Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

Day
Night

Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

Textbook Questions and Answers

1. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा:

प्रश्न 1.
खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा:
उत्तर:

2. जोड्या लावा:

प्रश्न 1.
जोड्या लावा:
उत्तर:

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्रीविठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडला. श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये, म्हणून त्याच्यावर ‘तू म्हणजे मीच’ या अहंभावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की, मी तुझ्या हृदयात राहीन, पण सोहं शब्दांचा मारा थांबव.

प्रश्न (आ)
‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला ।।’ या ओळींतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा.
उत्तर:
संत जनाबाईंना श्रीविठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा, असे वाटत होते. म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहं शब्दाचा मार दिला. शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये; म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठलाने मनात घर करून राहावे, असे संत जनाबाईंना वाटत होते. *

प्रश्न (इ)
प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील श्रीविठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते लिहा.
उत्तर:

श्रीविठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा, असे संत जनाबाई यांना वाटते आहे. त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला. त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदिखान्यात डांबला. तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली. त्याच्यावर सोहं शब्दाचा मारा केला. इतकेच नव्हे; तर त्याला जीवे न सोडण्याची समज दिली. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्रीविठ्ठलाप्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे.

4. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:

माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी. एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते. निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. मानवी जीवनात निष्ठा, भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्त्व आहे. जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल, तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे.

उपक्रम:
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.

Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:

उत्तर:

 1. पंढरीचा चोर
 2. बंदिखाना
 3. हृदयाचा
  1. शब्दांची
  2. सोहं शब्दाचा

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा:
1. पंढरीचा चोर म्हणजे (श्रीकृष्ण/श्रीविष्णू /महादेव/श्रीविठ्ठल) .
2. श्रीविठ्ठल काकुलती आला; कारण
(अ) त्याच्या पायात बेडी घातली.
(आ) त्याला हृदयात कोंडला होता.
(इ) त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.
(ई) त्याच्या गळ्यात दोर बांधला.

उत्तर:

 1. विठ्ठलाला धरले – भक्तीच्या दोराने
  1. विठ्ठल काकुलती आला – ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने
  2. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी – शब्दरचनेच्या जुळणीने.
 2. पंढरीचा चोर म्हणजे श्रीविठ्ठल.
  1. श्रीविठ्ठल काकुलती आला; कारण त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी- (आ) धरिला पंढरीचा चोर.
उत्तर: संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर

1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत जनाबाई.
2. कवितेचा विषय → विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी, म्हणून त्याला मनाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवणे.

3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

 1. बेडी = साखळी
 2. जीव = प्राण
 3. पाय = पद
 4. हृदय = जिव्हार.

4. कवितेतून मिळणारा संदेश → भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते. परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी, या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा, म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा, म्हणून श्रीविठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदिखान्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे. चोर-शिपाई या रूपकांतून श्रीविठ्ठलाचा निरंतर सहवास. विठ्ठल हृदयात कायम राहावा हा भक्तिभाव.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:

‘सोहं शब्दाचा मारा केला।
विठ्ठल काकुलती आला ।।
→ संत जनाबाई यांनी श्रीविठ्ठलाला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवला. त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला. तेव्हा विठ्ठल जनाबाईंची व्याकुळ होऊन विनवणी करू लागला.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → श्रीविठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कैद करणे, ही संत जनाबाईंची श्रीविठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे. ‘प्राण गेला तरी तुला मी सोडणार नाही,’ या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा, ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे. त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला.

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘हृदय बंदिखाना केला।
आंत विठ्ठल कोंडिला।।’
उत्तर:
आशयसौंदर्य: श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा ‘धरिला पंढरीचा चोर’ हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते.

काव्यसौंदर्य: श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे. असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावा, म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

भाषाभ्यास:

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

 1. आत
 2. चोर
 3. सोडणे.

उत्तर:

 1. आत × बाहेर
 2. चोर × साव
 3. सोडणे × धरणे.

प्रश्न 2.
वचन ओळखा:

 1. जुड्या
 2. दोर
 3. हृदय
 4. बंदिखाने.

उत्तर:

 1. अनेकवचन
 2. एकवचन
 3. एकवचन
 4. अनेकवचन.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. बंदीखाना, बंदिखाना, बंधिखाना, बंदिकाना.
2. पंन्ढरी, पंढरी, पंढरि, पंडरी.
उत्तर:

1. बंदिखाना
2. पंढरी.

उपक्रम:

प्रश्न 1.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील स्त्री-संत कवयित्रींची माहिती मिळवा.

Summary in Marathi

कवितेचा आशय:

पंढरीचा विठ्ठल सदैव हृदयात राहावा; म्हणून त्याला बंदिवान करण्याची आस संत जनाबाईंनी या अभंगात व्यक्त केली आहे. त्यासाठी चोर-शिपायाचे रूपक कवितेत वापरले आहे.

शब्दार्थ:

 1. गळां – गळ्यामध्ये.
 2. बंदिखाना – तुरुंग, कैदखाना.
 3. कोंडिला – डांबून ठेवला.
 4. शब्दें – शब्दांनी.
 5. जवाजुडी – कड्यांची साखळी.
 6. पायीं – पायात.
 7. बेडी – जखडून ठेवण्याची साखळी, साखळदंड.
 8. सोहं – अहंकार, मीपणा, व्यर्थ अभिमान.
 9. काकुलती – विनवणी करणे.
 10. बा – अरे.
 11. जीवें न सोडी – जिवंत सोडणार नाही.

कवितेचा (अभंगाचा) भावार्थ:

श्रीविठ्ठलाबरोबर सुखसंवादरूपी लटके भांडण करताना संत जनाबाई म्हणतात:

गळ्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरीच्या चोराला (श्रीविठ्ठलाला) पकडले आहे. ।।1।।
माझ्या हृदयाचा कैदखाना करून मी त्यात विठ्ठलाला डांबून ठेवले आहे. ।।2।।
या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून मी शब्द जुळवून साखळी केली व विठ्ठलाच्या पायात भक्कम बेडी घातली आहे. (भजन गाऊन विठ्ठलाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.) ।।3।।
विठ्ठलावर मी (अहंकारी) अहंपणाचा भडिमार केला. ‘तू म्हणजे मीच’ असे सांगितले. तेव्हा विठ्ठल व्याकुळ झाला. विनवणी करू लागला. ।।4।।
संत जनाबाई म्हणतात – अरे, विठ्ठला, मी तुला जिवंत सोडणार नाही. (माझ्या मनात कायम तुझा वास राहील, अशी तजवीज करणार आहे.) ।।5।।