Chapter 20 सर्व विश्वचि व्हावे सुखी
Textbook Questions and Answers
कृति
कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…
प्रश्न 1.
खालील चौकटी पूर्ण करा.
(अ) संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना – [ ]
(आ) मानवी सुखदुःखाशी सहृदयतेने समरस होणे – [ ]
(इ) ‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत – [ ]
(ई) सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत – [ ]
(उ) संत तुकारामांचे जीवनसूत्र – [ ]
उत्तर:
(अ) संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना – [पसायदान]
(आ) मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे – [मैत्री]
(इ) ‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत – [संत एकनाथ]
(ई) सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत – [संत गाडगे महाराज]
(उ) संत तुकारामांचे जीवनसूत्र – [परस्पर सहकार्य]
प्रश्न 2.
आकृत्या पूर्ण करा.
उत्तर:
प्रश्न 3.
फरक संग
उत्तर:
प्रश्न 4.
खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा.
(अ) जे खळांची व्यंकटी सांडो – [ ]
(आ) दुरिताचे तिमिर जावो – [ ]
उत्तर:
(i) जे खळांची व्यंकटी सांडो – [माणसांच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे.]
(ii) दुरितांचे तिमिर जावो – [(दुरित म्हणजे दुष्कर्म.) सर्व दुष्कर्माचा अंधार नष्ट होऊ दे.]
प्रश्न 5.
खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा.
(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)
उत्तर:
प्रश्न 6.
स्वमत.
(अ) सर्व संतांच्या प्रार्थनमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
उत्तर:
संत स्वत:पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात. त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दलच कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो, त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संतमहात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे ज्ञानदेव म्हणतात, नामदेवांना वाटते की, सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वत:च्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात.
(आ) ‘भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:
या ओळीतील भूत, मैत्र आणि जीव’ हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. देह धारण करणारा प्रत्येकजण ‘भूत’ होय. म्हणून जगातली सगळी माणसे भूत होत. पण फक्त माणसेच नव्हेत, तर सूक्ष्मजीवांपासून ते हत्ती-गेंडे यांसारखे सर्व प्राणिमात्र भूत होत. तसेच. वृक्षवेली यासुद्घा सजीवच आहेत. त्यासुद्घा भूत होत. या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ, पवित्र अशी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे, ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टींवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टींच्या पलीकडे जायला सांगतात. प्रत्येक जण सुखीच असेल. नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत.
(इ) या पाठातून तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
सर्व संतांनी घ्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी. सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या त-हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती नांदेल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करु शकतात. अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात. इतरेजनांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला.
भाषाभ्यास
खालील ओळींतील वृत्त ओळखा.
(i) म्हणे वासरा । घात झाला असा रे
तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे
वृथा धाडिला राम माझा वनासी
न देखो शके त्या जगज्जीवनासी
(ii) अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी
कधि न मुळि न थांबे, कोणत्या कारणांनी
वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एक ठावे
स्वपर जनसमूहा सौख्य कारी बनावे
(iii) मातीत ते पसरले अति रम्य पंख।
केले वरी उदर पांडुर निष्कलंक।।
चंचू तशीच उघडी पद लांबवीले।
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले।।
उत्तर:
वृत्त: हे भुजंगप्रयात अक्षरगणवृत्त आहे.]
वृत्त: हे मालिनी अक्षरगणवृत्त आहे.
वृत्त: हे वसंततिलका अक्षरगणवृत्त आहे.
Additional Important Questions and Answers
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
(ii) संतांची भूमी – [ ]
(iii) संत म्हणजे – [ ]
(iv) सर्व संतांच्या प्रार्थनांमधून व्यक्त झालेली भावना – [ ]
उत्तर:
(i) संतांची भूमी – [महाराष्ट्र]
(ii) संत म्हणजे – [सत्पुरुष]
(iii) सर्व संतांच्या प्रार्थनांमधून व्यक्त झालेली भावना – [मानवता]
कृती २: (आकलन)
प्रश्न 1.
आकृत्या सोडवा:
उत्तर:
प्रश्न 2.
सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे, हे सांगताना दिलेला दाखला सांगा.
उत्तर:
पाने, फुले, फळे, झाडे, झरे, नदया, समुद्र, आकाशातील सर्व ग्रहगोल हे सारे एकोप्याने राहतात. त्यांच्यात कधीही कलह होत नाही, त्यांच्याप्रमाणेच सर्वांनी एकोप्याने राहावे, असा दाखला ज्ञानदेवांनी दिला आहे.
प्रश्न 3.
विधान पूर्ण करा:
पसायदान म्हणजे …………………..
उत्तर:
पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला हात जोडून केलेली प्रार्थना होय.
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1.
पुढे दिलेली वाक्ये वाचा आणि योग्य त्या नामासाठी योग्य ते सर्वनाम वापरा:
(i) ही संतांची खरी भूमिका आहे.
(ii) संतांच्या साहित्याचा आत्मा भक्ती हा आहे.
(iii) संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत.
उत्तर:
(i) ही संतांची खरी भूमिका आहे.
(ii) त्यांच्या साहित्याचा आत्मा भक्ती हा आहे.
(iii) ते परमेश्वराकडे स्वत:साठी काहीही मागत नाहीत.
प्रश्न 2.
‘विश्वकल्याण = विश्वाचे कल्याण’ यासारखे आणखी दोन शब्द विग्रहासह लिहा.
उत्तर:
(i) शांतिनिकेतन = शांतीचे निकेतन.
(ii) रजनीनाथ = रजनीचा नाथ.
प्रश्न 3.
अधोरेखित शब्दांचे अनेकवचन योजून वाक्य पुन्हा लिहा:
माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत ठेवला पाहिजे.
उत्तर:
माणसांच्या मनांतील माणुसकीचे झरे जिवंत ठेवले पाहिजेत.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
विधाने पूर्ण करा:
(i) आयुष्यात मोठे व्हायचे असेल, तर अंगी नम्रता हवी; म्हणजे अंगी नम्रता असेल, तर ……………………….
(ii) थोरांच्या चरित्रांतून आपल्याला शिकवण मिळते की, ……………………….
उत्तर:
(i) आयुष्यात मोठे व्हायचे असेल, तर अंगी नम्रता हवी; म्हणजे अंगी नम्रता असेल, तर आयुष्यात मोठे होता येईल.
(ii) थोरांच्या चरित्रांतून आपल्याला शिकवण मिळते की, विनम्रता ही केव्हाही जगाला आपलेसे करते.
प्रश्न 2.
स्पष्ट करा:
(i) सर्वांभूती भगवद्भावो.
(ii) संतसंग देई सदा.
उत्तर:
(i) सर्वांभूती भगवद्भावो म्हणजे प्राणिमात्रांशी मैत्री केली पाहिजे. येथे मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे माणसांच्या सुखदुःखांशी समरस होणे आणि असे समरस होताना आपपरभाव न बाळगणे.
(ii) संतांचा सदोदित सहवास लाभावा. त्यामुळे संतांचे गुण, त्यांची वृत्ती, त्यांचा दृष्टिकोन अंगी भिनतो. मग सगळेच जण परस्पर सहकार्यासाठी उभे ठाकतात. या परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधले जाते. म्हणून मला सदोदित संतांचा सहवास दें.
प्रश्न 3.
रामदासांनी दिलेला संदेश लिहा.
उत्तर:
संत रामदासांचा संदेश: हे परमेश्वरा, जनहित तेच बघ. सर्वांचे कल्याण कर.
प्रश्न 4.
गाडगेबाबांचा संदेश लिहा.
उत्तर:
संत गाडगे महाराजांचा संदेश: धर्मकार्यासाठी वाटेल तसा पैसा उधळण्यापेक्षा तोच पैसा शिक्षण मिळवण्यासाठी खर्च करावा. स्वत:च स्वत:च्या उद्धारासाठी सिद्ध झाले पाहिजे. त्यातच माणसाचे कल्याण आहे.
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1.
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा:
(i) कल्याण
(ii) वैयक्तिक
(iii) माणुसकी
(iv) समारोप.
उत्तर:
(i) कल्याण × अकल्याण
(ii) वैयक्तिक × सामूहिक
(iii) माणुसकी × माणुसकीहीनता
(iv) समारोप × सुरुवात
प्रश्न 2.
कंसात दिलेला प्रत्यय जोडून शब्दांचे पूर्ण रूप लिहा:
(i) भूमिका (ला)
(ii) झरा (चे)
(iii) ग्रंथ (ला)
(iv) नदी (ना).
उत्तर:
(i) भूमिकेला
(ii) झऱ्याचे
(ii) ग्रंथाला
(iv) नदयांना.
प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा:
(i) कळवळा
(i) कल्याण
(iii) प्रार्थना
(iv) सहृदयता.
उत्तर:
(i) कळवळा = करुणा
(ii) कल्याण = उत्कर्ष
(iii) प्रार्थना = विनंती
(iv) सहृदयता = सहानुभूती.
उतारा क्र.३
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
(i) संपूर्ण गावाची भगवद्गीता – [ ]
(ii) गावाचे मंदिर – [ ]
(iii) मंदिरातील मूर्ती – [ ]
उत्तर:
(i) संपूर्ण गावाची भगवद्गीता – [गावस्वच्छता]
(ii) गावाचे मंदिर – [संपूर्ण गाव]
(iii) मंदिरातील मूर्ती – [माणूस]
प्रश्न 2.
आकृत्या पूर्ण करा:
उत्तर:
(३) चौकटी पूर्ण करा:
उत्तर:
कृती २: (आकलन)
प्रश्न 1.
‘माणूस हा सामाजिक प्राणी आहे,’ या विधानाची सत्यता पटवून देणारी वाक्ये लिहा.
उत्तर:
(i) माणूस हा कधीही एकाकी राहू शकत नाही.
(ii) त्याला संवादाची नितांत गरज असते.
(iii) माणसाने कुणालाही दुखावता कामा नये.
(iv) शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडले पाहिजे.
प्रश्न 2.
‘हे विश्वचि माझे घर’ या ज्ञानदेवांच्या उद्गारामागील भावनेचा:
(i) आज पूर्ण होताना दिसून येणारा भाग:
(ii) आज आपण गमावलेला भाग:
उत्तर:
(i) आज पूर्ण होताना दिसून येणारा भाग: विज्ञान-तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे; लहान झाले आहे. आज माणसे सहजगत्या कुठेही जाऊ शकतात, राहू शकतात. जग जणू एक घरच बनले आहे.
(ii) आज आपण गमावलेला भाग: घरातल्या माणसांच्या मनात घरातल्या इतरांबद्दल जिव्हाळा, आपुलकी असते. थोडक्यात, आपापसांतील नात्यांत भावनेचा ओलावा असतो. आज आपण हा ओलावा गमावून बसलो आहोत. माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे.
प्रश्न 3.
झाड व पर्वत यांतील साम्य लिहा.
उत्तर:
झाड व पर्वत यांच्यात एक साम्य आहे. झाड स्वत: उन्हाचा ताप सहन करते आणि थंड सावली इतरांना देते. त्याप्रमाणेच पर्वतही वागताना दिसतो. पर्वताच्या कुशीत नदी उगम पावते. पण नदी तिथे थांबत नाही. ती पर्वतापासून दूर जाते. पर्वत तिचा हा वियोग सहन करतो आणि नदीला सर्व जगाची तहान भागवू देतो.
प्रश्न 4.
उत्तर:
कृती ३: (व्याकरण)
प्रश्न 1.
पुढील शब्दांतील प्रत्यय ओळखा आणि त्या प्रत्ययासह आणखी दोन शब्द लिहा:
(i) साधर्म्य
(ii) सहृदयता.
उत्तर:
(i) साधर्म्य – य:
सुंदर + य = सौंदर्य,
गद + य = गय.
(ii) सहृदयता – ता:
कोमल + ता = कोमलता,
विविध + ता = विविधता.
प्रश्न 2.
कंसांतील सूचनांनुसार उत्तर: लिहा:
(i) या संकल्पना संतसाहित्यातून प्रकट झाल्या आहेत. (भूतकाळ करा.)
(ii) हा ग्रंथ पूर्ण करण्याच्या तयारीत ते होते. (भविष्यकाळ करा.)
(iii) यातून प्रार्थना निर्माण झाली. (वर्तमानकाळ करा.)
उत्तर:
(i) या संकल्पना संतसाहित्यातून प्रकट झाल्या होत्या.
(ii) हा ग्रंथ पूर्ण करण्याच्या तयारीत ते असतील.
(iii) यातून प्रार्थना निर्माण होते.
प्रश्न 3.
कंसांतील सूचनेनुसार बदल करून वाक्ये पुन्हा लिहा:
(i) संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. (मिश्र वाध्य करा.)
(ii) वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. (केवल वाक्य करा.)
उत्तर:
(i) संत ज्ञानेश्वरांनी जी प्रार्थना सांगितली, ती मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे.
(ii) वैयक्तिक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण नेहमीच प्रार्थना करतो.
प्रश्न 4.
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांबद्दल पुढील माहिती लिहून तक्ता पूर्ण करा.
विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात.
उत्तर:
कृती ४: (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
समाजातील जिव्हाळा हरवल्याबद्दलची व्यक्त केलेली खंत व त्याचा परिणाम तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
सध्या जवळजवळ सर्वांच्या मनात इतरांबद्दल जिव्हाळा राहिलेला नाही. साध्या साध्या प्रसंगात माणसे हमरातुमरीवर येतात. साधे बसमध्ये चढताना लोक धक्काबुक्की करतात. त्यामुळे मुले, म्हातारी माणसे, आजारी माणसे व अपंग यांचे खूप हाल होतात. काही दुष्ट दुधात भेसळ करतात, अन्नपदार्थात भेसळ करतात. त्यामुळे कित्येकांना विषबाधा होते. काहीजणांना प्राण गमवावे लागतात. वाईट बांधकामामुळे रस्त्यांवर भीषण अपघात घडतात. घरे कोसळतात. पूल कोसळतात. त्यांत अनेकांचे अतोनात नुकसान होते. या माणसांवर कोणती संकटे कोसळतात, कोणत्या दु:खांना तोंड द्यावे लागते. याबद्दल भ्रष्टाचाऱ्यांना ना खेद वाटतो, ना खंत वाटते. इतरांबद्दल जिव्हाळाच वाटत नसल्याने अशी कृत्ये माणसांकडून घडून जातात.
व्याकरण व भाषाभ्यास
कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती:
१. समास:
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा:
उत्तर:
२. अलंकार:
रूपक अलंकाराची लक्षणे सांगून उदाहरण दया:
उत्तर:
लक्षणे: उपमेय व उपमान यांत एकरूपता असते व ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तिथे रूपक अलंकार होतो.
उदाहरण: काय बाई सांगो। स्वामीची ती दृष्टी।
अमृताची वृष्टी । मज होय ।।
४. शब्दसिद्धी:
* पुढील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा:
उत्तर:
५. सामान्यरूप:
तक्ता पूर्ण करा:
६. वाक्प्रचार:
(१) वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा:
(२) तक्ता पूर्ण करा: (सराव कृतिपत्रिका-१)
भाषिक घटकांवर आधारित कृती:
१. शब्दसंपत्ती:
(१) विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) आधुनिक × ……………………….
(ii) मर्यादित × ……………………….
(iii) स्मरण × ……………………….
(iv) तिमिर × ……………………….
(v) दुष्कर्म × ……………………….
(vi) स्वार्थ × ……………………….
(vii) व्यर्ध × ……………………….
(viii) वैयक्तिक × ……………………….
उत्तर:
(i) आधुनिक × प्राचीन
(iii) स्मरण × विस्मरण
(v) दुष्कर्म × सत्कर्म
(vii) व्यर्थ × सार्थ
(ii) मर्यादित × अमर्यादित
(iv) तिमिर × प्रकाश
(vi) स्वार्थ × निःस्वार्थ
(viii) वैयक्तिक × सार्वजनिक,
(२) समानार्थी शब्द लिहा: (प्रत्येकी दोन)
(i) [ ………. ] = [वृक्ष] = [ ………. ]
(ii) [ ………. ] = [समुद्र] = [ ………. ]
(iii) [ ………. ] = [सूर्य] = [ ………. ]
(iv) [ ………. ] = [चंद्र] = [ ………. ]
उत्तर:
(i) [ झाड ] = [वृक्ष] = [ तारू ]
(ii) [ सागर ] = [समुद्र] = [ सिंधू ]
(iii) [ रवी ] = [सूर्य] = [ भास्कर ]
(iv) [ शशी ] = [चंद्र] = [ रजनीनाथ ]
(३) पुढील शब्दांतील समानार्थी व विरुद्धार्थी शब्दाच्या चार जोड्या तयार करा: (सराव कृतिपत्रिका-१)
उत्तर:
(४) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा:
(i) तुकाराम → [ ] [ ] [ ] [ ]
(ii) महाराज → [ ] [ ] [ ] [ ]
(iii) गगनभरारी → [ ] [ ] [ ] [ ] (सराव कृतिपत्रिका-१)
उत्तर:
(i) तुकाराम → [राम] [कारा] [मका] [मरा]
(ii) महाराज → [महा] [राज] [जरा] [राम]
(iii) गगनभरारी → [नभ] [भरा] [राग] [रान]
(५) गटात न बसणारा शब्द लिहा:
(i) तम, तिमिर, समर, काळोख, अंधार.
(ii) उजेड, तेज, प्रकाश, आकाश, आभा.
(iii) खोदाई, लढाई, शिष्टाई, मुंबई. (सराव कृतिपत्रिका-२)
(iv) हरिहर, हररोज, हरघडी, हरसाल. (सराव कृतिपत्रिका-२)
उत्तर:
(i) समर
(ii) आकाश
(ii) मुंबई –
(iv) हरिहर लेखननियम:
(१) अचूक शब्द निवडा:
उत्तर:
(i) सहायक / साहय्यक / सहय्यक / सहाय्यक. – [सहायक]
(ii) उतरार्ध / उत्तरार्ध / उतर्राध/ उत्तर्राध. – [उत्तरार्ध]
(iii) अतिशयोक्ती / अतीशयोक्ती/ अतिशयोक्ति / अतीशयोक्ति. – [अतिशयोक्ती]
(iv) कल्पवृक्ष /कप्लवृक्ष / कल्पव्रक्ष / कल्पवृक्ष. – [कल्पवृक्ष] (सराव कृतिपत्रिका-१)
(v) उप्तन्न/उत्पन/ उत्पन्न/ऊत्पन्न. – [उत्पन्न]
(vi) सुचना / सूचना / सुचणा / सूचाना. – [सूचना]
(vii) स्मृतीदीन /स्मृतिदिन / स्मृतिदीन /स्मृतीदिन. – [स्मृतिदिन]
(viii) परंपरिक / पारंपारिक / परंपारिक / पारंपरिक. – [पारंपरिक]
(ix) तिर्थरूप/तीर्थरूप/तीर्थरुप / तिथरूंप – [तीर्थरुप]
(x) आशिर्वाद/आशीर्वाद/आर्शीवाद/आशिरवाद – [आशीर्वाद] (मार्च १९)
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
(i) शिक्षणामुळे माणुस सूसंस्क्रुत व्हावा.
(ii) आपल्या पूरवजांनी अर्जीठा वेरूळ बनवलाय. (सराव कृतिपत्रिका-१)
उत्तर:
(i) शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो.
(ii) आपल्या पूर्वजांनी अजिंठा वेरूळ बनवलाय.
३. विरामचिन्हे:
(१) पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा:
संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथात पसायदान आहे.
उत्तर:
[ ‘ ‘ ] → एकेरी अवतरणचिन्ह
[ . ] → पूर्णविराम.
(२) पुढील वाक्यात योग्य ती विरामचिन्हे भरून वाक्य पुन्हा लिहा:
निसर्गातील फुले फळे वृक्ष नदया समुद्र सूर्य चंद्र तारे एकोप्याने राहतात
उत्तर:
निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नया, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात.
(३) प्रस्तुत वाक्यातील चुकीची विरामचिन्हे ओळखा व दुरुस्त करून लिहा: (सराव कृतिपत्रिका-१)
मी तिला म्हटले. कर्त्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही!
उत्तर:
मी तिला म्हटले, “कव्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही?”
(४) पुढे विरामचिन्हाचा उपयोग दिला आहे त्यानुसार त्या आशयाचे विरामचिन्ह चौकटीत भरा: (सराव कृतिपत्रिका-१)
(i) बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी → [ ” ” ]
(ii) दोन शब्द जोडण्यासाठी किंवा जोडशब्दातील पदे सुटी करून दाखवण्यासाठी → [ – ]
४. पारिभाषिक शब्द: *पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:
उत्तर:
(i) Children’s Theatre – बालरंगभूमी
(ii) Daily Wages – दैनिक वेतन / रोजंदारी
(iii) Joint Meeting – संयुक्त सभा
(iv) Junior Clerk – कनिष्ठ लिपिक
(v) Letter-Head – नाममुद्रित प्रत
(vi) Up-to-date – अदययावत
(vii) Open Letter – अनावृत पत्र
(viii) Press Note – प्रसिद्धिपत्रक
(ix) Registered Letter – नोंदणीकृत पत्र
(x) Revaluation – पुनर्मूल्यांकन
(xi) Survey – सर्वेक्षण / पाहणी
(xii) Secretary – सचिव / कार्यवाह
५. अकारविल्हे / भाषिक खेळ:
(१) पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा:
(i) संत → महंत → साधू → महापुरुष.
(ii) संस्कृत → मराठी → हिंदी → इंग्रजी.
उत्तर:
(i) महंत → महापुरुष → संत → साधू.
(ii) इंग्रजी → मराठी → संस्कृत → हिंदी.
(२) आकृती पूर्ण करा:
उत्तर:
सर्व विश्वचि व्हावे सुखी शब्दार्थ
- साधर्म्य – समान गोष्ट.
- चिरंजीव – चिरकाल टिकणारी गोष्ट.
सर्व विश्वचि व्हावे सुखी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
- साकडे घालणे : विनवणी करणे.
- आपलेसे करणे : आपुलकी निर्माण करणे,
- समरस होणे : एकरूप होणे.