे कवयित्रीने या ओळीत व्यक्त केले आहे. काडी-काडी जोडून संसार सांधणे यातून तिच्या अविरत कष्टाचे यथोचित चित्र साधले आहे.

4. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यशोचित शब्दांत केले आहे. उपरोक्त ओळींमध्ये शेतात शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय असते याचे चित्र हृदय शब्दांत केले आहे.

काव्यसौंदर्य : शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेतजमिनीत अहोरात्र खपत असते. ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते. मन दाबून उसांची कांडे जमिनीत पुरते. हे कष्ट भर उन्हात, उन्हाची पर्वा न करता अविरत करीत असते. ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते. पुढचे हिरवे स्वप्न पाहते. सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते, तेव्हा जणू या हिरवेपणात तिचे कष्टच उगवून आलेले असतात. खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाजते. अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री रोज मातीत नांदत असते.

भाषासौंदर्य : अतिशय साध्या, सोज्ज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरीण आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात. तिच्या अभिव्यक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतांसारखा सैल छंद वापरला आहे. नादयुक्त शब्दकळा हा कवितेचा घाट आहे. त्यातल्या ‘हिरवे होऊन मागे उरणे’, ‘रोज मातीत नांदणे’ या प्रतिमा काळीज हेलावून टाकणाऱ्या आहेत. या कवितेत प्रत्ययकारी शब्द रचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारत व उलगडत जाते.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर :
‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे हृदयद्रावक चित्रण सार्थ शब्दांत केले आहे. कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या वाफ्यातील सरीत कांदे लावते. जीव ओतून काम करते. काळ्या मातीला हिरव्या गोंदणाने सजवते. सोन्यासारखी झेंडूची फुले तोडून, त्यांची माळ करून घरादाराला तोरण लावते.

उसाच्या पिकासाठी उसाची छोटी कांडे मातीत दाबते. जणू ती स्वत:चे मनच त्यात दाबते. काड्या-काड्या जमवून आपला संसार सांधते. उन्हातान्हात दिवसभर खपून भविष्यातले हिरवे सुगीचे स्वप्न पाहते. विहिरीचे पाणी शेंदन काढते. अशा प्रकारे अहोरात्र शेतात कष्ट करून शेतकरी स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राखण्यासाठी झटत असते. काळ्या आईच्या कुशीत हिरवेगार पिकाचे स्वप्न पाहत मातीतच नांदत असते.

प्रश्न आ.
तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर :
आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे. या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात. पहाटे पहाटे आपापल्या खोपटात चुलीवर जेवण करतात. जाळाचा धूर घरभर पसरलेला असतो. त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजवत भाजी-भाकरी करीत असतात. लगबगीने सर्व आवरून पटकुरात भाकरी गुंडाळून नि छोट्यांना कमरेवर घेऊन झपाझपा मजुरीसाठी निघतात.

कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात. ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवतात अन् मग रेतीची घमेली डोईवर घेऊन त्यांची मजुरी सुरू होते. न थकता ओझे उचलून नि शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करून इमानेइतबारे दिवसभर उन्हातान्हात पायऱ्यांवरून चढ-उतार करून आपले काम नेटाने करतात.

दुपारी थोडा वेळ एकत्र जमून मीठ-भाकर खाऊन तिथल्याच एखादया नळाचे पाणी पितात आणि पुन्हा झटझटून त्यांचे ओझी उचलणे सुरू होते. दिवस सरून गेल्यावर जड पावलांनी घरी परततात. मिळालेल्या रोजगारातून रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून घरी येतात. पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल, रडणारे मूल व ‘आ’वासलेली भुकेली तोंडे हेच येते. काहीही तक्रार न करता निमूटपणे ही कामगार स्त्री आपल्या संसारासाठी हाडाची काडे करून जगत असते.

उपक्रम :

प्रश्न अ.
शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

प्रश्न आ.
यू-ट्यूबवरील कवी विठ्ठल वाघ यांची ‘तिफण’ ही कविता ऐका.

तोंडी परीक्षा.

प्रश्न अ.
प्रस्तुत कवितेचे तालासुरात सादरीकरण करा.

प्रश्न आ.
प्रस्तुत कवितेचा सारांश तुमच्या शब्दांत सांगा.

कृती 1:

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. हिरवं गोंदलेली जमीन → [ ]
  2. फुले कोणती → [ ]
  3. घरादाराला बांधलेले → [ ]
  4. काड्या-काड्यांनी सांधलेला → [ ]
  5. यातून पाणी शेंदते → [ ]

उत्तर :

  1. हिरवं गोंदलेली जमीन → काळी आई
  2. फुले कोणती → झेंडूची फुले
  3. घरादाराला बांधलेले → तोरण
  4. काड्या-काड्यांनी सांधलेला → संसार
  5. यातून पाणी शेंदते → विहिरीतून

व्याकरण

वाक्यप्रकार :

प्रश्न 1.
वाक्याच्या आशयानुसार पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :
1. काल फार पाऊस पडला. → [ ]
2. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? → [ ]
उत्तर :
1. विधानार्थी वाक्य
2. प्रश्नार्थी वाक्य

वाक्यरूपांतर :

प्रश्न 1.
कंसांतील सूचनांप्रमाणे वाक्यरूपांतर करा :
1. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? (विधानार्थी करा.)
2. ही इमारत फारच उंच आहे. (उद्गारार्थी करा.)
उत्तर :
1. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो.
2. बापरे! केवढी उंच ही इमारत!

समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
1. घरोघर → ……………..
2. अहोरात्र → ……………
उत्तर :
1. घरोघर → प्रत्येक घरी
2. अहोरात्र → (अह) दिवस आणि रात्र.

प्रयोग :

प्रश्न 1.
पुढील वाक्यांचे प्रयोग ओळखा :

  1. समीर चित्र रंगवतो. → [ ]
  2. कमलने बक्षीस मिळवले. → [ ]
  3. सैनिकाने शत्रूला पराभूत केले. → [ ]
  4. स्वाती गाणे म्हणते. → [ ]

उत्तर :

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग।
  3. भावे प्रयोग
  4. कर्तरी प्रयोग

अलंकार :

प्रश्न 1.
पुढील उदाहरणातील उपमेय व उपमाने ओळखा :

  1. ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच.
    उपमेय → [ ] उपमान → [ ]
  2. नयन नव्हे हे पाकळ्या कमळाच्या.
    उपमेय → [ ] उपमान → [ ]

उत्तर :

  1. उपमेय → [आंबा] उपमान → [आंबा[
  2. उपमेय → [नयन] उपमान → [कमळ-पाकळ्या]

रोज मातीत Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

शेतामध्ये कष्ट उपसणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोगत व्यक्त करताना कवयित्री म्हणतात – शेतमळ्यामध्ये रोपे पेरण्यासाठी खोदलेल्या लांबलचक चरांमध्ये मी कांदयाची रोपे लावते आहे. हे कांदे नाहीत, तर मातीमध्ये पेरलेला हा माझा जीव आहे, प्राण आहे.

या माझ्या शेतातील काळ्या मातीला मी हिरव्या रोपांच्या रंगाने गोंदते आहे. गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. काळ्या मातीत हिरवे स्वप्न उसवते आहे. या शेतजमिनीतच माझा संसार आहे. या मातीतच मी नांदते आहे. सोन्यासारखी पिवळीधमक झेंडूची फुले तोडून मी परडीत गोळा करते. ही फुले नाहीतच; जणू माझे शरीर मी त्या देठापासून फुलांच्या रूपाने तोडते आहे.

खुडलेल्या टपोऱ्या झेंडूच्या फुलाची मी पताका करून, ती फुले माळेत गुंफून मी त्याचे तोरण घराच्या दाराला शुभचिन्ह म्हणून बांधत आहे. घरादाराचा असा उत्सव मी प्राणपणाने साजरा करते. मी या काळ्याभोर मातीत रोजची नांदत आहे, वावरत आहे.

उसाचे पीक येण्यासाठी वाफ्यातील चरात मी उसाची बारीक कांडे बियाणे म्हणून दाबून बसवते. खरे म्हटले तर ही उसांची कांडे नाहीतच, माझे मन मी त्यात दाबून बसवते आहे. मनापासून माझे मी शेतीचे काम आवडीने करते आहे.

काडी-काडी जोडून मी माझा प्रपंच सांधते आहे. म्हणजे कष्ट करून संसाराचा गाडा इमानाने स्वत:च्या हिमतीने ओढते आहे. संसारातील खस्ता खाते आहे. मी रोज या माझ्या प्रिय काळ्याशार मातीत नांदत आहे.

उन्हातान्हाची पर्वा न करता, मरणाची वेदना सहन करून मी रोज राबते आहे. जेव्हा पीक हिरवेगार होऊन काळ्या जमिनीत लहरेल, समृद्धीच्या रूपात मागे उरेन, तेव्हा या कष्टाचे फळ मला मिळेल, असा माझा ठाम विश्वास आहे. पिके हिरवीगार राहावीत व दाण्यांनी लगडावीत म्हणून मी खोल विहिरीत पोहरा टाकून पाणी उपसते व ते शेतात सोडते. अशा प्रकारे माझे हिरवे स्वप्न साकार होण्यासाठी मी दररोज या मातीत काया झिजवत आहे; कष्ट करीत आहे.

शब्दार्थ :

  1. वाफा – शेतमळा.
  2. नांदते – वावरते, आनंदाने स्थाईक होते.
  3. देह – शरीर.
  4. बेणं – बी, बियाणे, बीज.
  5. सांधते – जोडते.
  6. उन्हातान्हात – भर उन्हात.
  7. शेंदते – (आडातील पाणी) पोहऱ्याने उपसून काढते.

टिपा :

  1. सरी – रोप लावण्यासाठी खणलेले लांब चर.
  2. हिरवं गोंदण – हिरव्या पिकांनी ठसवलेली (जमीन).
  3. काळी आई – शेतकऱ्याची काळीभोर शेतजमीन.
  4. तोरण – शुभपताकांची माळ.
  5. झेंडू – एक प्रकारचे फूल.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. देह तोडणे – देह (शरीर) कष्टवणे.
  2. मन दाबणे – (मातीत) मन गाढणे, मनापासून कष्ट करणे.
  3. संसार सांधणे – प्रपंच सावरणे.
  4. पाणी शेंदणे – रहाटाद्वारे विहिरीचे पाणी उपसणे.